Pune cylinder Blast : पुण्यात मोठी दुर्घटना टळली! मांजरी येथे गोडाऊन मधील सहा सिलेंडरचा स्फोट; अग्निशामक दलाची तत्परता

0
13
Pune cylinder Blast : पुण्यात मोठी दुर्घटना टळली! मांजरी येथे गोडाऊन मधील सहा सिलेंडरचा स्फोट; अग्निशामक दलाची तत्परता


मांजरी येथील वेल्हेकर वस्ती येथे एका सिलेंडरच्या गोडाऊनमध्ये आग लागल्याची वर्दी मिळाली. या घटनेची तातडीने दखल घेत अग्निशामक दलाकडून काळे बोराटे नगर, हडपसर, बी टी कवडे रोड अग्निशमन केंद्र व मुख्यालयातून एक वॉटर टँकर त्वरित रवाना करण्यात आला.घटनास्थळी जवान पोहोचताच येथील शिवतेज गॅस सेल्स सर्व्हिसेस या पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या गॅस गोडाउनमधे आग लागली होती. येथील सहा सिलेंडरने पेट घेतला होता. जवानांनी तातडीने आगीवर पाण्याचा मारा करुन सुमारे वीस मिनिटात आगीवर नियंञण मिळवले. या ठिकाणी सहा छोटे सिलेंडर फुटल्याचे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. अग्निशमन दल वेळेवर पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत सुदैवाने जीवित हानी अथवा कुणी जखमी झाले नाही. मोठ्या गॅस सिलेंडर मधून छोट्या गॅस सिलेंडरमधे गॅस भरताना आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. अग्निशमन अधिकारी प्रमोद सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी आग विझवत धोका दूर केला.



Source link