
पाच दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर आज गणेश दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात लोक बाहेर पडले आहेत.आज रविवारी सर्वांनाच सुट्टीचा दिवस असल्याने मोठ्या संख्येने गणेशभक्त बाहेर पडले आहेत. यंदा गणेशोत्सवामध्ये एकच शनिवार-रविवार आल्याने या गर्दीचे प्रमाणहीवाढले.मुंबईत तर याआधीच गर्दीने रेकॉर्ड तोडला आहे. पण,आता पुण्यातही अलोट गर्दी जमली आहे.





