
अकोल्यात माध्यमांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं की, आपल्याला सत्ता मिळाली तर आपण मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी यांना तुरुंगात पाठवू, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विजयादशमी उत्सवातील भाषणावर टीका करताना म्हटलं की, भागवत यांनी २०२४ च्या निवडणुकीसाठी लोकांना भडकावून मतं घेतली जाण्याची शक्यता वर्तवली आहे. यावर प्रकाश आंबेडकर यांनी जोरदार टीका केली आहे. मोहन भागवतांचे भाषण म्हणजे चोराच्या मनात चांदणं आहे.लोकांची मन खराब करणारे तेच आहेत.





