
Pune metro time table: सध्या दिवाळी सण सुरू आहे. रविवारी लक्ष्मी पूजणाच्या दिवशी मेट्रोच्या वेळापत्रकात मोठा बदल करण्यात आला असून याची दखल घेऊन पुणेकरांनी मेट्रो प्रवास करावा असे आवाहन करण्यात आले आहे. रविवारी पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. पुणे मेट्रो सेवा ही सकाळी ६ वाजेपासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. तर सोमवारपासून पुणे मेट्रोची सेवा नेहमीप्रमाणे सकाळी ६ ते रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहणार आहे, असे मेट्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.





