Thursday, July 23, 2026
Home Blog Page 364

‘पीएमपी’ची माण, चऱ्होलीत ई-बस स्थानके

0
‘पीएमपी’ची माण, चऱ्होलीत ई-बस स्थानके



पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बस स्थानकांमध्ये चऱ्होली आणि माण येथे नवीन ई- बस स्थानके सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे हिंजवडी येथील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचारी आणि हवाई प्रवाशांना या दोन बस स्थानकांचा फायदा होणार आहे. आज (२५ एप्रिल) दुपारी साडेचार वाजता दोन्ही बस स्थानकांचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.

शहरी वाहतुकीचे आधुनिकीकरण करण्यासाठी ‘पीएमपी’ प्रशासनाने चऱ्होली आणि माण या ठिकाणी दोन ई-बस स्थानक उभारण्याचे नियोजन केले. चऱ्होली येथे ६० बस धावणार आहेत. या ई-स्थानकांमुळे आळंदी, विश्रांतवाडी, लोहगाव, वाघोली परिसरातील प्रवाशांना सेवा मिळणार आहे. हवाई प्रवाशांना विमानतळावर जाण्यासाठी सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. माण येथून ३२ बसचे नियोजन करण्यात आले आहे.

वेगाने वाढणाऱ्या उपनगरीय क्षेत्रांमध्ये सेवा कार्यक्षमतेत सुधारणा करणे आणि सुलभ दळणवळण यंत्रणा सुरू करण्याच्या उद्देशाने या ई-बस स्थानकांचा उपयोग होणार असल्याचे ‘पीएमपी’ प्रशासनाकडून सांगण्यात आले.

आता नऊ ई-बस स्थानके

‘पीएमपी’ची हिंजवडी, कात्रज, बाणेर-सूस रस्ता, भोसरी, पुलगेट, डेक्कन जिमखाना आणि हिंजवडी फेज २ या सात ठिकाणी ई बस स्थानके आहेत. त्यामध्ये चऱ्होली आणि माण येथील या दोन स्थानकांची भर पडणार आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांसह पीएमआरडीएच्या हद्दीत ‘पीएमपी’ची सेवा सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. नवीन ई-बस स्थानकांमुळे प्रवाशांना सुलभ सेवा उपलब्ध होणार आहे. दीपा मुधोळ-मुंडे, व्यवस्थापकीय संचालक तथा अध्यक्ष, पीएमपीएमएल



Source link

Regarding the admission process in agricultural universities Career news

0
Regarding the admission process in agricultural universities Career news


या लेखमालिकेत आपण वेगवेगळ्या शाखा व त्यामधील संधी याबाबत आपण पाहत आहोत. परंतु आता एप्रिल व मे महिन्यात राज्य सामायिक परीक्षा मंडळाकडून विविध प्रवेश परीक्षा घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना मेडिकल किंवा इंजिनीअरिंग या शाखेत प्रवेश निश्चित करायचा आहे. त्यांनी प्रवेश प्रक्रियेबद्दल माहिती घेण्यास तसेच कॉलेज निवडण्यास सुरुवात केली आहे. परंतु या व्यतिरिक्त कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रियेविषयीची माहिती आपण या लेखात पाहू.

● कृषी शिक्षण प्रवेश प्रक्रिया

कृषी शिक्षणाची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया ही प्रामुख्याने महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे व राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष यांच्यामार्फत चालू होते.

प्रवेश पात्रता

बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थी यासाठी पात्र आहे. पीसीबी किंवा पीसीएम हे दोन्ही ग्रुप यासाठी पात्र आहेत. तसेच कृषी सामायिक प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक आहे. यातील गुणांवर प्रवेश ठरविला जातो. याचबरोबर नीट आणि जेईई या प्रवेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यालाही पात्र ठरविले जाते.

● कृषी विद्यापीठे

महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे असून, यामध्ये प्रवेश प्रक्रियेसाठी एकच वेळापत्रक राज्य सामायिक परीक्षा मंडळातर्फे देण्यात येते.

● महात्मा फुले कृषी विद्यापीठ

● डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ

● वसंतराव नाईक मराठवाडा ● कृषी विद्यापीठ

● डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ

● महाराष्ट्रातील कृषी महाविद्यालये

महाराष्ट्रातील चार कृषी विद्यापीठांतर्गत शासकीय व १५५ खासगी महाविद्यालय आहेत. या सर्व महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया एकाच वेळी चालू असते.

● शासकीय शिष्यवृत्ती व वसतीगृह निर्वाह भत्ता

वरील सर्व शासकीय व खासगी विनाअनुदानित महाविद्यालयात शासन नियमानुसार शिष्यवृत्ती व वस्तीगृह निर्वाह भत्ता अदा केला जाते. तसेच प्रत्येक महाविद्यालयाचे वार्षिक शुल्क हे शुल्क नियामक मंडळ, महाराष्ट्र यांनी ठरवून दिलेली आहे. प्रवेश घेताना माहितीपुस्तकेत प्रत्येक महाविद्यालयाच्या समोर हे शुल्क दर्शविले जाते.

● शासकीय आरक्षण

शासनाने वेळोवेळी विहित केलेले सर्व आरक्षण मर्यादा या प्रवेशावेळी राज्य सामायिक प्रवेश मंडळातर्फे लागू केल्या जातात.

● कृषी शिक्षणातील शाखा

● कृषी विज्ञान (ऑनर्स)

● उद्यान विद्या

● कृषी वनविद्या

● बी. एफ. एस. सी.

● कृषी अभियांत्रिकी

● कृषी अन्नतंत्रज्ञान

● बी. एस. सी. सामुदायिक विज्ञान

● जैवतंत्रज्ञान

● कृषी व्यवसाय व्यवस्थापन

वरील प्रत्येक शाखेचे प्रवेश एकाच वेळी केले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील प्रवेशाचे नियोजन अगोदर करणे गरजेचे आहे.

भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली व इतर राज्यातील उमेदवारांसाठी असलेल्या राखीव जागा वगळता उर्वरित जागांपैकी प्रथम ३० टक्के जागा महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांसाठी खुल्या असतील आणि नंतर ७० टक्के जागा या उमेदवार ज्या विद्यापीठ कार्यक्षेत्रामधील महाविद्यालय / शाळा / संस्था येथून अर्हता परीक्षा उत्तीर्ण झाला असेल अशा उमेदवारांसाठी असतील. विनाअनुदानित महाविद्यालयांमधील जागांचे वाटप खालील प्रमाणे असेल.

अ) प्रवेश क्षमतेच्या २० जागा संस्थास्तरीय कोटा.

ब) प्रवेश क्षमतेच्या उर्वरित ८० टक्के जागा शासकीय नियमानुसार.

अल्पसंख्यांक संस्थांच्या महाविद्यालयातील ५१ जागा संबंधित अल्पसंख्यांकाकरिता आरक्षित असतील आणि उर्वरित ४९ जागांचे वरील प्रमाणे ३० महाराष्ट्र कोटा आणि ७० विद्यापीठ कोटा याप्रमाणे वाटप करण्यात येईल.सध्या देशात ५३ कृषी विद्यापीठे आहेत. ५ अभिमत विद्यापीठे कृषीचे शिक्षण देत आहेत. ४ केंद्रीय विद्यापीठे आहेत. महाराष्ट्रात ४७ शासकीय महाविद्यालये व १५५ खासगी महाविद्यालय कृषी शिक्षणाची धुरा सांभाळत आहेत. या सर्वांमधून बाहेर पडणारा विद्यार्थी आधुनिक शेतीमध्ये हातभार लावत आहे.

● शासकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी किती गुणांची टक्केवारी असावी.

● खासगी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी किती गुणाची टक्केवारी असावी

● प्रवेश प्रक्रियेतील वेगवेगळ्या प्रवेश फेरीचे नियोजन कसे करावे.

● प्रवेश अर्ज कसा भरावा.

● विविध विषयांचे भारांकन कसे ग्राह्य धरले जाते या सर्व बाबींची आपण पुढील लेखात माहिती घेऊ.

sachinhort. shinde@gmail. Com





Source link

गुगलवरून पत्ता शोधून चोरी करणारे दोघे अटकेत

0
गुगलवरून पत्ता शोधून चोरी करणारे दोघे अटकेत



पिंपरी : ‘गुगल’वरून व्यावसायिक कार्यालयाचे पत्ते शोधून चोरी करणाऱ्या दोघांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. चोरी करण्यासाठी बस, रिक्षा अशा सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर ते करीत असत आणि मोबाइल फोनही बंद ठेवत असत. दोघांकडून दोन लाख ९८ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.सलीम सिकंदर शेख (वय ५८), अजित अर्जुन पिल्लई (वय ४२, दोघे रा. वांगणी गोरेगाव, जि. ठाणे) अशी अटक केलेल्या चोरांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहा एप्रिल रोजी काळेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोकणे चौकात पाचव्या मजल्यावरील व्यावसायिक कार्यालयामध्ये चोरीची घटना घडली. कार्यालयामधून ३६ हजार रुपये चोरीला गेले होते. घटनास्थळी गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार आणि त्यांच्या पथकाने भेट दिली. ११ दिवसांत ४०० सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यातून संशयित आरोपींची माहिती काढली. २० एप्रिल रोजी रात्री काळेवाडी येथे दोघे संशयित पायी जात असल्याचे पोलिसांना आढळून आले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

सलीम आणि अजित या दोघांकडून दोन लाख ९८ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. आरोपी सराईत आहेत. सलीम याच्याविरोधात मुंबई शहर येथे घरफोडीचे ६२ गुन्हे दाखल आहेत. तसेच, मुंबई शहर येथे त्याच्यावर १० ‘नॉन बेलेबल वॉरंट’ जारी करण्यात आले आहेत. अजित याच्याविरोधात २० गुन्हे दाखल आहेत. आरोपी ठाणे जिल्ह्यातील वांगणी येथील असून, ते पिंपरी-चिंचवड शहरात बसने चोरी करण्यासाठी येत असत. अजित हा उच्चशिक्षित असून, तो गुगलवरून व्यावसायिक कार्यालयांचे पत्ते शोधत असे. बसमधून उतरल्यानंतर चोरी करण्याच्या ठिकाणी ते ऑटो रिक्षाने जात असत. तसेच, चोरी करण्यासाठी येताना ते मोबाईलचादेखील वापर करत नसत.



Source link

अन्वयार्थ: ‘धर्मादाय’ मुजोरीला आदेशाचा डोस!

0
अन्वयार्थ: ‘धर्मादाय’ मुजोरीला आदेशाचा डोस!



काही गोष्टी वाईटातून चांगल्या होत्यात, तसाच प्रकार पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील एका महिलेच्या मृत्यूनंतर घडला आहे. धर्मादाय रुग्णालयांवर नियंत्रण ठेवण्याकरिता राज्यस्तरीय विशेष तपासणी करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. धर्मादाय रुग्णालयांवरील नियंत्रणासाठी धर्मादाय आयुक्त, आरोग्य विभाग आणि मुख्यमंत्री वैद्याकीय सहायता कक्ष यांच्या समन्वयातून पथक स्थापन करण्यात येणार आहे. याशिवाय जिल्हास्तरीय समित्या स्थापन करण्याची सूचना करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे स्वागतच आणि धर्मादाय रुग्णालयांवर सरकारने बारीक लक्ष ठेवून गरजूंना मोफत उपचार मिळतील याची खबरदारी घेतल्यास देशात महाराष्ट्र एक वेगळा आदर्श निर्माण करू शकेल. अर्थात त्यासाठी सरकारला कठोर भूमिका घ्यावी लागेल. सरकारकडून मोफत किंवा सवलतीत भूखंड घेऊन खासगी संस्था त्यावर मोठी रुग्णालये उभारतात. सरकारी सवलत घेतल्यास एकूण खाटांच्या २० टक्के खाटा या दारिद्र्य रेषेखालील वर्ग वा ठरावीक उत्पन्न मर्यादेतील रुग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी राखीव ठेवणे बंधनकारक असते. परंतु ही अट धर्मादाय रुग्णालयांकडून पाळली जात नाही. राखीव खाटांपैकी किती खाटा संबंधित रुग्णालयात उपलब्ध आहेत याची माहिती रुग्णालयाने देणे बंधनकारक असते. रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर खाटांच्या उपलब्धतेची माहिती सामान्य जनतेसाठी प्रसिद्ध करणेही अपेक्षित असते. मोठी रुग्णालये साऱ्या सवलती घेऊन सरकारी नियम वा अटींचे पालन करीत नाहीत. काही धर्मादाय रुग्णालये फार कमी खाटा मोफत उपचारासाठी उपलब्ध करून देतात. पुण्यातील दीनानाथ रुग्णालय व्यवस्थापनाने संबंधित महिलेच्या नातेवाईकांकडे १० लाख रुपयांच्या अनामत रकमेची मागणी केली व ही रक्कम लगेचच उभी करता आली नाही. मग त्या महिलेला अन्य रुग्णालयात हलवावे लागले. जुळ्यांना जन्म दिला पण दुर्दैवाने त्या महिलेचा मृत्यू झाला. यातून सरकारी यंत्रणेने काहीसा बोध घेतलेला दिसतो.

राज्यात ५०० पेक्षा अधिक धर्मादाय रुग्णालये आहेत. यातील अपवाद वगळता अन्य रुग्णालये मोफत उपचारांवर टाळाटाळ करतात, अशा तक्रारी असतात. मोठ्या धर्मादाय रुग्णालयांवर नियंत्रण आणण्याचे यार्पू्वीही सरकारदरबारी प्रयत्न झाले. पण त्यात यश आलेले नाही. धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाने धर्मादाय योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी ऑनलाइन प्रणाली विकसित करावी. शिवाय केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्यविषयक योजनांच्या संलग्नीकरण आणि समन्वयासाठीही प्रयत्न करावेत. योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी धर्मादाय आयुक्तांच्या अंतर्गत विभागनिहाय स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूक करावी, आदी निर्देश आता मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. धर्मादाय कार्यालयाकडे नोंदणी करणाऱ्या रुग्णालयांना रुग्णांना दिलेल्या उपचाराची माहिती, रुग्ण, शिल्लक खाटा यांची माहिती ऑनलाइन प्रणालीत भरणे सक्तीचे करणे, महापालिका क्षेत्रात जागा आणि इतर सवलती घेणाऱ्या आणि महसूल विभागाकडून जमीन सवलत घेणाऱ्या रुग्णालयाची यादी तयार करणे आदी उपाय सुचविण्यात आले आहेत. मोठ्या रुग्णालयांना वठणीवर आणण्यासाठी मुख्यमंत्री वा सरकारला खंबीरपणे कारवाई करावी लागेल.

गोरगरिबांना शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार घेण्याशिवाय पर्याय नसतो. शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार चांगले होत असले तरी आरोग्य खात्यावर मर्यादा येतात. करोना साथीनंतर निती आयोगाने आरोग्यावर एकूण अर्थसंकल्पाच्या आठ टक्के खर्च व्हावा, अशी शिफारस केली होती. राज्यात हा खर्च चार टक्केही होत नाही. यंदाच्या अर्थसंकल्पात वेतनावरील खर्च वगळता आरोग्य खात्यासाठी करण्यात आलेली ३,८२७ कोटी रुपयांची तरतूद फारच अल्प असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. गत वर्षाच्या तुलनेत आरोग्य खात्याच्या एकूण तरतुदीतही १३ टक्के कपात करण्यात आली आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजना किंवा आयुष्यमान भारत योजनेतून नागरिकांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार करण्याची तरतूद करण्यात आली आहे. पण महात्मा फुले योजनेचा लाभ मिळावा म्हणून नागरिकांना आवश्यक कार्डच सहजासहजी उपलब्ध होत नाहीत, अशा नागरिकांच्या तक्रारी असतात. सरकारी रुग्णालयांमध्ये उपचारांवर येणाऱ्या मर्यादा लक्षात घेता सामान्य नागरिकांना खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेण्याशिवाय पर्याय नसतो. धर्मादाय रुग्णालये सर्वसामान्यांना अजिबात थारा देत नाहीत. या पार्श्वभूमीवर धर्मादाय रुग्णालयांवर नियंत्रण आणण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय सर्वसामान्यांच्या हिताचा ठरतो. फक्त त्याची अंमलबजावणी कशी होते हे महत्त्वाचे. नियम कागदावरच आणि मोठ्या रुग्णालयांना मोकळीक हे चित्र फडणवीस यांना बदलावे लागेल. आरोग्य क्षेत्रातील सुधारणांवर नेहमी तमिळनाडूचे उदाहरण दिले जाते, महाराष्ट्रालाही आरोग्य क्षेत्रात बदल घडवून आणण्याची संधी आहे.



Source link

Process of collecting information on 111 Pakistani nationals residing in Pune begins

0
Process of collecting information on 111 Pakistani nationals residing in Pune begins



Process of collecting information on 111 Pakistani nationals residing in Pune begins | पुण्यामध्ये १११ पाकिस्तानी नागरिक वास्तव्यास माहिती संकलनाची प्रक्रिया सुरू





Source link

जैन मंदिर पाडण्याच्या निषेधार्थ सोलापुरात जैन समाजाचा मोर्चा

0
जैन मंदिर पाडण्याच्या निषेधार्थ सोलापुरात जैन समाजाचा मोर्चा



jain community held akrosh morcha in solapur akluj against vile Parle temple demolition| जैन मंदिर पाडण्याच्या निषेधार्थ सोलापुरात जैन समाजाचा मोर्चा





Source link

Navy radar plotter madan Jadhav from Koregaon died on duty at Uran base

0
Navy radar plotter madan Jadhav from Koregaon died on duty at Uran base



Navy radar plotter madan Jadhav from Koregaon died on duty at Uran base | भारतीय जवान मदन जाधव यांना वीरमरण, कण्हेरखेड येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार





Source link

Wife of 26 11 martyr ambadas Pawar directly appointed as deputy superintendent of Police by state government

0
Wife of 26 11 martyr ambadas Pawar directly appointed as deputy superintendent of Police by state government



Wife of 26 11 martyr ambadas Pawar directly appointed as deputy superintendent of Police by state government | शहीद अंबादास पवार यांच्या पत्नीस पोलीस उपाअधीक्षक म्हणून थेट नियुक्ती





Source link

traffic changes on ghodbunder route for four days gaimukh Ghat road work to be repaired again

0
traffic changes on ghodbunder route for four days gaimukh Ghat road work to be repaired again



traffic changes on ghodbunder route for four days gaimukh Ghat road work to be repaired again | घोडबंदर मार्गावर चार दिवस वाहतूक बदल, गायमुख घाट रस्त्याच्या कामाची पुन्हा दुरुस्ती





Source link

फलटण तालुक्यात 2025 ते 2030 या कालावधीसाठी ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पडला

0
फलटण तालुक्यात 2025 ते 2030 या कालावधीसाठी ग्रामपंचायतींच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पडला

फलटण | साहस Times :-  फलटण तालुक्यातील सर्व 131 ग्रामपंचायतींसाठी सन 2025 ते 2030 या पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम काल (24 एप्रिल 2025) रोजी अत्यंत शांततापूर्ण व पारदर्शक वातावरणात संपन्न झाला. सजाई गार्डन, फलटण येथे झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी सौ. प्रियांका आंबेकर होत्या. यावेळी तहसिलदार डॉ. अभिजीत जाधव, निवासी नायब तहसिलदार अभिजीत सोनवणे व नायब तहसिलदार तुषार गुंजवटे प्रमुख उपस्थित होते.

आरक्षण सोडतीसाठी लोकसंख्येचा निकष, तसेच यापूर्वी झालेल्या आरक्षणाच्या फेऱ्यांचा विचार करण्यात आला. राज्य शासन व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सूचनेनुसार ही सोडत राबवण्यात आली असून यामध्ये लोकनियुक्त सरपंचपदाच्या निवडणुका होणार आहेत.

आरक्षण वर्गवारीनुसार गावांची यादी पुढीलप्रमाणे:

अनुसूचित जमाती (ST):

  • ढवळेवाडी (आसू)

अनुसूचित जाती (SC):

  • सोनगांव, साठे, सांगवी, जिंती, पवारवाडी (महिला), वेळोशी, गोखळी, विंचुर्णी (महिला), आसू (महिला), मुंजवडी (महिला), सरडे, दालवडी (महिला), शिंदेनगर (महिला), गुणवरे, खुंटे (महिला), राजुरी-भवानीनगर (महिला), निंबळक, वाजेगांव, हणमंतवाडी (महिला), निरगुडी, मांडवखडक, सस्तेवाडी (महिला)

इतर मागास प्रवर्ग (OBC):

  • शिंदेमाळ (महिला), मिरगांव (महिला), मलवडी, धुळदेव (महिला), खडकी (महिला), कुसुरु, ठाकुरकी (महिला), उपळवे, पाडेगांव, बरड (महिला), आदर्की बु.॥, रावडी बु.॥, सोनवडी बु.॥ (महिला), वाखरी (महिला), तरडगांव (महिला), तरडफ, हिंगणगाव, शेरेशिंदेवाडी (महिला), राजाळे, गोळेवाडी (महिला), काशिदवाडी (महिला), भाडळी बु.॥ (महिला), जोर (कुरवली खुर्द), मठाचीवाडी, नाईकबोमवाडी, वाघोशी, धुमाळवाडी (महिला), तांबवे (महिला), झडकबाईचीवाडी (महिला), बोडकेवाडी (महिला), घाडगेमळा, फरांदवाडी (महिला), आदर्की खुर्द, सोनगांव

सर्वसामान्य महिला:

  • जावली, ढवळ, भिलकटी, झिरपवाडी, साखरवाडी, भाडळी खुर्द, कुलवली खुर्द, शिंदेवाडी, आळजापूर, वडले, चौधरवाडी, आंदरुड, खराडेवाडी, सोमंथळी, कांबळेश्वर, कापशी, आरडगांव, अलगुडेवाडी, रावडी खुर्द, काळज, ताथवडा, तडवळे, चांभारवाडी, सालपे, सासवड, तावडी, जाधववाडी (फलटण), मिरेवाडी (कुसुर), शेरेचीवाडी (ढवळ), घाडगेवाडी, माळेवाडी, ढवळेवाडी (निंबळक), पिराचीवाडी, टाकुबाईचीवाडी, माझेरी, परहर बु.॥, परहर खुर्द, जोर (वाखरी)

सर्वसाधारण:

  • सांगवी, गिरवी, खटकेवस्ती, सुरवडी, सासकल, होळ, कुरवली बु. दत्तनगर, विडणी, वडगांव, कापडगांव, सोनवडी खुर्द, टाकळवाडे, कोळकी, मुरुम, दुधेबावी, बिबी, पिंप्रद, शेरेचवाडी (हिंगणगाव), तिरकवाडी, नांदल, मिरढे, फडतरवाडी, चव्हाणवाडी, वाठार निंबाळकर, कोरेगांव, जाधववाडी (आसू), वडजल, मुळीकवाडी, मिरेवाडी दालवडी, कोऱ्हाळे, डोंबाळवाडी, विठ्ठलवाडी, मानेवाडी, जाधवनगर, दऱ्याचीवाडी, सावंतवाडी, उळंब, गोळेगांव

हा आरक्षण कार्यक्रम पारदर्शकपणे पार पडल्यानंतर ग्रामपंचायतींसाठी निवडणूक तयारी सुरू होणार असून प्रत्येक गावातील इच्छुक उमेदवारांनी पुढील प्रक्रियेची तयारी सुरू केली आहे.