Saturday, July 25, 2026
Home Blog Page 425

पिंपरीतील होर्डिंग दोन महिने जाहिरातीविना; वाचा काय आहे कारण?

0
पिंपरीतील होर्डिंग दोन महिने जाहिरातीविना; वाचा काय आहे कारण?



पिंपरी : वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळून किवळेतील दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. १५ एप्रिल ते १५ जून २०२५ या दोन महिने कालावधीत होर्डिंगवर जाहिरातफलक लावण्यास परवानगी दिली जाणार नाही. दोन महिने होर्डिंग जाहिरातीविना ठेवण्याचा निर्णय आकाशचिन्ह व परवाना विभागाने घेतला आहे. या निर्णयाला होर्डिंगचालकांनीही होकार दर्शविला आहे.

नेत्याचा वाढदिवस, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक यासह कोणत्याही कार्यक्रमाची होर्डिंगवर जाहिरात केली जाते. अनेक जण त्यासाठी महापालिकेची परवानगी घेत नसल्याचे वेळाेवेळी समाेर आले. अशा हाेर्डिंगधारकांवर महापालिका प्रशासनाने गुन्हे दाखल केले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचाही यासाठी वापर केला जात आहे. किवळे येथे १७ एप्रिल २०२३ रोजी अनधिकृत हाेर्डिंग काेसळून पाच मजुरांचा मृत्यू झाला हाेता. या दुघर्टनेनंतर महापालिकेने शहरातील १७४ अनधिकृत हाेर्डिंग जमीनदाेस्त केले. शहरात एक हजार ४०० हाेर्डिंग अधिकृत आहेत. होर्डिंगचे सर्वेक्षण सुरूच आहे.

शहरातील होर्डिंगचालक आणि आकाशचिन्ह व परवाना विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक महापालिकेत झाली. वादळी वारे, अवकाळी पावसामुळे होर्डिंग कोसळून अपघात घडण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी १५ एप्रिल ते १५ जून असे दोन महिने होर्डिंगवर जाहिरातफलक न लावण्याच्या सूचना होर्डिंगचालकांना दिल्या आहेत. या काळात होर्डिंग रिकामे ठेवण्यात यावेत. होर्डिंगचे लोखंडी स्ट्रक्चर, पाया खराब असल्यास ते तत्काळ दुरुस्त करून घ्यावे. स्थापत्यविषयक लेखापरीक्षण करावे, अशा सूचना महापालिकेने दिल्या आहेत.

होर्डिंगचालकांच्या तक्रारी

होर्डिंगवरील मोजमाप, उंची, स्थिरतेबाबत नियमबद्ध तपासणी करावी. चाळीस फुटांपेक्षा उंच होर्डिंग आणि ३० बाय ४० फुटांपेक्षा मोठ्या जाहिरातींवर कारवाई होत नाही. होर्डिंगचे मोजमाप आणि तपशील चार बाय तीन फुटांच्या पाटीवर लिहिणे बंधनकारक असूनही, त्याचे पालन होत नाही. पाच, दहा, पंधरा, वीस, पंचवीस वर्षांपूर्वीचे किती जाहिरात होर्डिंग आहेत, याची माहिती उपलब्ध करून दिली जात नाही, अशा तक्रारी होर्डिंगचालकांनी केल्या.

स्थिरता प्रमाणपत्र देण्यास ‘सीओईपी’चा नकार

किवळेतील दुर्घटनेनंतर शहरात नवीन होर्डिंग उभारण्यासाठी पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय (सीओईपी) या संस्थेच्या स्थिरता प्रमाणपत्राची अट बंधनकारक केली होती. आता ‘सीओईपी’नेच प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे महापालिकेच्या अभियंत्यांकडूनच स्थिरता प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

पावसाळ्यापूर्वीच्या वादळी वाऱ्यामुळे होर्डिंग कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत होर्डिंगवर जाहिरात लावली जाणार नाही. होर्डिंग रिकामे ठेवले जाणार आहेत. होर्डिंगचे स्ट्रक्चर खराब झाले असल्यास ते तातडीने दुरुस्त करून घेण्याच्या सूचना होर्डिंगचालक, मालकांना दिल्या आहेत, असे आकाशचिन्ह व परवाना विभागाचे उपायुक्त प्रदीप ठेंगल यांनी सांगितले.



Source link

‘…याकडे काँग्रेसने डोळसपणे पाहायला हवे’, ठाकरेंच्या सेनेचा सल्ला; म्हणाले, ‘मोदी 2047 पर्यंत…’

0
‘…याकडे काँग्रेसने डोळसपणे पाहायला हवे’, ठाकरेंच्या सेनेचा सल्ला; म्हणाले, ‘मोदी 2047 पर्यंत…’


Congress National Convention In Gujarat: “काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अधिवेशन मोदी-शहांच्या गुजरातमध्ये संपन्न झाले. अहमदाबादमध्ये काँग्रेसने अधिवेशन घेतले व राष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा केली याला विशेष महत्त्व आहे. एरवी विरोधकांचा आवाज दडपण्याची एकही संधी न सोडणाऱ्या मोदी-शहांना गुजरातच्या भूमीवरून त्यांच्यावर झालेले हल्ले सहन करावे लागले. ‘घुसकर मारेंगे’ हा भाजपवाल्यांचा आवडता शब्दप्रयोग आहे. राहुल गांधी यांनी अहमदाबादेत घुसून मारले असेच म्हणावे लागेल,” अशा शब्दांमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेनं नुकतंच अहमदाबादमध्ये पार पडलेल्या काँग्रेसच्या अधिवेशनावर भाष्य केलं आहे. “काँग्रेस नेत्यांनी महात्मा गांधी व सरदार पटेल यांना अभिवादन केले. पटेलांच्या भव्य पुतळ्याकडे जाऊन अभिवादन केले. साबरमती आश्रमात जाऊन गांधी विचारांशी संवाद साधला. पंतप्रधान मोदी परदेशी पाहुण्यांना गुजरातच्या सहलीवर आणतात तेव्हाच साबरमती व पटेलांच्या पुतळ्याकडे फिरकतात. गांधी यांनी अहमदाबाद येथे घुसून मारले व गुजरात भाजप गांधींचा हल्ला पाहत राहिला,” असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.

मोदी-शहांची झोप उडवली

“‘देशावर आर्थिक संकट येत आहे, पण पंतप्रधान मोदी कुठे लपून बसले आहेत? कुठे गेली ती 56 इंचांची छाती?’ असे धारदार बाण राहुल गांधी यांनी गुजरातच्या भूमीवरून सोडले. गांधी हे थेट हल्ला करतात. ते परिणामांची पर्वा करीत नाहीत. भाजपवाल्यांना मोदी हे अवतारी पुरुष वाटत असतील, पण प्रत्यक्षात ते कोणीच नाहीत. मतदार यादीतले घोटाळे, ईव्हीएमच्या भानगडी करून ते सत्तेवर बसले. महाराष्ट्रातल्या विधानसभा निवडणुकीत भाजप व त्यांच्या लोकांनी हेराफेरी केली, पण निवडणूक आयोग गुलामी करत असल्याने मोदी-शहांचे राज्य टिकले, असे गांधी म्हणाले. भाजपचा रथ रोखण्यासाठी आणि निवडणुकीत यश मिळवण्यासाठी काँग्रेस यापुढे मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय आणि आदिवासी समुदायांवर लक्ष केंद्रित करेल. गांधी यांनी गुजरातच्या भूमीवरून मोदी-शहांची झोप उडवली,” असं ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटलं आहे.

हा प्रयत्न चांगला आहे, पण त्यामुळे…

“मोदी हे 18 ते 20 तास काम करतात. देश व जनतेच्या प्रश्नांमुळे ते झोपत नाहीत, पण गांधी व त्यांची काँग्रेस गुजरातमध्ये फौजफाट्यासह अवतरली व भविष्याची दिशा ठरवून गेली. त्यामुळे झोप उडालेल्या मोदींना काही काळ तळमळत राहावे लागेल. काँग्रेसच्या अधिवेशनाची समाप्ती होताच अहमदाबादच्या रस्त्यावर लागलेली राहुल गांधी यांची भव्य होर्डिंग्ज उखडून फेकण्याचे शौर्य भाजप कार्यकर्त्यांनी केले. मोदी-शहांना त्यांच्याच जमिनीवर जाऊन आव्हान देण्याचा हा प्रयत्न चांगला आहे, पण त्यामुळे भारतात खरेच राजकीय क्रांती होईल काय?” असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं विचारला आहे.

महाराष्ट्रातील पराभवाला काँग्रेसअंतर्गत काही विषय जबाबदार

“2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेसने शंभर जागा जिंकल्या. इंडिया आघाडीने मोदींना 240 वर रोखले, पण इंडिया आघाडीला सत्ता मिळवता आली नाही. ज्या गुजरातच्या भूमीवरून काँग्रेसने मोदींना आव्हान दिले, त्या राज्यात काँग्रेस लोकसभेची एकही जागा जिंकू शकली नाही. मध्य प्रदेश, आंध्र प्रदेशातही काँग्रेसला मेहनत घेण्याची गरज आहे. महाराष्ट्रात लोकसभेत यश मिळाले, पण विधानसभेत मोठे अपयश पदरी पडले. त्यास भाजपचे घोटाळे जितके कारणीभूत आहेत, तेवढेच काँग्रेसअंतर्गत काही विषय जबाबदार आहेत. त्यावर मंथन झाले पाहिजे,” अशी अपेक्षा ठाकरेंच्या शिवसेनेनं व्यक्त केली आहे.

गुजरातच्या अधिवेशनात काँग्रेसने स्वतःपुरता…

ठाकरेंच्या शिवसेनेनं काँग्रेसने भाजपाकडून शिकावं असा खोचक सल्ला देताना प्रादेशिक पक्षांना कमी लेखू नये असं सूचक विधान केलं आहे. “लोकसभेच्या निकालानंतर ‘इंडिया आघाडी कोठे आहे?’ असे प्रश्न विचारले जातात. त्या प्रश्नांना काँग्रेसने गुजरातच्या अधिवेशनातून उत्तर देणे गरजेचे होते. इंडिया आघाडीचे काय झाले? ती जमिनीत गडप झाली की हवेत विरून गेली? नक्की काय झाले? याचे उत्तर देण्याची जबाबदारी काँग्रेस अध्यक्षांवर आहे. काँग्रेसने स्वतःला मजबूत करायला हवे, पण भारतीय जनता पक्ष स्वतःला मजबूत करताना आपल्याच मित्रपक्षांचा, प्रादेशिक पक्षांचा घास गिळतो. अर्थात आजचे मोदींचे सरकार हे शेवटी प्रादेशिक पक्षांच्या कुबड्यांवरच टिकले आहे याकडे काँग्रेसने डोळसपणे पाहायला हवे. गुजरातच्या अधिवेशनात काँग्रेसने स्वतःपुरता विचार केला व भूमिकांची मांडणी केली. त्यात ‘इंडिया’ किंवा ‘भारत’ दिसत नाही,” अशी खंत ठाकरेंच्या शिवसेनेनं व्यक्त केली आहे.

मतभेद बाजूला ठेवून…

“हुकूमशाहीविरुद्ध लढण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे व त्यासाठी काँग्रेसलाच पुढे यावे लागेल. दिल्लीत केजरीवाल यांच्या पराभवानंतर काँग्रेससाठी मैदान मोकळे झाले असे त्यांच्या नेत्यांना वाटणे स्वाभाविक आहे. अनेक राज्यांत मैदान मोकळे करण्याचे तंत्र ते अवलंबणार असतील तर मोदी-शहांची ते सेवा करीत आहेत असेच म्हणायला हवे. बिहार, गुजरात, प. बंगालच्या विधानसभा निवडणुकांत काँग्रेस काय भूमिका घेणार आहे? की पुन्हा एकदा पराभवाचेच दिलखुलास स्वागत करणार? दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘एकी’ झाली असती तर बरे झाले असते. केजरीवाल हे मोदी प्रवृत्तीशीच लढत होते. त्यामुळे मतभेद बाजूला ठेवून निर्णय घ्यायला हरकत नव्हती,” असं ठाकरेंच्या पक्षाने म्हटलं आहे.

मोदी अमर गुटिका चघळून खुर्चीवर बसले

“महाराष्ट्रात काँग्रेस मित्रपक्षांशी ज्या पद्धतीने वागली त्याचा निकाल विधानसभेत दिसला. आपल्याला मोदी-शहांच्या भाजपला हरवायचे आहे, आपल्याच गोतावळ्यातील मित्रांना नाही. भाजपचे लोक सांगतात, ‘मोदी 2047 सालापर्यंत पंतप्रधानपदी राहतील.’ मोदींचे आजचे वय 75 आहे. म्हणजे मोदी अमर गुटिका चघळून खुर्चीवर बसले आहेत. त्या अमर गुटिकेचे झाड गुजरातमध्ये आहे. काँग्रेसने गुजरातला जाऊन ते झाड गदागदा हलवले. हे झाड उखडायचे असेल तर मदतीसाठी अनेक हात लागतील. गुजरात अधिवेशनात यावर जास्त चिंतन होणे गरजेचे होते. काँग्रेसने आपल्या जुन्या वाड्याचे नेपथ्य लावून भाषणे केली. वाडा लयास गेला आहे. तो उभारण्याची ताकद निर्माण करावी लागेल. जुन्या काळातून बाहेर पडून नवा विचार द्यावा लागेल. गुजरातच्या भूमीवरून काँग्रेसने रणशिंग फुंकले, पण पुढे काय?” असा सवाल लेखाच्या शेवटी विचारण्यात आला आहे.





Source link

म्यानमारमध्ये ‘सायबर गुलामगिरी’साठी नेलेल्या ६० भारतीयांची सुटका; पाच जणांना अटक

0
म्यानमारमध्ये ‘सायबर गुलामगिरी’साठी नेलेल्या ६० भारतीयांची सुटका; पाच जणांना अटक



मुंबई : म्यानमारमध्ये सायबर गुलामगिरीमध्ये अडकविण्यात आलेल्या ६० भारतीयांची महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर शाखेने सुटका केली. या प्रकरणी एका परदेशी नागरिकासह पाच दलालांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तींमध्ये वेब सिरीज आणि दूरचित्रवाणीवरील कार्यक्रमामधील एका कलाकाराचा समावेश असल्याची माहिती महाराष्ट्र सायबरच्या अधिकाऱ्यांनी दिली.

सायबर गुलामगिरीसाठी म्यानमारमध्ये माणसे पाठविण्याप्रकरणी अटक केलेल्यांमध्ये मनीष ग्रे ऊर्फ मॅडी, तैसन ऊर्फ आदित्य रवी चंद्रन, रूपनारायण रामधर गुप्ता, जेन्सी राणी डी आणि चिनी-कझाकस्तानचा नागरिक असलेला तलानिती नुलाक्सी यांचा समावेश आहे. मनीष ग्रे ऊर्फ मॅडी हा वेब सिरिजमध्ये अभिनेता म्हणून काम करीत होता. तर दलाल तलानिती नुलाक्सी याला अटक करण्यात आली. या प्रकरणी महाराष्ट्र सायबरने तीन प्रथम माहिती अहवाल नोंदवले आहेत.

म्यानमारमध्ये कसे नेण्यात आले

विविध समाज माध्यमांद्वारे आरोपींनी भारतातील या ६० पीडित नागरिकांशी संपर्क साधून त्यांना थायलंड आणि पूर्व आशियाई देशांमध्ये मोठ्या पगाराच्या नोकऱ्यांचे आमिष दाखवले. नोकरीसाठी तयार झालेल्या नागरिकांना दलालांमार्फत पारपत्र आणि विमानाची तिकीटे देण्यात आली. या सर्व नागरिकांना पर्यटक व्हिसावर थायलंडमध्ये पाठविण्यात आले. तेथून त्यांना म्यानमारच्या सीमेवर पाठवण्यात आले. तेथे एका लहान नदीतून त्यांना एका ठिकाणी नेण्यात आले. तेथे या नागरिकांना सशस्त्र बंडखोरांच्या नियंत्रणाखाली ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांना डिजिटल घोटाळ्यापासून औद्योगिक स्तरावर बनावट गुंतवणूक योजनांमार्फत सायबर फसवणूक करण्यास भाग पाडण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र सायबरमधील अधिकाऱ्यांनी दिली.

भारतातील फसव्या कॉल सेंटरचे नेटवर्क उघडकीस

भारतातील नागरिकांना परदेशातील नोकरीचे आमिष दाखवणाऱ्या एजंट आणि फसव्या कॉल सेंटर कंपन्यांचे नेटवर्क उघडकीस आले असून, अनेक कंपन्या रोजगार एजन्सीच्या नावाखाली कार्यरत मानवी तस्करी करीत आहेत. मनीष ग्रे याने पीडित व्यक्तींना नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्यांना म्यानमारमध्ये पाठवले होते. तसेच भारतात सायबर गुन्हे करण्यासाठी एक युनिट सुरू करण्याची योजना तलानिती नुलाक्सी याने आखली होती. महाराष्ट्र सायबरने अन्य संस्थाच्या मदतीने कारवाई करून या ६० नागरिकांची सुटका केली. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींची पुढील चौकशी सुरू असल्याचे महाराष्ट्र सायबरमधील अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र ही कारवाई म्यानमारमध्ये करण्यात आली होती की नाही याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही.



Source link

कुणावर विश्वास ठेवायचा? कुणाकडे आशेने बघायचे?

0
कुणावर विश्वास ठेवायचा? कुणाकडे आशेने बघायचे?



 ‘कल्याणकारी’ भूमिका विसरून सरकारही भ्रष्टाचाराकडे- त्यामुळे नाडले गेलेल्या जनसामान्यांकडे- दुर्लक्ष करते…

गेल्या दोन-तीन आठवड्यांतल्या बातम्या खरेच मन सुन्न करणाऱ्या आहेत. दिल्ली उच्च न्यायालयातील एका न्यायाधीशांच्या घरात आग लागते काय, त्यात कैक रुपयांच्या नोटा जळतात काय, ते प्रकरण काही दिवस ‘मीडिया’मधून  नको तितके तापल्यानंतर अचानक बातमी बॅक फूट वर जाते काय सगळेच विचित्र. मग अचानक मंगेशकर रुग्णालय फ्रंट फुटवर चर्चेत आले. त्या निमित्ताने या धर्मादाय दवाखान्याचा धर्म कुठे गेला हे विचारण्याची वेळ आली आहे.

आता येथील हॉस्पिटल प्रशासन, वारेमाप फी आकारणारे डॉक्टर, उपचार देण्याआधी- रुग्णालयात दाखल करून घेताना- झालेले संवेदनशीलतेचा अभाव असलेले वर्तन हे सारे प्रसारमाध्यमांतून गाजते आहे. या रुग्णालयासाठी जागा घेताना मंगेशकर कुटुंबांनी सरकारकडे केलेली याचना, आणि नंतर चॅरिटी सोडून दवाखान्याला आलेले आजचे स्वरूप बघता कोणते क्षेत्र आता स्वच्छ ,प्रामाणिक राहिले असा प्रश्न निर्माण होतो. आपण याचा विचार कसा करणार हे महत्त्वाचे आहे.

या निमित्ताने मंगेशकर कुटुंबाबद्दल राग व्यक्त करणारी बरीच चर्चा विशेषत: समाजमाध्यमांतून झाली. व्यक्त झालेल्या त्या रागाला कारणे होती, ती आजवर दबली होती. एकतर या सर्वच मंडळींनी आपल्या गरिबीचे नको तितके स्तोम माजवले, तेही समाजात सहानुभूती मिळवण्यासाठी.  नुकत्याच एका कार्यक्रमात आशा भोसले यांनी पंतप्रधानांसमोर आमच्या वेळी लाडकी बहीण योजना असती तर आम्हाला भुकेले राहावे लागले नसते, असे विचित्र विधान करून कहर केला! गरिबी काही या एकट्या कुटुंबाच्याच नशिबी आली होती असे नाही.

याहीपेक्षा गरिबी भोगलेले लोक या देशात होते आणि आहेत. त्या प्रमाणे,  आपण समाजासाठी काहीतरी उदात्त करतो असा आव आणणारे दानशूर देशात परदेशात वाढले आहेत. त्यापैकी अनेक खरोखरच प्रामाणिक आहेत. यात उद्योजक, डॉक्टर्स, सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी असे सारेच आहेत. अशा समाजसेवी व्यक्तींची आणि त्यांनी उभारलेल्या संस्थांची आपण दखलदेखील घेतो. पण समाजसेवेच्या नावाखाली प्रसिद्धी मिळवणाऱ्या नाटकी दानशूराची संख्या गेल्या काही काळात बरीच वाढली आहे. दीनानाथ चॅरिटेबल ट्रस्ट हे त्यापैकीच एक ताजे उदाहरण म्हणून लोकांसमोर यावे, हे अधिक धक्कादायक होते!

पण हा प्रश्न निव्वळ एका रुग्णालयाचा नाही आणि त्यामागच्या एका कुटुंबाचा तर नाहीच नाही. शिक्षण क्षेत्रापाठोपाठ मेडिकल क्षेत्रात खासगीकरण आणि कॉर्पोरेटीकरण सुरू झाल्यापासून समाजाची लूट सुरू झाली आहे. करोना काळात तर या खासगी हॉस्पिटलांच्या लोकांनी त्रस्त पेशंट अन् त्यांच्या नातेवाईकांना ज्या प्रकारे लुटले, रेमडेसिविरसारख्या- गुण सिद्धच न झालेल्या आणि उलट अनेकांना घातकही ठरलेल्या औषधांसाठी ज्या प्रकारे नातेवाईकांची मानसिक आणि आर्थिक ओढाताण झाली-  त्या सुरस नसल्या तरी चमत्कारिक कथा अंगावर शहारे आणणाऱ्या आहेत. आजही पंचतारांकित हॉटेलांसारखी दिमाखात असलेली काही कॉर्पोरेट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटले ज्या तऱ्हेने पेशंटांना लुटतात ती राक्षसी कृतीच ठरते.

वैद्यकीय क्षेत्रातील नवे तंत्रज्ञान आपल्या देशात दुर्मीळ असल्यामुळे कुणालाच अवाच्यासवा किंमतवाढ केली जाते. महागड्या वैद्यकीय उपकरणांचा आणि पंचतारांकित व्यवस्थापनाचा खर्च भरून काढण्यासाठी लाखो रुपयांचे बिल आकारले जाते. त्यातही इन्शुरन्स असला की विचारायलाच नको. इन्शुरन्स, फार्मा, हॉस्पिटल यांची मिलीभगत असते हे आता उघडे गुपित. माणसाने एकदा हॉस्पिटलची पायरी चढली की तो हतबल होतो. डॉक्टरपुढे लाचार होतो. कसाही करून जीव वाचवणे, बरे होणे हेच उद्दिष्ट असते.आपण मग पैशासाठी  मागे पुढे बघत नाही. प्रसंगी कर्ज काढून जीव वाचवायची तयारी असते. याचाच फायदा घेऊन ही कॉर्पोरेट हॉस्पिटलची मंडळी पेशंटांना अक्षरश: वाटेल तसे नागवतात!

हे सारे प्रकार बोकाळू शकतात, यावरून साधा निष्कर्ष निघतो तो म्हणजे खासगीकरणाने प्रश्न सुटतील असे मानणाऱ्या सरकारचे आजकाल कुठेच नियंत्रण राहिलेले नाही. प्रत्येक राज्य, केंद्र शासनाच्या ढिसाळ प्रशासनाचे दाखले रोज प्रसारमाध्यमांतूनही दिसतात; उदाहरणार्थ, विशिष्टांनी कायदे मोडले तरी पोलिस काही करताना दिसत नाहीत. पण त्यापेक्षा खासगीकरणातून आलेली अनागोंदी निराळी ठरते.

शिक्षण क्षेत्रात खासगी संस्थानी चालवलेली लूट, ट्युशन इंडस्ट्री ने माजवलेला धुमाकूळ शासनाला दिसत नाही. इतकेच कशाला- सरकारी अनुदान ,सवलती मिळालेल्या संस्थावर देखील सरकारचा वचक नाही. भ्रष्टाचार खुलेआम चालला असताना सरकार डोळेझाक करते आहे, असेच नाइलाजाने म्हणावे लागते. कारण कुठे ना कुठे सरकारची यंत्रणा चालवणारे लोकच यात गुंतलेले असतात, सहभागी असतात ! पैशाचा हव्यास, सत्तेचा माज यामुळे सरकारी गुंडगिरी, दडपशाहीदेखील वाढलेली दिसते. बीड प्रकरण हे याचे ताजे उदाहरण.

यामुळे कुणाकडे आशेने बघायचे, हा प्रश्न अधिक गहिरा होतो हे खरे. पण हे आपण असेच बघत बसायचे, सहन करीत जायचे की काही चांगले बघायला,अनुभवायला मिळेल ही अपेक्षा करायची? समाजातली नैतिकता सर्व बाजूंनी ही अशी सातत्याने घसरणे ही राष्ट्र हिताचे निश्चितच नाही. केवळ मागचे ऐतिहासिक संस्कृतीचे गोडवे गाऊन स्वप्ने बघण्या पेक्षा हाता पायाखाली काय जळते त्या विषयी जागरूक असणे जास्त महत्वाचे… त्यामुळेच, सरकार ‘कल्याणकारी’ आहे की नाही हे ओळखणाऱ्या जनतेचा उत्स्फूर्त सहभागदेखील तितकाच महत्वाचा!

लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत.  vijaympande@yahoo.com

(समाप्त)



Source link

राणाकडून देशभर हल्ल्याचा कट, ‘एनआयए’चा संशय; २६/११च्या सूत्रधाराला १८ दिवसांची कोठडी

0
राणाकडून देशभर हल्ल्याचा कट, ‘एनआयए’चा संशय; २६/११च्या सूत्रधाराला १८ दिवसांची कोठडी



tahawwur rana plot to attack across the country. NIA suspects. 26/11 mastermind remanded in custody for 18 days राणाकडून देशभर हल्ल्याचा कट, ‘एनआयए’चा संशय; २६/११च्या सूत्रधाराला १८ दिवसांची कोठडी





Source link

Ajche Rashi Bhavishya : Today’s astrological predictions for mesh to meen zodiac signs

0
Ajche Rashi Bhavishya : Today’s astrological predictions for mesh to meen zodiac signs



Ajche Rashi Bhavishya : Today’s astrological predictions for mesh to meen zodiac signs | चैत्र पौर्णिमा कोणाच्या नशीबाचे उघडणार कुलूप? मेष ते मीनपैकी कोणाला मिळेल आर्थिक बळ? वाचा राशिभविष्य





Source link

हुर्रियतचा आणखी एक गट फुटीरतावादातून बाहेर

0
हुर्रियतचा आणखी एक गट फुटीरतावादातून बाहेर


जम्मू काश्मिरातील हुर्रियतशी संबंधित एक अन्य संघटना ‘जम्मू-काश्मीर मास मूव्हमेंट’ या संघटनेने फुटीरतावादी गटातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी दिली. यासोबतच हुर्रियतशी संबंधित १२ गटांनी संविधानावर विश्वास व्यक्त करीत फुटीरतावादापासून फारकत घेतली असल्याचे शहा यांनी ‘एक्स’वर सांगितले. हा भारताच्या संविधानाचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ संकल्पनेचा विजय असल्याचे ते म्हणाले.

जम्मू काश्मीर इस्लामिक पॉलिटिकल पार्टी, जम्मू काश्मीर मुस्लीम डेमोक्रॅटिक लीग, काश्मीर फ्रीडम फ्रंट या तीन संघटनांनी ८ एप्रिल रोजी हुर्रियतपासून फारकत घेतली होती. त्यानंतर वेगळे होण्याची घोषणा करणाऱ्या अन्य गटांमध्ये शाहीद सलीम यांच्या नेतृत्वाखालील ‘जम्मू-काश्मीर पीपल्स मूव्हमेंट’, शफी रेशी यांच्या नेतृत्वाखालील ‘जम्मू- काश्मीर डेमोक्रॅटिक पॉलिटिकल मूव्हमेंट’ आणि मोहम्मद शरीफ सरताज यांच्या नेतृत्वाखालील ‘जम्मू-कश्मीर फ्रीडम मूव्हमेंट’ यांचा समावेश आहे.

शाह उमर मिरवाइज उमर फारुख नजरकैदेत

हुर्रियत कॉन्फरन्सचे अध्यक्ष मीरवाइज उमर फारुख यांना नजरकैदेत ठेवण्यात आले. जामिया मशिदीत सामूहिक प्रार्थना करण्याची परवानगी नाकारण्यात आल्याचे तसेच मूलभूत अधिकार चिरडले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा
हेही वाचा

यासोबतच त्यांनी मुत्ताहिदा मजलिस उलेमा या संघटनेने वक्फ दुरुस्ती कायद्याविरोधात केलेल्या ठरावाची प्रतही सामायिक केली. हा ठराव मशिदीत प्रार्थनेवेळी वाचून दाखविण्यात येणार होता.





Source link

‘जनतेच्या मुलभूत हक्कांचाही विचार करावा’, ईडीला ‘सर्वोच्च’ चपराक

0
‘जनतेच्या मुलभूत हक्कांचाही विचार करावा’, ईडीला ‘सर्वोच्च’ चपराक



‘The fundamental rights of the people should also be considered’, Supreme court say to ED ‘जनतेच्या मुलभूत हक्कांचाही विचार करावा’, ईडीला ‘सर्वोच्च’ चपराक





Source link

‘दहा हजार कोटी रुपयांची योजना कुठे गायब झाली?’ रोजगार योजनेवरून राहुल गांधी यांचा भाजपला प्रश्न

0
‘दहा हजार कोटी रुपयांची योजना कुठे गायब झाली?’ रोजगार योजनेवरून राहुल गांधी यांचा भाजपला प्रश्न



‘Where has the scheme worth ten thousand crore rupees disappeared?’ Rahul Gandhi questions BJP on employment scheme ‘दहा हजार कोटी रुपयांची योजना कुठे गायब झाली?’ रोजगार योजनेवरून राहुल गांधी यांचा भाजपला प्रश्न





Source link

घराणेशाहीवरून विरोधकांवर टीका, वाराणसीत ३८८० कोटींच्या विकास प्रकल्पांची पंतप्रधानांकडून पायाभरणी

0
घराणेशाहीवरून विरोधकांवर टीका, वाराणसीत ३८८० कोटींच्या विकास प्रकल्पांची पंतप्रधानांकडून पायाभरणी



PM Narendra modi lays foundation stone of development projects worth Rs 3880 crore in Varanasi घराणेशाहीवरून विरोधकांवर टीका, वाराणसीत ३८८० कोटींच्या विकास प्रकल्पांची पंतप्रधानांकडून पायाभरणी





Source link