Saturday, July 25, 2026
Home Blog Page 420

Nagpur blast Relatives of deceased assured of jobs in same company

0
Nagpur blast Relatives of deceased assured of jobs in same company


नागपूर : उमेरड एमआयडीसीमधील एमएमपी कंपनीमध्ये दिनांक ११ एप्रिल रोजी भिषण स्फोटात मृत पावलेल्या कामगारांच्या कुटुंबास ६० लाख रुपयांची तर जखमी झालेल्या कामगारास ३० लाख रुपयांची मदत केली जात असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. या दुर्देवी अपघातात मृत व जखमी झालेल्या कामगारांच्या परिवारासोबत शासन खंबीरपणाने उभे आहे. त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची खबरदारी आम्ही घेत असून जे जखमी आहेत त्यांच्यावर शासनातर्फे मोफत उपचार केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

उमरेड येथील एमएमपी कंपनीमध्ये दिनांक ११ एप्रिल रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास भीषण स्फोट होऊन तीन कामगार जागीच मृत्यू पावले. तर आठ कामगार हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना तातडीने नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलविण्यात आले होते. यातील २ कामगारांचा उपचार सुरु असतांना मृत्यु झाला. घटनेची माहिती कळताच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांना निर्देश देवून जखमींवर उपचारांबाबत व आवश्यक ती मदत देण्यास सांगितले होते.

 दिनांक १२ एप्रिल रोजी सकाळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी तातडीने उमरेड येथील घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. कामगारांच्या जिवावर बेतणारे अपघात यापुढे होऊ नये यासाठी औद्योगिक सुरक्षिततेच्यादृष्टीने जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले. घटनास्थळाची पाहणी करताना त्यांच्या समवेत खासदार श्याम बर्वे, आमदार संजय मेश्राम, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, माजी आमदार राजू पारवे, सुधीर पारवे, राजेंद्र मुळक, कंपनीचे प्रमुख अरुण भंडारी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

अपघातात मृत कामगारांच्या कुटुंबियांना कंपनीतर्फे ५५ लाख, तर शासनातर्फे ५ लाख अशी आर्थिक मदत दिली जाईल. याचबरोबर जखमी कामगारांना कंपनीतर्फे ३० लाख रुपये आर्थिक मदत व शासनातर्फे मोफत उपचार करण्यात येत आहेत. याच बरोबर मृत्यू व जखमी झालेल्या परिवारातील एका व्यक्तीला कंपनीत नोकरी दिली जाणार आहे.

अपघातात मृत पावलेले कामगारांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. पियुष दुर्गे – रा.पांजरेपार, ता.भिवापूर, जि. नागपूर, सचिन पुरुषोत्तम मसराम – रा.पांजरेपार, ता.भिवापूर, जि. नागपूर, निखिल शेंडे – रा. विरखंडी, ता.भिवापूर, जि.नागपूर, अभिलाष जंजाळ – रा.गावसूत, ता.उमरेड, व निखिल नेहारे – रा. चिखलढोकडा, ता. उमरेड, जि.नागपूर

अपघातात जखमीमध्ये मनीष वाघ – रा.पेंढराबोडी, ता.भिवापूर, जि.नागपूर, करण शेंडे – रा.पांजरेपार, ता.भिवापूर, जि. नागपूर, नवनीत कुमरे – रा.मांगली, ता.उमरेड, जि.नागपूर, पियुष टेकाम – रा.पांजरेपार, ता.भिवापूर, जि. नागपूर, करण बावणे – रा.पिंपळा, ता.उमरेड, जि.नागपूर, कमलेश ठाकरे – रा.गोंडबोरी, ता.भिवापूर, जि.नागपूर.





Source link

…तर आम्ही त्यांचे नेतृत्व मान्य करू; रामराजे नाईक निंबाळकरांचे आमदार सचिन पाटलांना थेट आव्हान

0


सातारा: फलटण विधानसभेचे विद्यमान आमदार सचिन पाटील (Sachin Patil) यांनी काही दिवसापूर्वी रामराजे नाईक निंबाळकर (Ramraje Naik Nimbalkar) यांच्यावर त्यांचे नाव न घेता जोरदार टीका केली होती. या टिकेचा माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी खरपूस समाचार घेतलाय. विद्यमान आमदार माझ्यावर टीका करतात. मी या भागासाठी काय केलं, हे विचारायला त्यांचा जन्म तरी झाला होता का? मी काय केलं हे तुमच्या वडिलांना चांगलं माहित आहे. ते आमच्या घराशी संबंधित होते. चिलट, डास येतच असतात.. ढेकूण तर चावतच असतो. विद्यमान आमदारांकडे मी जास्त लक्ष देत नाही. त्यांच्याविषयी बोलणे म्हणजे मला स्वतःच्या विषयी कमीपणा करून घ्यायचं नाही. अशी बोचरी टीका ही त्यांनी केली आहे.  

एमआयडीसी या भागात आणून दाखवावी, आम्ही त्यांचे नेतृत्व मान्य करू

पुढे बोलताना रामराजे नाईक निंबाळकर म्हणाले की, कृष्णा महामंडळ त्याला काय त्याच्या नेत्याला देखील माहित नाही. तो एक पाळीव पोपट आहे. मालक जे बोलतो, जे शिकवतो ते इथं येऊन तो बोलतो. त्यांना जर या भागाचे कल्याण करायचे असेल तर म्हसवडची एमआयडीसी या भागात आणून दाखवावी, आम्ही त्यांचे नेतृत्व मान्य करू. असे प्रत्युत्तर ही रामराजे यांनी वाघोली येथील सभेत दिल आहे. 

सचिन पाटील यांची रामराजेंच्या नव्याने सुरुवात होणाऱ्या संघर्ष समितीवर टीका

वाठार स्टेशन येथे फलटण विधानसभा मतदारसंघातील अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार सचिन पाटील यांनी त्यांच्याच पक्षातील माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्यावर नाव न घेता टीका केलीये. मागील तीस वर्षात उत्तर कोरेगावच्या पाणी प्रश्न बाबत सत्तेत असताना हे लोक कुठे होते? संबंधित विभागाचे ते मंत्री होते. अध्यक्ष, आमदार होते यावेळी त्यांची संघर्ष समिती कुठे गेली होती? या भागातल्या 26 गावातील पाणी प्रश्न सोडवला नाही तर मला त्या ठिकाणी मत मागण्याचा अधिकार नाही. हे त्यांनी पाळावे. आता संघर्ष समितीचे पर्व संपले असून आपलं वय झालंय. आता नवीन संघर्ष करून काही उपयोग होणार नाही.

तीस वर्षांपूर्वी या तालुक्यातील 26 गावांचा प्रश्न मार्गी लागू शकला असता. पण आपण ते मनात आणले नाही. या तालुक्यातला शेतकरी आपण पाण्यापासून वंचित ठेवला आणि आता संघर्ष समिती काढत आहेत. या संघर्ष समितीला आमचा विरोध नाही. तुम्ही संघर्ष करत रहा आम्ही काम करून दाखवू. मात्र या भागातील 26 गावांना न्याय दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही, अशी जोरदार टीका रामराजे नाईक निंबाळकर यांचे नाव न घेता आमदार सचिन पाटील यांनी केली होती.

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..



Source link

Read here today movie release, hindi and marathi celebrity gossips in marathi

0
Read here today movie release, hindi and marathi celebrity gossips in marathi


Entertainment Live News Today, 13 April 2025: सध्या बॉक्स ऑफिसवर दाक्षिणात्य चित्रपट ‘गुड बॅड अग्ली’ धुमाकूळ घालताना दिसत आहे. हिंदी, तमिळ, तेलुगु या तीन भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटात अजित कुमार मुख्य भूमिकेत झळकला आहे. तसंच दुसऱ्या बाजूला सनी देओलच्या ‘जाट’ चित्रपटाच्या कमाईत हळूहळू वाढ होताना पाहायला मिळत आहे. मराठी सिनेसृष्टीत ‘अशी ही जमवा जमवी’, ‘जयभीम पँथर’, ‘पावटॉलॉजी’ हे नवे चित्रपट नुकतेच प्रदर्शित झाले आहेत. तर मालिकांमध्ये नवनवीन ट्विस्ट येत आहेत. आजच्या दिवसभरातील सिनेसृष्टी आणि मालिकाविश्वातील सर्व अपडेट्स एका क्लिकवर जाणून घ्या….

Entertainment News Live Today : मनोरंजन न्यूज अपडेट

Live Updates

10:20 (IST) 13 Apr 2025

सनी देओलच्या ‘जाट’ चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये झाली वाढ, तिसऱ्या दिवशी केली सर्वाधिक कमाई

Jaat Box Office Collection Day 3: सनी देओलच्या ‘जाट’ चित्रपटाने तीन दिवसांत किती कोटींची कमाई केली? जाणून घ्या…
अधिक वाचा

09:57 (IST) 13 Apr 2025

रत्नागिरीला सुके मासे खाल्ले अन् माझं ब्लड प्रेशर…; अशोक सराफांनी ‘फिटनेस’वर केलं भाष्य; म्हणाले, “त्या दिवसापासून…”

Ashok Saraf : अशोक सराफांनी सांगितला रत्नागिरीत नाटकाच्या प्रयोगादरम्यान घडलेला किस्सा, म्हणाले…
अधिक वाचा

09:50 (IST) 13 Apr 2025

हँडसम हिरोशी लग्न का नाही केलं? करण जोहरच्या प्रश्नावर माधुरी दीक्षितने दिलेलं ‘हे’ उत्तर; लाजत म्हणालेली, “माझा नवरा…”

जेव्हा माधुरी दीक्षितला करण जोहरने विचारलं होतं, “एखाद्या हँडसम हिरोशी लग्न का नाही केलं?” अभिनेत्री म्हणाली होती…
सविस्तर बातमी

09:28 (IST) 13 Apr 2025

सनी देओलच्या ‘जाट’ चित्रपटाचे दुसऱ्या दिवशी ४०० शो केले रद्द

सनी देओलचा ‘जाट’ चित्रपट १० एप्रिलला प्रदर्शित झाला. या चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर संथ गतीने सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी सनीच्या ‘जाट’ चित्रपटाने ९.५ कोटींची कमाई केली. पण, दुसर्‍या दिवशी चित्रपटाच्या कमाईत घसरण झाली. शुक्रवारी ११ एप्रिलला ‘जाट’ चित्रपटाने फक्त ७ कोटींचा गल्ला जमवला. माहितीनुसार, मुंबईतील ‘जाट’ चित्रपटाचे १०० आणि दिल्ली-एनसीआरमधील ३० असे ४०० हून अधिक शो रद्द केले. याचाच परिणाम ‘जाट’ चित्रपटाच्या दुसऱ्या दिवशीच्या कमाईवर झाल्याचं म्हटलं जात आहे.

09:11 (IST) 13 Apr 2025

अजित कुमारच्या ‘गुड बॅड अग्ली’ चित्रपटाचा प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद, आतापर्यंत केली ‘इतक्या’ कोटींची कमाई

सुपरस्टार अजित कुमारच्या २०२५ मधील बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘गुड बॅड अग्ली’. या चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ पाहायला मिळत आहे. १० एप्रिलला प्रदर्शित झालेला ‘गुड बॅड अग्ली’ चित्रपटाने अवघ्या तीन दिवसांत ५० कोटींचा आकडा पार केला आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, पहिल्या दिवशी अजित कुमारच्या चित्रपटाने २९.२५ कोटींची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी कमाई किंचित घट झाली. १५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला. पण तिसऱ्या दिवशी ‘गुड बॅड अग्ली’ चित्रपटाच्या कमाईत वाढ झाली. प्रदर्शनानंतरच्या पहिल्या शनिवारी या चित्रपटाने १८.५० कोटींचं कलेक्शन केलं. तीन दिवसांत ‘गुड बॅड अग्ली’ चित्रपटाने एकूण ६२.७५ कोटींची कमाई केली. ज्यामुळे अजित कुमारचा हा चित्रपट ५० कोटींच्या क्लबमध्ये सहज सामील झाला आहे.

 Entertainment Live News Today 13 April 2025

‘गुड बॅड अग्ली’ चित्रपटाचं पोस्टर ( फोटो सौजन्य – ग्राफिक्स टीम )





Source link

शरद पवारांनी बोट ठेवून दाखवलं; मग अजित पवारांनी वाचलं, ‘रयत’च्या बैठकीतला किस्सा चर्चेत

0


सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात पक्ष फुटीनंतर जवळीक आणि आधीसारखी चर्चा जरी होत नसली तरी हे दोन्ही नेते वेगवेगळ्या कारणास्तव एकत्र येत येताना वारंवार दिसत आहे. अजित पवार यांचे धाटके चिरंजीव जय पवार यांचा दोन दिवसांपूर्वी साखरपुडा पार पडला. या कार्यक्रमाला शरद पवार यांनी हजेरी लावली होती. त्यांना गेटवरती घ्यायला अजित पवार पोहोचले, त्यानंतर आता शरद पवार हे काल (शनिवारी) सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. तर अजित पवार हे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. हा दौरा अटोपून अजित पवार सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले. त्यानंतर साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीमध्ये अजित पवार आणि शरद पवार उपस्थित होते. 

साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेची काल (शनिवारी, ता 13) महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीसाठी शरद पवार हे साताऱ्यात होते. तसेच अजित पवार देखील या बैठकीसाठी हजर झाले, दिलीप वळसे पाटील देखील या बैठकीला उपस्थित होते. विशेष म्हणजे दोन्ही नेते या बैठकीत अगदी आजूबाजूच्या खुर्चीवर बसलेले दिसून आले. दोन्ही नेत्यांनी या बैठकीत एकत्र निर्णयही घेतले. दरम्यान, या बैठकीतला एक महत्त्वाचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओची सध्या चांगलीच चर्चा आहे. त्यामध्ये शरद पवारांनी अजित पवारांना कागदपत्रातील महत्वाचे तपशील शोधून देण्यासाठी मदत केली. 

व्हिडीओमध्ये नेमकं काय?

रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीत संस्थेचं गेल्या वर्षीचं किती उत्पन्न होतं, याबाबत चर्चा सुरु असताना या बैठकीत अजित पवार यांना गेल्या वर्षाच्या उत्पन्नाची माहिती सभासदस्यांना देण्याची विनंती करण्यात आली. अजित पवार यांच्या हातामध्ये असलेल्या कागदपत्रांमध्ये त्याबाबतची तपशील होता. पण त्यांना तो मिळत नव्हते. यावेळी शेजारी बसलेल्या शरद पवार यांनी त्यांना ते तपशील शोधून देण्यात मदत केली. शरद पवार यांनी यासाठी त्यांना कागजपत्रांवर बोट ठेवून मजकूर वाचायला सांगितला. यानंतर अजित पवार यांनी आकड्याचं वाचन केलं. हा त्यांचा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 

शरद पवार यांची बैठकीबाबत सोशल मिडियावर पोस्ट

शरद पवार यांनी त्यांच्या सोशल मिडिया ‘एक्स’वरती पोस्ट शेअर करत आजच्या बैठकीबाबत माहिती दिली आहे. रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलची बैठक आज ‘छत्रपती शिवाजी कॅालेज, सातारा‘ येथे पार पडली. या बैठकीत संस्थेने ‘रयत’ मासिक सुरू करण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून शिक्षण, विज्ञान, तंत्रज्ञान, आरोग्य, साहित्य, क्रीडा, सामाजिक, कला, संस्कृती, जागतिक घडामोडी वगैरे वैविध्यपूर्ण व माहितीपूर्ण लेख समाविष्ट केले जातील व त्याचा प्रसार होईल, असं शरद पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

अधिक पाहा..



Source link

Petrol Diesel Price Today, 13 April 2025: Check here Maharashtra India Petrol and Diesel Price in Marathi

0
Petrol Diesel Price Today, 13 April 2025: Check here Maharashtra India Petrol and Diesel Price in Marathi



Petrol Diesel Price Today, 13 April 2025: Check here Maharashtra India Petrol and Diesel Price in Marathi | मुंबई-पुण्यात आज १ लिटर इंधनासाठी किती रुपये मोजावे लागणार? जाणून घ्या…





Source link

शुक्र देणार बक्कळ पैसा; ४७ दिवसानंतर करणार मंगळाच्या राशी प्रवेश ‘या’ तीन राशी मिळवणार पैसा, प्रेम अन् नोकरीत प्रमोशन

0
शुक्र देणार बक्कळ पैसा; ४७ दिवसानंतर करणार मंगळाच्या राशी प्रवेश ‘या’ तीन राशी मिळवणार पैसा, प्रेम अन् नोकरीत प्रमोशन



Shukra Gochar 2025 in aries three zodic get happy l शुक्र देणार बक्कळ पैसा; ४७ दिवसानंतर करणार मंगळाच्या राशी प्रवेश ‘या’ तीन राशी मिळवणार पैसा, प्रेम अन् नोकरीत प्रमोशन





Source link

गोष्ट सांगतो ऐका…: कॅश

0
गोष्ट सांगतो ऐका…:  कॅश


अरविंद जगताप5 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

कॅमेरावाला आठवडाभर आयोगाच्या लोकांसोबत फिरत होता. पण, एकाच्याही गाडीत पैसे सापडले नव्हते, म्हणून तोही वैतागला होता. आज पहिल्यांदा पैसे सापडणार होते…

ऋषी नेहमीपेक्षा खूप उशिरा निघाला होता घरातून. खरं तर उन्हाचा तडाखा चुकवायचा म्हणून तो रोज एक तास आधीच निघतो. साहेब पण खुश असतात. साहेब म्हणजे फक्त ऋषीचे साहेब. त्यांचा पक्ष पंधरा वर्षे झाली सत्तेत आलेला नाही. साहेब तसे प्रामाणिक. त्यात मध्यमवर्गीय. त्यामुळं कुठल्या पक्षाने तिकीट दिलं नाही. नगरसेवकपदाच्या निवडणुकीत अपक्ष उभे होते. पडले. समोरच्या उमेदवारापेक्षा त्यांचा जनसंपर्क जास्त. पण, त्या उमेदवाराने घरोघरी जाऊन पैसे वाटले.

…तर ऋषी त्यांच्या ऑफिसमधे काम करतो. साहेब पडले, तरी त्यांनी लोकांची कामं करणं सोडलं नाही. त्यामुळं ऋषी बिझी असतो. त्यात यावेळी साहेबांनी विधानसभेला उभं राहायचं ठरवलं. नेहमीप्रमाणं अपक्ष. पण, साहेबांनी यावेळी पूर्ण जोर लावला आहे. ऋषी पण खूप धावपळ करतोय. साहेब निवडून आले तर त्याचं आयुष्य बदलून जाणार आहे. आजकाल रात्री तो हेच स्वप्न बघत असतो.. साहेब आमदार झालेत.. तो त्यांच्या बरोबर मिरवणुकीत उभा आहे.. मंत्रालयात जातोय.. लोक काम घेऊन येताहेत.. लोक त्याला पण साहेब म्हणताहेत… स्वप्न सुद्धा माणसाला खुश करतात काही काळ. लोक श्रीमंत झाल्यासारखे खुश होतात. ऋषी तसाच खुश होता. उन्हाची पर्वा न करता आपली स्कूटी चालवत होता. आज त्याला एक पार्सलही पोचवायला सांगितलं होतं साहेबांनी. महत्त्वाची जबाबदारी होती. ऋषी वेगात निघाला होता. त्याने सिग्नल क्रॉस केला आणि नेमके दोन-तीन लोक आडवे आले. ऋषीने नाराजीने गाडी थांबवली. एक कॅमेरावाला समोर आला. ऋषीच्या लक्षात आलं की, हे निवडणूक आयोगाचे लोक आहेत. तो प्रचंड वैतागला. पण, आता थांबला होता. निवडणूक ड्युटीवर असलेले लोक म्हणाले, ‘गाडीची डिक्की उघडा..’ कॅमेरावाला शूटिंग करत होता. ऋषी काही क्षण फक्त कॅमेऱ्याकडं बघत राहिला.

रात्रीच ऋषीने स्वप्न पाहिलं होतं.. त्याचे साहेब आमदार झालेत.. दहा-पंधरा वेगवेगळ्या चॅनलचे लोक आलेत कॅमेरे घेऊन.. साहेबांच्या बाजूला आपण उभे आहोत.. सगळ्या चॅनलवर आपण दिसतोय.. त्याची गर्लफ्रेंड मैत्रिणींना तो व्हिडिओ दाखवतेय.. मैत्रिणी तिच्या नशिबावर जळताहेत.. पण, यातलं काही झालं नाही. चॅनल सोडून निवडणूक आयोगाचा कॅमेरा समोर आला. ऋषी असा एकटक, मख्खपणे बघतोय, याचा आयोगाच्या माणसाला राग आला. त्याने जरा रागातच ऋषीला गाडीची डिकी उघडायला सांगितली. ऋषीने गाडीची चावी काढली. तो विचार करू लागला.. आयोगाच्या लोकांना कळत नव्हतं की, यात विचार करण्यासारखं काय आहे? एक फाटका दिसणारा तरुण एक जुनाट स्कूटी घेऊन निघालाय.. आयोगाचे लोक अशा लोकांनाही अडवतात. प्रोसेसचा भाग आहे म्हणतात. एरवी माणसं गुपचुप थांबतात. सगळी तपासणी करू देतात. पण, ऋषी त्यांना वेगळा वाटत होता. त्यांची कुठलीच गोष्ट तो ऐकायला तयार नव्हता. निवडणूक ड्युटीवर असलेल्या लोकांना जरा संशय यायला लागला.

त्यांनी पुन्हा ऋषीला थोडं दरडावून सांगितलं.. ‘डिक्की उघड!’ पण, ते सोडून ऋषी त्यांनाच समजावून सांगू लागला.. आपण साधा माणूस आहोत, आपल्याला का त्रास देता? अशी गयावया करू लागला. आता मात्र निवडणूक ड्युटीवाले लोक वैतागले होते. एक तर दहा-पंधरा लोकांची तपासणी केली, त्यांचं शूटिंग केलं आणि दिलं सोडून. विषय संपला. पण, आता हे प्रकरण त्यांच्यासाठी संशयास्पद होत होतं. ऋषी डिकी उघडायला टाळाटाळ करत होता. ड्युटीवाल्या माणसाने पुन्हा एकदा प्रेमानं सांगून पाहिलं.. ‘पटकन डिक्की उघड. आम्ही फक्त प्रोसेसचा भाग म्हणून हे करतोय. तुझ्याकडं कॅश नसेल, तर तुला घाबरायचं काय कारण आहे?’ पण, ऋषी काही ऐकत नव्हता. मग मात्र आयोगवाले भडकले. ते ओरडून बोलल्यावर ऋषीने डिकी उघडायचा प्रयत्न सुरू केला. चावी फिरवत राहिला, पण डिकी उघडत नव्हती. आता काही लोक पण हे सगळं बघायला गोळा झाले. ऋषी पुन्हा आयोगवाल्यांना सांगू लागला.. ‘डिक्कीत पैसे आहेत, पण ती आपली कष्टाची कमाई आहे. त्या पैशांचा निवडणुकीशी काही संबंध नाही. ते मी तुम्हाला घेऊ देणार नाही..’ निवडणूक ड्युटीवाले आता खूपच वैतागले होते. ते ताबडतोब डिकी उघडायचा आग्रह करत होते. ऋषी सारखा सारखा त्यांना, ‘माझी कष्टाची कमाई आहे..’ असं सांगत होता. बाचाबाची सुरू होती. ऋषी त्यांना म्हणाला, ‘सत्ताधारी लोकांच्या गाड्या तपासा ना.. तुम्हाला आम्हीच दिसतो का? आमचेच पैसे जप्त करायची ड्युटी आहे का तुमची?’ लोक उत्सुकतेने बघत होते. ऋषी चांगलाच अडकला, हे त्यांच्या लक्षात येत होतं. त्यातल्या काही लोकांना ऋषीचं म्हणणं पटतही होतं. पण, आयोगाच्या लोकांसमोर त्याची बाजू घेणं शक्य नव्हतं. आयोगाचे लोक म्हणाले, ‘भंकस करू नको. जे सांगितलं ते कर..’ ऋषी आता रागात ‘नाही’ म्हणाला. त्याचं म्हणणं होतं.. घरखर्च, मेडिकल असे सगळे खर्च वजा केल्यावर जे पैसे उरतात, ते गेल्या तीन वर्षापासून तो साठवतोय. आता तेच घबाड तुमच्या हाती एवढं सहजासहजी कसा देऊ? एवढं मन मारून साचलेले पैसे तुम्हाला नाही देऊ शकत..

ऋषी तावातावानं बोलत होता. कॅमेरामन दिवसभर शूटिंग करत असतो. पण, त्याला पहिलीच अशी केस भेटली होती. खरं तर कॅमेरावाला आठवडाभर आयोगाच्या लोकांसोबत फिरत होता. पण, एकाच्याही गाडीत पैसे सापडले नव्हते, म्हणून त्यालाही वैताग आला होता. आज पहिल्यांदा पैसे सापडणार होते. शूटिंग करायला मजा येणार होती. खूप वेळ ऋषीची बडबड ऐकून निवडणूक ड्युटीवाले लोक कंटाळले होते. त्यांनी आता थेट चावीच घेतली त्याच्या हातातून. ऋषी ओरडत राहिला.. माझी कष्टाची कमाई आहे.. कॅमेरा बंद करा.. वाटलं तर अर्धे पैसे तुम्ही ठेवा.. पण, आता एवढे लोक गोळा झाले होते की, निवडणूक ड्युटीवाल्याला कारवाई करायची खुमखुमी आली. कॅमेरावाला अँगल धरून उभा राहिला. डिकी उघडली गेली. त्यात मोजून तीस रुपये होते. खूप बारकाईने तपासणी झाली. पण, एकूण फक्त तीस रुपये होते. निवडणूक ड्युटीवाला म्हणाला, ‘तीस रुपये होते, तर एवढं काय घाबरत होता?’ ऋषी म्हणाला, ‘कष्टाची कमाई असली की त्रास होतो साहेब..’ कॅमेरामन म्हणाला, ‘अरे, पण येवढं फुटेज कशाला खात होता? आम्हाला वाटलं खरंच घबाड सापडणार आता..’ ऋषी म्हणाला, ‘सगळा खर्च जाऊन एवढेच उरतात साहेब. हे घबाडच आहे आमच्यासाठी.. आयोगाला कळावं म्हणू थोडं फुटेज खात होतो. माझी कॅश नेऊ ना परत?’ निवडणूक ड्युटीवाल्यांना हसावं का रागावावं, कळत नव्हतं.

(संपर्कः jarvindas30@gmail.com)



Source link

माझ्या हिश्श्याचे किस्से: सिनेमातील पात्रावरून घेतले होते ‘मनोजकुमार’ नाव

0
माझ्या हिश्श्याचे किस्से:  सिनेमातील पात्रावरून घेतले होते ‘मनोजकुमार’ नाव


रूमी जाफरी, लेखक-दिग्दर्शक7 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

मला माहीत आहे की, ४ एप्रिलनंतर मनोजकुमारजींविषयी खूप लिहिले गेले आहे. पण, हिंदी फिल्म इंडस्ट्रीचा सदस्य आणि मनोजजींचा अनुयायी, चाहता या नात्याने त्यांच्याबद्दल लिहिणे ही माझी जबाबदारी आहे, असे मला वाटते.

मनोजजींचा जन्म पाकिस्तानातील शेखपुरा गावात झाला. त्यावेळी हे गाव भारतात होते. जिथे सूफी संत वारिस शाह यांचा जन्म झाला, तेच हे शेखपुरा. वडिलांनी त्यांचे नाव हरीकृष्ण गिरी गोस्वामी ठेवले. मनोजजी शिक्षणासाठी लाहोरला आले. किशोरवयातच त्यांनी दिलीपकुमार यांचा ‘शबनम’ सिनेमा पाहिला आणि ते त्यांचे चाहते बनले. दिलीपकुमारांचा त्यांच्यावर इतका प्रभाव पडला की, त्यांनी आपणही अभिनेता बनायचे, असा निश्चय केला. ‘शबनम’मध्ये दिलीपकुमारांच्या पात्राचे नाव मनोज होते, त्यामुळे आपले नावही ‘मनोजकुमार’ ठेवायचे, असे त्यांनी ठरवून टाकले.

ईश्वराने त्यांची इच्छा पूर्ण केली. मुंबईत आल्यावर ते हीरो बनले. त्यांनी स्वत:ला मनोजकुमार हेच नाव दिले. परंतु, त्यांना खरी ओळख लाभली ती ‘भारतकुमार’च्या रुपात. यातूनच प्रेरणा घेऊन मी ‘गली गली चोर है’ या सिनेमात हीरो अक्षय खन्नाचे नावही ‘भारत’ असे ठेवले होते. मनोजजींनी भगतसिंग, सुखदेव, राजगुरु यांच्यावर ‘शहीद’ हा पहिला देशभक्तिपर सिनेमा बनवला. तो तयार होत असताना त्यांची भेट तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्रीजींशी झाली. त्यांनी मनोजजींना, ‘एखादा चांगला सिनेमा बनवा,’ असे सुचवले. मनोजजींनी सांगितले की, मी ‘शहीद’ नावाचा सिनेमा बनवतोय, तो तुम्हाला खूप आवडेल. शास्त्रीजींनी त्यांना हा सिनेमा आपल्याला दाखवा, असे सांगितले. तो १९६५ चा काळ होता. सिनेमा तयार झाल्यावर मनोजजींनी दिल्लीत त्याचा ट्रायल शो ठेवला. पण त्याचवेळी देशात युद्ध सुरू झाले.

शास्त्रीजी म्हणाले, सिनेमा बघावा इतका वेळ माझ्याकडे अजिबात नाही. मनोजजी नाराज झाले. तुम्ही मला शब्द दिला होता, असे म्हणाले. शास्त्रीजी तयार झाले, पण ८-१० मिनिटेच सिनेमा पाहीन, असे त्यांनी स्पष्ट केले. मनोजजी त्यांच्या शेजारी बसले. सिनेमा सुरू झाला. ८-१० मिनिटांनी मनोजजींनी शास्त्रीजींकडे पाहिले, तर ते सिनेमात खूप गढून गेल्याचे दिसले. मग मनोजजींनी मागे इशारा केला आणि इंटर्व्हल न करता सिनेमा सुरू ठेवायला सांगितले. ८-१० मिनिटांसाठी आलेले शास्त्रीजी सिनेमा पूर्ण होईपर्यंत थांबले. तो संपला तेव्हा त्यांचे डोळे भरुन आले होते.

शास्त्रीजींनी मनोजजींचे खूप कौतुक केले. मध्यरात्री मनोजजींना पंतप्रधान कार्यालयातून फोन आला की, शास्त्रीजींना उद्या तुम्हाला भेटायचे आहे. मनोजजी सकाळी तिथे पोहोचले. शास्त्रीजी म्हणाले, ‘मी देशाला एक नारा दिला आहे.. जय जवान, जय किसान. त्यावर एखादा सिनेमा तयार होऊ शकतो का?’ मनोजजी उत्तरले, ‘का नाही? तुम्ही सांगितले आहे, तर या विषयावरील एखाद्या कथेचा मी नक्की विचार करतो.’ मनोजजी दिल्लीवरून ट्रेनने मुंबईला निघाले आणि त्या प्रवासातच त्यांनी ‘उपकार’चे संपूर्ण कथानक लिहून काढले. अशा प्रकारे शास्त्रीजींच्या सांगण्यावरुन ‘उपकार’सारखा सिनेमा तयार झाला. यावरुन मला शहीद भगतसिंग यांचा एक शेर आठवतोय…

मेरे जज़्बातों से इस कदर

वाकिफ है मेरी कलम

मैं इश्क़ भी लिखना चाहूँ,

तो इंकलाब लिख जाता है!

‘शहीद’ हा माझ्याही खूप आवडीचा सिनेमा आहे. मी मनोजजींना भेटलो, तेव्हा विचारले की, तुम्ही या सिनेमाचे नाव ‘शहीद’च का ठेवले? ते भगतसिंग असेही ठेवता आले असते.. त्यावर ते म्हणाले, ‘हो. भगतसिंग असेही नाव ठेऊ शकलो असतो. पण, माझ्यावर दिलीपकुमार यांचा प्रचंड प्रभाव होता. त्यांचा ‘शहीद’ हा सिनेमाही देशभक्तीवर होता आणि त्यातील त्यांचे काम मला फार आवडले होते. त्यामुळे मी या सिनेमाचे नावही ‘शहीद’ असेच ठेवले.

मनोजकुमारजी खूप उत्तम शायर, लेखक होते. मला आठवतेय, ऋषी कपूर ‘आ अब लौट चले’चे दिग्दर्शन करत होते. एकेदिवशी त्यांनी आपल्या घरी पार्टी ठेवली होती. मनोजजींनी ऋषीजींना एक गाणे लिहून दिले आणि ‘आ अब लौट चले’चे हे शीर्षकगीत मी तुमच्यासाठी लिहून आणलेय, असे सांगितले. ते गाणे मला नेमके आठवत नाही, पण ऋषीजींनी मला हे गाणे ऐकवले, तेव्हा सिनेमातील सगळी गाणी आधीच पूर्ण झाल्याचा आम्हाला खूप खेद वाटला. अन्यथा, ते गाणेही सिनेमात नक्की घेता आले असते.

मनोजजी किती प्रतिभावान लेखक होते, हे सांगणारी आणखी एक घटना आठवतेय. त्यांचे सहायक जगदीश यांनी ती मला सांगितली होती. नंतर मनोजजींनीही तिला पुष्टी दिली होती. त्यांच्या ‘क्रांती’ सिनेमाची कथा-पटकथा सलीम-जावेद यांची होती. माझ्या माहितीप्रमाणे, सलीम-जावेद जोडी सुपरस्टार बनल्यानंतरचा हा एकमेव सिनेमा होता, ज्यामध्ये त्यांचे डायलॉग नव्हते. ‘क्रांती’चे डायलॉग स्वत: मनोजकुमारजींनी लिहिले होते. त्याविषयी त्यांनी सांगितले होते… या सिनेमात प्रेम चोप्रांचे पात्र षडयंत्र रचून दिलीपकुमार यांच्या पात्राला इंग्रजांच्या हाती पकडून देते. दिलीपकुमारांना गजाआड करण्यात येते, तेव्हा प्रेम चोप्रा कोठडीला कुलूप लावून जिना चढून जातात आणि कॅमेरा दिलीपकुमार यांच्यावर स्थिरावतो.

नरीमन ईराणी या दृश्यासाठी तयारी करीत होते, तेव्हा दिलीपजी पंजाबीमध्ये मनोजजींना म्हणाले की, मनोज, मला वाटतेय की या दृश्यात मी केवळ नि:शब्द लूक न देता काहीतरी बोलले पाहिजे. मनोजजी म्हणाले, काय बोलणार? क्रांतीला अटक झालीय, त्यामुळे इथे बोलण्यासारखी काही जागाच नाही. दिलीपजी म्हणाले, असे काहीतरी हवे की हा माझा हिंदुस्थानी भाऊ आहे आणि यानेच स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या क्रांतीला गजाआड केलेय.. मनोजजींनी सांगितले, ठीक आहे, मी विचार करतो. त्या दृश्यासाठी लायटिंगची व्यवस्था होईपर्यंत त्यांनी डायलॉग लिहून आणला. तो दिलीपकुमार यांना ऐकवला. या दृश्यात दिलीपकुमार म्हणतात… कुल्हाड़ी पर गर लकड़ी का दस्ता न होता, तो लकड़ी के कटने का रस्ता न होता.. आपले सिनेमे, गाणी यांसाठी मनोजजी कायम स्मरणात राहतील. आज त्यांची आठवण म्हणून ‘पूरब और पश्चिम’चे हे गाणे ऐका…

है प्रीत जहाँ की रीत सदा,

मैं गीत वहीं के गाता हूँ…

आपली काळजी घ्या, आनंदी राहा.



Source link

मुद्दे पंचविशी: लोकप्रतिनिधी अन् भांडवलशाही

0
मुद्दे पंचविशी:  लोकप्रतिनिधी अन् भांडवलशाही


महेश झगडे10 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

गेल्या काही दशकांतील लोकशाहीचा प्रवास पाहता, ती सामान्य जनतेसाठीची संपन्न व्यवस्था बनते आहे की श्रीमंतांसाठीची यंत्रणा होते आहे, हा प्रश्न पडतो. दूरदृष्टी, समस्यांची जाण आणि उपाय शोधण्यास सक्षम लोकप्रतिनिधी असतील, तरच तिचा भविष्यकाळ सुरक्षित असेल.

लोकशाही ही केवळ एक शासनपद्धती नाही, तर ती लोकांचा सहभाग, निर्णय प्रक्रियेतील पारदर्शकता आणि समान संधी यांचे प्रतिबिंब आहे. गेल्या दोनशे वर्षांत जगभरात लोकशाही व्यवस्थेने मोठी वाटचाल केली असली, तरी हल्ली तिची घडी विस्कटताना दिसते. त्याचे मुख्य कारण म्हणजे भांडवलशाही आणि लोकशाहीतील वाढती गुंतागुंत व लोकप्रतिनिधींचे घटलेले महत्त्व.

लोकशाहीत जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींमार्फत शासन व्यवस्था कार्यरत असते. ही व्यवस्था नेहमीच जनहित साधण्यासाठी असते, असा संविधानिक चौकटीतील गृहितार्थ होता. परंतु, गेल्या काही दशकांत ही गृहितके बाजूला पडून नव्या समीकरणांचा जन्म झाला आहे. या समीकरणांचा गाभा असा आहे की, लोकशाहीत निवडून येणारे लोकप्रतिनिधी लोकांचे प्रतिनिधी म्हणून कमी आणि भांडवलदारांच्या स्वार्थाचे रक्षण करणारे अधिक झाले आहेत. त्यामुळेच आज लोकशाही व्यवस्थेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

लोकशाही राष्ट्रे, पण वर्चस्व भांडवलशाहीचे : प्राचीन काळापासून लोकशाहीची कल्पना अस्तित्वात होती. तथापि, आधुनिक लोकशाहीने स्वतंत्र राष्ट्रांच्या स्थापनेनंतरच मूळ धरले. १८-१९ व्या शतकातील स्वातंत्र्यलढ्यांमधून निवडून आलेले लोकप्रतिनिधी संविधान तयार करण्यात आणि व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावत होते. स्वतंत्र भारताच्या प्रारंभीच्या दशकांतही हीच प्रक्रिया दिसते. परंतु, जसजशी आंतरराष्ट्रीय अर्थव्यवस्था खुली झाली आणि भांडवलशाहीचा प्रभाव वाढला, तसतसे लोकशाहीचे मूळ उद्दिष्ट डळमळीत होऊ लागले. आज जगातील बहुतांश लोकशाही राष्ट्रांमध्ये भांडवलशाहीचे स्पष्ट वर्चस्व दिसते. निवडणुकीतून निवडून आलेले लोकप्रतिनिधी आपल्या मतदारांचे प्रतिनिधित्व करतात की भांडवलशाहीच्या हातातील बाहुले होतात, हा प्रश्न गंभीर झाला आहे.

भांडवलदारांमुळे घटले लोकप्रतिनिधींचे महत्त्व : जागतिक अर्थव्यवस्थेत १९७० च्या दशकानंतर मोठे परिवर्तन झाले. अमेरिकेत तत्कालीन अध्यक्ष रिचर्ड निक्सन यांनी १५ ऑगस्ट १९७१ रोजी घेतलेल्या निर्णयानंतर भांडवलशाही अधिकच प्रभावशाली झाली. त्यानंतर, बँकिंग व्यवस्था, वित्तीय घडामोडी, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि खासगी उद्योग यांच्यावर भांडवलदारांचे नियंत्रण वाढत गेले. परिणामी, लोकशाहीने जी राजकीय आणि सामाजिक समतेची हमी दिली होती, ती एका विशिष्ट गटाच्या हातात केंद्रित होऊ लागली, त्यातून लोकप्रतिनिधींचे महत्त्व कमी होत गेले. आता परिस्थिती अशी आहे की, लोकशाही ही ‘लोकांची, लोकांसाठी, लोकांकडून’ चालवली जाणारी व्यवस्था राहिली नाही. तिचे रूपांतर पैशांची, पैशांसाठी आणि पैसेवाल्यांकडून चालवल्या जाणाऱ्या व्यवस्थेत झाले आहे, असे नोबेल पारितोषिक विजेते अर्थतज्ज्ञ जोसेफ स्टिग्लिट्झ यांनी नमूद केले आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो की, लोकशाहीला भांडवलशाहीच्या विळख्यातून सोडवायचे कसे? आणि ही स्थिती पुढील २५ वर्षांत काय स्वरूप धारण करेल?

आत्मपरीक्षणाची वेळ

जग चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या उंबरठ्यावर आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence), रोबोटिक्स, जिनोमिक्स, थ्री-डी प्रिंटिंग यांसारख्या क्षेत्रांमध्ये होणाऱ्या क्रांतिकारी संशोधनांमुळे मानवी जीवनाच्या प्रत्येक पैलूवर मोठा परिणाम होत आहे. या प्रगतीमुळे नवनव्या संधी निर्माण होणार असल्या, तरी भांडवलशाही आणि तंत्रज्ञान सम्राट (Tech Emperor) अधिक मजबूत होत जातील. उद्या लोकशाहीचे कार्यक्षेत्र संकुचित झाले तर काय होईल? नवतंत्रज्ञानाच्या नावाखाली लोकांचे अधिकार आणि खासगीपण गमावले गेले, तर ही लोकशाही राहील का? की ती केवळ निवडणुकांपुरती मर्यादित राहील? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी लोकप्रतिनिधींनी आत्मपरीक्षण केले पाहिजे.

लोकशाही वाचवायची असेल तर…

आता खरी कसोटी लोकप्रतिनिधींच्या जबाबदारीची आहे. तंत्र-सम्राट आणि भांडवलशाहीच्या प्रभावाखाली राहून लोकशाही चालवायची की ती अधिक सशक्त करायची, हा प्रश्न त्यांना निकाली काढावा लागेल. त्या दृष्टीने हे उपाय महत्त्वाचे…

१. निवडणूक प्रक्रिया सुधारणे

पैसा आणि प्रभाव यांचा गैरवापर थांबवण्यासाठी कठोर कायदे करणे. – राजकीय पक्षांच्या निवडणूक खर्चावर पारदर्शक नियंत्रण ठेवणे.

२. आर्थिक विषमता कमी करणे

तंत्र-सम्राट आणि भांडवलशाहीच्या ताब्यात गेलेल्या मूलभूत सेवांची पुनर्रचना करणे. – शिक्षण आणि आरोग्य सेवा सर्वसामान्यांसाठी अधिक सुलभ करणे.

३. लोकशाहीकरणासाठी तंत्रज्ञानाचा वापर

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर लोकशाही व्यवस्थेच्या सक्षमीकरणासाठी करणे. – पारदर्शक प्रशासनासाठी डिजिटल व्यवस्थांचा उपयोग करणे.

४. सामाजिक जाणीव निर्माण करणे

लोकशाही म्हणजे केवळ मतदान नव्हे. त्यात नागरिकांचा सततचा सहभाग आणि उत्तरदायित्व सुनिश्चित करणे. – नागरिकांनी राजकीय निर्णयांवर सतत प्रश्न विचारण्याची प्रवृत्ती जोपासणे.

नव्या युगातील लोकशाहीचे स्वरूप

भविष्यकाळात लोकशाही आणि भांडवलदार / तंत्र-सम्राट यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होईल. पण, लोकशाही ही केवळ एक संकल्पना नाही, ती एक सजीव संस्था आहे. लोकांनी तिला मजबूत करण्याचा प्रयत्न केला, तर ती भांडवलशाहीला / तंत्र-सम्राटांना यांना तोंड देऊ शकेल.

गेल्या काही दशकांतील लोकशाहीचा प्रवास पाहता, ती संपन्न जनतेसाठीची व्यवस्था बनते आहे की श्रीमंतांसाठीची यंत्रणा होते आहे, हा प्रश्न अधिक महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे दूरदृष्टी, समस्यांची जाण आणि उपाय शोधण्याची क्षमता असलेले लोकप्रतिनिधी असतील, तरच लोकशाहीचा भविष्यकाळ सुरक्षित असेल. अन्यथा, ‘लोकांची सत्ता’ या संकल्पनेची जागा ‘पैशांची सत्ता’ हे नवे तत्त्वज्ञान घेईल आणि जनता त्या व्यवस्थेची केवळ मूक प्रेक्षक बनेल. म्हणूनच, लोकशाही वाचवायची असेल, तर पुढची पंचवीस वर्षे लोकप्रतिनिधींनी नव्या तंत्रज्ञानाची आव्हानांना समजून घेऊन, जनतेच्या हितासाठी निर्णय घेण्याची तयारी दाखवली पाहिजे. तसे न झाल्यास येणाऱ्या काळात ‘लोकशाही’ ही केवळ इतिहासाच्या पानांवरच शिल्लक राहील.

(संपर्कः maheshzagade07@gmail.com)



Source link

रसिक स्पेशल: डॉ. आंबेडकरांच्या जीवनप्रेरणांचा शोध…

0
रसिक स्पेशल:  डॉ. आंबेडकरांच्या जीवनप्रेरणांचा शोध…




अवघ्या ६५ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्य, दुर्बलांसाठी केलेले कार्य भारताच्याच नव्हे, तर मानवतेच्या इतिहासात अजोड असे आहे. उद्या, १४ एप्रिलला बाबासाहेबांची १३४ वी जयंती साजरी होत आहे. त्या औचित्याने त्यांच्या या असामान्य कार्यामागील जीवनप्रेरणांचा हा वेध… डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रातून त्यांच्या कार्यामागील विविध प्रेरणांचे दर्शन घडते. त्यापैकी कोणत्याही काळातील नव्या पिढीला मिळणारी सर्वात मोठी प्रेरणा म्हणजे ‘ज्ञानसाधना’. बाबासाहेबांचे वडील रामजी यांचे इंग्रजी अतिशय चांगले होते. आमच्या घरामध्ये वडिलांनीच शिक्षणाविषयीची आस्था आणि आवड निर्माण केली, असे बाबासाहेबांनी म्हटले होते. रामजी हे कबीरपंथी असल्याने त्यांना भजने आणि अभंग तोंडपाठ होते. शिवाय, घरात रामायण, महाभारत, पांडव-प्रताप आदी ग्रंथांवर निरुपण होत असे. वडील रोज संध्याकाळी संतांचे अभंग आणि कबीराचे दोहे म्हणत, त्याचाही प्रभाव आम्हा भावंडांवर पडला, असे बाबासाहेब सांगायचे. अफाट ज्ञानसाधना, अपार निष्ठा अमेरिकन विदुषी डॉ. एलिनॉर झेलियट यांनी बाबासाहेबांवरील निबंध ग्रंथात त्यांच्या ज्ञानसाधनेबाबत खूप बारकाईने नोंदी केल्या आहेत. विशेषत: बाबासाहेबांचा अमेरिकेतील ज्ञानसाधनेचा कालखंड कसा होता आणि त्यांनी त्यासाठी केलेल्या तपश्चर्येचे वेगळेपण त्यातून समोर येते. अवघ्या बाविसाव्या वर्षी बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याकडून परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळाल्यावर ते अमेरिकेला रवाना झाले. या काळात त्यांनी एम. ए. चा अभ्यास केला. १९१५ मध्ये ही पदवी त्यांना मिळाली आणि १९१६ ला त्यांनी पीएच. डी. पूर्ण केली. म्हणजे अवघ्या तेविसाव्या वर्षी बाबासाहेब सर्वार्थाने उच्चविद्याविभूषित झाले होते. हजारो वर्षे उपेक्षेची आणि वंचनेची वागणूक मिळालेल्या समाजातील हा एक असाधारण तरुण अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात जाऊन तेथील सर्वोच्च पदवी संपादन करतो, हे खूप महत्त्वाचे होते. समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानववंशशास्त्र, मानसशास्त्र, भारतातील जातिव्यवस्था यासह प्रगत देशांचे इतिहास आणि त्यांचे साहित्य यांचा सखोल अभ्यास या काळात बाबासाहेब करत होते. त्यांच्या ज्ञानसाधनेने आणि अपार निष्ठेने विद्यापीठातील अनेक प्राध्यापक आणि ग्रंथपाल भारावून गेले होते. १९२३ मध्ये त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सची ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही पदवी मिळवली होती. एकूणच बाबासाहेबांची ज्ञानाकांक्षा आणि तिला दिलेली साधनेची जोड ही एक अपूर्व अशी प्रेरणा म्हणता येईल. अस्पृशांच्या वेदनेचा हुंकार बाबासाहेब १९१८ नंतर सामाजिक जीवनात उतरले आणि शेवटच्या श्वासापर्यंत दलित समाजासाठी कार्य करीत राहिले. ‘अ‍ॅनिलिएशन ऑफ कास्ट’ या पुस्तकात त्यांनी या देशातील जातिवादाला वैचारिक आणि तर्कशुद्ध उत्तर देणारे अभ्यासपूर्ण प्रतिपादन केले आहे. त्यावेळच्या सर्वच प्रस्थापित विचारवंतांना आणि नेत्यांना भारतातील जातिव्यवस्थेबाबत एक परखड मांडणी करणारा महान विद्वान आपल्यासमोर उभा ठाकल्याचे लक्षात आले. बाबासाहेबांनी मोठ्या प्रमाणात ग्रंथलेखनही सुरू केले. केवळ लेखन करूनच नव्हे, तर प्रत्यक्ष अस्पृश्यांचे आणि दुर्बल वर्गाचे प्रश्न मांडून, त्या संबंधीच्या लढ्यात प्रत्यक्ष सहभागी होऊन वाटचाल करण्याची भूमिका त्यांनी स्वीकारली. ‘मूकनायक’ आणि“बहिष्कृत भारत’ ही त्यांनी सुरू केलेली पाक्षिके त्याचाच परिपाक होता. त्याचप्रमाणे सभा, मेळावे, परिषदांचे आयोजन करून त्यांनी अस्पृश्य वर्गाचे दु:ख आणि दैन्य शब्दश: वेशीवर टांगले. आत्मसन्मानाचा लढा मागास समाजाने कुप्रथांतून बाहेर पडावे, अशी हाक त्यांनी दिली. मढ्यावरचे नवे कापड घेऊन ते घालू नका, मेलेल्या जनावरांचे मांस खाऊ नका, असे त्यांनी ठणकावून सांगायला सुरूवात केली. देशातला हा मोठा समाज आपल्या हजारो वर्षांच्या रुढींमधून बाहेर पडून आत्मसन्मानाच्या जाणिवेने जागा होत होता, ही डॉ. आंबेडकरांच्या लढ्याची फलश्रुती गांधीजींच्या नेतृत्वाखाली देशव्यापी स्वातंत्र्यलढा सुरू असतानाही जाणवू लागली होती. माणगावात भरलेल्या महाराष्ट्र अस्पृश्य परिषदेचे ते अध्यक्ष होते, त्यासाठी करवीर संस्थानच्या शाहू महाराजांनी त्यांना पाठबळ दिले होते. महाड येथे चवदार तळ्याच्या सत्याग्रहासाठी त्यांनी मागास समाजाला उभे केले आणि १९२७ च्या मार्चमधील हा लढा डिसेंबरपर्यंत सुरू ठेवला. लंडनला भरलेल्या गोलमेज परिषदेतही त्यांनी अस्पृश्य समाजाची गाऱ्हाणी मांडली आणि त्यासाठी प्रसंगी गांधीजींबरोबर संघर्षही केला. विद्या, स्वाभिमान, शील हीच दैवते बाबासाहेबांना मुंबईत १९५४ मध्ये त्यांच्या हीरक महोत्सवानिमित्त १ लाख १८ हजार रुपयांची थैली अर्पण करण्यात आली. त्यांनी ही रक्कम आपल्या प्रकृतीसाठी खर्च करावी, अशी लोकांची इच्छा होती. तथापि, गरीब समाजाकडून अशी थैली स्वीकारणे बेशरमपणाचे आहे, असे परखडपणे सांगत त्यांनी ती देणगी सामाजिक संस्थांच्या इमारत फंडाला दिली. या कार्यक्रमात बाबासाहेबांनी केलेले भाषण फार मोलाचे आहे. त्यांच्या जीवनप्रेरणा कशा स्वरूपात आकाराला आल्या असतील, याचा बोध त्यातून होतो. बाबासाहेब त्यावेळी म्हणाले, ‘माझे आयुष्य तीन गुरु आणि तीन उपास्य दैवतांनी घडले आहे. माझे पहिले आणि श्रेष्ठ गुरु गौतम बुद्ध, दुसरे गुरु कबीर आणि तिसरे गुरु म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले.’ जगाचे कल्याण फक्त बौद्ध धर्मच करू शकेल, हे सांगतानाच ज्योतिबा फुले यांचा मार्ग आम्ही कधीच सोडणार नाही, असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले. वडील कबीरपंथी असल्यामुळे कबीरांच्या विचारांचा परिणाम आपल्यावर झाला. या तिघांच्या शिकवणीने आपले आयुष्य बनले, असे त्यांनी म्हटले होते. विद्या, स्वाभिमान आणि शील ही आपली तीन उपास्य दैवते आहेत. माझे विद्येचे वेड भयंकर आहे. कोणाची याचना करीत नाही, म्हणून मी स्वाभिमानी आहे आणि आयुष्यात दगाबाजी, फसवणूक केल्याचे आपल्याला आठवत नाही, अशा शब्दांत त्यांनी या उपास्य दैवतांचा उल्लेख केला होता. देशाचे स्वातंत्र्य, लोकशाही टिकली पाहिजे आणि समाजात बदल घडला पाहिजे, हे स्वप्न बाबासाहेब पाहात होते. त्यासाठी राजकीय लोकशाहीबरोबरच आर्थिक आणि सामाजिक लोकशाही निर्माण व्हावी, ही त्यांची तळमळ होती. त्या दृष्टीने स्वातंत्र्य टिकवणे आणि लोकशाही बळकट करण्यासाठी सत्तेच्या जवळपास असणाऱ्या सर्वांनी डोळ्यात तेल घालून दक्ष राहिले पाहिजे, असे ते सांगत. आज बाबासाहेबांना अभिवादन करताना, त्यांनी दिलेल्या प्रेरणांचे मोल जाणून घ्यायला हवे. त्या केवळ दस्तऐवजांमध्ये किंवा पुस्तकात राहणार नाहीत, तर प्रत्येक पिढीला दीपस्तंभाप्रमाणे दिशा दाखवण्याइतक्या सक्षम आहेत. (संपर्कः arunbk1954@gmail.com)



Source link