Monday, July 27, 2026
Home Blog Page 434

‘आमदारांच्या शिफारशीने, मंत्रालयात येऊन बदली नाही’

0
‘आमदारांच्या शिफारशीने, मंत्रालयात येऊन बदली नाही’


मुंबई : कोणतीही बदली आमदारांच्या शिफारशीने किंवा मंत्रालयात येऊन होणार नाही, ती गुणवत्तेनुसारच होईल, असा इशारा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल अधिकाऱ्यांना दिला.

बावनकुळे यांनी राज्यातील उपविभागीय अधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांची मंत्रालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेतली. त्यात त्यांनी अधिकाऱ्यांना अनेक सूचना दिल्या आहेत. सर्वांचे गोपनीय अहवाल बघूनच अ, ब, क असे निकष ठरवले आहेत. जनतेशी संपर्क, कामे, निकाली काढलेल्या सुनावण्या हे तुमच्या बदलीचे निकष असतील. राजकीय दबावाला जुमानणार नाही, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

पाणंद रस्ते, सातबारा, महाराजस्व समाधान शिबीर, सलोखा योजना आणि वाळू धोरण चांगल्या पद्धतीने राबविण्याचे शासनाचे नियोजन आहे. शेवटच्या नागरिकापर्यंत लाभ व सुविधा द्यायच्या असून त्यात हयगय खपवून घेणार नाही, असे बावनकुळे यांनी सांगितले. प्रत्येक अधिकाऱ्याने जनतेला आपल्या कार्यालयात भेटीची वेळ ठरवावी व तसा फलक कार्यालयासमोर लावावा, अशा सूचना त्यांनी दिल्या.





Source link

…तर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी घरपोच!

0
…तर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी घरपोच!


मुंबई : व्यवसाय-कार्यालयाच्या ठिकाणी किंवा गृहनिर्माण सोसायटीमध्ये किमान २५ किंवा त्याहून अधिक वाहनमालकांनी शिबीर आयोजित करून एकत्रित नोंदणी केल्यास कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी बसविण्यात येणार आहे.

ही पाटी बसविण्यासाठी वाहन मालकांनी वैयक्तिकरित्या होम फिटमेंट सर्विस या पर्यायाचा वापर केल्यास त्यांना अतिरिक्त शुल्काचा भरणा करावा लागणार आहे.

उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी संचासह बसविण्याचे जीएसटी वगळून शुल्क दुचाकी वाहने व ट्रॅक्टरसाठी ४५० रुपये, तीन चाकी वाहने ५०० रुपये, हलकी वाहने, प्रवासी कार, मध्यम व जड वाहने ७४५ रुपये शुल्क भरावे लागणार आहे. या शुल्काशिवाय इतर कुठलेही शुल्क घेण्याची परवानगी नसल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे. नागरिकांच्या यासंदर्भात ०२२-२०८२६४९८ या क्रमांकावर आणि hsrpcomplaint. tco@gmail. com या ईमेलवर तक्रारी कराव्यात, असे आवाहन सहपरिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी केले आहे.





Source link

आयात शुल्काचे परिणाम अद्याप अस्पष्ट! एस जयशंकर यांचा सावध पवित्रा, भारतअमेरिका व्यापार करारासाठी प्रयत्न

0
आयात शुल्काचे परिणाम अद्याप अस्पष्ट! एस जयशंकर यांचा सावध पवित्रा, भारतअमेरिका व्यापार करारासाठी प्रयत्न



Impact of import tariffs still unclear! S Jaishankar cautious stance, efforts for India-US trade deal आयात शुल्काचे परिणाम अद्याप अस्पष्ट! एस जयशंकर यांचा सावध पवित्रा, भारतअमेरिका व्यापार करारासाठी प्रयत्न





Source link

अन्वयार्थ : भ्रष्टाचाराच्या समुद्रात ‘भरती’च्या गटांगळ्या

0
अन्वयार्थ : भ्रष्टाचाराच्या समुद्रात ‘भरती’च्या गटांगळ्या



पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभेची निवडणूक होत असतानाच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यामागे लागलेले शुक्लकाष्ठ काही संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. ‘आर. जे. कार वैद्याकीय महाविद्यालया’तील शिकाऊ महिला डॉक्टरवरील बलात्कार आणि तिच्या हत्येच्या प्रकरणावरून राज्यातील वातावरण ढवळून निघाले असतानाच, आता राज्यातील २५,७५३ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीत गैरप्रकार झाल्याने या सर्व नियुक्त्या सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच रद्द ठरवल्या. निवडणूक वर्षभरावर आली असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर सरकारी शिक्षक नोकरीस मुकल्याने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनाच लक्ष्य केले जाणार, हे उघड आहे. ही भरती २०१६ मध्ये ममता बॅनर्जी यांच्या सरकारच्याच काळात झाली होती. नोकऱ्या गेलेले सर्व शिक्षक संघटितपणे रस्त्यावर उतरले आहेत. ते जिथे जमले होते, त्या नेताजी सुभाष मैदानात ममता बॅनर्जी यांनी जाऊन त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. या शिक्षकांसाठी प्रसंगी तुरुंगात जाण्याची भाषा केली, हे मुख्यमंत्र्यांच्या स्वभावाला साजेसेच. ‘पर्यायी व्यवस्था होईपर्यंत या शिक्षकांनी विनावेतन ऐच्छिक पद्धतीने काम करावे. त्यांच्या वेतनावर नंतर तोडगा काढला जाईल’, असा त्यांनी मांडलेला प्रस्ताव शिक्षकांनी फेटाळला आहे. आमची काय चूक, असा सवाल आठ वर्षांनंतर नोकरी गमवाव्या लागलेल्या शिक्षकांनी केला आहे. ‘मोठ्या प्रमाणावर नोटा सापडलेल्या दिल्ली न्यायालयातील न्यायमूर्ती वर्मा यांची फक्त बदली करण्यात आली. पण ज्यांची काहीही चूक नाही अशा २५ हजार शिक्षकांना न्यायालयाने घरी पाठवले’ ही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची प्रतिक्रियाही बरीच बोलकी ठरते.

शिक्षक भरतीतील कथित घोटाळ्यावरून भाजपने ममता बॅनर्जी यांना आधीपासूनच लक्ष्य केले होते. या घोटाळ्यात तत्कालीन शिक्षणमंत्री पार्थो चटर्जी यांना ‘ईडी’ व ‘सीबीआय’ या दोन्ही यंत्रणांनी अटक केली. बिगर भाजपशासित राज्यांमध्ये केंद्रीय यंत्रणा अधिक सक्रिय होऊन तेथील सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात कारवाई करण्याची परंपराच पडली आहे. यामुळे शिक्षणमंत्र्यांच्या अटकेला सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने तसा रंग दिला. या भरतीत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपने केला होता. ‘२५ हजारांपैकी १९ हजार शिक्षक पात्र ठरतात तर उर्वरित ५३०० संशयित’ अशी आकडेवारी पश्चिम बंगाल शिक्षण विभागानेच उच्च न्यायालयात सादर केली होती. भरतीत घोटाळा झाल्याची ही एक प्रकारे कबुलीच. यानंतर ‘सीबीआय’ आणि ‘ईडी’चा तपास पुढे गेला नसला तरी, भरती प्रक्रियेत नक्कीच काळेबेरे असणार. त्यामुळेच आधी पश्चिम बंगाल उच्च न्यायालयाने सर्वच्या सर्व २५ हजार जणांची नियुक्ती रद्द केली; तो निकाल सर्वोच्च न्यायालयानेही गेल्या आठवड्यात योग्य ठरवला. शिक्षकांची २५ हजार अतिरिक्त पदे निर्माण करण्याच्या राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाची चौकशी करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली, हाच काय तो तृणमूल काँग्रेस सरकारला दिलासा.

शिक्षकांच्या नोकऱ्या वाचविण्यासाठी पश्चिम बंगाल सरकार सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका सादर करणार आहे. तेथेही दिलासा मिळाला नाही तर नोकऱ्या गेलेले सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पुन्हा नव्याने राबविण्यात येणाऱ्या भरतीत प्राधान्य देण्याचे किंवा अन्य विभागांमध्ये सामावून घेण्याची तयारी मुख्यमंत्र्यांनी दर्शवली आहे. काहीही करून या शिक्षकांना दिलासा देण्याचा ममता बॅनर्जी यांचा प्रयत्न आहे. युवकांमध्ये असलेले सरकारी नोकऱ्यांचे आकर्षण हा एकूणच संवेदनशील विषय. हा विषय हाताळण्यात सरकारी यंत्रणांना अद्यापही यश आलेले नाही. सरकारी नोकऱ्यांसाठी कितीही किंमत मोजण्याची तयारी असलेला मोठा वर्ग देशभर आहे. यातूनच महाराष्ट्रात लोकसेवा आयोगाचा घोटाळा उघड झाला. मध्य प्रदेशातील ‘व्यापमं’ घोटाळा उघड होऊ लागला असताना अनेकांचे जीव गेले. उत्तर प्रदेश व बिहारमध्ये लोकसेवा आयोगाच्या परीक्षांवरून काहूर माजले. उत्तर प्रदेश सरकारला परीक्षाच रद्द करावी लागली होती. स्पर्धा परीक्षा पारदर्शकपणे घेतल्या जाव्यात, अशी बेरोजगार तरुणांची रास्त मागणी असते. या परीक्षांमध्ये पेपर फुटीच्या प्रकारांना ऊत आला. बिहारमधील नितीशकुमार सरकारने निवडणुकीच्या तोंडावर २७ हजार पदांची भरती करण्याची घोषणा दोनच दिवसांपूर्वी केली. आता तेथे भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने व्हावी ही अपेक्षा. भरतीमध्ये घोटाळे होतात, ते नोकरीतील स्थैर्याच्या गरजेपोटी. लाच दिली जाते ती गरजवंतांकडून. या गरजवंतांना दिलासा देणे गैर नाही, या मुद्द्याला ममता बॅनर्जी यांनी हात घातल्यामुळे भाजपची काहीशी पंचाईत झाली खरी; पण हे झाले पक्षीय राजकारण. सरकारी नोकऱ्यांसाठी पारदर्शक, ‘पवित्र’ व्यवस्था उभारणे जोवर कुणाला जमत नाही, तोवर भ्रष्टाचाराचा समुद्र आटणार नाही.



Source link

Supreme Court verdict Tamil Nadu Governor R N Ravi राज्याचे संरक्षक की राजकीय प्यादी?

0
Supreme Court verdict Tamil Nadu Governor R N Ravi राज्याचे संरक्षक की राजकीय प्यादी?


‘महामहिमांच्या श्रीमुखात’ हा अग्रलेख (९ एप्रिल) वाचला. घटनेच्या अनुच्छेद १५३ नुसार राज्यपाल हे राज्याचे मुख्य कार्यकारी प्रमुख असतात. मात्र, प्रत्यक्षात त्यांची भूमिका राष्ट्रपतीप्रमाणेच औपचारिक आणि सल्लाग्राही असणे अपेक्षित असते. परंतु अलीकडे तमिळनाडू, महाराष्ट्र आणि दिल्लीत घडलेल्या घटनांनी या अपेक्षेच्या पूर्ण विरोधात जाणारे वास्तव उघड केले. राज्यपालपद सत्ता-संघर्षाचे केंद्र बनले आहे.

राज्यपालपदाकडून तटस्थतेची अपेक्षा असते. त्याचे मुख्य कार्य असते घटना-सुसूत्रता राखणे आणि राष्ट्राची एकता अबाधित ठेवणे. मात्र अनेक ठिकाणी या पदाचा वापर केंद्र सरकारची राजकीय उद्दिष्टे साध्य करण्यासाठी वा राज्य सरकारच्या कारभारात अडथळे आणण्यासाठी केला जात आहे. सर्वोच्च न्यायालयाने नुकताच दिलेला निर्णय अशा राजकीय भूमिकेला दिलेली घटना-संमत चपराक आहे. याआधी सरकारिया आयोग (१९८७) आणि पुंछी आयोग (२०१०) यांनीही स्पष्ट शिफारशी केल्या होत्या. राज्यपालांचा विवेक वापर हा केवळ अत्यंत अपवादात्मक, असांविधानिक प्रकरणांपुरता मर्यादित असावा; विधेयकावर निर्णय सहा महिन्यांच्या आत घ्यावा. पण या शिफारशी केवळ अहवालांपुरत्या मर्यादित राहिल्या. राज्यपाल स्वत:ला सत्तेचे मूळ केंद्र समजून, निवडून आलेल्या सरकारांच्या कार्यात अडथळा आणत आहेत. ते या समजातून लवकर बाहेर आले नाहीत, तर त्यांची ‘राज्याचे संरक्षक’ ही ओळख लवकरच ‘राजकीय प्यादी’ या बिरुदात परिवर्तित होईल.

● आकाश इंगळे, बुलढाणा

एक तरी स्तंभ शाबूत असल्याचे सिद्ध

‘महामहिमांच्या श्रीमुखात’ हा अग्रलेख (९ एप्रिल) वाचला. राज्यपालांची मनमानी सांविधानिक शिस्तीला आणि संघराज्य तत्त्वाला हरताळ फासणारी आहे. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागून तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी बाजी मारली. राज्यपालांनी प्रदीर्घकाळ रोखून धरलेली विधेयके संमत झाली आहेत, असे समजावे हा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल उत्साहवर्धक आहे. राज्यपालपदाचा पक्षीय स्वार्थासाठी उघडउघड वापर केला गेला. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाने लोकशाहीचा एक तरी स्तंभ अद्याप शाबूत आहे, हा दिलासा मिळाला.

● प्रभा पुरोहित, जोगेश्वरी (मुंबई)

हेही वाचा

‘सरकारिया’चीही अंमलबजावणी करा

‘महामहिमांच्या श्रीमुखात’ हा अग्रलेख (९ एप्रिल) वाचला. सर्वोच्च न्यायालयाने लोकशाहीच्या संरक्षणाची जबाबदारी पार पाडत राज्यपालांच्या ‘राजकीय उत्साहाला’ बांध घातला, हे उत्तमच झाले. मात्र केवळ एवढ्यावर न थांबता आता या निर्णयाचे निमित्त साधून अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या सरकारिया समितीच्या सूचनांचीही अंमलबजावणी करण्यात यावी. केंद्रात सत्तेत असलेल्या पक्षाच्या सदस्याची अन्य पक्षीय राज्यांत राज्यपालपदी नेमणूक न करणे, संबंधित राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी नेमणुकीसंदर्भात चर्चा करणे इ. शिफारशींचे पालन केले जावे. राष्ट्रपतींप्रमाणे, राज्यपालांवरही हक्कभंगाचा प्रस्ताव मांडता यावा अशी तरतूद करण्यात यावी. याव्यतिरिक्त कायद्याचे विशेष ज्ञान नसल्याने घटनात्मक निर्णय घेताना विधानसभेच्या अध्यक्षांच्या असलेल्या मर्यादा लक्षात घेऊन, पक्षांतर मुद्द्यातील त्यांचा अधिकार काढून घेण्यात यावा व त्या जागी स्वतंत्र न्यायाधिकरणाची नेमणूक करण्यात यावी. महाराष्ट्रात जे झाले, ते पाहता या संदर्भात लवकर निर्णय घेणे गरजेचे आहे.

● प्रसाद कदम, पुणे

मनमानीला पायबंद बसेल

‘महामहिमांच्या श्रीमुखात’ हे संपादकीय वाचले. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिशांमुळे एकत्र आलेल्या विविध प्रांतात भाषा, सांस्कृतिक परंपरा अशा भिन्नतेमुळे भविष्यातील फुटीरतेचा धोका लक्षात घेऊन संविधानकर्त्यांनी अंशत: संघराज्य आणि अंशत: एकात्म राज्याची कल्पना स्वीकारली. त्यातून राज्यपालाचे पद, त्यांचे अधिकार आणि कार्य निर्माण केले गेले. राज्यपालांनी राष्ट्रपतींचा प्रतिनिधी म्हणून राज्यात काम करणे अपेक्षित असते. त्यांचे स्थान नामधारी असते.

राज्यातील लोकनियुक्त सरकार संविधानाच्या चौकटीत काम करते की नाही हे बघण्याचे काम त्यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. अगदी आणीबाणीच्या काळात म्हणजे विधानसभेत कोणत्याच पक्षाला बहुमत नसेल तरच विवेक अधिकार वापरण्याचे अधिकार त्यांना आहेत, परंतु जोपर्यंत केंद्र आणि राज्य यांच्यात एकच पक्षाचे सरकार असते तोपर्यंत राज्यपाल निमूटपणे काम करतात, मात्र विरोधी पक्षाचे सरकार आले की केंद्रातील सरकार राज्यपालाचा वापर राज्य सरकारांना अडचणीत आणण्यासाठी करते हा इतिहास आहे. स्वातंत्र्यानंतर लगेचच याची चूणूक पाहावयास मिळाली. नेहरूंच्या काळात राज्यपालाचा वापर करून केरळातील कम्युनिस्टांचे नंबुद्रीपाद सरकार पाडण्यात आले. केरळचे शिक्षण विधेयकही तत्कालिक राज्यपालांनी अडवून धरले. आंध्रातील रामाराव सरकारने विधानसभेत बहुमत गमावले नसतानाही तत्कालीन राज्यपाल रामलाल यांनी सरकार बरखास्त केले व नंतर राष्ट्रपतींच्या आदेशावरून पुनर्स्थापितही केले. अशी कितीतरी उदाहरणे आहेत. न्यायालयाने दिलेल्या निर्णयाने या मनमानीला पायबंद बसेल.

● डॉ. विजय पाटील, सांगली

हेही वाचा

राज्यपाल नव्हेत, सत्ताधाऱ्यांचे गुलाम

‘महामहिमांच्या श्रीमुखात…’ हे संपादकीय वाचले. कोश्यारी यांनी महाराष्ट्रात काय केले, हे आपण पाहिले आहे. विधानसभा निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींची असते. विधान परिषदेतील आमदारही थेट जनतेतून निवडून आले नसले, तरीही संबंधित मतदारसंघांतून निवडूनच आलेले असतात. त्यांनी संमत केलेली विधेयके भारतीय घटनेच्या अनुच्छेद १५९ प्रमाणे आहेत का, हे पाहणे आणि त्यावर स्वाक्षरी करणे एवढीच राज्यपालांची घटनात्मक जबाबदारी असते. तरीही ज्या राज्यांत विरोधी पक्षांची सरकारे आहेत, तिथे राज्यपालांना हाताशी धरून अडवणूक केली जाते. दुर्दैवाने राज्यपालही आपल्या पदाच्या मर्यादा विचारात न घेता सत्ताधाऱ्यांचे गुलाम असल्याप्रमाणे वागताना दिसतात.

● मार्कुस डाबरे, पापडी (वसई)

‘पॅट’चा खटाटोप कशासाठी?

‘पॅट प्रश्नपत्रिका फुटीबाबत २१ वाहिन्यांविरोधात तक्रार’ हे वृत्त (लोकसत्ता- ९ एप्रिल) वाचले. यासंदर्भात कारवाई नेमकी कोणाकोणावर आणि कशी करणार, हा यक्ष प्रश्न आहे. मुळात गोपनीयता हा कुठल्याही परीक्षेचा प्राणभूत घटक असतो. पॅट परीक्षांच्या प्रश्नपत्रिका त्या परीक्षेच्या आधीच सर्वत्र उपलब्ध होतात. तालुक्याच्या पंचायत समितीच्या कार्यालयात या प्रश्नपत्रिका घेण्यासाठी शाळांना बोलावले जाते. कुठल्याही बंद पाकिटात नसलेल्या या प्रश्नपत्रिका खुल्या पद्धतीने शाळांना दिल्या जातात. शाळांचे शिक्षकच प्रश्नपत्रिका घेण्यासाठी येतात. त्यामुळे या परीक्षांबाबत कुठली गोपनीयता पाळली जात नाही. मग प्रश्न असा की या परीक्षांचे आयोजन कशासाठी? केवळ छपाई आणि वाहतुकीवर खर्च करण्यासाठी? शाळा स्तरावर होणाऱ्या परीक्षांची तरी किमान गोपनीयता पाळली जाते. केवळ एक कर्मकांड म्हणून या परीक्षा उरकवायच्या आहेत हेच यातून स्पष्ट होते. या परीक्षांना शाळा, शिक्षक आणि विद्यार्थी गांभीर्याने घेत नाहीत. आधीच जगजाहीर होणाऱ्या प्रश्नपत्रिकेद्वारे होणारे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन कितपत विश्वसनीय असेल?

● विवेक चव्हाण, शहापूर (ठाणे)

अपेक्षाभंग करणारे अधिवेशन

‘मतदान सरो, मतदार मरो’ हा लेख (९ एप्रिल) वाचला. अधिवेशन रेटून नेण्याची कला सत्ताधाऱ्यांच्या अंगवळणी पडली आहे. ज्या राज्यात भल्या मोठ्या देशाची आर्थिक राजधानी वसली आहे त्या राज्याची आर्थिक स्थिती ढासळली आहे. बेरोजगारी वाढत आहे. ज्यांच्या जिवावर महासत्तेचे स्वप्न दाखविले जात आहे त्या युवकांचे प्रश्न जटिल होत आहेत. परीक्षांमधला घोळ संपता संपेना, यातून युवकांची वाढणारी व्यसनाधीनता, गुन्हेगारी, असे शेकडो प्रश्न असताना राज्य सरकारला मात्र याचे काही गांभीर्य असल्याचे दिसून येत नाही. खरे तर या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारकडून आर्थिक क्षेत्रात भरीव योगदानाची आणि आणि नवकल्पनांची अपेक्षा होती, मात्र संपूर्ण कबर, कामरा, सालियन असे निरर्थक मुद्दे उकरून काढण्यात आले. पुढील अधिवेशनही असेच ढकलले जाईल.

● आकाश सानप, नाशिक





Source link

GT vs RR: साई सुदर्शनने घडवला इतिहास, IPLमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा भारताचा पहिला फलंदाज

0
GT vs RR: साई सुदर्शनने घडवला इतिहास, IPLमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा भारताचा पहिला फलंदाज



IPL 2025 Sai Sudharsan Record: गुजरात टायटन्स संघाने साई सुदर्शनची ८२ धावांची उत्कृष्ट खेळी आणि कमालीच्या गोलंदाजीच्या जोरावर राजस्थान रॉयल्स संघावर मोठा विजय मिळवला. गुजरातने आपल्या घरच्या मैदानावर राजस्थानचा ५८ धावांनी पराभव केला आहे. गुजरातने प्रथम फलंदाजी करताना २१७ धावांची मोठी धावसंख्या उभारली होती, ज्यामध्ये साई सुदर्शनच्या खेळीचं मोठं योगदान आहे. दरम्यान त्याने या सामन्यात मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.

साई सुदर्शनने आयपीएलमध्ये इतिहास रचला आहे. या स्पर्धेत आतापर्यंत कोणताही भारतीय फलंदाज जे करू शकला नाही, ते आता साई सुदर्शनने करून दाखवलं आहे. यापूर्वी एबी डिव्हिलियर्सनेही फक्त आरसीबीकडून खेळताना असा पराक्रम केला होता.

साई सुदर्शन हा एकाच आयपीएल मैदानावर सलग पाच वेळा ५० पेक्षा जास्त धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर, साई सुदर्शनने २०२४ मध्ये ५० पेक्षा जास्त धावांचे सलग दोन डाव खेळले. त्यानंतर, या वर्षीही त्याने याच मैदानावर सलग तीन वेळा ५० पेक्षा जास्त धावांचा डाव खेळला आहे. यापूर्वी कोणत्याही भारतीय फलंदाजांनी अशी कामगिरी केली आहे. २०१८ ते २०१९ दरम्यान आरसीबीकडून खेळताना एबी डिव्हिलियर्सनेही असाच पराक्रम केला होता.

https://platform.twitter.com/widgets.js

साई सुदर्शनने यावर्षी अहमदाबादमध्ये पंजाब किंग्जविरुद्ध ७४ धावांची शानदार खेळी केली. यानंतर, त्याने याच मैदानावर मुंबई इंडियन्सविरुद्ध ६३ धावांची शानदार खेळी केली होती. तो आरसीबीविरुद्ध ४९ धावांवर बाद झाला होता, पण हा सामना बंगळुरूमध्ये खेळवण्यात आला. यानंतर, हैदराबादमध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध तो फक्त ५ धावा करू शकला. पण तो पुन्हा अहमदाबादला परतताच त्याने शानदार खेळी केली होती.



Source link

Illegal parking at the entrance of Municipal Corporation Rukminibai Hospital in Kalyan

0
Illegal parking at the entrance of Municipal Corporation Rukminibai Hospital in Kalyan



Illegal parking at the entrance of Municipal Corporation Rukminibai Hospital in Kalyan | कल्याणमध्ये महापालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयाच्या प्रवेशव्दारावर बेकायदा वाहनतळ; रुग्णवाहिका, डाॅक्टरांच्या वाहनांना अडथळे





Source link

ठाण्यातील २०० वर्षे जुन्या ऐतिहासिक चर्चचे नूतनीकरण

0
ठाण्यातील २०० वर्षे जुन्या ऐतिहासिक चर्चचे नूतनीकरण



ठाणे – शहरालाल विविध ऐतिहासिक वास्तूंचा वारसा लाभला आहे. त्यातील एक वास्तू म्हणजे सेंट जेम्स (सीएनआय) चर्च आहे. या चर्चचे जुने बांधकाम जीर्ण झाले असल्यामुळे या चर्चच्या समितीने चर्चच्या नूतनीकरणाचे काम हाती घेतले आहे. परंतू, या नुतनीकरणा दरम्यान चर्चचा इतिहास पुसला जाणार नाही याची विशेष खबरदारी घेतली जात असल्याची माहिती सेंट जेम्स चर्च समितीने दिली.

ठाणे शहरात १८२५ साली बांधलेले सेंट जेम्स चर्चला पूर्वी ‘अँग्लिकन चर्च, ठाणे’ तर, ठाणेकर नागरिक पोर्तुगीज चर्च म्हणून ओळखत होते. इंग्रज-प्रोटेस्टंट ख्रिस्ती बांधवांनी या चर्चची उभारणी केली, असे इतिहासात लिहीले आहे. त्यामुळे ठाण्यातील ऐतिहासिक वारसात या चर्चेचा उल्लेख आहे. गेल्या काही वर्षांत, हवामान आणि बाह्य घटकांमुळे या चर्चच्या संरचनेचे नुकसान झाले होते. त्य़ामुळे पुढील पिढीला या चर्चचा इतिहास समजावा यासाठी चर्चेचे नुतणीकरण करण्याचा निर्णय समितीने घेतला. चर्चच्या संरचनेची अखंडता आणि वारसा जपण्यासाठी महत्त्वपूर्ण नूतनीकरणाचे प्रयत्न समितीकडून सुरू आहेत.

१९ व्या शतकाच्या सुरुवातीला बांधलेले हे चर्च काळाच्या कसोटीवर उतरले आहे. परंतु, या चर्चचा इतिहास, समृद्ध वारसा नव्या पिढीला समजण्यासाठी या चर्चचे संवर्धन महत्त्वाचे आहे, असे समितीकडून सांगण्यात आले. सध्याच्या नूतनीकरणाच्या कामात केवळ मूळ दगडी बांधकाम उघड करणेच नाही तर, भविष्यासाठी इमारतीचे संरक्षण करण्यासाठी नवीन प्लास्टर देखील लावण्यात येत आहे. त्यासह, नव्या रचनेत या चर्चचे बांधकाम होणार असले तरी, या चर्चचा ऐतिहासिक वारस्याला कुठेही धक्का लागणार नाही याची विशेष खबरदारी घेतली जात आहे. छप्पर,घंटी, टॉवर, बाह्य दर्शनी भाग आणि आतील भाग यांचा समावेश करून जीर्णोद्धार टप्प्याटप्प्याने केला जात आहे, अशी माहिती चर्च समितीकडून देण्यात आली.

नुतनीकरणानंतर ऐतिहासिक स्थळ म्हणून काम पाहणार

सेंट जेम्स चर्च च्या नुतनीकरणानंतर हे चर्च प्रार्थनास्थळ आणि ऐतिहासिक स्थळ म्हणून काम पाहिल, अशी माहिती समितीमार्फत देण्यात आली. तसेच भविष्यातील पिढ्यांसाठी हे चर्च ठाण्याच्या वसाहतकालीन वास्तुकलेचे दर्शन घडवेल, असेही त्यांनी सांगितले.

ठाण्यातील सर्वात जुन्या चर्चपैकी सेंट जेम्स हे चर्च आहे. २०० वर्षाचा इतिहास या चर्चला लाभला आहे. त्यामुळे या चर्चचे जतन करण्याचे महत्त्व ओळखून स्थानिक वारसाप्रेमी आणि चर्च समुदायाने या जीर्णोद्धाराचा निर्णय घेतला. या प्रकल्पाला विविध स्तरातून पाठिंबा मिळाला आहे, अशी प्रतिक्रिया चर्च समितीतील सदस्य अँथनी शिंदे यांनी दिली.



Source link

सह्याद्री कारखाना जिंकला म्हणजे महाराष्ट्र जिंकला असं नाही, घोरपडेंचं बाळासाहेब पाटलांना आव्हान

0


MLA Manoj Ghorpade on Balasaheb Patil : मागील 4 दिवसापूर्वी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पार पडली. या निवडणुकीमध्ये माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पॅनेलने 21-0 ने धुव्वा उडवत विद्यमान भाजपचे आमदार मनोज घोरपडे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्या पॅनलचा सुपडा साफ केला. यानंतर आमदार मनोज घोरपडे यांनी, सह्याद्री साखर कारखाना जिंकला म्हणजे महाराष्ट्र जिंकला असं नव्हे, असं वक्तव्य करत नाव न घेता बाळासाहेब पाटील यांच्यावर टीका केली. तसेच पुन्हा विधानस,भा निवडणूक लढण्याचे आव्हान देखील दिले.

नेमकं काय म्हणाले मनोज घोरपडे?

 9000 हजार सभासद आज देखील वारस नोंदी पासून वंचित आहेत. कारखान्यामध्ये वारस नोंदी करgन घ्या त्यानंतर इलेक्शन लावा त्यानंतर सर्वांना रिझल्ट कळेल. त्यानंतर मी ही पुन्हा विधानसभा निवडणूक लढण्यासाठी आमदारकीचा राजीनामा देऊ शकता असे म्हणत बाळासाहेब पाटलांना घोरपडे यांनी आव्हानं दिले. आमदार मनोज घोरपडे यांचे विरोधकांना कारखाना निवडणुकीनंतर सडेतोड उत्तर दिले आहे.

सह्याद्री साखर कारखान्याच्या विजयानं मविआच्या घटकपक्षांचा आत्मविश्वास वाढणार

सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक यावेळी अधिक चर्चेत राहिली. सत्ताधारी बाळासाहेब पाटील यांच्या पी.डी. पाटील पॅनल समोर दोन पॅनलचं आव्हान होतं. कराड उत्तरचे आमदार मनोज घोरपडे आणि उदयसिंह  पाटील- उंडाळकर यांचं स्व.यशवंतराव चव्हाण साहेब सह्याद्री  परिवर्तन पॅनल आणि भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांचं यशवंतराव चव्हाण सह्याद्री स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनल निवडणुकीच्या रिंगणात होती. या दोन्ही पॅनलचा पराभव करत बाळासाहेब पाटील यांच्या पॅनलनं 21-0 असा विजय मिळवला.  बाळासाहेब पाटील यांनी गेल्या दोन महिन्यांमध्ये कारखाना कार्यक्षेत्र पिंजून काढत त्यांच्या विरोधातील नरेटिव्ह खोडून काढण्यात यश मिळवल्याचं निकालातून पाहायला मिळालं. राज्यात पाच महिन्यांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठं अपयश आलं. सातारा जिल्ह्यात महायुतीनं सर्व जागा जिंकल्या. कराड उत्तरचे 5 टर्म आमदार असलेल्या बाळासाहेब पाटील यांचा देखील पराभव झाला. विधानसभा निवडणुकीनंतर बाळासाहेब पाटील यांच्या विरोधकांच्या निशाण्यावर सह्याद्री साखर कारखान्याची निवडणूक होती. सातारा लोकसभा मतदारसंघात मविआचा थोडक्यात पराभव झाला होता. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मविआला एकाही मतदारसंघात यश मिळालं नाही. मात्र, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतील विजयानं मविआच्या घटकपक्षांचा आत्मविश्वास नक्कीच वाढणार आहे. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचं कार्यक्षेत्र कराड, सातारा, कोरेगाव, खटाव आणि कडेगाव तालुक्यात आहे. बाळासाहेब पाटील यांनी विजयी सभेत आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोकसभा, विधानसभेच्या निवडणुका ताकदीनं लढायच्या आहेत, असं जाहीर केलं आहे.

महत्वाच्या बातम्या:

ठोक आता शड्डू… सह्याद्रीतील विजयानंतरच्या मिरवणुकीतील ‘ते’ पोस्टर चर्चेत, बाळासाहेब पाटलांचा विजय साताऱ्यातील राजकारणात टर्निंग पॉईंट ठरणार?

अधिक पाहा..



Source link

Sugar factory election under Radhakrishna Vikhe control goes unopposed

0
Sugar factory election under Radhakrishna Vikhe control goes unopposed



Sugar factory election under Radhakrishna Vikhe control goes unopposed | राधाकृष्ण विखे यांच्या वर्चस्वाखालील साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध





Source link