Railway Food: रेल्वेत निकृष्ट जेवण, ४ ऐवजी २ चपात्या, डाळ पातळ; IRCTC ने कॅटररला ठोठावला ५ हजार दंड

0
14
Railway Food: रेल्वेत निकृष्ट जेवण, ४ ऐवजी २ चपात्या, डाळ पातळ; IRCTC ने कॅटररला ठोठावला ५ हजार दंड


IRCTC च्या मेन्युमध्ये एका व्हेज थाळीमध्ये दोन पराठे किंवा चार चपात्या, १५० ग्रॅम साधा भात, १५० ग्रॅम घट्ट डाळ किंवा सांबर, ८० ग्रॅम दही, लोणचे असे पदार्थ नमूद आहे. परंतु पँट्री कारमधून आलेल्या जेवणाच्या थाळीत दोनच चपात्या होत्या. डाळ पाण्याप्रमाणे अगदी पातळ होती. शिवाय थाळीमध्ये दही नव्हते. त्याबाबत पँट्री कारच्या वेटरला विचारले असता , ‘या गाडीत एवढेच जेवण असते… दही संपले आहे… डाळ पुरेशी येत नसल्याने डाळी पातळ आहे…’ अशी कारणे पुढे केली गेली. तसेच थोड्या वेळाने एक वेटर ३०-४० रुपयांप्रमाणे इतर प्रवाशांना सुट्टे दही विकत असल्याचे दिसून आले. हा उघड उघड नियमांचा भंग असून सेवेत कुचराई करणे सरू असल्याचे गुप्त यांना दिसून आले. त्यांनी झालेल्या प्रकाराची इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिजम कॉर्पोरेशन लिमिटेडकडे (IRCTC) इमेलने तक्रार केली.



Source link