श्रीमंत रामराजे मोटार वाहतूक संस्थेची 24 वी वार्षिक सर्वसाधारण सभा यशस्वीरित्या संपन्न

0
5
श्रीमंत रामराजे मोटार वाहतूक संस्थेची 24 वी वार्षिक सर्वसाधारण सभा यशस्वीरित्या संपन्न


फलटण: येथील श्रीमंत रामराजे मोटार वाहतूक संस्थेची 24 वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज रविवार, 29 सप्टेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता संस्थेचे चेअरमन श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली गोविंद मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्ट्स प्रा. लि. च्या सभागृहात यशस्वीरित्या संपन्न झाली. या सभेसाठी संस्थेचे सर्व सभासद आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभेमध्ये मागील सभेचा वृत्तांत वाचन करून मंजूर करण्यात आला. व्यवस्थापक मंडळाने सादर केलेला अहवाल, नफा-तोटा व ताळेबंद पत्रकाचे वाचन करण्यात आले. नफा वाटणीपत्रक आणि अंदाजपत्रकावरही चर्चा करून त्यास मंजुरी देण्यात आली. लेखापरिक्षणाची दोषदुरुस्ती आणि स्थानिक हिशोब तपासणीसाठी निरीक्षक नेमण्याचे कामही करण्यात आले. शेवटी अध्यक्षांच्या मान्यतेने इतर महत्त्वाच्या विषयांचा विचार करून सभा संपन्न झाली.