Monday, July 27, 2026
Home Blog Page 440

Maharashtra government announces rules for loans कर्जासाठी सरकारची नियमावली जाहीर

0
Maharashtra government announces rules for loans कर्जासाठी सरकारची नियमावली जाहीर


मुंबई : ‘जायका’, ‘आयबीआरडी’, ‘एडीबी’ अशा विविध आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्यासाठी राज्य शासनाने नियमावली जाहीर केली आहे. यानुसार शासकीय विभागांना परस्पर या संस्थांकडे कर्जासाठी प्रस्ताव सादर करता येणार नाही. तसेच कर्ज घेताना वित्तीय तुटीच्या प्रमाणात कर्ज घेण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे.

बाह्य कर्जासाठी सध्या कोणत्याही मार्गदर्शक सूचना अस्तित्वात नव्हत्या. यामुळे काही विभाग थेट आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांशी व्यवहार करीत असत. यापुढे शासकीय विभागांना थेट आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांकडे मदतीसाठी प्रस्ताव सादर करता येणार नाही. कोणत्याही विभागाला आर्थिक सहाय्य पाहिजे असल्यास प्राथमिक प्रकल्प अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर करून त्यांची मान्यता घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच प्राथमिक प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी ‘मित्रा’ या शासकीय संस्थेचे सहाय्य घेण्याची सूचना करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक पातळीवर या संस्थेला माहिती अवगत करावे लागणार आहे.

आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थेच्या मदतीसाठी केंद्र सरकारच्या संबंधित विभागांकडे प्रस्ताव सादर करावा लागेल. केंद्राने मान्यता दिल्यावर सविस्तर प्रकल्प अहवाल सादर करून तो केंद्र सरकारला सादर करायचा आहे.





Source link

आदर्श नगर, वांद्रे रेक्लमेशन वसाहतींचा पुनर्विकास; म्हाडाच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाची मान्यता, रहिवाशांना प्रशस्त घरे

0
आदर्श नगर, वांद्रे रेक्लमेशन वसाहतींचा पुनर्विकास; म्हाडाच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाची मान्यता, रहिवाशांना प्रशस्त घरे



Redevelopment of Adarsh ​​Nagar, Bandra Reclamation Colonies; Cabinet approves MHADA proposal, residents will get spacious houses आदर्श नगर, वांद्रे रेक्लमेशन वसाहतींचा पुनर्विकास; म्हाडाच्या प्रस्तावास मंत्रिमंडळाची मान्यता, रहिवाशांना प्रशस्त घरे





Source link

Animals and birds are suffering from dehydration due to rising temperatures thane news

0
Animals and birds are suffering from dehydration due to rising temperatures thane news



Animals and birds are suffering from dehydration due to rising temperatures thane news | वाढत्या तापमानामुळे पशुपक्ष्यांना निर्जलीकरणाचा त्रास; दिवसाला ५ ते ७ श्वान तर, ४ ते ५ पक्षी जखमी





Source link

Sewage from jeans factories flows into the river through drains

0
Sewage from jeans factories flows into the river through drains



Sewage from jeans factories flows into the river through drains | शहरासह ग्रामीण भागातही जलप्रवाह प्रदुषीत; जीन्स कारखान्यांचे सांडपाणी थेट नाल्याद्वारे नदीत





Source link

रायगड,कर्जत येथे उल्हास नदीत बुडून दोघांचा मृत्यू

0
रायगड,कर्जत येथे उल्हास नदीत बुडून दोघांचा मृत्यू



लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

अलिबाग : कर्जत येथे उल्हास नदीत बुडून दोघांचा मृत्यू झाला आहे. रुपेन सुब्बा आणि विवेक सिंह रावत अशी दोघांची नावे आहेत. दोघेही रेडीसन ब्ल्यू हॉटेल मध्ये आचारी म्हणून कार्यरत होते.

उष्णता वाढली असल्याने दोघेही सोमवारी रात्री हॉटेल मागून वाहणाऱ्या नदीत पोहण्यासाठी गेले होते. सकाळपर्यंत दोघेही परत आले नाहीत. त्यामुळे हॉटेल प्रशासनाने दोघांचा शोध सुरू केला. कर्जत पोलीसांना याबाबत माहिती देण्यात आली. त्यांनी घटना स्थळी शोध घेत विवेक सिंह रावत याचा मृतदेह शोधून नदीपात्रातून बाहेर काढला.

मात्र या घटनेत बुडालेल्या रुपेन याचा शोध लागला नाही. त्यामुळे खोपोली येथून शोध व बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. त्यांनी नदी पात्रात उतरून रुपेन शोध घेत, त्याचा मृतदेह बाहेर काढला. पाण्याचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. कर्जत पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.



Source link

जिओ फायनान्सचा डिजिटल कर्ज क्षेत्रात प्रवेश, म्युच्युअल फंड, समभाग तारणावर झटपट कर्ज

0
जिओ फायनान्सचा डिजिटल कर्ज क्षेत्रात प्रवेश, म्युच्युअल फंड, समभाग तारणावर झटपट कर्ज



Jio Finance digital lending space Instant loans mutual funds, shares जिओ फायनान्सचा डिजिटल कर्ज क्षेत्रात प्रवेश, म्युच्युअल फंड, समभाग तारणावर झटपट कर्ज





Source link

नाशिकमध्ये उष्णतेची लाट; पारा ४१ अंशांवर

0
नाशिकमध्ये उष्णतेची लाट; पारा ४१ अंशांवर



लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक : सलग तीन दिवसांपासून उंचावणाऱ्या पाऱ्याने मंगळवारी ४१ अंश ही नवीन उच्चांकी पातळी गाठली. नाशिकमध्ये उष्णतेची लाट आल्याची स्थिती असून उन्हाच्या तडाख्याने जनजीवनावर परिणाम झाला आहे. उन्हाचे अक्षरश: चटके बसत असल्याने दुपारी प्रमुख रस्ते व बाजारपेठा ओस पडत आहेत. उष्णतेच्या लाटेचा परिणाम आर्थिक उलाढाल मंदावण्यात झाल्याचे चित्र आहे.

थंड हवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या नाशिकच्या तापमानात मागील काही वर्षात वाढ होत आहे. गतवर्षी तापमानाने ४२ अंश या सर्वोच्च तापमानाची नोंद केली होती. यंदा तो उच्चांकही मोडीत निघतो की काय, अशी स्थिती आहे. एप्रिलमध्ये तापमानाने ४० अंशाचा टप्पा ओलांडला. तीन दिवसांपासून पारा ४० अंशांच्यावर आहे. मंगळवारी त्याने ४१ अंश या हंगामातील नवीन उच्चांकी तापमानाची नोंद केली. तीव्र उन्हामुळे घराबाहेर पडणे वा रस्त्यावर फिरणे कठीण झाले आहे. सध्या शेतात उन्हाळी कामे सुरू आहेत. या वातावरणाचा शेतकरी, मजूर आणि रस्त्यावर काम करणाऱ्यांच्या आरोग्यावर अधिक परिणाम होत आहे. उन्हाच्या तडाख्यापासून बचावासाठी शेतीची कामे सकाळ आणि सायंकाळी केली जात आहे.

सकाळी अकरापासून उन्हाचे चटके बसू लागतात. दुपारी मुख्य चौक, रस्ते आणि बाजारपेठांतही शुकशुकाट पसरतो. दुपारी चारपर्यंत अशी स्थिती असते. त्यामुळे यावेळी थंडपेय, आईस्क्रिमची दुकाने, फ्रिज, वातानुकुलीत उपकरणांची दुकाने वगळता इतरत्र ग्राहक वर्ग अंतर्धान पावल्याचे दिसून येते.

आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन

वाढत्या तापमानाचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. उष्माघाताच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये निर्जलीकरण (डिहायड्रेशन), चक्कर येणे, पुरळ येणे असा त्रास होतो. अशा परिस्थितीत शरीराचे तापमान १५ मिनिटांत १०६ अंशांपर्यंत चढू शकते. या काळात सातत्याने पुरेसे पाणी पिणे महत्वाचे असते. दुपारी कष्टाची कामे टाळणे. दिवसा बाहेर पडताना डोके झाकून ठेवणे, अशाप्रकारे काळजी घेण्याचे आवाहन आरोग्यसेवा विभागाने केले आहे.



Source link

श्रीराम, गरुड रथयात्रेत उदंड गर्दी; दोन्ही रथांची आकर्षक सजावट

0
श्रीराम, गरुड रथयात्रेत उदंड गर्दी; दोन्ही रथांची आकर्षक सजावट



लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : नाशिककरांच्या श्रद्धेचा आणि उत्साहाचा आनंदोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीराम रथ आणि गरुड रथयात्रेला सियावर रामचंद्र की जयच्या जयघोषात मंगळवारी सायंकाळी श्री काळाराम मंदिरापासून भक्तीमय वातावरणात सुरूवात झाली. रात्री उशीरा रथयात्रा शहरातील वेगवेगळ्या मार्गावरून मार्गक्रमण करणार आहे.

श्री काळाराम मंदिर तसेच श्री अहिल्याराम व्यायाम प्रसारक मंडळातर्फे श्रीराम रथ आणि श्रीगरुड रथाचे विधीवत पूजन यंदाचे मानकरी हेमंतबुवा पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले. यात्रेनिमित्त दोन्ही रथांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. श्रीराम नवमीनंतर येणाऱ्या एकादशीला श्री काळाराम देवस्थानच्या वतीने रथयात्रा काढण्यात येते.

रथयात्रा जाणाऱ्या रस्त्याची परिस्थिती, वाहतूक व्यवस्थापन, गरुड रथाची सजावट, सुरक्षा व्यवस्था, ब्रेक व्यवस्था, ध्वनी व्यवस्था, रथसेवकांचा गणवेश, स्वच्छता आणि इतर महत्त्वाच्या विषयांवर विश्वस्त आणि महापालिका प्रशासनाने केलेल्या नियोजनामुळे रथयात्रेला सुरळीत सुरुवात झाली. रथयात्रेपुढे कपालेश्वर मंदिराचे ढोलपथक होते. यावेळी काहींनी मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक दाखविले. रथयात्रेत नाशिककरांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. राम, सीता, लक्ष्मण हनुमान यांची वेशभूषा काहींनी परिधान केली होती. उपस्थितांकडून अखंडपणे रामनामाचा गजर करण्यात येत होता.

दरम्यान, रथयात्रेमुळे गोदापात्रात गंगापूर धरणातून आवर्तन सोडण्यात आल्यामुळे गोदापात्रात जमा झालेल्या पानवेली दूरवह वाहून गेल्या. रथयात्रा उत्सवात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांच्या वतीने साध्या वेशात तसेच वर्दीत मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ठिकठिकाणी वाहतूक मार्गात बदल करण्यात आल्याने पर्यायी मार्गावर वाहतूक कोंडी झाली

रथावर लहान मुले

रथयात्रा हा नाशिककरांसाठी श्रध्देचा विषय. या यात्रेचा अविभाज्य भाग होता यावे यासाठी नाशिककरांनी श्री काळाराम मंदिराजवळ मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. दूरून का होईना, दर्शन व्हावे, यासाठी रथयात्रा मार्गावर मिळेल त्या ठिकाणी लोक उभे होते. रथावर कोणीही उभे राहू नये, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले असतानाही लहान मुलांसह अनेकांनी रथावर गर्दी केली होती. अशा हौशी लोकांना खाली उतरवितांना कार्यकर्त्यांच्या नाकीनऊ आले होते.



Source link

87 child laborers rescued from Mumbai child laborers are from Uttar Pradesh and Bihar Mumbai print news

0
87 child laborers rescued from Mumbai child laborers are from Uttar Pradesh and Bihar Mumbai print news



87 child laborers rescued from Mumbai child laborers are from Uttar Pradesh and Bihar Mumbai print news | वर्षभरातून मुंबईतून ८७ बालकामगारांची सुटका; बालकामगारांमध्ये उत्तर प्रदेश, बिहारमधील मुलांची संख्या अधिक





Source link

Priyansh Arya Century in just 39 Balls 2nd Fastest by Indian in History of IPL Against Chennai Super Kings PBKS vs CSK IPL 2025

0
Priyansh Arya Century in just 39 Balls 2nd Fastest by Indian in History of IPL Against Chennai Super Kings PBKS vs CSK IPL 2025


Priyansh Arya Fastest Century in IPL 2025 PBKS vs GT: पंजाब किंग्सचा सलामीवीर प्रियांश आर्याने आयपीएल कारकिर्दीतील पहिलं शतक झळकावलं आहे. प्रियांश आर्याने चेन्नई सुपर किंग्सविरूद्ध ३९ चेंडूत आपलं पहिलं आयपीएलमधील शतक पूर्ण केले. अश्विन, पथिराना अशा उत्कृष्ट गोलंदाजांची धुलाई करत त्याने आपली शतकी खेळी पूर्ण केली. प्रियांश आर्याने बाद होण्यापूर्वी ४२ चेंडूत ७ चौकार आणि ९ चौकारांसह २४५ च्या स्ट्राईक रेटने १०३ धावांची खेळी केली.

आयपीएलमध्ये आपला पहिला हंगाम खेळत असलेल्या २४ वर्षीय प्रियांशने मुल्लानपूरच्या मैदानावर स्फोटक फलंदाजी करत आपले पहिले शतक पूर्ण केले. आयपीएलमध्ये आपला फक्त चौथा सामना खेळत असलेल्या प्रियांशने चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध डावाची सुरुवात केली आणि सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर दणदणीत षटकार मारला.

प्रियांश आर्याने मथीशा पथिरानाच्या १३व्या षटकात सलग ३ षटकार आणि एक चौकार मारून आपले शतक पूर्ण केले. हे या हंगामातील सर्वात जलद शतक आहे, तर शतक करणारा तो फक्त दुसरा फलंदाज आहे. याशिवाय प्रियांश आर्याने आयपीएल इतिहासातील भारतीय फलंदाज म्हणून दुसरं सर्वात जलद शतक झळकावलं आहे.

गुजरात टायटन्सविरुद्ध आयपीएल पदार्पणात झटपट ४७ धावा करणाऱ्या प्रियांशला मागील सामन्यात निराशेसह परतावे लागले. पहिल्याच चेंडूवर त्याला जोफ्रा आर्चरने बोल्ड केले होते. त्या निराशेवर मात करत, प्रियांशने पुढच्याच सामन्यात पहिल्याच चेंडूवर षटकार मारला आणि अखेरीस शतक झळकावून थांबला. पण खलीलच्या षटकात षटकारानंतर पुढच्याच चेंडूवर खलीलने त्याचा झेल सोडला होता. पण षटकाच्या पाचव्या चेंडूवर या फलंदाजाने पुन्हा षटकार मारला आणि षटकार-चौकारांच्या आतिषबाजीमध्ये सीएसकेच्या गोलंदाजांची धुलाई केली.





Source link