Wednesday, July 29, 2026
Home Blog Page 496

काय आहे मल्हार मांस? ज्याची महाराष्ट्र झाली सुरुवात, झटका आणि हलाल मटणातील फरक समजून घ्या

0
काय आहे मल्हार मांस? ज्याची महाराष्ट्र झाली सुरुवात, झटका आणि हलाल मटणातील फरक समजून घ्या


महाराष्ट्रात सध्या हलाल आणि झटका मांसावरून राजकारण तापले आहे. भाजप नेते आणि महायुती सरकारमधील मंत्री नितेश राणे यांनी नुकतेच चिकन आणि मटण प्रेमींसाठी ‘मल्हार सर्टिफिकेशन’ सुरू केले. यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाले तर हिंदू दुकानदारांना ‘झटका मटण’ विक्रीसाठी ‘मल्हार प्रमाणपत्र’ देण्याची घोषणा करण्यात आली आहे. हिंदूंनी या प्रमाणित दुकानांमधूनच मटण खरेदी करावे, असे आवाहन राणे यांनी केले. या विधानावर बराच गदारोळ झाला आहे. त्यावर विरोधी पक्षांनी जोरदार टीका केली आहे. विरोधी पक्ष याला धार्मिक फूट पाडण्याचे षडयंत्र म्हणत आहेत.



Source link

Shaktipeeth Mahamarg : शक्तीपीठ महामार्गामुळे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास, मुख्यमंत्र्यांनी सांगितले भविष्यातील फायदे

0
Shaktipeeth Mahamarg : शक्तीपीठ महामार्गामुळे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास, मुख्यमंत्र्यांनी सांगितले भविष्यातील फायदे


शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्राच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. हा महामार्ग नागपूरपासून सिंधुदुर्गपर्यंत १२ जिल्ह्यांमधून जाणार असून, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शक्तीपीठांना जोडणारा आहे. त्यामुळे मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या औद्योगिक तसेच आर्थिक विकासालाही चालना मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत  सांगितले.



Source link

36 वर्षानंतर घरात सापडलेल्या Reliance च्या शेअर्सची आज लाखो रुपये किंमत; पण फायदा शून्य कारण…

0
36 वर्षानंतर घरात सापडलेल्या Reliance च्या शेअर्सची आज लाखो रुपये किंमत; पण फायदा शून्य कारण…


RIL Reliance Shares : एखाद्या व्यक्तीवर लक्ष्मी प्रसन्न होणं म्हणजे नेमकं काय असतं किंवा दैनंदिन राशीभविष्यामध्ये लावला जाणारा धनलाभाचा तर्क नेमका कसा असतो हे काही दिवसांपूर्वीच पाहायला मिळालं. जिथं रतन ढिल्लों नामक व्यक्तीला घरातील साफसफाई करताना हाती एक अशी वस्तू लागली, ज्यावर काही क्षण त्यांचाच विश्वास बसेना. 

ही वस्तू होती साधारण 36 वर्षांपूर्वीचे रिलायन्स कंपनीचे शेअर. चंदीगढमधील मूळ रहिवासी असणाऱ्या रतन ढिल्लों यांना मिळालेल्या या कागदपत्रांमध्ये 1988 मधील एका मोठ्या व्यवहाराची माहिती मिळाली. जिथं 10 रुपये प्रति शेअर इतक्या दरानं 30 इक्विटी शेअर खरेदी केल्याचं पत्रक त्यांच्यासमोर आलं. आजच्या दरानं या शेअरमधून ढिल्लों यांना 11 ते 12 लाख रुपयांचा लाभ होईल असं सांगितलं गेलं. सोशल मीडियाच्या माध्यमातूनच जाणकारांनी ढिल्लों यांच्या X पोस्टवर याबाबतची माहिती दिली होती. 

शेअर वाया जाणार? 

सोशल मीडियावर ढिल्लों यांची पोस्ट वाऱ्याच्या वेगानं व्हायरल झाली आणि यानंतर या शेअरचं पुढे काय झालं? हा प्रश्न अनेकांच्या मनात घर करत असतानाच त्याबबातची माहितीसुद्धा समोर आली. 

खुद्द ढिल्लों यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं, ‘असं वाटतंय की धीरुभाई अंबानी यांची सही आता व्यर्थ जाणार… मी या शेअरचं डिजिटायझेशन न करण्याचा निर्णय घेतला आहे’. सदर प्रक्रिया अतिशय मोठी आणि लांबलचक असून, वारसा हक्काचं एक कायदेशीर प्रमाणपत्र मिळवण्यासाठीच 6 ते 8 महिन्यांचा कालावधी लागणार आहे तर, IEPFA ही प्रक्रिया 2 ते 3 वर्षांत पार पडेल असं त्यांनी स्पष्ट केलं. 

सदर प्रक्रियेसाठी इतका सारा वेळ दवडणं मला फार फायद्याचं वाटत नाही असं सांगत त्यांनी भारतात हा कागदोपत्री व्यवहार अधिक सोपा केला पाहिजे अशी निकडही त्यांनी व्यक्त केली आणि आपण सध्यातरी ही शेअर प्रमाणपत्र सोबतच ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 





Source link

डोंगर कापून उभारला आलिशान संगमरवरी महाल; माजी मुख्यमंत्र्यांचं 500 कोटींचं घर वादात

0
डोंगर कापून उभारला आलिशान संगमरवरी महाल; माजी मुख्यमंत्र्यांचं 500 कोटींचं घर वादात


Video : राजकारणात नेतेमंडळींची कारकिर्द जितकी चर्चेचा विषय ठरते तितकंच त्यांचं खासगी आयुष्य, एकंदर कमाई हे सर्व मुद्देसुद्धा प्रचंड चर्चेच असतात. याच राजकारणात आता एका बड्या नेत्याच्या घरानं सर्वांचं लक्ष वेधलं आहे. महाकाय डोंगर कापून उभारण्यात आलेल्या माजी मुख्यमंत्र्यांच्या या घराचे व्हिडीओ थेट वृत्तसंस्थेनंच प्रसिद्ध केल्यामुळं आता विरोधकांच्याही भुवया उंचावल्या आहेत. 

विशाखापट्टणमच्या ऋषिकोंडा इथं समुद्राला लागूनच असणाऱ्या एका डोंगराचा काही भाग, कडेकपारी तासत तिथं पुरेशी जागा तयार करत डोंगरउतारावरच हा आलिशान महाल उभारण्यात आला असून, त्याची मालकी आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याकडे असल्याचं सांगण्यात येतं. जवळपास 10 एकरांच्या भूखंडावर साधारण 500 कोटींची रक्कम खर्ची घालत हा शुभ्र महाल उभारण्यात आला असून, रेड्डी यांचं हे घर सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकलं आहे. नियमांची पायमल्ली करत रेड्डी यांचा हा आलिशान निवास उभा असल्याचं म्हटलं जातं. 

ANI या वृत्तसंस्थेनं या घराच्या आतील व्हिडीओ जारी केला असून, यामध्ये घराचे अंतरंग अतिशय शुभ्र छटेमध्ये दिसत असून, तिथं असणारं फर्निचर, मोठाले झुंबर नजर खिळवून ठेवत आहेत. बाथटब म्हणू नका, बागबगिचा म्हणू नका किंवा भलंमोठं वाहनतळ म्हणू नका, जे म्हणाल ती सुविधा इथं उपलब्ध असल्याचं काही मिनिटांचा हा व्हिडीओ पाहून लक्षात येतं. 

काय आहे या महालवजा घराचं महत्त्वं? 

सूत्रांच्या माहितीनुसार हे महालवजा घर 10 एकरांच्या भूखंडावर 4 मोठ्या ब्लॉकमध्ये उभं आहे. या घराचे अंतरंग तयार करण्यासाठी आणि सजावटीसाठी इटालियन संगमरवराचा वापर करण्यात आल्याचा दावा केला जाते. ऋषिकोंडा या नावानं हे घर ओळखलं जात असून YSR काँग्रेसच्या काळात हे मुख्यमंत्री रेड्डी यांचं निवासस्थान आणि कार्यालय होतं. या परिसरात हाकेच्या अंतरावरच पक्के रस्ते, वीजेची उपकेंद्र आणि पाण्याची उत्तम सुविधा आहे. 

घर वादाच्या भोवऱ्यात 

आंध्र प्रदेशात तेलुगू देसम पार्टी अर्थात टीडीपीचं सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी या भल्यामोठ्या घराला हेरलं आणि याच्या निर्मितीसाठी तत्कालीन रेड्डी सरकारनं पैशांचा गैरव्यवहार केल्याचा गंभीर आरोप केला. हा आलिशान राजवाडा बांधण्यासाठी ऋषिकोंडाचा डोंगर पोखरण्यात आला असून, तिथं हे बांधकाम केल्याचा आरोपही रेड्डींवर लावण्यात येत आहे. 

नायडू यांच्या आरोपानुसार रेड्डी यांनी सार्वजनिक निधीचा दुरूपयोग केला असून वायएसआरसीपीच्या माजी मंत्र्यांनी मात्र रेड्डींच्या या बंगल्यावरून होणारे आरोप पाहता बचावात्मक स्पष्टीकरण देत हे बांधकाम कायदाच्या चौकटीत राहूनच केल्याचं स्पष्ट केलं. 





Source link

इथून पुढं रेल्वेच्या जेवणात… केंद्रीय मंत्र्यांच्या स्पष्ट सूचना; तिकीट काढताना नेमकं काय बदलणार?

0
इथून पुढं रेल्वेच्या जेवणात… केंद्रीय मंत्र्यांच्या स्पष्ट सूचना; तिकीट काढताना नेमकं काय बदलणार?


Indian Railway : विमानसेवेची उपलब्धता अगदी सहजपणे वाढलेली असतानाही आजच्या घडीलासुद्धा देशात लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी सामान्य नागरिक रेल्वे प्रवासालाच प्राधान्य देतात. देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाला रेल्वेमार्गानं जोडणाऱ्या या सुविधेमध्ये विविध श्रेणींअंतर्गत प्रवाशांना रेल्वेकडून बहुविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. 

रेल्वे प्रवासात पिण्याच्या पाण्यापासून ते अगदी प्रवाशांच्या आहाराची काळजी घेत न्याहारीपासून अगदी दोन वेळची जेवणं आणि सायंकाचा चहा नाश्ता यांची सुद्धा तजवीज केली जाते. याच सुविधेमध्ये आता काही महत्त्वाचे बदल होणार असून, खुद्द केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीच यासंदर्भातील माहिती लोकसभेत दिली. 

प्रवाशांना उत्तमोत्तम सुविधा देऊ करण्यासाठी म्हणून भारतीय रेल्वेकडून इथून पुढं रेल्वे प्रवासात दिल्या जाणाऱ्या पदार्थांची यादी/ मेन्यू आणि त्या पदार्थांचा दर निश्चित करणं बंधनकारक असेल. रेल्वेमंत्र्यांनी एका प्रश्नाचं लिखित उत्तर देताना यासंदर्भातील माहिती दिली. रेल्वे प्रवासादरम्यान दिलं जाणारं जेवण नेमकं किती रुपयांना विकलं जात आहे यासंदर्भातील माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचणं महत्त्वाचं असून, त्यांना रेट कार्ड उपलब्ध करून द्यावं असं ते म्हणाले. 

वैष्णव यांनी पुढे स्पष्ट केलेल्या मुद्द्यांनुसार आयआरसीटीसीच्या (IRCTC) संकेतस्थळ अर्थात वेबसाईटवरही पदार्थांचे दर आणि मेन्यू उपलब्ध असून रेल्वेतील वेटरकडेही ही माहिती सुपूर्द करण्यात येत आगे. जेणेकरून प्रवाशांना गरज भासल्यास ही माहिती मिळवता येईल. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी मेन्यू टॅरिफ लिंकसह प्रवाशांना SMS Alert सुद्धा दिला जातो असं सांगत रेल्वेतील आहार सुविधा आणि दरांबाबत प्रवाशांना जागरुक करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आल्याचं ते म्हणाले. 

रेल्वेतील जेवणासंदर्भात अनेकदा तक्रारींचा सूर प्रवासी आळवतात. मात्र याबाबत सरकार सजग असून, स्वच्छता आणि पदार्थ हाताळण्यासाठी बेस किचनमध्ये खाद्य सुरक्षा पर्यवेक्षक तैनात कणअयात आले असून, त्यांच्याकडून रेल्वे प्रवासादरम्यान या सुविधांची पाहणी केली जाते. रेल्वेमध्ये मिळणाऱ्या अन्नपदार्थांवर क्यूआर कोडच्या माध्यमातून खानावळ/ केटररच्या नावापासून पॅकेजिंग तारखेपर्यंतची माहितीसुद्धा मिळवता येऊ शकते असंही त्यांनी स्पष्ट केलं. 





Source link

‘लोकमान्य टिळक हे उत्तम गणिती व खगोलशास्त्री होते’

0
‘लोकमान्य टिळक हे उत्तम गणिती व खगोलशास्त्री होते’



बेळगाव येथील ‘लोकमान्य ग्रंथालय’ आणि ‘बुक लव्हर्स क्लब’ यांच्या विद्यमाने ‘डिव्हाईन इजिटेटर्स अँड हार्डी’ या पुस्तकाचे लेखक उमाकांत तासगावकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.



Source link

मुंबईतील लीलावती रुग्णालयात जादू टोणा आणि तंत्र-मंत्र, १५०० कोटींचा अपहार; ३ एफआयआर

0
मुंबईतील लीलावती रुग्णालयात जादू टोणा आणि तंत्र-मंत्र, १५०० कोटींचा अपहार; ३ एफआयआर


मुंबईतील प्रसिद्ध लीलावती रुग्णालय चालवणाऱ्या चॅरिटेबल ट्रस्टने माजी विश्वस्त आणि संबंधित व्यक्तींवर १५०० कोटी रुपयांहून अधिक रकमेचा आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे. लीलावती कीर्तीलाल मेहता मेडिकल ट्रस्टने यासंदर्भात सक्तवसुली संचालनालय आणि वांद्रे पोलिस ठाण्यात स्वतंत्र तक्रार दाखल केली आहे. रुग्णालयाच्या आवारात माजी विश्वस्त आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काळी जादू केल्याचा दावाही ट्रस्टने केला आहे. रुग्णालयाच्या आवारात मानवी कवटीसारख्या काळ्या जादूशी संबंधित काही साहित्य सापडल्याचा दावा ट्रस्टने केला आहे.



Source link

Maharashtra Election News LIVE March 13, 2025: देशात आरोग्य सेवांचे सुलभीकरण व लोकशाहीकरण होणे आवश्यकः डॉ. अभय बंग

0
Maharashtra Election News LIVE March 13, 2025: देशात आरोग्य सेवांचे सुलभीकरण व लोकशाहीकरण होणे आवश्यकः डॉ. अभय बंग


Maharashtra Election 2024 News LIVE: देशात आरोग्य सेवांचे सुलभीकरण व लोकशाहीकरण होणे आवश्यकः डॉ. अभय बंग

Maharashtra Election 2024 News LIVE: देशात आरोग्य सेवांचे सुलभीकरण व लोकशाहीकरण होणे आवश्यकः डॉ. अभय बंग(Chandrakant Paddhane)

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Thu, 13 Mar 202502:21 PM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: देशात आरोग्य सेवांचे सुलभीकरण व लोकशाहीकरण होणे आवश्यकः डॉ. अभय बंग

  • मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात ‘यशवंतराव चव्हाण स्मृती राष्ट्रीय पुरस्कार’ गडचिरोली जिल्ह्यातील ‘सर्च’ या संस्थेचे डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांना देण्यात आला.


Read the full story here

Thu, 13 Mar 202511:20 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: काय आहे मल्हार मांस? ज्याची महाराष्ट्र झाली सुरुवात, झटका आणि हलाल मटणातील फरक समजून घ्या

  • मंत्री नितेश राणे यांनी नुकतेच चिकन आणि मटण प्रेमींसाठी मल्हार सर्टिफिकेटचे लोकार्पण केले. हे झटका आणि हलाल मांसमधील फरक स्पष्ट करते. यामुळे राज्यात नवा राजकीय वाद निर्माण झाला आहे.


Read the full story here

Thu, 13 Mar 202510:23 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: Shaktipeeth Mahamarg : शक्तीपीठ महामार्गामुळे महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास, मुख्यमंत्र्यांनी सांगितले भविष्यातील फायदे

  • शक्तीपीठ महामार्गामुळे मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या औद्योगिक तसेच आर्थिक विकासालाही चालना मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत  सांगितले.


Read the full story here

Thu, 13 Mar 202506:16 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: लोकमान्य टिळक उत्तम गणिती व खगोलशास्त्री होते

  • बेळगाव येथील ‘लोकमान्य ग्रंथालय’ आणि ‘बुक लव्हर्स क्लब’ यांच्या विद्यमाने ‘डिव्हाईन इजिटेटर्स अँड हार्डी’ या पुस्तकाचे लेखक उमाकांत तासगावकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.


Read the full story here

Thu, 13 Mar 202505:34 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: मुंबईतील लीलावती रुग्णालयात जादू टोणा आणि तंत्र-मंत्र, १५०० कोटींचा अपहार; ३ एफआयआर

  • लीलावती रुग्णालयाच्या  माजी विश्वस्तांनी १५०० कोटी रुपयांहून अधिक आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप आजी विश्वस्तांनी केला आहे. रुग्णालयाच्या आवारात माजी विश्वस्त आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून काळी जादू केली जात असल्याचा दावाही करण्यात आला आहे.


Read the full story here

Thu, 13 Mar 202505:08 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: महाराष्ट्रात राहायचं असेल तर… मराठी भाषेबाबत भाजप नेत्या चित्रा वाघ यांचं मोठं वक्तव्य

  • महाराष्ट्रात राहायचे असेल तर मराठी येत असावी, असे वक्तव्य भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केले आहे. तसे नसेल तर भाषा शिकली पाहिजे आणि तिचा आदर केला पाहिजे.


Read the full story here





Source link

“महाराष्ट्रात राहायचं असेल तर…”; मराठी भाषेबाबत भाजप नेत्या चित्रा वाघ यांचं मोठं वक्तव्य

0
“महाराष्ट्रात राहायचं असेल तर…”; मराठी भाषेबाबत भाजप नेत्या चित्रा वाघ यांचं मोठं वक्तव्य


देशभरातील भाषेबाबत लोकांमध्ये वेगवेगळी विधाने समोर येत आहेत. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीही या भाषेबाबत आपले मत व्यक्त केले आहे. महाराष्ट्रात राहत असाल तर मराठी भाषा अवगत असली पाहिजे आणि ती शिकण्याची तयारी ठेवली पाहिजे, भाषेचा आदर केला पाहिजे.



Source link

डोंबिवलीत फडके रोडवर संघाच्या कचोरे येथील बाल प्रशिक्षण शिबिरावरील दगडफेकीचा निषेध

0
डोंबिवलीत फडके रोडवर संघाच्या कचोरे येथील बाल प्रशिक्षण शिबिरावरील दगडफेकीचा निषेध



Dombivli stone pelting on rashtriya Swayamsevak sangh child camp protests on streets डोंबिवलीत फडके रोडवर संघाच्या कचोरे येथील बाल प्रशिक्षण शिबिरावरील दगडफेकीचा निषेध





Source link