Pune Fire: पुण्याच्या मार्केट यार्डातील झोपडपट्टीला मोठी आग, सिलिंडरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती

0
14
Pune Fire: पुण्याच्या मार्केट यार्डातील झोपडपट्टीला मोठी आग, सिलिंडरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती

पुण्याच्या मार्केट यार्ड परिसरातील डॉ. आंबेडकरनगर झोपडपट्टीत शनिवारी दुपारी आग लागली. दुपारी चार वाजताच्या सुमारास ही आग लागली. अग्नीशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सिलिंडरच्या स्फोटामुळे ही आग लागल्याचे प्राथमिक माहिती आहे. या झोपडपट्टीतील गल्ली क्रमांक ११ मधील एका झोपडीत सिलिंडरचा स्फोट झाला. सिलिंडरच्या स्फोटामुळे लागलेली आग झपाट्याने पसरली, असे सांगण्यात येत आहे.

Source link