Thursday, July 2, 2026
Home Blog Page 89

सुक्कू कॉफीचे आरोग्यदायी फायदे, शरीरासाठी किती गुणकारी? सद्गुरुंनी काय सांगितलं

0
सुक्कू कॉफीचे आरोग्यदायी फायदे, शरीरासाठी किती गुणकारी? सद्गुरुंनी काय सांगितलं



तुम्ही कधी सुक्कू कॉफी किंवा सुक्या आल्याच्या कॉफीबद्दल ऐकले आहे का? सद्गुरुंनी सांगितले कॉफीचे जबरदस्त फायदे. 



Source link

दात दुखीवर रामबाण ठरतील ‘हे’ घरगुती उपाय!

0
दात दुखीवर रामबाण ठरतील ‘हे’ घरगुती उपाय!


Oral Care Tips: इतर कोणतेही दुखणे परवडले पण हे दाताचे दुखणे नको रे बाबा!” दात दुखत असल्यावर तुमच्याही मनात असाच काहीसा विचार येत असेल. कारण दाताचे दुखणे इतके तीव्र असते की, कधी कधी असह्य होते. यावर उपाय म्हणून पेन किलरचे औषध घेतले जाते, पण त्याने फक्त काही काळच आराम मिळतो. नंतर पुन्हा दुखणे सुरू होते. दात कीडल्यामुळे किंवा दाढेला सूज आली असल्यास दात दुखण्याची समस्या उद्भवते. पण तुम्ही काही घरगुती उपाय वापरू शकता. जे दाताचे दुखणे कमी करण्यास झटपट पटापट मदत करू शकता.

Add Zee News as a Preferred Source

प्राचीन आयुर्वेदात प्रत्येक आजारावर उपाय सांगितले गेले आहेत. आजही अनेक आधुनिक डॉक्टर उपचारासाठी आयुर्वेदाचा आधार घेत असतात. आपल्या रोजच्या आहारातील असे अनेक पदार्थ आहेत ज्यांमध्ये औषधी गुणधर्म आहेत. आयुर्वेदात कोणत्या आजारावर उपाय म्हणून कोणते पदार्थ का आणि कसे वापरावेत याबाबत सविस्तर माहिती दिली गेली आहे. त्यातील काही उपाय आपण या लेखातून जाणून घेणार आहोत.

 

लवंगचे तेल

दात दुखीसाठी लवंगचे तेल वापरणे अधिक फायदेशीर ठरते. यामध्ये असलेला युजेनॉल नावाचा घटक दुखणाऱ्या दातावर नैसर्गिक भूल देण्याचे काम करतो, यामुळे वेदनांचे प्रमाण कमी होऊन त्वरीत आराम मिळतो. तसेच यातील जंतुनाशक गुणधर्म दाताला कीड लागण्यास कारणीभूत असलेल्या जीवाणूंशी लढतात. काहीवेळा दंतवैद्य झिंक ऑक्साईडमध्ये लवंग तेलाचा वापर करतात. ज्यामुळे संवेदनशील मज्जातंतूना शांत करते.

 

लसूण पेस्ट

लसूणमध्ये अॅलिसिन नावाचे घटक असते जो वेदना कमी करण्यास मदत करतो. यामधील अँटीबॅक्टेरीयल गुणधर्म दातांचे आणि हिरड्यांचे संसर्गापासून संरक्षण करते. यातील अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्मांमुळे सूज आणि जळजळ कमी होण्यास मदत होते. दात दुखीवर लसूण पेस्ट वापरणे हा एक नैसर्गिक आणि प्रभावी घरगुती उपाय आहे.

 

कांद्याचा रस

दात दुखत असल्यास कांद्याचा लहान तुकडा तोंडात ठेवा आणि चघळा. यामुळे तुकड्यातून निघणारा रस दुखणाऱ्या दाताला प्रभावित करेल. कांद्यामध्ये असलेले अँटीसेप्टीक गुणधर्म दातांच्या आजूबाजूचे जंतू नष्ट करतात. कांद्यामध्ये असलेले गुणधर्म नैसर्गिकरित्या वेदना कमी करण्यास मदत करतात. यामुळे सूजही कमी होते.

 

जास्वंदाची पाने

जास्वंदाच्या पानांमध्ये अँटी इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. जे हिरड्यांची सूज कमी करण्यास मदत करतात. तुम्ही जास्वंदाची पाने गरम पाण्यात उकळवून, त्या पाण्याने गुळण्या करू शकता. ज्यामुळे दात दुखीवर त्वरीत आराम मिळतो.

 

या सर्व घरगुती उपायांसह नेहमीच दातांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. दातांची नियमित आणि योग्य स्वच्छता करणे आवश्यक आहे. तसेच दाताच्या दुखीची तीव्रता अधिक जास्त असेल तर अशावेळी दंतवैद्यांचा सल्ला घेणे अधिक महत्त्वाचे ठरते.

 

 

(Disclaimer: वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. ‘झी २४ तास’ याची खातरजमा करत नाही. यामधून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा केला गेलेला नाही. कुठलीही लक्षणं जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)





Source link

डॉ बाबासाहेबांना फलटणकराची मानवंदना; मा, खा . रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची ऑडिटोरियम उभारणीची घोषणा

0
डॉ बाबासाहेबांना फलटणकराची मानवंदना; मा, खा . रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची ऑडिटोरियम उभारणीची घोषणा

फलटण प्रतिनिधी :- फलटणमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध मान्यवरांनी उपस्थित राहून अभिवादन केले. या प्रसंगी फलटणमध्ये लवकरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर ऑडिटोरियम उभारण्यात येणार असल्याची माहिती खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली. त्यांनी सांगितले की, देशाची घडण आणि लोकशाहीची पायाभरणी बाबासाहेबांनी लिहिलेल्या राज्यघटनेतूनच घडली आहे.

कार्यक्रमात आमदार सचिन पाटील यांनीही आपले विचार मांडताना म्हटले की, राज्यघटनेमुळे सर्वसामान्य नागरिकांना जगण्याचा आणि शिक्षणाचा अधिकार मिळाला. तर फलटण नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी म्हणाले की, बाबासाहेबांच्या राज्यघटनेने राजेशाही संपुष्टात आणत सामान्य माणसालाच राज्याचा खरा मालक बनवले.

जेष्ठ नेते विजयराव येवले यांनीही या वेळी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाला माजी नगरसेवक सनी अहिवळे, सचिन अहिवळे, विजराव येवले, अभिजित नाईक निंबाळकर, सौ. सुपर्णा सनी अहिवळे, सौ. मीना जीवन काकडे, हरिष काकडे, सागर सोरटे, उमेश कांबळे, विशाल अहिवळे, विशाल पाटील, अमोल अहिवळे, निलेश मोरे, प्रवीण कांबळे, किरण अहिवळे, सुनिल अहिवळे, सतीश अहिवळे, श्रीकांत काकडे, जीवन काकडे, सनी मोरे, आप्पा सरगर, जाकीर हाज कुरेशी, सुरज अहिवळे यांसह अनेक सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन

0
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने 69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन

फलटण : भारतरत्न, बोधिसत्व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त फलटण शहरात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून अभिवादन करण्यात आले. मध्यरात्री बारा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून, मेणबत्ती प्रज्वलित करून त्रिशरण – पंचशील, बुद्ध पूजा, भीमस्मरण, भीम स्तुती आणि बुद्ध पठन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात भारतीय बौद्ध महासभा, फलटण शाखेचे कार्यालयीन सचिव बौद्धाचार्य चंद्रकांत मोहिते यांच्या नेतृत्वाखाली झाली. उपस्थित उपासक–उपासिका यांनी सामूहिक पठणात सहभाग घेतला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने विनम्र अभिवादन अर्पण करण्यात आले.

यावेळी बौद्धाचार्य आयु.चंद्रकांत मोहिते यांनी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणापूर्वीच्या अखेरच्या दोन दिवसांतील घडामोडी आणि अंत्यसंस्काराची माहिती अत्यंत सांगोपांगपणे मांडत उपस्थितांना भावूक केले.

कार्यक्रमामध्ये माजी नगरसेवक सचिन अहिवळे यांनी महामानवांना अभिवादन करताना दोन गोष्टी आत्मसात करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले –
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेल्या उच्च पदव्यांचा आदर्श ठेवून आपणही मुलांना उच्च दर्जाचे शिक्षण द्यावे.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण आयुष्यभर सुटाबुटात राहून आदर्श घडवला; समाजानेही त्याच मार्गाने आपले साधे पण स्वच्छता आणि नीटनेटकेपणा जपत पेहराव अंगीकारावा असे आव्हान त्यांनी केली.

त्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्षीय सदस्य सचिव आयु.कपिल काकडे यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करताना म्हटले की, डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित होऊन आदर्श व नीतिमान जीवन जगणे हीच खरी त्यांना आदरांजली ठरेल. तेव्हा सर्वांनी त्याच मार्गाने धम्ममय जीवन जगावे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्षीय सदस्य आयु.गणेश भीमराव अहिवळे यांनी ही समाजातील महत्वाच्या मुद्द्यावर भाष्य करत ज्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्यामुळे आपली व आपल्या कुटुंबाची प्रगती केली आहे. त्यांनी समाजातील इतर बांधवाना ही पुढे आणण्यासाठी योगदान द्यावे. मदतीचा हात द्यावा असे आवाहन केले आहे.

भारतीय बौद्ध महासभेचे जेष्ठ प्रवचनकार आयु.सोमीनाथ घोरपडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय कार्याचा आढावा घेत सर्वांना आवाहन केले की, “महापरिनिर्वाण दिन हा फक्त औपचारिकता नसून कृतज्ञतेचा दिवस आहे. प्रत्येकाने घरात बुद्ध वंदना घ्यावी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एखादे भाषण वाचून कुटुंबासमवेत अभिवादन करावे.”

अभिवादन कार्यक्रमाची सांगता सर्व बौद्ध उपासक–उपासिका यांनी सरणतंय घेऊन केली. यावेळी विविध सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व आर्थिक असा विविध क्षेत्रातील तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

0

कुरवली खुर्द येथे आयु.संघराज अशोक निकाळजे व परिवाराची प्रेरणादायी पुढाकार व भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने धम्म प्रवचनाचा आयोजन करण्यात आले होते.

0
कुरवली खुर्द येथे आयु.संघराज अशोक निकाळजे व परिवाराची प्रेरणादायी पुढाकार व भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने धम्म प्रवचनाचा आयोजन करण्यात आले होते.

साहस Times :- कुरवली खुर्द येथे आयु.संघराज अशोक निकाळजे व परिवाराची प्रेरणादायी पुढाकार व भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने धम्म प्रवचनाचा आयोजन करण्यात आले होते.

कुरवली खुर्द : मार्गशीर्ष महिन्याच्या पौर्णिमेनिमित्त संघराज अशोक निकाळजे व त्यांच्या परिवाराच्या वतीने धम्म प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे विधी संचलन भारतीय बौद्ध महासभेचे कार्यालयीन सचिव व बौद्धाचार्य चंद्रकांत मोहिते यांनी केले. यावेळी आयुष्यमान चंद्रकांत मोहिते यांनी भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे अध्यक्ष आयु. महावीर भालेराव, महासचिव आयु.बाबासाहेब जगताप, कोषाध्यक्ष आयु.विठ्ठल निकाळजे सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण फलटण तालुक्यामध्ये सुरू असणाऱ्या धम्म कार्याविषयी उपस्थितांना सांगून या कार्यामध्ये सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.

यावेळी बोलताना मोहिते यांनी बौद्ध धम्मातील पौर्णिमेचे महत्व स्पष्ट केले. बुद्ध, धम्म आणि संघ या त्रिरत्नांना वंदन करून तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मार्गावर सदाचारी, नैतिक व जागरूक जीवन जगण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांशी केले.

यानंतर समता सैनिक दलाचे ज्येष्ठ अधिकारी व प्रबोधनकार गायक आयुष्यमान लक्ष्मण निकाळजे यांनी तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जीवनकार्याचे प्रभावी वर्णन केले. धम्म ही निर्मळ, समानतेवर आधारलेली व अंधश्रद्धामुक्त जीवनपद्धती असून जुने रुढीपरंपरांचा स्वीकार न करता परिवर्तनवादी जीवनमार्ग स्वीकारणे हीच खरी प्रगती आहे, असे त्यांनी सांगितले. महापुरुषांच्या शिकवणीचे रूपांतर आचरणात घडवणे हीच खरी कृतज्ञता आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. त्यांनी यावेळी कवी वामनदादा कर्डक यांच्या एका भीम गीत गाऊन वातावरण मंत्रमुग्ध केले.

कार्यक्रमाचे मार्गदर्शक प्रवचन भारतीय बौद्ध महासभेचे ज्येष्ठ प्रवचनकार सोमीनाथ घोरपडे यांनी केले. त्यांनी मार्गशीर्ष पौर्णिमेचे ऐतिहासिक व धम्मदृष्ट्या या पौर्णिमेचे ऐतिहासिक पैलू उलगडले आणि उपस्थितांना बुद्ध, धम्म आणि संघाच्या वाटचालीतील या दिवसाचे विशेष स्थान स्मरण करून दिले.
राजा बिंबिसार यांच्याकडून वेळूवन दान, कालाम सुत्ताचा उपदेश, नालागिरी हत्तीवर विजय, भिक्खुणी संघमित्रा यांचे श्रीलंकेत आगमन, तसेच बोधिवृक्षाच्या शाखेचे श्रीलंकेत रोपण या सर्व घटनांमुळे मार्गशीर्ष पौर्णिमा इतिहासात विशेष स्मरणीय असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या त्याग, परिश्रम व समर्पणातून उभ्या राहिलेल्या चळवळीचा वारसा कृतीतून जपण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.

कार्यक्रमात आदर्शांचे पूजन आयुनि करुणा सरोदे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यांच्या होऊ घातलेल्या विवाहसंस्कारासाठी त्यांना भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याच्या वतीने हार्दिक शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या.

कार्यक्रमाच्या शेवटी संघराज अशोक निकाळजे व त्यांच्या परिवारामार्फत खीरदान करण्यात आले. यावेळी तांदूळवाडी येथून आलेले सरोदे परिवारातील सर्व सदस्य , निकाळजे परिवारातील सर्व सदस्य व कुरोली खुर्द येथील बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोदी आणि पुतीन ज्या SUV मध्ये बसले त्याची वैशिष्ट्य माहितीयेत का? ऐकून हैराण व्हाल

0
मोदी आणि पुतीन ज्या SUV मध्ये बसले त्याची वैशिष्ट्य माहितीयेत का? ऐकून हैराण व्हाल


Narendra Modi And Vladimir Putin : रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन हे गुरुवारी सायंकाळी दिल्लीच्या पालम एयरपोर्टवर लँड झाले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वतः त्यांना रिसिव्ह करण्यासाठी एअरपोर्टवर पोहोचले यामधून जगाला दोघांमध्ये असलेली बॉण्डिंग दिसून आली. एवढंच नाही तर ज्या प्रकारे मोदी रूस दौऱ्यावर असताना पुतीन यांनी त्यांना आपल्या कारमध्ये बसवलं होतं तसंच मोदींनी सुद्धा पुतीनला आपल्या SUV मध्ये बसवलं आणि मैत्रीतला दिलदारपणा दाखवला. तेव्हा मोदी आणि पुतीन बसलेल्या SUV नेमकी कोणती आहे आणि त्याची खासियत काय? यासंदर्भात सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. 

Add Zee News as a Preferred Source

कोणत्या SUV मध्ये बसले मोदी आणि पुतीन?

मोदी आणि पुतीन ज्या SUV मध्ये बसले होते ती  2024 टोयोटा फॉर्च्यूनर 4X2 डीजल मॅन्युअल व्हेरिएन्ट होती ज्याची एक्स शोरूम किंमत ही जवळपास 34.28 लाख रुपये आहे. पण यात शक्तिशाली बुलेटप्रूफिंग आणि उत्कृष्ट सुरक्षा वैशिष्ट्ये जोडली गेली आहेत, ज्यामुळे त्याची किंमत खूप वाढते. ही फर्स्ट ओनर एसयूव्ही असून तिचा रंग हा सुपर व्हाईट आहे. ही एसयूव्ही तिच्या अतुलनीय विश्वासार्हता, मजबूत बिल्ड गुणवत्ता आणि शक्तिशाली कामगिरीसाठी ओळखली जाते.

यात 2755 सीसीचा टर्बोचार्ज्ड डिझेल इंजन दिला असून जो जवळपास 201.15 हॉर्सपावर (bhp) च्या जास्त पॉवर आणि 420 Nm टॉर्कची शक्ती निर्माण करते. या गाडीचं इंजिन 6-स्पीड इंटेलिजेंट मॅन्युअल ट्रान्समिशन (iMT) शी जोडलेले आहे आणि ते 4X2 (टू-व्हील ड्राइव्ह) ड्राइव्हट्रेनद्वारे चालते. ही 7 सीटर SUV तिच्या उत्तम ग्राउंड क्लिअरन्स आणि मजबूत सस्पेंशनमुळे खडबडीत रस्ते आणि महामार्गांवर आरामदायी प्रवास देते.

FAQ : 

पुतीन भारतात कधी आले?

रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन हे गुरुवारी सायंकाळी भारतात आले. 

नरेंद्र मोदींनी पुतीन यांना कोणत्या गाडीतून रिसिव्ह केलं?

नरेंद्र मोदींनी पुतीन यांना   2024 टोयोटा फॉर्च्यूनर 4X2 डीजल मॅन्युअल व्हेरिएन्ट या SUV मधून रिसिव्ह केलं. 

मोदी आणि पुतीन बसलेल्या गाडीची किंमत किती?

मोदी आणि पुतीन बसलेल्या गाडीची किंमत ही जवळपास 34.28 लाख रुपये  आहे. 





Source link

सातारा जिल्हा भारतीय बौद्ध महासभेची नवीन कार्यकारिणी घोषित : अशोक भालेराव व नानासो मोहिते यांची जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड

0
सातारा जिल्हा भारतीय बौद्ध महासभेची नवीन कार्यकारिणी घोषित : अशोक भालेराव व नानासो मोहिते यांची जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड

सातारा : “समाजाचा सर्वांगीण विकास हा एकजुटीतूनच शक्य होतो. गटा-तटांच्या राजकारणामुळे समाजाची हानी होते,” अशी भावना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष यु.डी. बोराडे यांनी व्यक्त केली.

शाहूनगर येथील ग्रामसेवक भवन येथे भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा पश्चिम व पूर्व कार्यकारिणी पुनर्गठन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या सभेत अशोक भालेराव (पश्चिम) आणि नानासो मोहिते (पूर्व) यांची जिल्हाध्यक्षपदी एकमताने फेरनिवड करण्यात आली.

बोराडे पुढे म्हणाले, “पंचशीलाचे पालन करणे ही प्रत्येक धम्मकार्यकर्त्याची जबाबदारी आहे. संविधान जोडो हा संदेश घराघरांत पोहोचला पाहिजे आणि सामाजिक एकजूट भक्कम झाली पाहिजे.”

केंद्रीय कार्यालय प्रमुख एस. के. भंडारे म्हणाले, “सातारा जिल्हा ही बाबासाहेबांनी प्राथमिक शिक्षण घेतलेली पवित्र भूमी. अशा जिल्ह्यातील संघटन कार्य अधिक जोमाने आणि शिकवणुकीच्या तत्त्वांनुसार व्हायला हवे,” असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमात मार्गदर्शन करणाऱ्यांमध्ये संस्थेचे ट्रस्टी रिपोर्टिंग चेअरमन डॉ. सुभाष जौंजाळे, ट्रस्टी उपाध्यक्ष तथा केंद्रीय कार्यालय प्रमुख डॉ. एस. के. भंडारे, ट्रस्टी अरुण पोळ, राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्र प्रभारी भिकाजी कांबळे, राज्य संघटक (पुणे–सातारा विभाग) दादासाहेब भोसले यांचा समावेश होता.
पश्चिम विभागीय कार्यकारिणी
जिल्हाध्यक्ष : अशोक भालेराव
सचिव : यशपाल बनसोडे
कोषाध्यक्ष : रुपेश सावंत
संस्कार : मनोज गायकवाड
पर्यटन : आप्पा अडसूळे
संरक्षण : पिराजी सातपुते
कार्यालयीन हिशेब तपासनीस : नंदकुमार काळे
पूर्व विभागीय कार्यकारिणी
जिल्हाध्यक्ष : नानासो मोहिते
सचिव : सुनील कदम
कोषाध्यक्ष : नंदकुमार शिंदे
संस्कार : अविनाश बारसिंग
पर्यटन : दिलीप सर
संरक्षण : काकडे सर
कार्यालयीन हिशेब तपासनीस : बाळासाहेब जाधव
कार्यक्रमास राजगृहाशी एकनिष्ठ कार्यकर्ते, माजी आजी पदाधिकारी, केंद्रीय शिक्षक, बौद्धाचार्य, माजी श्रामणेर, समता सैनिक दल तसेच बौद्ध बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवडीनंतर प्रास्ताविक आणि कामकाजाचा आढावा जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव यांनी सादर केला. नवीन कार्यकारिणीमुळे जिल्ह्यातील सर्व गटांचे एकत्रिकरण होऊन संघटन अधिक सक्षम बनेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

ज्ञानसूर्य अस्ताला गेला… पण विचारांचा प्रकाश चिरंतन

0
ज्ञानसूर्य अस्ताला गेला… पण विचारांचा प्रकाश चिरंतन

ज्ञानसूर्य अस्ताला गेला… पण विचारांचा प्रकाश चिरंतन

साहस टाईम्स फलटण :- ज्ञानसूर्याच्या अस्ताने काळीज पिळवटले -६ डिसेंबर १९५६
६ डिसेंबर १९५६ हा दिवस इतिहासात काळ्या अक्षरांनी कोरला गेला. भारतीय राजकारणातील प्रचंड वादळ, कोट्यवधी दलितांची मायेची सावली असणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर शांत झाले. जाताना ते राष्ट्राला राज्यघटना, अशोकचक्र, मानवतावादी विचारसरणी आणि धर्म नसलेल्या माणसाला धम्म देऊन गेले. संघर्षातून मिळवलेल्या अधिकारांचे जतन व्हावे म्हणून रिपब्लिकन पक्षाची पायाभरणी करून गेले आणि ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ऐतिहासिक ग्रंथाला पूर्णत्व देताच त्यांच्या आयुष्याचा शेवटचा अध्याय लिहिला गेला.

गुरुवार, ६ डिसेंबर रोजी सकाळी सहा वाजता माईसाहेबांनी ज्यावेळी बाबासाहेबांना पाहिले त्यावेळी एक पाय उशीवर, डोक्याजवळ हस्तलिखित कागद, चष्मा, काही महत्त्वपूर्ण ग्रंथ व औषधाची बाटली होती… निद्रावस्थेत बाबांचे देहावसान झाले होते. ही बातमी कळताच सात कोटी दलितांच्या अनभिषिक्त राजाच्या अंतिम क्षणी जगजीवनराम पाय धरून रडले— “अखेरीस तेही एकटे गेले…”
महानायकाचे शेवटचे पाच दिवस अत्यंत व्यस्त, भावनिक आणि ध्येयवेडेपणाने भरलेले होते.
१ डिसेंबर १९५६
दिल्लीतील मथुरा रोडवर बौद्ध कलादालन पाहिले. विविध देशांतील बुद्धमूर्तींचे निरीक्षण केले. परतताना कॅनॉट प्लेस येथील बुक डिपो मधून सात पुस्तके खरेदी केली आणि रात्री उशिरापर्यंत ती चाळत राहिले.
२ डिसेंबर १९५६
दिवसभर ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाचे लेखन. संध्याकाळी दलाई लामांच्या सत्कार कार्यक्रमास उपस्थित. भारतात बुद्धधम्माचा प्रचार कसा करता येईल यावर चर्चा. रात्री लेखनाचे कार्य सुरूच; आणि त्याचवेळी रत्तूंना हळुवार प्रश्न –
“ही पुस्तके माझ्या हयातीत प्रकाशित होतील काय? मी भारतभर बौद्धधर्माचा प्रसार करू शकेन काय?”
रात्री १०.३० वाजता थकव्यामुळे झोप.
३ डिसेंबर १९५६
मुंबईत १६ डिसेंबर रोजी बौद्ध धम्मदीक्षा समारंभाचा निर्णय. कार्यकर्त्यांना कळविले. निघण्यासाठी प्रथम रेल्वे तिकीटांचा प्रयत्न अपयशी झाल्याने १४ डिसेंबरची विमानतिकिटे आरक्षित केली. १४ ते १८ डिसेंबर दरम्यान मुंबईत कुमारसेन समर्थ यांच्या घरी मुक्काम निश्चित.
४ डिसेंबर १९५६
रात्रीच्या श्रमांमुळे थकवा जाणवला. सकाळी जैन धर्मीय अधिवेशनाबाबत चर्चा. रिपब्लिकन पक्षासंदर्भात समाजवादी नेते एस. एम. जोशी व प्र. के. अत्रे यांना पत्र लेखन. तसेच भारतात बुद्धधम्माचा प्रसार आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा म्हणून ब्रह्मदेश सरकारला पत्र.
५ डिसेंबर १९५६
मुंबईतील धर्मांतर व धम्मप्रचाराच्या कार्यक्रमाची सातत्याने चिंता. दिवसभर ग्रंथलेखन -आपल्या हयातीत प्रकाशित व्हावेत यासाठी तळमळ. रात्री अस्वस्थता; तरीही प्रस्तावना लिहिली, पत्रे वाचली. झोपेचे इंजेक्शनही निष्फळ.
स्वयंपाक्याने जेवणास बोलावल्यावर अनिच्छेने थोडेसे भोजन.
समोर ग्रंथांच्या कपाटांकडे पाहत बाबासाहेब स्तब्ध… त्रिसरणाचा उच्चार…
मालिश करून घेताना पुटपुटले – “चल उचल कबिरा तेरा भवसागर डेरा…”
नानकचंद रत्तूंना बुद्धगीताची रेकॉर्ड लावण्यास सांगितले. दलितांच्या भवितव्याची चिंता तेवढ्याच तीव्रतेने.
११.३५ वाजता रत्तूंनी बाबासाहेबांचे शेवटचे दर्शन घेतले – त्यांना कल्पना नव्हती की हाच निरोप अंतिम ठरेल.
६ डिसेंबर १९५६ — अखेरचा प्रवास
सकाळी स्वयंपाकी सुदामबाबांनी दुःखद वार्ता दिली. दिल्लीतील माध्यमांना माहिती देण्यात आली. ही बातमी वाऱ्यासारखी देशभर पसरली. पंडित जवाहरलाल नेहरू व अन्य मंत्री अंतिमदर्शनासाठी पोहोचले.
सायं. ४.३० – पार्थिव दिल्ली विमानतळावरून नागपूरकडे.
रात्री – दीक्षा स्थळी अंतिमदर्शन.
नंतर -मुंबई सांताक्रूझ येथे लाखोंची गर्दी.
अंत्यसंस्कारासाठी जागा नाकारली जात असल्याच्या चर्चा -पण कार्यकर्त्यांनी ठाम भूमिका घेतली:
“मी हिंदू म्हणून मरणार नाही-अशी प्रतिज्ञा करणाऱ्या बाबासाहेबांचा अंत्यसंस्कार हिंदू स्मशानभूमीत कशाला?”
सी. के. बोले यांच्या जमिनीवर अखेर अंत्यसंस्कार ठरले आणि बौद्ध रीतीने, भदंत आनंद कौशल्य व एच. धर्मानंद यांच्या उपस्थितीत ते पार पडले.

ज्ञानाच्या अथांग महासागराला विनम्र अभिवादन!कोटी कोटी प्रणाम!
जय भीम! जय भारत!नमो बुद्धाय!🙏

संकलन : सोमीनाथ पोपट घोरपडे, प्रवचनकार, भारतीय बौध्द महासभा

शेतकरी कर्जमाफीवर बोलायचं नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय, मंत्री बाबासाहेब पाटलांची कबुली 

0



Babasaheb Patil : राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil ) यांनी कराड (Karad) येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी अभिवादन केले. यावेळी सहकार मंत्र्यांचे अज्ञान समोर आले असून माध्यमांपासून पळ काढताना आढळून आले. तर शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर बोलायचं नाही असं मुख्यमंत्री सांगितल्याची कबुली बाबासाहेब पाटील यांनी दिली. 

बँका बुडवणाऱ्यांवर कारवाईसाठी सिस्टीममुळे वेळ लागत आहे

यशवंतराव चव्हाण पुण्यतिथीला सरकारमधील कोणी आले नाही असे प्रसारमाध्यमांनी विचारले असता, मंत्री म्हणाले की, मला याबाबत माहिती नाही. बँका बुडवणाऱ्यांवर कारवाईसाठी सिस्टीममुळे वेळ लागत असल्याचे मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले. लेखापरिक्षणात अ वर्ग तरी संस्था, बँका बंद पडतात. त्यावर कायदा दुरूस्ती करणार असल्याचे बाबासाहेब पाटील म्हणाले. कर्ज घेणाऱ्या आणि बुडवणाऱ्या कारखान्यांवर कारवाई होणार का? असं देखील त्यांना विचारण्यात आले, यावेळी सहकारमंत्री म्हणाले की, कारखान्यांची यादी पत्रकारांनीच द्यावी असे म्हणाले. मग सहकार खाते काय करतयं? असा सवाल देखील उपस्थित केला जात आहे.

कर्जमाफी विषयावर बोलायचं नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याचे मंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले. कर्जमाफीमुळं सहकार खात्यावर किती बोजा कमी होईल, असा सवाल देखील सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांना विचारण्यात आला. यावेळी ते म्हणाले की, आकडे काढावे लागतील.

30 जूनआधी कर्जमाफी करणार असल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती

30 जूनआधी कर्जमाफी झाल्याशिवाय राहणार नाही. यावर्षीचे कर्जबाजारी शेतकरीही या कर्जमाफीत बसले आहेत. एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी शब्द दिला आहे. दिलेला शब्द पाळला नाही, दगाफटका केला तर फासावर जाण्याची तयारी आहे”, असंही रोखठोक मत बच्चू कडूंनी यावेळी व्यक्त केलं आहे. 30 जूनपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासंदर्भात अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिली आहे. प्रहारचे प्रमुख बच्चू कडू (Bacchu Kadu )  यांच्या आंदोलनानंतर सरकारनं हा निर्णय घेतला आहे. शेतकरी नेत्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर सरकारनं समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलाय. ही समिती अभ्यास करुन अहवाल देणार आहे. आम्हाला सरकारनं योग्य वेळ आणि तारीख दिली आहे. आम्ही तारखेसाठीच आलो होतो. आम्ही समाधानी असल्याचे मत बच्चू कडू यांनी व्यक्त केले आहे. 

महत्वाच्या बातम्या:

Radhakrishna Vikhe Patil: ‘आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची’ आता राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर मुक्ताफळे

 

आणखी वाचा



Source link