



Ranjitsinh Naik Nimbalkar on Ramraje Naik Nimbalkar : श्रीराम साखर कारखान्याच्या निवडणुकीवरुन रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjitsinh Naik Nimbalak) यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. श्रीराम साखर कारखान्यावर प्रशासकाची नेमणूक करुन श्रीराम साखर कारखान्याच्या निवडणुकीला स्थगिती देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पत्रकार परिषद घेत रामराजेंवर टीकास्त्र सोडले. यावेळी त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचाही समाचार घेतला.
फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी ज्यांच्यावर लोकप्रतिनिधी व श्रीमंत म्हणून विश्वास ठेवला त्यांनी तिजोरी लुटली हे फलटण तालुक्याचे दुर्दैव असल्याचे रणजितसिंह निंबाळकर म्हणाले. फलटण तालुक्यातील सहकारी संस्था रामराजेंनी अक्षरश विकण्यास काढल्या असल्याचा आरोप त्यांनी केला. फलटण तालुक्यातील तरुणांनी रामराजेंना आता घरी बसवण्याचं ठरवलं आहे, अशी टीका माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली.
कारखान्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज केलं आहे. ज्यांच्यावर आम्ही विश्वास ठेवला त्यांनीच तिजोरी लुटल्याचे रणजितसिंह निंबाळकर म्हणाले. कारखान्यात काहीही ठेवलं नाही. शिक्षणावर जर तुमचा पराक्रम असता तर तुम्ही बारामतीच्या बरोबर घेऊन गेला असता असा टोला त्यांन रामराजेंना लगावला. 20 वर्षापूर्वीचा ऐकेकाळचा फलटणचा 1 लाख लिटरचा दूध संघ भंगारात जमा झाला आहे. जमिन विकली, मशनरी विकायला काढली तो शून्य लिटरवर आणला आहे. श्रीराम कारखान्यातही मोठा भ्रष्टाचार केला आहे. मालोजी बँकेवर रिझर्व्ह बँकेवर निर्बंध लावले. तुमच्याकडे असणारा खरेदी विक्री संघ गायब आहे. मार्केट कमिटीत सहा महिन्यांचे पगार नाहीत अशी टिका रणजित निंबाळकर यांनी रामराजेंवर केला. पाणीसुद्धा तुम्ही 30 वर्ष भाड्यानं दिलं होतं अशी टीकाही त्यांनी रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर केली.
महत्वाच्या बातम्या:
अधिक पाहा..


आदर्की खुर्द (ता. फलटण) – प्रेमप्रकरणातील बदनामीच्या रागातून एका व्यक्तीचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना आदर्की खुर्द (ता. फलटण) येथे घडली आहे. याप्रकरणी लोणंद पोलिसांनी दोन जणांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे, तर मुख्य आरोपी फरार आहे.
घटनाक्रम:
लोणंद पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आदर्की खुर्द येथील दत्तात्रेय उर्फ काका व्यंकट निंबाळकर याच्या प्रेमसंबंधांबाबत गावातीलच रत्नशिव निंबाळकर हा बदनामी करत असल्याचा संशय आरोपी दत्तात्रेयला होता. या रागातून त्याने आपल्या साथीदार विनोद महादेव राक्षेच्या मदतीने रत्नशिव निंबाळकरच्या हत्या करण्याचा कट रचला.
ता. १२ रोजी सकाळी सव्वा दहा वाजता आदर्की बुद्रूक ते आदर्की खुर्द मार्गावर, राजेंद्र भालेराव जाधव यांच्या बांधकाम सुरू असलेल्या घरासमोर आरोपींनी रत्नशिवच्या दुचाकीला (MH-47-V-0549) पाठीमागून कार (MH-26-BX-6546) ने जोरदार धडक देऊन तोल जाऊन पडण्यास भाग पाडले. अपघातानंतर विनोद राक्षेने रत्नशिवला धरून ठेवले, तर दत्तात्रेय उर्फ काका निंबाळकरने धारदार कोयत्याने त्याच्या डोक्यावर आणि हातावर सपासप वार करून त्याचा निर्घृण खून केला.
या घटनेबाबत मृत रत्नशिव निंबाळकर यांचा भाऊ कमलेश संभाजी निंबाळकर (वय ३६, रा. आदर्की खुर्द) यांनी लोणंद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिस तपास व कारवाई:
लोणंद पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून आरोपी विनोद महादेव राक्षे यास अटक केली आहे. त्याला आज फलटण न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला २५ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. दरम्यान, मुख्य आरोपी दत्तात्रेय उर्फ काका निंबाळकर फरार असून, त्याचा शोध सुरू आहे.
घटनास्थळी फलटण उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांनी भेट दिली असून, पुढील तपास लोणंद पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशिल भोसले करत आहेत.

Success Story: आपल्या लेकीने आयुष्यात मोठ्या पदावर काम करावं, खूप नाव कमवावं असं प्रत्येक वडिलांना वाटत असतं. समाज आपल्याला आपल्या लेकीमुळे ओळखतो, ही वडिलांसाठी अभिमानाची गोष्ट असते. अशाच एक मेहनती वडिलांच्या जिद्दी लेकीची ही कहाणी आहे. या लेकीने आपल्या कर्तृत्वाने आपल्या वडिलांचे नाव रोशन केलं. आयएएस रुपल राणा यांची प्रेरणादायी कहाणी आपण जाणून घेणार आहोत. आयुष्यात आलेल्या सर्व आव्हानांना न जुमानता त्यांनी आपले आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण केले. रुपल यांचे वडील दिल्ली पोलिसात असिस्टंट सब इन्स्पेक्टर म्हणून काम करत आहेत. ज्यांना त्यांच्या मुलीच्या यशाचा अभिमान वाटतो.
रूपल राणा या मूळच्या उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील आहेत. त्यांनी UPSC नागरी सेवा परीक्षा 2024 मध्ये उत्तीर्ण केली. या परीक्षेत त्यांनी ऑल इंडिया 26 वा क्रमांक मिळवून इतिहास रचला. काहीतरी चांगले करण्याची इच्छा असेल, त्याला प्रामाणिकपणा,मेहनतीची जोड असेल तर तुम्ही अडचणींवर मात करुन मोठे यश मिळवू शकता हे रुपल यांची कहाणी वाचून लक्षात येईल.
रुपल यांनी बागपत येथील जेपी पब्लिक स्कूलमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. हायस्कूलच्या परीक्षेत त्यांना 10 सीजीपीए गुण मिळाले. यानंतर त्यांनी बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स, पिलानी येथून अकरावी आणि बारावीचे शिक्षण पूर्ण केले. मग त्यांनी बी.एस्सी केले. दिल्ली विद्यापीठाच्या देशबंधू कॉलेजमधून. पदवी पूर्ण केली. जिथे रूपल विद्यापीठात टॉपर ठरल्या होत्या.
रुपलं यांच्या लहानपणीच आईचे निधन झाले. त्यामुळे आयुष्यात त्यांना आईचे प्रेम मिळाले नाही. असे असले तरी वडिलांनी त्यांना ही कसर कधी जाणवू दिली नाही. त्यांचे वडील जसवीर राणा हे दिल्ली पोलिसात असिस्टंट सब-इन्स्पेक्टर म्हणजे एएसआय आहेत. त्यांनी रुपलला खूप आधार दिला. तसेच भाऊ-बहिणींनीही त्यांना पाठिंबा दिला. रुपल यांनी स्वत:च्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केले आणि यश मिळवले. वैयक्तिक आयुष्यात आलेल्या दुःखाने त्या खचून गेल्या नाही. त्यांना त्याला स्वत: च्या शक्तीत रुपांतरीत केले.
रुपल यांना यश सहजासहजी मिळाले नाही. रुपल यांना पहिल्या दोन प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत अपयश हाती आले. पण त्यांनी हार मानली नाही. चुकांमधून त्या शिकत गेल्या आणि त्यांनी स्वत:च्या धोरणात सुधारणा केली.
अखेर रुपल यांना त्यांच्या दृढनिश्चय आणि कठोर परिश्रमाचे फळ मिळाले. त्यांनी तिसऱ्या प्रयत्नात परीक्षा उत्तीर्ण केली आणि आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण केले. त्यांनी 2024 च्या यूपीएससी परीक्षेत 26 वा क्रमांक मिळवला.
रुपल राणा यांच्या यशाची कहाणी जगभरातील लाखो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. कौटुंबिक मूल्ये, समर्पण आणि घरी सहाय्यक वातावरण असेल तर यश मिळते, ते या कहाणीतून कळते.


बॉलीवूड अभिनेता अभय देओल मागील काही वर्षांपासून मोठ्या पडद्यापासून दूर आहे. अभय इंडियन एक्सप्रेसच्या ‘द सुवीर सरन शो’मध्ये हजेरी लावणार आहे. या मुलाखतीत तो देओल या आडनावाबरोबरचं वलय, अभिनयक्षेत्रात येण्याचा विचार आणि स्टारडम याबद्दल बोलणार आहे. अभयची ही मुलाखत पाहा लाइव्ह…
