Monday, September 28, 2026
Homeदेश-विदेशRain Update | केरळ, कर्नाटकसह देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; तर...

Rain Update | केरळ, कर्नाटकसह देशातील 12 राज्यांना मुसळधार पावसाचा इशारा; तर उत्तर भारतात… | Navarashtra (नवराष्ट्र)

[ad_1]

Rain On Umbrella - Weather Concept

Rain On Umbrella – Weather Concept

मान्सूनही अपेक्षित वेळेच्या 4 दिवस आधी गुजरातमध्ये दाखल झाला आहे. बुधवारी राज्यातील बहुतांश जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. याशिवाय मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड आणि ओडिशामध्ये हलक्या पावसाची बातमी आहे.

नवी दिल्ली : सध्या देशातील अनेक जिल्ह्यांमध्ये मान्सूनच्या पावसाने (Rain News) दमदार हजेरी लावली आहे. त्यातच आता हवामान विभागाने देशातील 12 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. यामध्ये बंगाल, सिक्कीम, आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, केरळ, कर्नाटक आणि तेलंगणा यांचा समावेश आहे.

मान्सूनही अपेक्षित वेळेच्या 4 दिवस आधी गुजरातमध्ये दाखल झाला आहे. बुधवारी राज्यातील बहुतांश जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. याशिवाय मध्य प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड आणि ओडिशामध्ये हलक्या पावसाची बातमी आहे. दुसरीकडे, उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये तीव्र उष्णता जाणवत आहे. हवामान खात्याने उत्तर प्रदेश, बिहार आणि झारखंडमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, दिल्ली, ओडिशा, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्येही उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.




[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments