Thursday, July 23, 2026
Home Blog Page 363

Mumbai News LIVE Updates : मुंबई शहर आणि उपनगरातील विविध घडामोडींची माहिती एका क्लिकवर…

0
Mumbai News LIVE Updates : मुंबई शहर आणि उपनगरातील विविध घडामोडींची माहिती एका क्लिकवर…



Latest News in Mumbai Today Live पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्यासाठी राज्य सरकारकडून मदतकार्य सुरू करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांसाठी विशेष विमानाची सोय केली. राज्य सरकारने ‘इंडिगो’ आणि एअर इंडिया अशी दोन विशेष विमाने पर्यटकांसाठी केली होती, त्यातून १८४ पर्यटक मुंबईत दाखल झाले. दरम्यान, आणखी २३२ प्रवाशांसाठी आज, शुक्रवारी एका विशेष विमानाची व्यवस्था राज्य सरकारने केली आहे. मुंबईशी संबंधित विविध घडामोडींची माहिती या Blog च्या माध्यमातून घेता येईल…



Source link

OTT Release This Week: l2 empuraan on OTT : jewel thief on OTT : Crazxy on prime video : Ayyana Mane on OTT

0
OTT Release This Week: l2 empuraan on OTT : jewel thief on OTT : Crazxy on prime video : Ayyana Mane on OTT


OTT Release This Week: एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अनेक उत्तम चित्रपट आणि मालिका ओटीटीवर प्रदर्शित होणार आहेत. हा वीकेंड चित्रपट आणि मालिका प्रेमींसाठी मजेदार असेल. प्रेक्षक घरी बसून त्यांच्या कुटुंबासह ओटीटीवर चित्रपट आणि वेब सीरिज पाहू शकतील. या यादीत सैफ अली खान स्टारर ‘ज्वेल थीफ’ ते पृथ्वीराजचा ‘एल२: एम्पुरान’ यांचा समावेश आहे. २१ एप्रिल ते २७ एप्रिल दरम्यान ओटीटीवर प्रसारित होणाऱ्या चित्रपट आणि वेब सीरिजबद्दल जाणून घ्या.

ज्वेल थीफ

Jewel Thief- The Heist Begins on Netflix : सैफ अली खान, जयदीप अहलावत व निकिता दत्ता यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘ज्वेल थीफ’ हा चित्रपट गेल्या काही काळापासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता, जो लोकांना आवडला होता. या चित्रपटात सैफ एका चोराच्या भूमिकेत दिसणार आहे, ज्याला जयदीप ५०० कोटी रुपयांचा आफ्रिकन रेड सन डायमंड चोरण्याचे काम देतो. सैफ-जयदीप व्यतिरिक्त, कुणाल कपूरसह अनेक स्टार्स यात दिसणार आहेत. हा चित्रपट २५ एप्रिल रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

क्रेजी

Crazxy on OTT : सोहम शाह स्टारर ‘क्रेझी’ हा चित्रपट या वर्षाच्या सुरुवातीला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांना खूप आवडला होता. आता हा चित्रपट ओटीटीवर आला आहे. ‘क्रेझी’ २१ एप्रिल रोजी हिंदीमध्ये प्राइम व्हिडिओमध्ये प्रदर्शित झाला आहे. तुम्ही जर हा चित्रपट थिएटरमध्ये पाहिला असेल, तर तुम्ही तो घरबसल्या ओटीटीवर पाहू शकता.

हेही वाचा

एल 2: एम्पुरान

L2: Empuraan on OTT : पृथ्वीराज सुकुमारन दिग्दर्शित ‘L2: Empuraan’ हा चित्रपट नुकताच चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. या चित्रपटात गुजरात दंगलींची कथा दाखवण्यात आली असल्याने त्यावरून बरेच वाद निर्माण झाले. यामध्ये प्रेक्षकांना अॅक्शन, क्राइम आणि थ्रिलर सर्वकाही पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट सध्या ओटीटीवर मल्याळम भाषेत उपलब्ध आहे. तो तुम्हाला जिओ हॉटस्टारवर पाहता येईल. हा चित्रपट हिंदीमध्ये पाहण्यासाठी तुम्हाला थोडी वाट पाहावी लागेल.

हेही वाचा

अय्याना माने

Ayyana Mane on OTT : ‘अय्याना माने’ ही कन्नड भाषेतील एक वेब सीरिज आहे. ही एका नव्या नवरीची कहाणी सांगते. तिला तिच्या वडिलोपार्जित घरात विचित्र गोष्टी जाणवतात आणि त्यानंतर जे घडते ते पाहून तुम्हाला धक्का बसेल. ही सीरिज २५ एप्रिल रोजी Zee5 वर प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा

लॉगआउट

बाबिल खानची मुख्य भूमिका असलेला ‘लॉगआउट’ हा चित्रपट दिल्लीत घडणारा एक सायकोलॉजिकल थ्रिलर आहे. या सिनेमाची कथा २६ वर्षीय एन्फ्लुएन्सर प्रत्युषची आहे, ज्याचे फॉलोअर्स १ कोटी होणार असतात. पण एका चाहत्याने त्याचा फोन हॅक केल्यावर त्याचे आयुष्य पूर्णपणे बदलते. लॉगआउट आता झी 5 वर स्ट्रीम होत आहे. हा सिनेमा १८ एप्रिलला रिलीज झाला होता. तुम्ही तो पाहिला नसेल तर या वीकेंडला पाहू शकता.





Source link

State government begins relief operations for tourists stranded in Kashmir after Pahalgam terror attack Mumbai news

0
State government begins relief operations for tourists stranded in Kashmir after Pahalgam terror attack Mumbai news



State government begins relief operations for tourists stranded in Kashmir after Pahalgam terror attack Mumbai news | राज्यात ५०० पर्यटक दाखल, विशेष विमानांची व्यवस्था; मुख्यमंत्र्यांकडून परिस्थितीचा आढावा





Source link

विमान कंपन्यांवर नियंत्रणासाठी लवकरच कार्यप्रणाली

0
विमान कंपन्यांवर नियंत्रणासाठी लवकरच कार्यप्रणाली



पुणे : काश्मीरमध्ये पर्यटकांवरील हल्ल्यानंतर काही विमान कंपन्यांनी प्रवासी शुल्कात वाढ केल्याच्या प्रकाराची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. भविष्यात आपत्ती काळामध्ये विमान कंपन्यांच्या प्रवासी शुल्कावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारकडून कार्यप्रणाली (मेकॅनिझम पॉलिसी) तयार केली जाणार आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (डीसीजीआय) ही कार्यप्रणाली बनविण्यात येणार असल्याचे केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित संकटाच्या काळात प्रवासी शुल्क वाढविल्यास विमान कंपन्यांवर कारवाई करण्याचा इशारा मोहोळ यांनी दिला आहे.

पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर भयभीत प्रवाशांनी माघारी जाण्यासाठी धडपड सुरू केली असताना हवाई कंपन्यांकडून प्रवासी शुल्क वाढविल्याचे समोर आले. त्यानंतर सर्व स्तरावरून केंद्र सरकार आणि हवाई कंपन्यांना लक्ष्य करण्यात आले. अखेर केंद्र सरकारला मध्यस्थी करावी लागली. हवाई कंपन्यांना प्रवासी शुल्क कमी करण्याबाबत आदेश द्यावा लागला. तसेच निरनिराळ्या राज्यांतून काश्मीरला गेलेल्या पर्यटकांना विशेष विमानाद्वारे माघारी आणावे लागले. मात्र, आपत्तीच्या काळात विमान कंपन्यांकडून असे वर्तन घडू नये, हे केंद्र सरकारला सांगण्याची वेळ येऊ नये म्हणून कार्यप्रणाली तयार करण्याबाबत हवाई वाहतूक तज्ज्ञांकडून मागणी करण्यात आली होती.

मानवनिर्मित किंवा नैसर्गिक आपत्तीच्या काळात हवाई कंपन्यांनी संवेदनशीलता आणि नैतिक जबाबदारी दाखविणे गरजेचे आहे. माणुसकीच्या भावनेतून मदत करणे अपेक्षित आहे. मात्र, संधीचा फायदा घेऊन प्रवासी शुल्क वाढविणे, वारंवार केंद्र सरकारला मध्यस्थी करावी लागणे हे शोभनीय नाही. त्यामुळे आपत्तीच्या काळात हवाई कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी कायमस्वरूपाची कार्यप्रणाली तयार करण्याची आवश्यकता आहे.– धैर्यशील वंडेकर, हवाई वाहतूक तज्ज्ञ

विमान कंपन्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने कार्यप्रणाली तयार करण्यात येईल. आपत्ती काळात नफा कमावणाऱ्या कंपन्यांवर कारवाई करण्यात येईल. – मुरलीधर मोहोळ, केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री



Source link

भारत-पाकिस्तान व्यापार पूर्णत: बंद

0
भारत-पाकिस्तान व्यापार पूर्णत: बंद



पीटीआय, नवी दिल्ली/ इस्लामाबाद

पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानवर दबाव वाढवण्यासाठी भारताने अटारी सीमा बंद केल्यामुळे दोन्ही देशांमधील उरलासुरला व्यापार व्यवहारही संपुष्टात आला. भारताने गुरुवारी आणखी कडक पावले उचलत वैद्याकीय उपचारांसाठी आलेल्या पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसाही रद्द केला असून त्यांना २७ एप्रिलपूर्वी भारत सोडण्याच्या सूचना दिल्या. पाकिस्तानात असलेल्या भारतीय नागरिकांना तातडीने मायदेशी परतण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच सिंधु जलकरार स्थगित केल्याची अधिकृत माहितीही पाकिस्तान सरकारला भारताकडून गुरुवारी देण्यात आली.

सिंधु जलकरारातील तरतुदींचा भंग केल्याचे सांगत भारताने हा करार स्थगित करत असल्याचे गुरुवारी रात्री पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाला कळवले. सीमेच्या पलीकडील दहशतवादी कारवायांच्या माध्यमातून काश्मीरला लक्ष्य करण्याची पाकिस्तानची कृती या कराराअंतर्गत नमूद केलेल्या भारताच्या अधिकारांचे उल्लंघन करणारी असल्याने तो स्थगित करण्यात आल्याचे भारताने कळवले.

भारताने बुधवारी पाकिस्तानवर घातलेल्या निर्बंधांना पाकिस्ताननेही तशाच निर्बंधांद्वारे प्रत्युत्तर दिले आहे. त्यात अटारी सीमा बंद करण्यात आल्याने दोन्ही देशांतील व्यापार बंद झाला आहे. २०१९च्या पुलवामा हल्ल्यापासूनच भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा व्यापार नगण्य राहिला आहे. भारताच्या एकूण व्यापारात पाकिस्तानचा वाटा ०.०६ टक्के इतकाच असल्याचे भारतीय निर्यात संस्थांच्या महासंघाचे अध्यक्ष एस. सी. रल्हान यांनी सांगितले. यात प्रामुख्याने फळे, सुका मेवा, तेलबिया आणि गुणकारी वनस्पतींचा समावेश होतो. पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानातून येणाऱ्या मालावर २०० टक्के शुल्क आकारण्यास सुरुवात केली. त्यामुळे पाकिस्तानचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. आताही पाकिस्तान भारताकडून मोठ्या प्रमाणात आयात करतो. त्यात रसायने, औषधे, कापूस, चहा, कॉफी, कांदे, टोमॅटो यांचा समावेश आहे. याशिवाय अटारी सीमेमार्गे अफगाणीस्तानशी होणाऱ्या व्यापारावरही काही प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, भारताने गुरुवारी पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा सरसकट रद्द केले. त्यामुळे भारतात वैद्याकीय उपचारांसाठी आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना आता २९ एप्रिलपर्यंत आपल्या मायदेशी परतावे लागणार आहे. पाकिस्तानात गेलेल्या भारतीयांनाही तातडीने परतण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

विमानसेवेला फटका

पाकिस्तानने भारतासाठी आपली हवाई हद्द बंद केल्याचा मोठा परिणाम भारतातील विमान वाहतुकीवर होण्याची चिन्हे आहेत. भारतातून पश्चिम आशिया, युरोप, उत्तर अमेरिका येथे ये-जा करणाऱ्या विमानांना आता वळसा घालून जावे लागणार असल्याने विमान प्रवासाचा वेळ वाढण्याची शक्यता एअर इंडिया आणि इंडिगो या विमान कंपन्यांनी व्यक्त केली आहे. भारताने जाहीर केलेल्या निर्बंधांना प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने आपली हवाई हद्द भारतीय विमानांसाठी बंद केल्याचे जाहीर केले. त्यानंतर टाटा समूहाच्या एअर इंडिया कंपनीने ‘एक्स’ संकेतस्थळावरून या बंदीच्या परिणामांची माहिती दिली.



Source link

‘चूक झाली! सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटींमुळे…’ सरकारकडून कबुली; पहलगाम हल्ल्यासंदर्भातली खळबळजनक माहिती समोर

0
‘चूक झाली! सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटींमुळे…’ सरकारकडून कबुली; पहलगाम हल्ल्यासंदर्भातली खळबळजनक माहिती समोर


Pahalgam Terror Attack: काश्मीरच्या (Jammu and Kashmir) पहलगाम इथं झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय संरक्षण मंत्रालयाच्या अनेक उच्चस्तरिय बैठका पार पडल्या. त्याचदरम्यान दिल्लीमध्ये केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली एक सर्वपक्षीय बैठक पार पडली. जिथं सर्व पक्षांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला. सदर बैठकीनंतर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू (Kiren rijiju) यांनी इथं सुरक्षाव्यवस्थेमध्ये त्रुटी असल्यानं मोठी चूक झाल्याची बाब जाहीरपणे स्वीकारली. झाला प्रकार आणि ही घटना नेमकी कशी झाली, कुठे काय चुकलं यासंदर्भातील माहिती यंत्रणांकडून बैठकीमध्ये देण्यात आल्याचं रिजिजू म्हणाले. 

पहलगाम हल्ल्यासंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर 

केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी माध्यमांशी संवाद साधताना केलेल्या वक्तव्यानुसार, ‘तिथं पर्यटक येत होते, नेहमीची कामं सुरू होती. सर्वकाही सुरळीतपणे सुरू होतं आणि या घटनेनं संपूर्ण वातावरण बिघडवलं. सदर प्रकरणी सध्या सर्व राजकीय पक्षांनी आपल्या भूमिका स्पष्ट केल्या. एक गोष्ट समोर आली ती म्हणजे देशानं एकजुटीनं दहशकतवादाविरोधात लढा दिला पाहिजे हीच बाब सर्वांनी स्वीकारली. 

आमच्या अधिकाऱ्यांकडून, गुप्तचर यंत्रणेकडून हल्ल्याची माहिती देत घटना कशी झाली आणि नेमक्या कोणत्या त्रुटींमुळं चूक झाली याचीही माहिती दिली. जिथं हा हल्ला झाला, ही घटना घडली ते ठिकाण मुख्य रस्त्यालगत नसून तिथवर पोहोचण्यासाठी पायी जावं लागतं किंवा घोड्यावरून जावं लागतं. तिथून दोन- अडीच तासांच्या पठारावर ही घटना घडली. सर्वकाही सुरळीत सुरू असतानाही ही घटना एका चुकीमुळं घडली. असा कोणताही प्रकार पुढे होऊ नये आणि यासाठी नेमकी काय व्यवस्था केली आहे यासंदर्भातील माहिती सर्वपक्षीय बैठकीत देण्यात आली’, असं रिजिजू म्हणाले. 

या संघर्षाच्या वेळी सर्व पक्ष आणि संपूर्ण देश एकजुटीनं उभं असून सरकार या संदर्भात जो काही निर्णय घेईल त्याला सर्वांची साथ असेल असा निर्णय या सर्वपक्षीय बैठकीत झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या अटीतटीच्या वेळी एकमेकांशी राजकारण न करता एकजुटीनं राहण्याचा संदेश या बैठकीत देण्यात आल्याचं म्हणत पाकिस्तान आणि दहशतवादी हल्ल्याच्या समर्थकांवर कठोरातील कठोर कारवाई करण्यात येईल असा आश्वासक सूरही त्यांनी आळवला. 

 

दरम्यान, या सर्वपक्षीय बैठकीच्या सुरुवातीलाच पहलगाम हल्ल्यातील मृतांना काही क्षणांचं मौन बाळगून श्रद्धांजली वाहण्यात आली. या बैठकीसाठी केंद्राच्या वतीनं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू, राज्यसभा सदन नेता जे पी नड्डा, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची उपस्थिती पाहायला मिळाली. 





Source link

Chief Minister urges for multiple routes to Navi Mumbai International Airport

0
Chief Minister urges for multiple routes to Navi Mumbai International Airport



Chief Minister urges for multiple routes to Navi Mumbai International Airport | नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बहुपर्यायी मार्गांसाठी मुख्यमंत्री आग्रही; रस्ते, मेट्रो, जलवाहतुकीने विमानतळ जोडण्याच्या सिडकोला सूचना





Source link

नोकरीची संधी : शिक्षकांची रिक्त पदे

0
नोकरीची संधी : शिक्षकांची रिक्त पदे



● नेव्ही चिल्ड्रन स्कूल, कुलाबा, मुंबई – ४००००५. (नेव्ही एज्युकेशन सोसायटी अंतर्गत CBSE बोर्डाशी संलग्न शाळा) पुढील रिक्त पदांची भरती –

( I) प्रायमरी टीचर (पीआरटी) –

(अ) पीआरटी (जनरल आणि हिंदी)-

पात्रता – पदवी किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि बी.एड./ D. EI. Ed किंवा समतुल्य कोर्स किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण.

(ब) पीआरटी (कॉम्प्युटर सायन्स) –

पात्रता – संबंधित विषयातील पदवी/बी.सी.ए. किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण. (बी.एड. पात्रताधारक उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल.)

( II) ट्रेन्ड ग्रॅज्युएट टीचर (टीजीटी) –

(अ) टीजीटी (समाजशास्त्र, इंग्लिश आणि गणित) –

पात्रता – ( i) संबंधित विषयातील पदवी किमान ५५ टक्के गुणांसह उत्तीर्ण. ( ii) बी.एड. किंवा समतुल्य पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण. ( iii) १२ वीच्या स्तरावरदेखील संबंधित विषय अभ्यासलेला असावा. ( iv) संबंधित विषयातील मास्टर्स डिग्री असल्यास आणि/किंवा सीबीएसई शाळांमध्ये शिकविण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य.

(ब) टीजीटी (कॉम्प्युटर सायन्स) –

पात्रता – संबंधित विषयातील पदवी/बी.सी.ए. किमान ५५ टक्के गुण (बी.एड. पात्रताधारक उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल).

(क) TGT (फिनान्शियल लिटरसी आणि मार्केट मॅनेजमेंट) –

पात्रता – पदवी आणि एनएसई सर्टिफिकेट इन फिनान्शियल मार्केट्स ( NCFM) ३ मॉड्युल्ससह किमान ६० टक्के गुण.

( III) पोस्ट ग्रॅज्युएट टीचर (पीजीटी)-

(अ) पीजीटी (कॉमर्स, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, पॉलिटिकल सायन्स, इंग्लिश आणि मॅथ्स) (इयत्ता ११ वी व १२ वीसाठी) –

पात्रता – ( i) संबंधित विषयातील मास्टर्स डिग्री किमान ५५ टक्के गुण. ( ii) संबंधित विषयातील बी.एड.पदवी किंवा समतुल्य पदवी किमान५० टक्के गुण. ( iii) संबंधित विषय उमेदवाराने १२ वी आणि पदवीस्तरावर अभ्यासलेला असावा. ( iv) संबंधित विषय सीबीएसई शाळांमध्ये शिकविण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य.

वयोमर्यादा – (दि. १ जुलै २०२५ रोजी) २१ ते ५० वर्षे.

उमेदवाराकडे चांगले व्यक्तिमत्त्व, उत्कृष्ट संभाषण कौशल्ये आणि हिंदीमध्ये संवाद साधण्याची क्षमता असावी. संगणक आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल्स/ईआरपी सॉफ्टवेअर/एलएमएस पॅकेजेस यांचे कार्यक्षम ज्ञान आणि मायक्रोसॉफ्ट ऑफिस सॉफ्टवेअरमध्ये पारंगत असावा.

उमेदवार शारीरिक आणि वैद्याकीयदृष्ट्या योग्य असावा. उमेदवाराकडे उच्च नैतिक चारित्र्य असावे.

विहीत नमुन्यातील अर्ज www. ncsmumbai. nesnavy. in या संकेतस्थळावरून डाऊनलोड करून पूर्ण भरलेले अर्ज आवश्यक त्या स्वयंसाक्षांकीत कागदपत्रांसह रजिस्टर्ड पोस्टाने किंवा स्पीड पोस्टाने एनसीएस, मुंबई येथे अर्जावर दिलेल्या पत्त्यावर दि. २१ मे २०२५ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.

suhaspatil237 @gmail. com



Source link

‘पीएमपी’ची माण, चऱ्होलीत ई-बस स्थानके

0
‘पीएमपी’ची माण, चऱ्होलीत ई-बस स्थानके



पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बस स्थानकांमध्ये चऱ्होली आणि माण येथे नवीन ई- बस स्थानके सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे हिंजवडी येथील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचारी आणि हवाई प्रवाशांना या दोन बस स्थानकांचा फायदा होणार आहे. आज (२५ एप्रिल) दुपारी साडेचार वाजता दोन्ही बस स्थानकांचे उद्घाटन उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.

शहरी वाहतुकीचे आधुनिकीकरण करण्यासाठी ‘पीएमपी’ प्रशासनाने चऱ्होली आणि माण या ठिकाणी दोन ई-बस स्थानक उभारण्याचे नियोजन केले. चऱ्होली येथे ६० बस धावणार आहेत. या ई-स्थानकांमुळे आळंदी, विश्रांतवाडी, लोहगाव, वाघोली परिसरातील प्रवाशांना सेवा मिळणार आहे. हवाई प्रवाशांना विमानतळावर जाण्यासाठी सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. माण येथून ३२ बसचे नियोजन करण्यात आले आहे.

वेगाने वाढणाऱ्या उपनगरीय क्षेत्रांमध्ये सेवा कार्यक्षमतेत सुधारणा करणे आणि सुलभ दळणवळण यंत्रणा सुरू करण्याच्या उद्देशाने या ई-बस स्थानकांचा उपयोग होणार असल्याचे ‘पीएमपी’ प्रशासनाकडून सांगण्यात आले.

आता नऊ ई-बस स्थानके

‘पीएमपी’ची हिंजवडी, कात्रज, बाणेर-सूस रस्ता, भोसरी, पुलगेट, डेक्कन जिमखाना आणि हिंजवडी फेज २ या सात ठिकाणी ई बस स्थानके आहेत. त्यामध्ये चऱ्होली आणि माण येथील या दोन स्थानकांची भर पडणार आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांसह पीएमआरडीएच्या हद्दीत ‘पीएमपी’ची सेवा सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येत आहेत. नवीन ई-बस स्थानकांमुळे प्रवाशांना सुलभ सेवा उपलब्ध होणार आहे. दीपा मुधोळ-मुंडे, व्यवस्थापकीय संचालक तथा अध्यक्ष, पीएमपीएमएल



Source link

Regarding the admission process in agricultural universities Career news

0
Regarding the admission process in agricultural universities Career news


या लेखमालिकेत आपण वेगवेगळ्या शाखा व त्यामधील संधी याबाबत आपण पाहत आहोत. परंतु आता एप्रिल व मे महिन्यात राज्य सामायिक परीक्षा मंडळाकडून विविध प्रवेश परीक्षा घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. आता ज्या विद्यार्थ्यांना मेडिकल किंवा इंजिनीअरिंग या शाखेत प्रवेश निश्चित करायचा आहे. त्यांनी प्रवेश प्रक्रियेबद्दल माहिती घेण्यास तसेच कॉलेज निवडण्यास सुरुवात केली आहे. परंतु या व्यतिरिक्त कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रियेविषयीची माहिती आपण या लेखात पाहू.

● कृषी शिक्षण प्रवेश प्रक्रिया

कृषी शिक्षणाची केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया ही प्रामुख्याने महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणे व राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष यांच्यामार्फत चालू होते.

प्रवेश पात्रता

बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थी यासाठी पात्र आहे. पीसीबी किंवा पीसीएम हे दोन्ही ग्रुप यासाठी पात्र आहेत. तसेच कृषी सामायिक प्रवेश परीक्षा देणे बंधनकारक आहे. यातील गुणांवर प्रवेश ठरविला जातो. याचबरोबर नीट आणि जेईई या प्रवेश परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यालाही पात्र ठरविले जाते.

● कृषी विद्यापीठे

महाराष्ट्रात चार कृषी विद्यापीठे असून, यामध्ये प्रवेश प्रक्रियेसाठी एकच वेळापत्रक राज्य सामायिक परीक्षा मंडळातर्फे देण्यात येते.

● महात्मा फुले कृषी विद्यापीठ

● डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ

● वसंतराव नाईक मराठवाडा ● कृषी विद्यापीठ

● डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ

● महाराष्ट्रातील कृषी महाविद्यालये

महाराष्ट्रातील चार कृषी विद्यापीठांतर्गत शासकीय व १५५ खासगी महाविद्यालय आहेत. या सर्व महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया एकाच वेळी चालू असते.

● शासकीय शिष्यवृत्ती व वसतीगृह निर्वाह भत्ता

वरील सर्व शासकीय व खासगी विनाअनुदानित महाविद्यालयात शासन नियमानुसार शिष्यवृत्ती व वस्तीगृह निर्वाह भत्ता अदा केला जाते. तसेच प्रत्येक महाविद्यालयाचे वार्षिक शुल्क हे शुल्क नियामक मंडळ, महाराष्ट्र यांनी ठरवून दिलेली आहे. प्रवेश घेताना माहितीपुस्तकेत प्रत्येक महाविद्यालयाच्या समोर हे शुल्क दर्शविले जाते.

● शासकीय आरक्षण

शासनाने वेळोवेळी विहित केलेले सर्व आरक्षण मर्यादा या प्रवेशावेळी राज्य सामायिक प्रवेश मंडळातर्फे लागू केल्या जातात.

● कृषी शिक्षणातील शाखा

● कृषी विज्ञान (ऑनर्स)

● उद्यान विद्या

● कृषी वनविद्या

● बी. एफ. एस. सी.

● कृषी अभियांत्रिकी

● कृषी अन्नतंत्रज्ञान

● बी. एस. सी. सामुदायिक विज्ञान

● जैवतंत्रज्ञान

● कृषी व्यवसाय व्यवस्थापन

वरील प्रत्येक शाखेचे प्रवेश एकाच वेळी केले जातात. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील प्रवेशाचे नियोजन अगोदर करणे गरजेचे आहे.

भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली व इतर राज्यातील उमेदवारांसाठी असलेल्या राखीव जागा वगळता उर्वरित जागांपैकी प्रथम ३० टक्के जागा महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांसाठी खुल्या असतील आणि नंतर ७० टक्के जागा या उमेदवार ज्या विद्यापीठ कार्यक्षेत्रामधील महाविद्यालय / शाळा / संस्था येथून अर्हता परीक्षा उत्तीर्ण झाला असेल अशा उमेदवारांसाठी असतील. विनाअनुदानित महाविद्यालयांमधील जागांचे वाटप खालील प्रमाणे असेल.

अ) प्रवेश क्षमतेच्या २० जागा संस्थास्तरीय कोटा.

ब) प्रवेश क्षमतेच्या उर्वरित ८० टक्के जागा शासकीय नियमानुसार.

अल्पसंख्यांक संस्थांच्या महाविद्यालयातील ५१ जागा संबंधित अल्पसंख्यांकाकरिता आरक्षित असतील आणि उर्वरित ४९ जागांचे वरील प्रमाणे ३० महाराष्ट्र कोटा आणि ७० विद्यापीठ कोटा याप्रमाणे वाटप करण्यात येईल.सध्या देशात ५३ कृषी विद्यापीठे आहेत. ५ अभिमत विद्यापीठे कृषीचे शिक्षण देत आहेत. ४ केंद्रीय विद्यापीठे आहेत. महाराष्ट्रात ४७ शासकीय महाविद्यालये व १५५ खासगी महाविद्यालय कृषी शिक्षणाची धुरा सांभाळत आहेत. या सर्वांमधून बाहेर पडणारा विद्यार्थी आधुनिक शेतीमध्ये हातभार लावत आहे.

● शासकीय महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी किती गुणांची टक्केवारी असावी.

● खासगी महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी किती गुणाची टक्केवारी असावी

● प्रवेश प्रक्रियेतील वेगवेगळ्या प्रवेश फेरीचे नियोजन कसे करावे.

● प्रवेश अर्ज कसा भरावा.

● विविध विषयांचे भारांकन कसे ग्राह्य धरले जाते या सर्व बाबींची आपण पुढील लेखात माहिती घेऊ.

sachinhort. shinde@gmail. Com





Source link