Wednesday, July 1, 2026
Home Blog Page 88

झोपेत असताना अचानक पडल्यासारखं का वाटतं? ‘आरोग्याला धोका…’; डॉक्टराने सांगितलं त्यामागील वैज्ञानिक कारण

0
झोपेत असताना अचानक पडल्यासारखं का वाटतं? ‘आरोग्याला धोका…’; डॉक्टराने सांगितलं त्यामागील वैज्ञानिक कारण


या जगात असंख्य माणसं आहेत आणि त्याच्या तेवढ्याच सवयी असतात. झोपेबद्दल अनेक सवयी असतात, तर अनेक समस्या पण असतात. आपण अंथरुणात शांत झोपतो पण अनेक वेळा हो अनेक वेळा असं वाटतं की, अचानक झटक्याने जाग येते, असं वाटतं उंचीवरून पडतोय. त्यानंतर दचकून जाग येते. या विचित्र या समस्यामागे तितकंच मनोरंजक वैज्ञानिक कारण आहे. इंग्लंडमधील ब्रॅडफोर्ड इथे राष्ट्रीय आरोग्य सेवा (NHS) चे जनरल प्रॅक्टिशनर डॉ. आमिर खान यांनी यामागील कारण सांगितलं आहे.

Add Zee News as a Preferred Source

हिपनिक जर्क म्हणजे काय?

वैज्ञानिक भाषेत या समस्येला हिपनिक जर्क असं म्हणतात. तुम्ही झोपायला जाता तेव्हा तुमचे शरीर आणि स्नायू हळूहळू आरामाच्या मोड म्हणजे जातो. कधीकधी, तुमचा मेंदू या विश्रांतीचा चुकीचा अर्थ झोपेचे लक्षण म्हणून घेतो. याचा अर्थ तुमचे शरीर सामान्यपणे झोपायला जात आहे, पण तुमच्या मेंदूला काहीतरी गडबड असल्याचे जाणवतं आणि तो तुमचे रक्षण करण्याचा प्रयत्न करतो.

मेंदू अचानक धक्का का देतो?

‘पडण्याच्या’ या खोट्या धोक्याला मेंदू शरीराला एक शक्तिशाली सिग्नल पाठवून प्रतिसाद देतो, जेणेकरून तुम्ही ‘स्वतःला पकडू शकता.’ यामुळे अचानक धक्का बसतो, हालचाल होते किंवा अचानक जाग येते. हे सर्व काही सेकंदाच्या काही अंशात घडतं.

ही आपल्या पूर्वजांची सवय आहे का?

अनेक शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, हा धक्का आपल्या प्राचीन प्रवृत्तींशी जोडलेला आहे. जेव्हा मानव झाडांवर झोपत असे, तेव्हा थोडासा तोलही बिघडणे धोकादायक ठरायचा. शरीराचा अचानक होणारा धक्का हा पडण्यापासून संरक्षणात्मक यंत्रणा असण्याची शक्यता आहे. कालांतराने, ही सवय कायम राहिली असून, जरी आपण आता झाडांवर झोपत नाही.

या समस्यामुळे आरोग्याला धोका!

हिप्निक झटके पूर्णपणे सामान्य आणि सुरक्षित असून ते कोणत्याही आजाराचे लक्षण नाहीत किंवा कोणत्याही गंभीर समस्येशी संबंधित नाहीत. उलट, ते शरीराचे एक छोटेसे प्रतिक्षेप आहेत. जसे की डोळ्यावर प्रकाश पडल्यावर डोळे मिचकावणे.

जरी हे कोणालाही होऊ शकते, पण काही विशिष्ट परिस्थितींमुळे ते अधिक सामान्य होते.

जास्त ताण
खूप थकलो आहे
रात्री कॅफिनचे सेवन
अस्वस्थता किंवा सतत धावपळीचा दिवस
या परिस्थितीत, मेंदू अधिक सक्रिय राहतो, ज्यामुळे तो झोपताना शरीराच्या विश्रांतीला ‘अलार्म’ म्हणून पटकन समजतो.

पुढच्या वेळी असे घडले तर घाबरू नका!

जर हा धक्का तुम्हाला कधी त्रास देत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा की, ही एक पूर्णपणे सामान्य गोष्ट आहे. तुमचे शरीर फक्त एका जुन्या सवयीचे पालन करत आहे. तुमचा मेंदू फक्त अधिक सक्रिय राहण्याच्या त्याच्या सवयीशी जुळवून घेत आहे. झोपेतील हा छोटासा धक्का विचित्र वाट असल्या तरी, तो अजिबात आपल्या आरोग्यासाठी धोकादायक नाही. हा तुमच्या मेंदूच्या मनोरंजक युक्त्यांपैकी एक आहे.





Source link

वंचितांचा आवाज कायमचा थांबला – सत्यशोधक बाबा आढाव यांना अखेरचा सलाम

0
वंचितांचा आवाज कायमचा थांबला – सत्यशोधक बाबा आढाव यांना अखेरचा सलाम


फलटण प्रतिनिधी :  समाजातील अन्यायाविरुद्ध आयुष्यभर रणांगणात लढलेल्या, वंचित-श्रमिक आणि असंघटित कामगारांच्या हक्कांसाठी झगडणाऱ्या सत्यशोधक विचारांचे प्रवर्तक बाबा आढाव यांच्या निधनाने सामाजिक क्षेत्रातील परिवर्तनाची परंपरा हादरून गेली आहे. गरीब, मजूर, हमाल, उपेक्षित, पीडित आणि श्रमिकांच्या व्यथेशी एकरूप होऊन संघर्ष केलेल्या या महात्म्याचे जाणे म्हणजे समाजातील असंख्य कष्टकऱ्यांचा आधार हरपणे आहे.
असमानतेविरुद्ध अखंड संघर्ष – आपल्या वैयक्तिक आयुष्यापेक्षा समाजातील दुर्लक्षित घटकांचे जीवन उंचावण्यासाठी आयुष्य वाहून घेण्याचा त्यांचा संकल्प जन्मापासून शेवटच्या श्वासापर्यंत अविचल राहिला.
महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेल्या सत्यशोधक परंपरेचे ते जिवंत प्रतिक होते.
श्रमिकांना हक्क मिळवून देणारे योद्धा कामगारांच्या वेदनेवर फक्त भाषणे नव्हे तर चळवळ उभारून उत्तर मिळवून देणे ही त्यांची जीवनशैली:
हमाल पंचायत चळवळ बाजारपेठांतील हमालांना ओळखपत्र, नोंदणी, न्याय्य वेतन, सुट्टी, सामाजिक सुरक्षा, निवृत्तीवेतन मिळवून देणारी ऐतिहासिक लढाई. मोफत बाजार संकल्पना दानाचा अहंकार नाही आणि गरिबीची लाज नाही, सन्मानपूर्वक गरजूंना वस्तू वितरणाची क्रांतिकारक कल्पना. असंगठित कामगारांना न्याय बांधकाम कामगार, घरकामगार महिला, ग्रामीण श्रमिक, कंत्राटी मजूर यांना शासनाच्या योजनांशी जोडणे, विमा व सामाजिक संरक्षण मिळवून देण्यासाठी आयुष्याचा थरारक संघर्ष.
त्यांची संघर्षशक्ती म्हणजे घोषणा नव्हे प्रत्यक्ष कृती.
तत्त्वांशी तडजोड नाही
धार्मिक अंधश्रद्धा, वर्णव्यवस्था, जातिभेद आणि सामाजिक अन्यायाविरुद्ध त्यांनी निर्भिड आवाज उठवला. “माणूस हा माणूस म्हणून समान” हे विचार त्यांनी व्यवहारात उतरणारा आंदोलनाचा मार्ग दाखवला.
साधेपणातून क्रांती –
बाबांचे संपूर्ण आयुष्य विलासी झगमगाटापासून दूर राहिले. खाणे साधे, राहणी साधी पण स्वभाव तेजस्वी, विचार कणखर आणि न्यायासाठी तडफदार.
त्यांचा देह शांत झाला, पण संघर्षांची मशाल हातात घेत उभे राहणाऱ्या पुढील पिढ्यांना त्यांचे कार्य प्रेरणा देत राहील. बाबा आढाव यांनी दाखवलेला मार्ग एकच होता तो म्हणजे अन्यायाविरुद्ध लढा द्यायचा, वंचितांसोबत खंबीरपणे उभे राहायचे आणि समाज परिवर्तन तडफदार कृतीतून घडवायचे. महान कार्याची परंपरा पुढे नेणे हीच त्यांना खरी आदरांजली.

— आयु. सोमीनाथ घोरपडे
सामाजिक कार्यकर्ता • ज्येष्ठ प्रवचनकार
भारतीय बौद्ध महासभा, फलटण
📞 7387145407

महाराष्ट्रात चमकले फलटणचे नाव – अमृता अहिवळे यांची उल्लेखनीय कामगिरी!

0
महाराष्ट्रात चमकले फलटणचे नाव – अमृता अहिवळे यांची उल्लेखनीय कामगिरी!

फलटण प्रतिनिधी :- फलटण तालुक्यासाठी गौरवाची बातमी!
लष्करवाडा, मंगळवार पेठ येथील अमृता बाळासाहेब अहिवळे यांनी उद्योग निरीक्षक (Industrial Inspector) पदाच्या  निवड प्रक्रियेमधून अनुसूचित जाती प्रवर्गात महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवून आपल्या प्रतिभेची उज्ज्वल छाप उमटवली आहे.

लहानपणापासून अभ्यासात सातत्यपूर्ण प्रगती करत आलेल्या अमृताने चिकाटी, मेहनत आणि नियोजन यांचा योग्य मेळ साधत हे ध्येय गाठले. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे परिसरात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून सामाजिक स्तरावरही सकारात्मक उर्जा निर्माण झाली आहे.

परिस्थिती नव्हे तर जिद्द महत्त्वाची असते, याचे जिवंत उदाहरण म्हणजे अमृता अहिवळे. त्यांचा हा यशस्वी प्रवास अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

अमृताला कुटुंबीय, मित्रमैत्रिणी आणि शिक्षक यांची साथ लाभली असून त्यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

या अभूतपूर्व यशाबद्दल अमृता बाळासाहेब अहिवळे यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे.

Heart Attack Prevention Pill : अवघ्या 20 पैशांची गोळी Heart Attack पासून करेल बचाव, थंडीत खिशात ठेवाच; नाहीतर…..

0
Heart Attack Prevention Pill : अवघ्या 20 पैशांची गोळी Heart Attack पासून करेल बचाव, थंडीत खिशात ठेवाच; नाहीतर…..


थंडीत हॉर्ट अटॅकचा धोका वाढतो. अशावेळी या घटना जास्त प्रमाणात घडतात. हिवाळा सुरू होताच हृदयविकाराचे रुग्ण वाढू लागतात. थंड हवेमुळे हिवाळ्यात हृदयविकाराचा धोका वाढतो, ज्यामुळे शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. यामुळे रक्तप्रवाह मंदावतो, रक्तदाब वाढतो आणि हृदयाला रक्त पंप करण्यासाठी अधिक काम करावे लागते. यामुळे हृदयावर जास्त ताण येतो आणि हृदयविकाराचा धोका वाढतो.

Add Zee News as a Preferred Source

आधीच हृदयविकार, उच्च रक्तदाब, कोलेस्ट्रॉल किंवा मधुमेह असलेल्या लोकांना हिवाळ्यात हृदयविकाराचा धोका वाढतो. हिवाळ्यात हृदयविकार टाळण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी तयार राहणे अत्यंत महत्वाचे आहे.

ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. साकेत गोयल यांच्या मते, डिस्प्रिन ही एक अतिशय सामान्य आणि स्वस्त गोळी हृदयविकाराच्या बळीचे प्राण वाचवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते. त्याची किंमत फक्त 20 ते 40 पैसे आहे. ही गोळी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यूचा धोका सुमारे 28% कमी करू शकते आणि त्याचा परिणाम रुग्णालयात दिलेल्या उच्च-अभिनय इंजेक्शनसारखाच असतो.

20 पैशांची गोळी

डॉक्टरांनी सांगितले की प्रत्येकाने त्यांच्यासोबत डिस्प्रिनची गोळी ठेवावी. हृदयविकाराची सुरुवातीची लक्षणे दिसताच ही गोळी जीव वाचवू शकते.

हृदयविकाराच्या झटक्यात कशी घ्यावी गोळी 

गोळी चावून घ्या आणि नंतर थोडे पाणी प्या. ही गोळी हृदयाच्या नसांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होण्यास प्रतिबंध करते आणि मृत्यूचा धोका 25-28% कमी करते. हा परिणाम रुग्णालयात दिलेल्या काही विशेष इंजेक्शन्ससारखाच असतो.

डिस्प्रिन घेतल्याने काही नुकसान होऊ शकते का?

डॉक्टरांनी सांगितले की बहुतेक प्रकरणांमध्ये, ही गोळी निरुपद्रवी आहे. रुग्णाला गॅस, अ‍ॅसिडिटी किंवा छातीत जळजळ होत असली तरीही, ही गोळी दिली जाऊ शकते. आपत्कालीन परिस्थितीत हे औषध जीव वाचवू शकते.

गोळी दिल्यानंतर काय करावे?

डिस्प्रिन दिल्यानंतर क्षणभरही वाट पाहू नका, कारण स्ट्रोक किंवा हृदयविकाराच्या झटक्यात वेळ खूप महत्वाचा असतो. रुग्णाला ताबडतोब रुग्णालयात घेऊन जा. पोहोचताच, ईसीजी करा आणि विलंब न करता हृदयरोग तज्ञांना भेटा, कारण वेळेवर आणि योग्य उपचार रुग्णाचे प्राण वाचवू शकतात.

हे लक्षात ठेवा

हिवाळ्यात हृदयविकाराचा धोका वाढतो, म्हणून सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. योग्य वेळी दिलेली फक्त 20 पैशांची साधी गोळी जीव वाचवू शकते. थंडीच्या काळात तुमच्या हृदयाची विशेष काळजी घ्या, हृदयविकाराची लक्षणे ओळखा आणि आपत्कालीन परिस्थितीसाठी नेहमी तयार रहा.

(Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)





Source link

फक्त चाकं विकायची! जग जिंकायला निघाली Tyre ची कंपनी, रस्ते अन् हवामानानुसार ठरवणार दर्जा…

0
फक्त चाकं विकायची! जग जिंकायला निघाली Tyre ची कंपनी, रस्ते अन् हवामानानुसार ठरवणार दर्जा…


Auto News Share Market : ऑटो क्षेत्रामध्ये भारतानं उत्तरोत्तर प्रगतीच केली आहे आणि यापुढंही हे प्रगतीचं सत्र सुरूच राहील. अशा या क्षेत्रामध्ये टायर अर्थात वाहनांना त्याच ताकदीची आणि उत्तम दर्जाची चाकं तयार करत एक मुख्य टायर उत्पादक कंपनी जग जिंगण्यासाठी सज्ज झाली आहे. 

Add Zee News as a Preferred Source

भारतीय टायर निर्मात्या कंपन्यांमध्ये आघाडीवर असणाऱ्या आणि जग जिंकायला निघालेल्या या कंपनीचं नाव आहे सिएट (CEAT). वैश्विक स्तरावर ही कंपनी आपलं वेगळं अस्तित्वं निर्माण करण्यासाठी त्या दृष्टीनं पावलंही उचलू लागली आहे. उपलब्ध माहितीनुसार विविध आंतरराष्ट्रीय बाजारांमध्ये त्यातही प्रामुख्यानं युरोप आणि अमेरिकेत निर्यात वाढवण्यासाठी त्या त्या क्षेत्रातील रस्ते, हवामान आणि वाहन चालकांचा प्राधान्यक्रम लक्षात घेता कंपनीनं तशाच पद्धतीनं उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. आरपीजी समूहाचे (RPG Group) उपाध्यक्ष अनंत गोएंका यांनी दिली. 

गोएंका यांच्या माहितीनुसार कंपनीनं निर्यातीला अनुसरून आक्रमक आखणी केली आहे, ज्या धर्तीवर कामही सुरू आहे. सध्या सिएट कंपनीच्या एकूण उत्पादनात 20 टक्के रक्कम ही निर्यात व्यवसायातून येत असून, येत्या काळात ही टक्केवारी आणखी वाढवण्याकडे कंपनीचा अधिक कल असेल. 

जागतिक स्तरावर कंपनीच्या कक्षा रुंदावण्यासमवेत कंपनी प्रामुख्यानं अमेरिका आणि युरोपातील ग्राहकवर्गावर अधिक लक्ष केंद्रीत करत आहे. जागतिक स्तरावरील ब्रँड होण्याचा टप्पा गाठण्याचा मानस ही कंपनी बाळगत आहे. यामध्ये गुंतवणूक एक महत्तावीच भूमिका बजावतो हेसुद्धा गोएंका यांनी स्पष्ट केलं. 

सिएटची रणनिती काय?

सिएट कंपनीकडून आखल्या गेलेल्या रणनितीअंतर्गत ‘टेलर मेड’ संकल्पनेच्या आधारे कोणा एका क्षेत्राच्या गरजांच्या हिशोबानं टायर तयार करम्यात येतील.  त्याच दृष्टीनं कंपनीनं कामही सुरू केलं आहे, विविध देशांमधील वाहनचालकांच्या गरजा लक्षात घेत कंपनी टायर तयार करत असून, इटली आणि स्पेनसाठी वेगळी श्रेणी, नॉर्डिक देशांसह जर्मनीसाठी कठोर परीक्षण, पश्चिम आशिया, युरोप आणि अमेरिकेच्या रस्त्यांसाठी विशेष डिझाईवर कंपनी भर देत आहे. इतकंच नव्हे, तर पश्चिम आशियामधील रस्ते आणि हवामान स्थितीला अनुसरून कंपनी टायर निर्मिती करत आहे. त्यामुळं एका अर्थी जग जिंकण्यासाठी ही कंपनी सज्ज आहे असं म्हणणं गैर नाही. तेव्हा आता येणारा काळ त्यांच्यासाठी नेमका कसा असेल हे पाहणं महत्त्वाचं! 





Source link

प्रभाग 12 मध्ये नवे राजकीय गणित! शिवसेना–राजे गटाच्या ताकदीत वाढ — दत्तनगरमध्ये नागरिकांचा मोठा प्रतिसाद

0
प्रभाग 12 मध्ये नवे राजकीय गणित! शिवसेना–राजे गटाच्या ताकदीत वाढ — दत्तनगरमध्ये नागरिकांचा मोठा प्रतिसाद

फलटण | नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग 12 मध्ये राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. दत्तनगर येथे झालेल्या बैठकांना प्रभागातील अनेक नागरिक, युवा कार्यकर्ते, महिला आणि मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवसेना व राजे गटाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, तसेच नगरसेवक विकास वसंतराव काकडेस्मिता शहा यांना सक्रिय पाठिंबा दर्शवत आहेत. या बैठका श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होत आहेत.

प्रभागातील स्थानिक प्रश्न, विकासकामांची गरज आणि शिवसेना–राजे गटाचा वाढता प्रभाव यामुळे हा पाठिंबा मिळत असलेचे  उपस्थितांनी सांगितले. तसेच प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

यावेळी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर म्हणाले—

“फलटण शहरातील सर्व प्रभागांत विकासाची दिशा तयार करण्यासाठी सक्षम नेतृत्व आणि जनतेचा विश्वास आवश्यक आहे. आज प्रभाग 12 मधील नागरिकांनी दाखवलेला विश्वास म्हणजे आगामी निवडणुकीतील मोठा संकेत आहे.”

या घडामोडींमुळे प्रभाग 12 मधील निवडणुकीचे चित्र बदलत असल्याचे आणि आगामी निवडणुकीत शिवसेना व राजेगटाला बळकटी मिळू शकते, असे राजकीय तज्ञांचे मत आहे.

,

तुमची किडनी कमजोर करणाऱ्या 4 नोकऱ्या, संशोधनातून धक्कादायक खुलासा!

0
तुमची किडनी कमजोर करणाऱ्या 4 नोकऱ्या, संशोधनातून धक्कादायक खुलासा!


kidneys Dieses: पोटापाण्यासाठी आपण सर्वजण काहीना काही नोकरीधंदा करत असतो. प्रत्येक कामाचं स्वरुप वेगळ असतं. तिथलं वातावरण, कामाची पद्धत, कामाचे तास या सर्वाचा परिणाम आपल्या शरिरावर कळत नकळत होत असतो. विशेषत: किडनीवर होत असतो. किडनीवर वाईट परिणाम करणाऱ्या अशा 4 कोणत्या नोकऱ्या आहेत? सविस्तर जाणून घेऊया 

Add Zee News as a Preferred Source

उष्ण हवामानात सतत श्रम 

बांधकाम साइटवर, रस्ते बांधकामात, कारखान्यांच्या भट्ट्याजवळ किंवा शेतात तीव्र उन्हात लोक दिवसभर घाम गाळतात. तेव्हा शरीरातील पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन) वाढते. यामुळे किडनीवर अतिरिक्त ताण येतो आणि ती हळूहळू खराब होऊ लागते. अशा कामगारांमध्ये किडनी आजारांची शक्यता सामान्य लोकांपेक्षा कितीतरी पट जास्त असते. याची लक्षणे उशीरा दिसतात, म्हणून नियमित तपासणी आवश्यक असल्याचे अमेरिका व थाईलंडच्या अभ्यासात असे दिसून आले आहे. 

रसायने व विषारी वायूंच्या सहवासातील व्यवसाय 

पेंट, बॅटरी, चिकट द्रव्ये, टॅनरी किंवा विविध कारखान्यांमध्ये कामगार रोज विषारी रसायनांशी थेट स्पर्श करतात, तेव्हा ते शरीरात साठून किडनीच्या पेशींना हानी पोहोचवत असतात हे त्यांच्या लक्षातही येत नाही. सीसे, कॅडमियम व पारा सारख्या अवजड धातूंचा धोका तर प्रचंड असतो. मायनिंग, वेल्डिंग, पेंटिंग किंवा केमिकल प्लांट्समध्ये कार्यरत असणाऱ्यांना किडनी विकाराची धास्ती दुप्पट होते. ट्रायक्लोरोएथिलीन व टॉल्यूनसारखे सॉल्व्हेंट्स दीर्घकाळात फिल्टरिंग क्षमता गळतात, ज्याचा परिणाम क्रॉनिक किडनी डिसीज (सीकेडी) म्हणून होत असल्याचे दिसून आले आहे.
   
दीर्घकालीन मानसिक दबाव 

कार्यालयीन कामात सतत टेन्शन, बदलणाऱ्या शिफ्ट्स, झोपेची कमतरता आणि अनियमित आहारामुळे रक्तदाब वाढतो आणि शरीराचे चयापचय बिघडते. याचा थेट फटका किडनीला बसतो. एका संशोधनानुसार, अशा तणावग्रस्त नोकऱ्यांमध्ये कार्यरत व्यक्तींमध्ये किडनीची कार्यक्षमता हळूहळू घसरते. हे वाढते कारण रक्त शुद्धीकरण प्रक्रिया बाधित होते. ज्यामुळे शरीरात घाण जमा होते. ऑफिस वर्कर्समध्ये हे प्रमाण वाढत असल्याचे चित्र गेल्या काही वर्षांपासून दिसत आहे.

विषारी धातू आणि गॅस-संपर्कातील उद्योग

बॅटरी उत्पादन, खाणकाम किंवा धातू प्रक्रिया उद्योगांमध्ये अवजड धातूंचा रोजचा सहवास असतो. किडनीच्या कार्यावर ते दीर्घकालीन विषारी परिणाम करतात. हे रसायने रक्तप्रवाहात मिसळून फिल्टर्स नष्ट करतात. अशा वातावरणात काम करणाऱ्यांमध्ये किडनी विकाराची शक्यता सामान्यपेक्षा 3-4 पट अधिक असते. सूज, थकवा किंवा मूत्रातील बदल अशी लक्षणे दिसतात.

काय घ्याल काळजी? 

किडनी आजारांना दूर ठेवण्यासाठी पाणी भरपूर प्या, ब्रेक घ्या, सुरक्षित वस्त्रे वापरा, नियमित किडनी तपास करा आणि जीवनशैली संतुलित ठेवा. लवकर निदानाने मोठी हानी टाळता येते, असे संशोधनात म्हटलंय.

FAQ

१. कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या किडनीसाठी सर्वात धोकादायक मानल्या जातात?

उत्तर: उष्ण हवामानात सतत शारीरिक श्रम करावे लागणाऱ्या नोकऱ्या (उदा. बांधकाम, रस्तेकाम, शेती, भट्टीजवळील काम), विषारी रसायने व अवजड धातूंच्या संपर्कात येणाऱ्या नोकऱ्या (उदा. पेंटिंग, वेल्डिंग, बॅटरी उत्पादन, खाणकाम, टॅनरी, केमिकल प्लांट) आणि सतत मानसिक तणाव व अनियमित जीवनशैली असलेल्या नोकऱ्या (उदा. कॉर्पोरेट ऑफिस जॉब्स, बदलत्या शिफ्ट्स) या किडनीसाठी सर्वात जास्त धोकादायक मानल्या जातात.

२. या नोकऱ्यांमुळे किडनी कशी खराब होते?

उत्तर: तीव्र उन्हात काम केल्याने डिहायड्रेशन होऊन किडनीवर सतत ताण येतो.  
सीसा, कॅडमियम, पारा, ट्रायक्लोरोएथिलीनसारखी विषारी रसायने व धातू रक्तात मिसळून किडनीच्या फिल्टरिंग पेशी नष्ट करतात.  
मानसिक तणावामुळे रक्तदाब वाढतो, झोप व आहार बिघडतो, ज्यामुळे किडनीची रक्त शुद्ध करण्याची क्षमता हळूहळू कमी होते. परिणामी क्रॉनिक किडनी डिसीज (CKD) होण्याचा धोका वाढतो.

३. अशा नोकरी करणाऱ्यांनी किडनीचे आरोग्य कसे जपावे?

उत्तर: भरपूर पाणी प्या (दिवसभरात वारंवार थोडे थोडे), नियमित ब्रेक घ्या, काम करताना सुरक्षित कपडे-मास्क-ग्लोव्हज वापरा, दर ६-१२ महिन्यांनी किडनी फंक्शन टेस्ट (सीरम क्रिएटिनिन, युरिन रूटीन) करून घ्या, तणाव कमी करा, झोप व आहार नियमित ठेवा. लवकर निदान केल्यास मोठी हानी टाळता येते.

 





Source link

भारतीय बौध्द महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने फलटण शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन

0
भारतीय बौध्द महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने फलटण शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन

भारतीय बौध्द महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने फलटण शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन

फलटण : भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने महामानव बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त फलटण शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास श्रद्धापूर्वक वंदन करुन सूत्रपठनासह यामध्ये त्रिसरण, पंचशील, बुद्ध पूजा, भिमस्मरण, भीम स्तुती सामुदायिकरित्या घेऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी समता सैनिक दलाच्या वतीने ही बौद्धाचार्य आयु.चंद्रकांत मोहिते यांनी विनम्र अभिवादन केले.

यावेळी भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे अध्यक्ष आयु.महावीर भालेराव, सरचिटणीस आयु बाबासाहेब जगताप सर, कोषाध्यक्ष आयु.विठ्ठल निकाळजे सर, संस्कार सचिव आयु.बजरंग गायकवाड सर, तालुक्याचे प्रचार व पर्यटन उपाध्यक्ष आयु.रामचंद्र मोरे, फलटण तालुक्याचे कार्यालयीन सचिव तथा बौद्धाचार्य आयु.चंद्रकांत मोहिते, संघटक आनंद जगताप, अमोल काकडे, प्रशांत सोनवणे, जेष्ठ प्रवचनकर सोमीनाथ घोरपडे सर, साहित्यिक तानाजी जगताप, आयु.सुरज भैमुले, आयु.नंदकुमार निकाळजे, आयुनि संगिता निकाळजे, धम्म उपासक अजय निकाळजे, विजय निकाळजे, आयुनि पारिजातका जगताप, आयुनि भाग्यश्री बजरंग गायकवाड, आयुनि भाग्यश्री विठ्ठल निकाळजे, आयुनि रजनी निकाळजे, निलाक्षी जगताप, तनिष्का जगताप, आरोही गायकवाड हे यावेळी उपस्थित होते.

Eye Blackout Symptoms: डोळ्यासमोर अंधार येणं कशाचं लक्षणं? वेळ निघून जाण्याआधी जाणून घ्या!

0
Eye Blackout Symptoms: डोळ्यासमोर अंधार येणं कशाचं लक्षणं? वेळ निघून जाण्याआधी जाणून घ्या!


Eye Blackout Symptoms: कधीकधी डोळ्यांसमोर अचानक पूर्ण अंधार पडतो, असा प्रसंग अनेकांच्या आयुष्यात येतो. बहुतांश जण याकडे दुर्लक्ष करतात. तर काहीजण असं का होत असेल याचा विचार करतात. डोळ्यासमोर अंधारे येण्यामागची कारणे काय आहेत? त्यामुळे तुम्हाला भविष्यात कोणती मोठी समस्या निर्माण होऊ शकते? सविस्तर जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

रक्तदाब अचानक खाली येणे 

झोपेतून किंवा बसलेल्या स्थितीतून अचानक उभे राहिल्यावर रक्तदाब खाली पडतो. मेंदूपर्यंत रक्त व ऑक्सिजन कमी पोहोचल्याने काही सेकंदांसाठी डोळ्यांसमोर पूर्ण काळोख पडतो. यासोबत चक्कर येणे, डोके हलके वाटणे किंवा पाय खालील भाग सुन्न होणे अशी लक्षणे दिसतात. हे वयस्कर व्यक्ती, डिहायड्रेशन किंवा काही औषधांमुळे जास्त होते.
   
मायग्रेन

डोकेदुखी येण्यापूर्वी 10 ते 30 मिनिटे काही लोकांना दृष्टीची विचित्र लक्षणे जाणवतात – चमकदार झिगझॅग रेषा, ठिणग्या किंवा एका भागात दृष्टी नाहीशी होणे. काहींना तर दोन्ही डोळ्यांसमोर पूर्ण अंधार येतो. ही लक्षणे गेल्यावरच डोकेदुखी सुरू होते. मायग्रेन असलेल्यांमध्ये हे वारंवार दिसते.

मिनी-स्ट्रोक 

मेंदूला रक्त पुरवणाऱ्या रक्तवाहिनीत तात्पुरती अडथळा आल्याने अचानक दृष्टी जाऊ शकते. फक्त काळोख येण्याऐवजी एका बाजूला अंधूकपणा, हात-पाय कमजोर होणे, बोलणे अडखळणे अशी लक्षणेही येऊ शकतात. ही लक्षणे 5-10 मिनिटांत बरी होतात, पण पूर्ण स्ट्रोकची ही आगाऊ चेतावणी असते. ताबडतोब डॉक्टरांकडे जाणे गरजेचे.

रेटिना सरकणे

डोळ्याच्या मागील पडद्याला (रेटिना) अचानक ताण आल्यास किंवा फाटल्यास पडदा आपल्या जागेवरून सरकतो. यामुळे अचानक अनेक काळे ठिपके, प्रकाशाच्या चमका किंवा एका बाजूला काळा पडदा पडल्यासारखे वाटते. उपचारात उशीर झाल्यास कायमस्वरूपी अंधत्व येऊ शकते.

इतर गंभीर कारणे

काचबिंदूचा  इस्केमिक अटॅक, डोळ्यांत रक्तस्राव, मेंदूतील गाठ किंवा हृदयाच्या ठोक्यात अडथळा यामुळेही अचानक दृष्टी जाऊ शकते. ही लक्षणे वारंवार येत असतील, वेदना असतील किंवा हात-पाय सुन्न पडत असतील तर त्वा त्वरित रुग्णालयात जाणे आवश्यक आहे. काही सेकंदांचा किरकोळ काळोख असो वा पूर्ण ब्लॅकआउट, एकदाही असे झाल्यास डोळ्यांची आणि मेंदूची तपासणी करून घेणे सुरक्षित आहे. लवकर निदान केल्यास मोठी हानी टाळता येते, हे लक्षात असू द्या.

FAQ

१. प्रश्न : मी बसलेल्या जागेवून अचानक उभा राहिलो की डोळ्यांसमोर ४-५ सेकंद पूर्ण काळोख पडतो. हे धोकादायक आहे का?

उत्तर : बहुतेक वेळा हे ऑर्थोस्टॅटिक हायपोटेन्शनमुळे होते, म्हणजे रक्तदाब अचानक खाली पडतो. हे वयस्कर लोक, पाणी कमी प्यायलेले किंवा काही औषधे घेणाऱ्यांमध्ये सामान्य आहे. धोकादायक नसले तरी वारंवार होत असेल तर डॉक्टरांना भेटा, कारण यामागे हृदयाचे आजार किंवा रक्ताल्पता असू शकते.

२. प्रश्न : डोळ्यांसमोर काळोख येण्याबरोबर डोकेदुखीही येते आणि आधी प्रकाशाच्या झिगझॅग रेषा दिसतात. याचा अर्थ काय?

उत्तर : ही मायग्रेनच्या ऑऱ्याची (Migraine with Aura) लक्षणे आहेत. साधारण १०-३० मिनिटे ही दृष्टीची लक्षणे राहतात आणि नंतर तीव्र डोकेदुखी सुरू होते. हे मेंदूच्या रक्तवाहिन्यांच्या तात्पुरत्या बदलांमुळे होते. मायग्रेनचा त्रास असणाऱ्यांना हे २०-३०% लोकांना होतेच. तरीही पहिल्यांदाच झाल्यास एकदा नेत्रतज्ज्ञ व न्युरोलॉजिस्टला दाखवावे.

३. प्रश्न : अचानक एका डोळ्याने दिसेनासे झाले आणि काळण्यात काळे ठिपके-चमक दिसले. किती वेळात डॉक्टरांकडे जावे?

उत्तर : हे रेटिना अलग होण्याचे (Retinal Detachment) किंवा रेटिनल व्हेन ऑक्लूजनचे अत्यंत गंभीर लक्षण आहे. २४ ते ४८ तासांच्या आत उपचार न झाल्यास त्या डोळ्याची दृष्टी कायमची जाऊ शकते. असे झाल्यास लगेच जवळच्या नेत्ररुग्णालयात किंवा आपत्कालीन विभागात जा – एक मिनिटही वाया घालवू नका!





Source link

निंभोरे येथे भारतीय बौध्द महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन

0
निंभोरे येथे भारतीय बौध्द महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन

निंभोरे येथे भारतीय बौध्द महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन

फलटण : भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने महामानव बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या निंभोरे येथील अस्थींना श्रद्धापूर्वक वंदन करुन सूत्रपठनासह डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे अध्यक्ष आयु.महावीर भालेराव, सरचिटणीस आयु बाबासाहेब जगताप सर, कोषाध्यक्ष आयु.विठ्ठल निकाळजे सर, संस्कार सचिव आयु.बजरंग गायकवाड सर, तालुक्याचे प्रचार व पर्यटन उपाध्यक्ष आयु.रामचंद्र मोरे, संघटक आनंद जगताप, अमोल काकडे, जेष्ठ प्रवचनकर सोमीनाथ घोरपडे सर, नंदकुमार निकाळजे, संगिता निकाळजे, धम्म उपासक अजय निकाळजे, विजय निकाळजे, आयुनि पारिजातका जगताप, आयुनि भाग्यश्री बजरंग गायकवाड, आयुनि भाग्यश्री विठ्ठल निकाळजे, आयुनि रजनी निकाळजे, निलाक्षी जगताप, तनिष्का जगताप, आरोही गायकवाड हे यावेळी उपस्थित होते.
यावेळी सकाळी भारतीय बौद्ध महासभा पुणे जिल्हा अंतर्गत बारामती तालुका व शहर शाखेच्या व भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या समता सैनिक दलाच्या वतीने महामानव बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना सलामी देण्यात आली. यामध्ये फलटण तालुका शाखेचे समता सैनिक दलाचे संरक्षण उपाध्यक्ष आयु. संपत भोसले यांच्या नेतृत्वाखाली सलामी देण्यात आली.

यावेळी संपूर्ण दिवसभर भारतीय बौद्ध महासभा शाखा बारामती तालुका शाखेचे अध्यक्ष भीमशाहिर आयु.पुण्यशील लोंढे यांनी भीम बुद्ध गीतातून वातावरण कृतज्ञतामय, धम्ममय केले. त्यांनी बुद्ध- भीम गीतातून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन केले.

यावेळी बोलताना भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे अध्यक्ष आयु. महावीर भालेराव म्हणाले, निंभोरे या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी आहेत. हे एक ऊर्जेच्या केंद्र आहे. या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती व महापरिनिर्वाण दिनानिमित्त BRA sport club Nimbhore यांच्या वतीने करण्यात येणारी व्यवस्था ही अतिशय चांगली व सुनियोजित होती. लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून मंडळाच्या वतीने संपूर्ण काळजी घेतली गेली होती. येणाऱ्या काळातही मंडळासाठी लागणारे सहकार्य भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने देण्यात येईल.
यावेळी निंभोरे गावचे सरपंच आयु.नवनाथ कांबळे म्हणाले, “या ठिकाणी जागा अपुरी पडत आहे.थोडी गैरसोय जरी होत असली तरी येणाऱ्या काळामध्ये प्रशस्त असे बुद्ध विहाराचे निर्माण करण्याचा संकल्प आहे. आमच्या अगोदरच्या पिढीने, त्यानंतरच्या पिढीने आणि आमच्या पिढीने हा समृद्ध वारसा जपला व या आस्थीचे संरक्षण केले आहे. येणाऱ्या काळातही अस्थीचे जतन करण्याची जबाबदारी आमचे मंडळ सक्षमपणे पार पाडेल. मी तमाम आंबेडकरवादी कार्यकर्ते, बौद्ध उपासक उपासक, नेते सर्वांना विनंती करतो की सर्वांनी या कामांमध्ये सहकार्य करावे.”यावेळी मंडळाचे अध्यक्ष, कल्पेश कांबळे, रुपेश कांबळे, संकेत कांबळे व सर्व मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. फलटण तालुक्यासह आजूबाजूच्या तालुक्यांमधून व जिल्ह्यांमधून आज संपूर्ण दिवसभर हजारो लोकांनी निंभोरे या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थींचे दर्शन घेऊन महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन केले. कार्यक्रमाची सांगता भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे सर्व पदाधिकारी व BRA sport club निंभोरे चे सर्व पदाधिकारी यांनी संयुक्तरीत्या सरणतंय घेऊन झाली.