
मनीष मल्होत्राने त्याच्या घरी पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टीला सलमान खान, ऐश्वर्या राय, रेखा, गौरी खान, सुहाना, खुशी कपूर, अनन्या पांडे, वरुण धवन, शाहिद कपूर आणि इतर बड्या कलाकारांनी हजेरी लावली. समोर आलेल्या माहितीनुसार, दबंग खानची एण्ट्री झाली तेव्हा ऐश्वर्या राय बच्चन या पार्टीमधून बाहेर पडताना दिसत होती. ते दोघे एकमेकांसमोर आले तेव्हा त्यांनी एकमेकांना मिठी मारली.








