Thursday, August 27, 2026
Homeसातारा४३ माढा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या...

४३ माढा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ सोमवार दिनांक २९ रोजी सायंकाळी ६-०० वाजता गजानन चौक फलटण येथे शरद पवार यांची जाहिर सभा

फलटण : ४३ माढा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ सोमवार दिनांक २९ रोजी सायंकाळी ६-०० वाजता गजानन चौक फलटण येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा मा.शरद पवार यांची जाहीर सभा होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे. माढा लोकसभा मतदार संघात प्रचाराच्या यंत्रणेला वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार)पक्षानेही तोडीस तोड प्रचार यंत्रणा राबवित माढा मध्ये शरद पवार यांची प्रत्येक तालुक्यात एक सभा घेतली असून,फलटण मधील सभेत शरद पवार काय बोलणार या कडे मतदारांचे लक्ष निश्चितच लागून राहणार आहे. या सभेस सातारा जिल्ह्यातील व माढा लोकसभा मतदार संघातील अनेक राजकीय दिग्गज उपस्थित राहणार असून

प्रचंड संख्येने मतदारांनी आपली उपस्थिती दाखवावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments