Thursday, July 23, 2026
Home Blog Page 360

‘अंबादेवी शैलाश्रय’ भारतातील अश्मयुगीन काळातील सर्वात प्राचीन ज्ञात भित्तीचित्रे!

0
‘अंबादेवी शैलाश्रय’ भारतातील अश्मयुगीन काळातील सर्वात प्राचीन ज्ञात भित्तीचित्रे!



Ambadevi Shailashraya may be the oldest known mural paintings from the Stone Age in India ‘अंबादेवी शैलाश्रय’ भारतातील अश्मयुगीन काळातील सर्वात प्राचीन ज्ञात भित्तीचित्रे!





Source link

उन्नती संस्थेचा शनिवारी दशवार्षिक सोहळा, मिलिंद बोकील यांचे व्याख्यान

0
उन्नती संस्थेचा शनिवारी दशवार्षिक सोहळा, मिलिंद बोकील यांचे व्याख्यान


विदर्भातील आदिवासी भागात शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या उन्नती शिक्षण संस्थेने दहा वर्षे पूर्ण केली असून या निमित्ताने दशवार्षिक सोहळ्याचे आयोजन ठाणे येथे करण्यात आले आहे.



Source link

Maritime security has been put on high alert सागरी सुरक्षेत वाढ

0
Maritime security has been put on high alert सागरी सुरक्षेत वाढ


पालघर: पहलगाम अतिरेकी हल्ल्याच्या पार्श्वभुमीवर पालघर घटकात सागरी सुरक्षा अधिक सतर्क करण्यात आलेली आहे. तसेच सर्व सागरी खाडी पोलीस ठाणे हद्दीतील पोलीस अधिकारी व अमलदार यांना सर्तक राहणेबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत.

पालघर जिल्हा सागरी सुरक्षेकरिता पालघर घटकात एकुण चार नौका आहेत. त्यापैकी एक बोट कार्यरत असुन त्याद्वारे नियमीत सागरीगस्त करण्यात येत आहे. चार बोटींपैकी नादुरुस्त असलेल्या एका बोटीची स्थानिक दुरुस्तीदार यांना वर्क ऑर्डर देण्यात आली असुन त्या बोटीच्या दुरुस्तीचे कामकाज सुरू आहे. तसेच उर्वरीत दोन बोटीचे आधुनिकीकरण (दुरुस्ती) करण्यासाठी 25 मार्च रोजीच्या शासन निर्णयाद्वारे निधी मंजुर असल्याने दुरुस्ती कामाची प्रक्रिया सुरू आहे.

पालघर घटकातील मत्स्यविभाग यांच्याशी समन्वय साधुन दोन ड्रोनव्दारे खाडी किनारी देखरेख (पेट्रालिंग) करण्यात येत असुन त्यावर स्थानिक पोलीस ठाण्याच्या माध्यमातुन निगराणी ठेवण्यात येत आहे. पालघर घटकात आवश्यकतेनुसार खाजगी बोटीद्वारे सागरीगस्त करण्यात येत आहे. तसेच भारतीय तटरक्षक दल, मत्स्यविभाग, महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड, कस्टम व पोलीस दल यांचे कडुन वेळोवळी संयुक्त सागर गस्त राबविण्यात येते. पालघर घटकात लॅन्डिंग पॉईंट, कोस्टल पोस्ट, मर्मस्थळ येथे या सर्व ठिकाणी बंदोबस्त लावला असुन त्यावर बारकाईने निगराणी ठेवण्यात येत आहे.

हेही वाचा

पहलगाम अतिरेकी हल्ल्याच्या अनुषंगाने पालघर घटकातील सर्व सुरक्षा यंत्रना यांना सतर्क राहण्याबाबत बल्क मॅसेज पाठविण्यात आलेला आहे. तसेच सागर रक्षक दल, सुरक्षा रक्षक, स्थानिक मच्छिमार सोसायटी, मच्छिमार यांचे संपर्कात असून काही संयशास्पद आढळुन आल्यास त्यांना तात्काळ पालघर नियंत्रण कक्ष व स्थानिक पोलीस ठाणे येथे कळविण्याबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत.

गस्ती नौकेसाठी प्रशासकीय मान्यतेला विलंब

पालघर पोलिसांनी सागरी गस्तीसाठी डहाणू येथे दोन तसेच सातपाटी व विरार येथे प्रत्येकी एक अशा चार गस्ती नौका भाडेतत्त्वावर घेतल्या होत्या. नोव्हेंबरपासून १०० दिवसांचा करारनामा असल्याने या बोटी २० मार्चपासून कार्यरत नसल्याची माहिती पुढे आली आहे. दुसरीकडे पश्चिम किनारपट्टीवरील पूर्ण हंगामासाठी १ ऑगस्ट ते ३१ मे (अंदाजे २४५ दिवस) या गस्ती नौका भाडेतत्त्वावर घेण्याबाबत प्रस्ताव वरिष्ठ पातळीवर पाठवण्यात आला असला तरी त्याला अजूनही प्रशासकीय मान्यता मिळालेली नाही.

१२० किलोमीटरसाठी फक्त एक नौका

मुंबई व मुंबई उपनगर तसेच पालघर व ठाणे या चार जिल्ह्यांतील सुमारे २७० किलोमीटर लांबीच्या समुद्रकिनाऱ्यावर मासेमारी नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी तसेच बंदर क्षेत्रात देखरेख ठेवण्यासाठी फक्त दोन गस्ती नौका मत्स्य व्यवसाय विभागाकडे आहेत. त्यापैकी १२० किलोमीटर किनारा लाभलेल्या पालघर व ठाणे जिल्ह्यासाठी फक्त एक नौका असून या क्षेत्रात २६ मासेमारी बंदरे कार्यरत आहेत.

मत्स्य विभागाकडून दोन ड्रोनद्वारे खाडीकिनारी देखरेख ठेवण्यात येत असून किनाऱ्यावर बाहेरच्या बोटींची हालचाल आढळल्यास याबाबत त्वरित पोलिसांना कळविण्यात येईल. तसेच याबाबत स्थानिक मच्छीमारांना देखील सूचना देण्यात आल्या असून बाहेरच्या बोटी आढळल्यास सर्वांना सतर्क ठेवण्यात येईल.– राजन मेहेर, सातपाटी मत्स्यविभाग





Source link

पाकिस्तानसोबतचे संबंध तुटल्यानंतर भारतीयांच्या थेट किचनवर होणार परिणाम!

0
पाकिस्तानसोबतचे संबंध तुटल्यानंतर भारतीयांच्या थेट किचनवर होणार परिणाम!


Which Things Will Get Expensive After India-Pakistan Trade : 22 एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानचे संबंध हे खराब होत आहेत. या हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये आलेल्या टुरिस्टवर निशाणा साधत त्यांच्यावर गोळी झाडत हत्या केली. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी 26 टुरिस्टची हत्या केली आणि काही लोकांना दुखापत झाली. या हल्ल्यानंतर पाकिस्तान विरोधात भारत सरकारनं अनेक मोठे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे आता भारत आणि पाकिस्तानच्या बाजारपेठेवर या सगळ्याचा परिणाम पाहायला मिळणार आहे. जर आपले संपूर्ण संबंध संपले तर कोणत्या गोष्टी या महागणार याविषयी जाणून घेऊया.

परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानसोबतचा सिंधू जल करार स्थगित करण्यात आला आहे. त्यासोबत भारत सरकारनं पाकिस्तानच्या रहिवाशांसाठी असलेल्या सार्क व्हीजाला देखील पूर्णपणे रद्द केलं आहे. तर सरकारनं पाकिस्तानचे जे नागरिक हे SVES व्हीजाच्या अंतर्गत आता भारतात आहेत, त्यांना 48 तासात देश सोडण्याचे आवाहन दिले. त्याशिवाय भारतानं पाकिस्तानच्या ऑफिशियल एक्स अकाऊंटला देखील बॅन केलं आहे. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानचे सगळे संबंध हे संपत आले आहेत. सरकारनं घेतलेल्या या मोठ्या निर्णयांनंतर भारत आणि पाकिस्तानच्या सगळ्या व्यापारांवर त्याचा परिणाम पाहायला मिळणार आहे. भारत-पाकिस्तानमधील नातं खराब होत असताना भारतात अनेक गोष्टी महाग होण्याची शक्यता आहे. 

ड्रायफ्रुट्स

भारत पाकिस्तानकडून मोठ्या प्रमाणात ड्रायफ्रुट्स खरेदी करतो. ड्रायफ्रुट्सची मागणी भारतीय बाजारात खूप जास्त आहे. अशात पाकिस्तानसोबत व्यापारी संबंधांवर परिणाम झाल्यानं भारतात ड्रायफ्रुट्सच्या किंमतीवर बदल होण्याची शक्यता आहे. याचा अर्थ ड्रायफ्रुट्स हे महाग होण्याची शक्यता आहे. 

सेंधव मीठ

त्याशिवाय पाकिस्तानमधून भारतात मोठ्या प्रमाणात सेंधव मीठ खरेदी करण्यात येतं. भारतात येणार सेंधव मीठ हे पूर्णपणे पाकिस्तानमधून येतं. त्याचं कारण म्हणजे पाकिस्तान त्या देशांपैकी एक आहे जिथे सगळ्यात जास्त सेंधव मीठाचं उत्पादन करण्यात येतं. त्यामुळे भारतात मीठाची किंमत वाढण्याची शक्यता आहे. 

ऑप्टिकल लेन्स

भारतात वापरण्यात येणाऱ्या चष्मांची ऑप्टिकल लेन्स ही पाकिस्तानमधून खरेदी करण्यात येते. इथे बनवण्यात येणाऱ्या ऑप्टिकल्सची भारतीय बाजारात खूप मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आता सरकारच्या निर्णयानंतर ऑप्टिकल लेन्स देखील महागण्याची शक्यता आहे. 

हेही वाचा : 90 कोटींचं बजेट सलमानच्या ‘या’ चित्रपटाचं पहलगाममध्ये झालं शूटिंग; कश्मीरमध्ये बनवलं ‘खोटं’ पाकिस्तान

त्यासोबत पाकिस्तानमधून भारतात फळं, सीमेंट, मुलतानी माती, कॉटन, स्टील आणि चामड्याच्या सामानाची आयात करण्याक येते. भारत पाकिस्तानमधून मोठ्या प्रमाणात अनेक गोष्टींची आयात करतो. त्यामुळे आता जवळपास सगळ्याच गोष्टी या महागण्याची शक्यता आहे. 





Source link

ट्रेनमध्ये किती टनचा AC असतो? दररोज प्रवास करणाऱ्या 99% लोकांना कल्पनाच नाही

0
ट्रेनमध्ये किती टनचा AC असतो? दररोज प्रवास करणाऱ्या 99% लोकांना कल्पनाच नाही


भारतीय रेल्वे ही आपल्या देशातील लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी सर्वात किफायतशीर आणि आरामदायी पद्धत आहे. उन्हाळ्याच्या हंगामात किंवा दमट परिस्थितीत, प्रवाशांना ट्रेनच्या एसी कोचमध्ये आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळतो. ट्रेनच्या एसी डब्यांमध्ये थंडावा असल्याने प्रवाशांना प्रवासादरम्यान जास्त त्रास सहन करावा लागत नाही. त्याच वेळी, संपूर्ण ट्रेन डबा थंड ठेवण्यासाठी बसवलेल्या एअर कंडिशनरचे (एसी) वजन किती टन असते हे तुम्हाला माहिती आहे का? हा एक असा प्रश्न आहे जो खूप कमी लोकांना माहिती आहे.

एसीची क्षमता ‘टन’ मध्ये मोजण्याचा अर्थ काय?

एसीची क्षमता मोजण्यासाठी वापरले जाणारे ‘टन’ हे एकक वजनाचे मोजमाप नाही तर ते त्याची थंड करण्याची क्षमता दर्शवते. एक टन थंड होण्याचा अर्थ असा होता की एक प्रणाली 24 तासांत एक टन (सुमारे १००० किलो) बर्फ वितळवण्याइतकी उष्णता काढून टाकू शकते. आधुनिक भाषेत सांगायचे तर, 1 टन क्षमतेचा एसी एका खोलीतून सुमारे 12000 ब्रिटिश थर्मल युनिट्स (BTU) प्रति तास या वेगाने उष्णता काढून टाकू शकतो. सोप्या भाषेत सांगायचे तर, एसीचे टनेज जितके जास्त असेल तितकी त्याची कूलिंग क्षमता जास्त असेल.

ट्रेनच्या एसी कोचमध्ये किती टन एसी बसवलेला असतो?

आता आपण मुख्य प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया. ट्रेनमधील एसी कोच थंड ठेवण्यासाठी, सामान्य घरांमध्ये बसवलेल्या एसींपेक्षा खूप जास्त क्षमतेचे युनिट आवश्यक असते. भारतीय रेल्वेच्या एसी कोचमध्ये बसवल्या जाणाऱ्या एअर कंडिशनरची क्षमता साधारणपणे 7 ते 8 टन असते.

प्रवाशांच्या संख्येवर एसीची क्षमता कशी अवलंबून असते?

ही एसी क्षमता प्रामुख्याने डब्यातील प्रवाशांची संख्या आणि त्या कोचच्या प्रकारावर अवलंबून असते. कारण प्रवाशांची संख्या थेट कोचच्या कूलिंग लोडवर परिणाम करते.
एसी फर्स्ट क्लास: यात सर्वात कमी प्रवासी असतात. म्हणून त्यात ६.७ टन एसी आहे.
एसी 2-टायर: यामध्ये प्रथम श्रेणीपेक्षा थोडे जास्त प्रवासी वाहून नेतात. त्यात दोन 5 टन एसी आहेत.
एसी 3-टायर: यात सर्वाधिक प्रवासी वाहून जातात. त्यात 7 टनांचे दोन एसी आहेत.

एसी फर्स्ट क्लास किंवा 2-टायरपेक्षा एसी थ्री-टायरमधील प्रवाशांची संख्या खूपच जास्त असल्याने, त्यांना प्रभावीपणे थंड ठेवण्यासाठी थोडी जास्त कूलिंग क्षमता आवश्यक असू शकते. म्हणूनच कोचच्या प्रकारानुसार आणि त्यात बसलेल्या प्रवाशांच्या कमाल संख्येनुसार एसीची क्षमता बदलू शकते, जेणेकरून सर्व प्रवाशांना पुरेसा थंडावा मिळेल.





Source link

Raj Thackeray and Uddhav Thackeray Sister kirti phatak reaction on likely reunite | “आज बाळासाहेब असते तर…”, राज ठाकरे

0
Raj Thackeray and Uddhav Thackeray Sister kirti phatak reaction on likely reunite | “आज बाळासाहेब असते तर…”, राज ठाकरे



Raj Thackeray and Uddhav Thackeray Sister kirti phatak reaction on likely reunite | “आज बाळासाहेब असते तर…”, राज ठाकरे – उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर आतेबहि‍ण किर्ती फाटक म्हणाल्या…





Source link

शिरुरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात ज्येष्ठ महिलेचा मृत्यू

0
शिरुरमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात ज्येष्ठ महिलेचा मृत्यू



लोकसत्ता वार्ताहर

शिरूर : शिरुर येथील इनाम गावातील नलगेमळ्यात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात घराच्या बाहेर ओट्यावर झोपलेल्या ९० वर्षांच्या ज्येष्ठ महिलेचा मृत्यू झाला. शुक्रवारी पहाटे ही घटना घडली.

लक्ष्मीबाई बबन भोईटे असे मृत्युमुखी पडलेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. त्या घराच्या ओट्यावर झोपल्या होत्या. पहाटे बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. लक्ष्मीबाई यांनी आरडाओरडा केल्यानंतर त्यांच्या मुलाने खिडकीतून डोकावून पाहिले असता बिबट्या त्यांच्या आईला घेऊन उसाच्या शेतात गेल्याचे दिसले. स्थानिक ग्रामस्थांचा मदतीने ज्येष्ठ महिलेचा शोध घेण्यात आला. शेतात त्या मृतावस्थेत आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले.

गेल्या काही दिवसापासून नलगेमळा येथे बिबट्याचा वावर वाढला आहे. वन विभागाचा वतीने या भागात बिबटे जेरबंद करण्यासाठी ५ पिंजरे लावण्यात आले आहेत. सहाय्यक वनसरंक्षक स्मिता राजहंस आणि तालुका वनपरीक्षेत्र आधिकारी निळकंठ गव्हाणे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केल्याचे वनखात्याचे भानुदास शिंदे यांनी सांगितले.

गेल्या वर्षभरात बिबट्यांचा हल्ल्यात तीन लहान मुलांना प्राण गमवावे लागले आहे . १९ ऑक्टोबर २०२४ रोजी वंश सिंग, १५ नोव्हेंबर २०२४ रोजी टेभेकर वस्ती येथील शिवतेज टेंभेकर आणि २४ डिंसेबर २०२४ रोजी रक्षा निकम या चिमुकल्यांना प्राण गमवावे लागले आहेत. श्वान, शेळ्या, मेंढ्या यांच्यावर बिबट्यांकडून सातत्याने हल्ले होत आहेत. हल्ले झाल्यावर बिबट्यांना पकडण्यासाठी पिंजरे लावणे, गस्त यांसारखे उपाय काही दिवस केले जातात. बिबट्यांचा हल्ल्याने नागरिक भयभीत झाल्याने या भागातील शेतीसह दैनंदिन कामावरही परिणाम झाला असल्याचे स्थानिक नागरिकांकडून सांगण्यात आले.

जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव आणि खेड या भागात काही वर्षापासून बिबट्यांचा वावर होता. आता शिरूर तालुक्यातही वावर सुरू झाला आहे. पूर्वी शिरूर तालुक्यातील जांबूत, पिंपरखेड, टाकळी हाजी, फाकटे, कवठे येमाई या बेट परिसरात बिबट्याचा वावर होता. आता मांडवगण फराटा, वडगाव रासाई, पिंपळसुटी, इनामगाव, न्हावरा या पूर्व भागात ही मोठ्या प्रमाणावर बिबटे आढळून येत आहेत.

शिरूर तालुक्यात डिंभा आणि चासकमान कालव्याचे पाणी, विविध नद्यांमुळे बागायती क्षेत्र वाढले आहे. तसेच उसाचे पीक मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. ऊस क्षेत्र हे बिबट्याचा वास्तव्यासाठी अनुकूल ठरत आहे. या परिसरात बिबट्यांची संख्या वाढली असून भक्ष्य न मिळाल्यास बिबट्या हे मानवी वस्तीकडे येऊ लागले आहेत. यामुळे बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.



Source link

महात्मा गांधींही स्वत:ला ‘इंग्रजांचा सेवक’ लिहित असत, SC ने राहुल गांधींना करून दिली आठवण; पाहा, असेच एक पत्र

0
महात्मा गांधींही स्वत:ला ‘इंग्रजांचा सेवक’ लिहित असत, SC ने राहुल गांधींना करून दिली आठवण; पाहा, असेच एक पत्र


स्वातंत्र्यसेनानी विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. ‘वीर सावरकरांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले आणि तुम्ही त्यांची खिल्ली उडवत आहात. हे मान्य करता येणार नाही आणि भविष्यातही असे घडले तर आम्ही स्वत:हून दखल घेऊ, असेही ते म्हणाले. इतकेच नव्हे तर न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मनमोहन यांच्या खंडपीठाने राहुल गांधी यांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांना विचारले की, महात्मा गांधी देखील आपल्या पत्रात स्वत:ला इंग्रजांचा सेवक म्हणून लिहित असत हे तुमच्या क्लायंटला माहित आहे का?



Source link

Pahalgam Sister of terrorist allegedly involved in attack says My one brother is in jail other is Mujahideen

0
Pahalgam Sister of terrorist allegedly involved in attack says My one brother is in jail other is Mujahideen



Pahalgam Sister of terrorist allegedly involved in attack says My one brother is in jail other is Mujahideen | “माझा एक भाऊ मुजाहिद्दीन अन् दुसरा…”, पहलगाम हल्यातील दहशतवाद्याची बहिण म्हणाली, “एक इसम सैनिकाच्या गणवेशात…”





Source link

भारतातील ‘ही’ महत्त्वपूर्ण मानली जाणारी एक नदी अचानक गुप्त का झाली? जाणून घ्या यामागचे रहस्य…

0
भारतातील ‘ही’ महत्त्वपूर्ण मानली जाणारी एक नदी अचानक गुप्त का झाली? जाणून घ्या यामागचे रहस्य…



India’s Secret River Why is Saraswati River called invisible l भारतातील ‘ही’ महत्त्वपूर्ण मानली जाणारी एक नदी अचानक गुप्त का झाली? जाणून घ्या यामागचे रहस्य…





Source link