Tuesday, July 28, 2026
Home Blog Page 474

उल्हासनगर महापालिकेचा करवाढीचा संकल्प; पाणीपट्टीत अल्प दरवाढ, तर भांडवली मुल्याधारित कल प्रणाली राबवण्याचे संकेत

0
उल्हासनगर महापालिकेचा करवाढीचा संकल्प; पाणीपट्टीत अल्प दरवाढ, तर भांडवली मुल्याधारित कल प्रणाली राबवण्याचे संकेत



मुंबई/नवी दिल्ली : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल प्रसिद्ध झालेल्या विडंबनात्मक गाण्यावरून राज्यात वादंग उठले असताना, विनोदकार कुणाल कामरा याने ‘मी माफी मागणार नाही आणि वाद शांत होण्याची वाट पाहत कुठे लपूनही बसणार नाही,’ असे सोमवारी रात्री निवेदनाद्वारे स्पष्ट केले.

सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत कामरा याला विनोदाबद्दल माफी मागण्यास सांगितले. तसेच मंत्रिमंडळातील इतर मंत्री आणि भाजप, शिंदे गटाच्या नेत्यांनीही कामराला माफी मागण्यास बजावले. परंतु कार्यक्रमस्थळावरील तोडफोडीला निरर्थक म्हणून टीका करणाऱ्या कामराने zझुकण्यास स्पष्ट शब्दांत नकार दिला आहे. त्याने सोमवारी रात्री निवेदन प्रसिद्ध केले.

‘मी माफी मागणार नाही. मी जे बोललो तेच अजित पवार (पहिले उपमुख्यमंत्री) यांनी एकनाथ शिंदे (दुसरे उपमुख्यमंत्री) यांच्याबद्दल म्हटले होते. मला जमावाची भीती वाटत नाही आणि परिस्थिती शांत होण्याची वाट पाहत मी कुठेही लपून बसणार नाही.’

‘आमच्या भाषण आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा अधिकार केवळ शक्तिशाली आणि श्रीमंत लोकांवर टीका करण्यासाठी वापरला जात नाही. एका शक्तिशाली सार्वजनिक क्षेत्रातील व्यक्तीवरील विनोद न स्वीकारण्याची तुमची असमर्थता माझ्या अधिकाराचे स्वरूप बदलत नाही. माझ्या माहितीनुसार, आपल्या नेत्यांची आणि आपल्या राजकीय व्यवस्थेच्या सर्कसची खिल्ली उडवणे कायद्याच्या विरोधात नाही’, असेही त्याने म्हटले आहे.

विनोदकार कुणाल कामरा याने प्रसिद्ध केलेल्या चित्रफितीला अवघ्या दोन दिवसांत ४३ लाखांहून अधिक ‘व्ह्यूज’ मिळाले आहेत. त्याच्या इन्स्टाग्रामवरील माहितीनुसार, पाँडिचेरीमध्ये असलेल्या कामराने त्याच्या ‘एक्स’ खात्यावरील छायाचित्र एका स्पष्टीकरणासह अद्यायावत केले आहे.

‘या कार्यक्रमात असभ्य भाषा, आक्षेपार्ह मजकूर आहे आणि ज्यांच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात, त्यांनी तो पाहण्यास अयोग्य आहे. प्रेक्षकांमुळे झालेल्या कोणत्याही आक्रोश किंवा दुखापतीसाठी तुम्हीच जबाबदार आहात’, असे त्याने म्हटले आहे.

पोलिसांचे समन्स

कुणाल कामरा याला मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवून मंगळवारी सकाळी ११ वाजता चौकशीला उपस्थित राहण्यास सांगितले होते. परंतु कामराने चौकशीला उपस्थित राहण्यासाठी एक आठवड्याचा कालावधी मागितल्याचे समजले. ती नोटीस कामराच्या वडिलांच्या निवासस्थानी पाठवण्यात आली होती. त्याच्या वडिलांनी ती स्वीकारल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. पण कामरा सध्या मुंबई नसल्याचे बोलले जात आहे. शिवसेना नेते मुरजी पटेल यांनी याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

कार्यक्रमांवर बंदीची मागणी

द्वेषपूर्ण भाषणांना प्रोत्साहन देणाऱ्या, समाजात तणाव निर्माण करणाऱ्या ‘स्टँड-अप कॉमेडी प्लॅटफॉर्म’वर बंदी घालावी, अशी मागणी शिवसेना (शिंदे गट) खासदार धैर्यशील माने यांनी मंगळवारी लोकसभेत केली. काही लोक ‘स्टँड-अप कॉमेडी’च्या माध्यमातून त्यांचा राजकीय अजेंडा चालवत असल्याचेही माने म्हणाले.

‘देशात अशी काही धोरणे किंवा चौकट असावी जिथे विनोदी कलाकारांना धोरणांवर टीका करण्याची परवानगी असावी, एखाद्या व्यक्तींविरुद्ध वैयक्तिक टिप्पणीसाठी परवानगी नसावी,’ असे खासदार माने म्हणाले.

पुन्हा नवी चित्रफीत

● कामरा याने मंगळवारी त्याच्या ‘स्टँड अप अॅक्ट’ची एक चित्रफीत नव्याने प्रसिद्ध करून त्याच्या भूमिकेत दुप्पट भर घातली. या चित्रफितीत त्याने शिवसेना कार्यकर्त्यांनी कार्यक्रमस्थळ उद्ध्वस्त करताना आणि त्याचे छायाचित्र तसेच पुतळे जाळतानाच्या चित्रफिती प्रसिद्ध केल्या. तसेच ‘हम होंगे कंगाल, हम होंगे कंगाल एक दिन…’ या विडंबनात्मक पार्श्वगीताची जोडही दिल्याने या वादत आणखी भर पडण्याची शक्यता आहे.

● दरम्यान, इन्स्टाग्रामवर कुणाल कामराच्या समर्थनार्थ अनेकांनी आवाज उठवला आहे. तसेच ‘एक्स’वर मणिपूरमधील बाल पर्यावरण कार्यकर्ती लिसिप्रिया कांगुजम हिने लिहिले की, ‘काही वर्षांपूर्वी, जेव्हा मी एकटी होते तेव्हा हा माणूस माझ्या बाजूने उभा होता. आज मी त्याच्या बाजूने उभी आहे. कितीही द्वेष त्याचा आवाज बंद करू शकत नाही.

शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी कामरा बरोबर असल्याचे सिद्ध केले आहे. कामराने कोणाचेही नाव घेतले नाही; त्याने फक्त गुवाहाटीला गेलेला आणि फडणवीसांचा बाहुला असलेला दाढीवाला माणूस म्हणून सांगितले. परंतु शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या सर्वोच्च नेत्याबद्दल आणि त्या स्टुडिओची तोडफोड करण्याबद्दल काय वाटले? – प्रियंका चतुर्वेदी, खासदार, शिवसेना (ठाकरे)

तुम्ही विनोदाच्या नावाखाली एखाद्याला बदनाम करत आहात. त्याने केलेल्या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत आहात. शिंदेजी काही काळापूर्वी ऑटो रिक्षा चालवत होते. आज ते स्वत:हून येथपर्यंत पोहोचले आहेत. त्याची (कामराची) ओळख काय? आपण जे बोलतो त्याची जबाबदारी आपल्याला घ्यावी लागेल. त्याचे परिणाम होऊ शकतात. -कंगना राणावत, खासदार, भाजप



Source link

भारतातील ‘या’ राज्याच्या आमदारांना मिळतो सर्वात जास्त पगार; दुसऱ्या नाही तर पहिल्या क्रमांकाच्या राज्याचे नाव जाणून शॉक व्हाल

0
भारतातील ‘या’ राज्याच्या आमदारांना मिळतो सर्वात जास्त पगार; दुसऱ्या नाही तर पहिल्या क्रमांकाच्या राज्याचे नाव जाणून शॉक व्हाल


Salary Of MLA In India: भारतात लोकशाही आहे. जनतेने निवडणून दिलेले लोकप्रतिनिधी अर्थात आमदार सरकार चालवतात आणि जनतेचे प्रश्न सोडवतात. भारतात एकूण 28 राज्य आहेत. प्रत्येक राज्यात आमदारांची संख्या वेगळी आहे.  जनतेचे प्रश्न सोडवणाऱ्या आमदारांना मानधन म्हणून मासिक वेतन दिले जाते. जाणून घेऊया सर्वात जास्त पगार भारतातील कोणत्या राज्यातील आमदारांना मिळतो. 

विविध राज्यांमध्ये आमदारांना भत्ते मिळून लाखो रुपयांचा पगार मिळतो. पगारासह आमदारांना विविध सुविधा मिळतात. यात निवास, प्रवास यासारख्या अनेक सुविधा मिळतात. कर्नाटक राज्यातील आमदारांनी दुप्पट पगारवाढ करण्याची मागणी केली आहे. यामुळे देशभरातील विविध राज्यातील आमदारांच्या पगाराची चर्चा सुरु झाली आहे.  

सर्वाधिक पगार मिळणाऱ्या राज्याच्या यादीत आपले महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर आहे. आमदारांना सर्वाधिक पगार देणारे दुसरे राज्य म्हणजे महाराष्ट्र. महाराष्ट्रात आमदारांना दरमहा 2.6 लाख रुपये वेतन दिले जाते. या यादीत तेलंगणा राज्य तिसऱ्या क्रमांकावर आहे. तेलंगणातील आमदारांना दरमहा अडीच लाख रुपये वेतन दिले जाते. दिल्लीसह संपूर्ण देशात अशी 8 राज्ये आहेत जिथे आमदारांना 2 लाख रुपयांपेक्षा जास्त पगार दिला जातो. तर सर्वात कमी पगार हा त्रिपुरा, नागालँड, मणिपूरमधील आमदारांना मिळतो. यांचा पगार हा 50 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. 

आमदारांना सर्वात जास्त पगार देणाऱ्या राज्यांच्या यादीत ज्या राज्याचे नाव पहिल्या स्थानी आहे ते नाव जाणून सगळेच शॉक होतात.  संपूर्ण देशात सर्वाधिक पगार झारखंडमधील आमदारांना मिळतो. झारखंडमधील आमदारांना दरमहा 2.9 लाख रुपये इतके वेतन दिले जाते. या आमदारांना पगाराव्यतिरिक्त राज्य सरकारकडून भत्ते आणि इतर सुविधा देखील दिल्या जातात.

 





Source link

अलर्ट..!, गुन्हेगारांच्या निशाण्यावर ब्युटी पार्लरमध्ये जाणाऱ्या महिला, पोलिसांकडून गाइडलाईन जारी

0
अलर्ट..!, गुन्हेगारांच्या निशाण्यावर ब्युटी पार्लरमध्ये जाणाऱ्या महिला, पोलिसांकडून गाइडलाईन जारी


पार्लरमध्ये जाणाऱ्या महिला गुन्हेगारांच्या निशाण्यावर आल्या आहेत. याबाबत पोलिस मुख्यालयाने महिलांच्या सुरक्षेसंदर्भात मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यासाठी महिला हेल्पलाईन सतर्क करण्यात येत असतानाच पार्लर आणि हॉटेलमध्ये महिलांनी स्वत:चे संरक्षण कसे करावे, याबाबत १४ मुद्द्यांवर माहिती देण्यात आली आहे.



Source link

आज सोन्याच्या दरात घट की वाढ? जाणून घ्या आजचा 24 कॅरेटचा भाव

0
आज सोन्याच्या दरात घट की वाढ? जाणून घ्या आजचा 24 कॅरेटचा भाव


Gold Rate Today: भारतीय शेयर बाजारात आलेल्या तेजीनंतर सोन्याच्या किंमतीत घसरण होत असल्याचे पाहायला मिळतेय. MCX वर सोनं प्रति 10 ग्रॅमने 87,734 रुपयांवर व्यवहार करताना दिसत आहे. तर, चांदीच्या किंमतीत आज तेजी पाहायला मिळत आहे. चांदी प्रति किलो 336 रुपयांनी वाढून 98,220 रुपयांवर व्यवहार करताना दिसत आहे. 

डॉलरमध्ये होणारी घसरण आणि नफावसुलीमुळं सोनं आणि चांदीच्या दरात घसरण होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोनं 3,050 डॉलरवर स्थिरावले होते तर चांदी 1.5 टक्क्यांनी घसरून 34 डॉलरवर स्थिरावली होती. सराफा बाजारात सोनं 900 रुपयांनी घसरून 87,800 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले आहे. तर चांदी 1,500 रुपयांनी घसरून 97,900 रुपये प्रति किलोग्रॅमवर स्थिरावली आहे. कच्चा तेलांच्या किंमती 72 डॉलरच्या आसपास स्थिरावल्याचे पाहायला मिळतेय. मार्च महिन्यात सोन्याच्या किंमती जवळपास 4 टक्क्यांनी वाढल्या आहेत.

मागील आठवड्यात दिल्लीच्या सराफा बाजारात सोनं 400 रुपयांनी घसरून 91,250 रुपये प्रति 10 ग्रॅमवर स्थिरावले होते. अखिल भारतीय सराफा संघाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी 99.9 टक्के शुद्धता असलेले सोनं 91,650 रुपये प्रति 10 ग्रॅमवर स्थिरावले. तर, एकीकडे 99.5 टक्के शुद्धता असलेले सोनं 400 रुपयांच्या घसरणीने 90,880 रुपयांवर स्थिरावले होते. त्यानंतर शुक्रवारीदेखील सोन्याच्या दरात घसरण झाली होती. सोन्याच्या दरात होत असलेल्या घसरणीमुळं ग्राहकांना दिलासा मिळतोय. 

आंतरराष्ट्रीय स्तरावर घडणाऱ्या घडामोडींमुळं सोन्याच्या दरात सातत्याने चढ-उतार होताना दिसतंय. अमेरिका आणि चीनमधील वाढत्या व्यापार तणावामुळे आणि जागतिक अनिश्चिततेमुळे, सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढतेय त्यामुळं सोन्याच्या दरात वाढ होतेय. पण आज मात्र किंचितशे दर घसरले आहेत. मात्र येत्या काळात सोन्याचे दर आणखी वाढू शकतात, असा अंदाज आहे.





Source link

फलटण-बारामती मार्गावरील भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

0
फलटण-बारामती मार्गावरील भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

फलटण, ता. २४ मार्च – फलटण-बारामती मार्गावरील सोमंथळी (ता. फलटण) येथील सरकारी मळाजवळ भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने सस्तेवाडी (ता. फलटण) येथील सद्दाम फरास (वय २५) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेला युवराज चव्हाण गंभीर जखमी झाला आहे.

ही दुर्घटना सोमवारी (२४ मार्च) सकाळी घडली. सद्दाम फरास आणि युवराज चव्हाण कामानिमित्त बारामतीकडे निघाले होते. महामार्गावरून जाणाऱ्या त्यांची दुचाकी (क्र. MH-11 CR 0064) ला बारामतीहून फलटणकडे येणाऱ्या इंडिका विस्टा (क्र. MH-42 AF 9600) कारने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, सद्दाम फरास याचा जागीच मृत्यू झाला, तर युवराज चव्हाण गंभीर जखमी झाला.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे अजित पिंगळे आणि प्रदीप खरात घटनास्थळी पोहोचले. १०८ रुग्णवाहिकेद्वारे जखमीला तातडीने फलटणच्या आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले.

अपघातानंतर कार चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र सतर्क ग्रामस्थांनी त्याला पकडले. या अपघातामुळे सोमंथळी परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, बारामती-फलटण महामार्गावरील वारंवार होणाऱ्या अपघातांबद्दल नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. महामार्गावरील सुरक्षेबाबत ठोस उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

गर्लफ्रेंडला लाखो रुपये उसने दिले, पैसे मागताच योगेशला संपवले, मृतदेह स्विफ्ट कारमध्ये टाकून कॅनॉलमध्ये फेकला!

0



Satara Crime News: गर्लफ्रेंडला लाखो रुपये उसने दिले, पैसे मागताच योगेशला संपवले, मृतदेह स्विफ्ट कारमध्ये टाकून कॅनॉलमध्ये फेकला!



Source link

साताऱ्यातील तरुणांचं घृणास्पद कृत्य, थायलंडच्या रीना बीचवर जर्मन तरुणीवर अत्याचार

0


सातारा: राज्यातील वाढती गुन्हेगारी हा चिंतेचा विषय ठरत असताना साताऱ्यातील दोन जणांनी संपूर्ण देशाची मान शरमेने खाली जाईल, असे कृत्य केले आहे. या दोघांनी थायलंडमध्ये एका तरुणीवर बलात्कार (Rape) केल्याची माहिती समोर येत आहे. सातारा (Satara News) जिल्ह्यातल्या कोरेगाव तालुक्यातील दोन जण थायलंड देशात फिरण्यासाठी गेले होते. थायलंड (Thailand) येथील सुरत थानी प्रांतातील कोह पांगण जिल्ह्यातल्या बाण ताई उपजिल्हा गाव क्रमांक सहा येथील रीन बीचवर (Thailand news) या दोघांनी जर्मन महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. संबंधित पीडित महिलेने कोह फांगन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही आणि काही साक्षीदारांच्या आधारावर दोन्ही संशयित आरोपींना अटक केली आहे. सध्या दोघांची रवानगी थायलंड येथील तुरुंगात करण्यात आली आहे. या घटनेचा आणखी तपशील समोर आलेला नाही. मात्र, या घटनेमुळे सातारकरांची मान शरमेने खाली गेली आहे.

आणखी वाचा

‘दीडशहाण्या तुझा कार्यक्रमच करतो, माझ्याकडे रिव्हॉल्व्हर आहे’, माजी आमदाराच्या मुलाची धमकी; सरकारी अधिकारीही शेवटपर्यंत नडला, म्हणाला….

अधिक पाहा..



Source link

मेरठमधील सौरभ राजपूत हत्याकांड प्रकरणाच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासे

0
मेरठमधील सौरभ राजपूत हत्याकांड प्रकरणाच्या पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासे


Meerut Saurabh Shocking Postmortem Report: मेरठच्या सौरभ हत्या प्रकरणाचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आला आहे. या रिपोर्टने मारेकरांनी क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत हे दाखवून दिले आहे. सौरभची मान कापली, हात मनगटापासून कापण्यात आले आणि हृदयावर तीन वेळा वार करण्यात आल्याचे रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. मृत्यूचे कारण शॉक आणि जास्त रक्तस्त्राव असे रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे.

हत्येचा क्रूरपणा उघड 

माजी मर्चंट नेव्ही ऑफिसर सौरभ राजपूतच्या  पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. त्यातून त्याच्या हत्येचा अत्यंत क्रूरपणा उघड झाला आहे. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्याच्या शरीराचे तुकडे केलेले सांगितले आहे. त्याचे हात मनगटावर कापले गेले होते आणि त्याचे पाय मागे वाकले होते, हे दर्शविते की त्याच्या शरीराचे तुकडे ड्रममध्ये ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. हा क्रूरपणा त्याची पत्नी मुस्कान रस्तोगी आणि तिचा प्रियकर साहिल शुक्ला यांनी केल्याचा अहवाल आहे. 

हे ही वाचा: Meerut Murder: मुलीला फाशीची मागणी करणाऱ्या आईचे भिंग फुटलं, जावईच्या सहानुभूतीचे कारण झाले उघड!

 

खून करून गेले हिमाचलला 

सौरभ राजपूतला त्याच्या पत्नीने 4 मार्च रोजी अंमली पदार्थ पाजून त्याची हत्या केली. यानंतर तिचा प्रियकर साहिल शुक्लाच्या मदतीने  त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून सिमेंटने भरलेल्या ड्रममध्ये बंद करण्यात आले. यानंतर मुस्कान आणि साहिल हिमाचल प्रदेशात सुट्टीवर गेले. कुटुंबीयांची दिशाभूल करण्यासाठी आणि   गुन्हा लपविण्यासाठी त्यांनी सौरभच्या फोनवरून कुटुंबियांना मेसेज पाठवत राहिले. 18 मार्च रोजी राजपूतच्या कुटुंबाने तो बेपत्ता झाल्याची तक्रार केल्यावर खून उघडकीस आला, त्यानंतर मुस्कान आणि साहिलला अटक करण्यात आली.

हे ही वाचा: ‘बायको आणि सासूने घर उद्ध्वस्त..’, पती आत्महत्या करत असताना पत्नी आणि सासू 44 मिनिटं Live पाहत राहिल्या

 

काय म्हणाले डॉक्टर? 

पोस्टमार्टम करणाऱ्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, सौरभ राजपूतच्या हृदयावर तीन वेळा जोरदार वार करण्यात आले होते. हे वार फारच हिंसक हल्ल्याचे संकेत देते. पोलीस अधीक्षक आयुष विक्रम सिंग यांनी सौरभच्या पोस्टमार्टमबद्दल बोलताना मेनी केले की, मुस्कानने राजपूतवर चाकूने वार केले, नंतर त्याची मान आणि हात कापले. त्यानंतर ड्रममध्ये बसवण्यासाठी मृतदेहाचे चार तुकडे करण्यात आले.





Source link

करणी काढण्यासाठी होम करणारा भोंदूबाबा गजाआड

0
करणी काढण्यासाठी होम करणारा भोंदूबाबा गजाआड



in sangli fake baba arrested performing black magic for karni करणी काढण्यासाठी होम करणारा भोंदूबाबा गजाआड





Source link

औरंगजेबाची कबर उखडण्याचे निवेदन; चौघे ताब्यात

0
औरंगजेबाची कबर उखडण्याचे निवेदन; चौघे ताब्यात



Chhatrapati sambhajinagar Aurangzeb tomb four detained by police औरंगजेबाची कबर उखडण्याचे निवेदन; चौघे ताब्यात





Source link