Wednesday, July 22, 2026
Home Blog Page 356

The Municipal Commissioner has taken serious note of the shocking incident आयुक्तांकडून गंभीर दखल

0
The Municipal Commissioner has taken serious note of the shocking incident आयुक्तांकडून गंभीर दखल


नांदेड: देशाला स्वातंत्र्य मिळवून देणार्‍या स्वातंत्र्यसैनिकांचा मान-सन्मान राखण्याचा प्रयत्न शासन, न्यायपालिका आणि विवेकी घटकांकडून होत असताना हैदराबाद मुक्तिसंग्रामात ऐतिहासिक योगदान देणार्‍या नांदेडमध्ये मनपाच्या माता गुजरीजी विसावा उद्यानात साकारण्यात आलेल्या हुतात्मा स्मारकाचा ओटा आणि त्या परिसरात गेल्या गुरुवारी एका वाढदिवसाच्या निमित्ताने ओली पार्टी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर त्याची मनपा आयुक्तांनी आता गंभीर दखल घेतली आहे.

शहराच्या उत्तर भागात अत्यंत मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या वरील उद्यानात नांदेडमधील शेकडो नागरिक सकाळी फिरायला जात असतात. छायाचित्रकार भारत होकर्णे व त्यांचे काही सहकारीही नित्यनेमाने तेथे जातात. शुक्रवारी सकाळी ते या उद्यानात फिरायला गेलेले असताना हुतात्मा स्मारकाच्या परिसरात आदल्या दिवशी झालेल्या एका वाढदिवसाच्या ओल्या पार्टीचे अवशेष दिसून आल्यानंतर त्यांची छायाचित्रे त्यांनी काढून ठेवली.

वाढदिवस कोणाचा होता, तो कोणी साजरा केला, ते अद्याप समोर आलेले नाही; पण शुक्रवारी सकाळी हुतात्मा स्मारकासमोर वाढदिवसाचा केक, बिर्याणी खावून तेथेच सोडून दिलेल्या कागदी पत्रावळ्या आणि दारुच्या काही बाटल्या दिसून आल्या. शुक्रवारी नांदेडमध्ये बंद पाळण्यात आला होता. या धामधूमीत मनपाच्या यंत्रणेचे हुतात्मा स्मारक परिसरातील प्रकाराकडे लक्ष गेले नाही. पण शनिवारीही हुतात्मा स्मारकाचा ओटा तशाच स्थितीत होता.

हेही वाचा

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी याच ठिकाणी पालकमंत्री आणि अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हुतात्म्यांना अभिवादन केले जाते. कविवर्य लक्ष्मीकांत तांबोळी यांनी लिहिलेले मराठवाडा गीतही तेथे कोरण्यात आलेले आहे. अशा पवित्र ठिकाणी कोणा अज्ञाताच्या वाढदिवसानिमित्त मद्यप्रेमींनी उच्छाद मांडला होता. पण दोन दिवसांत मनपाच्या संंबंधित यंत्रणेचे त्याकडे लक्ष गेले नाही.

नांदेड शहराच्या वेगवेगळ्या भागात सायंकाळनंतर रस्त्याच्या लगतच दारुच्या पार्ट्या रंगतात, असे निदर्शनास आल्यानंतर पोलीस यंत्रणेने सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणार्‍यांविरुद्ध मध्यंतरी मोहीम राबविली. या पार्श्वभूमीवर तळीरामांनी आपला मोर्चा शहराबाहेर झाडीझुडपात वळवला. या नव्या प्रकारामुळे गेल्या दोन महिन्यांत आगीच्या १४ घटनांची नोंद झाल्याची माहिती मनपाच्या अग्निशमन विभागप्रमुखांनी गेल्या आठवड्यातच दिली होती. हुतात्मा स्मारक आतापर्यंत सुरक्षित समजले जात होते. पण गेल्या गुरुवारी तेथे ओली पार्टी झाल्याचे ढळढळीत पुरावे छायाचित्रकार होकर्णे यांनी आपल्या कॅमेर्‍यात बंदिस्त करतानाच मनपाने या प्रकाराची गंभीर नोंद घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

नांदेड मनपाच्या उद्यानातील हुतात्मा स्मारकाच्या परिसरात वाढदिवसानिमित्त ओली पार्टी झाली, ही बाब आमच्या निदर्शनास कोणीही आणून दिलेली नाही. उपलब्ध झालेली छायाचित्रे पाहून तसेच आवश्यक ती माहिती घेऊन संबंधितांवर कारवाई करण्यात येईल. तसेच यापुढे मनपा उद्यानात असे प्रकार होणार नाहीत, याची खबरदारी घेतली जाईल. – डॉ.महेशकुमार डोईफोडे, आयुक्त, नांदेड-वाघाळा मनपा





Source link

Pakistan Diplomats Shocking Throat Slit Gesture In London were indians who were protesting against pahalgam attack

0
Pakistan Diplomats Shocking Throat Slit Gesture In London were indians who were protesting against pahalgam attack



Pakistan Diplomats Shocking Throat Slit Gesture In London were indians who were protesting against pahalgam attack | पहलगाम हल्ल्याच्या विरोधात आंदोलन होत असताना पाकिस्तानी अधिकाऱ्याचे संतापजनक कृत्य; व्हिडीओ होतोय व्हायरल





Source link

खोळंबलेली कामे पूर्ण करण्यासाठी आता ‘सेवा पंधरवडा…’!

0
खोळंबलेली कामे पूर्ण करण्यासाठी आता ‘सेवा पंधरवडा…’!



अमरावती: सर्वसामान्य जनतेची कामे वेळेत व्हावीत, यासाठी राज्य सरकारने सन २०१५ मध्ये ‘आपले सरकार सेवा पोर्टल’ सुरु केले. त्या माध्यमातून जनतेची कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण होणे अपेक्षित आहे. पण, या पोर्टलचा आढावा घेतला असता आणि मंत्रालय स्तरावर नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे अवलोकन केले असता संबंधित नागरिकांचे अर्ज, तक्रारी यांचा सक्षम प्राधिकाऱ्यांकडून विहित कालमर्यादेमध्ये निपटारा होत नसल्याचे निदर्शनास आले आहे.

राज्यामध्ये सन २०२२ व २०२३ या वर्षी सेवा पंधरवडा, महिना राबविण्यात आला होता. राज्य शासनाच्या विविध क्षेत्रीय कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना याबाबत राज्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर माहिती प्राप्त करून देणे तसेच त्यांना राज्य शासनाच्या विविध योजनांचा योग्य लाभ घेता यावा, त्याबाबत नागरिकांमध्ये जागरूकता वाढावी, शासनाबद्दल आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृध्दींगत व्हावा यासाठी विशेष मोहीम व लोकाभिमुख उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने २८ एप्रिल ते १२ मे, २०२५ या कालावधीत सेवा पंधरवडा राबविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

सेवा पंधरवडा कालावधीत सरकारच्या विविध संकेतस्थळांवर प्राप्त झालेल्या व आतापर्यंत प्रलंबित असलेल्या सर्व अर्जाचा मोहिम स्वरुपात निपटारा करणे अपेक्षित आहे. सेवा पंधरवड्यामध्ये प्रामुख्याने सर्वसामान्य जनतेशी निगडीत असणाऱ्या महसूल विभाग, ग्रामविकास विभाग, नगरविकास विभाग, कृषी विभाग, आदिवासी विकास विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, ऊर्जा विभाग या विभागांकडील तसेच सर्व शासकीय विभांगाकडील सेवाहक्क अधिनियमाअंतर्गत अधिसूचित केलेल्या सेवा विषयी प्रलंबित कामांचा विहित कालमर्यादेमध्ये निपटारा करण्याकरीता कार्यपध्दती निश्चित करावी व अंमलबजावणीकरिता सर्व संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करुन देण्यात यावी.

सर्व संबंधित खात्यांच्या जिल्हाप्रमुखांनी सेवा महिन्याची यशस्वी अंमलबजावणी करण्याकरिता नियोजन करावे, तसेच प्रगतीविषयी क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडून दैनंदिन आढावा घ्यावा आणि क्षेत्रीय भेटी द्याव्यात. शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या सेवा पंधरवड्याविषयी जनतेमध्ये यथोचित माहिती प्रसारीत करण्यात यावी. सेवा पंधरवडा कालावधीत मान्यवरांच्या भेटी, आयोजित शिबिरे, त्यामधील नागरिक-प्रशासनाचा सहभाग या विषयी स्थानिक प्रसार माध्यमांमधून प्रसिध्दी देण्यात यावी, असे सांगण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी, तहसील कार्यालयांमध्ये हेल्पडेस्क किवा हेल्पलाईन किंवा व्हॉट्सअॅपव्दारे मदत करण्याकरीता यंत्रणा, कक्ष तयार करून गरजू नागरिकांना मार्गदर्शन, शंकाचे निरसन करून त्यांची कामे पूर्ण करण्याकरीता आवश्यक ती व्यवस्था करण्यात यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.



Source link

‘सिंधू नदीत एकतर पाणी वाहणार, नाहीतर रक्ताचे पाट…’ बिलावल भुट्टोंसह पाकच्या पंतप्रधानांनी ओकली गरळ

0
‘सिंधू नदीत एकतर पाणी वाहणार, नाहीतर रक्ताचे पाट…’ बिलावल भुट्टोंसह पाकच्या पंतप्रधानांनी ओकली गरळ


Pakistan On Pahalgam Terror Attack: जम्मू काश्मीरच्या पहलगाम इथं झालेल्या दहशतवादी हल्ल्यानं अनेक निष्पापांचा बळी घेतला आणि जगभरातून या हल्ल्याचा निषेध करण्यात आला. फक्त भारतच नव्हे, तर इतरही अनेक मित्र राष्ट्रांनी या हल्ल्याचा निषेध करत पाकिस्तानविषयीसुद्धा नाराजीचा सूर आळवला. इथं भारताकडून दहशतवादी कारवायांना मिळणाऱ्या प्रोत्साहानाचा निषेध करत अनेक करार आणि सीमाभागातून होणारे व्यवहार रद्द करण्यात आले. ज्यामुळं पाकिस्ताननंही भारताविरोधात जाहीर भूमिका घेतली. 

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील नात्यात तणाव कमी होत नसतानाच शेजारी राष्ट्राच्या माजी परराष्ट्र मंत्री आणि पाकिस्तान पीपल्स पार्टीचे प्रमुख बिलावल भुट्टो जरदारी यांनी चिथावणीखोर वक्तव्य करत गरळ ओकली. 

एकतर या नदीतून आमचं पाणी वाहील नाहीतर…

एका जाहीर सभेमध्ये उपस्थितांना संबोधित करताना भुट्टो यांनी सिंधू जल कारारासंदर्भात भाष्य करत भारताला थेट इशारा दिला. ‘मी सिंधू नदीच्या काठावर उभा राहून भारताला स्पष्टपणे सांगतोय की, सिंधू (नदी) आमची आहे आणि आमचीच राहील. एकतर या नदीतून आमचं पाणी वाहील नाहीतर मग इथं आमच्याच रक्ताचे पाट वाहतील…’, असं भुट्टो म्हणाले. 

बिलावल भुट्टो जरदारी यांच्या या चिथावणीखोर वक्तव्यानंतर परिस्थिती आणखी चिघळली जाण्याची भीती अनेक जाणकारांनी व्यक्त केली. पाक नेते भुट्टो यांनी भारतानं सिंधूवर हल्ला केल्याचं म्हणत देशाला हल्लेखोर म्हटलं. भारताची लोकसंख्या आमच्याहून जास्त असेल मात्र पाकिस्तानचे लोक धाडसी आहेत. आम्ही सीमेवर आणि पाकिस्तानातही लढा देऊ, असं सांगत आमचा आवाजच भारताला सडेतोड उत्तर देईल याचाच पुनरुच्चार त्यांनी केला. 

पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनीसुद्धा सिंधू जल कारारासंदर्भातील तणावपूर्ण वातावरणात आपल्या जळजळीत वक्तव्यानं आणखी भर टाकली. ‘पाकिस्तानला पुरवलं जाणारं पाणी कमी केलं किंवा वळवण्याचा प्रयत्न जरी केला तरी याचं उत्तर पूर्ण ताकदीनं दिलं जाईल, कोणीही इथं काहीही चूक करुच नये’ असं म्हणत शांतता आमची प्राथमिकता असली तरीही अखंडता आणि सुरक्षेच्या बाबतीत आम्ही कोणतीच तडजोड करणार नसल्याची भूमिका मांडत त्यांनीसुद्धा भारताविरोधात सूर आळवला. 





Source link

सूरज चव्हाणच्या झापुक झुपूकची पहिल्या दिवसाची कमाई

0
सूरज चव्हाणच्या झापुक झुपूकची पहिल्या दिवसाची कमाई



Zapuk Zupuk box office collection day 1: suraj chavan film Zapuk Zupuk collected 27 lakh : झापुक झूपक बॉक्स ऑफिस कलेक्शन : सूरज चव्हाणच्या झापुक झुपूकची पहिल्या दिवसाची कमाई





Source link

Google set to fire remote workers if they dont return to office

0
Google set to fire remote workers if they dont return to office



Google set to fire remote workers if they dont return to office | ‘Work from Home’ करणाऱ्यांची नोकरी जाणार? गुगलने कर्मचाऱ्यांना दिला इशारा; प्रकरण काय?





Source link

Mahavitaran makes smart meters mandatory for all consumers in maharashtra

0
Mahavitaran makes smart meters mandatory for all consumers in maharashtra



Mahavitaran makes smart meters mandatory for all consumers in maharashtra | राज्यातील सर्वच ग्राहकांकडे स्मार्ट मीटरची सक्ती, निवडणुकीपूर्वीचे आश्वासन सरकार…





Source link

in akola placement drive on 30th April 2025 अकोल्यात ३० ला ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’

0
in akola placement drive on 30th April 2025 अकोल्यात ३० ला ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’


अकोला : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे ३० एप्रिल जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सकाळी १० वाजता ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’चे आयोजन करण्यात आले आहे. खासगी क्षेत्रात कंपन्यांना योग्य उमेदवार मिळत नाहीत. तर दुसरीकडे सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी उपलब्ध नसल्याचे चित्र दिसून येते. खाजगी कंपन्या व सुशिक्षित बेरोजगार तरुणांमध्ये समन्वय घडवून आणण्याच्या दृष्टीने ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’घेतला जाणार आहे. यामध्ये विविध कंपन्यांनी एकूण १८० पदांची मागणी नोंदवली आहे.

इक्विटस बँक (एकूण रिक्तपदे- २० शैक्षणिक पात्रता किमान १२ वी किंवा पदवीधर), स्वतंत्र मायक्रो फायनान्स कंपनी (एकुण रिक्तपदे २० शैक्षणिक पात्रता किमान १२ वी किंवा पदवीधर), ग्रामीण कुटा (एकुण रिक्त पदे – ५० शैक्षणिक पात्रता किमान १२ वी किंवा पदवीधर), मुथूट मायक्रो फायनान्स (एकुण रिक्तपदे – ३० शैक्षणिक पात्रता किमान १२ वी किंवा पदवीधर), यशस्वी ग्रुप (एकुण रिक्तपदे- ३० शैक्षणिक पात्रता किमान १२ वी किंवा पदवीधर), आयटीएमस्कील अकादमी आयसीआयसी बँक (एकुण रिक्तपदे – ३० शैक्षणिक पात्रता किमान १२ वी किंवा पदवीधर) ऑनलाइन अर्ज ३० एप्रिलपूर्वी ‘एनसीएस.जीओव्ही.इन’ या संकेतस्थळावर करावा.

जास्तीत जास्त उमेदवारांनी आपली शैक्षणिक कागदपत्रे, बायोडाटा तसेच पासपोर्ट साईज छायाचित्रासह जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, प्रशासकीय इमारत, दुसरा माळा, अकोला येथे स्वखर्चाने उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा.

हेही वाचा

काही अडचण आल्यास, या कार्यालयाच्या दुरध्वनी क्रमांक ०७२४२४३३८४९ किंवा ७०२४२४१०९८, ८९८३४१९७९९ या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्तांनी केले आहे.





Source link

हास्यतरंग : राजधानी…

0
हास्यतरंग : राजधानी…



आई : सांग मध्य प्रदेशची राजधानी कोणती?

मन्या : मम्मी! इंदौर!

बाबा : अगं! नीट शिकव त्याला! मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ आहे.

आई : दोन-तीन दिवसांपूर्वी धार सांगत होता. 

मारत… मारत… धारपासून इंदौरपर्यंत घेऊन आले आहे.

दोन-तीन दिवसात इंदौरपासून भोपाळपर्यंत पोहचेल.



Source link

The groundwater level in Katol and Narkhed tehsils of Nagpur district ८०० फुटांहूनअधिक खोल

0
The groundwater level in Katol and Narkhed tehsils of Nagpur district ८०० फुटांहूनअधिक खोल


नागपूर : नागपूर जिल्ह्यात संत्री लागवडीचे तालुके अशी ओळख असलेल्या काटोल व नरखेड तालुक्यात जमिनीतील पाण्याची पातळी सूमारे आठशे फुटांपेक्षा अधिक खोल गेली आहे. त्याचा फटका संत्री उत्पादनाला बसण्याची शक्यता आहे.

यंदा मार्च पासूनच उन्हाळा जोरात तापू लागला आहे. एप्रिल महिन्यात तथा तापमान ४५ अंशांपर्यंत गेले. संत्री उत्पादनासाठी मुबलक पाण्याची आवश्यकता भासते. त्यामुळे जमिनीतून बोअरवेल व्दारे पाण्याचा उपसा केला जातो. त्यामुळे जलस्तर  खाली जातो. काटोल आणि नरखेड तालुक्यात हेच झाले. हा डार्क झोन घोषित करण्यात आला.

या भागातील पाणी टंचाई बाबत शुक्रवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आढावा बैठक घेतली. . या बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, निवासी उपजिल्हाधिकारी प्रविण महिरे व उपविभागीय अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्याला मुबलक प्रमाणात पाण्याची उपलब्धता आहे. याला काटोल आणि नरखेड तालुक्यातील काही गावे अपवाद आहेत. या तालुक्यात ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची दूर्भिक्षता आहे अशी गावे जिल्हा प्रशासनामार्फत निश्चित केली आहेत. या गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची उपलब्धता तत्परतेने करा, असे निर्देश बावनकुळे यांनी जिल्हा प्रशासनास दिले.

हेही वाचा

पाणी टंचाईअंतर्गत ज्या काही उपाय योजना शासनाने सूचवल्या आहेत त्यावर भर देऊन पाणी वाटपाचे सुयोग्य नियोजनकरा, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले.

कंत्राटी कामगारांसाठी घरे

कोराडी आणि खापरखेडा वीज प्रकल्पातील कंत्राटी कामगारांसाठी पंतप्रधान आवास योजनेतून पाच हजार घरे बांधणार असल्याचे बावनकुळे यांनी बैठकीपूर्वी पत्रकारांशी बोलताना सांगितले. कामगारांसाठी भिलगाव ,खैरीजवळ हे बांधकाम सुरू आहे. तसेच सध्या तयार असलेली घरे लवकरच वाटप केली जाणार असे बावनकुळे म्हणाले.

म्हाडा इमारतीचा पुनर्विकास

नागपूर शहरांतील हिस्लाप कॉलेजच्या जवळ असलेल्या म्हाडाच्या वसाहतीचा लवकरच पुनर्विकास केला जाईल,असे त्यांनी सांगितले. येथील अतिक्रमण काढण्याचा दावाही त्यांनी केला.





Source link