Rashmi Shukla : रश्मी शुक्ला बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक, पदभार स्वीकारताच म्हणाल्या..

0
17
Rashmi Shukla : रश्मी शुक्ला बनल्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक, पदभार स्वीकारताच म्हणाल्या..


१९८८ बॅचच्या आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला महाराष्ट्राच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक बनल्या आहेत. त्यांनी आज (मंगळवार) आपल्या पदाची सुत्रे स्वीकारली. त्यांच्या बॅचचे माजी पोलीस महासंचालक रजनीश शेट डिसेंबर महिन्यात निवृत्त झाले होते. त्यानंतर त्यांची नियुक्ती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या चेअरमनपदी करण्यात आली आहे. रश्मी शुक्ला यांनी मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्याकडून महाराष्ट्र पोलीस महासंचालकपदाची सुत्रे घेतली. रजनीश सेट निवृत्ती झाल्यापासून महाराष्ट्र डीजीपीचा अतिरिक्त कार्यभार त्यांच्याकडेच होता.



Source link