Sunday, June 28, 2026
Home Blog Page 45

सोमंथळीपूलदुर्घटना : करंज ओढ्यावरच्या नव्या पुलाचा स्लॅब कोसळला, ठेकेदारावर कारवाईची मागणी

0
सोमंथळीपूलदुर्घटना : करंज ओढ्यावरच्या नव्या पुलाचा स्लॅब कोसळला, ठेकेदारावर कारवाईची मागणी

फलटण – सोमंथळी येथील करंज ओढ्यावर नव्याने उभारण्यात येत असलेल्या सिमेंट काँक्रिट पुलाच्या कामाला नुकतीच सुरुवात झाली असताना मोठी दुर्घटना घडली आहे. पुलाच्या वरच्या मजल्यावरील (स्लॅब) काम सुरू असतानाच तो अचानक कोसळल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे बांधकामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून संबंधित ठेकेदाराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
सोमंथळीतील करंज ओढ्यावरचा पूल अनेक वर्षांपासून रखडलेला होता. टिकाऊ व दर्जेदार पूल व्हावा यासाठी ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. विविध माध्यमांतूनही या संदर्भात वारंवार बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर अखेर या पुलासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाला आणि कामास सुरुवात झाली. मात्र कामाच्या सुरुवातीलाच स्लॅब कोसळल्याने संपूर्ण प्रकल्पाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
काम सुरू असतानाच पुलाचा भाग कोसळत असेल, तर पुढील बांधकाम किती सुरक्षित असेल, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. “बांधकामाच्या टप्प्यातच पूल ढासळत असेल, तर पूर्ण झाल्यानंतर त्याच्या सुरक्षिततेची हमी कोण देणार?” अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषी ठेकेदारावर कठोर कारवाई करावी, तसेच उर्वरित काम दर्जेदार साहित्य व तांत्रिक देखरेखीखाली नव्याने करावे, अशी ठाम मागणी सोमंथळी व परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे. निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या संबंधित ठेकेदाराकडून काम काढून घेऊन दुसऱ्या सक्षम ठेकेदाराकडे देण्यात यावे, अशीही मागणी होत आहे.
सोमंथळीचे पोपट गोफणे यांनी सांगितले, “नवीन पुलाच्या वरच्या स्लॅबचे काम सुरू असताना तो कोसळल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करून काम दुसऱ्या ठेकेदाराकडे द्यावे.”

अकलूजमध्ये राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचा जल्लोष; सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या १०८ व्या जयंतीनिमित्त भव्य आयोजन

0
अकलूजमध्ये राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचा जल्लोष; सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या १०८ व्या जयंतीनिमित्त भव्य आयोजन

अकलूजमध्ये राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचा जल्लोष; सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या १०८ व्या जयंतीनिमित्त भव्य आयोजन


अकलूज  : सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांच्या १०८ व्या जयंतीनिमित्त अकलूज येथील स्मृतीभवन, शंकरनगर येथे दि. २८ फेब्रुवारी व १ मार्च २०२६ रोजी राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
ही माहिती अकलूज नगरपरिषदेचे नगरसेवक सयाजीराजे मोहिते पाटील यांनी सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याच्या विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
 लावणीचा वैभवशाली प्रवास
जयंती समारंभ समितीचे संस्थापक अध्यक्ष जयसिंह मोहिते पाटील यांनी सहकार महर्षींच्या अमृतमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त जानेवारी १९९३ पासून राज्यस्तरीय लावणी स्पर्धेला प्रारंभ केला होता. सन २०१८ पर्यंत अखंड सुरू राहिलेल्या या स्पर्धेमुळे अनेक लावणी कलाकारांना राज्य, देश आणि परदेशातही कार्यक्रम सादर करण्याची संधी मिळाली.
या व्यासपीठातून अनेक कलावंतांना चित्रपट व रिअॅलिटी शोमध्ये काम करण्याची संधी मिळाली असून अकलूजची लावणी देशाबरोबरच परदेशातही पोहोचली आहे.
समितीच्या अध्यक्षा कु. स्वरूपाराणी मोहिते पाटील यांनी २०२४ पासून या स्पर्धेला नवचैतन्य देत पुन्हा जोमाने सुरुवात केली असून आजही त्यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन सुरू आहे.
 २९ वे वर्ष – बादशाही रंगमंचावर रंगणार लावणीचा जल्लोष
यंदाचे स्पर्धेचे २९ वे वर्ष असून स्मृतीभवन, शंकरनगर येथील बादशाही रंगमंचावर महाराष्ट्रातील ११ निवडक पार्थ्यांचा सहभाग असणार आहे.
पारंपरिक व नवकवींच्या लावण्यांचा नजराणा, ढोलकीची दमदार थाप, घुंगरांचा नाद, पदन्यासाची नजाकत आणि पेटी-तबल्याची संगत यांचा सुरेख संगम रसिकांना अनुभवता येणार आहे.
 भव्य पारितोषिकांची लयलूट
磊 प्रथम क्रमांक – ₹ ३,००,०००
賂 द्वितीय क्रमांक – ₹ २,००,०००
雷 तृतीय क्रमांक – ₹ १,००,०००
 उत्कृष्ट नृत्यांगना – ₹ ५,००० व कै. श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील स्मृतीचषक
 उत्कृष्ट अदा (वैयक्तिक) – ₹ ५,०००
 उत्कृष्ट मुजरा – ₹ ३,०००
論 उत्कृष्ट ढोलकीपटू – ₹ १,०००
 उत्कृष्ट पार्श्वगायिका – ₹ १,०००
 उत्कृष्ट पेटीवादक – ₹ १,०००
論 उत्कृष्ट तबलावादक – ₹ १,०००
 स्पर्धेतील सहभागी पार्थ्या
 शनिवार, दि. २८ फेब्रुवारी २०२६
वैशाली समसापुरकर – जय अंबिका सांस्कृतिक कला केंद्र, सणसवाडी
काजल-स्वाती जळगावकर – अलंकार सांस्कृतिक कला केंद्र
बेला, श्रद्धा नेटूरकर – जय भवानी सांस्कृतिक कला केंद्र, खोसपुरी पंढरीचापूल, जि. अहिल्यानगर
अपर्णा, कीर्ती नगरकर – लक्ष्मी सांस्कृतिक कला केंद्र, सणसवाडी, जि. पुणे
गोकुळ शिरगाव – सांस्कृतिक कला केंद्र, ता. कागल, जि. कोल्हापूर
 रविवार, दि. १ मार्च २०२६
छाया, पूजा, श्रद्धा कोल्हापूरकर – रेणुका सांस्कृतिक कला केंद्र, अंबप वाठार, जि. कोल्हापूर
जोत्स्ना वाईकर – पिंजरा सांस्कृतिक कला केंद्र
नटरंग सांस्कृतिक कला केंद्र – वेळे, ता. वाई, जि. सातारा
ग्रुप पार्टी – मोडनिंब, ता. माढा, जि. सोलापूर
राजनंदिनी सांस्कृतिक कला केंद्र – यवत चौफुला, जि. पुणे
वैष्णवी कोल्हापूरकर – रेणुका सांस्कृतिक कला केंद्र, अंबप वाठार, जि. कोल्हापूर
 प्रवेशिकेसाठी संपर्क : ९७६४११३६९५
या पत्रकार परिषदेस समितीचे सुभाष दळवी, महादेव अंधारे, अशोक जावळे, विजय दोशी, पोपटराव भोसले पाटील, बिभिषन जाधव, संजय गळीतकर, सुहास थोरात, सतीश यादव व इतर सदस्य उपस्थित होते.
अकलूजमध्ये रंगणाऱ्या या राज्यस्तरीय लावणी स्पर्धेमुळे सांस्कृतिक परंपरेला नवे बळ मिळणार असून रसिकांना दोन दिवस लावणीच्या ठेका-तालाचा अविस्मरणीय अनुभव घेता येणार आहे.
l

अजित पवार यांच्या कथित विमान अपघाताबाबत चौकशीची मागणी; बारामतीत निवेदन आंदोलन

0
अजित पवार यांच्या कथित विमान अपघाताबाबत चौकशीची मागणी; बारामतीत निवेदन आंदोलन


बारामती प्रतिनिधी :- अजित पवार  यांच्या कथित विमान अपघाताबाबत सोशल मीडियावर फिरणाऱ्या संदेशांच्या पार्श्वभूमीवर बारामतीत उद्या, सोमवार दि. २३ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता प्रांताधिकारी कार्यालयात शासनाला निवेदन देण्यात येणार आहे. अपघाताची निःपक्ष व जलद गतीने चौकशी करावी, तसेच घटनेबाबत अधिकृत व स्पष्ट माहिती जाहीर करावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात येणार आहे.
दि. २८ जानेवारी रोजी अजित पवार यांच्या विमानाला अपघात होऊन त्यामध्ये त्यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाल्याचा दावा काही संदेशांमध्ये करण्यात आला आहे. मात्र या संदर्भात अधिकृत स्तरावर कोणतीही पुष्टी झालेली नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे ही घटना प्रत्यक्षात घडली आहे का, की केवळ अफवा आहे, याबाबत स्पष्टता येणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.
अजित पवार हे बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचे नेतृत्व मानले जाते. त्यांच्या संदर्भातील अशा गंभीर स्वरूपाच्या बातम्यांमुळे नागरिकांमध्ये चिंता आणि विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. काही ठिकाणी अपघात होता की घातपात, अशा शंका उपस्थित केल्या जात आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने अधिकृत निवेदन जारी करून सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
बारामतीकरांच्या वतीने दिल्या जाणाऱ्या निवेदनात पुढील प्रमुख मागण्या करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे:
घटनेबाबत तात्काळ अधिकृत स्पष्टीकरण जाहीर करावे.
जर अपघाताची घटना घडली असेल, तर तिची उच्चस्तरीय आणि निःपक्ष चौकशी करावी.
चौकशी अहवाल ठरावीक कालावधीत सार्वजनिक करावा.
अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करावी.
नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बारामतीकरांची एकजूट दाखवावी आणि सत्य परिस्थिती समोर आणण्यासाठी पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
सध्या अधिकृत पुष्टी अभावी या प्रकरणाकडे अफवा आणि अप्रमाणित दाव्यांच्या स्वरूपात पाहिले जात असून, जबाबदारीने माहिती पडताळूनच प्रसारित करण्याचे आवाहन प्रशासनाकडूनही करण्यात येत आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावात रमले, शेतात झाडांची लागवड; विरोधकांच्या टीकेलाही प्रत्युत्तर

0


Eknath Shinde Farming at Dare Village  सातारा: विरोधकांना टीका करण्याशिवाय काहीच काम नाही. मी कधीच त्यांच्याकडे लक्ष देत नाही. मी शेतकऱ्याचा मुलगा याचा मला अभिमान आहे. गावी आल्यानंतर झाडे लावण्याचा कार्यक्रम कायम मी करतो. ग्लोबल वार्मिंगचा फटका आपण खातोय. प्रत्येकाने झाडे लावली पाहिजेत. पर्यावरणाचे जतन करणे याची पुढील पिढीला चांगला मेसेज जाईल, यामुळे मी विरोधकांकडे लक्ष देत नाही. मी शेतीमध्ये काम करतो असतो त्यामुळे विरोधकांचे मन कुठे रमत नाही, माझे मन मात्र शेतात रमतं असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. (Eknath Shinde Farming at Dare Village)

Eknath Shinde Satara : विरोधकांचे मन कुठे रमत नाही, माझे मन मात्र शेतात रमतं

राज्याची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरेगावी मुक्कामी आहेत. या दरम्यान नागरिकांच्या भेटीबरोबरच ते शेतातही रमलेले पाहायला मिळत आहेत. यावेळी त्यांनी अनेक वृक्षांची लागवड केली आहे. या भागात झाडांच्या रूपाने नवं नंदनवन केलं असल्याचं पाहायला मिळत आहे. शेकडो अवाकडू झाडांची लागवड या ठिकाणी केली जात आहे. या भागात जी झाडे उगवत नाही ती सुद्धा या ठिकाणी लावण्यात आले आहे. त्यात सफरचंद, काजू, अवाकडू , चंदन, रक्तचंदन अशी अनेक झाडे या ठिकाणी लावण्यात आली आहे. सर्व प्रकारचा भाजीपाला देखील या ठिकाणी आहे. ही जमीन देखील पोषक आहे.

Eknath Shinde at Satara : तरुणांनी मुंबईकडे न जाता इथेच थांबावा, यासाठी आमचा संकल्प

या ठिकाणचा तरुण मुंबईकडे न जाता इथेच थांबावा, यासाठी आमचा संकल्प आहे. यासाठी गटशेती, सेंद्रिय शेतीला आम्ही प्राधान्य देत आहोत. रासायनिक खते देखील आम्ही वापरत नाही. बांबूची लागवड ही या भागात मोठ्या प्रमाणात केली आहे. प्रतापगड, वासोटा किल्ला मकरंदगड अशा विविध गडांच्या पायथ्याशी आम्ही आहोत, यामुळे पर्यटनाला चालना मिळत आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटायला रात्री उशिरा सुद्धा दरेगावात गर्दी उसळल्याचे पाहायला मिळाले. एकनाथ शिंदे शनिवार रात्रीपासून विश्रांतीसाठी दरे गावात मुक्कामी आहे. यावेळी नेते, पदाधिकारी यांची शिंदे यांना भेटण्यासाठी सकाळपासून रिघ होती. काल उशिरा देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बाहेरून आलेल्या आणि भागातील लोकांना भेटून समस्या जाणून घेतल्या. आज दुपारी ते दरे गावचा 2 दिवसाचा दौरा संपऊन मुंबईकडे रवाना होणार आहेत.

आणखी वाचा

आणखी वाचा



Source link

आर्यावर्त ‘भारतवर्ष’ म्हणून कसे विस्तारले?: प्रत्येक संस्कृतीत वेगवेगळ्या आहेत; महापूर, जलप्रलयाशी संबंधित कथा

0
आर्यावर्त ‘भारतवर्ष’ म्हणून कसे विस्तारले?:  प्रत्येक संस्कृतीत वेगवेगळ्या आहेत; महापूर, जलप्रलयाशी संबंधित कथा




ऋ ग्वेदाचे अंतिम संकलन साधारणपणे १००० इसवी सनापूर्वी केले गेले असे मानले जाते. यामध्ये कुरुकुळातील सदस्यांसाठी ‘भरत’ शब्दाचा वापर केला गेला आहे. या कुळातील सदस्य सिंधू नदीच्या खोऱ्यापासून गंगेच्या पश्चिम तटापर्यंत पसरलेल्या क्षेत्रावर नियंत्रण ठेवत असत. हा भूभाग आज पंजाब आणि हरियाणा म्हणून ओळखला जातो. या दृष्टीने भरत कुळातील राजांना हिंदुस्थानच्या सुरुवातीच्या राजांमध्ये गणले जाते. या राजांनी गंगेच्या मैदानी प्रदेशात वैदिक संस्कृतीची स्थापना आणि प्रसार करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
साधारण एक हजार वर्षांनंतर, म्हणजेच १०० इसवी सनापूर्वीच्या आसपास ओडिशामध्ये जैन राजा खारवेलच्या शिलालेखात गंगेच्या मैदानी क्षेत्राला ‘भारतवर्ष’ म्हटले गेले आहे. हा उल्लेख सांगतो की, तोपर्यंत हे नाव एक भौगोलिक-सांस्कृतिक ओळख म्हणून प्रस्थापित झाले होते. साधारण याच कालखंडात भरत राजांची कथा ऋषी व्यासांद्वारे संस्कृत महाकाव्याच्या रूपात संकलित केली गेली. सुरुवातीला हा ग्रंथ ‘जय’ आणि नंतर ‘महाभारत’ नावाने प्रसिद्ध झाला. महाभारतात ययाती, शंतनू, पुरू, कुरू आणि भरत यांसारख्या राजांच्या कथा वर्णिल्या आहेत. कारण या राजांचा उल्लेख आधी ऋग्वेदातही मिळतो, त्यामुळे असे मानणे स्वाभाविक वाटते की महाभारतात वैदिक विचारांचे विस्तृत रूप मांडले गेले असेल. परंतु वास्तव मध्ये परिस्थिती यापेक्षा वेगळी दिसून येते. या नव्या महाकाव्यात भरताला शकुंतला आणि दुष्यंत यांचा पुत्र सांगितले आहे. शकुंतला ही मेनका आणि विश्वामित्राची मुलगी आहे. येथे मेनका एक अप्सरा आहे आणि विश्वामित्र सूर्यवंशी मानले जातात. दुसरीकडे दुष्यंत चंद्रवंशी आहेत. अशा प्रकारे राजा भरतमध्ये हिंदूु्थानच्या दोन महान राजवंशांचा (सूर्यवंश आणि चंद्रवंश) संगम दाखवला गेला आहे. साधारण ५०० इसवीमध्ये रचित विष्णुपुराणात भरत नावाच्या एका अन्य व्यक्तीचा उल्लेख मिळतो, जो राजा ऋषभनाथाचा पुत्र होता. ऋषभनाथाने तपस्वी बनल्यानंतर भरताने राजपद सांभाळले होते. ऋषभनाथ जैन परंपरेत प्रथम तीर्थंकर मानले जातात. जैन धर्मात जीवनात संयम आणि तपस्येला विशेष महत्त्व दिले गेले आहे. जैन विचारांचा प्रारंभ सुरुवातीपासूनच मौखिक स्वरूपात होत राहिला. जैन ग्रंथांनुसार भरत, ऋषभनाथांचे पुत्र आणि हिंदुस्थानचे पहिले चक्रवर्ती सम्राट होते. त्यांनी आपल्या ९९ भावांना पराजित करून मेरुपर्वतावर आपले नाव कोरले. परंतु त्यांचा अहंकार तेव्हा तुटला, जेव्हा त्यांना समजले की मेरुपर्वतावर त्यांच्याआधीही अनेक नावे कोरलेली होती. अशा वेळी प्रश्न पडतो की तो भरत कोण आहे, ज्याच्या नावावरून हिंदुस्थानला भारतवर्ष म्हटले जाते? ते वेदांत वर्णित राजे आहेत, महाभारताचे पात्र आहेत की जैन ग्रंथात उल्लेखित चक्रवर्ती सम्राट आहेत? या संदर्भात हे समजून घेणे आवश्यक आहे की कोणत्याही राजाने कधीही संपूर्ण हिंदुस्थानवर प्रत्यक्ष रूपाने शासन केले नाही. साधारण २३०० वर्षांपूर्वी सम्राट अशोकाने उत्तर भारतापासून दक्षिण केवळ तुंगभद्रा नदीपर्यंतच्या व्यापार मार्गांवरच नियंत्रण प्रस्थापित केले होते. अकबराचे शासनही प्रामुख्याने उत्तर भारतापर्यंत मर्यादित होते. इंग्रजांच्या शासनकाळातही अनेक संस्थाने स्वतंत्रपणे कार्यरत होती. हिमालयापासून महासागरापर्यंत पसरलेल्या एका अखंड भारताची धारणा मूलतः राजकीय नाही, तर सांस्कृतिक राहिली आहे.
सर्वात प्रसिद्ध पूर-वृत्तांत बायबलच्या ‘ओल्ड टेस्टामेंट’मध्ये आढळतो. त्यानुसार, मानवतेच्या वाढत्या क्रूरतेमुळे क्षुब्ध होऊन सृष्टीकर्ता म्हणजेच एकमेव ईश्वर ‘जेहोवाह’ने पृथ्वी जलमय करण्याचा निर्णय घेतला. ‘नोआह’ हा एक सत्शील आणि नीतिमान माणूस असल्याने, जेहोवाहने त्याला आगामी विनाशाची सूचना देऊन सुरक्षित राहण्याचा मार्ग सांगितला. बायबलमधील हे आख्यान प्राचीन सुमेरच्या परंपरांमधून उगम पावलेले मानले जाते, जिथे आजचा इराक स्थित आहे. परंतु तिथे केवळ एक देव नाही, तर ‘अनुनकी’ नावाचा देवसमूह मनुष्यांच्या कोलाहलामुळे क्रोधित होऊन पृथ्वीवर जलप्रलय आणतो. ग्रीस कथाही देवांचा अधिपती ‘झ्यूस’ने महापूर पाठवून मानवतेचा विनाश केला. यात ‘प्रोमीथीअस’ नावाच्या देवाच्या हस्तक्षेपामुळे ‘डेडलस’ नामक व्यक्ती बचावली. ज्याने आपल्या खांद्यामागे दगड फेकले आणि त्यातून मनुष्यांची उत्पत्ती झाली, असे सांगते. या सर्व पाश्चात्त्य आख्यानांमध्ये जलप्रलय हा दैवी क्रोधाचा परिणाम आहे. मात्र, चीन आणि भारताच्या कथांमध्ये कोणत्याही क्रोधित देवतेचा उल्लेख आढळत नाही. चिनी आख्यानानुसार, सर्वोच्च देवी ‘नूवा’ हिने आपल्या मनोरंजनासाठी मनुष्यांची रचना केली होती. एके दिवशी देवांमध्ये झालेल्या युद्धामुळे ज्या स्तंभांवर स्वर्ग टिकला होता ते नष्ट झाले आणि मुसळधार पाऊस सुरू झाला. यामुळे पृथ्वी जलमय झाली. तेव्हा नूवा देवीने एका विशाल कासवाच्या पायांच्या साहाय्याने स्वर्गाची भेग भरून काढली आणि पाऊस थांबला.



Source link

गोड बोलून हनी ट्रॅप; व्यावसायिकाकडून ४० लाखांची खंडणी — १० जण अटकेत, ३२.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त

0
गोड बोलून हनी ट्रॅप; व्यावसायिकाकडून ४० लाखांची खंडणी — १० जण अटकेत, ३२.७२ लाखांचा मुद्देमाल जप्त

फलटण, दि. २० (प्रतिनिधी): गोड बोलून प्रेमाच्या जाळ्यात ओढत खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत मारहाण करून खंडणी उकळणाऱ्या टोळीचा फलटण शहर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी एका महिलेसह १० संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून तब्बल ३२ लाख ७२ हजार ८०९ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
असे घडले प्रकरण
कापूरहोळ येथील व्यावसायिक आनंद काशिनाथ दळवी यांच्याशी दहा दिवसांपूर्वी फलटणमधील एका महिलेने मोबाईलवर संपर्क साधला. व्हॉट्सअ‍ॅप कॉलद्वारे ओळख वाढवत तिने त्यांना प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि फलटण येथे येण्यासाठी प्रवृत्त केले.
दि. १३ रोजी संबंधित महिलेने दळवी यांना फलटणमधील एका फ्लॅटवर बोलावले. तेथे आधीच कट रचून तिच्या साथीदारांनी दळवी यांना खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली. शिवीगाळ, दमदाटी व मारहाण करत ४० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली.
संशयितांनी दळवी यांच्याकडून जबरदस्तीने १ लाख ९५ हजार रुपये रोख तसेच एटीएम व क्रेडिट कार्डच्या माध्यमातून रक्कम उकळली. त्यानंतर पुणे रस्त्याने सोडण्याच्या बहाण्याने नेत असताना त्यांच्या गळ्यातील सुमारे २० तोळे वजनाची अंदाजे ३० लाख रुपये किंमतीची सोन्याची चेन मारहाण करून हिसकावून घेतली.
तक्रारीनंतर पोलिसांची कारवाई
या घटनेनंतर आनंद दळवी यांनी फलटण शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे संशयितांचा माग काढला.
पोलिसांनी शिताफीने पुढील संशयितांना ताब्यात घेतले:
साहिल रवी तारे (दत्तनगर, फलटण),
वैभव बाळासो सस्ते (सस्तेवाडी, ता. फलटण),
रोहन नवीन काकडे (मंगळवार पेठ, फलटण),
विनायक बाळासो जाधव (ठाकुरकी, ता. फलटण),
राज राम बोके (मंगळवार पेठ, फलटण),
विजय दत्तु ननवरे (झिरपे गल्ली, मंगळवार पेठ, फलटण),
तुषार ऊर्फ गदया संजय ननावरे (झिरपे गल्ली, मंगळवार पेठ, फलटण),
सागर ऊर्फ टक्या मोहन साळुंखे (वीर, ता. पुरंदर),
राहुल रामचंद्र जगताप (कसबा पेठ, फलटण)
आणि एक महिला आरोपी.
तपासात या सर्वांचा गुन्ह्यात सहभाग स्पष्ट झाल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे.
३२ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त
संशयितांकडून रोख रक्कम, दागिने, मोबाईल फोन, वाहने असा एकूण ३२ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अटक केलेल्या आरोपींपैकी पाच जण सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी विविध गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांचे मार्गदर्शन व पथक
ही कारवाई फलटणचे पोलीस उपअधीक्षक विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरविंद काळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे, पोलीस उपनिरीक्षक दिनेश शिंदे, अयोध्या घोरपडे तसेच गुन्हे प्रकटीकरण विभागाच्या पथकाने केली.
फलटण शहर पोलिसांच्या या कारवाईमुळे हनी ट्रॅपच्या माध्यमातून खंडणी उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला असून व्यावसायिक व नागरिकांनी अनोळखी व्यक्तींशी संपर्क साधताना सावधगिरी बाळगावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

शिंदे विश्रांतीसाठी दरेगावात! चर्चा मात्र जिल्हा परिषदेच्या जोडणीची, साताऱ्यात शिवसेनेचं ठरलं

0


सातारा: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या दरेगावी दोन दिवस मुक्कामी आहेत. हा उपमुख्यमंत्र्यांचा विश्रांती दौरा असला तरीसुद्धा या ठिकाणी राजकीय चर्चांना उधाण आल्याचे चित्र पाहायला मिळतंय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील दरेगावी असल्यामुळे त्यांच्या पक्षाचे नेते किंवा राष्ट्रवादीचे काही नेते त्यांना भेटण्यासाठी येतात का याबाबत सध्या चर्चा जिल्ह्यात सुरू आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेचा तिढा सुटला नसल्यामुळे जिल्ह्यातील अनेकांचं लक्ष या घडामोडींकडे लागलेलं आहे.

सातारा जिल्हा परिषदेमध्ये त्रिशंकू परिस्थिती आहे. बहुमतासाठी 33 चा आकडा कोणालाच गाठता आला नाही. अशा परिस्थितीत भाजपला 27 जागा जिंकता आल्या आहेत, तर राष्ट्रवादीने 20 जागा जिंकल्या आहेत. तसेच शिवसेनेने 15 जागा जिंकल्या आहेत. यामुळे सत्ता कोण स्थापन करणार याकडे जिल्ह्यातील लोकांचे लक्ष लागलं आहे.

राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र येत सत्ता स्थापन करतील अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून साताऱ्यात पाहायला मिळते. यामुळे एकनाथ शिंदे या ठिकाणी आल्यानंतर काही घडामोडी घडतात का याबाबत सातारा जिल्ह्यात सध्या चर्चा सुरू आहे. 

सातारा जिल्हा परिषद संख्याबळ : एकूण जागा 65

  • भाजप : 27
  • राष्ट्रवादी काँग्रेस : 20
  • शिवसेना : 16
  • स्वाभिमानी शेतकरी संघटना : 01
  • काँग्रेस : 01
  • अपक्ष : 01

एकनाथ शिंदेंचा ग्रीन सिग्नल

साताऱ्यात राष्ट्रावादी काँग्रेसचे 20 आणि शिवसेनेचे 16 सदस्य एकत्र येऊन सत्ता स्थापनेसाठी प्रयत्न करत असल्याची माहिती आहे. स्वबळावर निवडणूक लढवलेल्या भाजपचेही प्रयत्न सुरू आहेत. परंतु, निवडणुकीच्या काळात भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये जोरदार टीका झाल्याने या दोन्ही पक्षांचे एकमेकांशी बिनसल्याची माहिती आहे. 

साताऱ्याचे पालकमंत्री आणि शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादीचे मंत्री मकरंद पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतल्याची माहिती आहे. या भेटीत एकनाथ शिंदे यांनी साताऱ्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यास ग्रीन सिग्नल दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.

भाजपकडून प्रयत्न सुरू

दरम्यान, सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपाचाच होईल यासाठी आमचे प्रयत्न सुरू असून याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वरिष्ठ स्तरावर बोलत आहेत असं मंत्री जयकुमार गोरे यांनी स्पष्ट केलं. साताऱ्यात महायुती म्हणून पुढे जाऊ. तसे न घडल्यास चमत्कार करायची इच्छा नाही, पण वेळ पडल्यास चमत्कार करून दाखवावा लागेल असंही जयकुमार गोरे म्हणाले. 

ही बातमी वाचा:

आणखी वाचा



Source link

दिल्लीत अतिरेकी हल्ल्याचा कट; लाल किल्ला आणि चांदणी चौकात हाय अलर्टची घोषणा

0
दिल्लीत अतिरेकी हल्ल्याचा कट; लाल किल्ला आणि चांदणी चौकात हाय अलर्टची घोषणा


Manali Sagvekar

सध्या ‘झी 24 तास डिजिटल’मध्ये कॉन्टे्ट रायटर म्हणून इंटर्नशिप करत आहे. याआधी ‘सकाळ मीडिया’ ग्रुपमध्ये (जानेवारी २०२४ – एप्रिल २०२४) एंटरटेनमेंट बीटचा भाग म्हणून इंटर्नशिप केली आहे, जिथे मराठी मनोरंजन बातम्या, सेलिब्रिटी अपडेट्स आणि डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी जीवनशैली सेक्शनमध्ये कॉन्टेन्ट रायटर म्हणून काम केले आहे. नंतर, ‘साम टीव्ही मराठी’मध्ये (जुलै २०२५ – सप्टेंबर २०२५) डिजिटल न्यूजरूम (लाइफस्टाइल बीट) मध्ये देखील इंटर्नशिप केली, जिथे मराठीमध्ये आकर्षक जीवनशैली कॉन्टेन्ट तयार केले, CMS आणि Google Workspace सह काम करायला शिकले आणि डिजिटल सामग्री वर्कफ्लोमध्ये अनुभव मिळवला.

…Read More





Source link

सातारा जिल्हा परिषदेत सत्तेचा तिढा; भाजपचा दावा तर शिवसेना-राष्ट्रवादीच्या हालचालींना वेग

0
सातारा जिल्हा परिषदेत सत्तेचा तिढा; भाजपचा दावा तर शिवसेना-राष्ट्रवादीच्या हालचालींना वेग

सातारा प्रतिनिधी :- सातारा जिल्हा परिषदेत सत्तेचा तिढा; भाजपचा दावा तर शिवसेना-राष्ट्रवादीच्या हालचालींना वेग
सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यानंतर सत्तेचा तिढा कायम आहे. कोणाचा अध्यक्ष होणार याबाबत राजकीय वातावरण तापले असून भाजप आणि शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील शाब्दिक चकमकींना सुरुवात झाली आहे.

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी “काहीही झालं तरी जिल्हा परिषद अध्यक्ष भाजपचाच होणार” असा ठाम दावा केला होता. त्यावर प्रत्युत्तर देताना शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी खोचक टीका केली. “ते आमच्यापेक्षा मोठे आणि दिग्गज मंत्री आहेत. त्यांच्या वक्तव्यावर बोलायलाही आम्हाला भीती वाटते, कारण लगेच दुसरा पालकमंत्री नेमला जातो,” असा टोला त्यांनी लगावला.

पत्रकारांनी “तुम्ही दुसरा ग्रामविकास मंत्री नेमू शकता का?” असा प्रश्न विचारल्यावर देसाई म्हणाले, “मला तो अधिकार नाही; मात्र जयकुमार गोरे यांना पालकमंत्री नेमण्याचे अधिकार आहेत,” असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा उपरोधिक टिप्पणी केली.

दरम्यान, जयकुमार गोरे यांनी सोलापूरमध्ये बोलताना सांगितले की, सातारा जिल्हा परिषदेत भाजपचे 27 सदस्य निवडून आले असून एक अपक्ष सदस्यही त्यांच्या सोबत आहे. त्यामुळे अध्यक्षपद भाजपकडेच येईल, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वरिष्ठ पातळीवर चर्चा करत असल्याची माहितीही त्यांनी दिली. “चमत्कार करण्याची इच्छा नाही; पण वेळ पडल्यास चमत्कार करून दाखवावा लागेल,” असेही गोरे म्हणाले.

दरम्यान, साताऱ्यात भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी शिवसेनेचे शंभूराज देसाई आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मकरंद पाटील यांनी हालचाली सुरू केल्याची माहिती आहे. दोन्ही नेत्यांनी दोन दिवसांपूर्वी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या बैठकीत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी हिरवा कंदील मिळाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

सातारा जिल्हा परिषद संख्याबळ (एकूण जागा : 65)
भाजप : 27
राष्ट्रवादी काँग्रेस : 20
शिवसेना : 16
स्वाभिमानी शेतकरी संघटना : 01
काँग्रेस : 01
अपक्ष : 01

राष्ट्रवादी काँग्रेस (20), शिवसेना (16) आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक सदस्य मिळून त्यांची एकूण संख्या 37 होते, जी बहुमतासाठी पुरेशी आहे. त्यामुळे अध्यक्षपदासाठी शिवसेना-राष्ट्रवादी आघाडी मजबूत स्थितीत असल्याचे चित्र आहे. मात्र भाजपनेही आपले प्रयत्न सुरू ठेवले असल्याने अंतिम निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

फलटणमध्ये सामाजिक नेतृत्व हरपले : चंद्रशेखर पंढरीनाथ हेंद्रे यांचे दुःखद निधन

0
फलटणमध्ये सामाजिक नेतृत्व हरपले : चंद्रशेखर पंढरीनाथ हेंद्रे यांचे दुःखद निधन

फलटण :- फलटणमध्ये सामाजिक नेतृत्व हरपले : चंद्रशेखर पंढरीनाथ हेंद्रे यांचे दुःखद निधन
फलटण शहरातील ज्येष्ठ सामाजिक नेते तथा विठ्ठल मंदिर ट्रस्ट, फलटणचे सन्माननीय माजी सदस्य चंद्रशेखर पंढरीनाथ हेंद्रे यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच फलटण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मनमिळाऊ, हसतमुख आणि सर्वांना मदत करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख होती. समाजातील प्रत्येक घटकाच्या सुख-दुःखात ते नेहमी सहभागी होत असत. राजे गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणूनही त्यांनी आपली वेगळी छाप निर्माण केली होती.
त्यांच्या जाण्याने फलटण शहराने एक सामाजिक नेतृत्व गमावले असून सर्व स्तरांतून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
त्यांची अंत्ययात्रा आज सकाळी ९ वाजता स्वामी विवेकानंद नगर, फलटण येथील त्यांच्या निवासस्थानापासून निघणार आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, हीच प्रार्थना.