Monday, July 27, 2026
Home Blog Page 432

मुसलमानांच्या घरोघरी जाऊन वक्फ कायद्याचे फायदे सांगणार BJP, मित्रपक्षांनाही मिळणार दिलासा

0
मुसलमानांच्या घरोघरी जाऊन वक्फ कायद्याचे फायदे सांगणार BJP, मित्रपक्षांनाही मिळणार दिलासा


वक्फ कायदा लागू झाल्यानंतर भाजप आता मुस्लिमांमधील विरोधाची आग शांत करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याची सुरुवात बिहारपासून होणार आहे, जिथे काही महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. पक्षाचे नेते घरोघरी जाऊन हा कायदा मुस्लिमांच्या हिताचा कसा असेल, हे सांगून विरोधकांचा दावा फेटाळून लावणार आहेत. याशिवाय लोकसभा आणि राज्यसभेत पाठिंबा देणाऱ्या जेडीयूला दिलासा देण्याचाही प्रयत्न असेल, पण जमिनीवरील मुस्लिमांच्या नाराजीची चिंता त्यांना सतावत आहे.



Source link

बौद्ध मूर्तीस्थापनेनंतर साखरवाडीत तणाव: पोलिसांकडून बौद्ध समाजाला मारहाण व अटक!

0
बौद्ध मूर्तीस्थापनेनंतर साखरवाडीत तणाव: पोलिसांकडून बौद्ध समाजाला मारहाण व अटक!

फलटण :- अनेक वर्षांच्या प्रतीक्षा आणि संघर्षानंतर साखरवाडी (तालुका फलटण, जिल्हा सातारा) येथील बौद्ध समाजाने स्वतः पुढाकार घेत भगवान गौतम बुद्ध यांचे मूर्तिस्थान व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा स्थापन केला. “आता सुट्टी नाही!” अशा निर्धारासह ही ऐतिहासिक कृती केली गेली होती. मात्र, या पवित्र कार्यानंतर साखरवाडीत तणाव निर्माण झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मूर्तीस्थापनेनंतर बौद्ध समाजातील काही व्यक्तींना पोलिसांकडून अटक करण्यात आली असून, काहींवर मारहाण झाल्याचेही समजते. यामुळे साखरवाडी परिसरात अस्वस्थता आणि संतापाचे वातावरण आहे. स्थानिक बौद्ध अनुयायांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी शांततेत आणि कायद्याच्या चौकटीत हा उपक्रम राबवला, मात्र तरीही प्रशासनाकडून अतिरेकी पद्धतीने कारवाई करण्यात आली.

या घटनेनंतर बौद्ध समाजाने तीव्र निषेध नोंदवत, मूर्तीस्थापनेला मान्यता द्यावी, अटकेतील व्यक्तींना तत्काळ मुक्त करावे आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.

विदर्भातील अंमली पदार्थाच्या तस्करीचे धागेदोरे सीमापार, आंतरराज्यीय तस्करास राजस्थान-मध्यप्रदेश सीमेवरून अटक

0
विदर्भातील अंमली पदार्थाच्या तस्करीचे धागेदोरे सीमापार, आंतरराज्यीय तस्करास राजस्थान-मध्यप्रदेश सीमेवरून अटक



inter state syndicate of drug smuggling a smuggler arrested in yavatmal विदर्भातील अंमली पदार्थाच्या तस्करीचे धागेदोरे सीमापार, आंतरराज्यीय तस्करास राजस्थान-मध्यप्रदेश सीमेवरून अटक





Source link

will also get carpet area of facility plot Government announces concessions for redevelopment

0
will also get carpet area of facility plot Government announces concessions for redevelopment



will also get carpet area of facility plot Government announces concessions for redevelopment | आता सुविधा भूखंडाचे चटईक्षेत्रफळही मिळणार! पुनर्विकासासाठी शासनाकडून सवलत जाहीर





Source link

Success Story of Neeta Travels Owner neeta who married at 14 then divorced at 34 now earing well

0
Success Story of Neeta Travels Owner neeta who married at 14 then divorced at 34 now earing well



Success Story of Neeta Travels Owner neeta who married at 14 then divorced at 34 now earing well | नीता ट्रॅव्हल्सच्या मालकीणीचा संघर्षमय प्रवास! १४व्या वर्षी लग्न अन् नवऱ्याने दिली जीवे मारण्याची धमकी; ‘या’ निर्णयाने बदललं आयुष्य





Source link

न्यायालयीन लढ्याचा विजय! शिक्षण संस्थेच्या विरोधात १४ वर्षांनी शिक्षकाला मिळाला न्याय

0
न्यायालयीन लढ्याचा विजय! शिक्षण संस्थेच्या विरोधात १४ वर्षांनी शिक्षकाला मिळाला न्याय

इंदापूर: सत्ताधाऱ्यांशी निगडित असलेल्या शिक्षण संस्थेच्या अन्यायाविरुद्ध तब्बल १४ वर्षे न्यायालयीन लढा देणाऱ्या शिक्षकाला अखेर न्याय मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिक्षण संस्थेची याचिका फेटाळत उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला आहे. यामुळे बावडा (ता. इंदापूर) येथील श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीला न्याय व्यवस्थेने जोरदार चपराक दिली आहे. या संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आहेत.

प्रकरण २००२ सालचे आहे. शहाजीनगर (रेडा) येथील कै. शहाजीराव पाटील माध्यमिक विद्यालयात शिक्षक पदासाठी देविदास मधुकर माने यांची नेमणूक करण्यात आली होती. जिल्हा परिषदेने २००४ मध्ये त्यांच्या नियुक्तीस मान्यता दिली होती. मात्र, नोव्हेंबर २०११ मध्ये संस्थेने त्यांचे निलंबन केले.

देविदास माने यांनी या अन्यायाविरुद्ध पुणे येथील शाळा न्यायाधिकरणात धाव घेतली. न्यायाधिकरणाने त्यांच्या बाजूने निकाल देत निलंबनाचा आदेश रद्द केला. मात्र, संस्थेने हा निर्णय उच्च न्यायालयात आव्हानात्मक केला.

या खटल्यात माने यांची बाजू शिक्षण क्षेत्रातील अनुभवी वकील ॲड. सुकुमार घनवट आणि ॲड. विश्वनाथ तळकुटे यांनी प्रभावीपणे मांडली. त्यांनी संस्थेने शिक्षण अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी न घेता केलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचे ठोस पुराव्यांसह न्यायमूर्ती आर.एन. जोशी यांच्यासमोर मांडले. उच्च न्यायालयाने माने यांचे निलंबन रद्द करत, त्यांना तात्काळ सेवेत घेण्याचे आदेश दिले.

पण संस्थेने हार मानली नाही. त्यांनी हा निकाल सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिला. मात्र, ७ एप्रिल २०२५ रोजी झालेल्या सुनावणीत ॲड. लांडगे यांनी माने यांची बाजू भक्कमपणे मांडली. त्यांनी संस्थेच्या वेळकाढूपणाचा मुद्दा अधोरेखित केला. सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद मान्य करत शिक्षण संस्थेची याचिका फेटाळली आणि उच्च न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.

हा निर्णय केवळ देविदास माने यांचा विजय नसून, संपूर्ण शिक्षक समाजासाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. नियम, कायदा आणि सत्यावर आधारित लढा अखेर न्यायाच्या रूपात फळाला आला आहे.

thugs of hindostan : disaster bollywood movie : thugs of hindostan flop film :thugs of hindostan 310 crore budget : बॉलीवूडचा सुपरफ्लॉप चित्रपट : ठग्स ऑफ हिंदोस्तान

0
thugs of hindostan : disaster bollywood movie : thugs of hindostan flop film :thugs of hindostan 310 crore budget : बॉलीवूडचा सुपरफ्लॉप चित्रपट : ठग्स ऑफ हिंदोस्तान


एखादा नवीन चित्रपट आला आणि त्याचे रिव्ह्यू चांगले असतील, सगळीकडे चर्चा होत असेल तर अनेकजण तो चित्रपट पाहायला आवर्जून जातात. दर आठवड्याला अनेक चित्रपट रिलीज होतात, काही फ्लॉप होतात तर काही हिट होतात. हिट चित्रपट पाहायला अनेकांना आवडतं. मात्र काही लोकांना फ्लॉप चित्रपट पाहण्याची आवड असते. असाच एक बॉलीवूड चित्रपट आहे, जो चित्रपटगृहांमध्ये फ्लॉप झाला. तो आता ओटीटीवर उपलब्ध आहे.

तुम्ही दर आठवड्याला ओटीटीवर येणार नवनवीन सिनेमे पाहत असाल. पण हा चित्रपट सात वर्षांपूर्वी आला होता. खरं तर या चित्रपटात तगडी स्टारकास्ट होती. निर्मात्यांनी तब्बल ३१० कोटी रुपये खर्च करून त्याची निर्मिती केली होती. पण या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. या चित्रपटाचे नाव आहे ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’. आमिर खानचा हा चित्रपट बॉलीवूडमधील सर्वात मोठ्या फ्लॉप सिनेमांपैकी एक आहे.

सात वर्षांपूर्वी २०१८ मध्ये हा चित्रपट रिलीज झाला. ट्रेलर आल्यापासून चित्रपटाबद्दल नकारात्मक पसरली होती. आमिर खान अमिताभ बच्चन असे दोन दिग्गज मुख्य भूमिकेत असूनही कथा दमदार नसल्याने प्रेक्षकांनी चित्रपट नाकारला. व्हीएफएक्स व ग्राफिक्सचा सिनेमात खूप वापर करण्यात आला होता.

हेही वाचा

या चित्रपटात १७९५ चा काळ दाखवण्यात आला होता. तेव्हा भारताला हिंदुस्थान म्हटलं जायचं. तर भारतीय बँडिट्सना ठग्स म्हटलं जायचं. कंटेंट चांगला नसेल तर कितीही खर्च करून चित्रपटाची निर्मिती केली असेल आणि कितीही मोठे स्टार्स असतील तरी चित्रपटाकडे प्रेक्षक पाठव फिरवतील हे ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’ने सिद्ध केलं.

चित्रपटाचा ट्रेलर

हेही वाचा

या चित्रपटाचे दिग्दर्शन विजय कृष्णा आचार्यने केलं होतं. तब्बल ३१० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आदळला. भारतात त्याने फक्त १५१.३० कोटींचे कलेक्शन केले होते. आणि जगभरातील कलेक्शन ३२७ कोटी रुपये होतं. हा त्या वर्षीच्या फ्लॉप चित्रपटांपैकी एक होता.

हेही वाचा

या चित्रपटात आमिर खान, अमिताभ बच्चन, कतरिना कैफ आणि फातिमा सना शेख यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. चित्रपटाची कथा १७९५ मधील ब्रिटीश इंडियाच्या काळावर बेतलेली आहे. तुम्ही हा चित्रपट पाहिला नसेल तर तो युट्यूब किंवा प्राइम व्हिडीओवर पाहू शकता.





Source link

तापमानाने घेतला पारा चढ; तहसीलदारांचा उन्हाळ्यात काळजी घेण्याचा इशारा

0
तापमानाने घेतला पारा चढ; तहसीलदारांचा उन्हाळ्यात काळजी घेण्याचा इशारा

फलटण (साहस टाइम्स) । फलटण शहरासह संपूर्ण तालुक्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून, नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक झाले आहे. उन्हाच्या झळा वाढू लागल्याने दुपारी घराबाहेर पडणे टाळावे, असे स्पष्ट आवाहन तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी केले आहे.

ज्यांना दुपारी बाहेर जाऊन काम करणे अपरिहार्य आहे, त्यांनी पांढऱ्या रंगाचे कापड, टोपी किंवा छत्रीचा वापर करून डोक्याचे आणि शरीराचे संरक्षण करावे, असे आवाहन त्यांनी केले. यामुळे उष्माघातासारख्या गंभीर त्रासांपासून बचाव होतो.

उन्हाळ्यात शरीरातून पाण्याचे बाष्पीकरण मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यासाठी वेळोवेळी भरपूर पाणी प्यावे. तसेच नारळपाणी, कोकम सरबत, कैरीचे पन्हे, ग्लूकोजसारखी नैसर्गिक व ऊर्जा देणारी पेये सेवन करावीत, अशी माहिती त्यांनी दिली. कृत्रिम थंड पेये, सॉफ्ट ड्रिंक्स यांचा वापर टाळावा, असा सल्ला ही त्यांनी दिला.

या दोन ते तीन महिन्यांच्या काळात गरज असल्यासच दुपारी घराबाहेर पडावे, अन्यथा शक्यतो विश्रांती घ्यावी, असा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

ईव्हिएमविरोधात विविध संघटनांचा एल्गार, जेलभरो

0
ईव्हिएमविरोधात विविध संघटनांचा एल्गार, जेलभरो


यवतमाळ : भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय पीछडा वर्ग (ओबीसी) मोर्चाच्या वतीने स्थानिक संविधान चौकात जेलभरो आंदोलन करण्यात आले. ईव्हीएम विरोधात घोषणाबाजी करीत महाबोधी महाविहार मुक्त करण्याची मागणी यावेळी आंदोलकांनी केली.

येथील संविधान चौकात रखरखत्या उन्हात विविध संघटनांचे कार्यकर्ते शेकडोच्या संख्येने एकत्र आले. ईव्हिएम हटाओ संविधान बचाओ, ओबीसीची जातनिहाय जनगणना करा, नवीन शैक्षणिक धोरण रद्द करा, वक्फ बोर्ड संशोधन विधेयक मागे घ्या, महाबोधी महाविहार मुक्त करा अशा विविध मागण्या आंदोलकांनी लावून धरल्या. लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएम मशीनद्वारे घोटाळा करून केंद्रात आणि राज्यात भाजपने सरकार स्थापन केल्याचा आरोप आंदोलकांनी यावेळी केला. या प्रकाराने संसदीय लोकशाही संपण्याच्या मार्गावर आहे. लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी ईव्हिएम मशीन कायमची हद्दपार करून सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी आंदोलकांनी केली. ईव्हिएम भारतातून हद्दपार हाईपर्यंत हा लढा सुरू ठेवण्याचा इशारा भारतीय बेरोजगार मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत मुनेश्वर यांनी दिला. या मोर्चाचे नेतृत्व भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुनील गवई. बीएमपी पक्षाच्या उपाध्यक्ष ज्योती शामकुवर यांनी केले.

आंदोलनात शाहेद सिदिकी, विजयराज शेगेकर, विजय चहांदे, भुवन मुनेश्वर, प्रतीक भुजाडे, ॲड. रोशना आडे, अर्चना लढे, वेणूमडावी, अविनाश मरापे, दिनेश आमटे, युवराज आडे, राजीव डफाळे, विलास भोयर, गुलाब कन्नलवार आदींसह बहुजन क्रांती मोर्चा, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, छत्रपती क्रांतीसेना, भारतीय बेरोजगार मोर्चा, राष्ट्रीय गुरु रविदास क्रांती मोर्चा, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, मौर्य क्रांती संघ, बहुजन मुक्ती पार्टी, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, महाराष्ट्र टिपू सुलतान सेना, लहुजी क्रांती मोर्चा आदी सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. प्रचंड ऊन असतानाही आंदोलक रस्त्यावर ठिय्य देवून बसले. पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.

हेही वाचा

संविधान सन्मान रॅली

समता पर्व प्रतिष्ठान यवतमाळच्या वतीने ॲड. सीमा तेलंगे यांच्या मार्गदर्शनात संविधान सन्मान रॅलीचे आयोजन यवतमाळात करण्यात आले होते. पथनाट्य, देखाव्यातून संविधानासंदर्भात जनजागृती करण्यात आली. समता मैदान येथून रॅली सुरू होवून शहरातील विविध भागात फिरली. संविधान चौकात रॅलीचा समारोप झाला. रॅलीत विविध पोस्टर पथनाट्य, दृश्य सादरीकरणामधून संविधानाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. रॅलीत विद्यार्थी व युवकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. चिमुकल्यांनीही विविध महापुरूषांच्या वेशभूषा साकारून समाजप्रबोधन केले.





Source link

महावीर जयंतीनिमित्त फलटणमध्ये सामाजिक ऐक्याचा संदेश; रामराजे नाईक निंबाळकर यांचे महावीर स्तंभाला अभिवादन

0
महावीर जयंतीनिमित्त फलटणमध्ये सामाजिक ऐक्याचा संदेश; रामराजे नाईक निंबाळकर यांचे महावीर स्तंभाला अभिवादन

फलटण |भगवान महावीर यांच्या शांततेच्या आणि अहिंसेच्या संदेशाने प्रेरित होऊन, महावीर जयंतीनिमित्त फलटणमध्ये धार्मिक आणि सामाजिक सलोख्याचे वातावरण पाहायला मिळाले. विधान परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी भगवान महावीर स्तंभास पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.

या प्रसंगी क्रांतीसुर्य प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मिलिंद नेवसे, सामाजिक कार्यकर्ते दादासाहेब चोरमले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. महावीर जयंतीनिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, या उपक्रमांतून अहिंसा, क्षमा आणि करुणा यांचे महत्व अधोरेखित करण्यात येत आहे.