Tuesday, July 28, 2026
Home Blog Page 467

होय मी काळी! तर मग ब्रह्मांडातील सर्वात शक्तीशाली घटकाचा रंग कोणता? मुख्य सचिवाची पोस्ट एकदा वाचाच…

0
होय मी काळी! तर मग ब्रह्मांडातील सर्वात शक्तीशाली घटकाचा रंग कोणता? मुख्य सचिवाची पोस्ट एकदा वाचाच…


मुंबई : स्त्रीनं यशाची अनेक शिखरं पादाक्रांत केली. प्रत्येकवेळी स्वत:ला सिद्ध केलं. पण आजच्या 21 व्या शतकातही काही स्त्रियांना त्यांच्या रंगावरून डिवचलं जातंय. समाज पुढारलाय, असं आपण म्हणतो पण खरंच तसं आहे का? हा प्रश्न एका महिला अधिकाऱ्याच्या फेसबुक पोस्टवरून पडलाय. 

मुलगी जन्मली.. कशीय … गोरी आहे नं? लग्न ठरवताना मुलगी गोरी आहे का? हा संवाद काहींच्या कानावर पडला असेलच. आता कुठे असं असतं? 21 वं शतक आहे, पण नाही अजूनही काहींची मानसिकता तशीच आहे. केरळच्या मुख्य सचिव शारदा मुरलीधरन यांना याचा प्रत्यय आलाय. कृष्णवर्णीय रंगामुळे भारतातच त्यांना रंगभेदाला सामोरं जावं लागलं. त्या उद्विग्न झाल्या आणि समाजमाध्यमावर आवाज उठवला.

काय म्हणाल्या शारदा मुरलीधरन?

भारतीय समाजात स्त्री असणं कठीण आहे. मात्र कृष्णवर्णीय स्त्री असणं म्हणजे तुम्ही अस्तित्वहीन होऊन जाता. वरीष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत असताना एका व्यक्तीनं डिवचलं. माझ्या कार्यकाळाबाबत अपमानजनक टिप्पणी केली. मी दुखावले गेले कारण त्याचा संदर्भ कृष्णवर्णीय रंगाशी होता. ‘तुझ्या रंगाची कारकीर्द जितकी गोरी तितकी तुझी काळी’ असं ते विचित्र विधान केलं गेलं. 

हेही वाचा : ‘अंबानी आहेस की भिकारी,’ शाळेत उडवण्यात आली होती अनंत अंबानीची खिल्ली, नीता अंबानी यांनी सांगितला कुटुंबाचा ‘तो’ काळ

 

मात्र आता हे त्यांच्याबाबतीत घडलंय असं नाही गेल्या 50 वर्षांपासून आपण सुंदर नाही, या ओझ्याखाली आपण जगत आलोय. असं त्या म्हणतात.. काळा रंग हा चांगला नाहीच… त्यातही एखादी स्त्री काळी असेल तर ती अस्तित्वहीन मानली जाते..  अशी खंत त्यांनी व्यक्त केली..  पण शारदा यांनी आपला रंग स्वीकारला.. आणि तो स्वीकारण्याची प्रेरणा आपल्या मुलांनी दिली.  कृष्णवर्णीय रंग सुंदर आहे, तो विश्वाची सर्वव्यापी सत्यता आहे. शारदा मुरलीधरन यांनी रंगभेदाला सामोरं जाण्याचा आपला अनुभव मांडला…पण सोबतच त्यांनी प्रश्नही उपस्थित केला… ‘कृष्णवर्णीय स्त्रियांना का दुर्लक्षित केलं जातं?’ त्यांच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.

post

चर्चा तर होतच राहील पण आपण मानसिकता बदलणार आहोत का?  काळी-गोरी, जाड-बारीक अशा अनेक टिप्पण्या महिलांच्या देहावर केल्या जातात. थोडक्यात तिला कमी लेखलं जातं. टॉल डार्क हँडसम असा मुलगा चालतो पण मुलगी मात्र गोरीच हवी. म्हणून सोशल मीडियावर मुली फोटो, व्हिडीओ टाकताना फिल्टर वापरून उजळ दिसण्याचा प्रयत्न करतात. हे खरंच कुठेतरी थांबलं पाहिजे. मनापासून स्वीकारलं गेलं पाहिजे. 





Source link

‘अंबानी आहेस की भिकारी,’ शाळेत उडवण्यात आली होती अनंत अंबानीची खिल्ली, नीता अंबानी यांनी सांगितला कुटुंबाचा ‘तो’ काळ

0
‘अंबानी आहेस की भिकारी,’ शाळेत उडवण्यात आली होती अनंत अंबानीची खिल्ली, नीता अंबानी यांनी सांगितला कुटुंबाचा ‘तो’ काळ



भारतातील सर्वात श्रीमंतांपैकी असतानाही मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी आपली मुलं आकाश, इशा आणि अनंत यांना आर्थिक शिस्त लावली होती. 
 



Source link

Sex and Relationship “सेक्स हा माझा लग्नसिद्ध अधिकार!”

0
Sex and Relationship “सेक्स हा माझा लग्नसिद्ध अधिकार!”



डॉ. शशांक सामक व डॉ. जेसिका सामक
Sex and Relationship for Marriage आनंद-आनंदी केस ही जरा वेगळी एवढ्याचसाठी होती की, वाट पाहून पाहून आनंदीने माझ्यासमोरच आनंदला ठणकावले की, घरी वारंवार उपाशी ठेवलं गेलं तर माणूस हॉटेलची वाट धरतो हे लक्षात ठेव. सेक्स हा माझा लग्नसिद्ध अधिकार आहे आणि तो तू नाकारता कामा नये. नाही तर तू लग्नच करायला नको होतं. तू माझा हा अधिकार नाकारलास तर मला माझं आयुष्य आनंदात घालवायचं पूर्ण स्वातंत्र्य आहे हे लक्षात ठेव. आनंदीचं हे धारिष्ट्य आणि मनीषाची सोशिकता या दोन्ही गोष्टींनी मला अंतर्मुख केले!
होमोसेक्शुआलिटी?
खरे तर माझ्याकडे आलेल्या दोन्ही केसेस सेक्स-काउन्सेलिंग काय व सेक्स-थेरपी यांच्या साहाय्याने सुटायला पाहिजे होत्या. पण सेक्ससाठीचा पुढाकार मनीष व आनंद दोघा नवऱ्यांकडून घेतला जात नव्हता ही फॅक्ट होती. (अर्थात इथे आम्हा सेक्सॉलॉजिस्टना ‘होमोसेक्शुआलिटी’चा विचारही करावा लागतो. मनीष व आनंद दोघांकडून अर्थातच अशी हिस्ट्री मिळाली नव्हती. मी त्यांना एकेकट्यांना विचारूनसुद्धा! पण कमीजास्त प्रमाणात त्याचे अंश असू शकतातही!).

लग्नामधील सेक्सची जबाबदारी

खरं म्हणजे अशा केसेस पाहिल्या की विवाहपूर्व काउन्सेलिंग किती आवश्यक असते हे सर्वांच्याच लक्षात येईल.
लग्न म्हणजे काय इथपासून लग्नामधील सेक्सची जबाबदारी याची जाणीव संबंधित दोघांनाही करून देणे आवश्यक आहे. बहुतेक नवविवाहितांचे संसार मोडण्यात ही जबाबदारी दुर्लक्षित केलेली किंवा झिडकारलेली असते. मग कोर्टात आरोप-प्रत्यारोपांचे रान उठवले जाते. जोडीदाराला कमीपणा दिला जातो. ‘इम्पोटन्स’, ‘फ्रिजिडिटी’ वगरे ब्रिटिश काळातील आणि आता आधुनिक सेक्सॉलॉजीतील कालबाह्य शब्द वापरले जातात. इगो दुखावून नाती फारच कडवट केली जातात. वकिलांची चलती आणि दाम्पत्याची फरफट बराच काळ होत राहते.

नवविवाहितांचे प्रॉब्लेम्स

खरे म्हणजे नवविवाहितांचे सेक्सविषयक सर्व प्रॉब्लेम हे कोर्टापेक्षा सेक्सॉलॉजिस्टच्या कक्षात सोडवता येऊ शकतात. मात्र त्यासाठी संबंधित जोडप्याचे मन:पूर्वक सहकार्य आवश्यक असते. ते त्या जोडप्यातील कोण्या एकाकडून मिळत नसल्यास मात्र आपला सेक्सचा ‘लग्नसिद्ध अधिकार’ मिळवायला दुसरी व्यक्ती मुखत्यार असते. मग व्यथित जोडीदाराकडून घटस्फोट किंवा ‘समाजदेखलं जुजबी’ लग्न टिकवण्यासाठी विवाहबाह्य मैत्रीसंबंध हे पर्याय निवडले जाऊ शकतात. आणि या साऱ्यासाठी त्या व्यथित जोडीदाराला दोष देण्यापेक्षा आपणच त्याला जबाबदार आहोत याची जाणीव संबंधित आडमुठय़ा जोडीदाराने ठेवणे आवश्यक आहे.

कामनिराशेतून आत्मघात

क्वचित प्रसंगीच व्यथित जोडीदार सहनशीलतेचा मार्ग स्वीकारून सर्व काही आलबेल असल्याचा आव आणतो. पण अशांवर पुढे कामजीवनाच्या वैफल्याने, शून्यतेने व्यक्तिमत्त्वावर, मानसिकतेवर निश्चितच परिणाम होऊन स्त्रियांमध्ये ओव्हरीचे, पाळीचे त्रास, ब्रेस्ट कॅन्सरसारख्या गंभीर व्याधीही उद्भवू शकतात. या कामनिराशेतून आत्मघातासारखेही प्रयत्न अशा ‘सहनशील’ व्यक्तीकडून होऊ शकतात. म्हणूनच कामजीवनात अशी सहनशीलता अनाठायीच नव्हे तर मूर्खपणाचीही असते हे अशांनी ध्यानात ठेवावे.

नवविवाहितांच्या लैंगिक समस्या

दाम्पत्यातील व्यक्तीसंबंधातील लाज, राग, संताप, चीड, तिरस्कार इथपासून सेक्सच्या विषयीची शरम, घृणा, अनभिज्ञता, भीती, काळजी यांसारख्या विविध कारणांचा समावेश नवविवाहितांच्या लैंगिक समस्यांमध्ये होतो. समलिंगी आकर्षणाचा प्रभाव हेही कारण तसे विरळ नाही. परंतु या सर्व कारणांचा अभ्यास करून ती दूर करता येतात. यासाठी ‘सेक्सॉलॉजी’ या आधुनिक वैद्यकीय स्पेशिआलिटीचा विचार करणे महत्त्वाचे आहे. ‘सेक्स व रिलेशनशिप’ काउन्सेलिंग आणि ‘सेक्स थेरपी’ म्हणजे लैंगिक समस्या सोडवण्यासाठीचे मार्गदर्शक ट्रेनिंग प्रोग्रम हेच महत्त्वाचे असतात. सरकारलाही याचे महत्त्व कळल्याने आणि संसार विस्कटून टाकण्यापेक्षा त्यांना तो सावरायला शिकवणे हे समाजस्वास्थ्याला उपकारक असते हेही जाणवल्याने फॅमिली कोर्टात ‘काउन्सेलिंग’चे सेशन्स त्या जोडप्याला देण्यावर भर दिला जातो ही अत्यंत स्पृहणीय गोष्ट आहे. (यापूर्वी चतुरंग पुरवणीमध्ये १६ मार्च २०१३ रोजी प्रकाशित झालेला लेख पुनर्प्रकाशित करत आहोत.)



Source link

फलटण नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

0
फलटण नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

फलटण : फलटण नगरपरिषदेचे विरोधी पक्षनेते मा.श्री. समशेरसिंह नाईक निंबाळकर (दादा) यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती.

यावेळी नगरसेवक सचिन अहिवळे (सर), माजी नगरसेवक डॉ. प्रविण आगवणे, कोळकी ग्रामपंचायत सदस्य सागर काकडे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे माजी अध्यक्ष अविनाश सरतापे, जीवन काकडे, प्रशांत काकडे, सनी मोरे, सुनील अहिवळे, भैय्या काकडे, युवराज काकडे, अमोल अहिवळे, विकी बोके, नटू काकडे, मुकेश रणपिसे, बारीक काकडे, जयराम माळी, नामदेव काकडे, अमित काकडे, अभिजित गायकवाड, किरण अहिवळे, नितिन अहिवळे, कपिल येवले, तुषार आढाव आदी उपस्थित होते.

या प्रसंगी सर्वांनी त्यांना शुभेच्छा देत दीर्घायुष्य व यशस्वी राजकीय कारकीर्दीच्या सदिच्छा व्यक्त केल्या.

archer Madhura Dhamangaonkar makes it to the Indian team for the World University Games Amravati

0
archer Madhura Dhamangaonkar makes it to the Indian team for the World University Games Amravati



archer Madhura Dhamangaonkar makes it to the Indian team for the World University Games Amravati | अमरावतीच्या मधुरा धामणगावकरची ‘तिरंदाजी’ आंतरराष्ट्रीय पातळीवर





Source link

नांदेड बँक संचित तोट्यातून मुक्त होण्याच्या मार्गावर!

0
नांदेड बँक संचित तोट्यातून मुक्त होण्याच्या मार्गावर!


नांदेड : येत्या एक एप्रिलपासून सुरू होणारे नवे आर्थिक वर्ष नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेसाठी आनंदाचे नि हर्षाचे ठरणार आहे. मागील १५ वर्षांहून अधिक काळापासून बँकेच्या अहवालात लागलेल्या संचित तोट्याच्या काळ्या डागापासून ही संस्था मुक्त होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.

स्थापनेची शताब्दी पार केलेल्या या बँकेचा ताळेबंद सन २००० च्या सुमाराला बिघडला होता. पण त्याची तमा न बाळगता तत्कालिन कारभाऱ्यांनी मनमानी केल्यामुळे २००५ साली रिझर्व्ह बँकेने जिल्हा बँकेवर निर्बंध लागू केले तर राज्याच्या सहकार खात्याने संचालक मंडळ बरखास्त करून बँकेवर आधी प्रशासक आणि मग प्रशासक मंडळ नेमले.

सुमारे पावणे चारशे कोटींचा संचित तोटा आणि ५६२ कोटींची अनुत्पादित कर्जे अशी २००७ साली या बँकेची स्थिती होती. या कठीण काळात तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी शासनातर्फे १०० कोटींचे बिनव्याजी कर्ज देऊन जिल्ह्याच्या या मध्यवर्ती बँकेला सावरले तर त्यांच्यानंतरचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी वरील कर्जाचे अनुदानात रुपांतर करून बँकेला मोठा दिलासा दिला.

प्रशासक मंडळाने बँकेतील अनावश्यक खर्चांना लगाम लावला. जिल्हाभर विखुरलेल्या तोट्यातील शाखा बंद केल्या आणि एकंदर कारभारात लक्षणीय सुधारणा केल्यानंतर २०१५ साली बँकेचा कारभार पुन्हा लोकनियुक्त प्रतिनिधींच्या हाती आला. तेव्हा अनुत्पादित कर्जाचा आकडा २०१ कोटींपर्यंत खाली आला होता.

येत्या ३१ मार्च अखेर बँकेची जिल्ह्यातील तीन साखर कारखान्यांकडे अडकून पडलेली रक्कम १०० कोटींच्या वर असली, तरी मागील दहा वर्षांत थकहमीबद्दल राज्य शासनाकडून प्राप्त झालेले २५ कोटी, कलंबर साखर कारखान्याच्या विक्रीतून बँकेच्या तिजोरीत जमा झालेले २२ कोटी आणि कायदेशीर उपाय तसेच तडजोडीतून विविध संस्थांकडून वसूल झालेले ६० कोटी यामुळे बँकेच्या संचित तोट्यात मोठी घट झाली.

बँकेला २००८ पासून प्रत्येक वर्षात नफा झाला. पण हा नफा २००७ पासूनच्या संचित तोट्यापुढे फिका पडत होता. मार्च २०२० अखेरीस बँकेचा संचित तोटा ११८ कोटींवर होता, पण त्यानंतरच्या चार वर्षांत वेगवेगळ्या मार्गांनी बँक प्रशासनाने हा तोटा भरून काढत तब्बल २० वर्षांनंतर बँकेच्या ताळेबंदातून ‘तोटा’ हा शब्द हद्दपार होईल, अशी स्थिती निर्माण केल्याचे सांगण्यात आले.

रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शनक तत्वांनुसार बँकेच्या अनुत्पादित कर्जांचे प्रमाण १५ टक्क्यांच्या वर असता कामा नये आणि व्यवस्थापन खर्च एकूण उलाढालीच्या २ टक्केपेक्षा जास्त होऊ नये. या दोन्ही अटींची पूर्तता बँकेकडून नव्या वर्षात झालेली असेल, असा विश्वास बँक प्रशासनाने व्यक्त केला आहे. मागील काही वर्षात बँकेतील प्रशिक्षित मनुष्यबळ घटले, तरी उपलब्ध अधिकारी आणि कर्मचा-यांच्या माध्यमातून बँकेने संचित तोटा भरून काढत या बँकेला गतवैभव प्राप्त करून देण्याच्या दिशेने पाऊल टाकल्याचे मानले जात आहे.



Source link

थायलंडमध्ये जर्मन तरुणीवर अत्याचार करणाऱ्या साताऱ्यातील दोन तरुणांना कोणती शिक्षा मिळणार?

0


Satara Crime : साताऱ्यातील दोन तरुणांनी थायलंडमध्ये जात भारताची मान शरमेने खाली घालणारं कृत्य केलं होतं. विजय दादासाहेब घोरपडे (वय 47) आणि राहुल बाळासाहेब भोईटे (वय 40) या साताऱ्यातील दोन तरुणांनी थायलंडमधील एका बीचवर 24 वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार केले होते. दरम्यान, तरुणीने तक्रार दाखल केल्यानंतर दोघांना थायलंड पोलिसांनी अटक केली असून त्यांना तुरुंगात रवाना करण्यात आलंय. 

थायलंडमध्ये 14 मार्च रोजी रिन बीचवर फुल मून पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पीडित तरुणी तिच्य मित्रासोबत या ठिकाणी आली होती. ही पार्टी रात्रभर सुरुच राहिली. दरम्यान पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास साताऱ्यातील या दोन तरुणांनी पीडितेला खडकाळ भागात नेले आणि त्याठिकाणी त्यांच्यावर अत्याचार केले. त्यानंतर या तरुणांनी राहत असलेल्या बंगल्याकडे पळ काढला. दरम्यान, अत्याचार झाल्यानंतर तरुणी शुद्धीत नव्हती. त्यामुळे पोलिसांनी घटना उघडकीस आल्यानंतर तपास सुरु केला होता. दरम्यान, तरुणी शुद्धीत आल्यानंतर तिने आरोपींची ओळख पटवली. दरम्यान,  विजय घोरपडे यांने त्याच्यावर करण्यात आलेले आरोप मान्य केले. तर राहुल भोईटे यांनी आरोप नाकारले होते. परंतु, पिडीतेला मिठी मारल्याचे आणि तिचे चुंबन घेतल्याचे कबूल केले. पण पीडितेने प्रतिकार केला म्हणून आम्ही तिच्यावर बलात्कार केला नाही, असा दावा राहुल भोईटे यांनी केला.

साताऱ्यातील दोन तरुणांवरील आरोप सिद्ध झाल्यास कोणती शिक्षा दिली जाऊ शकते?

दरम्यान, साताऱ्यातील या दोन तरुणांवरील आरोप सिद्ध झाल्यास त्यांना कोणती शिक्षा मिळू शकते? थायलंडमधील काय सांगतो? जाणून घेऊयात.. थायलंडमध्ये 276 ते 281 या कलमान्वये आरोपींना देण्यात येणाऱ्या शिक्षेची तरतुद केली आहे. 

थायलंडमधील  Siam Legal International, a full service law firm च्या माहितीनुसार, जर एखाद्या महिलेच्या इच्छेविरोधात कोणत्याही प्रकारे धमकी देऊन किंवा हिंसाचार करुन लैंगिक अत्याचार केल्यास संबंधित आरोपीला  कलम 276 नुसार 4  ते 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली जाऊ शकते. यशिवाय दंड देखील ठोठावला जाऊ शकतो. 

कलम 277 नुसार, 15 वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या किंवा अल्पवयीन मुलीवर  लैंगिक अत्याचार केल्यास 4 ते 20 वर्षांची शिक्षा सुनावली जाऊ शकते. अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याच्या प्रकरणात मुलीची संमती असो अथवा नसो थायलंडमध्ये हा गुन्हाच ठरतो. जर अत्याचाराचा गुन्हा 13 वर्षांपेक्षा लहान मुलीवर झाला तर  गुन्हेगाराला 7 ते 20 वर्षांचा तुरुंगवास आणि न्यायालयाने सुनावलेली दंडाची रक्कम भरावी लागते. 

मात्र, जर 15 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या मुलीवर तिच्या संमतीने शारीरिक संबंध ठेवण्यात आले तर न्यायालयाकडून लग्नाची परवानगी दिली जाऊ शकते. तर गुन्हेगाराला देखील कोणतीही शिक्षा सुनावली जाणार नाही. न्यायालयाने शिक्षा भोगत असताना त्यांना एकत्र लग्न करण्याची परवानगी दिली, तर न्यायालय अशा गुन्हेगाराला मुक्त करेल.

जर 276 किंवा 277 कलमान्वये गुन्हे केलेल्या प्रकरणात पीडितेला गंभीर शारीरिक हानी पोहोचली तर, गुन्हेगाराला 15 ते 20 वर्षांचा तुरुंगवास किंवा जन्मठेपेची शिक्षा  दिली जाऊ शकते. पीडितेचा मृत्यू झाला असेल तर गुन्हेगाराला मृत्युदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा होईल.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

बायकोचं अफेअर रंगेहात पकडलं नवऱ्याच्या संतापाचा कडेलोट; पत्नीचा प्रियकर असलेल्या योगा टिचरला संपवून 7 फुट खोल खड्ड्यात पुरलं

Suspended PSI Ranjit Kasale: गाड्या पकडणं, पैशांच्या पेट्या अन्…; निलंबन होताच पोलिसाचे परळी विधानसभा निवडणुकीबद्दल धक्कादायक दावे, मुंडेंच्या अडचणी वाढणार?

अधिक पाहा..



Source link

राज्य पोलीस दल आता ‘बालस्नेही’ होणार; पोलीस दलाला युनिसेफ सहकार्य करणार

0
राज्य पोलीस दल आता ‘बालस्नेही’ होणार; पोलीस दलाला युनिसेफ सहकार्य करणार


या प्रशिक्षणासाठी सुवर्णा पवार, उप विभागीय आयुक्त, महिला व बाल विकास विभाग, नंदिनी आवाडे, सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य महिला आयोग, संतोष शिंदे, माजी सदस्य, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग आणि संस्थापक, विधायक भारती, साची मनियार, संस्थापक, अशियाना फाउंडेश, राहुल कांतिकार, अधीक्षक, सरकारी निरीक्षणगृह, डोंगरी, सुमित्रा आष्टीकर, माजी अध्यक्षा, बालकल्याण समिती, ठाणे, गोविंद बेनीवाल, बाल संरक्षण अधिकारी, युनिसेफ महाराष्ट्र, उमा सुब्रमणियन, संचालक, रती फाउंडेशन, महेश आठवले, निवृत्त पोलिस निरीक्षक, महाराष्ट्र पोलीस आणि अल्पा वोरा, बाल संरक्षण विशेषज्ञ, युनिसेफ महाराष्ट्र उपस्थित होते.



Source link

बेकायदा बॅनरबाजीला चाप, उल्हासनगरात १३ गुन्हे दाखल, कारवाई सुरूच

0
बेकायदा बॅनरबाजीला चाप, उल्हासनगरात १३ गुन्हे दाखल, कारवाई सुरूच


उल्हासनगर : कोणत्याही ठिकाणी बेकायदा पद्धतीने लावले जाणारे जाहिरात फलक, होर्डींग याविरूद्ध उल्हासनगर महापालिका प्रशासनाने आक्रमक भूमिका घेत अशी बॅनरबाजी करणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्यास सुरूवात केली आहे. गेल्या काही दिवसात उल्हासनगर महापालिकेने केलेल्या कारवाईत १३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापुढेही ही कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती उल्हासनगर महापालिका प्रशासनाने दिली आहे.

शहरात कोणत्याही ठिकाणी बेकायदा जाहिरात फलक, होर्डीग, प्रदर्शित होणार नाहीत यादृष्टीने उच्च न्यायालयाने जनहित याचिका क्रमांक १५५/२०११ मध्ये आदेश दिलेले आहेत. हा आदेश शहरातील नागरिकांच्या तसेच सर्व राजकीय पक्षांच्या निदर्शनास यापूर्वी वेळोवेळी आणून दिलेले आहेत. त्यानंतरही उल्हासनगर शहरात ठिकठिकाणी राजकीय व्यक्ती, कंपन्या आणि इतर जाहिरातींचे फलक प्रदर्शित होत असल्याचे पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आले होते.

त्यामुळे उल्हासनगर महापालिका प्रशासनाने प्रभाग समितीच्या सहायक आयुक्तांना अशा फलकबाजीवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर उल्हासनगर महापालिकेच्या प्रभाग समिती अधिकाऱ्यांनी आपापल्या प्रभागात कारवाई केली होती. त्यानंतर प्रभाग समिती १ ते ४ कार्यालयाच्या अखत्यारितील विविध ठिकाणी १३ गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकानुसार दिली आहे.

यात उल्हासनगर पोलीस ठाण्यात ४, मध्यवर्ती पोलीस ठाण्यात ३, विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात ४, हिललाईन पोलीस ठाण्यात २ असे एकूण १३ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. उल्हासनगर महापालिका विनापरवानगी अनधिकृत होर्डींग, जाहिरात फलकांवर दररोज कारवाई केली जात असून नागरिकांनी अशाप्रकारे फलकबाजी न करण्याचे आवाहन केले आहे.



Source link

फक्त १८ मिनिटात चार्ज होणार, ६६३ किमीच्या रेंजनी धावणार, या इलेक्ट्रिक गाडीची एवढी आहे किंमत; वाचा सविस्तर माहिती

0
फक्त १८ मिनिटात चार्ज होणार, ६६३ किमीच्या रेंजनी धावणार, या इलेक्ट्रिक गाडीची एवढी आहे किंमत; वाचा सविस्तर माहिती



2025 Kia EV6 Electric SUV Launched: Price, Features, and Design| Kia EV6 Electric SUV: फक्त १८ मिनिटात चार्ज होणार, ६६३ किमीच्या रेंजनी धावणार, या इलेक्ट्रिक गाडीची एवढी आहे किंमत; वाचा सविस्तर माहिती





Source link