
जवळपास ९ महिने अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर अखेर पृथ्वीवर परतले आहेत. बुधवारी सकाळी ते दोघेही स्पेसएक्स ड्रॅगन फ्रीडम क्राफ्टद्वारे अमेरिकेच्या फ्लोरिडा किनाऱ्यावर उतरले. ही मोहीम अजिबात सोपी नव्हती.

जवळपास ९ महिने अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर अखेर पृथ्वीवर परतले आहेत. बुधवारी सकाळी ते दोघेही स्पेसएक्स ड्रॅगन फ्रीडम क्राफ्टद्वारे अमेरिकेच्या फ्लोरिडा किनाऱ्यावर उतरले. ही मोहीम अजिबात सोपी नव्हती.




अमेरिकेतील इंडियाना मध्ये एक खळबळजनक घटना समोर आली आहे. येथे राहणाऱ्या एका महिला शिक्षिकेने शाळेत शिकणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांशी लैंगिक संबंध ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. तिने आपल्या मुलाला जवळच झोपवले आणि विद्यार्थ्यांसोबत ग्रुप सेक्स केला. महिलेने एकाच वेळी तीन विद्यार्थ्यांसोबत लैंगिक संबंध ठेवले. याशिवाय ती त्यांचे प्रायव्हेट आणि न्यूड फोटो मागायची आणि मग त्यांना भरघोस पैसे द्यायची.

Palace In India: भारतीय इतिहासात (Indian History) डोकावलं असता अनेक असे संदर्भ आढळतात जे कायमच भारावून सोडतात. राजेमहाराजांची संस्थानं, त्यांची श्रीमंती, तेथील रुढी आणि परंपरा पाहताना डोळे दीपतात. राजेशाही थाट पाहताना कायमच या राजेरडवाड्यांच्या प्रासादाची अर्थात त्यांच्या आलिशान महालांचीसुद्धा तितकीच चर्चा होते. अशा या भारत देशामध्ये प्रत्येक महालाच्या निर्मितीमागे एक ना एक कथा- कहाणी आहे. त्यातल्याच एका महालाविषयी इथं जाणून घेऊया, ज्याचा उल्लेख अनेकदा अपशकुनी किंवा एक दुर्दैवी महाल म्हणून केला जातो.
मध्य प्रदेशातील दातिया इथं हा महाल असून त्याचं नाव आहे सतखंडा महाल ( Datia Satkhanda Palace). पाहताक्षणी डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या या महालाकडे 400 वर्षांपासून फार क्वचितच कोणी फिरकतं. इथं आजवर कोणी वास्तव्यही केलं नाही, ज्यामुळं हा अपशकुनी महाल असल्याचं अनेकजण म्हणतात. महाराज बीर सिंह देव यांनी या महालाची उभारणी केली पण, त्यांच्या कुटुंबानं कधीच या महालाचा वापर मात्र केला नाही.
सतखंडा महालाच्या निर्मितीसाठी कोणत्याही लाकूड अथवा लोखंडाचा वापर झालेला नाही. इतकंच नव्हे, तर या महालाच्या 7 पैकी दोन मजले पाण्याखाली आहेत. 1620 मध्ये दतियाचे राजा बीर सिंह यांनी 35 लाख रुपये खर्चून हा महाल उभारला होता. या महालातील अतिशय बारीक नक्षीकामामुळं त्याच्या पूर्णत्वासाठी तब्बल 9 वर्षांचा काळ गेला. या महालाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथं मंदिर आणि मशीदही आहे.
440 खोल्या, शेकडो खिडक्या आणि झरोके असणारा हा महाल मुघल शासक जहांगीरच्या स्वागतासाठी त्याची उभारणी करण्यात आली होती. असं म्हणतात की राजा बीर सिंह देव यांनी शहाजहांला सिंहासनारुढ होण्यासाठी प्रचंड मदत केली होती. ज्या कारणानं या राजाच्या वाट्याला ओरछाचं सिंहासन आलं. जहांगीर इथं आला तेव्हा त्यानं फक्त एका रात्रीचा मुक्काम या महालात केला होता. तेव्हापासून हे महाल निर्मनुष्यच आहे. या महालाची प्रत्येक कमान, प्रत्येक चौक आणि महालातील प्रत्येक नक्षी इतिहासाची साक्ष देत असून, अद्वितीय कलेचं प्रदर्शन करते. पण, इथं कोणाचाही वावर नसल्यामुळं काळानुरुप या महालाकडे पाहण्याचा अनेकांचाच दृष्टीकोन बदलला.

ज्या वयात आपल्यापैकी बहुतेक जण नोकरी शोधण्यासाठी आणि चांगले करिअर करण्यासाठी धडपडत आहेत, त्या वयात या रशियन माणसाने निवृत्ती घेतली आहे. इतकंच नाही तर आता या २३ वर्षीय व्यक्तीला आयुष्यभरासाठी पेन्शनही मिळणार आहे. तुमचा विश्वास बसणार नाही, पण रशियातील एका व्यक्तीची ही खरी कहाणी आहे. पॉवेल वयाच्या २१ व्या वर्षी नोकरीत रुजू झाले आणि अवघ्या दोन वर्षांच्या सेवेनंतर निवृत्त झाले आहेत. यासोबतच इंटरनॅशनल रेकॉर्ड रजिस्ट्रेशन एजन्सीमध्येही त्याने एक अनोखा विक्रम केला आहे.
गाझामधील जनतेला अखेरचा इशारा दिल्यानंतर इस्रायलने पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर हल्ले सुरू केले आहेत. हवाई हल्ल्यानंतर इस्रायली सैन्याने आता गाझावर जमीनी कारवाई सुरू केली आहे. इस्रायलच्या लष्कराने बुधवारी सांगितले की, त्यांनी गाझामध्ये लक्ष्यित जमिनीवरील कारवाई सुरू केली आहे आणि गाझाचा काही भाग पुन्हा ताब्यात घेतला आहे. विशेष म्हणजे एक दिवसापूर्वीच गाझावर हवाई हल्ले सुरू झाले होते. या हल्ल्यांमध्ये ४०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. त्याचबरोबर हमाससोबतचा शस्त्रसंधी करारही संपुष्टात येण्याच्या मार्गावर होता.

