Raju dengre murder : भाजपचे नागपूर ग्रामीणचे पदाधिकारी राजू डेंगरे यांचा निर्घृण खून; फरार आरोपींचा शोध सुरू

0
22
Raju dengre murder : भाजपचे नागपूर ग्रामीणचे पदाधिकारी राजू डेंगरे यांचा निर्घृण खून; फरार आरोपींचा शोध सुरू

पैशांसाठी खून?

राजू डेंगरे यांचा खून त्यांच्याच ढाब्यावरील कर्मचाऱ्यांनी केल्याचा संशय आहे. डेंगरे यांच्याकडील पैसे देखील हल्लेखोरांनी पळवल्याचं बोललं जात आहे. डेंगरे यांचा खून केल्यानंतर आरोपी ज्या गाडीतून पळून गेले, त्या गाडीला अपघात झाल्याचं आढळून आलं आहे. मात्र, आरोपी फरार आहेत. या प्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. डेंगरे यांच्या खुनामागे राजकीय हेतू आहे की आणखी काही हे देखील तपासलं जात आहे.

Source link