Tuesday, July 28, 2026
Home Blog Page 472

बँका, विमा कंपन्यांना सायबर हल्ल्यांचा धोका! जाणून घ्या कोणी दिला धोक्याचा इशारा…

0
बँका, विमा कंपन्यांना सायबर हल्ल्यांचा धोका! जाणून घ्या कोणी दिला धोक्याचा इशारा…



cyber attack threat to banks and insurance companies बँका, विमा कंपन्यांना सायबर हल्ल्यांचा धोका! जाणून घ्या कोणी दिला धोक्याचा इशारा…





Source link

एमपीएससीकडून ‘पीएसआय’चा निकाल जाहीर… अतिश मोरे राज्यात प्रथम…

0
एमपीएससीकडून ‘पीएसआय’चा निकाल जाहीर… अतिश मोरे राज्यात प्रथम…


पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्‍या महाराष्ट्र अराजपत्रित गट- ब सेवा मुख्य परीक्षेतील पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. त्यात अतिश मोरे यांनी सर्वाधिक गुणांसह राज्‍यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.

एमपीएससीने प्रसिद्धिपत्रकाद्वारे या बाबतची माहिती देण्यात आली. एमपीएससीने पीएसआय संवर्गातील ३७४ पदांसाठी ५ नोव्‍हेंबर २०२३ रोजी परीक्षा घेतली होती. उमेदवारांचे निकालाकडे लक्ष लागले होते. त्यानुसार एमपीएससीने सर्वसाधारण गुणवत्ता यादी संकेतस्थळावर जाहीर केली. सर्वसाधारण गुणवत्ता यादी उमेदवारांच्‍या अर्जामधील विविध दाव्‍यांच्‍या अनुषंगाने तयार करण्यात आली आहे. अंतिम निकालापूर्वी पडताळणी केल्‍यानंतर काही उमेदवारांच्‍या शिफारशींमध्ये बदल होऊ शकतो. खेळाडू व अनाथ प्रवर्गातून अर्ज सादर केलेल्‍या उमेदवारांची प्रमाणपत्र प्राधिकृत अधिकाऱ्यांकडून पडताळणीच्‍या अधीन राहून त्‍यांचा प्रवर्गाचा दावा तात्‍पुरता ग्राह्य धरण्यात आला आहे. त्‍यानुसार सर्वसाधारण गुणवत्ता यादीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

सर्वसाधारण गुणवत्ता यादी न्‍यायालयात दाखल विविध न्‍यायिक प्रकरणांमधील न्‍यायनिर्णयाच्‍या अधिन राहून जाहीर करण्यात येत आहे. उमेदवारांच्‍या प्रमाणपत्राची पडताळणी पूर्ण झाल्‍यानंतर खेळाडूव अनाथ प्रवर्गातील संवर्गाची तात्‍पुरती निवड जाहीर होईल. त्‍यानंतर या परीक्षेच्‍या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्यायही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या प्रक्रियेनंतर अंतिम गुणवत्ता यादीच्‍या आधारे उमेदवारांची शिफारशी करण्यात येतील, अशी माहिती एमपीएससीकडून देण्यात आली आहे.





Source link

Shiv Sena Thackeray faction opposes privatization of Bhagwati Hospital in Borivali

0
Shiv Sena Thackeray faction opposes privatization of Bhagwati Hospital in Borivali



Shiv Sena Thackeray faction opposes privatization of Bhagwati Hospital in Borivali | बोरिवलीतील भगवती रुग्णालयाच्या खासगीकरणाला शिवसेनेचा (ठाकरे) विरोध





Source link

New Bank Rules: 1 एप्रिलपासून बँकेसंबंधी 6 नियम बदलणारच, नंतर पश्चात्ताप होण्याआधी आताच जाणून घ्या

0
New Bank Rules: 1 एप्रिलपासून बँकेसंबंधी 6 नियम बदलणारच, नंतर पश्चात्ताप होण्याआधी आताच जाणून घ्या


New Bank Rules: 1 एप्रिल 2025 पासून नवीन बँकिंग नियम लागू होणार आहेत, ज्यामुळे खातेधारकांसाठी महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत. यामुळे क्रेडिट कार्डचे भत्ते, बचत खात्याचे नियम, एटीएममधून पैसे काढण्याची धोरणे आणि बरेच काही बदल होणार आहेत. दंड टाळण्यासाठी आणि तुमच्या बँकिंग फायद्यांचा जास्तीत जास्त फायदा घेण्यासाठी ही माहिती असणं आवश्यक आहे. 

एटीएममधून पैसे काढण्याच्या शुल्कात बदल

अनेक बँकांनी त्यांच्या एटीएम पैसे काढण्याच्या धोरणांमध्ये सुधारणा केल्या आहेत. दरमहा मोफत एटीएममधून पैसे काढण्याच्या मर्यादेत घट केली जात आहे. ग्राहकांना आता इतर बँकांच्या एटीएममधून एका महिन्यातून फक्त तीन वेळा मोफत पैसे काढण्याची परवानगी असेल. ही मर्यादा ओलांडल्यास प्रति व्यवहार20 ते 25 रुपयांपर्यंत अतिरिक्त शुल्क आकारले जाईल.

किमान बॅलेन्स

एसबीआय, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक आणि इतर संस्था त्यांच्या किमान बॅलेन्स नियमात बदल करत आहेत. बँक खातं शहरी, अर्ध-शहरी किंवा ग्रामीण भागात आहे की नाही यावर ते अवलंबून असेल. निर्धारित शिल्लक न ठेवल्यास दंड आकारला जाऊ शकतो.

पॉझिटिव्ह पे सिस्टमची (पीपीएस) अंमलबजावणी

सुरक्षित व्यवहार होण्यासाठी अनेक बँका पॉझिटिव्ह पे सिस्टम (पीपीएस) सुरू करत आहेत. या सिस्टममध्ये 5 हजारांपेक्षा जास्त चेक पेमेंटसाठी व्हेरिफेशन आवश्यक आहे. प्रोसेस होण्याआधी  ग्राहकांना चेक नंबर, तारीख, पैसे देणाऱ्याचे नाव आणि रक्कम यासारख्या तपशीलांची पुष्टी करणं आवश्यक असेल. यामुळे फसवणूक आणि चुका कमी होतील. 

डिजिटल बँकिंगमध्ये वाढलेली वैशिष्ट्ये

डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन देण्यासाठी अॅडव्हान्स ऑनलाइन फिचर्स आणि एआय-संचालित चॅटबॉट्स लाँच केलं जात आहे, ज्यामुळे ग्राहकांना मदत मिळेल. डिजिटल व्यवहारांचं संरक्षण करण्यासाठी टू फॅक्टर व्हेरिफिकेशन आणि बायोमेट्रिक पडताळणीसारखे वाढीव सुरक्षा उपाय देखील मजबूत केले जातील.

बचत खाते आणि एफडी व्याजदरांमध्ये बदल

अनेक बँका बचत खाते आणि मुदत ठेवींवरील व्याजदरांमध्ये सुधारणा करत आहेत. बचत खात्याचे व्याज आता खात्यातील शिल्लक रकमेवर अवलंबून असेल, म्हणजेच जास्त शिल्लक असल्यास चांगले दर मिळू शकतात. स्पर्धात्मक परतावा देणे आणि बचतीला प्रोत्साहन देणं हा यामागील मूळ उद्धेश आहे. 

सुधारित क्रेडिट कार्ड फायदे

एसबीआय आणि आयडीएफसी फर्स्ट बँकसह प्रमुख बँका त्यांच्या सह-ब्रँडेड विस्तारा क्रेडिट कार्डमध्ये बदल करत आहेत. तिकीट व्हाउचर, नूतनीकरण भत्ते आणि माइलस्टोन रिवॉर्ड्ससारखे फायदे बंद केले जातील. अ‍ॅक्सिस बँक 18 एप्रिलपासून अशाच प्रकारचे बदल लागू करेल, ज्यामुळे त्यांच्या विस्तारा क्रेडिट कार्डधारकांवर परिणाम होईल.





Source link

45550000000 एवढा बँक बॅलेन्स; भारतात IPL सुरु करणारा फरार का झाला? आईच्या मैत्रिणीशी लग्न आणि बरचं काही…

0
45550000000 एवढा बँक बॅलेन्स; भारतात IPL सुरु करणारा फरार का झाला? आईच्या मैत्रिणीशी लग्न आणि बरचं काही…


Rise and Fall of Lalit Modi: सध्या भारतात इंडियन प्रिमीयर लीग अर्थात IPL ची धुम सुरु आहे. IPL चा यंदा हा 18 वा सिजन आहे. IPL सोबत चर्तेत आला आहे तो भारतात IPL सुरु करणारा व्यक्ती. भारतात IPL सुरु करणारा फरार सध्या फरार आहे. त्याच्या बँक खात्यात 45550000000 एवढा बॅलेन्स आहे. आईच्या मैत्रिणीशी लग्न, वयाच्या 61 व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीसह अफेयर आणि बरचं काही… जाणून घेऊया नेहमी चर्चेत असणारा हा व्यक्ती आहे तरी कोण?

भारतात IPL सुरु झाले की ललित मोदीचे  नाव चर्चेत येते. ललित मोदीनेच भारतात IPL सुरु केले. 2008 मध्ये भारतात पहिल्यांदाच इंडियन प्रीमियर लीग सुरू करणारा ललित मोदी भारतातून फरार आहे. आयपीएलचे माजी अध्यक्ष आणि फरार ललित मोदी याने अलीकडेच भारतीय नागरिकत्व सोडण्यासाठी अर्ज केला. त्याला वानुआटु या देशाचे  नागरिकत्व पाहिजे होते.  पण तो मिळू शकले नाही.कोट्यावधीचं साम्राज्य उभ करणाऱ्या ललित मोदीची आता काय अवस्था झालेय. मोठा गैरव्यवहार केल्यानंतर मे 2010मध्ये ललित मोदीने भारतातून युकेला पलायन केले. 

IPL ही भारतातील सर्वात प्रतिष्ठीत क्रिकेट लीग आहे. संपूर्ण जगाचे लक्ष IPL वर असते.  2008 मध्ये आयपीएलचा पहिला हंगाम खेळला गेला. ललित मोदी यांनी त्यांच्या संपर्कांचा वापर करून बॉलिवूडमधील बड्या सेलिब्रिटींना आणि उद्योगपतींना आयपीएल संघ खरेदी करण्यास भाग पाडले.  हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन, राजस्थान क्रिकेट असोसिएशन आणि पंजाब क्रिकेट असोसिएशनमध्ये काम करणाऱ्या ललित मोदींनी आता बीसीसीआयमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. 2008 ते 2010 पर्यंत ललित मोदी आयपीएलचे अध्यक्ष होते.

क्रिकेट प्रेमी ललित मोदी हे मोदी एंटरप्रायझेसचे अध्यक्ष आहेत. भारत सोडल्यानंतरही त्यांनी मोदी एंटरप्रायझेसची जबाबदारी सांभाळली. मोदी यांची 1200 कोटी रुपयांची  कंपनी कृषी, तंबाखू, पान मसाला, माउथ फ्रेशनर, कन्फेक्शनरी, रिटेल, शिक्षण, कॉस्मेटिक, मनोरंजन आणि रेस्टॉरंटमध्ये व्यवसाय करते. एका वृत्तानुसार जुलै 2022 मध्ये ललित मोदींची एकूण संपत्ती 4,555 कोटी रुपये होती.  मध्य पूर्व, पश्चिम आफ्रिका, आग्नेय आफ्रिका, आग्नेय आशिया, पूर्व युरोप, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका आणि मध्य अमेरिकेसह जगातील अनेक देशांच्या ललित मोदीच्या कंपनीचा कारभार परसलेला आहे.

ललित मोदींची एकूण 4.555 कोटी इतकी आहे. आलिशान बंगले आणि फ्लॅट्सचे मालक असलेल्या ललित मोदीकडे 15 कोटी रुपयांच्या तीन फेरारी कार आहेत. याशिवाय मोदींकडे एक खाजगी विमान देखील आहे.
ललित मोदीचे खाजगी आयुष्य देखील तितकेच चर्चेत राहिले. ललित मोदीने आईच्या मैत्रीणीशी लग्न केले. जी त्याच्यापेक्षा 9 वर्ष मोठी होती. तर, वयाच्या 61 व्या ललित मोदी याने बॉलिवूड अभिनेत्री सुष्मिता सेनसोबत लग्नाची घोषणा केली. दोघांचे फोटोही व्हयारल झाले होते. मात्र, फक्त मैत्री असल्याचे सांगण्यात आले. 





Source link

भगवद्गीता आणि उपनिषेदांमुळं सुनीता विलियम्स सुखरुप पृथ्वीवर परतल्या? व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा

0
भगवद्गीता आणि उपनिषेदांमुळं सुनीता विलियम्स सुखरुप पृथ्वीवर परतल्या? व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा


Sunita Williams: नासाच्या अंतराळवीर सुनीता विलियम्स यांचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत दावा करण्यात येत आहे की, सुनीता या अंतराळ मोहिमेदरम्यान त्यांच्यासोबत भगवद्गगीता आणि उपनिषेदसोबत घेऊन गेल्या होत्या. तसंच, 9 महिन्यानंतर त्या अंतराळातून त्यामुळंच सुखरुप परत येऊ शकल्या, असंही व्हिडिओत म्हटलं आहे. या व्हिडिओमागचं सत्य काय हे आज आपण जाणून घेऊया. 

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ पत्रकार परिषदेतील असल्याचे दिसत आहे. सुनीता विलियम्स यात म्हणताना दिसत आहे की, भगवद्गीता आणि श्री गणेशाची मूर्ती नेहमी सोबत अंतराळात घेऊन जाते. पुढे त्या असं म्हणताना दिसत आहेत की, मी भारतीय असल्याचा मला खरोखरच आदर आणि आनंद आहे. त्याचाच एक भाग असलेला काही भाग मी माझ्यासोबत अंतराळात घेऊन जाते. माझ्या घरातही श्रीगणेशाची मूर्ती आहे. श्रीगणेश नेहमीच मी जिथे जाते तिथे माझ्यासोबत असतात. म्हणूनच मला त्यांना अंतराळातदेखील न्यावे लागते. त्याचबरोबर भारतीय जेवणे मी अंतराळात नेहमी समोसे घेऊन जाते, असंदेखील त्यांनी म्हटलं आहे. 

भगवद्गीतासोबतच मी उपनिषेददेखील अंतराळात घेऊन गेली होती. अंतराळात राहण्यासाठी आणि अशा प्रकारच्या गोष्टींवर चिंतन करण्यासाठी आणि वाचण्यासाठी योग्य आहे, असं त्या व्हिडिओत म्हणत आहेत. 

सुनीता विलियम्स यांचा हा व्हिडिओ फेसबुकवर शेअर करण्यात आला आहे. त्यात युजरने म्हटलं आहे की, गणेश जी आणि भगवद्गीतानेहमीच माझ्यासोबत अंतराळात असतात. या दोन गोष्टी मला नेहमीच सपोर्ट करतात आणि मला मानसिक तणावापासून लांब ठेवतात. सुनीला विलियम्स यांची अमेरिकेत पत्रकार परिषद. सुनीला विलियम्स यांनी 9 महिन्यांनंतर अंतराळातून पृथ्वीवर सुखरूप परतल्या याचे श्रेय भगवद्गीता आणि उपनिषेदेला दिले आहे, असा दावा करण्यात आला आहे. तसंच, आणखी एका ट्विटर युजरने हा दावा केला आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल होणारा व्हिडिओ जरी खरा असला तरी तो अर्धसत्य आहे. त्या व्हिडिओसोबत करण्यात आलेला दावा मात्र खोटा आहे. सुनीता विलियम्स यांचा व्हायरल होणारा व्हिडिओ 2 एप्रिल 2013 रोजीचा आहे. या व्हिडिओचे टायटल आहे की, ”I had samosas in space with me, says astronaut Sunita Williams.” सुनीता विल्यम्स यांच्या भारत भेटीदरम्यान त्यांनी दिल्लीतील राष्ट्रीय विज्ञान केंद्रात त्या संबोधित करत होत्या. अलीकडे व्हायरल झालेला हा भाग मूळ YouTube व्हिडिओच्या ०:३९ मिनिटांनी सुरू होतो. 

व्हिडिओत करण्यात आलेला दावा हा खोटा असल्याचे समोर आले आहे. सुनीता यांचा व्हिडिओ 2013 चा असून या व्हिडिओत त्या त्यांच्या आधीच्या अंतराळ मोहिमांबद्दल बोलत होत्या. 





Source link

Maharashtra Election News LIVE March 25, 2025: जमावाला घाबरत नाही, पुढचा शो एलफिन्स्टन ब्रीजवर करणार; एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यावर कुणाल कामराची प्रतिक्रिया

0
Maharashtra Election News LIVE March 25, 2025: जमावाला घाबरत नाही, पुढचा शो एलफिन्स्टन ब्रीजवर करणार;  एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यावर कुणाल कामराची प्रतिक्रिया


Maharashtra Election 2024 News LIVE: जमावाला घाबरत नाही, पुढचा शो एलफिन्स्टन ब्रीजवर करणार;  एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यावर कुणाल कामराची प्रतिक्रिया

Maharashtra Election 2024 News LIVE: जमावाला घाबरत नाही, पुढचा शो एलफिन्स्टन ब्रीजवर करणार; एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यावर कुणाल कामराची प्रतिक्रिया

Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील सर्व २८८ मतदारसंघातील उमेदवार, राजकीय पक्षांची रणनीती, बंडखोरी, माघार, मतदान आणि निकालाचे सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील.

Tue, 25 Mar 202510:51 AM IST

महाराष्ट्र बातम्या News Live: जमावाला घाबरत नाही, पुढचा शो एलफिन्स्टन ब्रीजवर करणार; एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यावर कुणाल कामराची प्रतिक्रिया

  • kunal karma : कामरा यांनी आपल्या नव्या कॉमेडी शो ‘नया भारत’मध्ये एका व्यंग्यात्मक गाण्याद्वारे शिंदे यांच्यावर निशाणा साधला होता. या गाण्यात त्यांनी २०२२ मध्ये झालेली शिवसेना फूट आणि शिंदे यांच्या बंडखोरीचा उल्लेख करत त्यांना गद्दार म्हटले आहे.


Read the full story here





Source link

धक्कादायक..! वृद्ध आईला घरात एकटीला सोडून गेली मुलगी, ५४ पाळीव कुत्र्यांनी लटके तोडून केले ठार

0
धक्कादायक..! वृद्ध आईला घरात एकटीला सोडून गेली मुलगी, ५४ पाळीव कुत्र्यांनी लटके तोडून केले ठार


कोलोराडोतील एका महिलेला तिच्या ७६ वर्षीय आईवर तिच्या पाळीव कुत्र्यांनी हल्ला करून ठार मारल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पुएब्लो काउंटी शेरिफ कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, जेसिका हॉफ (४७) हिला फेब्रुवारी महिन्यात तिची आई लावोन हॉफ यांच्या मृत्यू प्रकरणी शुक्रवारी अटक करण्यात आली. लॅव्होन यांना स्मृतिभ्रंश झाला होता आणि त्यांना २४ तास काळजी घेण्याची गरज होती. ‘डिमेंशिया’ हा एक मानसिक आजार आहे ज्यामध्ये स्मरण शक्ती आणि विचार करण्याची क्षमता कमकुवत होते.



Source link

३२ लाख मुस्लिमांना भाजप वाटणार ‘ईदी’, ‘सौगात-ए-मोदी’ किटमध्ये मिळणार सणासुदीचे सर्व सामान

0
३२ लाख मुस्लिमांना भाजप वाटणार ‘ईदी’, ‘सौगात-ए-मोदी’ किटमध्ये मिळणार सणासुदीचे सर्व सामान


ईदपूर्वी भारतीय जनता पक्षाने गरीब मुस्लिमांना भेटवस्तू वाटण्याची मोहीम सुरू केली आहे. अल्पसंख्याक ‘सौगत-ए-मोदी’ अभियान राबवून भाजप ३२ लाख गरीब मुस्लिमांना भेटवस्तू देणार आहे. मंगळवारी दिल्लीतील निजामुद्दीन येथून या मोहिमेला सुरुवात होणार आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा या मोहिमेवर देखरेख ठेवणार आहेत. गरीब मुस्लिमांना अभिमानाने ईद साजरी करता यावी यासाठी त्यांना एक किट ही भेट देण्यात येणार असल्याचे भाजपचे म्हणणे आहे.



Source link

लग्नाच्या 15 दिवसांतच बायकोने पतीची हत्या घडवून आणली; प्रियकराला पैसे दिले अन्…

0
लग्नाच्या 15 दिवसांतच बायकोने पतीची हत्या घडवून आणली; प्रियकराला पैसे दिले अन्…


Crime News Today: उत्तर प्रदेशच्या औरेया जिल्ह्यात लग्नाच्या 15 दिवसांतच नवरदेवाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नवरदेवाची हत्या इतर कोणी नाही तर त्याच्या नववधुने केली होती. नववधु प्रगतीने तिचा प्रियकर अनुरागसह पतीचीच हत्या केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

5 मार्च 2025 रोजी प्रगतीचे लग्न व्यावसायिक दिलीपसोबत लग्न झालं होतं. मात्र प्रगतीचे दुसऱ्याच कोणासोबत अफेअर होते. प्रगतीचा अनुराग नावाच्या मुलासोबत प्रेमसंबंध होते. प्रगतीला कोणत्याही परिस्थितीत अनुरागसोबत लग्न करायचे होते. तर अनुरागदेखील प्रगतीसाठी कोणीतीही हद्द पार करण्यात तयार होता. अशातच प्रगतीने पतीची हत्या करण्याचा कट रचला. 

मैनपुरी येथीर रहिवाशी दिलीपचे लग्न औरेया येथे राहणाऱ्या प्रगतीसोबत झाले होते. लग्नानंतर 15 दिवसांनंतर म्हणजेच 19 मार्च रोजी दिलीपवर गोळी झाडली. उपचारादरम्यान दिलीपचा मृत्यू झाला. तपासादरम्यानच पोलिसांनी एक खळबळजनक खुलासा केला आहे. पोलिसांनी या हत्याकांडात त्याच्या पत्नीला आणि तिच्या प्रियकराने हा कट चरला होता.

19 मार्च रोजी औरेया जवळच्या एक युवक जखमी अवस्थेत सापडला. गेहूच्या शेतात तो गंभीर जखमी अवस्थेत पडला होता. ग्रामस्थांनी लगेचच याची माहिती पोलिसांना कळवली. पोलिस घटनास्थळी पोहोचून त्यांनी तरुणाला रुग्णालयात दाखल केले. मात्र तिथे त्यांची प्रकृती आणखी नाजूक झाल्याने त्यांना मोठ्या रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तरुणाचा मृत्यू झाला. 

पोलिस चौकशीत प्रगतीने पतीची हत्या केल्याचे कबुल केले आहे. तपासात समोर आले की, प्रगतीचा प्रियकरदेखील त्याच गावात राहत होता. लग्नानंतरदेखील ती त्याला सोडायला तयार नव्हती. यामुळंच तिने पतीची हत्या करण्याचा निर्णय घेतला आणि कट रचला. प्रगतीने अनुरागला पतीच्या हत्येसाठी दोन लाख रुपये दिले. त्यानंतर अनुरागने त्याचा साथीदार रामजी नागरसोबत मिळून 19 मार्च रोजी प्रगतीचा पती कन्नोजहून परतत येत असताना हॉटेलजवळ थांबून त्याच्यावर गोळ्या झाडल्या.

पोलिसांनी अनुराग आणि रामनी नागर यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून पिस्तूल आणि जिवंत काडतूस जप्त करण्यात आली आहे. त्यांची सखोल चौकशी केल्यानंतर त्यांनी प्रगतीचे नाव घेतले तेव्हा तिला अटक करण्यात आली. 





Source link