Sunday, October 4, 2026
Homeक्रीडाRavindra Jadeja : बायकोची कृपा... जडेजाने रिवाबाला केला सामनावीर पुरस्कार समर्पित |...

Ravindra Jadeja : बायकोची कृपा… जडेजाने रिवाबाला केला सामनावीर पुरस्कार समर्पित | पुढारी

[ad_1]








राजकोट, वृत्तसंस्था : भारत आणि इंग्लंड यांच्यात राजकोटच्या निरंजन शहा क्रिकेट स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या तिसर्‍या कसोटी सामन्यात रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) पहिल्या डावात शतकी खेळी केली, तर दुसर्‍या डावात 5 विकेटस् घेत आपण जगातील अव्वल दर्जाचा अष्टपैलू आहोत, हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले. जडेजाला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. त्याने हा पुरस्कार पत्नी रिवाबाला समर्पित केला. मला मानसिकद़ृष्ट्या खंबीर ठेवणे ही तिची कृपा आहे, असे तो म्हणाला.

भारताने इंग्लंडचा 434 धावांनी पराभव केला. दुसर्‍या डावात इंग्लंडचा संघ 122 धावांत गारद झाला. या डावात भारताचा डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाने 5 विकेटस् घेतल्या. जडेजाने सांगितले की, रिवाबाने मला मानसिकद़ृष्ट्या खंबीर राहण्यासाठी मदत केली आहे. जडेजाने होम ग्राऊंडवर जिंकलेला सामनावीराचा पुरस्कार पत्नीला समर्पित केला. ‘माझ्या घरच्या मैदानावरचा हा सामनावीराचा पुरस्कार खास आहे. मी तो माझ्या पत्नीला समर्पित करतोय. पडद्यामागे ती मला मानसिक पाठबळ देते. ती कायम माझा आत्मविश्वास वाढवत असते.’ (Ravindra Jadeja)









[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments