water pipe replacement in bhayandar ghodbunder transit camp brings relief to residents || अखेर संक्रमण शिबिरातील जल वाहिन्या महापालिकेने बदलल्या, नागरिकांना मोठा दिलासा
congress state president harshvardhan sapkal made serious allegation today ruling party has created structure of looters || सत्ताधाऱ्यांनी लुटारूंची रचना निर्माण केली, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप
मुंबई प्रतिनिधी :- राजकारणात मोठा भूकंप घडवत फलटणचे माजी नगराध्यक्ष व श्री सद्गुरु-महाराजा संस्था समूहाचे प्रमुख दिलीपसिंह भोसले यांनी अखेर भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष ना. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबईतील भाजपा प्रदेश कार्यालयात हा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हेही उपस्थित होते.
या पक्षप्रवेशानंतर भोसले यांनी आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या राजे गटाला स्पष्टपणे रामराम ठोकला आहे. भोसले यांच्यासोबत श्री सद्गुरु हरिबुवा महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले आणि समूहातील इतर पदाधिकाऱ्यांनीही भाजपमध्ये प्रवेश करत भाजपा संघटनास नवसंजीवनी दिली.
चार दशकांहून अधिक काळाचे सामाजिक योगदान
1974 पासून फलटणच्या सामाजिक व राजकीय जीवनात सक्रीय असलेले दिलीपसिंह भोसले हे शहराच्या विकासासाठी एक झपाटलेले नेतृत्व म्हणून ओळखले जातात. 1978 च्या फलटण नगरपालिका निवडणुकीत त्यांनी नागरी संघटनेच्या माध्यमातून प्रस्थापितांना धक्का देत यश मिळवले. नंतर नगरसेवक, नगराध्यक्ष या पदांवर त्यांनी प्रभावी कामगिरी बजावली.
त्यांच्या कार्यकाळात उभारले गेलेले प्रियदर्शनी इंदिरा गांधी सांस्कृतिक भवन आजही फलटण शहराच्या सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक आहे. या सभागृहात लता मंगेशकर यांच्यासारख्या दिग्गजांचा कार्यक्रम झाला आहे.
सहकार, शिक्षण, व साहित्य-संस्कृतीचे द्रष्टे नेतृत्व
राजकीय कारकिर्दीबरोबरच दिलीपसिंह भोसले यांनी सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या संस्था म्हणजे –
श्री सद्गुरु हरिबुवा महाराज पतसंस्था
महाराजा मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडीट सोसायटी
सहकार महर्षी हणमंतराव पवार कुक्कुटपालन संस्था
या संस्थांच्या पारदर्शक आणि शिस्तबद्ध कारभारामुळे संपूर्ण सातारा जिल्ह्यात त्यांची विश्वासार्ह छाप आहे. शिक्षण, साहित्य व संस्कृतीच्या माध्यमातून त्यांनी समाजमनाला जोडले आहे. श्री सद्गुरु प्रतिष्ठान आणि श्री सद्गुरु शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षण प्रसारात मोलाचे योगदान दिले आहे.
भाजपला मिळाले तगडे नेतृत्व
फलटणसह संपूर्ण तालुक्यात भाजपला दिलीपसिंह भोसले यांच्या प्रवेशामुळे नवे बळ मिळाले आहे. राजकारणासोबत समाजकारणातही त्यांचे अनुभव आणि नेतृत्व भाजपच्या वाढीस उपयुक्त ठरणार आहे, अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांमधून उमटत आहे.
या कार्यक्रमाला अॅड. सौ. मधुबाला भोसले, रणजितसिंह भोसले, संदीप जगताप, जयकुमार शिंदे, अमोल सस्ते, संदीप चोरमले आदी पदाधिकारी उपस्थित होते.
BEST initiative will be funded by Mumbai Municipal Corporation in the new financial year mumbai news | बेस्टला निधी मिळणार, पण अटी सापेक्षच; मुंबई महापालिका प्रशासनाने घातल्या अटी |
बौध्दिसत्वांची भग्न मूर्ती जर आपण निरखून पाहीली तर तिच्यातील प्रमाणबद्धता आपल्याला आज देखील आवाका करून सोडते. खंडित असतांना देखील तिच्यातील सौंदर्य तसूभरही कमी झाले नाही. प्राचीन काळी मथुरा शैलीत लाल वालुकामय दगडाचा वापर मूर्ती तयार करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात केला जात असे. बौध्दिसत्वांच्या खंडीत मूर्तीने आपल्या डोक्यावर मुकूट परिधान केले असून त्यावर अतिशय नाजुक पध्दतीने नक्षीकाम केले आहे जणू काही ते सुवर्ण अलंकारच आहेत येवढ्या सुक्ष्म पध्दतीने त्यावर काम केले आहे तर लांब खांद्यावर रुळणारे कुरळे केस अतिशय प्रमाणबद्ध पध्दतीने दोन्ही बाजूला कोरले आहेत त्यातच चेहर्यावरची सात्विकात आपल्या मनाचा ठाव घ्यायला पुरेशी आहे. अर्धलोम स्थितील डोळे लयदार भुवया सडसडीत सरळ नाक धनुष्याकृती नाजुक ओठ , गळ्यातील कंठा, माळा मध्यम शरीरयष्टीच्या स्थितप्रज्ञ अवस्थेतील बौध्दिसत्वांच्या मूर्ती आज देखील किती उच्चतम आणि पराकोटीची कलाकृती आपल्या समोर प्रकट करते.
एक क्षण मनात विचार डोकावतो की छिन्नविछिन्न भग्न करायला एक जोरदार हातोड्याचा घाव पुरेसा आहे… पण मूर्ती घडवणारे हात किती संतुलित एक एक छिन्नी होड्याचा फटका श्वास रोखून मारत असणार मूर्ती घडवणारा कलाकार मनाची एकाग्रता जराही ढळू न देता एक एक प्रमाणबद्ध नाजुक फटका मारत असेल की एकही अधिकचा दगडाचा टवका उडू नये अन्यथा संपूर्ण कलाकृती बिघडून जाण्यास कारणीभूत ठरू शकेल. आज कितीही संसाधने असली तरी इतकी उच्चतम प्रतीची कलाकृती घडवणे अशक्यप्राय आहे….!
Thane Municipal Corporation appeals to save water by avoiding wastage | ठाणे महापालिका म्हणते.., ठाणेकरांनो, पाणी जपून वापरा; पाण्याचा अपव्यय टाळून पाणी बचत करण्याचे आवाहन
साहस टाईम्स :- देशभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी होत आहे. या निमित्ताने त्यांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी डॉ. बाबासाहेबांच्या विचारांवर नव्याने प्रकाश टाकला. त्यांनी संविधानाची स्थिती, अर्थव्यवस्थेतील अनियमितता आणि सामाजिक भेदभावावर भाष्य करताना बाबासाहेबांचे विचार आज किती प्रासंगिक आहेत, याचे सखोल विश्लेषण केले.
प्रकाश आंबेडकर म्हणाले, “डॉ. आंबेडकरांची प्रासंगिकता मी तीन भागांत विभागेन – संविधान, अर्थव्यवस्था आणि सामाजिक समता. बाबासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य यासाठी समर्पित केले. मात्र आजही ही लढाई अपूर्ण आहे. संविधान, त्यातील मूल्ये आणि दलित समाजाच्या हक्कांसाठीची ही चळवळ आजही सुरू आहे.”
गेल्या वर्षीच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ‘संविधान वाचवा’ हा मुद्दा चर्चेत होता. मात्र प्रकाश आंबेडकर यांच्या मते, भाजपाच्या विजयाचा अर्थ ‘संविधान वाचवा’ च्या विरोधात जनादेश होता, असं म्हणता येणार नाही. विरोधकांच्या अपयशाने भाजपाला संधी मिळाली, हे लक्षात घेतलं पाहिजे, असे ते म्हणाले.
संविधान धोक्यात का?
प्रकाश आंबेडकर यांच्या मते, “भाजप आणि आरएसएस हिंदू राष्ट्राच्या संकल्पनेला पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहेत. आरक्षण संपवण्याचा प्रयत्नही दीर्घकालीन अजेंडाचा भाग आहे. हे संविधानातील मूलभूत तत्त्वांना आव्हान आहे. त्यामुळेच बाबासाहेबांचे विचार आज अधिक महत्त्वाचे ठरतात.”
अर्थव्यवस्था आणि संसदीय लोकशाही
बाबासाहेब संसदीय लोकशाहीचे खंदे समर्थक होते. अर्थविषयक निर्णय संसदेत होण्याचे त्यांनी समर्थन केले होते. आज मात्र संसदेला डावलून काही मूठभर कॉर्पोरेट कंपन्यांसाठी निर्णय घेतले जातात, अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. बाबासाहेब भांडवलशाहीविरोधात होते, पण औद्योगिकीकरणाचे समर्थन करत त्यांनी कृषीवर अवलंबून असलेल्या समाजाला पर्याय सुचवले होते.
दलित समाजाची आजची स्थिती
प्रकाश आंबेडकर म्हणाले, “बाबासाहेबांनी सामाजिक परिवर्तनासाठी जो लढा दिला, तो आजही अपूर्ण आहे. शारीरिक भेदभाव आढळत नसला, तरी मानसिक स्तरावर तो कायम आहे. पुढच्या पिढीला या व्यवस्थेपासून मुक्त करणे हे मोठे आव्हान आहे.”
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या समतेच्या, बंधुतेच्या आणि न्यायाच्या मूल्यांची आठवण करून देणारी ही १३५ वी जयंती, देशातील प्रत्येक नागरिकासाठी संविधानाची मूल्यं जपण्याचे प्रेरणास्थान ठरावी, असे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले.
Anushka Sharma on Ranveer Singh: Anushka Sharma why revealed why she couldnt date Ranveer Singh: Anushka Sharma how she wanted a boyfriend: रणवीर सिंह व अनुष्का शर्मा यांनी एकमेकांना का डेट केले नाही? अभिनेत्री खुलासा करत म्हणालेली, “रणवीर हे कधीच…”
Our Gods Goddesses Not That Powerful Samajwadi MLA Indrajeet Saroj | “आपल्या देशातील देवी-देवता शक्तिशाली नाहीत, म्हणून…”, परकीय आक्रमणांवरून समाजवादी नेत्याच्या वक्तव्याची चर्चा