Monday, July 27, 2026
Home Blog Page 438

पोलीस कोठडीत मृत्यू प्रकरणात एसआयटी स्थापन करा; अॅड. प्रकाश आंबेडकर यांची हायकोर्टात मागणी

0
पोलीस कोठडीत मृत्यू प्रकरणात एसआयटी स्थापन करा; अॅड. प्रकाश आंबेडकर यांची हायकोर्टात मागणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) :परभणी येथे पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात त्यांची आई पुढे सरसावली असून, त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने ही याचिका स्वीकारत २९ एप्रिल रोजी पुढील सुनावणी ठेवली आहे. या प्रकरणी राज्य शासनाला नोटीस बजावण्यात आली आहे.

सूर्यवंशी कुटुंबीयांच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी स्वतः न्यायालयात बाजू मांडत, या प्रकरणाची चौकशी उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावी, अशी मागणी केली.

अॅड. आंबेडकर यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, बदलापूरमधील बालिकांवरील अत्याचार प्रकरणात एसआयटी स्थापन करण्यात आली होती. त्याच धर्तीवर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या प्रकरणातही विशेष तपास पथक (SIT) नेमावे, दोषींवर कठोर कारवाई करावी, आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी विनंती केली.

प्रकरणात संबंधित पोलीस अधिकाऱ्यांविरोधात आजवर कोणतीही कारवाई झालेली नाही, इतकेच नव्हे तर त्यांचे निलंबनही झालेले नाही. न्यायालयीन चौकशी असूनही अद्याप कारवाई संदर्भात कोणतेही स्पष्ट निर्देश दिले गेलेले नाहीत. म्हणूनच सूर्यवंशी यांच्या आईने ही याचिका दाखल केली आहे.

सरकारतर्फे याप्रकरणी मुख्य सरकारी वकील अमरजितसिंह गिरासे यांनी काम पाहिले असून, पुढील सुनावणीसाठी सर्वांचे लक्ष कोर्टाच्या निर्णयाकडे लागले आहे.

46वा भाजप स्थापना दिवस उत्साहात साजरा; माण-खटावमध्ये जयकुमार गोरे भाऊ यांच्या नेतृत्वाखाली भव्य कार्यकर्ता मेळावा

0
46वा भाजप स्थापना दिवस उत्साहात साजरा; माण-खटावमध्ये जयकुमार गोरे भाऊ यांच्या नेतृत्वाखाली भव्य कार्यकर्ता मेळावा

गोंदवले बुद्रुक, 6 एप्रिल 2025 (साहस टाइम्स):
भारतीय जनता पक्षाच्या 46व्या स्थापना दिनानिमित्त माण-खटाव विधानसभा मतदारसंघातील शेतकरी भवन, गोंदवले बुद्रुक येथे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (भाऊ) यांच्या उपस्थितीत भव्य कार्यकर्ता संमेलन संपन्न झाले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठीत पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे मार्गदर्शक विचार ऑनलाईन प्रणालीद्वारे कार्यकर्त्यांनी ऐकले.

भाजपच्या स्थापनेचा गौरव साजरा करताना राज्यात 1.5 कोटी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचा आनंदोत्सवही साजरा करण्यात आला. माण-खटाव मतदारसंघात 71,000 सदस्य नोंदणी पूर्ण केल्याबद्दल जयकुमार गोरे यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले.

याप्रसंगी श्रीराम नवमीचाही उल्लेख करत “प्रभू श्रीराम सर्वांना आशीर्वाद देवो” अशी प्रार्थना करण्यात आली. राष्ट्रगीताच्या सामूहिक गायनाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी सौ. सोनिया गोरे, आमदार डॉ. दिलीपराव येळगावकर, म्हसवड, दहिवडी आणि खटाव मंडळांचे अध्यक्ष, महिला मोर्चा व युवा मोर्चा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बिनविरोध निवडणुकीचा निर्धार : पृथ्वीराज जाचक यांच्याकडे श्री छत्रपती साखर कारखान्याची धुरा; सुप्रिया सुळे यांचा पाठिंबा

0
बिनविरोध निवडणुकीचा निर्धार : पृथ्वीराज जाचक यांच्याकडे श्री छत्रपती साखर कारखान्याची धुरा; सुप्रिया सुळे यांचा पाठिंबा

बारामती :- इंदापूर तालुक्यातील भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या आगामी निवडणुकीसंदर्भात महत्त्वाचा राजकीय निर्णय घेण्यात आला असून, ही निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्धार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. त्याचबरोबर कारखान्याच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज जाचक यांची पुन्हा नियुक्ती करण्याचा निर्णयही त्यांनी घेतला आहे. याला आता खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील जाहीरपणे पाठिंबा दर्शवला आहे.

खासदार सुळे यांनी आज लासुर्णे येथे पृथ्वीराज जाचक यांच्या निवासस्थानी भेट देत त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “शेतकऱ्यांच्या हितासाठी राजकारण बाजूला ठेवून जर एकत्रितपणे निर्णय घेतला जात असेल, तर आम्ही त्याला विरोध करणार नाही. पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वात जर कारखान्याचा कारभार चालणार असेल, तर त्याचा लाभ निश्चितच शेतकऱ्यांना होईल.”

गेल्या काही काळात श्री छत्रपती साखर कारखाना आर्थिक अडचणीत सापडला होता. या पार्श्वभूमीवर कारखान्याला पुन्हा उभारी देण्यासाठी अजित पवार यांनी पुढाकार घेत सर्वपक्षीय बैठकीत बिनविरोध निवडणुकीसाठी एकजूट होण्याचं आवाहन केलं. सहकार क्षेत्रातील अनुभवी व्यक्तिमत्त्व असलेल्या पृथ्वीराज जाचक यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास ठेवत त्यांच्याकडेच कारखान्याची धुरा देण्याचा निर्णय घेण्यात आला.

सुळे यांच्या पाठिंब्यानंतर आता ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता अधिकच बळावली असून, कारखान्याच्या नव्या पर्वाची सुरुवात पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वात होणार आहे.

— साहस Times

बॉलीवूडवर शोककळा! प्रसिद्ध निर्मात्यांचं वयाच्या ८२ व्या वर्षी निधन; राणी मुखर्जी, तमन्ना भाटियाला केलेलं लॉन्च

0
बॉलीवूडवर शोककळा! प्रसिद्ध निर्मात्यांचं वयाच्या ८२ व्या वर्षी निधन; राणी मुखर्जी, तमन्ना भाटियाला केलेलं लॉन्च



producer filmmaker salim akhtar passed away who launched rani mukerji बॉलीवूडवर शोककळा! प्रसिद्ध निर्मात्यांचं वयाच्या ८२ व्या वर्षी निधन; राणी मुखर्जी, तमन्ना भाटियाला केलेलं लॉन्च





Source link

26/11 हल्ल्याचा सूत्रधार, तहव्वूर राणाच्या पापाचा घडा भरला; कोणत्याही क्षणी भारतात आणण्याची शक्यता

0
26/11 हल्ल्याचा सूत्रधार, तहव्वूर राणाच्या पापाचा घडा भरला; कोणत्याही क्षणी भारतात आणण्याची शक्यता


Tahawwur Rana Extradition: संपूर्ण देशाच्या सुरक्षा व्यवस्थेला सुरुंग लावत मुंबई, या देशाच्या आर्थिक राजधानीला हादरवणाऱ्या 26/11 हल्ल्याचा खरा सुत्रधार तहव्वूर राणा याला भारतात आणण्याला मार्ग मोकळा झाला असून, बुधवारी (9 एप्रिल 2024) रात्रीपर्यंत त्याला भारतात आणलं जाण्याची शक्यता असल्याचं म्हटलं जात आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार राणाला भारतात आणण्यासाठी एनआयएची एक टीम अमेरिकेत पोहोचली असून प्रत्यार्पणासाठीच्या सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळं तहव्वूर राणाला कधीही भारतात आणता येईल, मात्र त्याला दिल्लीला आणलं जाईल की मुंबईत हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

काही माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तांनुसार दिल्ली आणि मुंबईमधील कारागृह तहव्वूर राणाच्या शिक्षेसाठी सज्ज असून अमेरिकेतील न्यायव्यवस्थेच्या शिफारसींनुसार इथं तरतुदी करण्यात येतील असं म्हटलं जात आहे. सुरुवातीचे काही दिवस राणाची रवानही एनआयएच्या कोठडीत होणार असून यासंदर्भातील सर्व लहानमोठ्या घडामोडींवर खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यासह त्यांच्याअंतर्गत कार्यरत असणारे अधिकारी करडी नजर ठेवणार आहेत. 

मुंबई हल्ल्यांचा सूत्रधार राणा इतका क्रूर… 

कॅनडा- पाकिस्तानचं नागरिकत्वं असणारा तहव्वूर राणा लष्कर-ए-तैय्यबाचा या दहशतवादी संघटनेसाठी काम करत असून, त्यानं डेविड हेडली (दाऊद गिलानी या नावानं ओळख) याला पासपोर्ट तयार करून देण्यात मदत केली होती. हा तोच हेडली, ज्यानं कटकारस्थानं रचत भारतात दाखल होत मुंबईतील हल्ल्याचं षडयंत्र रचलं. लष्कर आणि पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआय यांनी एकत्र येत मुंबईवर हा भ्याड हल्ला केल्याचे पुरावे तपासातून समोर आले असून, राणानं 26 नोव्हेंबर 2008 मधील हल्ल्यात मृत पावलेल्यांच्या वृत्तावर आनंद व्यक्त करत या क्रूरकर्म्यानं या हल्ल्यातील दहशतवाद्यांना पाकिस्तानचा मरणोत्तर दिला जाणारा सर्वोच्च सैन्य पुरस्कार देण्याय यावा अशी गरळ ओकली होती. 

भारत सरकराच्या वतीनं राणाला भारतात आणण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले असून, डिसेंबर 2019 मध्ये भारताच्या वतीनं त्याच्या प्रत्यार्पणासाठी अमेरिकेला एय राजकीय संदेश पाठवला होता. 10 जून 2020 मध्ये त्याच्या अस्थायी अटकेसाठी एक औपचारिक तक्रारसुद्धा दाखल केली होती.

 

 





Source link

Nia Sharma Aly Goni and Reem Shaikh Return To Laughter Chefs 2 For More Madness

0
Nia Sharma Aly Goni and Reem Shaikh Return To Laughter Chefs 2 For More Madness



Nia Sharma Aly Goni and Reem Shaikh Return To Laughter Chefs 2 For More Madness | ‘लाफ्टर शेफ्स २’मध्ये जुन्या कलाकारांचं कमबॅक, आता निया शर्मासह पाहायला मिळणार ‘हे’ जुने चेहरे





Source link

edible oil industry demand over packaging to change to central government mumbai print news zws 70

0
edible oil industry demand over packaging to change to central government mumbai print news zws 70



edible oil industry demand over packaging to change to central government mumbai print news zws 70 | खाद्यतेलाचे पॅकिंग बदलणार; खाद्यतेल उद्योगाची केंद्र सरकारकडे मोठी मागणी





Source link

तारापूर एमआयडीसीच्या वाहिन्यांमधून सांडपाण्याची गळती, जलप्रदूषण होऊन मासे मृत्युमुखी पडत असल्याचा तक्रारी

0
तारापूर एमआयडीसीच्या वाहिन्यांमधून सांडपाण्याची गळती, जलप्रदूषण होऊन मासे मृत्युमुखी पडत असल्याचा तक्रारी



industrial effluent leakage from drainage line leads to episodes of fish kills || तारापूर एमआयडीसीच्या वाहिन्यांमधून सांडपाण्याची गळती, जलप्रदूषण होऊन मासे मृत्युमुखी पडत असल्याचा तक्रारी





Source link

ट्रम्प टॅरिफ धोरणापायी येणाऱ्या अडचणी तात्पुरत्याच?

0
ट्रम्प टॅरिफ धोरणापायी येणाऱ्या अडचणी तात्पुरत्याच?


अतुल संघवी

२ एप्रिल रोजी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नव्याने मोठ्या प्रमाणात आयात शुल्क (टॅरिफ्स) लागू करत जागतिक व्यापार धोरणात मोठे परिवर्तन घडवले. हे शुल्क प्रामुख्याने अशा देशांवर लादण्यात आले ज्यांच्याशी अमेरिकेची व्यापार तूट अधिक आहे. ही आकडेवारी पाहूनच त्यांनी टॅरिफ्सची पातळी ठरवली.या नव्या धोरणाचा सर्वात मोठा फटका बसलेला आहे श्रीलंका, बांगलादेश, व्हिएतनाम आणि चीन यांना. विशेषतः श्रीलंकेवर ४४ % आणि बांगलादेशवर ३७ % टॅरिफ लावले गेले आहे. या दोन्ही देशांनी गेल्या अनेक वर्षांत वस्त्रोद्योगावर आपली अर्थव्यवस्था उभी केली होती, आणि अमेरिकन बाजारपेठ ही त्यांच्यासाठी प्रमुख बाजारपेठ होती.

भारतावर लावलेले टॅरिफ तुलनेत सौम्य म्हणजेच २६ % इतके आहे. त्यामुळे भारतातील वस्त्रोद्योगासाठी ही मोठी संधी आहे. विशेषतः अरविंद लिमिटेड, आदित्य बिर्ला फॅशन, वर्धमान आणि इतर वस्त्र उत्पादक कंपन्यांना आता अमेरिकन बाजारात बांगलादेश आणि श्रीलंकेच्या तुलनेत अधिक स्पर्धात्मक दरात प्रवेश मिळू शकतो.ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणामुळे व्हिएतनाममधून निर्यात होणाऱ्या वस्तूंवरही मोठा परिणाम झाला आहे. अनेक चिनी कंपन्यांनी पूर्वी आपली उत्पादन युनिट्स व्हिएतनाममध्ये हलवली होती, पण आता तिथल्या उत्पादनांवरही टॅरिफ लागल्यामुळे त्या कंपन्यांना भारत किंवा इतर देशांचा विचार करावा लागणार आहे.

औषधनिर्मिती क्षेत्राबाबतचे ट्रम्प यांचे धोरण अद्याप स्पष्ट नाही. भारत हा अमेरिकेच्या बाजारपेठेसाठी प्रमुख जनरिक औषध उत्पादक देश आहे. फार्मा क्षेत्रावरही टॅरिफ लावले गेले, तर सन फार्मा, डॉ. रेड्डीज, सिप्ला आणि ल्युपिन यांसारख्या कंपन्यांसाठी मोठा धोका निर्माण होऊ शकतो.आयटी सेवांवर थेट टॅरिफ नसले तरी अप्रत्यक्ष परिणाम संभवतो. उत्पादन, लॉजिस्टिक्स आणि रिटेल क्षेत्रातील अमेरिकी ग्राहक नव्या टॅरिफमुळे खर्च पुन्हा नियोजित करत असल्यामुळे टीसीएस, इन्फोसिस, विप्रो आणि एचसीएल यांसारख्या भारतीय आयटी कंपन्यांवर दबाव येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

ट्रम्प यांनी यूएसएमसीए (USMCA) करार कायम ठेवत मेक्सिको आणि कॅनडाला टॅरिफमधून वगळले आहे. त्यामुळे अमेरिकेला या देशांतून स्वस्त वस्तू मिळण्याची शक्यता कायम राहते, ज्यामुळे महागाईवर नियंत्रण राहू शकते. विशेषतः मेक्सिकोमधील स्वस्त मजुरीचा फायदा ट्रम्प यांनी धोरणात्मक पद्धतीने उचलला आहे.ट्रम्प हे लवकरच बांगलादेशसारख्या देशांशी नवे व्यापार करार करण्याची शक्यता आहे, विशेषतः अशा देशांसोबत जे कमी मूल्यवर्धन असलेल्या वस्तू जसे की रेडीमेड कपडे, पुरवतात आणि ज्या वस्तू अमेरिकन उत्पादक तयार करू इच्छित नाहीत. त्यामुळे सामान्य अमेरिकी नागरिकांवरील महागाईचा दबाव कमी केला जाऊ शकतो.

युरोपियन युनियनसोबत अमेरिकेच्या नव्या व्यापार करारांची शक्यता आहे, ज्यामुळे अमेरिकन उच्च मूल्यवर्धित उत्पादक ब्रँड्सना युरोपमध्ये सवलतीने प्रवेश मिळू शकतो. यामुळे अमेरिकेच्या निर्यातीला चालना मिळेल.या सर्व धोरणांमुळे चीनच्या वाढत्या आर्थिक वर्चस्वाला झटका देण्याचा ट्रम्प यांचा हेतू स्पष्ट दिसतो. चीनने अनेक देशांमध्ये उत्पादन केंद्रे उभारून अमेरिकेत स्वस्त माल पाठवण्याची रणनीती आखली होती, जी आता टॅरिफमुळे अडथळ्यात आली आहे.

हेही वाचा

थोडक्यात, हे धोरण तात्पुरत्या अडचणी निर्माण करत असले तरी दीर्घकालीन लाभ भारतासाठी तसेच अमेरिकेसाठीही संभवतात. भारतासारख्या देशांना आता नव्या उद्योग-स्थापनेसाठी संधी असून, अमेरिका स्वतःच्या बाजारात अधिक उच्च मूल्यवर्धन उत्पादने निर्माण करण्यास प्रवृत्त होईल.हीच वेळ आहे भारताने व्यापार संवाद मजबूत करत उत्पादन आणि निर्यात धोरण बळकट करण्याची. विशेषतः वस्त्रोद्योग, इलेक्ट्रॉनिक्स, फार्मा आणि आयटी या क्षेत्रांत धोरणात्मक वाढ साधणे आवश्यक आहे. atul.sanghavi@gmail.com





Source link

चक्क आइस्क्रीममध्ये डिटर्जंट? कर्नाटकात एफडीए कारवाईत आणखी काय आढळले? 

0
चक्क आइस्क्रीममध्ये डिटर्जंट? कर्नाटकात एफडीए कारवाईत आणखी काय आढळले? 



Detergent in ice cream? What else was found in the FDA operation in Karnataka? विश्लेषण : चक्क आइस्क्रीममध्ये डिटर्जंट? कर्नाटकात एफडीए कारवाईत आणखी काय आढळले? 





Source link