Wednesday, July 29, 2026
Home Blog Page 510

भर रस्त्यात अश्लील चाळे भोवले, माफीनामा, शरणागतीनंतर गौरव अहुजाला कराड पोलिसांंकडून अटक

0


Pune Crime Update: पुण्यात भर रस्त्यात अश्लील चाळे करणाऱ्या गौरव अहुजाला शनिवारी(8 मार्च) रात्री कराड पोलिसांनी अटक केलीय. शनिवारी पुण्याच्या गजबजलेल्या शास्त्रीनगर चौकात रस्त्याच्या मधोमध BMW गाडी थांबवत गौरव अहुजा नावाच्या तरुणाने अश्लील प्रकार केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओ नंतर पुण्यासह सगळीकडून या घटनेचा संताप व्यक्त केला जात होता. काल रात्री आपल्या कृत्याचा खेद वाटतो. आपण चुकलो असं म्हणत गौरव अहुजा कराड पोलिसांना शरण गेला होता.  आता अखेर कराडच्या डीवायएसपी पथकाने गौरव अहुजाचं माजाचं विमान खाली उतरवलंय. (Gaurav Ahuja Arrest)

भरचौकात लघूशंका करत अश्लील कृत्य

श्रीमंतीचा माज दाखवत सिग्नलवर गाडी रस्त्याच्या मधोमध उभी करून भर चौकात लघुशंका केल्याचे विकृत दृश्य कॅमेरात कैद झाले होते . MH 12 RF 8419 या क्रमांकाच्या BMW गाडीतून आलेल्या गौरवणे कायद्याचे नियम तर धाब्यावर बसवलेच .पण अश्लील कृत्य करत मित्रासोबत वेगात गाडीतून फरार झाला होता . पुण्यातील विमानतळ पोलिस ठाण्यात 2021 साली गौरव अहुजावर जुगार आणि अपहरणाचा देखील गुन्हा दाखल आहे .क्रिकेटवर बेटिंग घेणाऱ्या टोळीचा देखील गौरव सदस्य आहे. .कराड पोलिसांना शरण येत गौरव अहुजाने पुणेकरांची तसेच पुणे पोलिसांची आणि शिंदे साहेबांची माफी मागतो असा माफीनामाही दिला .आपल्या कृत्याचा खेद वाटतोय आपण चुकलो असल्याचं सांगत गौरव अहुजा सातारा जिल्ह्यात कराड पोलिसांना शरण गेला .त्यानंतर त्याला अटक करण्यात आली .विशेष म्हणजे गौरव अहुजाने याआधीही असाच एक व्हिडिओ शेअर केला होता .त्यात आपल्या कुटुंबीयांना त्रास देऊ नये असा आवाहन केलं होतं .

दारू प्यायले होते की नाही याची तपासणी होणार

गौरव अहुजा आणि त्याच्यासोबत असलेल्या भाग्येश निबजीया या मित्रावर येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सार्वजनिक ठिकाणी उपद्रव, अश्लील आणि अश्लाघ्य वर्तन, रहदारीस अडथळा निर्माण करणे, अशा कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. घटनेवेळी काढण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये बीअरची बाटली दिसत आहे. त्यामुळे गाडीतील दोनही तरुणांनी मद्यप्रशान केले होते की नाही याचीही तपासणी करण्यात येणार आहे. पुण्यामध्ये मद्यधुंद अवस्थेमध्ये तरुणांनी अश्लील चाळे केले, सिग्नलवरती रस्त्याच्या मधोमध आपली बीएमडब्लू गाडी उभी करून, बाहेर येत रस्त्यावर लघुशंका केली, त्यानंतर एकाने त्या तरूणाला जाब विचारल्यानंतर त्याने पुन्हा एकदा अश्लील चाळे केले आणि भरधाव वेगात आपली कार पळवली. ही संतापजनक घटना समोर आल्याने मोठी खळबळ उडाली होती.. 

 

अधिक पाहा..



Source link

रसिक स्पेशल: ‘एक देश – एक एमएसपी’ महाराष्ट्रासाठी अन्यायी

0
रसिक स्पेशल:  ‘एक देश – एक एमएसपी’ महाराष्ट्रासाठी अन्यायी


अनिल घनवट17 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

‘एमएसपी’ची हमी देणे, हा शेतकऱ्यांच्या समृद्धीचा एकमेव मार्ग होऊ शकत नाही. पण तरीही, ‘एक देश – एक एमएसपी’चे अनाठायी धोरण राबवले जात आहे. त्यामुळे उत्तर भारतातील राज्यांचा फायदा होत आहे आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मात्र तोंडाला पाने पुसली जात आहेत.

स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक काळ चाललेले शेतकरी आंदोलन सध्या पंजाबमध्ये सुरू आहे. त्यांच्या एकूण पंधरा मागण्या आहेत. त्यापैकी सर्वांत महत्त्वाची मागणी आहे, ती सर्व शेतमालाची किमान आधारभूत किमतीच्या (एमएसपी) खाली विक्री होणार नाही, याची हमी देणारा कायदा केंद्र शासनाने करावा आणि त्याची चोख अंमलबजावणी व्हावी. तसे पाहिले तर पंजाब – हरियाणातील शेतकरी पिकवत असलेला सर्व गहू आणि भात सरकार आधारभूत किमतीने खरेदी करतच आहे. नवीन कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी झालेल्या आंदोलनादरम्यान, पंजाब सरकरने २०२० मध्ये असा कायदाही केला आहे. मग ही मंडळी आंदोलन का करत आहेत, हा प्रश्न आहे.

कशी ठरते ‘एमएसपी’?

भारतात ‘एमएसपी’ ठरवण्याची “सरासरी’ पद्धत आहे. त्यामध्ये प्रत्येक राज्यातील विविध सेंटरमधून, रँडम पद्धतीने शेतकऱ्यांकडून उत्पादन खर्चाची माहिती घेतली जाते. ती राज्य सरकारकडे सादर केली जाते. राज्य सरकार त्याची सरासरी काढून केंद्र सरकारला शिफारशीच्या रूपात पाठवते. अशा सर्व राज्यांतून आलेल्या शिफारशींची सरासरी काढली जाते आणि कृषी मूल्य व खर्च आयोग, केंद्र शासनाकडे संभाव्य एमएसपी कळवते. हे आकडे अन्न मंत्रालय, ग्राहक व्यवहार मंत्रालय, परराष्ट्र व्यापार मंत्रालय यांच्याकडे पाठवले जातात. प्रत्येक मंत्रालय आपल्या सोयीने यात काटछाट सुचवते. महागाई नियंत्रण, अन्य देशांशी केलेले करार वगैरे सर्व बाबी लक्षात घेऊन अंतिम एमएसपी जाहीर केली जाते, ती कधीच खऱ्या उत्पादन खर्चावर आधारित नसते.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा तोटा

गेल्या अनेक दशकांपासून केंद्र शासनाने जाहीर केलेली एमएसपी ही महाराष्ट्र सरकारने केलेल्या शिफारशींपेक्षा खूप कमी आहे. केंद्रीय कृषी मूल्य आयोग सुद्धा प्रत्येक राज्याचा उत्पादन खर्च काढत असते आणि त्यानुसार आधारभूत किमती जाहीर होतात. २०२२-२३ मध्ये केंद्र शासनाने भात पिकाला जाहीर केलेली एमएसपी २०४० रुपये प्रति क्विंटल होती, तर महाराष्ट्राने केलेली शिफारस ४४५२ रुपये प्रति क्विंटल इतकी होती.

याच हंगामात गहू पिकासाठी केंद्र शासनाने जाहीर केलेली एमएसपी २०१५ रुपये इतकी, तर राज्य शासनाची शिफारस ३७५५ रुपये प्रति क्विंटल होती. यातून महाराष्ट्राच्या शेतकऱ्याचा किती तोटा होतो, हे दिसते. सरासरी पद्धतीत पंजाबातील शेतकऱ्यांचा मात्र मोठा फायदा होतो. २०२३-२४ या वर्षात कृषी मूल्य आयोगाने काढलेल्या पंजाबच्या गव्हाचा उत्पादन खर्च प्रति क्विंटल केवळ ७८६ रुपये आहे आणि एमएसपी प्रति क्विंटल २२७५ रुपये मिळाली. याच राज्याचा भाताचा (Paddy) उत्पादन खर्च प्रति क्विंटल ८६४ रुपये आहे आणि एमएसपी २१८३ रुपये प्रति क्विंटल मिळाली. याच वर्षात कृषी मूल्य आयोगाने महाराष्ट्रातील भात आणि गव्हाचा काढलेला उत्पादन खर्च अनुक्रमे २८३९ व २११५ रुपये प्रति क्विंटल आहे. या दोन्ही पिकांना राज्य सरकारची शिफारस चार हजार रुपयांपेक्षा जास्त दराची आहे. म्हणजे एमएसपी उत्पादन खर्चापेक्षा ५० टक्के कमी आहे.

उत्पादन खर्चात फरक का?

भारतातील प्रत्येक राज्यात सर्व पिके कमी-जास्त प्रमाणात पिकवली जातात. पण, काही राज्यांतील जमीन, हवामान, पाण्याची उपलब्धता ठराविक पिकांना पोषक असते. त्यामुळे त्या पिकाची उत्पादकता त्या राज्यामध्ये जास्त असते. उत्पादकता वाढली की उत्पादन खर्च कमी होतो. शिवाय, प्रत्येक राज्यात मजुरीचे दर सारखे नसतात, ट्रॅक्टरसाठी लागणाऱ्या डिझेलचे दर वेगळे असतात. कुठे वीज मोफत, तर कुठे पाणी मोफत अशा गोष्टींमुळे उत्पादन खर्चात मोठा फरक पडू शकतो.

पंजाबमध्ये अतिशय सुपीक जमीन आहे. विविध धरणांतून पाण्याची उपलब्धता आहे. वीज मोफत आहे. त्या राज्यात गव्हाचे सरासरी प्रति एकर २२ ते २५ क्विंटल उत्पादन येते आणि महाराष्ट्रात १२ ते १५ क्विंटल येते. मग सर्व राज्यांना सरसकट एकच एमएसपी देऊन कसे चालेल? पंजाब – हरियाणामध्ये एमएसपीवर होत असलेल्या धान्य खरेदीचा खर्च केंद्र शासन करते. म्हणजे करदात्यांचा, शेतकऱ्यांसाठी खर्च होणारा पैसा फक्त पंजाब – हरियाणातील शेतकऱ्यांच्याच पदरात पडतो.

काय करायला हवे?

मुळात किमान आधारभूत किमतीची म्हणजे एमएसपीची हमी देणे, हा शेतकऱ्यांना समृद्ध करण्याचा एकमेव मार्ग होऊ शकत नाही. हमीभाव हा कमी भाव असतो, तो नफा देणारा नसतो. तथापि, अतिरिक्त उत्पादन झाले, खुल्या बाजारातील दर खूपच कोसळले, तर किमान काही संरक्षण असावे म्हणून सरकारने एमएसपी अर्थात हमीभाव द्यायचे ठरवले, तर कोणत्या पिकांना किती एमएसपी द्यायची, हे ज्या त्या राज्याने ठरवले पाहिजे. तसे झाले तरच त्या राज्यातील शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च भरून निघण्याची शक्यता आहे. ज्या पिकांचे उत्पादन वाढवण्याची गरज आहे, त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जास्त एमएसपी देऊन उत्पादन वाढवावे. पंजाब – हरियाणामध्ये भात आणि गहू जशी मुख्य पिके आहेत, त्याप्रमाणे महाराष्ट्रात कांदा, कापूस, सोयाबीन, तूर व सर्व तेलबियांना एमएसपी जाहीर करून संरक्षण देण्यात यावे. या शेतमालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांना प्रोत्साहन द्यावे.

यासाठी हमीभावाचा कायदाच केला पाहिजे, असे नाही. या पिकांची देशांतर्गत आणि प्रदेशात किफायतशीर दरात विक्री करण्याची सुलभ व्यवस्था केली, तर एमएसपीची गरजच भासणार नाही. पण तरीही, ‘एक देश – एक एमएसपी’चे अनाठायी धोरण राबवले जात आहे. त्यातून अन्य राज्यांतील पिकांच्या वाढीव उत्पादन खर्चाच्या सरासरीमुळे उत्तर भारतातील राज्यांचा फायदा होत आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मात्र तोंडाला पाने पुसली जात आहेत. इथले राज्यकर्ते याची दखल घेणार का, हाच प्रश्न आहे.

(संपर्कः ghanwatanil77@gmail.com)



Source link

खलनिग्रहणाय: पोलिसांची खरी कसोटी

0
खलनिग्रहणाय:  पोलिसांची खरी कसोटी




गुंतागुंतीच्या, गंभीर स्वरुपाच्या आणि उघडकीस न आलेल्या गुन्ह्यांचा तपास हीच पोलिसांची खरी कसोटी असते. जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी हे गुन्हे उघडकीस आणणे आवश्यक ठरते. अशा गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलिसांना अद्ययावत तंत्रज्ञानासह योग्य प्रशिक्षणाची गरज असते. शिवाय, कठोर परिश्रम आणि अखंड जागरूकताही आवश्यक असते. मी लातूरला १९९४ ते ९७ या काळात पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत होतो. त्या दरम्यान कासार शिरसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक मोठा दरोडा पडला. त्यामध्ये दोन लोकांचा बळी गेला होता. क्राइम ब्रँचची टीम घेऊन आम्ही सगळे तिथे तातडीने दाखल झालो. संपूर्ण परिसराची घेराबंदी करून आरोपींचा शोध सुरू केला. त्या दरम्यान आमच्या एका अधिकाऱ्याला एक डायरी सापडली. त्यामध्ये पाच लोकांची नावे मिळाली. माहिती घेतली असता हे सगळे अट्टल गुन्हेगार असल्याचे समोर आले. त्यामुळे त्यांच्या गावात पोलिसांचे पथक पाठवण्यात आले. हे सगळे लोक त्यांच्या घरीच सापडले. त्यांची चौकशी केली असता, या लोकांनी गुन्हा केला नसावा, असे तपास पथकाला वाटले. मग प्रश्न पडला की ही डायरी कोणाची? आणि तिच्यात या लोकांची नावे कशी काय आली? त्यामुळे त्या लोकांकडे आणखी विचारपूस करण्यात आली. तेव्हा त्यांनी सांगितले की, हा दरोडा एका वेगळ्या टोळीच्या लोकांनी टाकला आहे आणि ती आमची दुश्मन टोळी आहे. म्हणून त्यांनी आमची नावे मुद्दाम त्या डायरीत लिहिली आणि ती सार्वजनिक ठिकाणी फेकून दिली, जेणेकरुन पोलिसांनी आम्हाला अटक करावी. मग याच लोकांच्या मदतीने पोलिस पथकाने दरोडा टाकणाऱ्या टोळीचा तपास सुरू केला आणि ती आख्खी टोळी जवळच्या जंगलात हाती लागली. दरोड्यामध्ये लुटलेला सगळा मुद्देमाल त्या टोळीकडून हस्तगत करण्यात आला. गंभीर गुन्ह्यांचा तपास हे पोलिसांसाठी एक मोठे आव्हान असते. त्यामध्ये पहिल्यांदा घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण करणे खूप महत्त्वाचे ठरते, कारण त्यातून बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतात. त्यानंतर फिर्यादीची विचारपूस तसेच घटनेच्या साक्षीदारांचा जबाबही तितकाच आवश्यक असतो. गुन्हेगारांची मोडस ऑपरेंडी कशी आहे? म्हणजे ते कशा पद्धतीने गुन्हे करतात, हे लक्षात येणेही महत्त्वाचे असते. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये चांगला समन्वय असला पाहिजे. शिवाय, अन्य भागाशी; विशेषत: आजूबाजूच्या जिल्ह्यांच्या पोलिस ठाण्यांशी संपर्क असणे आवश्यक असते. अशा गुन्ह्यांच्या तपासात फॉरेन्सिक टीमही खूप महत्त्वाची भूमिका बजावते. त्याचप्रमाणे खबऱ्यांचे नेटवर्कही चांगले असायला हवे. गंभीर आणि उघडकीस न आलेल्या गुन्ह्यांच्या तपासात दिवसरात्र एक करावा लागतो. अशावेळी तपास पथक हे एक टीम म्हणून काम करते. त्यामुळे त्यांच्यातही चांगला समन्वय गरजेचा असतो. या पथकाला वेळोवेळी वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळणेही महत्त्वाचे असते. नागपूर जिल्ह्याचा (ग्रामीण) पोलिस अधीक्षक असताना, क्राइम कॉन्फरन्समध्ये मला पहिल्यांदा एक असा गंभीर गुन्हा दिसला, ज्यामध्ये वर्षभरापूर्वी एका सहायक फौजदाराची हत्या करण्यात आली होती. खूप प्रयत्न करूनही हा गुन्हा उघडकीस आला नव्हता. त्यामुळे या तपासासाठी आम्ही क्राइम ब्रँचची एक चांगली टीम तयार केली. ही हत्या सुनियोजित असल्याचे टीममधील सर्वांचे मत होते. पण, खूप तपास करुनही काही निष्पन्न झाले नाही. एकेदिवशी संध्याकाळी मी गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक अब्दुल रजाक यांच्यासोबत याच विषयावर बोलत मैदानात वॉकिंग करत होतो. तेव्हा त्यांनी सांगितले की, सर, मला तरी हा गुन्हा सुनियोजित वाटत नाही, तो अचानक घडला असावा. मग मी त्यांना त्या दिशेने तपास करण्यास सांगितले. ते जलालखेडा पोलिस ठाण्यात गेले आणि तिथेच सात दिवस तळ ठोकला. त्या परिसरात घडलेल्या सगळ्या जबरी चोऱ्यांची माहिती घेतली. त्यांना लक्षात आले की, हा गुन्हा घडला त्या काळात त्याच भागामध्ये रस्त्यावरील लुटीच्या अनेक घटना घडल्या होत्या आणि त्यातील बहुतांश उघडकीला आल्या नव्हत्या. त्यांनी त्या घटनांचा नव्याने तपास सुरू केला तेव्हा, या सगळ्या जबरी चोऱ्या एकाच टोळीने केल्या असाव्यात, हे लक्षात आले. आणखी तपास केल्यावर ही टोळी मध्य प्रदेशची असल्याचे समोर आले. त्यातूनच लूटमारीचे हे सर्व गुन्हे उघडकीला आले आणि त्या सहायक फौजदाराची हत्याही याच टोळीने केली होती, हे निष्पन्न झाले. त्याचे असे झाले होते की, ही टोळी एकदा रस्त्यावर ट्रॅप लावून बसली होती. हा अधिकारी त्याच रस्त्यावरुन दुचाकीने जात होता. त्याला या टोळीने घेरले आणि त्यावेळी झालेल्या झटापटीत त्यांनी गळा दाबून त्याचा खून केला. या गुन्ह्याच्या तपासाचा अहवाल ‘सीआयडी’ला पाठवण्यात आला आणि या कामगिरीला ‘बेस्ट डिटेक्शन अवॉर्ड’ही मिळाले. गुंतागुंतीच्या, गंभीर स्वरुपाच्या आणि उघडकीस न आलेल्या गुन्ह्यांचा तपास हीच पोलिसांची खरी कसोटी असते, हे पोलिस दलातील ३४ वर्षांच्या अनुभवावरून मी सांगू शकतो. सामान्य जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी गंभीर गुन्हे उघडकीला आणणे खूप आवश्यक असते. अनेकदा गंभीर आणि संवेदनशील गुन्हे उघडकीस आले नाही, तर कायदा व सुव्यवस्थेचाही मोठा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे अशा गुन्ह्यांच्या तपासासाठी पोलिसांना अद्ययावत तंत्रज्ञानाच्या वापरासह योग्य प्रशिक्षणाची गरज असते. शिवाय, कठोर परिश्रमांची तयारी आणि अखंड जागरूकताही आवश्यक असते. पोलिस दलात असे अनेक अधिकारी, कर्मचारी असतात, ज्यांना गुन्हे उघडकीस येत नाहीत तोपर्यंत चैन पडत नाही. स्वत:चा जीव धोक्यात घालून गुन्हे उघडकीस आणणारे अनेक अधिकारी, अंमलदार मी पाहिले आहेत. मुंबई क्राइम ब्रँच अशा प्रकारचे आव्हानात्मक गुन्हे उघडकीस आणण्यात तरबेज आहे. गुन्ह्यांचा योग्य तपास करुन गुन्हेगारांना शिक्षेपर्यंत पोहोचवण्यात एकणूच महाराष्ट्र पोलिसांची कामगिरी संपूर्ण देशात अव्वल मानली जाते. आपल्या पोलिस दलाला ही देदीप्यमान परंपरा लाभली आहे. ती पुढेही आणखी लखलखत राहावी, ही अपेक्षा. (संपर्कः bhushankumarupadhyay@gmail.com)



Source link

माझ्या हिश्श्याचे किस्से: अनुपम खेर यांनी पक्षाघात होऊनही पूर्ण केले शूटिंग; ‘पहला पहला प्यार’च्या शूटिंगदरम्यान अर्धा चेहरा झाला होता पॅरालाइज

0
माझ्या हिश्श्याचे किस्से:  अनुपम खेर यांनी पक्षाघात होऊनही पूर्ण केले शूटिंग; ‘पहला पहला प्यार’च्या शूटिंगदरम्यान अर्धा चेहरा झाला होता पॅरालाइज


रूमी जाफरी, लेखक-दिग्दर्शक5 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

परवा, ७ मार्चला माझे घनिष्ट मित्र आणि भारतातील एक महान अभिनेते अनुपम खेर यांचा वाढदिवस होता. त्यामुळे मनात विचार आला की, ज्यांना मी खेर साहेब म्हणून संबोधतो, त्या अनुपम खेर यांच्याविषयीच्या काही गोष्टी माझ्या हिश्श्याच्या आजच्या किश्श्यांमध्ये सांगाव्यात.

ही गोष्ट १९८२ किंवा ८३ ची असेल. भोपाळमध्ये एशियाडच्या निमित्ताने टीव्ही आला होता. त्यावेळी केवळ दूरदर्शन हेच एकमेव चॅनल होते, त्यावरच कार्यक्रम सादर व्हायचे. तेव्हा आम्हाला टॉकीजमध्ये जाऊन सिनेमा बघायला मनाई होती. त्यामुळे घरी टीव्ही आल्यानंतर त्यावर सिनेमा बघण्यात जो एक प्रकारचा कैफ किंवा उत्कंठा असायची, ती शब्दांत सांगता येणार नाही. अगदी कृषी दर्शनसह टीव्हीवरचे सगळे कार्यक्रम आम्ही बघायचो. एकेदिवशी मी टीव्ही सुरू केला, तेव्हा त्यावर ‘वापसी’ नावाचा एक सिनेमा सुरू होता. ही एका रुग्णाची कहाणी होती. त्याचे कथानक, त्यातील अभिनेत्याचे काम लक्षवेधक होते. ज्या कलाकाराने रुग्णाची ही व्यक्तिरेखा साकारली होती, त्याचा अभिनय इतका जबरदस्त होता की, कितीतरी दिवस त्या भूमिकेने माझ्या मनात घर केले होते. सिनेमाची टायटल्स लक्ष देऊन पाहिली नव्हती, त्यामुळे त्या अभिनेत्याचे नाव समजले नव्हते. पण, मी त्याचा चाहता मात्र बनलो होतो.

काही दिवस असेच निघून गेले. एके दिवशी मी केस कापण्यासाठी सलूनमध्ये गेलो. आपला नंबर येण्याची वाट बघत बसलो असताना तिथे मला एक सिनेमॅगेझीन दिसले. मी ते चाळू लागलो, तेव्हा त्यामध्ये मला त्या अभिनेत्याचा फोटो दिसला. महेश भट्ट यांच्यासमवेत आपल्या नव्या कारसह त्यांचा हा फोटो होता. तेव्हा मला समजले की या अभिनेत्याचे नाव अनुपम खेर आहे. पुढे मी मुंबईला आलो आणि अन्नू कपूर (अन्नू भाई) यांच्यासमवेत नाटकांसाठी काम करायला सुरूवात केली.

जुहूच्या एका शाळेमध्ये आम्ही ‘लैला मजनू’ नाटकाची तालीम करत होतो. तेव्हा अचानक माझे लक्ष तिथे उभे असलेल्या खेर साहेबांकडे गेले. त्या नाटकात त्यांचे अनेक मित्र काम करत होते, म्हणून त्यांना भेटण्यासाठी ते आले होते. मी त्यावेळी त्यांना प्रत्यक्ष पाहिले. मी खिडकीजवळ गेलो आणि बाहेर उभ्या असलेल्या खेर साहेबांना निरखू लागलो. डोक्यावर केस नसतानाही इतका सुंदर दिसणारा माणूस मी त्यापूर्वी कधी पाहिला नव्हता. त्यांच्या चेहऱ्यावर जी चमक होती, तशी चमक मी नंतर केवळ दिलीपकुमार साहेबांच्या चेहऱ्यावर पाहिली. या गोष्टीवरून मला इफ़्तिख़ार नसीम साहेब यांचा एक शेर आठवतोय…

उस के चेहरे की चमक के

सामने सादा लगा

आसमाँ पे चाँद पूरा था

मगर आधा लगा।

पुढे मी लिहायला सुरूवात केली. माझ्या कारकिर्दीतील पहिल्या तीन सिनेमांमध्ये खेर साहेब काम करत होते. ते सिनेमे होते.. ‘श्रीमान आशिक’, ‘वक्त हमारा है’ आणि “पहला पहला प्यार’. त्यांनी एका मुलाखतीत माझ्याविषयी जे प्रशंसोद्गार काढले होते, ते मी कधी विसरु शकत नाही. ते म्हणाले होते, ‘एखाद्या पदार्थाच्या चवीप्रमाणे डॉयलॉगची लज्जतही जिभेवर रेंगाळत राहते. मला रूमी जाफरींच्या डॉयलॉगची अशी चव लागली आहे की, मी त्यांच्या सिनेमाच्या शूटिंगवरुन दुसऱ्या शूटिंगच्या ठिकाणी जातो आणि अन्य लेखकाने लिहिलेले डॉयलॉग म्हणतो, तेव्हा माझ्या जिभेला ती लज्जत जाणवत नाही.’ एवढ्या मोठ्या अभिनेत्याने असे म्हणणे हा त्यांचा उमदेपणा होता. पण, त्यामुळे मला खूप प्रोत्साहन मिळाले.

“पहला पहला प्यार’चे शूटिंग सुरू असताना एकेिदवशी खेर साहेबांच्या सेक्रेटरीचा फोन आला आणि लगेच भेटायला या, असा निरोप दिला. आम्ही भेटायला गेल्यावर सेक्रेटरीने सांगितले की, खेर साहेबांना पक्षाघाताचा झटका आला आहे, त्यांचा अर्धा चेहरा पॅरालाइज झाला आहे. हे ऐकून आम्हाला मोठा धक्का बसला. आता सिनेमाचे उरलेले शूटिंग कसे पूर्ण होणार, याचे सगळ्यांना टेन्शन आले होते आणि मला खेर साहेब कसे बरे होणार, याचे टेन्शन आले होते. मला खेर साहेबांची मन:स्थिती समजत होती. कोणाही व्यक्तीच्या चेहऱ्याच्या बाबतीत असे घडले तर त्याच्यावर काय वेळ येईल? आणि एखाद्या अभिनेत्यासाठी तर त्याचा चेहरा हेच सर्व काही असते. त्याचा चेहराच पॅरालाइज झाला, तर त्याने काय करावे? खेर साहेबांच्या मनावर या घटनेने काय आघात झाला असेल, याची मला जाणीव होत होती. मी त्यांना म्हणालो, खेर साहेब, तुमचा चेहराच इतका तेजस्वी, चमकदार आहे ना, त्याला नजर लागली असावी…

इकडे आमचे निर्माते शाद साहेब आणि दिग्दर्शक मनमोहन सिंह खूप हैराण झाले. सिनेमाचा क्लायमॅक्स चित्रीत करायचा राहिला होता. खेर साहेबांसह ऋषी कपूर, तब्बू, कादर खान, अमरिश पुरी, टिक्कू तलसानिया अशा सर्व कलाकारांच्या तारखाही घेतलेल्या होत्या. पण, खेर साहेबांचा अर्धा चेहरा पॅरालाइज झाला असताना काम करणार तरी कसे? मग मी डोके वापरुन सिनेमाचा शेवटचा प्रसंग बदलून पुन्हा लिहिला आणि त्याप्रमाणे त्यांना दाढी – मिशा लावून, पंडित बनवून थेट क्लायमॅक्सच्या दृश्यामध्ये आणले. खेर साहेब सेटवर आले, शूटिंगही झाले. पण, त्यांना असा काही आजार झाला आहे, हे कुणाच्या लक्षातही आले नाही.

खेर साहेबांना सलाम केला पाहिजे, कारण आपल्या हिमतीच्या, इच्छाशक्तीच्या जोरावर एवढ्या गंभीर आजाराशी लढून ते त्यातून सुखरूप बाहेर पडले आणि फिल्म इंडस्ट्रीत पुन्हा ताकदीने उभे राहिले, आपले काम सुरू ठेवले. त्यांनी आपल्या नाटकाला अगदी समर्पक नाव दिले होते- ‘कुछ भी हो सकता है’. खेर साहेब, ईश्वराने आपल्याला शंभर वर्षांपेक्षा अधिक दीर्घायुष्य द्यावे. खेर साहेबांसाठी ‘श्रीमान आशिक’मधील हे गाणे ऐका…

अभी तो मैं जवान हूँ,

अभी तो मैं जवान हूँ…

स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.



Source link

डायरीची पाने: हे आम्हाला माहीतच नव्हतं!

0
डायरीची पाने:  हे आम्हाला माहीतच नव्हतं!


इंद्रजित भालेराव7 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

आमच्या शाळेत दररोज सकाळी सुंदर प्रार्थना व्हायची. उंच आवाजात पाढे, उजळणी म्हणताना शाळा दुमदुमून जायची. शेवटच्या तासाला कवितेच्या तालावर ती झुलायची…

आम्ही शिकत होतो, तेव्हा शिक्षण व्यवस्थेतले आजचे पुष्कळ शब्द आम्हाला माहीतच नव्हते. उदाहरणार्थ, कॉपी, ट्युशन, निरोप समारंभ, स्नेहसंमेलन हे शब्द दहावीपर्यंत माहीत नव्हते. असं काही असतं, हेही कुणाच्या बोलण्यातून आलं नव्हतं. या सगळ्या गोष्टींपासून आमचं शिक्षण मुक्त होतं. आधुनिक युगापासून कोसो दूर असलेल्या लहान गावात आम्ही राहत होतो. सध्या सगळीकडं परीक्षा सुरू आहेत आणि कॉपीमुक्त परीक्षा, कॉपीयुक्त परीक्षा, सामूहिक कॉपी असे शब्द कानावर पडत आहेत, वाचायला मिळत आहेत. आम्ही शिकत होतो तेव्हा आम्हाला ‘कॉपी’ ही वस्तू तर सोडाच; पण हा शब्दही माहीत नव्हता. कारण तो तेव्हा अस्तित्वातच नव्हता. कॉपी हा शब्द अस्तित्वात कधी आला आणि लोक कॉपी कधीपासून करू लागले, याचं संशोधन व्हायला पाहिजे.

अर्थातच परीक्षेत केल्या जाणाऱ्या कॉपीविषयी मी हे बोलतो आहे. की शहरातले लोक आधीपासून कॉपी करत होते? आणि आम्हा खेड्यातल्या मुलांना यातलं काहीच माहीत नव्हतं? आज याबाबतीत खेडीही पुढे गेली आहेत. काही गावंच्या गावं कॉपीसाठी कुप्रसिद्ध असतात. तिथं कॉपी सेंटर चालतात, असं म्हटलं जातं. परीक्षा सेंटर चालतं, असं म्हणत नाहीत.

मग आमच्या परीक्षा कशा पार पडत? खरं तर तिसरीपर्यंतच्या परीक्षा आमचेच गुरुजी घ्यायचे. आणि ते कडक परीक्षा घेत असत. त्यांना कुणीही तसे सांगितलेले नसायचे. पण, परीक्षा कडक घ्यायला पाहिजे, हे तेव्हा सगळ्यांनाच माहीत होतं आणि मान्य होतं. त्यांच्या पातळीवर ठरवलं तर ते हवं त्यांना पास आणि हवं त्यांना नापासही करू शकत होते. त्यांना तसे विचारणारे कुणी नव्हते. पण, तरीही गुरुजी अनेक मुलांना नापास करीत.

नापास केलेल्या मुलांचे पालक येऊन शिक्षकांना विचारत नसत की, आमच्या मुलाला नापास का केलं? कारण त्यांना माहीत असायचं की, आपल्या मुलाला काही येत नसणार, त्याचा अभ्यास पक्का झालेला नसणार, मग त्याला पुढच्या वर्गात घालून काय उपयोग? त्यामुळं गुरुजींना विचारायची काय गरज? असंच त्यांना वाटायचं. गुरुजीही कोणाविषयी अढी ठेवून उगाच कुणाला नापास करीत नसत. ज्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आणि लिहायला सांगितलेल्या गोष्टी जमत नसत त्यांना, ‘यंदाचं वर्ष तू याच वर्गात बस आणि अभ्यास पक्का कर,’ असं ते सांगत.

विद्यार्थी, पालक यांच्यासह सर्वांना ते मान्य असायचं. तो मुलगा खरंच अभ्यास करून पक्का व्हायचा आणि पुढं निघून जायचा. आजच्यासारखी सर्वांना पुढे पळा, पुढे पळा, सर्वांच्या पुढे पळा.. अशी घाई नसायची. फक्त चौथी, सातवी आणि दहावीच्या परीक्षा शाळेबाहेर व्हायच्या. दुसऱ्या गावात जाऊन त्या द्याव्या लागत. नाही तर बाकी सर्व वर्गांच्या परीक्षा शाळेतल्या शाळेतच पार पाडत. गावातलेच गुरुजी त्या परीक्षा घेऊन मुलांचं पास / नापास ठरवायचे. ज्या परीक्षा बाहेरगावी जाऊन द्यायच्या, त्यांना बोर्डाची परीक्षा, असं म्हटलं जायचं.

अशा परीक्षा अवघड समजल्या जायच्या. त्यांची तयारी जास्त करायला पाहिजे, असं गुरुजींना, शाळांना, गावाला आणि मुलांनाही वाटत असे. त्यामुळं त्यासाठी गुरुजी जास्तीचे तास घेत. संध्याकाळी मुलांना शाळेत बोलावून त्यांचा अभ्यास घ्यायचे आणि त्यांच्यासोबतच ते शाळेत झोपायचे. त्यामुळे ट्युशन हाही शब्द आम्हाला माहीत नव्हता. कारण तेव्हाचे गुरुजी केवळ शाळेपुरते मर्यादित नव्हते. शाळेबाहेरही त्यांचे लक्ष मुलांकडे असे. फक्त शिक्षणापुरते नव्हे, तर मुलांच्या आयुष्याच्या जडणघडणीचेही ते शिल्पकार असत.

दहावीपर्यंत मी तीन शाळांमध्ये शिकलो. पहिली ते चौथीपर्यंत गावातच शाळा होती. पाचवी ते सातवी ही तीन वर्षे आहेरवाडी नावाच्या गावी जाऊन-येऊन शिकलो. पुढं आठवी ते दहावी अशी आणखी तीन वर्षे हयातनगरला जाऊन-येऊन शिकलो. अशा तीन वेळा शाळा सोडल्या, पण त्या सोडताना शाळेने अथवा गावाने निरोप समारंभ केला नाही. त्यामुळं शेवटच्या वर्गातल्या विद्यार्थ्यांना निरोप द्यायचा असतो, त्याचा एक कार्यक्रम करायचा असतो, त्यासाठी भाषणं करायची असतात, हे आम्हाला माहीत नव्हतं. निरोप समारंभ हा शब्दच माहीत नव्हता. तेव्हाचे सगळे मित्र अजून आमच्या काळजात आहेत, आम्ही त्यांना अजूनही निरोप दिलेला नाही.

आज मी महाराष्ट्रभर शाळा-महाविद्यालयांच्या स्नेहसंमेलनाचा पाहुणा म्हणून फिरत असलो, तरी दहावीपर्यंत स्नेहसंमेलन हा शब्दही आम्ही ऐकलेला नव्हता. ‘गॅदरिंग’ हा तर फार दूरचा शब्द. आमच्या शाळेत कधीच स्नेहसंमेलनं झाली नाहीत. ती होत असतात, असेही आम्हाला कुणी सांगितलं नाही. मग आमच्या शाळेत काहीच होत नव्हतं काय? तर असं अजिबात नाही. दररोज सकाळी सुंदर प्रार्थना व्हायची. गुरुजी परवचा घ्यायचे. उंच आवाजात पाढे आणि उजळणी म्हणताना शाळा दुमदुमून जायची. शेवटच्या तासाला सुंदर कविता म्हणत. सगळी शाळा त्या तालावर झुलत असे. २६ जानेवारी आणि १५ ऑगस्टच्या मागेपुढे गुरुजी खेळांच्या स्पर्धा घ्यायचे.

त्यामध्ये; लिंबू-चमचा, दोन मुलांचा एकेक पाय एकत्र बांधून धावणे, पोत्यात पाय घालून चालणे, नुसते धावणे, कबड्डी अशा काही स्पर्धा घेतल्या जात. सांस्कृतिक स्वरूपाच्या कुठल्याही स्पर्धा शाळा घेत नसे. गाणी, कविता, अभिनय अशा स्पर्धा आम्ही कधी पाहिल्या नव्हत्या.

शाळेत असं काही होत नव्हतं, तर मग आमचं सांस्कृतिक भरण-पोषण कसं झालं? तर, भोवतालच्या सांस्कृतिक घटना पाहून ते झालं, असं मला वाटतं. पारावरच्या पोथ्या, पारासमोरची कीर्तनं, सणावाराला होणारी सोंगं, मंदिरातल्या आरत्या, भूपाळ्या, शेजारत्या ऐकून आम्हाला बऱ्याच गोष्टी समजत गेल्या. शिकाव्याशा वाटल्या. त्यात आम्ही सहभागी होत गेलो. त्यामुळे लहानपणापासून चांगलं काव्य कानावर पडलं, चांगला अभिनय पाहायला मिळाला, चांगल्या सुरात गाणारे ऐकता आले. जात्यावरच्या ओव्या ऐकल्या, पाठ केल्या.

शिवाय, दारी येणारे कितीतरी बांधव नाट्य, अभिनय, गीत, संगीत घेऊन येत असत. त्यांचे किती प्रकार सांगावेत? भल्या पहाटे येणारा वासुदेव होता, त्याच्या आधी येणारा कुडमुडे जोशी होता, वासुदेवानंतर येणारा पांगुळ होता आणि दिवसभर दारात येणारे कितीतरी भिक्षेकरी होते, जे गीत – संगीत आणि अभिनयाचे विविध प्रकार सादर करायचे. ते ऐकण्यात, पाहण्यात, त्यांचं अनुकरण करण्यात आम्ही गुंगून जायचो. मला वाटतं, त्यातूनच आमच्या पिढीचं भरणपोषण झालं असावं.

आता या गोष्टी बंद झाल्या आणि शाळांमधून हे सगळे नवे प्रकार सुरू झाले. तिथून आता विद्यार्थी घडतात, असं म्हणायला हरकत नाही. कारण आता शाळेत विद्यार्थी स्वत:च हे सगळे प्रकार सादर करतात. त्यांना ते शिकवले जातात. काळाच्या प्रवाहात होत्याचे नव्हते होऊन जाते आणि जे नव्हते ते समोर येते. हा काळ काही गोष्टी संपवत असतो, काही नव्या गोष्टी जन्माला घालत असतो. बदल हा सृष्टीचा नियमच आहे, असे म्हटले जाते, ते खोटे नाही.

(संपर्कः inbhalerao@gmail.com)



Source link

‘एआय’च्या विश्वात…: ‘एआय’ची धास्ती वाटतेय? चला, त्याच्याशी दोस्ती करू!

0
‘एआय’च्या विश्वात…:  ‘एआय’ची धास्ती वाटतेय? चला, त्याच्याशी दोस्ती करू!




सध्या सगळीकडं ‘एआय’ची चर्चा आहे. या क्रांतिकारी तंत्रज्ञानामुळं आपलं जगणं अधिक सोपं, वेगवान आणि समृद्ध होऊ शकतं. त्यासाठी ते कुशलतेने आणि जबाबदारीने हाताळता आलं पाहिजे. ‘एआय’मुळे विविध क्षेत्रांत घडणारे बदल समजावून सांगतानाच, त्याचे रोजच्या जगण्यातील फायदे उलगडणारे आणि संभाव्य धोक्यांविषयी सावध करणारे हे पाक्षिक सदर… आजकाल आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता हा परवलीचा शब्द झाला आहे. अवघ्या एका वर्षात चॅट जीपीटी आणि त्यासारख्या ‘एआय’ आधारित अनेक टूल्सनी सगळ्याच क्षेत्रांमध्ये अफाट बदल घडवायला सुरूवात केली आहे. मग ते वैद्यकीय आणि शिक्षण क्षेत्र असो किंवा शेती, उद्योग क्षेत्र असो; ‘एआय’ची जादू सगळीकडे दिसून येत आहे. संगणक प्रणाली किंवा मशीनला माणसासारखी विचारशक्ती, शिकण्याची क्षमता आणि निर्णय घेण्याची क्षमता प्रदान करणारी एक आधुनिक तंत्रज्ञानप्रणाली म्हणजे ‘एआय’. माणूस जसा अनुभवातून शिकतो, तसे ‘एआय’सुद्धा माहिती आणि डेटाच्या आधारे शिकतो आणि सतत सुधारणा करत जातो.
दहा वर्षांत वेगाने विकसन : संगणकांनी माणसासारखं विचार करावा, यावर १९५० च्या दशकात संशोधन सुरू झालं आणि त्याचवेळी ‘एआय’चे बीज रोवले गेले. अलीकडच्या काळात मशिन लर्निंग (ML), डीप लर्निंग (DL) आणि बिग डेटा यांसारख्या प्रगत तंत्रज्ञानांमुळे ‘एआय’चे वेगाने विकसन झाले. आता ‘एआय’ फक्त आकडेमोड किंवा माहिती प्रक्रिया न करता शिकण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता बाळगतो. ‘एआय’च्या विकासाची ही वाटचाल काही दशकांपासून सुरू असली, तरी गेल्या १० वर्षांत त्याने झपाट्याने प्रगती केली. मोठ्या प्रमाणातील डेटा (Big Data), संगणकांची वाढती क्षमता आणि अल्गोरिदममधील सुधारणांमुळे त्याने वेग घेतला आहे. गुगलचे सर्च इंजिन, अॅमेझॉनची शिफारस प्रणाली आणि सिरी किंवा अॅलेक्सा यांसारखे व्हाइस असिस्टंट ही ‘एआय’च्या यशाची काही सोपी आणि वास्तविक उदाहरणे आहेत. ऑनलाइन शॉपिंग ते अभ्यासक्रम : एखादी वस्तू विकत घेण्यासाठी काही वर्षांपूर्वी लागणारा वेळ आठवला, तर त्यामध्ये आणि ‘एआय’आधारित ई कॉमर्स मोबाइल ॲपमध्ये जमीन-अस्मानाचा फरक दिसतो. आता ‘एआय’च्या मदतीने गंभीर आजारांचे निदान अधिक अचूकपणे करता येते. रूग्णांच्या वैद्यकीय नोंदींचे विश्लेषण करून उपचार सुचवले जातात. दुसरीकडे, नव्या औषधांच्या संशोधनालाही वेग आला आहे. वैयक्तिक शिकवणी (Personalized Learning) देणे, ऑनलाइन अभ्यासक्रम सुधारणे आणि विद्यार्थी-शिक्षक संवाद वाढवणे यांसाठीही ‘एआय’ मदत करते. त्याशिवाय; स्वयंचलित कार, रोबोटिक्स, व्हर्च्युअल रिअॅलिटी (व्हीआर) आणि स्मार्ट सिटी यांसारख्या प्रकल्पांमध्येही ‘एआय’ महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्याला तुमच्याविषयी सगळं माहितीय..! भारतीय माणूस दिवसातील सरासरी ७ तास ४२ मिनिटे मोबाइलवर घालवतो. त्यामुळे आता ‘एआय’ला तुमचा दिनक्रम, स्वभाव, वागणे, संवाद (आणि विसंवाद), कार्यपद्धती यातील मथितार्थ माहीत आहे. एका मोबाइल ॲपवरून तुम्ही विमानाचे पुणे ते बेंगळुरु तिकीट काढले, तर तुम्ही बेंगळुरुला किती दिवसांच्या अंतराने आणि कोणत्या कामासाठी जाता? कोणत्या ठिकाणी / परिसरात राहता? काय खाता-पिता? असा सगळा व्यक्तिगत ‘बिग डेटा’ त्याला माहीत असतो. आज ‘एआय’ ही फक्त एक वैज्ञानिक संकल्पना न राहता प्रत्यक्षात उपयोगात येणारे साधन बनले आहे. या नवतंत्रज्ञानामुळे आपल्याला ‘न भूतो’ अशी परिस्थिती अनुभवायला येत आहे. ‘एआय’ हे केवळ वर्तमानात थांबणारे तंत्रज्ञान नाही, तर त्याचा भविष्यातील प्रभावही अमर्याद आहे. त्याचवेळी या प्रगतीबरोबरच काही आव्हानेही उभी आहेत. गोपनीयता आणि सुरक्षिततेसंबंधी चिंता, मानवी नोकऱ्यांवरील परिणाम आणि डीपफेक तंत्रज्ञानासह ‘एआय’चा गैरवापर आदी गोष्टींवर तत्परतेने योग्य तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे. एकूणच, या तंत्रज्ञानाची धास्ती घेण्यापेक्षा त्याच्याशी दोस्ती केली पाहिजे. त्याच्याशी गट्टी जमली की मोबाइल वापरू शकणाऱ्या प्रत्येकाला हे तंत्रज्ञान आणि वापरायला सोपी अशी अगणित ‘एआय’ टूल्स हाताच्या बोटांवर खेळवता येतील! चला तर मग, आपापले सीट बेल्ट घट्ट करा, आपल्या मेंदूतील ‘न्यूरल नेटवर्क’ पकडून ठेवा… घाबरून न जाता, आत्मविश्वासाने आणि एकमेकांच्या साथीने ‘एआय’च्या या नव्या, जादुई विश्वाची सफर करूया! (संपर्कः amey@aconsultancy.marketing)



Source link

बुकमार्क: एका काश्मिरी माणसाचा हृदयस्पर्शी आत्मशोध…

0
बुकमार्क:  एका काश्मिरी माणसाचा हृदयस्पर्शी आत्मशोध…


स्वप्नील जोशी11 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

काश्मीर खोरं नक्की आहे तरी कसं? तिथल्या माणसांच्या आयुष्यात सतत काहीतरी धुमसतंय. त्यातून येणारं विस्थापन, अस्तित्व नाकारण्यासाठी, ओळख लपवण्यासाठी होणारी होरपळ आणि त्यातून वाट्याला येणारा एकाकीपणा.. या सगळ्यांचं यथार्थ दर्शन ‘रूह’मधून घडतं. मराठीसह अन्य भारतीय भाषांतील समकालीन कसदार पुस्तकांची ओळख करुन देणारे हे पाक्षिक सदर…

आपण पाहतो ते आताचे काश्मीर आणि अद्याप आपल्यापर्यंत न पोहोचलेलं खोरं यात किती ‘अंतर’ आहे, याचे प्रत्यंतर मानव कौल यांच्या ‘रूह’ या पुस्तकातून वाचकाला येतो. ‘न दिसणाऱ्या कित्येक कथा-कहाण्या वाट पाहात असतात, असे वाटून मी अपेक्षेने या अंधारामागे धावत असतो,’ असं कौल एके ठिकाणी सांगतात. आपण जगलेले आयुष्य पुन्हा नव्याने अनुभवण्यासाठी काहीसं उत्सुक असलेलं त्यांचं मन आपल्याशी मुक्तपणे संवाद साधतं. आपण जे आयुष्य जगतो, त्यापासून कधीच दूर जाऊ शकत नाही. त्याप्रमाणे काश्मीरच्या प्रवासातील अनुभवांबद्दल ते म्हणतात की, माझ्या भूतकाळापासून लांब पळायचा मी जेवढा प्रयत्न करत होतो, तेवढाच त्याच्याकडे खेचला जात होतो.

लहानपणी श्रीनगरमध्ये राहात असताना, बेकरीतून लवास घेऊन येणे, कंदूर भट्टीजवळची ती उबदार माणसं, आईने केलेला गरमगरम चहा आणि लवास कधी मिळेल, याची वाट पाहात फेरन घानून बसलेले बाबा.. हे सगळं त्यांना लख्ख आठवतं. हा लेखन प्रवास लिहिताना त्यांच्या मनाच्या तळाशी कितीतरी गोष्टी एकाच वेळी फेर धरत. एकेकाळी जे पहिले होते, ज्याचा गंध अनुभवला होता, ज्याचा स्वाद घेत‌ला होता, त्याबद्दल लिहिता लिहिता त्यांचे मन आणि पावलं त्यांना अनंतनागपासून ख्वाजाबागेपर्यंत त्यांच्या मूळ घरापर्यंत घेऊन जातात. लहानपणी काश्मीर सोडून मध्य प्रदेशात येणं ही लेखकाच्या आयुष्यातील ही एक महत्त्वाची घटना असली, तरी ‘आपण पुन्हा कधी तरी तेथे परत जाऊ,’ हा विश्वास त्यांच्या मनात होता. काश्मीरमधील आपल्या घराजवळ पोहोचताच तेथून बाबांना केलेला फोन, त्यांच्यातला दोन – तीन वाक्यांचा संवाद, ‘रुह’ची सोबत.. हे सगळं वाचताना मन हरखून जातं. जात, धर्म, लिंग या सगळ्यांच्या संकुचित सीमा ओलांडून मानवतेचे आणि माणसांच्या भोळ्या चेहऱ्याआड लपलेल्या अमानवी प्रवृत्तीचे दर्शनही लेखक आपल्याला करून देतो.

संपूर्ण पुस्तक वाचल्यावर आपल्याला ‘रूह’ या शीर्षकामागे असलेली लेखकाची मनोभूमिका कळते. हा सगळा लेखनप्रपंच ‘रूह’च्या अमेरिकेतील भेटीतच निश्चित झाला होता. तिने दिलेले आव्हान पूर्ण करताना, आपण काश्मीरचा प्रवास कसा केला हे कथन करतानाच, तिथे भेटलेल्या प्रत्येक पात्राची स्वतंत्र गोष्ट कौल आपल्याला सांगतात. ‘खोऱ्यामध्ये आता परिस्थिती ठीक आहे, या वाक्याचा नेमका अर्थ काय आहे? हे आपल्याला अद्यापपर्यंत कळलेले नाही. खोऱ्यात पर्यटक आले की, तिथले लोक आपला थकवा पोत्यात भरून दल सरोवरात बुडवून टाकतात,” या त्यांच्या वाक्यातून वास्तवातील परिस्थितीचा अंदाज येतो.

काश्मीर हाच विषय केंद्रस्थानी ठेवून या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. मानव कौल यांचे काश्मीरबद्दलचे विचार, स्वतःशी झालेले संवाद पुस्तकात सुसूत्रपणे एकत्रित उतरले आहेत. काश्मीर खोऱ्यातील स्वर्गीय आनंद देणारा निसर्ग आणि त्याचे वर्णन करताना लेखकाने सफरचंदाचे झाड, धुक्यात हरवलेली वाट, तेथील खाद्यसंस्कृती, घरांची रचना हा सगळा भाग चित्रमय स्वरुपात आपल्यासमोर उभा केला आहे. काश्मिरी पंडितांचे विस्थापन आणि दहशतीचे सावट या सामाजिक प्रश्नाच्या मुळाशीही आपण येऊन पोहोचतो. लेखकाच्या नजरेतून मुक्तपणे वाहणारी झेलम नकळत आपली होते. आपल्या प्रवासाचे, वर्तुळ पूर्ण होत असताना सोबत वडील नसण्याची खंत लेखकाने कवितेतूनच फार सुंदरपणे मांडली आहे.

या पुस्तकातील आशय आणि अभिव्यक्ती या दोन्ही बाबी पूर्णपणे एकरूप झाल्या आहेत. पुस्तकाच्या मध्यावर आल्यावर वाचकांना जाणीव होते की, अरे, अजून बरंचसं काश्मीर आपल्याला समजून घ्यायचंय! नीता कुलकर्णी यांनी केलेला या पुस्तकाचा मराठी अनुवाद मूळ पुस्तकाइतकाच या विषयामध्ये गुंतवून ठेवणारा आहे. कोणताही विशिष्ट दृष्टिकोन अथवा धारणा न ठेवता, काश्मिरी लोकांच्या आत्म्याला झालेल्या जखमांची ही हळवी कथा एक वाचक म्हणून प्रत्येकाने वाचावी अशी आहे.

– पुस्तकाचे नाव : रूह

– लेखक : मानव कौल

– अनुवाद : नीता कुलकर्णी

– प्रकाशक : रोहन प्रकाशन

– पाने : २००, किंमत : २९५ रु.

(संपर्कः swapnilkashi566@gmail.com)



Source link

कव्हर स्टोरी: यंदाचा उन्हाळा ‘अतिकडक’

0
कव्हर स्टोरी:  यंदाचा उन्हाळा ‘अतिकडक’




ग्लोबल वॉर्मिंग… हा एकविसाव्या शतकातील परवलीचा शब्द बनला आहे. २०१४ ते २०२४ या दशकात तापमानवाढीचा नवा उच्चांक झाला आहे. यंदा तर होळीच्या आधीपासूनच उन्हाची तीव्रता वाढली आहे. एकीकडे सामाजिक, राजकीय वातावरणाचा पारा रोज वरती चढत असताना, नैसर्गिक वातावरणातील वाढत्या उष्णतेनेही डोकी तापू लागली आहेत. पर्यावरणासह मानवी आरोग्य तसेच शेतीवर परिणाम घडवणाऱ्या या वाढत्या उन्हाचा आणि त्याच्या बदलत्या तऱ्हांचा हा वेध… यंदाच्या जानेवारीतील तापमान गेल्या १२१ वर्षांतील सर्वाधिक असल्याची नोंद केली गेली. जानेवारीमध्ये सरासरी तापमानात १.५७ अंश, तर फेब्रुवारीत १.५८ अंश सेल्सिअसने वाढ झाली आहे. त्यामुळे फेब्रुवारीअखेरीस आणि मार्चच्या पहिल्या आठवड्यातच उन्हाचे चटके जाणवू लागले. जानेवारी, फेब्रुवारीतील ही वाढ पाहता, यंदाच्या उन्हाळ्यात तापमानाचा उच्चांक होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या अहवालानुसार, येत्या काही दिवसांत पारा ४० अंशांवर किंवा त्याहीपुढे जाऊ शकतो. या उन्हाळ्यात देशात सरासरी तापमान ४५ अंश इतके राहण्याची शक्यता असून; दिल्ली, राजस्थान, गुजरातमध्ये ते कमाल ५० अंश, तर महाराष्ट्र, मध्य प्रदेशात कमाल ४८ अंशांवर जाऊ शकते. शिवाय, या उन्हाळ्यात उष्णतेच्या दोन ते तीन लाटा येण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे. भारतासह एकूणच दक्षिण आशिया तापमानवाढीच्या बाबतीत ‘अतिसंवेदनशील’ असल्याचे ‘आयपीसीसी’चा अहवाल सांगतो. या पार्श्वभूमीवर एकीकडे दिल्ली आणि उत्तर भारतात उन्हाची तीव्रता वाढत आहे, तर दुसरीकडे मुंबईसारख्या ३५ ते ४० अंशांदरम्यान तापमान राहणाऱ्या, समुद्रकिनाऱ्यावरील महानगरालाही यंदा उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. मार्चच्या सुरुवातीलाच उन्हाची ही स्थिती असल्याने एप्रिल, मे आणि जूनच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंतचा कालावधी आबालवृद्धांसाठी सत्त्वपरीक्षा पाहणारा असेल. या काळात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल, असे तज्ज्ञ सांगत आहेत. वाढत्या प्रदूषणामुळे तापमानात भर पडत असल्याने पर्यावरणावरही दूरगामी परिणाम होणार, हे स्पष्ट आहे. त्यावर उपाययोजनांसाठी उशीर झाला असला, तरी काही गोष्टी प्राधान्याने करण्याची गरज या क्षेत्रातील अभ्यासक व्यक्त करीत आहेत. सिंचन सुविधांच्या अभावामुळे भारतातील शेती आजही प्रामुख्याने मान्सूनच्या भरवशावर आहे. अशा स्थितीत उन्हाचे वाढते दिवस, उष्णतेच्या लाटा, अवकाळी आणि अतिपाऊस यांमुळे शेतीपुढे नवी संकटे उभी राहिली आहेत. हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या या आपत्तींना माणसाने ओलांडलेल्या मर्यादा हेच कारण आहे. त्यावर तात्कालिक उपचारांची तर आवश्यकता आहेच. पण, सुनियोजित, दीर्घकालीन आणि प्रभावी उपायही तातडीने हाती घ्यावे लागतील. भारतासाठी २०२४ ठरले ‘ताप’दायक… – ३७ : शहरांचे तापमान या वर्षीच्या उन्हाळ्यात ४५ अंशांपेक्षा जास्त होते. – ३०० : दिवस या वर्षात असह्य उष्णता निर्देशांकानुसार ‘तप्त’ होते. – ४८ हजार : लोकांची झाली उष्माघाताचे संशयित रुग्ण म्हणून नोंद. – २,०७४ : लोक मार्च ते जुलै दरम्यान देशात झाले उष्माघाताने बाधित. – ७६९ : लोकांना महाराष्ट्रात या कालावधीत बसला उष्माघाताचा फटका. – १६१ : जणांचा मार्च ते जुलै दरम्यान देशभरात उष्माघाताने झाला मृत्यू. स्त्रोत : इंटरगव्हर्न्मेंटल पॅनल ऑन क्लायमॅट चेंज-आयपीसीसी, नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल आणि अन्य संस्थांचे अहवाल. वसुंधरेची ‘तप्त’पदी… – तापमान ०.५ अंश वाढण्यास १७५ वर्षे लागली, पण गेल्या २४ वर्षांत १.५ अंशांनी वाढले. – या पावणेदोनशे वर्षांच्या काळातील २०१४ ते २०२४ हे ‘सर्वांत उष्ण दशक’ ठरले. – विशेषत: २०२३ हे या १७५ वर्षांतील ‘सर्वाधिक उष्ण वर्ष’ म्हणून नोंदवले गेले. – तापमानवाढ १.५ अंशांवर रोखण्याचे ध्येय, पण २०३० पर्यंतच २ अंशांवर जाण्याची भीती. – सागरी तापमान ०.६ अंशाने वाढले, परिणामी समुद्राच्या पातळीतही ४.७७ मिलीमीटरने वाढ झाली. – हवेतील आर्द्रतेत ४.९ टक्के वाढ; त्यामुळे अतिपाऊस, ढगफुटीच्या घटनाही वाढल्या. – कार्बनचे उत्सर्जन ५१ %, मिथेनचे १६२ %, नायट्रस ऑक्साइडचे २४ % वाढले. यामुळे होतेय तापमानवाढ… – सूर्यावरील विस्फोटांचे प्रमाण वाढले. – हरितगृह वायू उत्सर्जनात अपेक्षित घट नाही. – जंगलतोड, जलस्त्रोतांवर अतिक्रमण सुरूच. – अनिर्बंध नागरी आणि औद्योगिक प्रदूषण. – अनियंत्रित शहरीकरण, काँक्रिटीकरण. हे आहेत धोक्याचे संकेत… – वारंवार हिमवादळे येणे, हिमकडे कोसळणे. – प्रत्येक ऋतुबदलाच्या वेळी अवकाळी पाऊस. – पहाटेच्या वेळी ढगाळ वातावरण आणि पाऊस. – हिवाळ्यात अचानक थंडीचे प्रमाण वाढणे. – रात्रीचे सरासरी तापमान वाढणे. काय करावे? काय टाळावे? – दिवसातून किमान तीन लिटर पाणी प्या. – लिंबू सरबत, फळांचे ताजे रस, ओआरएस घ्या. – चहा, कॉफी, कृत्रिम शीतपेये, अतिथंड पाणी टाळा. – ताजा आहार घ्या; तळलेले पदार्थ, जंक फूड टाळा. – फिकट / पांढऱ्या रंगाचे, सैलसर, सुती कपडे वापरा. – उन्हाच्या वेळी स्वयंपाक टाळा, घरात हवा खेळती ठेवा. – उष्माघाताची लक्षणे जा‌णवल्यास लगेच डॉक्टरांकडे जाऊन योग्य उपचार घ्या. भविष्यात मोठ्या आपत्तीची चिन्हे; युद्धपातळीवर उपाययोजना हव्या तापमानाचा गेल्या १२१ वर्षांचा उच्चांक २०२५ मध्ये होईल, असा अंदाज आहे. जानेवारी आणि फेब्रुवारी हे महिने आधीच सर्वाधिक उष्ण ठरले आहेत. जागतिक हवामान बदलासोबतच आपल्याकडील शहरांमधील काँक्रिटीकरण, वाढते प्रदूषण, वृक्षतोड यामुळे तापमानवाढीची ही समस्या गंभीर बनली आहे. जगभरात स्थानिक वातावरणात होत असलेले असे बदल आणि जागतिक पातळीवरील अभ्यासावरून, भविष्यात मोठी नैसर्गिक आपत्ती येण्याचे संकेत मिळत आहेत. त्याचे गंभीर परिणाम प्रामुख्याने आरोग्य, पर्यावरण, कृषी आणि आर्थिक क्षेत्रावर पडतील. त्यातूनच मग आजारांमध्ये वाढ, जलस्त्रोतांमध्ये घट, वनसंपदेचा ऱ्हास, अन्नसुरक्षेची समस्या, लोकांचे स्थलांतर आणि देशांच्या आर्थिक उत्पन्नात घट असे दीर्घकालीन परिणाम दिसू लागतील. यापासून बचावण्यासाठी सरकार आणि समाजाने एकत्रितपणे युद्धपातळीवर, नियोजनबद्ध उपाययोजना हाती घ्याव्या लागतील. – प्रा. सुरेश चोपणे, पर्यावरण अभ्यासक वाढते तापमान आरोग्याला घातक, यंदा उष्माघाताचाही मोठा धोका अचानक वाढणारे तापमान आरोग्यासाठी घातक असते. या उष्म्याचे स्वास्थ्यावर काही तात्कालिक, तर काही दीर्घकालीन परिणाम होतात. उन्हामुळे त्वचेप्रमाणेच शरीराचे अंतर्गत तापमान वाढल्याने अनेक प्रक्रिया आणि पाचक रस अकार्यक्षम होऊ शकतात. अशावेळी मेंदूतील तापमान नियंत्रण केंद्र जागृत होऊन शरीर थंड ठेवण्यासाठी पेशी तसेच रक्तातील पाणी वापरले जाते आणि घाम तयार होतो. परिणामी शरीरातील पाणी कमी होऊन खूप तहान लागते. लघवीचे प्रमाण कमी होते. तिचा रंग पिवळा, नंतर लालसर होतो. रक्तदाब कमी होतो. डोके दुखते, डोळ्यांची आग होते. अंधारी येते, उलट्या होतात. रस्त्याच्या कामावरील मजूर, शेतात राबणारे शेतकरी – शेतमजूर, मैदानात खेळणारे खेळाडू अशांना उष्माघाताचा धोका असतो. उन्हाच्या तीव्रतेमुळे तो यंदा अधिक वाढला आहे. अनेकदा उष्णतेचे विकार आणि उष्माघात जीवावर बेतू शकतात. त्यामुळे प्रत्येकानेच या काळात योग्य ती खबरदारी घ्यायला हवी. – डॉ. अविनाश भोंडवे, ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ शेती उत्पादनांवर होतोय परिणाम, वैज्ञानिक पद्धतींचा अवलंब करा तापमानामध्ये सातत्याने होणाऱ्या बदलांचा शेतीवर मोठा परिणाम होत आहे. विशेषतः रब्बी हंगामातील गहू, हरभरा आणि भाजीपाला पिकांसाठी ही स्थिती आव्हानात्मक ठरली आहे. उष्णतेच्या तीव्रतेमुळे गव्हाच्या दाण्यांची भरणी कमी होऊन उत्पादन घटते. हरभऱ्यावर फुलगळ आणि बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होऊन उत्पादन कमी होते. भाजीपाला पिकांची पाने करपणे, फळधारणेत अडथळा येण्यासोबतच गुणवत्तेवर प्रतिकूल परिणाम होत आहे. अशा स्थितीत संभाव्य नुकसान टाकण्यासाठी शेतकऱ्यांनी नियमितपणे हवामान सल्ल्याचे पालन करणे गरजेचे आहे. पाण्याचे योग्य व्यवस्थापन करून पीक संरक्षित करावे. त्यासोबत मल्चिंग, ठिबक सिंचन आणि जैविक ताण व्यवस्थापन तंत्राने बदलत्या तापमानाचा प्रभाव नियंत्रित करता येईल. या उपायांमुळे पिकांची वाढ सुधारेल आणि उत्पादनही टिकवता येईल. बदलत्या हवामानाशी जुळवून घेत, वैज्ञानिक पद्धती अवलंबल्यास शेतकरी आपल्या उत्पादनात स्थिरता राखू शकतील. – डॉ. श्रद्धा बगाडे, कृषी हवामानशास्त्रज्ञ, म. फुले कृषी विद्यापीठ



Source link

अंबानींना लागला मोठा जॅकपॉट! 24 तासात कमावले 57500 कोटी; चीन, अमेरिका सगळेच झाले हैराण

0
अंबानींना लागला मोठा जॅकपॉट! 24 तासात कमावले 57500 कोटी; चीन, अमेरिका सगळेच झाले हैराण


Mukesh Ambani India Richest Just Got Richer : मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. मुकेश अंबानीना मोठा जॅकपॉट लागला आहे. अंबानी यांनी 24 तासात कमावले 57500 कोटी कमावले आहेत. यामुळे अंबानी यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. मुकेश अंबानी यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क यांना मागे टाकले आहे. अंबानी 24 तासांत जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक कमाई करणारे व्यक्ती बनले आहेत.

48 तासात मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली आहे.  चीनपासून अमेरिकेपर्यंत सर्वजण आश्चर्यचकित झाले आहेत. 6 आणि 7 मार्च या दोन दिवसांत मुकेश अंबानी यांच्या एकूण संपत्तीत 6.6 अब्ज डॉलर्स म्हणजेच 57,500 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. त्यानंतर त्यांची एकूण संपत्ती 88 अब्ज डॉलर्सच्या पुढे गेली आहे. शुक्रवारीही त्यांच्या एकूण संपत्तीत सुमारे 3 अब्ज डॉलर्सची वाढ झाली. 

मुकेश अंबानी जगातील 17 व्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती आहेत.  ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार  यांच्या संपत्तीत शुक्रवारी 2.92 अब्ज डॉलर्स म्हणजेच 25,400 कोटी रुपयांपेक्षा जास्त वाढ झाली.  मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती 88.1 अब्ज डॉलर्स झाली आहे.मुकेश अंबानी यांच्या एकूण संपत्तीत चालू वर्षात 2.49 अब्ज डॉलर्सची घट झाली आहे. मात्र,  गेल्या दोन दिवसांपासून मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत वाढ होत आहे.  मुकेश अंबानी यांच्या एकूण संपत्तीत 6.60 अब्ज डॉलर्स म्हणजेच  57,500 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.. गुरुवारी मुकेश अंबानी यांच्या एकूण संपत्तीत 3.7 अब्ज डॉलर्सची वाढ झाली.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्सने मोठी उसळी घेतल्याने मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत वाढ झाली.  मुकेश अंबानी यांच्या कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 6.24 टक्क्यांची वाढ झाली आहे. बीएसईच्या आकडेवारीनुसार 5 मार्च रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर्स 1,175.75 रुपयांवर होते. 7 मार्च रोजी  रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 73.35 रुपयांची वाढ झाली आहे. 

24 तासांच्या कमाईत अमेरिकन गुंतवणूकदार लॅरी एलिसन अंबानींपेक्षा पुढे आहेत. एलिसन हे सॉफ्टवेअर कंपनी ओरेकलचे अध्यक्ष आणि सीटीओ देखील आहेत. एलिसनने 24 तासांत 3.29 अब्ज डॉलर्सची कमाई केली. एलिसननंतर, कमाईच्या बाबतीत मुकेश अंबानी यांचा क्रमांक लागतो. अंबानीनंतर, तिसरे स्थान डेल टेक्नॉलॉजीजचे संस्थापक आणि अध्यक्ष मायकल डेल यांचे आहे. 24 तासांत डेलची एकूण संपत्ती 2.53 अब्ज डॉलर्सने वाढली.

 

 





Source link

टाटा, अंबानी यांना टक्कर देणारी भारतातील एकमेव महिला; 20,700 कोटींची कमाई, वयाच्या 50 व्या वर्षी सुरु केला स्टार्टअप

0
टाटा, अंबानी यांना टक्कर देणारी भारतातील एकमेव महिला; 20,700 कोटींची कमाई, वयाच्या 50 व्या वर्षी सुरु केला स्टार्टअप


Success Story:  रतन टाटा, मुकेश अंबानी हे भारतातील नव्हे तर जगातील यशस्वी उद्योजक आहेत. या दिगग्ज उद्योगपतींना भारतातील एक महिला उद्योजक टक्कर देते.   वयाच्या 50 व्या वर्षी  स्टार्टअप सुरु करणारी ही महिला 20,700 कोटींची कमाई करते.  फाल्गुनी नायर  (Falguni Nayar) असे महिलेचे नाव आहे.  

फाल्गुनी नायर या ‘Nykaa’ ब्रँडच्या फाऊंडर आहेत. सध्या ‘Nykaa’ हा ब्रँड देशातील सर्वात मोठ्या ब्रँडपैकी एक ब्रँड बनला आहे.   फाल्गुनी नायर या Nykaa कंपनीच्या कार्यकारी अध्यक्ष, एमडी आणि सीईओ आहेत.  टाटा, अंबानी यांच्या ब्रँडला टक्कर  फाल्गुनी नायर यांचा Nykaa ब्रँड टाटा ग्रुपच्या कॉस्मेटिक ई-रिटेलिंग साइट ‘टाटा क्लिक’ आणि मुकेश अंबानींच्या ब्युटी ब्रँड ‘टिरा’ला या ब्रँड्सना टक्कर देत आहे. दिवसेंदिवस Nykaa ब्रँड अधित प्रसिद्ध होत आहे. Nykaa खूपच लोप्रिय होत आहेत. 

फोर्ब्सच्या रिअल टाईम रिच लिस्टनुसार, भारतातील 13 अब्जाधीश महिला उद्योजकांमध्ये फाल्गुनी नायर यांचे नाव देखील सामील  झाले आहे. कंपनीच्या निर्णय प्रक्रियेत फाल्गुनी नायर यांचा थेट सहभाग असतो. अशा प्रकारे कंपनीचे सर्व निर्णय घेणाऱ्या त्या एकमेव सीईओ व्यावसायिक महिला आहेत. फाल्गुनी नायर या देशातील सर्वात श्रीमंत महिला सीईओ आहेत. त्यांची एकूण संपत्ती 2.5 अब्ज डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार 20,700 कोटी रुपये इतकी आहे.

ठरवले तर काहीही अशक्य नाही असे आणि वय हा फक्त आकडा असतो हे फाल्गुनी नायर यांनी त्यांच्या यशातून सिद्ध करुन दाखवले आहे. वयाच्या 50 व्या वर्षी फाल्गुनी नायर यांनी स्टार्टअप सुरु केला आणि तो यशस्वी देखील करुन दाखवला आहे. फाल्गुनी नायर यांनी आयआयएम-अहमदाबाद येथून शिक्षण घेतले आहे. जवळपास  20 वर्षे इन्व्हेस्टमेंट बँकिंग आणि ब्रोकिंग क्षेत्रात काम केले. वयाच्या 50 व्या वर्षी त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. 2021 मध्ये त्यांनी  Nykaa ब्रँड लाँच केला. अल्प कालावधीत या ब्रँडने मोठे यश मिळवले असून त्या सर्वात यशस्वी व्यावसायिक महिलांपैकी एक ठरल्या आहेत. Nykaa ब्रँड फक्त ई-रिटेलिंगच करत नाही तर या ब्रँडने स्वत:चे 35,000 प्रोडक्ट देखील लाँच केले आहेत. Nykaa चे देशभरात 17 स्टोर देखील आहेत. Nykaa ब्रँडने अनेक सेलिब्रिटींसोंबत पार्टनरशिप केली आहे.





Source link