Thursday, August 20, 2026
Homeमहाराष्ट्ररणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा माढा...

रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये संपन्न होणार आहे.

माढा लोकसभा मतदारसंघाचे महायुती अर्थात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार तथा विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये संपन्न होणार आहे. यासाठी माळशिरस येथील जागेची पाहणी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी नुकतीच केली आहे.

भारतीय जनता पार्टीने माढा लोकसभा मतदारसंघाची निवडणुक ही अत्यंत प्रतिष्ठेची केली आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील हालचालींवर राज्य व देश पातळीवरून अनेक दिग्गज मान्यवर वॉच ठेवून आहेत.

खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अत्यंत निकटचे खासदार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीबाबत विचारणा केलेली होती. याबाबतची माहिती प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी स्वतः जाहीर कार्यक्रमांम दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या असलेल्या संबंधामुळे व खासदार निंबाळकर यांनी माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये केलेल्या विकास कामांमुळे माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा संपन्न होणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments