Thursday, July 23, 2026
Home Blog Page 362

‘देशाला आज इंदिरा गांधींची उणीव भासतेय’; संजय राऊतांचा ‘पहलगाम’वरून केंद्र सरकारवर निशाणा

0
‘देशाला आज इंदिरा गांधींची उणीव भासतेय’; संजय राऊतांचा  ‘पहलगाम’वरून केंद्र सरकारवर निशाणा


जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशाचा संताप उफाळून आला आहे. संपूर्ण पाकिस्तान देशातून या हल्ल्याचा सूड घेण्याची भावना व्यक्त केली जात आहे. केंद्र सरकारही पाकिस्तानविरोधात कठोर निर्णय घेत आहे. पण या प्रकरणामुळे आता राजकारणही तापले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.



Source link

हिंदू कधीही धर्म विचारून मारत नाहीत, शक्ती आहे तर दाखवावी लागेल; ‘पहलगाम’बाबत मोहन भागवतांचं मोठं विधान

0
हिंदू कधीही धर्म विचारून मारत नाहीत, शक्ती आहे तर दाखवावी लागेल; ‘पहलगाम’बाबत  मोहन  भागवतांचं मोठं विधान


Mohan Bhagwat On pahalgam attack : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, सध्याचा संघर्ष हा केवळ कोणत्याही संप्रदाय किंवा धर्माच्या नावावर नसून धर्म आणि अधर्म यांच्यात आहे. धर्माच्या आधारे लोकांची हत्या करणारे धर्मांध असून असे वर्तन हे राक्षसी प्रवृत्तीचे लक्षण आहे, असेही ते म्हणाले. दहशतवादाविरोधात कारवाई करण्यावर भर देताना संघप्रमुख म्हणाले, ‘आमच्यात ताकद असेल तर ती दाखवावी लागेल.



Source link

Explained: काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांबद्दल शिंदेंचे खासदार नरेश म्हस्के नेमकं काय म्हणाले? का होतेय त्यांच्यावर टीका?

0
Explained: काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांबद्दल शिंदेंचे खासदार नरेश म्हस्के नेमकं काय म्हणाले? का होतेय त्यांच्यावर टीका?


Politics on Pahalgam Terrorist Attack: काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या 27 पर्यटकांपैकी 6 पर्यटक महाराष्ट्रातील आहेत. डोंबिवलीमधील 3, पुण्यातील 2 आणि पनवेलमधील एका पर्यटकाने या हल्ल्यात प्राण गमावले आहेत. काश्मीरमध्ये अडकून पडलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांची घरी परत येण्यासाठी धडपड सुरु असतानाच सत्ताधाऱ्यांमध्ये श्रेयवादासाठी चढाओढ सुरु असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. असं असतानाच सध्या श्रीनगरमध्ये असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या पक्षाचे ठाणे मतदारसंघाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केलेल्या एका विधानामुळे नवीन वादाला तोंड फुटलं आहे. म्हस्के यांनी उपमुख्यमंत्री शिंदेंच्या कामाचं कौतुक करताना नेमकं असं काय म्हटलं आहे त्यामुळे वाद निर्माण झाला आहे पाहूयात…

एकाच वेळी दोन-दोन मंत्री काश्मीरमध्ये

पहलगाम हल्ल्यात राज्यातील सहा पर्यटक ठार झाले. काश्मीरच्या विविध भागांत अडकलेल्या पर्यटकांना माघारी आणण्यासाठी सरकारने मोहीम हाती घेतली आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि राज्यातील मंत्री गिरीश महाजन यांना स्वत: मुख्यमंत्र्‍यानी तातडीने काश्मीरला पाठविले. असे असताना त्याच दिवशी रात्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विशेष विमानाने काश्मीरला गेले. यानंतर दोन्ही पक्षांकडून मदतीसंदर्भात वेगवेगळे दावे केले जात आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनामध्ये 500 पर्यटकांना परत आणण्यात आल्याचं म्हटलं आहे. तर दुसरीकडे विशेष विमानांद्वारे एकूण 520 पर्यटकांना मुंबईत परत आणल्याचा दावा शिंदेंच्या शिवसेनेनं केला आहे. 

शिंदेंनी काश्मीरला जाण्याच्या निर्णयाचं म्हस्केंकडून समर्थन

एकनाथ शिंदेंनी काश्मीरमध्ये जाण्याच्या निर्णयाचं समर्थन करताना खासदार म्हस्केंनी गुरुवारी प्रसारमाध्यमांसमोर काही आकडेवारी मांडली. “सरकार जबाबदारी समजून मदत करत आहे.  घेऊन शिवसेनेतर्फे, एकनाथ शिंदेंतर्फे पाठवण्यात आलेलं विमान काल ज्येष्ठ नागरिक, महिलांचा समावेश असलेलं 75 पर्यटकांना घेऊन पोहोचलं. आता दुपारी 185 प्रवासी घेऊन एक विमान येणार आहे. रात्री सुद्धा 185 प्रवासी असलेलं विमान येणार आहे,” असं म्हस्के पत्रकारांना माहिती देताना म्हणाले.

याच विधानामुळे झाला वाद; म्हस्के नेमकं काय म्हणाले?

पुढे बोलताना म्हस्केंनी, “तुम्हाला माहित आहे का? त्यामध्ये 45 प्रवासी असे आहेत जे वर्धा आणि नागपूरचे आहेत. ते रेल्वेने त्या ठिकाणी गेले होते. अतिशय वाईट परिस्थिती आहे. सीआरपीएफच्या कॅम्पमध्ये राहत होते. हे असे 45 लोक आहेत जे कधीही विमानात बसले नव्हते. त्या लोकांना विमानाने आणण्याची व्यवस्था एकनाथ शिंदेंनी केलेली आहे. तुम्हाला मिर्चा झोंबतात? काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाल्यानंतर पाकिस्तान आणि आयएसआयचं नरेटीव्ह चालवण्याचं काम संजय राऊतांनी केलं,” असं विधानही केलं. या विधानावरुनच आता म्हस्केंवर टीका केली जात आहे. 

उठली टीकेची झोड

जे लोक कधीही विमानात बसले नाहीत. त्यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विमानात बसवून आणले, असे वक्तव्य करणाऱ्या महस्के यांना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी फटकारलं आहे. “विमानातून परत आणले म्हणजे काय लोकांवर उपकार केले का? असा संतप्त सवाल अंधारेनी विचारला आहे. सर्व स्तरातून म्हस्केंवर टीका होताना दिसत आहे. काळ, वेळ काय आहे आणि खासदार असणारी व्यक्ती कोणत्या गोष्टींवर बोलतेय याचं भान असायला हवं अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडूनही व्यक्त केली जात आहे. 

लोकांच्या टॅक्समधले पैसे; घरचा पैसा नाही

दहशतवादी हल्ल्यासारख्या गंभीर विषयात महाराष्ट्रात दुर्दैवाने श्रेयवादाची लढाई सुरू आहे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी नरेश म्हस्केंच्या विधानाचा सामाचार घेतला आहे. “सगळ्यांनी एकत्र येऊन या परिस्थितीला सामोरे गेले पाहिजे. मात्र खासदार नरेश म्हस्के यांच्या वक्तव्याचा निषेध केलाच पाहिजे. ही उपकाराची भाषा महाराष्ट्रातली जनता खपवून घेणार नाही,” असं रोहिणी खडसे म्हणाल्या. “एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदावर बसवून महाराष्ट्रातील जनतेने उपकार केले आहेत. असे वक्तव्याने जनता तुम्हाला खुर्ची सोडायला भाग पाडतील हे विसरू नका,” असा इशाराही रोहिणी खडसेंनी दिला. “लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा देत आहात, घरून पैसे भरले नाहीत,” असा घणाघातही रोहिणी खडसेंनी केला. 





Source link

Viral Video : seller struggle to give his customer water bottle

0
Viral Video : seller struggle to give his customer water bottle



Viral Video : seller struggle to give his customer water bottle | ‘ज्याच्या वाट्याला संघर्ष येतो ना तोच माणूस…’ फेरीवाल्याची तारेवरची कसरत पाहून तुमच्याही डोळ्यांतून येईल पाणी





Source link

पहलगाम हल्ल्यानंतर परतलेल्या पर्यटकांसाठी एसटीची शिवनेरी धावली!

0
पहलगाम हल्ल्यानंतर परतलेल्या पर्यटकांसाठी एसटीची शिवनेरी धावली!



in mumbai st mahamandal shivneri buses to drop pahalgam tourists at their hometowns पहलगाम हल्ल्यानंतर परतलेल्या पर्यटकांसाठी एसटीची शिवनेरी धावली!





Source link

धक्कादायक! मद्यधुंद अवस्थेत असणार्‍या पोलीस चालकाने घराबाहेर झोपलेल्या व्यक्तीला चिरडलं

0


Satara Crime News : साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यात असणाऱ्या सर्कलवाडी येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे.  यात आज (25 एप्रिल) पहाटेच्या सुमारास भरधाव वेगात आलेल्या पोलिसाच्या कारने रस्ता लगत एका घराच्या समोर झोपलेल्या व्यक्तीला उडवले (Crime News) आहे. यामध्ये त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. रमेश लक्ष्मण सपकाळ असे या मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या घटनेतील संबंधित पोलीस हा मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे. सर्कलवाडीचे ग्रामस्थ सध्या वाठार स्टेशन येथील पोलीस ठाण्यात दाखल झाले असून संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. 

बार्शी ड्रग्स प्रकरणात आणखी तिघांचा समावेश, आरोपींची संख्या पोहोचली 12 वर 

बार्शीतल्या ड्रग्स प्रकरणाची व्याप्ती वाढताना पाहायला मिळतेय. या प्रकरणी आधीच 9 आरोपीचें नावे निष्पन्न असताना पोलिसांनी आणखी तिघांना आरोपी केलंय. यामध्ये परांडा येथील मस्तान शेखसह साजिद मुजावर आणि शेळके नावाच्या व्यक्तीला आरोपी म्हणून सहभागी करण्यात आलंय. मात्र हे तिघे आरोपी अद्याप फरार आहेत. 18 एप्रिल रोजी बार्शीत 20 ग्राम एमडी ड्रग्ससह पोलीसांनी तिघांना अटक केली होती. त्यानंतर या संपूर्ण ड्रग्स रॅकेटचा भांडफोड पोलिसांनी केलाय.  

आतापर्यंतची करवाई पाहता बार्शी ड्रग्ज तस्करीत एकूण 12 आरोपी निष्पन्न झाले आहेत. त्यातील 9 आरोपी हे धाराशिव जिल्ह्यातल्या परांडा येथील तर तिघे बार्शी येथील आहेत. या 12 आरोपी पैकी 7 जण पोलिस कोठडीत असून तिघे फरार आहेत. परंडा येथील दीपक काळे आणि खांडवी येथील अय्याज शौकत शेख या 2 जणांना पोलिसांनी कालच अटक केली असून त्यांना आज 25 एप्रिल रोजी कोर्टात हजर केले जाऊ शकते.

हे आहेत बार्शी ड्रग्स प्रकरणातील आरोपी

परंडा येथील असद हसन देहलुज, मेहफुज महंमद शेख, वसिम इसाक बेग, जावेद नवाबमुद्दीन मुजावर,हसन चाऊस, दीपक काळे, साजिद चाँद मुजावर, फिरोज उर्फ मस्तान रसूल शेख आणि शेळके नावाच्या अश्या 9 जणांना आरोपी केली आहे. त्यातील मुजावर, शेख व शेळके हे फरार आहेत. बार्शी येथील अय्याज शौकत शेख, जमीर अन्सार पटेल आणि सरफराज उर्फ गोल्डी अस्लम शेख हे 3 आरोपी बार्शी येथील आहेत. 20 ग्रॅम वजनाचे 10 पुड्यासह पोलिसांनी 18 एप्रिल रोजी 3 जणांना अटक केली होती त्यानंतर तस्करीचा भांडाफोड झाला.

इतर महत्वाच्या बातम्या 

 

अधिक पाहा..



Source link

महानंदच्या प्रकल्पामुळे आरोग्यास धोका! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाईचे पाऊल

0
महानंदच्या प्रकल्पामुळे आरोग्यास धोका! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाईचे पाऊल



in pune mahanand milk powder project pollution at varvand daund taluka pune महानंदच्या प्रकल्पामुळे आरोग्यास धोका! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून कारवाईचे पाऊल





Source link

gyms will get grant of 14 lakh rupees from state government in wardha

0
gyms will get grant of 14 lakh rupees from state government in wardha



gyms will get grant of 14 lakh rupees from state government in wardha | ग्रामीण भागातही आता सुदृढ युवक दिसणार, व्यायाम शाळेस भरघोस अनुदान लागू





Source link

Girls dance on Rangnang Rangnang Halgi Vajati marathi song video viral on social media trending news

0
Girls dance on Rangnang Rangnang Halgi Vajati marathi song video viral on social media trending news



Girls dance on Rangnang Rangnang Halgi Vajati marathi song video viral on social media trending news | याला म्हणतात लावणीचा ठसका; मराठी मुलींचा हलगीच्या तालावर जबरदस्त डान्स, VIDEO पाहून सगळेच झाले फॅन





Source link

भारतीय जवानाला पाकिस्तानी रेंजर्सने बॉर्डरवर पकडलं! डोळ्यांवर पट्टी बांधून…

0
भारतीय जवानाला पाकिस्तानी रेंजर्सने बॉर्डरवर पकडलं! डोळ्यांवर पट्टी बांधून…


Indian BSF Jawan Detained By Pakistani Rangers: जम्मू आणि काश्मीर येथील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी भारतीय पर्यटकांवर केलेल्या बेछूट गोळीबारामध्ये 27 जणांचा मृत्यू झाला आहे. घटनेने सर्वांना हादरवून टाकलं असून वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानदरम्याचे संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. यादरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. यादरम्यान पंजाबमध्ये एक अत्यंत विचित्र घटना घडली आहे. येथील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) एका जवानाने चुकून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडली. चुकून पाकिस्तानच्या सीमाभागात गेलेल्या भारताच्या या बीएएसएफ जवानाला पाकिस्तानी रेंजर्सनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. 

नेमकं घडलं काय?

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना बुधवारी फिरोजपूरजवळ घडली आहे. बीएसएफच्या गणवेशात असलेले कॉन्स्टेबल पीके सिंग अंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून गेले. कॉन्स्टेबल पीके सिंग हे पाकिस्तानच्या सीमेत शिरले तेव्हा त्यांच्या हातात सर्व्हिस रायफल होती. 82 व्या बटालियनमध्ये कॉन्स्टेबल असलेले पीके सिंग हे एका स्थानिक शेतकऱ्यांबरोबर सावली शोधत असताना चुकून सीमेच्या पलीकडे गेल्याची माहिती समोर आली आहे.

पाकिस्तानच्या बाजूने सीमारेषेजवळ गवताच्या कुरणावर काम करत असलेल्या शेतकऱ्यांवर पीके सिंग लक्ष ठेऊन होते. त्यावेळी ते चुकून पाकिस्तानच्या सीमा भागात गेले. या भागात असलेल्या झीरो लाइनजवळ शेतकऱ्यांना विशेष परवानगी घेऊन शेती करण्याची परवानगी दिली जाते. मात्र अशावेळी या शेतकऱ्यांबरोबर बीएसएफचे जवान असतात. या सैनिकांना किसान गार्ड असंही म्हणतात. झिरो लाइनच्या काही अंतर आधी तारा लावलेल्या असतात. मात्र पाकिस्तानने त्यांच्या बाजूने असलेल्या झिरो लाइनवर तारा लावलेल्या नसल्याने पीके सिंग चुकून ही सीमारेषा ओलांडून पलीकडे गेले. 

नक्की वाचा >> ‘बदला घेणार, पण कसा?’ ठाकरेंच्या शिवसेनेचा मोदी-शहांना सवाल; म्हणाले, ‘दुबईत…’

डोळ्यांवर पट्टी बांधलेला फोटो

नो मॅन्स लॅण्ड म्हणजेच दोन्हीकडील कोणत्याही अधिकारी किंवा सैनिकांना प्रवेशाची परवानगी नसलेल्या भागात गेलेल्या पीके सिंग यांना पाकिस्तानी रेंजर्सने ताब्यात घेतलं. पीके सिंग यांच्या डोळ्यांवर पट्टी बांधून त्यांना पाकिस्तानी रेंजर्सने बंधकाप्रमाणे ठेवल्याचे फोटो समोर आले आहेत. 

फ्लॅग मिटींग्स सुरु

त्यांना सुरक्षितपणे परत आणण्यासाठी दोन्ही देशांच्या सीमा दलांमध्ये संवाद सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बीएसएफ जवनाला सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्यासाठी दोन्ही देशांमधील अधिकाऱ्यांमध्ये फ्लॅग मिटींग्स सुरु आहेत. अशाप्रकारे एखाद्या सैनिकाने चुकून सीमा ओलांडून जाणं ही सामान्य बाब आहे.

नक्की वाचा >> महाराष्ट्रात घडू शकते पहलगामसारखी घटना? ‘या’ जिल्ह्यात 700+ पाकिस्तान्यांचं बेकायदेशीर वास्तव्य

यापूर्वीही असं अनेकदा घडलं

यापूर्वीही दोन्ही बाजूने असं घडलं असून अनेकदा अशा सैनिकांना मायदेशी परत पाठवलं जातं, असं अधिकाऱ्यांनी नमूद केलं. मात्र आता पहलगाम प्रकरणानंतर दोन्ही देशांमधील संबंध तापलेले असल्याने पीके सिंग यांची सुटका कधी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.





Source link