Pune Parinche accident: पुण्यात पुरंदर तालुक्यात परिंचे येथे दोन दुचाकींची भीषण धडक; दोघे जागीच ठार तर तिघे जखमी

0
16
Pune Parinche accident: पुण्यात पुरंदर तालुक्यात परिंचे येथे दोन दुचाकींची भीषण धडक; दोघे जागीच ठार तर तिघे जखमी


याबाबत सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत चंद्रकांत संपत दानवले हे शुक्रवार (दि. ३) शुक्रवारी त्यांच्या दुचाकीवरुन (क्रमांक एमएच १२ जेपी ९४८९) वरून परिंचे कडून सटलवाडी येथे जात होते. तर संजय जयसिंग नानगुडे हे त्यांच्या जवळील अक्टीव्हा दुचाकीने (क्रमांक एम एच १२ इएक्स ०५३२) सटलवाडी कडून शिवतारेवस्ती ते पोलदरा च्या दरम्यान जात होते. यावेळी दोन्ही दुचाकींची अचानक समोरासमोर भीषण धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता कि, अपघात झाल्यावर दोन्ही दुचाकी उडून दूरवर फेकल्या गेल्या. या घटनेमुळे चंद्रकांत दानवले आणि संजय नानगुडे यांहे गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्या एका दुचाकीवरील इतर तिघेही गंभीर जखमी झाले. याबाबत सासवडचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अनिल खोमणे पुढील तपास करीत आहेत. या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.



Source link