Monday, July 27, 2026
Home Blog Page 442

अचानक एसटीचा ब्रेक फेल, चालकाने दाखवले प्रसंगावधान, जीव धोक्यात घालून वाचवले 51 जणांचे प्राण

0


सातारा : बसचे अपघात होणे हे काही नवीन नाही. कायम बस चालकाला अपघातासाठी दोषी ठरवलं जातं. मात्र, याच बस चालकाने प्रसंगावधान दाखवून बसमधील 51 प्रवाशांचे प्राण वाचवले आहेत. सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गावरील त्रिपुटी खिंड येथे वडूज येथून साताऱ्याला निघालेल्या एसटी बसचे ब्रेक अचानक निकामी झाले आहे. मात्र, बसचालकाने मोठ्या हुशारीनं प्रवाशांना धोक्याचे बाहेर काढले.

नेमकं काय घडलं? 

तीव्र उतार आणि मोठे वळण असल्यामुळं बस नियंत्रणाबाहेर गेली होती. मात्र, प्रसंगावधान राखून चालक देवदास वायदंडे यांनी हॅन्ड ब्रेक ओढला आणि बसमधून 51 लोकांना सुखरुप बाहेर काढले. त्यानंतर रस्त्यावरून येणाऱ्या कोणत्याही वाहनांना बसचा त्रास होऊ नये यासाठी रस्त्याच्या शेजारील नाल्यात आणि झाडावर नेऊन आदळली. त्यामुळे मोठा अपघात टळला आणि प्रवाशांचा जीवही वाचला आहे. स्वतःचा जीव धोक्यात घालून या बस चालकाने 51 प्रवाशांचे जीव वाचवले आहेत .यामुळं बस चालकाचं आता सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. 

चालकाचे सर्व प्रवाशांनी मानले आभार 

दरम्यान, या घटनेमध्ये प्रवाशांना किरकोळ दुखापती व्यतिरिक्त कोणतीही जीवितहानी झालेली नाही. वडूज ते सातारा बसमधून 51 प्रवासी प्रवास करत होते. यावेळी चालकाचे सर्व प्रवाशांनी आभार मानले. या घटनेची नोंद कोरेगाव येथील पोलीस ठाण्यात करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या:

Wardha News : पोलीस कर्मचार्‍याच्या गाडीचा भीषण अपघात; कुटुंबातील दोन चिमुकल्यांसह चौघे ठार, वर्धातील दुर्दैवी घटना  

अधिक पाहा..



Source link

Ramdas Athawale said Chief Minister Devendra Fadnavis should not go to Raj Thackerays house

0
Ramdas Athawale said Chief Minister Devendra Fadnavis should not go to Raj Thackerays house



Ramdas Athawale said Chief Minister Devendra Fadnavis should not go to Raj Thackerays house | मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या घरी जाऊ नये, कारण…रामदास आठवले यांचे मत





Source link

Professor pays peon Rs 5000 to check exam papers got suspended

0
Professor pays peon Rs 5000 to check exam papers got suspended



Professor pays peon Rs 5000 to check exam papers got suspended | शिपाई करत होता उत्तर पत्रिका तपासण्याचे काम; प्रकरण उजेडात येताच प्राध्यापिकेची हकालपट्टी





Source link

तेल्या भुतोजींच्या कावडीचे फलटणमध्ये जल्लोषात स्वागत; मुंगी घाटातील थरार पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी

0
तेल्या भुतोजींच्या कावडीचे फलटणमध्ये जल्लोषात स्वागत; मुंगी घाटातील थरार पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी


फलटण :- श्री शंभू महादेवाच्या चैत्र वारीचे अद्वितीय दृश्य सोमवारपासून प्रकट होऊ लागले आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले हजारो भक्त पवित्र नद्यांचे पाणी दोन रांजणांत भरून, कावडी खांद्यावर घेत शिखर शिंगणापूरला चालत जात आहेत. यातील सासवड येथील ‘तेल्या भुतोजी’ यांची कावड विशेष मानाची मानली जाते. या कावडीचे फलटण शहरात आगमन होताच तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांनी प्रशासनाच्या वतीने औपचारिक स्वागत केले.

या वेळी निवासी नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे, महसूल नायब तहसीलदार तुषार गुंजवटे, तलाठी संघटनेचे अध्यक्ष लक्ष्मण अहिवळे, मंडलाधिकारी शीलवंत चव्हाण, तसेच तलाठी सोमनाथ पंडित हे उपस्थित होते.

या वारीचा सर्वोच्च क्षण म्हणजे ‘तेल्या भुतोजी’ यांची कावड मुंगी घाट चढत असतानाचा थरार. हजारो भाविक या दृश्यासाठी घाटात उपस्थित राहतात. या पारंपरिक कावडीच्या माध्यमातून देवाला पावसासाठी साकडे घालण्याची परंपरा आजही तेवढ्याच श्रद्धेने जपली जाते.

साताऱ्यात स्विफ्ट कारची ओमिनीला धडकत पुढच्या पिकअपला आदळली, तिहेरी अपघातात 2 जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू, 6 जखमी

0



साताऱ्यात स्विफ्ट कारची ओमिनीला धडकत पुढच्या पिकअपला आदळली, तिहेरी अपघातात 2 जिवलग मित्रांचा मृत्यू, 6 जखमी



Source link

बिहारमध्ये आणखी एक राजकीय पक्ष, मराठमोळ्या शिवदीप लांडे ‘सिंघम’ यांनी IPS पदाचा राजीनामा देऊन बनवली हिंद सेना पार्टी

0
बिहारमध्ये आणखी एक राजकीय पक्ष, मराठमोळ्या शिवदीप लांडे ‘सिंघम’ यांनी IPS पदाचा राजीनामा देऊन बनवली हिंद सेना पार्टी


सिंघम या नावाने ओळखले जाणारे मराठमोळे माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी बिहारमध्ये हिंद सेना नावाचा नवा पक्ष स्थापन केला आहे, जो या वर्षाच्या अखेरीस बिहार विधानसभा निवडणूक लढवणार आहे. शिवदीप वामनराव लांडे बिहारमधील २४३ जागांवर निवडणूक लढवणार आहेत, मग तो उमेदवार आणि चेहरा कोणताही असो. त्यांच्या विचारधारेला अनुसरणाऱ्यांनाच पक्षाची उमेदवारी दिली जाईल, असे ते म्हणाले. शिवदीप लांडे हे मूळचे महाराष्ट्र राज्यातील असले तरी ते बिहार कॅडरचे आयपीएस अधिकारी होते आणि व्हीआरएस घेतल्यानंतर त्यांनी बिहार सोडणार नसल्याचे जाहीर केले होते. गेल्या वर्षी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनीही जन सुराज पार्टी नावाचा नवा पक्ष स्थापन केला होता.



Source link

सफाळे रेल्वे फाटक कायमचे बंदच राहणार

0
सफाळे रेल्वे फाटक कायमचे बंदच राहणार


लोकसत्ता प्रतिनिधी

पालघर : सफाळे रेल्वे स्थानकालगत असणारे फाटक सुरू करण्याच्या दृष्टीने सफाळे विकास कृती समिती व प्रवासी संघटनांनी केलेले प्रयत्न निष्फळ ठरले असून सफाळे येथील रेल्वे फाटक यापुढे कायमचे बंद राहणार असे पश्चिम रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याकरिता पर्याय असणारे पादचारी पूल दोन – अडीच महिन्यात उभारून त्यावर सरकते जिने उभारण्याचे काम पश्चिम रेल्वे तातडीने हाती घेईल असे सांगण्यात आले. समर्पित मालवाहू रेल्वे मार्ग राष्ट्रीय महत्त्वाचा प्रकल्प असल्याने या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन पश्चिम रेल्वेतर्फे करण्यात आले.

सफाळे येथील रेल्वे फाटक ३१ मार्च मध्यरात्रीपासून बंद करण्यात आले होते. याअनुषंगाने ४ एप्रिल रोजी सफाळे विकास कृती समितीकडून आंदोलन छेडण्यात आले होते. या अनुषंगाने खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी आंदोलन करणाऱ्या पूर्व व पश्चिम भागातील नागरिकांची स्वतंत्रपणे बैठक घेऊन त्यांच्याकडून निवेदन स्विकारून अडचणी समजून घेतल्या होत्या. त्यानंतर ७ एप्रिल रोजी जिल्हाधिकारी तसेच रेल्वेच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यच्या समवेत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत खासदार सहभागी झाले होते. यावेळी सफाळे रेल्वे फटका विषयी वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात येईल असे ठरवून आज सकाळी पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक यांच्यासोबत बैठक ठरविण्यात आली होती.

आज पश्चिम रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक (डीआरएम) पंकज सिंग यांच्या समवेत मुंबई सेंट्रल येथे झालेल्या बैठकीत सफाळे विकास कृती समिती, प्रवासी संघटनेचे प्रतिनिधी व काही नागरिकांनी भेट घेतली असता या विषयासंदर्भात सुमारे दोन तास वेगवेगळ्या पर्यायांबाबत चर्चा करण्यात आली. मात्र स्थानिक पातळीवर सुचवण्यात येणाऱ्या विविध पर्याय व्यवहार्य नसल्याचे सांगण्यात आल्याने तसेच रेल्वे फाटक पुन्हा खुले करणे शक्य नसल्याने चर्चा निषफळ ठरली.

समर्पित मालवाहू रेल्वे मार्ग हा पंतप्रधान कार्यालयाचा महत्वकांक्षी प्रकल्प असून जानेवारी महिन्यापासून तो कार्यरत करण्याच्या दृष्टीने वरिष्ठ पातळीवरून पाठपुरावा सुरू आहे. मात्र वेगवेगळ्या कारणांमुळे हा प्रकल्प कार्यान्वित होऊन शकला नाही असे सांगण्यात आले. हा प्रकल्प एप्रिल महिन्यात सुरु करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु असल्याचे रेल्वेचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

सध्या या मालवाहू मार्गावर ट्रायल रन अर्थात चाचणी घेण्याचे काम सुरू असून या मार्गाची पश्चिम रेल्वेची जोडणी आवश्यक विद्युत व सिग्नल यंत्रणामध्ये नूतनीकरणचे काम पूर्ण होऊन पुढील आठवड्यात मालवाहू मार्ग सुरू होईल असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगण्यात आले. या पार्श्वभूमीवर सफाळे येथे बंद करण्यात आलेले रेल्वे फाटक पुन्हा सुरू करणे शक्य नसून या पार्श्वभूमीवर सुचवण्यात आलेल्या विविध पर्यायांना लवकरात लवकर कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासन प्रयत्नशील राहील असे आश्वासन देण्यात आले.

सफाळे करिता सुचवलेले पर्याय

सफाळ्याच्या पूर्वेला असणाऱ्या जिन्याला सरकत्या जिन्याची जोड देण्याच्या दृष्टीने जागा उपलब्ध करून दिल्यास पूर्वेच्या बाजूला सरकता जिना दोन महिन्यात उभारण्याची तयारी दर्शवण्यात आली. तसेच अस्तित्वात असलेला जिना पश्चिमेच्या बाजूला उपनगरीय रेल्वे चौपदरीकरण प्रकल्पाच्या पुढे नेऊन त्या ठिकाणी देखील जागेच्या उपलब्धतेनुसार सरकता जीना तातडीने उभारण्याचे तयारी रेल्वे प्रशासनाने दर्शवली. सफाळा रेल्वेने स्थानकात अस्तित्वात असलेल्या पादचारी पुलाच्या उत्तर व दक्षिणेला दोन नवीन पादचारी पूल उभारण्याचे काम देखील लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले.

सफाळे रेल्वे फाटक पुन्हा कार्यान्वित करणे शक्य नसून पादचारी पुलाचा विस्तार, नव्याने उभारणे तसेच दोन्ही बाजूला सरकते जिने व उद्वाहक उभारण्यासाठी पश्चिम रेल्वे कडून लवकरात लवकर कामे हाती घेऊन पूर्ण करण्यात येतील. नागरिकांना होणाऱ्या गैरसोयींबद्दल रेल्वे बोर्ड व रेल्वे मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येईल. -डॉ. हेमंत सवरा, खासदार



Source link

प्राधान्यक्रमानंतर ‘एमपीएससी’कडून राज्यसेवा २०२३ची निवड यादी कधी जाहीर होणार? आयोगाने दिले उत्तर…

0
प्राधान्यक्रमानंतर ‘एमपीएससी’कडून राज्यसेवा २०२३ची निवड यादी कधी जाहीर होणार? आयोगाने दिले उत्तर…



when will mpsc announce selection list 2023 mpsc exam 2023 latest updates प्राधान्यक्रमानंतर ‘एमपीएससी’कडून राज्यसेवा २०२३ची निवड यादी कधी जाहीर होणार? आयोगाने दिले उत्तर…





Source link

माझ्यासाठी सेक्स सर्वात महत्वाचा, अन्यथा बाहेर जाऊन.. Rippling संस्थापकाच्या पत्नीने उघड केली रहस्ये

0
माझ्यासाठी सेक्स सर्वात महत्वाचा, अन्यथा बाहेर जाऊन.. Rippling संस्थापकाच्या पत्नीने उघड केली रहस्ये


Rippling चे संस्थापक प्रसन्ना यांच्यावर त्यांच्या पत्नीने नवे आणि खळबळजनक आरोप केले आहेत. ती म्हणाली की, ती गरोदर असतानाही प्रसन्ना तिच्यासोबत सेक्सचा आग्रह धरत असे. अन्यथा मी बाहेर जाईन, अशी धमकी देत असे.



Source link

पतंजलीच्या स्वदेशी आंदोलनाला प्रत्येक भारतीयांनी सपोर्ट करायला हवा?

0
पतंजलीच्या स्वदेशी आंदोलनाला प्रत्येक भारतीयांनी सपोर्ट करायला हवा?


आताच्या काळात भारत जगातील सर्वात वेगाने अर्थव्यवस्था वाढवणारा देश आहे. ज्यामध्ये देशातील अनेक कंपन्यांचे मोठे योगदान आहे. खास करून ज्या कंपन्या स्वदेशीचा अवलंब करत आहेत आणि देशातच त्यांची उत्पादने तयार करत आहेत आणि लोकांना रोजगार देत आहेत. यामुळे, आपल्या देशात उत्पादन होणारे अनेक पदार्थ, सामान जगभरातील बाजारपेठांमध्ये पोहोचत आहे. स्वदेशी चळवळ म्हणजे आपल्या स्वतःच्या गोष्टींचा प्रचार करणे. ज्यामध्ये पतंजली कंपनी सर्वात महत्वाची भूमिका बजावत आहे. आज, पतंजली ही चळवळ नवीन उंचीवर घेऊन जात आहे. आयुर्वेदिक आणि देशी उत्पादनांद्वारे पंतजलीने या चळवळीत मोठे योगदान दिले आहे. बाबा रामदेव आणि आचार्य बालकृष्ण यांच्या नेतृत्वाखाली भारतातील टॉप कंपन्यांच्या यादीत पतंजलीचा समावेश आहे. तसेच, वेगाने वाढणाऱ्या ग्राहकोपयोगी वस्तू क्षेत्रातही त्यांनी मोठे नाव कमावले आहे. ज्यामुळे परदेशी कंपन्यांना कठीण स्पर्धेचा सामना करावा लागत आहे.

पतंजलीचा महसूल आणि नफा सतत वाढत आहे. देशातील आघाडीच्या एफएमसीजी कंपन्यांपैकी एक असलेल्या पतंजलीने त्यांच्या वाढीवर, रोजगार निर्मितीवर आणि स्वदेशी उत्पादनांवर विशेष लक्ष दिले आहे. त्यांच्या व्यवसाय मॉडेलमुळे आणि कमी दरांमुळे, त्यांनी एफएमसीजी आणि आयुर्वेदिक उत्पादनांच्या बाजारपेठेत स्वतःचं वेगळं असं स्थान निर्माण केलं आहे. 

आर्थिक योगदान आणि रोजगाराच्या संधी

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पतंजलीचे आर्थिक योगदान खूप मोठे आहे.2023-24 मध्ये पतंजली आयुर्वेदाचे उत्पन्न 9335.32 कोटी रुपये होते. जे गेल्या वर्षीपेक्षा 23.15% जास्त आहे. त्याच वेळी, 2023 मध्ये पतंजली फूड्सचे उत्पन्न 31800 कोटी रुपये होते. यावरुन कंपनी भारताची अर्थव्यवस्था मजबूत करत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. 

पतंजली नवीन रोजगार संधी उपलब्ध करून देण्यातही महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्यांच्याकडे 10000 आरोग्य केंद्रे, 4500 वितरक असून 638795 गावांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे गावांच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळत आहे. तसेच,10 लाख किराणा दुकाने देखील आहेत आणि आधुनिक व्यापारी दुकानांमध्ये देखील ते उपस्थित आहेत. ज्यामुळे लहान दुकानदार आणि वितरकांना रोजगाराच्या संधी मिळत आहेत.

स्वस्त आणि स्वदेशी उत्पादने

आवळा रस आणि मोहरीचे तेल यांसारखी पतंजली उत्पादने आणि इतर अनेक दैनंदिन वापरातील वस्तू माफक दरात आहेत. आयुर्वेदिक गोष्टी या आरोग्यासाठी चांगल्या आहेत. पतंजलीची बहुतेक उत्पादने प्रतिस्पर्धी कंपन्यांपेक्षा स्वस्त आहेत. यामध्ये गायीचे तूप वगळता सगळ्या गोष्टी सामान्य माणसाला, खास करुन ग्रामीण भागातील लोकांना परवडतील अशा आहेत. पतंजलीचे कमी दर आणि स्वदेशी आकर्षण (मेड इन इंडिया) यामुळे किरकोळ बाजारात चांगलीच पसंती आहे. 

संस्कृती आणि देशाचा अभिमान

पतंजली आपली संस्कृती जिवंत ठेवत आहे कारण आयुर्वेद हा त्यांचा मूळ गाभा आहे. आयुर्वेद हे  आपल्या परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे. कंपनीचा असा विश्वास आहे की, त्यांचे उद्दिष्ट केवळ पैसे कमवणे नाही तर आर्थिकदृष्ट्या कमकुवत आणि गरजू लोकांना मदत करणे देखील आहे. यामुळे देशाचा अभिमान वाढतो आणि स्वावलंबी होण्याची प्रेरणा मिळते.

लघु आणि मध्यम व्यवसायांना पतंजलीची मदत 

पतंजलीने अनेक लघु आणि मध्यम उद्योगांना मदत केली आहे. कंपनी स्थानिक शेतकरी आणि लहान व्यावसायिकांकडून तिच्या उत्पादनांसाठी कच्चा माल खरेदी करते. ज्यामुळे गावांच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळते. यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळतो आणि त्यांचे उत्पन्न वाढते. पतंजली नोएडा, नागपूर आणि इंदूर सारख्या मोठ्या शहरांमध्ये नवीन कारखान्यांसह आपला व्यवसाय वाढवत आहे, ज्यामुळे लोकांसाठी नवीन रोजगाराच्या संधी देखील निर्माण होत आहेत.

(Disclaimer – This article is part of India Dotcom Pvt Lt’s consumer connect initiative, a paid publication program IDPL claims no editorial involvement and assumes no responsibility or liability for any errors or omissions in the content of the article.)





Source link