Ram Mandir Inauguration | पुण्यातून तरुणाची थेट अयोध्येपर्यंत सायकलस्वारी; ‘असा’ असणार प्रवास | Navarashtra (नवराष्ट्र)

0
16
Ram Mandir Inauguration  | पुण्यातून तरुणाची थेट अयोध्येपर्यंत सायकलस्वारी; ‘असा’ असणार प्रवास | Navarashtra (नवराष्ट्र)


पुण्यातून तरुणाची थेट अयोध्येपर्यंत सायकलस्वारी; ‘असा’ असणार प्रवास

अयोध्येतील राम मंदिर उद्घाटनासाठी पुण्यातील तरुण आशिष दुसाने पुणे ते अयोध्या सायकल प्रवास करणार आहे,

पुणे : अयोध्येतील (Ayodhya) राम मंदिर उद्घाटनासाठी (Ram Mandir Inauguration) अवघा देश जय्यत तयारी करत आहे. 22 जानेवारी रोजी रामलल्लाची मंदिरामध्ये भक्तीमय व उत्साहपूर्ण वातावरणामध्ये प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे. जगभरातील हिंदू बांधवांचे या सोहळ्यावर लक्ष राहणार आहे. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने या ऐतिहासिक सोहळ्याची तयारी करत आहे. दरम्यान, पुण्यातून (Pune) एका तरुणाने पुणे ते अयोध्या असा सायकल प्रवासाचा निर्धार केला आहे. लोकप्रबोधन करत या तरुणाने प्रवास सुरु केला असून येत्या 22 तारखेला तो अयोध्येमध्ये पोहचणार आहे.

मुळचा खान्देश येथील असणारा आशिष दुसाने हा तरुण अयोध्या मंदिर उद्घाटनासाठी सायकलने उत्तर प्रदेशला जाणार आहे. हा तरुण जळगावच्या अमळनेरचा रहिवासी आहे. तो अयोध्येत रामलल्लाच्या उत्सवासाठी शिवजन्मभूमी जुन्नर पुणे ते रामजन्मभूमी अयोध्या अशी सायकलवारी करत आहे. पुण्यातील पुणेश्वर, काशी विश्वेश्वर आणि श्रीकृष्ण भूमी मुक्त करण्याबद्दल तो रामाकडे साकडे घालणार आहे. आज या तरुणाने अमळनेर येथे प्रवेश केल्यानंतर त्याचे जोरदार स्वागत करण्यात आले.






Source link