Wednesday, July 29, 2026
Home Blog Page 511

2,43,93,60,00,000 एवढ्या किंमतीच्या राजमहलात राहते भारतातील सर्वात सुंदर महिला

0
2,43,93,60,00,000 एवढ्या किंमतीच्या राजमहलात राहते भारतातील सर्वात सुंदर महिला


Residence Laxmi Vilas Palace: 15 हजार कोटी रुपये..  भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटीलिया या निवासस्थानाची ही किंमत आहे. अँटीलिया हे जगभरातील सर्वात महागड्या घरांपैकी एक आहे. मात्र, भारतातील  सर्वात सुंदर महिला अँटीलिया पेक्षा भव्य दिव्य अशा राजमहलात राहते आहे. लक्ष्मी विलास पॅलेस असे या राजमहलाचे नाव आहे.  गुजरातमधील लक्ष्मी विलास पॅलेस हा ब्रिटनच्या प्रसिद्ध बकिंगहॅम पॅलेसपेक्षाही मोठा आहे. जाणून घेऊया लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये राहणारी भारतातील सर्वात सुंदर महिला कोण?

लक्ष्मी विलास पॅलेस हे बडोदाचे राज घराने गायकवाड कुटुंबाचे निवासस्थान आहे. हा राजवाडा गायकवाड राजघराण्याचा महाल आहे. वडोदरामधील लक्ष्मी विलास पॅलेस हे जगातील सर्वात मोठे खाजगी निवासस्थान असून यासमोर अनेक श्रीमतांची घर फिकी पडतात. गायकवाड कुटुंबीय हे या पॅलेसचे मालक आहे. राजघराण्याचे प्रमुख समरजितसिंह गायकवाड हे त्यांच्या पत्नी राधिकाराजे गायकवाड आणि कुटुंबासह या वाड्यात राहतात. 2013 पासून ते कुटुंबासह या महालात आलिशान जीवनशैली जगत आहेत. 

महाराजा सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांनी सन 1890 मध्ये लक्ष्मी विलास पॅलेस बांधला होता. सध्या महाराज समरजीत सिंह गायकवाड आणि त्यांची पत्नी महारानी राधिका राजे गायकवाड यांचे कुटुंब या पॅलेसमध्ये राहत आहे. मराठा साम्राज्याच्या वैभव कसे होते याची झलक या राजवाड्यात पहायाल मिळते.  एकेकाळी गायकवाड कुटुंबाने बडोदावर राज्य केले होते. या पॅलेसची मालकी समरजीत सिंह गायकवाड यांच्याकडे आहे. समरजीत सिंह यांच्या कुटुंबियांची संपत्ती 20 हजार कोटींच्या आसपास आहे. 2002 साली त्यांचा विवाह राजकुमारी राधिकाराजे यांच्याशी झाला होता. त्यांना दोन मुली आहेत.

 3,04,92,000 स्क्वेअर फूटमध्ये लक्ष्मी विलास पॅलेस विस्तारलेला आहे. जगातील सर्वात महागडे घर असलेल्या ब्रिटनच्या बकिंगहॅम पॅलेसही याच्यापेक्षा आकारेने लहान आहे.  बकिंगहॅम पॅलेसचा विस्तार हा केवळ 8,28,821 स्क्वेअर फूट इतका आहे. तर जगातील सर्वात महागड्या घरांच्या यादीत दुसऱ्या स्थानी असलेल्या मुकेश अंबानी यांचे अँटिलिया हे आलिशान घर आहे. मात्र, अँटेलिया हाऊस देखील फक्त 48,780 स्क्वेअर फूट आकाराचे आहे. लक्ष्मी विलास पॅलेस मध्ये 170 हून अधिक खोल्या आहेत. याची किंमत  2,43,93,60,00,000  म्हणजेच जवळपास 25 हजार कोटी इतकी आहे.

 





Source link

पालकत्व सुजाण कार्यक्रम: विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विशेष कार्यशाळा

0
पालकत्व सुजाण कार्यक्रम: विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी विशेष कार्यशाळा

फलटण – दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी ‘पालकत्व सुजाण हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम ९ मार्च २०२५ रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत सद्गुरु उपळेकर महाराज मंदिर, ग्राउंड फ्लोअर हॉल, स्टेट बँकेच्या शेजारी, फलटण येथे होणार आहे.


कार्यक्रमाची वैशिष्ट्ये:

✅ मुलांचा हट्टीपणा आणि चंचलता कमी करण्याचे उपाय
✅ पालकांचा सहभाग – मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक का?
✅ मुलांना मोबाईल आणि गेम्सपासून दूर ठेवण्याचे तंत्र
✅ उजव्या आणि डाव्या मेंदूच्या समतोल विकासासाठी मार्गदर्शन
✅ पालकांच्या अपेक्षा आणि मुलांच्या क्षमतेतील तफावत कशी भरून काढावी?
✅ मुलांचे भावनिक उद्रेक आणि मानसिक आरोग्य हाताळण्याचे तंत्र
✅ आनंदी पालकत्व आणि आनंदी मुलांसाठी मार्गदर्शन

प्रमुख वक्ते:

🔹 मनशक्तीचे साधक डॉ. संजीवकुमार पाटील (सुप्रसिद्ध सिनेअभिनेता)

➡️ मर्यादित २०० जागा – विनामूल्य सहभाग!

➡️ सीट रजिस्ट्रेशन अनिवार्य – ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर आय.आय.टी, मोनिता गार्डन, ICICI बँक समोर, लक्ष्मीनगर, फलटण’ येथे भेट द्या.

📞 संपर्क: 9423867165 / 9545456156

महाकुंभवेळी 30 कोटी कमावल्याचे जगाला सांगितलं, आता पिंटू भाईंना द्यावा लागणार ‘इतका’ टॅक्स!

0
महाकुंभवेळी 30 कोटी कमावल्याचे जगाला सांगितलं, आता पिंटू भाईंना द्यावा लागणार ‘इतका’ टॅक्स!


Mahakumbh Pintu Bhai Tax: उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे 45 दिवसांचा महाकुंभमेळा नुकताच संपन्न झाला. यात देशासह जगभरातील लाखो भाविकांनी हजेरी लावली. भाविकांच्या उपस्थितीचा वेगळा रेकॉर्ड येथे प्रस्थापित झाला होता. दरम्यान महाकुंभमध्ये वेगवेगळे व्यवसाय करुन अनेकांनी लाखोची कमाई केली. दात घासण्याच्या काड्या विकून लाखो कमावलेला एक तरुण माध्यमांसमोर आला होता. पिंटू महारा उर्फ पिंटू भाई नावाच्या व्यावसायिकाने आपण महाकुंभ काळात बोट चालवून 30 कोटी कमावल्याचेही सांगितले होते. आता या पिंटू भाईंना किती टॅक्स भरावा लागणारेय? हेदेखील जाणून घेऊया. 

महाकुंभच्या 45 दिवसांत बोट चालवून 30 कोटी रुपये कमावलेले पिंटू महारा सध्या चर्चेत आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतः विधानसभेच्या अधिवेशनात पिंटू यांच्या कमाईच्या वृत्ताला दुजोरा दिला. पिंटू महारा यांच्याकडे 130 बोटी आहेत आणि त्यांना दररोज सुमारे 23 लाख रुपये नफा मिळत होता. 45 दिवसांत त्यांनी 30 कोटी रुपये कमावणाऱ्या पिंटू महारा यांना कोट्यवधी रुपयांचा कर भरावा लागणार आहे. 

30 कोटी रुपयांच्या उत्पन्नावर किती टॅक्स?

एवढ्या मोठ्या उत्पन्नावर पिंटू महारा यांना किती कर भरावा लागेल? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. भारतात 15 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्नावर 30% कर भरावा लागतो. आयकर गणनेनुसार पिंटू महारा यांना सुमारे 12 कोटी 80 लाख रुपये कर भरावा लागेल. एकूण उत्पन्न 30 कोटी रुपये असेल तर उत्पन्न कर 8 कोटी 98 लाख 12 हजार 500 रुपये कर भरावा लागले. यामध्ये 3 कोटी 32 लाख 30 हजार 625 रुपये अधिभार, 49 लाख 21 हजार 725 रुपये आरोग्य आणि शिक्षण उपकर असा एकूण 12 कोटी 80 लाख इतका कर असेल. जर पिंटू महारा यांनी त्यांचे खर्च कमी करून 20 कोटी रुपयांचे निव्वळ उत्पन्न दाखवले तर त्यांची कर देयता 8.52 कोटी रुपयांपर्यंत कमी होईल.

पिटू महाराने कसे कमावले 30 कोटी?

पिंटू महारा यांनी महाकुंभच्या 45 दिवसांत एकूण 130 बोटींचे संचालन केले.प्रत्येक बोटीने दररोज सरासरी 50 हजार रुपये कमावले. 300 हून अधिक खलाशांना त्यांनी रोजगार मिळवून दिला.भाविकांच्या प्रचंड गर्दीचा लाभ या व्यवसायाला झाला. महाकुंभात असा व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकाने प्रचंड नफा कमावला.
महाकुंभातून केवळ खलाशांनीच नव्हे तर ऑटो, टॅक्सी, बस, बोट चालक आणि पर्यटक वाहन चालकांनीही मोठा नफा कमावला आहे. ऑटो आणि टॅक्सी चालकांनी दररोज 3 हजार ते 5 हजार रुपये कमाई केली. बस आणि पर्यटक वाहन चालकांनी दररोज 5 हजार ते 10 हजार रुपये कमाई केली. बोट चालकांनी दररोज 2 हजार ते 4 हजार रुपये इतकी कमाई केली. तर हॉटेल बुकिंग वाल्यांनी दररोज 5 हजार ते 10 हजार रुपयांपर्यंत कमाई केली. 

सरकार काय म्हणते?

योगी सरकारने दिलेल्या माहितीनुसार, प्रयागराज महाकुंभ 2025 मुळे उत्तर प्रदेशच्या अर्थव्यवस्थेला 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त फायदा होतोय. या कार्यक्रमाचा लाखो लोकांना केवळ धार्मिकच नव्हे तर आर्थिकदृष्ट्याही फायदा झाल्याचे सरकारकडून सांगण्यात आले.





Source link

खासदार उदयनराजे झाले डॉक्टर, कॅनडाच्या अमेझिंग ऑलंम्पिया कॅनडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डतर्फे डॉक्टरेट बहाल

0



खासदार उदयनराजे झाले डॉक्टर, कॅनडाच्या अमेझिंग ऑलंम्पिया कॅनडा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डतर्फे डॉक्टरेट बहाल



Source link

इस्राईलच्या महिला पर्यटकावर सामूहिक बलात्कार; महाराष्ट्रातील मुलासह तिघांना कालव्यात फेकले, एकाचा मृत्यू

0
इस्राईलच्या महिला पर्यटकावर सामूहिक बलात्कार; महाराष्ट्रातील मुलासह तिघांना कालव्यात फेकले, एकाचा मृत्यू


Israeli Tourist Gangraped: कर्नाटकात 27 वर्षीय इस्राईल पर्यटकासह दोन महिलांवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. गुरुवारी रात्री तीन वाजणाच्या सुमारास दोन महिलांवर कथित सामूहिक बलात्कार झाल्याचे समोर आले आहे. बेंगळुरूपासून जवळपास 350 किमी दूर असलेल्या कोप्पलमध्ये ही घटना घडली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी महिलांवर बलात्कार करण्याआधी अन्य तीन पर्यटकांना कालव्यात ढकलून दिले. पीडितांनी दिलेल्या तक्रारीनुसार, यूएसमधील डॅनिअल आणि महाराष्ट्रातील पंकज कालव्यातून सुखरुप बाहेर आले. मात्र, ओडिशाचा रहिवाशी असलेला बिबाशचा मात्र मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. आरोपी अद्याप फरार असून त्यांना लवकरात लवकर अटक करण्यात येईल, असे अश्वासन वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

कोप्पलच्या पोलीस अधीक्षक राम एल अरासिद्दी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सनापुरजवळ पाच लोकांनी दोन महिला आणि तीन पुरुषांनी हल्ला केला. त्यातील दोन परप्रांतीय पर्यटक आहेत. एक अमेरिकन आणि दुसरी महिला इजराईलयेथील आहे. महिलाने तिच्या तक्रारीत म्हटलं आहे की, आरोपींनी मारहाण करण्याबरोबरच दोन महिलांसोबत बलात्कार केल्याचा आरोपही केला आहे. 

पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, चार पर्यटक आणि एक होमस्टेची मालक सनापुर येथील दरीजवळ फिरण्यासाठी आले होते. तेव्हा तीन जण बाईकवरुन आले आणि पेट्रोल पंपबद्दल विचारायला लागले. तेव्हा होमस्टेची संचालक हिने इथे जवळपास पेट्रोल पंप नाहीये असं सांगितले. तेव्हा त्यांनी पाच जणांना धमकवण्यास सुरुवात केली. त्यांच्याकडून पैसे मागितले. आरोपी कन्नड आणि तेलगू भाषेत बोलत होते.  त्यानंतर आरोपींनी तिन्ही पुरुषांना मारहाण आणि शिवीगाळ करत जबरदस्ती कालव्यात फेकले. 

पिडितेच्या तक्रारीनुसार, त्यांचे तिन्ही मित्र कालव्यातून बाहेर पडायचा प्रयत्न करत होते तेव्हा तिन्ही आरोपींनी तिच्यावर आणि इजराईल महिलेवर बलात्कार केला. या घटनेनंतर पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. शुक्रवारी सकाळी पोलिसांच्या विशेष पथकाने डॉग स्कॉडच्या मदतीने बेपत्ता तरुणाचा शोध घेतला. मात्र शनिवारी सकाळी त्याचा मृतदेह पोलिसांना सापडला आहे. पोलिस आता आरोपींची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत असून त्यांना लवकरच अटक करण्यात येईल, असं पोलिसांनी म्हटलं आहे.





Source link

बोर्डाच्या परीक्षेपूर्वी आईचं निधन, विद्यार्थ्यांने आईचे अंत्यदर्शन घेऊन पेपर लिहिला… मन हेलावून टाकणारा प्रसंग

0
बोर्डाच्या परीक्षेपूर्वी आईचं निधन, विद्यार्थ्यांने आईचे अंत्यदर्शन घेऊन पेपर लिहिला… मन हेलावून टाकणारा प्रसंग


तामिळनाडूच्या तिरुनेलवेली जिल्ह्यात वलियरमध्ये परीक्षेच्या काही तास आधी विद्यार्थ्याच्या आईचा अचानक मृत्यु झाला. विद्यार्थ्याची 12 वीची बोर्डाची परीक्षा होती. विद्यार्थी सुनील कुमार अक्षरशः पाणावलेल्या डोळ्यांनी कॉलेजमध्ये पोहोचला. सुनिल कुमारने घरातून निघण्यापूर्वी आईच्या पार्थिवाचे दर्शन घेतले. 

तिरुनेलवेली जिल्ह्यातील वलीयुर येथील सुनील कुमारची आई सुब्बलक्ष्मी यांचे बारावीच्या परीक्षेच्या पहिल्या दिवशी 3 मार्च रोजी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे वडील कृष्णमूर्ती यांचे सहा वर्षांपूर्वी निधन झाले. सुनील आणि त्याची बहीण सुहासिनी यांच्या संगोपनाची जबाबदारी सुब्बलक्ष्मी यांच्यावर होती.

तीव्र नैराश्यातही, सुनीलच्या नातेवाईकांनी आणि शेजाऱ्यांनी त्याला परीक्षा देण्यास प्रोत्साहित केले, कारण त्यांना त्याच्या आईने तिच्या मुलांना शिक्षण देण्याचा दृढनिश्चय आठवला. जाण्यापूर्वी, भावनिक झालेल्या सुनीलने त्याचे परीक्षेचे हॉल तिकीट त्याच्या आईच्या पायाशी ठेवले आणि तो रडू लागला. लोकांनी त्याला पाठिंबा दिला आणि परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहित केले.

विद्यार्थी परीक्षा केंद्रावर पोहोचला

त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी त्याचे सांत्वन केले आणि त्याला परीक्षा केंद्रावर घेऊन गेले, त्याला आठवण करून दिली की त्याच्या आईला तो यशस्वी व्हावा अशी इच्छा होती. राज्याचे शिक्षण मंत्री अंबिल महेश यांच्या पथकाने सुनीलशी बोलून त्यांची मदत मागितली. मंत्र्यांनी सांगितले की ते तुमच्यासोबत आहेत आणि तुम्हाला आवश्यक ते सर्व सहकार्य करतील.

मुख्यमंत्री एमके स्टॅलिन काय म्हणाले?

मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी ट्विटरवर या घटनेबद्दल एक पोस्ट शेअर केली आणि लिहिले की, तमिळ समुदायाचे शिक्षण आपल्या जीवापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. तामिळनाडू उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा ३ मार्च ते २५ मार्च दरम्यान होणार आहे, ज्यामध्ये ८ लाखांहून अधिक विद्यार्थी बसण्याची अपेक्षा आहे.





Source link

सोन्याची नाणी शोधण्यासाठी इथं रोज रात्री शेकडो लोक खोदतात खड्डे; ‘छावा’ चित्रपटाशी कनेक्शन

0
सोन्याची नाणी शोधण्यासाठी इथं रोज रात्री शेकडो लोक खोदतात खड्डे; ‘छावा’ चित्रपटाशी कनेक्शन



Chhava Effect Treasure Hunt At Night: या ठिकाणी रोज सकाळी शेकडो छोटे छोटे खड्डे दिसून येतात.



Source link

महाराष्ट्रातील ‘शरीररसौष्ठव’ डोळे दिपवणार! प्रभादेवीत रविवारी रंगणार ‘स्वामी समर्थ श्री’ स्पर्धा

0
महाराष्ट्रातील ‘शरीररसौष्ठव’ डोळे दिपवणार! प्रभादेवीत रविवारी रंगणार ‘स्वामी समर्थ श्री’ स्पर्धा


गेली आठ दशके कबड्डीसह शरीरसौष्ठव खेळात एकापेक्षा एक स्पर्धांचे आयोजन करण्याबरोबर खेळाडू घडवणार्‍या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाने यंदा आपल्या स्पर्धेला भव्य आणि दिव्य करण्यासाठी राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातून शरीरसौष्ठवांना स्वामी समर्थ श्री मध्ये येणार्‍या आवाहन केले असल्याचे स्पर्धाप्रमुख जयराम शेलार यांनी सांगितले. त्यामुळे सुमारे सव्वाशे खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविल्याची माहिती महाराष्ट्र शरीरसौष्ठव संघटनेचे सचिव राजेंद्र चव्हाण यांनी सांगितले. सव्वा तीन लाखांच्या रोख पुरस्कारांचा वर्षाव केला जाणार्‍या या स्पर्धेत विजेत्याला ५५,५५५ रुपयांचे इनाम दिले जाणार आहे. तसेच उपविजेत्याच्या मेहनतीलाही प्रोत्साहन म्हणून २२,२२२ रुपयांचा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. ही स्पर्धा ५५, ६०, ६५, ७०, ७५, ८० आणि ८० किलोवरील अशा एकंदर सात गटात खेळली जाणार असून प्रत्येक गटात अव्वल तीन खेळाडूंना सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकासह पहिल्या पाच खेळाडूंना १०, ८, ६, ४ आणि ३ हजार अशी रोख रकमेची बक्षीसेही दिली जातील.



Source link

महिला कर्मचाऱ्यांना दरमहा मिळणार मासिक पाळीची सुट्टी, भारतातील मोठ्या कंपनीचा ऐतिहासिक निर्णय!

0
महिला कर्मचाऱ्यांना दरमहा मिळणार मासिक पाळीची सुट्टी, भारतातील मोठ्या कंपनीचा ऐतिहासिक निर्णय!


Menstrual Leave: तुम्ही भारतातील प्रसिद्ध कंपनी लार्सन अँड टुब्रो म्हणजेच एल अँड टीचे नाव ऐकले असेल. ही कंपनी औद्योगिक तंत्रज्ञान, अवजड उद्योग, अभियांत्रिकी, बांधकाम, उत्पादन, वीज, माहिती तंत्रज्ञान, लष्करी आणि वित्तीय सेवा यासारख्या क्षेत्रात काम करते. या कंपनीने अत्यंत महत्वाचा निर्णय घेतलाय. ज्याचे विशेष करुन महिला वर्गातून कौतुक केलं जातंय. लार्सन अँड टुब्रोने  महिला कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन सुविधा सुरू केली आहे. एल अँण्ड टीमध्ये काम करणाऱ्या महिलांना दरमहा एक दिवस मासिक पाळीची रजा मिळणार आहे.

महिला दिनापूर्वी एल अँड टीचे अध्यक्ष एस एन सुब्रमण्यम यांनी  घोषणा केली आहे. मुंबईतील त्यांच्या पवई कार्यालयात 350 महिला कर्मचाऱ्यांमध्ये ही घोषणा केली. एल अँड टीमध्ये एकूण 60 हजार कर्मचारी आहेत. यापैकी साधारण 5 हजार महिला आहेत. म्हणजेच एकूण कर्मचाऱ्यांपैकी 9% महिला आहेत.टाईम्स ऑफ इंडियामध्ये यासंदर्भात वृत्त देण्यात आले आहे.मासिक पाळीच्या रजेची ही सुविधा फक्तमॅन्यूफॅक्चरिंग आणि कंस्ट्रक्शन इंडस्ट्रीशी संबंधित महिला कर्मचाऱ्यांसाठी आहे. एल अँड टीच्या इतर सर्व व्यवसायांमध्ये किंवा वर्टिकलमध्ये काम करणाऱ्या महिलांना ही सुविधा नसेल, असेही कंपनीकडून स्पष्ट करण्यात आलंय. कारण त्या ठिकाणी काम करणाऱ्या महिलांना घरून काम करण्याची सुविधा आधीच उपलब्ध आहे. एल अँड टीच्या मुख्य कार्यालयांत काम करणाऱ्या महिलांना ऑफिसमध्ये येऊन काम करणे अनिवार्य आहे.

सुब्रमण्यम यांच्या विधानामुळे उडाला होता गोंधळ 

एल अँड टीचे अध्यक्ष सुब्रह्मण्यम यांनी यापूर्वी आठवड्यातून 90 तास काम करण्यासंदर्भात विधान केले होते. रविवारीही काम करायला हवे पण तसे शक्य नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. हे विधान खूपच वादग्रस्त ठरले. विविध क्षेत्रातील प्रमुखांनी या विधानावर टीका केली. आता सुब्रमण्यम यांच्या नवीन घोषणेमुळे पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. 

प्रश्नांची उत्तरे मिळणे बाकी

वर्षातून 12 दिवसांच्या मासिक पाळीच्या रजेचे धोरण कसे अंमलात आणले जाईल? सध्याच्या सुट्टीपेक्षा ही अतिरिक्त सुट्टी असेल की नाही?महिलांना महिन्याच्या कोणत्याही दिवशी ही रजा घेता येईल का? या प्रश्नांची उत्तरे अद्याप मिळालेली नाहीत.

इतर कंपन्यांसाठी उदाहरण

ज्या महिलांना पिरियड्सच्या दिवसात शारीरिक अस्वस्थता जाणवते त्यांच्यासाठी हा निर्णय म्हणजे दिलासा मिळाला आहे. कंपनी हे धोरण कसे अंमलात आणते आणि त्याचा महिला कर्मचाऱ्यांवर काय परिणाम होईल? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. कारण एल अॅण्ड टी कंपनीने उचललेले हे पाऊल भविष्यात इतर कंपन्यांसाठीही एक उदाहरण बनू शकते. इतर कंपन्यांनीही त्यांच्या महिला कर्मचाऱ्यांसाठी असेच धोरण बनवावे. महिलांसाठी कामाचे जीवन सोपे करण्याच्या दिशेने हे एक चांगले पाऊल असू शकते, असे म्हटले जात आहे.





Source link

सुजलेला चेहरा, काळे डाग! अभिनेत्री रन्या रावला कस्टडीत मारहाण? व्हायरल फोटोवर महिला समितीने केलं भाष्य

0
सुजलेला चेहरा, काळे डाग! अभिनेत्री रन्या रावला कस्टडीत मारहाण? व्हायरल फोटोवर महिला समितीने केलं भाष्य



सोमवारी रात्री रन्या राव दुबईहून बंगळुरूमधील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर आली असता सोन्याच्या बिस्किटांची तस्करी करताना पकडली गेली. 
 



Source link