Tuesday, July 28, 2026
Home Blog Page 473

Satara : मोबाईलवर 5G नेटवर्क शोधत आजोबा जंगलात शिरले, कोअर झोनमध्ये पाय ठेवताच अस्वलाचा हल्ला

0


Satara Bear attack : कोयना विभागातील अतिदुर्गम व चांदोली अभयारण्याच्या कोअर झोनमधील कोळणे गावात एका वृध्दावर अस्वलाने हल्ला करून त्यांना गंभीररित्या जखमी केल्याची घटना घडली आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यात वृद्ध व्यक्ती गंभीर जखमी झाले असून त्याच्यांवर सध्या कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. अर्जुन मानू डांगरे (वय 80) असे जखमी वृद्धाचे नाव आहे. सध्या सर्वत्र 5G नेटवर्क मिळत असताना पाटण तालुक्यात नेटवर्क मिळत नसल्याने रेंजच्या शोधात असलेल्या वृध्दावर या अस्वलाने जीवघेणा हल्ला केल्याची माहितीपुढे आली आहे.

कोअर झोनमध्ये पाय ठेवताच अस्वलाचा हल्ला, डोक्याला गंभीर दुखापत

दरम्यान, वन्यप्राण्यांच्या ग्रामस्थांवरील वाढत्या हल्ल्यामुळे नागरीकांमध्ये चांगलेच भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या हेळवाक वनपरिक्षेत्रातील अतिदुर्गम ठिकाणी वसलेल्या कोळणे येथील अर्जुन डांगरे हे मोबाईलला रेंज येत नसल्या कारणाने मोबाईलला नेटवर्क असलेल्या ठिकाणी फोन करण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी त्यांच्यावर अचानक अस्वलाने हल्ला चढवत त्यांना गंभीररित्या जखमी केले. या हल्ल्यात डांगरे यांच्यावर हातावर व डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. यावेळी ग्रामस्थांनी आरडाओरडा केल्यानंतर अस्वलाने तेथून धूम ठोकली.

कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु,  प्रकृती नाजूक

या घटनेची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी वनविभागाला दिल्यानंतर ग्रामस्थ व वन्यजीव विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी अर्जुन डांगरे यांना तात्काळ उपचारासाठी हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर अधिक उपचारासाठी कराड येथील कृष्णा रुग्णालयात हलविण्यात आले. अस्वलाच्या हल्ल्यात अर्जुन डांगरे यांच्या हातावर व डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांची प्रकृती नाजूक असल्याचे समजत आहे.

गोंदियाच्या देवरी तालुक्यातील लेंडीजोबच्या जंगलात झाडावर अस्वलाचे दर्शन 

गोंदियाच्या देवरी तालुक्यातील लेंढीजोबच्या जंगलात गावातील काही नागरिकांना झाडावर अस्वलीचे दर्शन झाले. सध्या मोहपूल वेचण्याच्या हंगाम सुरू असून लेंढीजोब गावातील नागरिक मोहफुल वेचण्याकरिता जंगलात जात असताना अस्वल झाडावर चढल्याचे दिसले. परिसरातील आजूबाजूच्या गावातील नागरिकांना याची माहिती मिळताच जंगल परिसरात बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. तर काही नागरिकांनी त्याचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

हे ही वाचा 

अधिक पाहा..



Source link

Meerut Murder Case : हावभाव, हातवारे… आणि बेधुंद नाच; नव्या व्हिडीओतून मुस्कान- साहिलचे खरे ‘रंग’ समोर

0
Meerut Murder Case : हावभाव, हातवारे… आणि बेधुंद नाच; नव्या व्हिडीओतून मुस्कान- साहिलचे खरे ‘रंग’ समोर


Meerut Murder Case : संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या सौरभ राजपूत हत्याकांड अर्थात मेरठ हत्याकांड प्रकरणात दर दिवशी एक नवा खुलासा होत असून त्यातच आता एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये दिसणारी दृश्य अनेकांना विचलित करत असून, कृर वृत्तीच्या मुस्कान आणि साहिलचे खरे असुरी रंग इथं दिसत आहेत. 

काही सेकंदांच्या या व्हिडीओमध्ये मुक्सान आणि तिचा प्रियकर साहिल एके ठिकाणी पार्टी करताना दिसत असून ते बेधुंद असल्याचं पाहताक्षणी लक्षात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार हा व्हिडीओ हिमाचल प्रदेशातील कसो इथला असून, मुस्काननं पती सौरभची हत्या केल्यानंतर ती आणि साहिल थेट हिमाचल प्रदेशला पोहोचल्याचं म्हटंल जात आहे. 

14 मार्च रोजी या दोघांनीही तिथंच होळी साजरी केली आणि या पार्टीदरम्यान एका क्लबमध्ये नशेच्या अधीन असणाऱ्या या निर्दयी जोडीनं विचित्र हावभाव, हातवारे, नाच केल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. आजुबाजूला असणाऱ्या गर्दीचाही या दोघांवर फारसा फरक पडतान दिसत नाही हेच व्हिडीओतून स्पष्ट होत असून या व्हिडीओनंतर आता अनेकांनीच संताप व्यक्त करत मुस्कान आणि साहिलला कठोर शिक्षा करण्यात यावी अशीच मागणी केली आहे. 

मेरठ हत्याकांड प्रकरणातील महत्त्वाच्या नोंदी… 

  • मुस्काननं साहिलच्या मदतीनं 3 मार्च रोजी पती सौरभ राजपूतची हत्या केली. 
  • सौरभच्या मृतदेहाचे तुकडे करत त्यांनी एका ड्रममध्ये हे तुकडे टाकत त्यावर सिमेंट ओतून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. 
  • यानंतर मुस्कान आणि साहिल हिमाचल प्रदेशात सुट्ट्यांसाठी गेले. 
  • दोघांनीही मिळून सौरभच्या कुटुंबाला मेसेज करत त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. 
  • 18 मार्च रोजी मुस्काननं आपल्या आईसमोर या गुन्ह्याची कबुली दिली ज्यानंतर पोलिसांनी साहिल आणि मुस्कानला अटक करत त्यांची रवानगी मेरठ कारागृहात केली. 

याआधीही व्हायरल झालेला डान्स व्हिडीओ… 

हे प्रकरण उघडकीस आल्या क्षणापासून सोशल मीडियावर आरोपींचे काही व्हिडीओ समोर आले होते. यामधील एका व्हिडीओमध्ये मुस्कान साहिलला केक भरवताना दिसली. त्याआधी होळी साजरा करताना चेहऱ्यावर रंग लागलेले आरोपींचे फोटोसुद्धा समोर आले होते. दरम्यान, हिमाचलच्या प्रवासादरम्यान मुस्कान आणि साहिलला तिथं फिरवणाऱ्या कॅब चालकानंही या जोडीसंदर्भात धक्कादायक माहिती दिली. 

जिथं त्यांच्या मद्यपानापासून साहिलच्या वाढदिवसाची केक खरेदी आणि मुस्कानला घरून येणारे फोन इथपर्यंतचा खुलासा कॅब चालकानं केल्याचं म्हटलं जातं. साहिल आणि मुस्कान मद्याच्या आहारी गेल्याची धक्कादायक बाब इथं समोर आली असून आता याप्रकरणात पुढं कोणती कारवाई होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. 





Source link

उच्च न्यायालयाबाहेरच अंधश्रद्धा निर्मूलनालाच आव्हान, इमारतीबाहेर करणीचे प्रयोग

0
उच्च न्यायालयाबाहेरच अंधश्रद्धा निर्मूलनालाच आव्हान, इमारतीबाहेर करणीचे प्रयोग



Ambadas Danve मुंबई पोलीस हे बेटिंगला सहकार्य करत आहेत. त्याचे पुरावे पेन ड्राईव्हमध्ये आहेत असं म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी एक पेन ड्राइव्ह अध्यक्षांना दिला आहे. तसंच मुंबई पोलिसांच्या उपस्थितीत पाकिस्तानी खेळाडूंशी संपर्क केला जातो आहे. बेटिंगमध्ये अनेक पोलीस अधिकारी आहेत असा गंभीर आरोप दानवे यांनी केला आहे.

अंबादास दानवेंचा आरोप काय?

माझ्याकडे अनेक फसवणुकीच्या घटना आहेत, खालच्या सभागृहात बेटिंग अॅपबाबतही बोलणं झालं आहे. मी एक पेन ड्राइव्ह आपल्याला देत आहे. क्रिकेट बेटिंग अॅप आहे लोटस २४ नावाचं. यामध्ये मेहुल जैन, हिरेश जैन, कमलेश जैन हे लोक सातत्याने बेटिंग करतात. पाकिस्तानातील खेळाडूंशी हे संपर्क ठेवून आहेत. खुलेआमपणे बेटिंग चालतं. मुंबई पोलिसांमधल्या मोठ्या अधिकाऱ्यांसह बैठक होते. चॅम्पियन्स ट्रॉफी संपली आता आयपीएलसाठी मुंबईत ही मंडळी काम करत आहेत. पेन ड्राइव्ह ऐका म्हणजे पाकिस्तानातल्या लोकांशी बोलताना काय केलं आहे ते कळेल. कुठल्या पोलीस अधिकाऱ्यांची नावं आहेत ते पण कळेल. अशा पद्धतीने पोलिसांच्या सहकार्याने राज्यात बेटिंगसारख्या घटना घडत आहेत. असा गंभीर आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे.

पोलीस अधिकारी सत्ताधाऱ्यांची हुजरेगिरी करण्यात गुंतले आहेत-अंबादास दानवे

राज्यातील कायदा आणि सु्व्यवस्थेचा प्रश्न पाहिला तर पोलीस अधिकारी सत्ताधाऱ्यांची हुजरेगिरी करण्यात गुंतले आहेत असंही अंबादास दानवेंनी म्हटलं आहे. माझ्याकडे अनेक उदाहरणं आहेत. एका मंत्र्याच्या सांगण्यावरुन महिलेला कसं फसवलं जातं? महिलेने लाच स्वीकारली असेल पण मंत्र्यावर गुन्हा आहेच. पत्रकाराला अटक झाली पण मंत्र्यावर गुन्हा आहेच. पोलिसांचा वापर केला जातो आहे. पोलीस यंत्रणा व्यक्तिगत कामांसाठी मंत्री वापरत आहेत. राज्यातल्या विविध खात्यांमधले, मंत्र्यांचे गैरव्यवहार समोर येत आहेत. कसे गैरव्यवहार होतात ते समोर आलं आहे असंही अंबादास दानवेंनी म्हटलं आहे.

अहिल्यानगर या ठिकाणी काय घडलं?

महसूल विभागाची काही प्रकरणं आहेत. राज्य सरकारमधले मंत्री, आमदार कसे वागतात त्याचं उदाहरण देतो. अहिल्यानगर या ठिकाणी बऱ्हाणपूर नावाचं गाव आहे तिथे तुळजाभवानीचं मंदिर आहे, तिथे एक भगत नावाचे पुजारी आहेत. तसंच या ठिकाणी एक प्रवेशद्वार आहे याबाबत अनेकजण असं म्हणतात की अनेक पोथ्या, अख्यायनं यामध्ये त्याचा उल्लेख आहे. निवडणूक काळात या भागातले अभिषेक भगत हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या विचारांचे आहेत. त्यांनी त्या पक्षाचा प्रचार केला म्हणून कर्डिले नावाचे आमदार आहेत. त्यांनी हे प्रवेशद्वार आणि अंबिका भवन पाडलं, त्यासाठी महसूल विभागाला हाताशी धरलं होतं. हिंदुत्ववाद म्हणत असताना याकडे लक्ष द्यायची गरज आहे. कलेक्टरला फोन केला असता अनधिकृत बांधकामं अनेक आहेत असंही कळलं. जे विरोधात आहेत त्यांच्यावर कारवाई केली जाते असा प्रकार घडला आहे.



Source link

Who is Kunal Kamra? A look at comedian’s controversies over the years

0
Who is Kunal Kamra? A look at comedian’s controversies over the years


Kunal Kamra All Controversies : कुणाल कामरा वादात अडकण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही कुणाल कामरा वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. एकनाथ शिंदेंवर गाणं तयार केल्याने त्याने माफी मागावी अशी मागणी केली जाते आहे. मात्र कुणाल कामरा याआधीही वादग्रस्त कॉमेडी केल्याने अशाच प्रकारे कारवाईच्या चक्रव्यूहात अडकला आहे. जाणून घेऊ त्याबाबत.

कोण आहे कुणाल कामरा?

कुणाल कामरा हा एक स्टँड अप कॉमेडियन आहे. जाहिरात क्षेत्रात अकरा वर्षे काम केल्यानंतर कुणाल कामरा स्टँड अप कडे वळला. २०१७ मध्ये त्याने रमित वर्माच्या साथीने Shut Up Ya Kunal हे पॉडकास्ट सुरु केलं होतं. या कार्यक्रमात कुणाल कामरा सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते तसंच प्रसिद्ध व्यक्तींशी अनौपचारिक गप्पा मारत असे. त्यानंतर तो स्टँड अप करु लागला. वाद आणि कुणाल कामरा असं समीकरणच होऊन बसलं.

२०१८ मध्ये काय घडलं?

कुणाल कामरा हा त्याच्या राजकीय भूमिकांमुळे अनेकदा चर्चेत आला आहे. सोशल मीडियावरच्या त्याच्या काही पोस्टमुळे वादही निर्माण झाले. २०१८ मध्ये कुणालने त्याचं ट्विटर (आत्ताचं एक्स) अकाउंटच डिलिट केलं होतं. मुस्लिम, शीख आणि मदर तेरेसा यांच्याबद्दलचे काही ट्वीटस व्हायरल झाल्यानंतर कुणाल कामराने त्याचं ट्विटर अकाऊंट डिलिट केलं होतं आणि मुंबईतलं घरही सोडलं होतं. तो गुडगाव या ठिकाणी राहण्यासाठी गेला होता. २०१९ मध्ये कुणाल कामराला त्याचे दोन शो रद्द करावे लागले होते. काही लोकांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन कार्यक्रम उधळण्याची धमकी दिली होती.

२०२० मध्ये कुणाल कामरा आणि अर्णब गोस्वामी यांचा वाद

कुणाल कामरा आणि पत्रकार अर्णब गोस्वामी एकाच विमानातून प्रवास करत होते. प्रवासादरम्यान कुणाल कामराने अर्णब गोस्वामींना काही प्रश्न विचारले. मात्र, अर्णब गोस्वामी कुणालकडे सपशेल दुर्लक्ष करत लॅपटॉपमध्ये आपलं काम करत राहिले. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायल झाला. यानंतर झालेल्या स्टँड अप कॉमेडी शोमध्ये कुणालने अर्णब गोस्वामीच्या शांत राहण्याचीही यथेच्छ खिल्ली उडवली. या दोघांमधला वाद टोकाला गेला होता. तसंच इंडिगोने कुणाल कामरावर सहा महिने बंदी घातली होती. तसंच सरकारी विमान कंपनी एअर इंडियानेही कुणाल कामरावर बंदी घातली होती. स्पाइसजेटनेही असाच निर्णय तेव्हा घेतला होता.

shiv sena became aggressive over kunal Kamras song on eknath shinde vandalizing Khars Unicontinental hotel
कुणाल कामराने खार येथील युनीकॉन्टिनेंटल हॉटेलमधील द हॅबिटॅट क्लबमध्ये शो घेतला होता. या क्लबमध्ये जाऊन एकनाथ शिंदेंच्या समर्थकांनी धुडगूस घातला.file photo

सर्वोच्च न्यायालय विरुद्ध कुणाल कामरा

कुणाल कामराने नोव्हेंबर २०२० या महिन्यात सर्वोच्च न्यायालयावर टीका केली होती. तसंच अर्णबच्या प्रकरणात माफी मागणार नाही असंही म्हटलं होतं. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेली ट्वीट डिलिट कऱण्यासही नकार दिला होता. त्यामुळेही कुणाल कामरा विरुद्ध सर्वोच्च न्यायालय यांच्यात वाद निर्माण झाल्याचं दिसून आलं.

ओला कंपनी विरुद्ध कुणाल कामरा

ओला कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल आणि कुणाल कामरा यांच्यातलाही वाद सर्वश्रुत आहे. कुणाल कामराने ओला कंपनी त्यांच्या ग्राहकांच्या तक्रारी समजून घेण्यात कमी पडत आहे असं म्हणत एक पोस्ट शेअर केली होती. त्यावरुन हा वाद झाला होता. कारण सोशल मीडियावर या दोघांचे ट्वीट व्हायरल झाले होते.

आणखी कशामुळे वादात अडकला आहे कुणाल कामरा?

कुणाल कामरा हा कायमच मोदींच्या विरोधात टीका करताना दिसतो. त्यामुळे तो एका विशिष्ट पक्षाचा अजेंडा चालवत असल्याचा आरोप त्याच्यावर होतो आहे. दरम्यान २०१९ मध्ये भाजपाला लोकसभा निवडणुकीत जो विजय मिळवला होता त्यावरुनही त्याने भाजपाची खिल्ली उडवली होती. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि मुकेश अंबानी यांचीही खिल्ली उडवली होती.

कुणाल कामरा पुन्हा का चर्चेत?

वादांशी जुनं नातं असलेला कुणाल कामरा पुन्हा चर्चेत आला आहे. कारण त्याने एकनाथ शिंदेंवर एक विडंबनात्मक गाणं तयार केलं आहे. एवढंच नाही तर त्याने ४५ मिनिटांचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत त्याने पुन्हा एकदा मोदी, भाजपा, एकनाथ शिंदे, मुकेश अंबानी, सुधा मूर्ती या सगळ्यांची यथेच्छ खिल्ली उडवली आहे.





Source link

“उच्च न्यायालय बॉम्बने उडवणार”, पोलीस नियंत्रण कक्षात फोन खणखणताच…

0
“उच्च न्यायालय बॉम्बने उडवणार”, पोलीस नियंत्रण कक्षात फोन खणखणताच…


नागपूर : शहरात दंगलीनंतर तणावपूर्ण शांतता असतानाच अचानक पोलीस नियंक्षण कक्षातील फोन खणखणला आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या इमारतीत बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाली. या निनावी फोन आल्यामुळे एकच खळबळ उडाली. या फोननंतर बॉम्बची शोधाशोध करण्यासाठी सुरक्षायंत्रणांची धावपळ उडाली. बॉम्बशोधक-नाशक पथक तातडीने उच्च न्यायालयात पोहचले. पोलिसांचा मोठा ताफा तैनात करण्यात आला. उच्च न्यायालयात अचानक घडत असलेल्या घडामोडी आणि पोलिसांच्या बंदोबस्तामुळे वकिलांमध्येही कुजबुज सुरु झाली.

सखोल शोधमोहीमेनंतर काहीच न सापडल्याने तो फोन अफवाच असल्याचे स्पष्ट झाले व पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करणाऱ्या व्यक्तीला सदर पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ओमप्रकाश वासनानी असे फोन करणाऱ्या आरोपी युवकाचे नाव आहे.

उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या इमारतीमध्ये बॉम्ब ठेवल्याचा फोन दुपारी साडेचार सुमारस नागपूर पोलिसांना आला. त्यानंतर तातडीने तेथे बॉम्बशोधक व नाशक पथक तसेच इतर अधिकाऱ्यांनी धाव घेतली. इमारतीत शोध मोहीम सुरू करण्यात आली. इमारतीचा कानाकोपरा तपासल्यावर ही अफवा असल्याचे स्पष्ट झाले. संबंधित फोन नेमका कुणी केला? याचा पोलिसांनी शोध केला.

हेही वाचा

या प्रकरणाचा तपास करण्यात आला. पोलिसांनी जरीपटक्यातून फोन आल्याची माहिती समोर आली. गुन्हे शाखेने जरीपटक्यातील ओमप्रकाश वासनानी याला ताब्यात घेतले. त्याला सदर पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याने उच्च न्यायालय बॉम्बने उडविण्याची धमकी दिल्याची कबुली दिली. ओमप्रकाशविरुद्ध सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासाठी दिली धमकी

ओमप्रकाश याच्या अमरावतीमध्ये विवाहित बहिणीचा सिलींडरच्या स्फोटात मृत्यू झाला होता. या प्रकरणात राजापेठ पोलीस ठाण्यात बहिणीच्या पती व सासऱ्याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. २००७ मध्ये घडलेल्या या घटनेनंतर ओमप्रकाश न्यायालयीन लढाई लढत होता. मात्र, २०११-२०१२ मध्ये उच्च न्यालयातून बहिणीचा पती व सासरा निर्दोष सुटला. तेव्हापासून ओमप्रकाश याने दोन्ही आरोपींना शिक्षा मिळावी यासाठी प्रयत्न करीत आहेत. तो नेहमी उच्च न्यायालयात जाऊन हा खटला नव्याने सुरु करण्यासाठी प्रयत्न करीत असतो. ओमप्रकाश हा स्वत:हून जरीपटका पोलीस ठाण्यात हजर झाला. त्याने बॉम्बस्फोटाचा कॉल केल्याची कबुली पोलिसांना दिली.





Source link

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कारासाठी विधानसभेत ठराव मंजूर

0
महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कारासाठी विधानसभेत ठराव मंजूर


Bharat Ratna : भारतरत्न हा पुरस्कार एखाद्या क्षेत्रात असाधारण आणि सर्वोच्च कामगिरी केल्याबद्दल देण्यात येतो. हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. यामध्ये राजकारण, कला, साहित्य आणि विज्ञान क्षेत्रातील विचारवंत तसेच शास्त्रज्ञ, लेखक, उद्योगपती आणि समाजसेवक यांना देण्यात येतो.  

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार द्या, यासाठी विधानसभेत ठराव मांडण्यात आला आहे. छगन भुजबळ, विजय वडेट्टीवार यांनी या ठरावाला संमती दिली आहे. मात्र, छगन भुजबळ यांनी काही सवाल देखील उपस्थित केले आहेत. महात्मा ही उपाधी मोठी आहे की भारतरत्न पुरस्कार? असा सवाल देखील छगन भुजबळ यांनी केला आहे. 

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्या

छगन भुजबळ यांच्या या विधानानंतर महात्मा की भारतरत्न यावरून चर्चा सुरू झाली आहे. महात्मा ही उपाधी जनतेनं दिली असून भारतरत्न अनेक आहेत असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. त्यानंतर आता थेट विधानसभेतच ‘महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न द्या, असा ठराव मांडण्यात आला आहे. जयकुमार रावल यांनी विधानसभेत हा ठराव मांडला आहे. विधानसभेचा हा ठराव केंद्र सरकारकडे पाठवणार असल्याचंही जयकुमार रावल यांनी सांगितलं.

छगन भुजबळ यांनी सरकारच्या या ठरावाचं स्वागत केलं आहे. मात्र, महात्मा ही उपाधी मोठी की भारतरत्न हा पुरस्कार मोठा, असा सवाल पुन्हा एकदा छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे. महात्मा ही उपाधी सर्वसामान्य जनतेनं बहाल केल्याचं देखील यावेळी छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील सरकारच्या ठरावाचं स्वागत केलं आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची जुनी मागणी आहे. ती आता पूर्ण होत असल्यास सभागृहाची एकमतानं मंजुरी असेल असं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.

महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची मागणी जुनीच आहे. मात्र आता छगन भुजबळ यांनी भारतरत्न की महात्मा असा सवाल उपस्थित केला आहे. त्यामुळे केंद्र सरकार भारतरत्नच्या ठरावावर काय निर्णय घेतं, याकडे आता लक्ष लागलं आहे. 





Source link

अक्षय कुमारने मुंबईतील दोन फ्लॅट ‘इतक्या’ कोटींना विकले; ३ कोटींचा झाला फायदा

0
अक्षय कुमारने मुंबईतील दोन फ्लॅट ‘इतक्या’ कोटींना विकले; ३ कोटींचा झाला फायदा



Bollywood actor Akshay Kumar sells two flats in Mumbai for Rs 6 6 crore makes a profit of over Rs 3 crore : अक्षय कुमारने मुंबईतील दोन फ्लॅट ‘इतक्या’ कोटींना विकले; ३ कोटींचा झाला फायदा





Source link

उजनी धरणातून सोलापूर जिल्ह्याला सुरू असलेले आवर्तन बंद करण्याची अहिल्यानगर जिल्ह्यात मागणी

0
उजनी धरणातून सोलापूर जिल्ह्याला सुरू असलेले आवर्तन बंद करण्याची अहिल्यानगर जिल्ह्यात मागणी



ahilyanagar resident protest ujani dam water released to solapur district उजनी धरणातून सोलापूर जिल्ह्याला सुरू असलेले आवर्तन बंद करण्याची अहिल्यानगर जिल्ह्यात मागणी





Source link

संतापजनक! पुण्यात चौथीत शिकणार्‍या मुलीवर २७ वर्षीय नराधमाकडून लैंगिक अत्याचार

0
संतापजनक! पुण्यात चौथीत शिकणार्‍या मुलीवर २७ वर्षीय नराधमाकडून लैंगिक अत्याचार



in pune fourth standard girl raped by 27 year old accused संतापजनक! पुण्यात चौथीत शिकणार्‍या मुलीवर २७ वर्षीय नराधमाकडून लैंगिक अत्याचार





Source link

“ये ढाई किलो के हात की ताकद…”, दमदार डायलॉग, अ‍ॅक्शन सीन्स आणि रक्तपात; सनी देओलच्या ‘जाट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शितत

0
“ये ढाई किलो के हात की ताकद…”, दमदार डायलॉग, अ‍ॅक्शन सीन्स आणि रक्तपात; सनी देओलच्या ‘जाट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शितत



Sunny Deol Randeep Hoodas Jaat Movie Trailer release action scenes watch : “ये ढाई किलो के हात की ताकद…”, दमदार डायलॉग, अ‍ॅक्शन सीन्स आणि रक्तपात; सनी देओलच्या ‘जाट’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शितत





Source link