Sunday, August 23, 2026
Homeदेश-विदेशइथून पुढं रेल्वेच्या जेवणात... केंद्रीय मंत्र्यांच्या स्पष्ट सूचना; तिकीट काढताना नेमकं काय...

इथून पुढं रेल्वेच्या जेवणात… केंद्रीय मंत्र्यांच्या स्पष्ट सूचना; तिकीट काढताना नेमकं काय बदलणार?

इथून पुढं रेल्वेच्या जेवणात… केंद्रीय मंत्र्यांच्या स्पष्ट सूचना; तिकीट काढताना नेमकं काय बदलणार?

[ad_1]

Indian Railway : विमानसेवेची उपलब्धता अगदी सहजपणे वाढलेली असतानाही आजच्या घडीलासुद्धा देशात लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी सामान्य नागरिक रेल्वे प्रवासालाच प्राधान्य देतात. देशाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाला रेल्वेमार्गानं जोडणाऱ्या या सुविधेमध्ये विविध श्रेणींअंतर्गत प्रवाशांना रेल्वेकडून बहुविध सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. 

रेल्वे प्रवासात पिण्याच्या पाण्यापासून ते अगदी प्रवाशांच्या आहाराची काळजी घेत न्याहारीपासून अगदी दोन वेळची जेवणं आणि सायंकाचा चहा नाश्ता यांची सुद्धा तजवीज केली जाते. याच सुविधेमध्ये आता काही महत्त्वाचे बदल होणार असून, खुद्द केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीच यासंदर्भातील माहिती लोकसभेत दिली. 

प्रवाशांना उत्तमोत्तम सुविधा देऊ करण्यासाठी म्हणून भारतीय रेल्वेकडून इथून पुढं रेल्वे प्रवासात दिल्या जाणाऱ्या पदार्थांची यादी/ मेन्यू आणि त्या पदार्थांचा दर निश्चित करणं बंधनकारक असेल. रेल्वेमंत्र्यांनी एका प्रश्नाचं लिखित उत्तर देताना यासंदर्भातील माहिती दिली. रेल्वे प्रवासादरम्यान दिलं जाणारं जेवण नेमकं किती रुपयांना विकलं जात आहे यासंदर्भातील माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचणं महत्त्वाचं असून, त्यांना रेट कार्ड उपलब्ध करून द्यावं असं ते म्हणाले. 

वैष्णव यांनी पुढे स्पष्ट केलेल्या मुद्द्यांनुसार आयआरसीटीसीच्या (IRCTC) संकेतस्थळ अर्थात वेबसाईटवरही पदार्थांचे दर आणि मेन्यू उपलब्ध असून रेल्वेतील वेटरकडेही ही माहिती सुपूर्द करण्यात येत आगे. जेणेकरून प्रवाशांना गरज भासल्यास ही माहिती मिळवता येईल. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी मेन्यू टॅरिफ लिंकसह प्रवाशांना SMS Alert सुद्धा दिला जातो असं सांगत रेल्वेतील आहार सुविधा आणि दरांबाबत प्रवाशांना जागरुक करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आल्याचं ते म्हणाले. 

रेल्वेतील जेवणासंदर्भात अनेकदा तक्रारींचा सूर प्रवासी आळवतात. मात्र याबाबत सरकार सजग असून, स्वच्छता आणि पदार्थ हाताळण्यासाठी बेस किचनमध्ये खाद्य सुरक्षा पर्यवेक्षक तैनात कणअयात आले असून, त्यांच्याकडून रेल्वे प्रवासादरम्यान या सुविधांची पाहणी केली जाते. रेल्वेमध्ये मिळणाऱ्या अन्नपदार्थांवर क्यूआर कोडच्या माध्यमातून खानावळ/ केटररच्या नावापासून पॅकेजिंग तारखेपर्यंतची माहितीसुद्धा मिळवता येऊ शकते असंही त्यांनी स्पष्ट केलं. 



[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments