Tuesday, July 28, 2026
Home Blog Page 476

संतनगरी शेगावात दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी पाच युवकांना…

0
संतनगरी शेगावात दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी पाच युवकांना…



shegaon police detained five youths for uploading objectionable content to incite community tension || संतनगरी शेगावात दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी पाच युवकांना…





Source link

Lakshmi Niwas actors and actress dance on Zapuk Zupuk song

0
Lakshmi Niwas actors and actress dance on Zapuk Zupuk song



Lakshmi Niwas actors and actress dance on Zapuk Zupuk song | Video: ‘लक्ष्मी निवास’ मालिकेतील कलाकारांचा ‘झापुक झुपूक’ गाण्यावर जबरदस्त डान्स, शांता आजीने वेधलं सगळ्यांचं लक्ष





Source link

Maharashtra Election News LIVE March 23, 2025: शरद पवारांनी घेतली पुतण्या अजित पवारांची भेट; संजय राऊतांनी साधला निशाणा, म्हणाले..

0
Maharashtra Election News LIVE March 23, 2025: शरद पवारांनी घेतली पुतण्या अजित पवारांची भेट; संजय राऊतांनी साधला निशाणा, म्हणाले..


Maharashtra Election 2024 News LIVE: शरद पवारांनी घेतली पुतण्या अजित पवारांची भेट; संजय राऊतांनी साधला निशाणा, म्हणाले..

Maharashtra Election 2024 News LIVE: शरद पवारांनी घेतली पुतण्या अजित पवारांची भेट; संजय राऊतांनी साधला निशाणा, म्हणाले..(HT_PRINT)

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Sun, 23 Mar 202511:11 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: शरद पवारांनी घेतली पुतण्या अजित पवारांची भेट; संजय राऊतांनी साधला निशाणा, म्हणाले..

  • शिवसेना (उबाठा) नेते पक्ष सोडून गेलेल्यांशी कोणताही संपर्क ठेवत नाहीत, असे राऊत म्हणाले. त्यांचा पक्ष महाविकास आघाडीचा भाग आहे, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेससोबत शिवसेना ठाकरे गट विरोधी आघाडीत सामील आहे.


Read the full story here





Source link

शरद पवारांनी घेतली पुतण्या अजित पवारांची भेट; संजय राऊतांनी साधला निशाणा, म्हणाले..

0
Maharashtra Election News LIVE March 23, 2025: शरद पवारांनी घेतली पुतण्या अजित पवारांची भेट; संजय राऊतांनी साधला निशाणा, म्हणाले..


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये त्यांचे पुतणे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांचे सहकारी आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांनी या भेटीवर तीव्र प्रतिक्रिया दिली. शिवसेना (उबाठा) नेते पक्ष सोडून गेलेल्यांशी कोणताही संपर्क ठेवत नाहीत, असे राऊत म्हणाले. त्यांचा पक्ष महाविकास आघाडीचा भाग आहे, त्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट आणि कॉंग्रेसही सामील आहेत.



Source link

डॉ. आंबेडकर यांनाही धर्मावर आधारित आरक्षण मान्य नव्हते, मुस्लिम आरक्षणाला RSS चा विरोध

0
डॉ. आंबेडकर यांनाही धर्मावर आधारित आरक्षण मान्य नव्हते,  मुस्लिम आरक्षणाला RSS चा विरोध


हिंदूंच्या घरांवर व मंदिरांवर हल्ले –

मठ, मंदिरांवरील हल्ले, देवी-देवतांची विटंबना, मालमत्तेची लूट आणि बळजबरीने धर्मांतर करणे निंदनीय आहे, परंतु संस्थात्मक उदासीनता आणि सरकारच्या निष्क्रियतेमुळे गुन्हेगारांना बळ मिळाले आहे, असे कुमार म्हणाले. बांगलादेशात हिंदूंच्या लोकसंख्येत सातत्याने होत असलेल्या घसरणीबाबत अरुण जी म्हणाले की, १९५१ मध्ये हिंदूंची लोकसंख्या २२ टक्क्यांवरून आज केवळ ७.९५ टक्क्यांपर्यंत घसरणे हे संकटाचे गांभीर्य दर्शवते. हिंदूंचा, विशेषत: अनुसूचित जाती-जमातींचा ऐतिहासिक छळ हा एक सततचा मुद्दा आहे. मात्र, गेल्या वर्षी संघटित हिंसाचार आणि सरकारी निष्क्रियतेचे प्रमाण चिंताजनक आहे.



Source link

दिल्लीतील डिअर पार्कमधील झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले तरुण-तरुणीचे मृतदेह, परिसरात खळबळ

0
दिल्लीतील डिअर पार्कमधील झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळले तरुण-तरुणीचे मृतदेह, परिसरात खळबळ


झाडाला लटकलेल्या मुलाची आणि मुलीची ओळख पटली आहे. दीपक असे मृत तरुणाचे नाव असून त्याचे वय २१ वर्षे असून तो दिल्लीतील झोपडपट्टी क्रमांक ५, पिलांजी गाव, घर क्रमांक १७११ मध्ये राहत होता. भाऊ गणेश यांनी सांगितले की, दीपक काल दुपारी दोनच्या सुमारास घरातून निघाला. दीपक लोधी कॉलनीतील एका पिझ्झा शॉपमध्ये कामाला होता. मुलीचे वय १८ वर्षे असून तिचे नाव सिरजना आहे. ही मुलगी घर क्रमांक १७२, गल्ली नंबर 1, छतरपूर एन्क्लेव्ह, फेज 2, छतरपूर, दिल्ली येथील रहिवासी आहे. तिची बहीण सपना हिने सांगितले की, सिरजना गेल्या तीन दिवसांपासून एसजेईच्या हुमायूंपूर गावात आपल्या मावशीकडे राहत होती. कामानिमित्त छतरपूर एन्क्लेव्हयेथे जाण्याच्या उद्देशाने ती काल दुपारी दोनच्या सुमारास मावशीच्या घरातून निघाली होती.



Source link

अजब! दारु पिऊन गाडीत बसला म्हणून पोलिसांनी प्रवाशाला ठोकला 1000 रुपयांचा दंड; पोस्ट व्हायरल

0
अजब! दारु पिऊन गाडीत बसला म्हणून पोलिसांनी प्रवाशाला ठोकला 1000 रुपयांचा दंड; पोस्ट व्हायरल


मद्यपान केलेल्या एका चालकाना पोलिसांनी 1000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. विशेष म्हणजे चालक गाडी चालवत नसतानाही पोलिसांनी त्याला दंड ठोठावला. चालकाने Reddit वर सगळा घटनाक्रम शेअर केला आहे. ‘गोरेगावमध्ये ड्रिकिंग अँड ड्रायव्हिंग, काल रात्री पोलिसांनी माझी कार अडवली’, असं चालकाने पोस्टमध्ये सांगितलं आहे. 

चालकाने पोस्टमध्ये लिहिलं आहे की, पार्टीमधून परतत असताना पोलिसांनी कार रोखली. आपण खूप संतापलो होतो हे मान्य करताना त्याने आपला वैयक्तिक ड्रायव्हर गाडी चालवत होता असं सांगितलं. ड्रायव्हरची अनेक वेळा तपासणी करण्यात आली आणि तो व्यवस्थित असल्याचं आढळलं. गाडीत दारू सापडली नाही आणि चालक गाडी चालवण्यास योग्य असूनही, पोलिसांनी त्याला फक्त प्रवासी म्हणून मद्यधुंद असल्याबद्दल 1000 रुपये दंड ठोठावला, असा दावा त्याने केला आहे. 

“त्यांनी मला विचारले की मी मद्यपान केलं आहे का, जे स्पष्ट दिसत होतं आणि खरं होतं. मी एका पार्टीतून परतत असताना त्यांनी गाडीत दारु आहे का याची तपासणी केली. दारू पिऊन आल्याबद्दल त्यांनी मला 1 हजारांचा दंड ठोठावला,” असं त्याने लिहिलं आहे. पोस्टच्या शेवटी प्रवाशाने विनोदी पद्धतीने कबुली देत पोस्ट संपवली आहे. “जर ते अर्थपूर्ण नसेल तर माफ करा, मला आत्ताच डोकेदुखी होत आहे,” असं त्याने पोस्टच्या अखेरीस लिहिलं. काही वेळातच ही पोस्ट व्हायरल झाली. 

या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत आपली मतं मांडली आहेत. “काय? ते तुला दंड कसा काय ठोठावू शकतात? मग लोकांनी बारमध्ये कसं जायचे?” यावर, त्याने उत्तर दिलं की, “मी गोंधळलो आहे, हे मॉरल पोलिसिंगसारखे दिसते. त्यांनी माझ्यावर दारू प्यायल्याचा आरोप केला.” 

एका युजरने स्वतःचा अनुभव सांगताना म्हटलं की, “मी थोडंसं मद्यपान केलं होतं आणि गुडगावमध्ये मला थांबवण्यात आले. मी मद्यपान करत असल्याचे मान्य केले आणि माझ्याकडे पैसे नसल्याचे सांगितले. त्यांनी माझ्या नंबर प्लेट आणि फोन स्क्रीनचा फोटो काढला आणि मला जाऊ दिले. ऑनलाइन चलन मिळाले नाही. मागच्या सीटवर बसून मद्यपानाचे पैसे कोण देते? पोलिसांनी तुम्हाला फसवलं”. 

मोटार वाहन कायद्याच्या कलम 185  नुसार, दारू किंवा ड्रग्जच्या प्रभावाखाली वाहन चालवणे हा दंडनीय गुन्हा आहे. पहिल्या गुन्ह्यासाठी 6 महिन्यांपर्यंत तुरुंगवास किंवा 10 हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी, शिक्षा 2 वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा 10 हजार रुपये दंड किंवा दोन्ही होऊ शकते. 





Source link

भारतातील अनोखे गाव, इथं मुलांना लग्नासाठी मुलीच मिळेनात, शाळेत फक्त 5 मुलं

0
भारतातील अनोखे गाव, इथं मुलांना लग्नासाठी मुलीच मिळेनात, शाळेत फक्त 5 मुलं


Village of Bachelors In India:  लग्न करताना मुली फक्त मुलांच्या स्वभावाती गुण-दोष नाहीतर त्याच्या कुटुंबांची आणि मुलगा कुठे राहतो, त्याचे घर कसं आहे. याचीही संपूर्ण चौकशी करतात. नंतरच लग्नाची चर्चा पुढे जाते. कधी कधी लग्न न करण्याची अनेक कारण असतात. मग तो मुलाचा किंवा मुलीचा स्वभाव असो किंवा घरातील परिस्थिती. पण तुम्ही कधी एकलंय का, की या गावातील मुलांना लग्नासाठी कोणी मुलगीच देत नाहीये. भारतात असं एक गाव आहे जिथे लग्नासाठी मुलांना कोणी मुलीच द्यायला तयार नाही. त्यामुळं या गावाचे नाव Village of Bachelors असं पडलं आहे. कर्नाटक राज्यातील हावेरी जिल्ह्यातील जोंदालगट्टी असं या गावाचे नाव आहे.

केरळच्या जोंदालगट्टी गावातील मुलांसाठी लग्न करणे ही खूप मोठी समस्या असल्यासारखे वाटते. कारण मुली आणि त्यांच्या कुटुंबातील लोकही या गावाशी नातं जोडण्यास तयार नाहीत. आता तुम्ही विचार करत असाल की गावात नेमकं असं काय आहे की, मुली त्या गावातील मुलांना लग्नासाठी नकार देतात. तर या मागे कारण आहे ते गावाचा न झालेला विकास. 

या गावात आरोग्या सेवा, रस्ते, सुविधा आणि अन्य गरजेच्या व्यवस्था नाहीत. त्यामुळं लग्नासाठी कोणीही या गावात यायला तयार नाही. या गावात जवळपास 200 लोकांची लोकसंख्या आहे. तर, जवळपास 20 तरुण लग्नाचा प्रयत्न करत आहेत. मात्र अजूनही त्यांना कोणतीही मुलगी लग्नासाठी भेटली नाहीये. 

गेल्या कित्येक वर्षांपासून या गावातील तरुणांची लग्नच होत नाहीयेत. त्याचा परिणाम या गावच्या भविष्यावर पडण्याची शक्यता आहे आणि त्याची सुरुवातदेखील झाली आहे. कारण गावात मुलं जन्मच घेत नसल्याने शाळेत या वर्षी कोणीही नव्याने दाखल झालेले आहे. शाळेत फक्त 5 मुलं आहेत तर आंगणवाडी ओस पडलेली आहे. 

एका रिपोर्टनुसार, जोंदालगट्टी गावात सर्वाधीक मराठा समाजाचे लोक राहतात. यातील 41 घरांपैकी 31 कुटुंब मराठा समाजाचे आहेत. तर, ओबीसी समाजातील ही काही घरे आहेत. लग्नाच्या या समस्येवर तोडगा काढण्यासाठी गावातील काही तरुणांनी अलीकडेच आमदार यासिर अहमद पठाण यांच्या जनसंवाद बैठकीत चिंता व्यक्त केली होती. 

एका रिपोर्टनुसार, आमदारांसोबत झालेल्या भेटीदरम्यान, गावकऱ्यांनी सांगितले की, गावातून मुख्य रस्त्यावर जाण्यासाठी जंगलातून जावे लागते. जरी काही दिवसांपूर्वी तिथे बस सेवा सुरू झाली असली तरी ती फक्त सकाळीच उपलब्ध असते आणि संध्याकाळी परत येते. गावातील तरुणांची आर्थिक स्थिती चांगली असली तरी गावाची वाईट परिस्थिती पाहून मुली लग्न करण्यास नकार देतात.





Source link

श्रीराम कारखान्यावर आरोप निराधार – संजीवराजे नाईक निंबाळकर

0
श्रीराम कारखान्यावर आरोप निराधार – संजीवराजे नाईक निंबाळकर

सभासदांची दिशाभूल करून सत्ता हस्तगत करण्याचा विरोधकांचा प्रयत्न फसणार

फलटण – जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखाना गेल्या १५-१६ वर्षांपासून श्रीराम सहकारी साखर कारखाना चालवत आहे. त्यामुळे श्रीराम संचालक मंडळाकडे कोणतेही आर्थिक अधिकार नाहीत. आर्थिक गैरव्यवहार किंवा घोटाळे करण्याची संधीच नसल्याचे विरोधकांनाही ठाऊक आहे. मात्र, खोटे आरोप करून सभासदांची दिशाभूल करत निवडणूक जिंकण्याचा डाव आखला जात आहे. मात्र, श्रीरामचे सभासद सुज्ञ, अभ्यासू आणि जाणकार आहेत. त्यामुळे विरोधकांचा हा डाव यशस्वी होणार नाही, असा ठाम विश्वास श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केला.

श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या लक्ष्मी विलास पॅलेस येथे आयोजित पत्रकार परिषदेत या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, ज्येष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, निवृत्त सनदी अधिकारी विश्वासराव भोसले आणि ॲड. नरसिंह निकम यांनी पत्रकार परिषद घेऊन केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी ही परिषद घेण्यात आली होती. यावेळी युवराज ॲड. श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, श्रीरामचे चेअरमन डॉ. बाळासाहेब शेंडे, व्हा. चेअरमन नितीन शाहूराज भोसले आणि संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

श्रीराम-जवाहरचे आर्थिक ताळेबंद स्पष्ट

श्रीराम जवाहर शेतकरी सहकारी साखर उद्योगच्या नावाने गाळप परवाना मिळालेला होता. साखर पोत्यांवर त्या संस्थेचे नाव होते. ताळेबंद आणि नफा-तोटा पत्रक देखील त्या संस्थेचेच होते. मात्र, सभासदांची दिशाभूल करण्यासाठी चुकीचे आरोप करण्यात आले. सर्व संबंधित कागदपत्रे पत्रकारांना दाखवत हे आरोप निराधार असल्याचे डॉ. बाळासाहेब शेंडे यांनी स्पष्ट केले.

श्रीरामचा आर्थिक डोलारा आणि जबाबदारी

श्रीराम सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीत गेला होता. त्याचे नक्त मूल्य कमी असल्याने कोणत्याही बँकेने अर्थसहाय्य करण्यास नकार दिला. त्यामुळे संचालक मंडळाला हा कारखाना चालविणे शक्य झाले नाही. सहकार खाते आणि मंत्री समितीच्या मान्यतेने वस्तुस्थिती समजावून सांगून श्रीराम कारखाना चालविण्यास देण्यात आला. मात्र, सभासदांना एफआरपीनुसार ऊसदर आणि कामगारांना नियमानुसार पगार मिळेल याची पूर्ण दक्षता घेतली गेली असल्याचे संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

गाळप क्षमतेबाबत दिशाभूल करणारे आरोप

गाळप क्षमता वाढविताना जुन्या मशीनरीचा विस्तार केला जातो. त्यात बॉयलर आणि मिलसारखी यंत्रणा जुन्या सेटअपवर आधारीत असते, मात्र, काही भाग नवा बसवावा लागतो. प्रतिदिन २,५०० मेट्रिक टन गाळप होत होते, ते आता ४,५०० ते ५,००० मेट्रिक टनांपर्यंत वाढले आहे. आगामी काळात गाळप क्षमता १०,००० मेट्रिक टनांपर्यंत जाईल, अशी खात्रीही संजीवराजे यांनी दिली.

मतदार यादीत कोणतीही त्रुटी नाही

संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेली मतदार यादी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था आणि साखर संचालकांनी तपासून मान्य केली आहे. विरोधकांनी मयत सभासदांचे वारस, शेअर्सची रक्कम पूर्ण असणे आणि जमिनीच्या नावावर सभासद असणे यासंदर्भात आक्षेप घेतले आहेत. मात्र, कोणाचाही मतदानाचा हक्क डावललेला नाही. मयत सभासदांच्या वारस नोंदीसाठी आवश्यक कागदपत्रे मिळताच ती प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

एफआरपीपेक्षा अधिक ऊसदर आणि वेळेवर पेमेंट

माळेगाव आणि सोमेश्वर साखर कारखान्यांच्या ऊस दराशी तुलना करताना, श्रीरामने नेहमी एफआरपीपेक्षा अधिक दर दिला आहे. यावर्षी संपूर्ण गाळप हंगाम संपताच ऊस उत्पादक, तोडणी कामगार आणि वाहतूकदार यांना संपूर्ण पैसे वेळेत अदा करण्यात आले आहेत. कामगारांचे पगारही नियमाप्रमाणे दिले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

श्रीराम सभासदांच्याच मालकीचा

श्रीराम कारखाना सभासदांच्याच मालकीचा आहे आणि भविष्यातही राहील. करार संपल्यानंतरही विस्तार केलेली संपूर्ण मशीनरी श्रीरामच्या मालकीची असेल आणि कोणतेही कर्ज किंवा बोजा कारखान्यावर राहणार नाही. त्यामुळे विरोधकांनी खोटे आरोप करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करु नये, असे संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी ठणकावून सांगितले.

फलटण दूध संघाला ऊर्जितावस्था देणार

फलटण तालुका दूध संघ अद्याप कार्यरत आहे, आणि त्याला अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील अनेक सहकारी दूध संघ बंद पडले असताना, फलटण दूध संघ टिकून आहे. लवकरच या संघाला अधिक मजबूत करण्याचे आश्वासन संजीवराजे यांनी दिले.

नवीन संस्था उभारण्यापेक्षा जुन्यांचे पुनरुज्जीवन अधिक कठीण

श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी आजोबांनी उभारलेल्या संस्थांना सशक्त करण्याचे काम केले आहे. मोटार मालक सहकारी संस्थेची उलाढाल कोट्यवधींची असून, अनेकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. श्रीराम साखर कारखाना, फलटण दूध संघ, साखरवाडी कारखाना आणि ग्रामविकास सोसायट्या पुन्हा उभारण्यासाठी मोठ्या मेहनतीची गरज होती. नवीन संस्था उभारण्यापेक्षा जुन्या संस्थांचे पुनरुज्जीवन अधिक कठीण असते, असे संजीवराजे यांनी स्पष्ट केले.

प्रियकराचं ऐकून सासऱ्याला विष देऊन केलं ठार, एका महिन्यानंतर पोलीस स्टेशन गाठलं; म्हणाली…; अधिकारी चक्रावला

0
प्रियकराचं ऐकून सासऱ्याला विष देऊन केलं ठार, एका महिन्यानंतर पोलीस स्टेशन गाठलं; म्हणाली…; अधिकारी चक्रावला


बिहारच्या मुझफ्फरपूर येथे एका महिलेने प्रियकराच्या सांगण्यावरुन आपल्या सासऱ्याची हत्या केली. सूनेने सासऱ्याच्या जेवणात विष मिसळून त्याला ठार केलं होतं. मात्र हत्येच्या एका महिन्यानंतर तिने एसएसपी ऑफिस गाठलं आणि आपला गुन्हा कबूल केला. आपल्याला प्रियकराने विष आणून दिलं होतं असं तिने पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी महिलेला अटक केली असून, पुढील कारवाई सुरु केली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, 23 फेब्रुवारीला करजा पोलीस ठाण्याच्या गोपालपूर गावातून 55 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला होता. याप्रकरणी मृत प्रकाश पासवान यांची सून सोनी कुमारी यांनी सासऱ्यांना विष दिल्याचं कबूल केलं आहे. मृत प्रकाश पासवान यांचा मुलगा आणि इतर लोकही एसएसपी कार्यालयात पोहोचले होते. त्यांनी आरोपी सूनेविरोधात कडक कारवाईची मागणी केली आहे. 

सोनी कुमारीने आपल्या कबुली जबाबात म्हटलं आहे की, तिचे गावातील एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. प्रियकराने तिच्याशी बोलण्यासाठी मोबाईल खरेदी करुन दिला होता. सासऱ्यांना मारण्यासाठी प्रियकरानेच विष आणून दिलं होतं. हे विष नंतर जेवणात मिसळण्यात आलं. 

मृत व्यक्तीच्या मुलाने सांगितलं आहे की, तो आसाममध्ये गाडी चालवण्याचं काम करतो. घऱी पत्नी आणि वडील राहत होते. गावातील एका तरुणाशी तिचे प्रेमसंबंध जुळले होते. प्रियकराच्या सांगण्यावरुन पत्नीने माझ्या वडिलांनी हत्या केली आहे. 

याप्रकरणी एसपी ग्रामीण विद्यासागर यांनी सांगितलं की, काही दिवसांपूर्वी करजा परिसरात एक व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. पहिल्या दिवसापासून हे प्रकरण संशयास्पद होतं. याचं कारण विषाचं सेवन झाल्याने मृत्यू झाला होता. काल अचानक सूनेने येऊन मीच विष दिल्याचं मान्य केलं. राणा पासवान नावाच्या व्यक्तीने विष आणून दिलं होतं. तो महिलेचा प्रियकर आहे. आधी महिलेने आपल्या प्रियकराविरोधात तक्रार दाखल केली आणि नंतर आपला गुन्हा मान्य केला. तिला अटक करण्यात आली आहे. 





Source link