Wednesday, July 29, 2026
Home Blog Page 512

‘I Love You चंदा…’, पत्नीला प्रियकरासोबत जगता यावे म्हणून पतीने संपवलं जीवन; चिठ्ठी वाचून डोळे पाणावतील

0
‘I Love You चंदा…’, पत्नीला प्रियकरासोबत जगता यावे म्हणून पतीने संपवलं जीवन; चिठ्ठी वाचून डोळे पाणावतील


Crime Story :  गेल्या काही वर्षांमध्ये विवाहबाह्य संबंधाच्या अनेक घटना समोर येत आहे. कधी पती तर कधी पत्नीचं विवाहबाह्य संबंधातून अनेक वेळा गुन्हेगारीकडे हे प्रकरण जातं. बिहारमधील सुपौलमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीला कळलं की, पत्नीचं विवाहबाह्य संबंध आहे. पतीला पत्नीचं हे प्रकरण कळल्यानंतर त्याने स्वत:चं आयुष्य संपवलं. पत्नीला आयुष्यभर तिच्या प्रियकरासह आनंदी राहता यावे म्हणून त्याने टोकाचं पाऊल उचलं. हे प्रकरण नगरपरिषद क्षेत्रातील लाटौना मिशन वॉर्ड-18 मधील आहे. बुधवारी इथे पोलिसांना तरुणाच्या आत्महत्येची माहिती मिळाली. मृत पुरुषाचं नाव कुमुद यादव असून त्याच्या खिशातून एक सुसाईड नोट सापडली आहे, ज्यामध्ये त्याच्या पत्नीचे दुसऱ्या मुलासोबत प्रेमसंबंध असल्याचे त्याने सांगितलंय. (I Love You Chanda Husband ends life so wife can live with lover extramarital affair letter will bring tears to your eyes)

मृत व्यक्तीची सुसाईट नोट वाचून पोलिसांचेही डोळे पाणावलेय. कुमुद दोन वर्षांपासून नगर परिषद परिसरातील वॉर्ड 18 मध्ये पत्नी चंदा यादवसोबत भाड्याच्या घरात राहत होता. बुधवारी दुपारी कुमुदचा त्याची पत्नी चंदासोबत कशावरून तरी वाद झाला. यानंतर त्याने गळफास लावून आत्महत्या केली. चंदा ओरडताच आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि मात्र उशीर झाला होता. 

लोकांनी मृताच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच मृतांच्या कुटुंबीयांनीही घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनीही तिथे पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला. मृताच्या कुटुंबीयांनी सांगितले की, कुमुदची पत्नी चंदा यादव ही मधेपुरा जिल्ह्यातील महेशुआ पंचायतीच्या रानीपट्टी येथील रहिवासी अरुण यादव यांची मुलगी आहे. कुमुदने 2019 मध्ये चंदासोबत प्रेमविवाह केला होता.

कुटुंबीयांनी सांगितले की, चंदा यादव यांचं यापूर्वीही दोनदा लग्न झालं होतं. दोघांनाही मुले नाहीत. कुमुदची आई तिच्या बालपणीच वारली. गावकऱ्यांनी सांगितलं की पती-पत्नीमध्ये भांडण कशावरून झाले हे त्यांना माहित नव्हतं.

पत्नीसमोर आत्महत्या करणाऱ्या कुमुदने सुसाईड नोटमध्ये पत्नी चंदा कुमारीशी संबंधित अनेक किस्से सांगितलंय. कुमुदने लिहिलं की, चंदा, मी तुला खूप प्रेम केले. मी आजही ते करतो आणि भविष्यातही करत राहीन. पण तुला एका मुलाने फसवले आहे. म्हणूनच तू माझ्यावर कंटाळली आहेस. मला माहित आहे की तू त्याच्याशिवाय राहू शकत नाहीस. म्हणून, मी तुला मुक्त केलं. तू त्याच्यासोबत आनंदी राहा. मला त्या मुलाशी काहीही अडचण नाही. मी फक्त आत्महत्या करत आहे. आय लव्ह यू चंदा. 





Source link

अल्पसंख्यांकांना लग्नात 50 हजारांचं गिफ्ट, ‘या’ राज्यात इमामांना पगार देणार सरकार!

0
अल्पसंख्यांकांना लग्नात 50 हजारांचं गिफ्ट, ‘या’ राज्यात इमामांना पगार देणार सरकार!



Karnataka Budget 2025: कर्नाटक सरकारने चालू आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला आहे. काय-काय आहे अर्थसंकल्पात जाणून घेऊया. 
 



Source link

तरुणाने 14 वर्षाच्या मुलीला फरफटत नेलं, बाप आणि नातेवाईक पाहत राहिले; पोलिसांनी घडवली जन्माची अद्दल

0
तरुणाने 14 वर्षाच्या मुलीला फरफटत नेलं, बाप आणि नातेवाईक पाहत राहिले; पोलिसांनी घडवली जन्माची अद्दल



14 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विरोध असतानाही तिच्या पतीने तिला फरफटत नेल्याची धक्कादायक घटना बंगळुरुनजीक घटली आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिघांना अटक करण्यात आली आहे. 
 



Source link

बारामतीत रविवारी जनआक्रोश मोर्चा; स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ कुटुंबियांसह समाजबांधवांची उपस्थिती

0
बारामतीत रविवारी जनआक्रोश मोर्चा; स्व. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ कुटुंबियांसह समाजबांधवांची उपस्थिती

बारामती – स्व. संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ आणि आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी, या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आयोजित करण्यात आलेला जनआक्रोश मोर्चा रविवारी (दि. ९) काढण्यात येणार आहे. पूर्वी हा मोर्चा शनिवारी (दि. ८) होणार होता, मात्र देशमुख कुटुंबीयांना या आंदोलनात सहभागी होता यावे, यासाठी तो पुढे ढकलण्यात आला आहे.

या मोर्चात स्व. संतोष देशमुख यांचे बंधु, मुलगी आणि संपूर्ण कुटुंब सहभागी होणार आहे. मोर्चा रविवारी सकाळी ८ वाजता कसबा येथील छत्रपती शिवाजी उद्यानातून सुरू होणार असून, नेहमीच्या मार्गाने जात भिगवण चौक येथे समाप्त होणार आहे.

स्व. संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर बारामती शहरात तीव्र पडसाद उमटले. यामुळे मराठा समाजाने तातडीने जिजाऊ भवन येथे बैठक घेऊन निषेध मोर्चा आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता.

मोर्चात सर्व जाती-धर्मांचे नागरिक सहभागी होणार असून, मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे. बारामती बंद पाळण्यात येणार असून, सर्वधर्मीय नागरिक या अन्यायाविरोधात एकत्र येणार आहेत.

– साहस Times

HSRP चा अर्थ काय, वाहनांवर ही नंबर प्लेट लावण्यासाठी नेमकं काय करावं? पाहा A to Z माहिती

0
HSRP चा अर्थ काय, वाहनांवर ही नंबर प्लेट लावण्यासाठी नेमकं काय करावं? पाहा A to Z माहिती



How To Apply for HSRP Number Plate : कुठे आणि कसा कराल अर्ज? यासाठी पैसेही मोजावे लागणार? पाहा आणि समजून घ्या संपूर्ण प्रक्रिया…. 



Source link

संजय राऊतांविरोधात सरसेनापती हंबीरराव मोहितेंचे वंशज आक्रमक, दहा कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार

0


Sanjay Raut : राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांच्यावर आरोप करणाऱ्या मोहिते नावाच्या महिलेचा सरसेनापती हंबीरराव मोहिते (Sarsenapati Hambirrao Mohite) घराण्याची संबंध जोडणाऱ्या एका युट्यूब चॅनेलसह शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या विरोधात सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज व तळबीड येथील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. कराड तळबीड पोलीस ठाण्यात संबंधित युट्यूब संपादकावर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तळबीडमधील हंबीरराव मोहिते यांच्या समाधीसमोर यूट्यूब चॅनेलसह खासदार संजय राऊत यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच बदनामी करणाऱ्यांवर दहा कोटीचा मानहानीचा दावा ठोकणार असल्याचे देखील सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या वंशजांनी सांगितले आहे. 

सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज राजेंद्र मोहिते म्हणाले की, महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर ज्या महिलेने आरोप केले, त्या महिलेचा तळबीड किंवा सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्याची कुठलाही संबंध नाही. परंतु, एक युट्यूब चॅनेल आणि खासदार संजय राऊत यांनी कुठलीही माहिती न घेता या प्रकरणाशी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे नाव जोडण्याचा प्रयत्न केला. 

दहा कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार

यामुळे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची बदनामी झाली आहे. त्यामुळे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या वंशजांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो.  जसे सरसेनापतींच्या वंशजांचे मन दुखावले तसेच महाराष्ट्राच्या जनतेचे एखील मन दुखावले आहे. याबद्दल त्यांनी महाराष्ट्राची जाहीर माफी मागावी. त्यांच्यावर आम्ही दहा कोटींचा मानहानीचा दावा ठोकणार आहे, असे राजेंद्र मोहिते यांनी म्हटले आहे.  

नेमकं काय म्हणाले होते संजय राऊत? 

राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी एका महिलेला स्वतःचे नग्न फोटो पाठवत विनयभंग केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. याबाबत पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले होते की, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे विकृत आहेत. सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कुटुंबातील एका स्त्रीचा या मंत्र्यांने कसा विनयभंग आणि छळ केल्याचं कळतंय. ही महिला काही दिवसांनी विधानभवनासमोर उपोषणाला बसणार आहे. जयकुमार गोरेंबद्दलचे आरोप महाराष्ट्राला काळिमा फासणारी आहे. हंबीरराव मोहितेंच्या कुटुंबातील स्त्रीचा विनयभंग गेला अशा मंत्र्याला आपण मंत्रीमंडळात का ठेवलं आहे?, असा सवाल संजय राऊतांनी उपस्थित केला होता. 

आणखी वाचा 

Sanjay Raut : फडणवीसांकडून शिंदेंच्या ‘मित्रा’ची उचलबांगडी, संजय राऊत म्हणाले, ‘त्याचे राजकीय आका…’

अधिक पाहा..



Source link

प्रगत शिक्षण संस्थेचे माण तालुक्यातील अंगणवाड्यांसोबतचे काम दिशादर्शक – मालविका झा

0
प्रगत शिक्षण संस्थेचे माण तालुक्यातील अंगणवाड्यांसोबतचे काम दिशादर्शक – मालविका झा

फलटण : प्रगत शिक्षण संस्थेने केंद्र सरकारच्या निपुण भारत अंतर्गत लातूर जिल्ह्याच्या औसा तालुक्यातील 205 व सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात 50 अंगणवाड्यांसोबत बालशिक्षणात उत्कृष्ट काम केले असून त्यांनी केलेल्या कामामुळे माण तालुक्यातील अंगणवाडीमध्ये अमुलाग्र बदल झाला असून बालशाळेची वर्गरचना ते बाल शिक्षणातील सेविका व मदतनीस यांची समज वाढली असून त्याचे परिणाम म्हणून अंगणवाडीमध्ये गुणवत्ता पूर्ण बालशिक्षण दिले जात आहे. म्हणून प्रगत शिक्षण संस्थेचे माण तालुक्यातील अंगणवाड्यांसोबतचे काम दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन टाटा एज्यूकेशन विभाग महाराष्ट्राच्या प्रमुख मालविका झा यांनी केले आहे.त्या माण तालुक्यातील राजवडी गावातील राजवडी अंगणवाडी क्र. 142 व उमाजीनगर अंगणवाडी(राजवडी)च्या भेटी दरम्यान बोलत होत्या.
नुकतेच टाटा एज्यूकेशन विभाग महाराष्ट्र च्या प्रमुख मालविका झा, टाटा ट्रस्ट्सची एक सहयोगी संस्था असणारी कलिके संस्थेच्या प्रतिनिधीनी माण तालुक्यातील या दोन अंगणवाड्यांना भेटी दिल्या. कलिके समृद्धी उपक्रम (Learning Enhancement Initiative) राबविण्यासाठी नोडल एजन्सी म्हणून कार्य करते. कलिके कर्नाटकातील यादगीर या जिल्ह्यात कार्यरत आहे,जो सर्व विकास निर्देशांकांनुसार राज्यातील सर्वात मागास जिल्ह्यांपैकी एक आहे.
या भेटीत राजवडी गावातील उमाजीनगर अंगणवाडीच्या सेविका निलम दिपक जगदाळे व राजवडी अंगणवाडी क्र. 142 पल्लवी सुभाष यादव व अंगणवाडी मदतनीस जयश्री आकाराम भोसले यांच्याशी संवाद साधून चर्चा केली. या चर्चेदरम्यान कलिके टीम व श्रीम. मालविका झा यांनी अनेक गोष्टीबाबत माहिती घेतली.हे मुक्त खेळाचे कोपरे तुम्ही रोज मांडता का? कोपऱ्यावरील खेळ किती दिवसांनी बदलता? 5 ते 6 वयोगटातील विद्यार्थ्यांना तुम्ही अक्षरे शिकवता त्यावेळी इतर वयोगटातील मुले काय करतात? यावर सेविका ताई म्हणाल्या, प्रत्येक वयोगटातील मुलासोबत आम्ही नियोजन स्वतंत्र करतो. 3 ते 4 वयोगटातील मुले मुक्त खेळाच्या कोपऱ्यावर खेळतात. गोष्टीच्या पुस्तकाचा वापर कसा करता? पुस्तके कधी बदलता? मुलांना वेगवेगळी गाणी घेता की भिंतीवर लावलेलीच घेता. तर सेविका ताई म्हणाल्या, “आम्ही दर महिन्याला नवीन गाणे घेतो. वर्षेभर ही गाणी वापरतो. अक्षर दृढीकरण खेळ, वर्क शीट याही विषयी चर्चा केली.मुलांना आनंद व मनोरंजन अभिनय गीत घेतो. असे सांगण्यात आले.अंगणवाडीत घेण्यात येणारे उपक्रम, सेविका व मदतनीस यांना प्रशिक्षणे, ऍक्टिव्हिटी किट, इतर साहित्य, प्रकल्प सहाय्यक व प्रकल्प अधिकारी भेटी, प्रगत शिक्षण संस्थेचा बालशिक्षण कार्यक्रम व त्यांचा प्रत्यक्ष वापर यावर या भेटीदरम्यान मार्गदर्शन करताना प्रकल्प समन्वयक तथा संस्थेचे कार्यकारी अधिकारी प्रकाश अनभुले यांनी माहिती दिली.यावेळी प्रकल्प सहाय्यक नम्रता भोसले याही पूर्णवेळ उपस्थित होत्या.
यावेळी टाटा शिक्षण विभाग महाराष्ट्राच्या प्रमुख मालविका झा,कलिके संस्थेतून जिल्हा व्यवस्थापक अशोक के, माल्लामा बी,तारासिंग जे,वरिष्ठ समन्वयक गिरीश आर, तालुका समन्वयक शांताम्मा, मुद्देश, बालक शिक्षण कार्यक्रम अधिकारी कोटरेश वाय,बाल विकास विभाग प्रमुख चिटकालांबा एन, प्रगतीची उपस्थिती प्रकल्प समन्वयक तथा कार्यकारी अधिकारी प्रकाश अनभुले, प्रकल्प सहाय्यक नम्रता भोसले, उमाजीनगर अंगणवाडीच्या सेविका निलम दिपक जगदाळे व राजवडी अंगणवाडी क्र. 142 पल्लवी सुभाष यादव व अंगणवाडी मदतनीस जयश्री आकाराम भोसले उपस्थित होत्या.ही अंगणवाडी भेट यशस्वी होण्यासाठी प्रकल्प अधिकारी राहुल मुळीक यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांनी वेळोवेळी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मार्गदर्शन केले.

हुंडा नाही, नोकरी नाही, तर ‘या’ कारणामुळे गावातील मुलांची होत नाहीयेत लग्न

0
हुंडा नाही, नोकरी नाही, तर ‘या’ कारणामुळे गावातील मुलांची होत नाहीयेत लग्न



Viral:  एका गावामध्ये हुंडा किंवा नोकरी नाही तर भलत्याच कारणामुळे मुलांना लग्नासाठी नकार पचवायला लागत आहे. 
 



Source link

अवकाशातील लँडींगच्या दीड वर्षांनंतर चांद्रयान 3 नं दिली मोठी Update; चंद्रावरील ‘त्या’ पुराव्यानं सारं जग थक्क

0
अवकाशातील लँडींगच्या दीड वर्षांनंतर चांद्रयान 3 नं दिली मोठी Update; चंद्रावरील ‘त्या’ पुराव्यानं सारं जग थक्क



भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं चंद्रावर पठवलेल्या Chandrayaan 3 संदर्भातील अत्यंत महत्त्वाची माहिती समोर. लँडींगच्या दीड वर्षांनंतर… 
 



Source link

राज्यात अनधिकृत होर्डिंगचा सुळसुळाट; विधानसभा अधिनेशनात मुद्दा गाजला

0
राज्यात अनधिकृत होर्डिंगचा सुळसुळाट; विधानसभा अधिनेशनात मुद्दा गाजला


मुंबईत बेकायदा होर्डिंगचा अपघात झाल्यानंतर महायुती सरकार जागे झाले. मात्र फक्त मुंबईत केवळ होर्डिंग्जचा प्रश्न नसून तर संपूर्ण राज्यात अनधिकृत होर्डिंग्जची संख्या प्रचंड वाढलेली आहे. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. गडचिरोली जिल्ह्यातील नागभिड तालुक्यात मोठे होर्डिंग असून ते कोसळले तर मोठा अपघात होईल. त्यामुळे ग्रामीण महाराष्ट्रातील होर्डिंग्जचे ऑडिट होणार का, आणि एखादी घटना घडल्यास त्यासाठी मंत्री जबाबदार असतील का असा प्रश्न काँग्रेस पक्षाचे विधानसभेतील विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवर यांनी आज विधानसभेत उपस्थित केला.



Source link