Sunday, September 20, 2026
Homeमनोरंजनबिग बॉस मराठी ५ ची ट्रॉफी बारामतीचा सुरज चव्हाणच्या नावे, रीलस्टारची पहिली...

बिग बॉस मराठी ५ ची ट्रॉफी बारामतीचा सुरज चव्हाणच्या नावे, रीलस्टारची पहिली ऐतिहासिक विजय

फलटण :- गेली अनेक दिवस प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण अखेर आला आहे. ‘बिग बॉस मराठी ५’ चा महाअंतिम सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आणि बारामतीचा सुपुत्र सुरज चव्हाण या सिझनचा विजेता ठरला आहे. विशेष म्हणजे सुरज हा पहिला रीलस्टार ठरला आहे, ज्याने ‘बिग बॉस मराठी’ ची ट्रॉफी जिंकली आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला असून, सुरजवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

सुरज चव्हाणची कथा खरंच प्रेरणादायक आहे. गुलिगत धोका फेम सुरज हा बारामतीतील एका छोट्या गावातून आलेला आहे. रील बनवत सुरजने टिकटॉकवर प्रसिद्धी मिळवली होती, मात्र त्याचा प्रवास सहज नव्हता. गरीब कुटुंबातून आलेल्या सुरजने अनेक संघर्ष झेलले. जीवन जगण्यासाठी त्याला वेळप्रसंगी माथाडी कामगाराचं कामही करावं लागलं. शिक्षणात फारसे प्रावीण्य नसल्याने बिग बॉसच्या घरात त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळेच सुरुवातीला त्याने या कार्यक्रमात सहभागी होण्यास नकार दिला होता. मात्र, ‘बिग बॉस मराठी’च्या टीमने त्याच्याशी बोलून त्याला सामील होण्यासाठी प्रवृत्त केले.

सुरजने आपल्या साधेपणाने, सगळ्यांशी आदराने वागून, आणि टास्कमधील उत्कृष्ट कामगिरीने प्रेक्षकांची आणि सहकाऱ्यांची मने जिंकली. त्याला मिळालेला प्रचंड जनसमर्थन त्याच्या या यशाचे कारण ठरले. अखेर सगळ्या अडचणींवर मात करत, सुरजने बारामतीचा किंग म्हणून आपले स्थान निर्माण केले आहे.

आता ‘बिग बॉस मराठी ५’ च्या ट्रॉफीने सन्मानित झाल्यानंतर त्याच्यावर चाहत्यांकडून शुभेच्छांचा ओघ सुरू आहे. सुरजच्या विजयामुळे तळागाळातील लोकही ‘बिग बॉस मराठी’ सारख्या कार्यक्रमाशी आपलेपणाने जोडले गेले आहेत. बारामतीतील सुरजचे स्वागत कसे होणार याची उत्सुकता आता साऱ्यांना लागून राहिली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments