Wednesday, July 22, 2026
Home Blog Page 357

अतिमुसळधार पाऊस, ठिकठिकाणी भूस्खलन; सिक्कीममध्ये निसर्ग कोपला, 1000 हून अधिक पर्यटक…

0
अतिमुसळधार पाऊस, ठिकठिकाणी भूस्खलन; सिक्कीममध्ये निसर्ग कोपला, 1000 हून अधिक पर्यटक…


Sikkim Floods and Lanslide latest update : जम्मू काश्मीरच्या पहलगाम भागामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानं देश हादरलेला असतानाच आणखी एका भागात नैसर्गिक आपत्तीमुळं भयावह परिस्थिती उदभवल्याचं पाहायला मिळत आहे. देशाच्या सिक्कीम प्रांतातील उत्तरेकडे असणाऱ्या चुंगथांग शहरात भूस्खलनानंतर यंत्रणेनं तातडीन बचावकार्य सुरू करत 1100 हून अधिक पर्यटकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केलं. तर, उर्वरित 1800 हून अधिक पर्यटक अद्यापही मदतीच्या प्रतीक्षेत असल्याचं म्हटलं जात आहे. प्रभावित क्षेत्रातील या सर्व पर्यटकांना सध्या चुंगथांपासून साधारण 100 किमी अंतरावर असणाऱ्या गंगटोक इथं आणण्याचं काम हाती घेण्यात आलं आहे. 

उत्तर सिक्कीममधील लाचेन आणि लाचुंग या दोन गिरिस्थानांवर गुरुवारी रात्री स्टेशन भागात भूस्खलन झालं आणि यामुळं इथं हजारो पर्यटक अडकून पडले. मांगनचे पोलीस अधीक्षक सोनम डेट्चू भूतिया याच्या माहितीनुसार भूस्खलनामुळे ज्यांची वाहनं रस्त्यावर अडकली होती त्या पर्यटकांना नजीकच्याच गावांमध्ये गुरुवारी रात्री मुक्कामी ठेवण्यात आलं आणि शुक्रवारी त्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आलं. इथं पर्यटकांनी पोलीस स्टेशन, गुरुद्वारा, इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस कॅम्प आणि स्थानिकांच्या घरांमध्ये आसरा घेतला. 

पावसानं जोर धरला आणि परिस्थिती बिघडू लागली

जिल्हा पोलिस प्रमुखांच्या माहितीनुसार गुरुवारी दुपारपासूनच सिक्कीमच्या या भागात पावसानं जोर धरला आणि परिस्थिती बिघडू लागली. सततच्या या पावसामुळे भूस्खलनामुळे होत चुंगथांगहून लाचेनला जाणाऱ्या रस्त्यावर मुनशिथांगजवळ आणि चुंगथांगहून लाचुंगला जाणाऱ्या रस्त्यावर लिमाजवळ अनेक ठिकाणी रस्त्यांची दूरवस्था झाली आणि इथल्या अनेक वाटा बंद झाल्या. 

रस्त्यांची स्थिती आणि हवमानाचा मारा पाहता उत्तर सिक्कीममध्ये प्रवास करण्यासाठीचे परवाने शुक्रवारी रद्द करण्यात आले होते. सावधगिरी म्हणून जिल्हा प्रशासनाने टूर ऑपरेटर्सना परिस्थिती सुधारेपर्यंत पर्यटकांना उत्तर सिक्कीममध्ये पाठवू नये असे निर्देशही दिले. 

सिक्किम येथे ग्लेशियर लेक फुटून आलेल्या पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या ठिकाणांपैकी लाचेन हे एक ठिकाण होते. जवळपास दीड वर्ष संपर्क तुटल्यानंतर यावर्षी मार्च महिन्यात हे ठिकाण पर्यटकांसाठी खुले झाले होते. मात्र आता इथं पुन्हा पावसामुळं परिस्थिती बिघडल्यानं या भागात पर्यटनावर उदरनिर्वाह करणाऱ्या स्थानिकांच्या अडचणींमध्ये नव्यानं भर पडली आहे. 





Source link

पुण्यातील रुणालयाने बिलासाठी मृतदेह अडविला; नातेवाइकांची पूना हॉस्पिटलविरोधात आरोग्य विभागाकडे तक्रार

0
पुण्यातील रुणालयाने बिलासाठी मृतदेह अडविला; नातेवाइकांची पूना हॉस्पिटलविरोधात आरोग्य विभागाकडे तक्रार



in pune poona hospital hold patients dead body for payment of bill पुण्यातील रुणालयाने बिलासाठी मृतदेह अडविला; नातेवाइकांची पूना हॉस्पिटलविरोधात आरोग्य विभागाकडे तक्रार





Source link

बक्कळ पैसा! मायावी ग्रह करणार शनीच्या राशीत प्रवेश; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी

0
बक्कळ पैसा! मायावी ग्रह करणार शनीच्या राशीत प्रवेश; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मी



Rahu enter in kumbha rashi three zodic get wealth and health l बक्कळ पैसा! मायावी ग्रह करणार शनीच्या राशीत प्रवेश; ‘या’ तीन राशींच्या दारी नांदणार लक्ष्मीचे सुख





Source link

रिक्षावाल्या आजींचा दुर्गम भागात ठसा; 65 व्या वर्षी रिक्षा शिकून उंडाळ्यातल्या प्रवाशांचं जिंकले मन

0
रिक्षावाल्या आजींचा दुर्गम भागात ठसा; 65 व्या वर्षी रिक्षा शिकून उंडाळ्यातल्या प्रवाशांचं जिंकले मन

सातारा :“जिद्द असेल तर वय फक्त एक आकडा ठरतो” हे नांदगाव (ता. सातारा) येथील 65 वर्षीय मंगल आवळे या आजींनी सिद्ध करून दाखवलं आहे. सध्या त्यांची रिक्षा उंडाळे व सवादे जिंती या दुर्गम भागांमध्ये धावते आहे. मुलाकडून रिक्षा चालवायला शिकलेल्या या आजींनी अवघ्या दोन-तीन दिवसांत वाहनावर हुकमत मिळवली आणि गेल्या 15 दिवसांपासून त्या रिक्षा चालवून प्रवाशांची मने जिंकत आहेत.

गर्दी असो वा चढ-उतार, मंगल आजी कुठेही निर्धास्तपणे रिक्षा चालवतात. मोबाईलमध्ये अडकलेल्या तरुणाईपुढे त्यांनी प्रेरणादायी आदर्श उभा केला आहे. उंडाळे परिसरात ‘रिक्षावाल्या आजी’ म्हणूनच त्यांची ओळख बनली आहे. समाज माध्यमांतूनही त्यांच्या या धाडसी निर्णयाचं कौतुक होत आहे.

राज्यातील 10 हजार महिलांना ‘पिंक इ-रिक्षा’; मुख्यमंत्री फडणवीस यांचा स्तुत्य उपक्रम

दरम्यान, राज्यात महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘पिंक इ-रिक्षा योजना’ सुरू केली आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात नागपूरसह 8 जिल्ह्यांतील 10 हजार महिलांना रिक्षा वितरित करण्यात आल्या आहेत. यामध्ये पुणे, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती, अहिल्यानगर आणि छत्रपती संभाजीनगरचा समावेश आहे.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेमागे सुरक्षित सार्वजनिक वाहतूक सुविधा आणि महिलांना रोजगार देण्याचा दुहेरी हेतू असल्याचे सांगितले आहे. महिला व बालविकास विभागाद्वारे राबवली जाणारी ही योजना महिला सबलीकरणाचा महत्त्वपूर्ण टप्पा ठरत आहे.

व्हॅटिकनच्या चिमणीतील पांढऱ्या धुराची प्रतीक्षा…

0
व्हॅटिकनच्या चिमणीतील पांढऱ्या धुराची प्रतीक्षा…


कराचीचे आर्चबिशप जोसेफ कार्डिनल कॉर्डेइरो हे माझ्या वडिलांचे पहिले चुलत भाऊ होते. त्यांनी दोन किंवा तीन कॉन्क्लेव्हमध्ये भाग घेतला होता. कॉन्क्लेव्ह म्हणजे पदावर असलेल्या एखाद्या पोपचा मृत्यू झाल्यानंतर पुढच्या पोपची निवड करण्यासाठीची ७० किंवा ८० कार्डिनल्सची (उच्च स्तरीय पाद्री) बैठक. एकदा ते मुंबईला आलेले असताना मी त्यांना या कॉन्क्लेव्हबद्दल काही प्रश्न विचारले होते आणि त्यांना स्वतःला काही मते मिळाली का, असेही विचारले होते. त्यांनी फक्त हसून माझ्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले.

गोव्याचे कार्डिनल आर्चबिशप फिलिप नेरी फेराव हे माझ्या दिवंगत पत्नीच्या सख्ख्या चुलत भावाचे पुत्र. पोप फ्रान्सिस यांचा उत्तराधिकारी निवडण्यासाठी त्यांना रोमला बोलावले जाईल. जगातील कॅथोलिक चर्चच्या प्रमुखाच्या निवडीत माझ्या वडिलांचा चुलत भाऊ सहभागी होता हे सांगताना मला खूप आनंद होत असे. आता, माझ्या प्रिय पत्नीचे नातेवाईक फिलिप नेरी या प्रक्रियेशी संबंधित आहेत, ते मतदान करणार आहेत, हे सांगतानाही मला असाच आनंद होतो.

पोप फ्रान्सिस यांनी शेवटचा श्वास घेण्याआधी त्यांना भेटणाऱ्या शेवटच्या व्यक्तींपैकी एक म्हणजे अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. व्हान्स. व्हान्स स्वतः कॅथेलिक आहेत, अमेरिकेतील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतलेल्या परदेशी विद्यार्थ्यांशी ट्रम्प यांच्या वागणुकीबद्दल पोप फ्रान्सिस यांच्या मनात असलेल्या शंका दूर करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी व्हान्स यांना पाठवले होते.

ख्रिश्चन धर्मगुरू पोप यांच्याकडे जगातील महत्वाच्या नेत्यांवर प्रभाव टाकण्याची ताकद आहे. ते हे काम शांतपणे आणि वाद न घालता करतात, पण तरीही त्याचा परिणामकारकपणा कमी नसतो. त्यांच्या ताब्यात लष्कर नसले तरी जगभरातील कोट्यवधी कॅथलिक लोकांचा पाठिंबा त्यांना आहे, आणि धर्म ज्या नैतिकता व न्यायाचे समर्थन करतो, त्याची नैतिक सत्ता त्यांच्याकडे आहे.

फ्रान्सिस हे एक चांगले पोप होते. त्यांचा दृष्टिकोन खुला होता. जेव्हा त्यांना कॅथलिक विवाहित जोडप्यांनी गर्भनिरोधकांचा वापर न करण्याच्या चर्चच्या आदेशाविषयी विचारले गेले, तेव्हा त्यांनी तत्काळ उत्तर दिले की, “मी कॅथलिक लोकांकडून सशासारखी पिल्लं जन्माला घालण्याची अपेक्षा करत नाही.” माझी खात्री आहे की त्यांनी बायबल काळातील जीवनशैलीवर आधारित असलेल्या चर्चच्या अनेक नियमांमध्ये शिथिलता आणली असती. फ्रान्सिस यांना गरीब आणि शोषित लोकांची अधिक काळजी होती आणि त्यांनी चर्चच्या शिकवणींपेक्षा त्या गोष्टींना अधिक महत्त्व दिलं.

युरोपमधील चर्चमध्ये लोकांची उपस्थिती झपाट्याने घटत आहे, अगदी सामूहिक प्रार्थनेसाठी राखीव असलेल्या रविवारच्या दिवशीही हीच स्थिती आहे. पाद्रींना प्रशिक्षण देणाऱ्या सेमिनरींची स्थिती तर याहूनही खराब आहे. पोप ज्या व्हॅटिकनचं नेतृत्व करतात, त्या व्हॅटिकनचे हे कर्तव्य आहे की, त्यांनी या घटत्या उपस्थितीमागची कारणं समजून घेतली पाहिजेत आणि या समस्यांचा सामना करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

युरोपमधील आर्थिकदृष्ट्या प्रगत देशांमध्ये धर्माचे आकर्षण कमी होत चालले आहे. उदाहरणार्थ, मी आणि माझी पत्नी निवृत्तीनंतर दरवर्षी लंडनला जायचो, तेव्हा हॉटेलजवळील चर्चमध्ये जे काही भक्त दिसायचे, ते आपल्या किंवा आपल्याहून काळ्या रंगाचे लोकच असायचे. स्थानिक लोक, विशेषतः तरुण पिढी, जवळपास नव्हतीच. चांगल्या जीवनमानाच्या प्रमाणात धर्मनिष्ठा कमी होत असल्याचे ते लक्षण स्पष्ट दिसत होते.

पोर्तुगालमध्ये तर चर्चमध्ये येणाऱ्यांची स्थिती अजूनच दयनीय होती. पोर्तुगीज लोक जवळपास पाच शतकांपूर्वी गोव्याच्या किनाऱ्यावर उतरले होते. तो काळ होता ‘श्रद्धेचा’. तेव्हा पाद्री हे सैनिकांबरोबरच यायचे आणि लोकांना ख्रिश्चन धर्मात धर्मांतरित करायचे. त्यांनी माझ्या पूर्वजांचे आणि इतर हिंदूंचे धर्मांतर केले आणि जाती नष्ट करण्याच्या हेतूने आमची आडनावंही बदलली. रूपांतर केलेल्या कुटुंबांना त्या त्या पाद्रीचं पोर्तुगीज आडनाव दिलं जायचं. म्हणूनच पोरवोरीममध्ये ‘रिबेरो’ तर दिव्यात ‘मेनेझेस’ आडनावांची संख्या मोठी आहे – हे अनुक्रमे माझं आणि माझ्या पत्नीचं मूळ गाव.

मी पोर्तुगालमधील पोर्तो शहरात – जिथे प्रसिद्ध पोर्ट वाइन तयार होते – गेलेलो असताना काही पोर्तुगीज तरुण-तरुणी धोतर घालून आणि साड्या नेसून “हरे कृष्ण, हरे राम”ची पत्रकं देत होते. मी त्यांना आठवण करून दिली की माझे पूर्वज राम आणि कृष्णाचे भक्त होते, आणि त्यांनाच या मुलांच्या पूर्वजांनी ख्रिश्चन धर्मात धर्मांतरित केलं होतं – तेही साडेचार शतकांपूर्वीच्या गोव्यात! आणि आम्ही पोर्तुगालला गेलेलो असताना, या मुलांनी आम्हाला “घरवापसी”करायला सांगणं हे फारच उपहासात्मक होतं.

पोप फ्रान्सिस अर्जेंटिनाचे होते. ते पोपपदी विराजमान होणारे पहिले दक्षिण अमेरिकन होते. ते जेसुइट संघाचे पहिले पो देखील होते. हा असा पाद्री वर्ग आहे ज्यांला हे पद मिळवायला १४ वर्षं लागतात, तर इतर धर्मप्रांतातील पाद्रींसाठी केवळ आठ वर्षे.

मी मुंबईच्या धोबी तलाव येथील जेसुइट शाळेत शिक्षण घेतलं. ही शाळा आजही तितक्याच दिमाखात उभी आहे. जेसुइट शाळेत शिक्षण घेणं ही एक विशेष गोष्ट होती. १९३६ ते १९४४ या काळात माझ्या काळातले पाद्री हे स्पॅनिश होते. माझी फार इच्छा आहे की फ्रान्सिस यांच्या जागी पुन्हा एक जेसुइट पोप व्हावा.

पोपच्या निवडीत सामान्य लोकांचा सल्ला घेतला जात नाही. त्यामुळे माझी ही इच्छा फक्त इच्छा राहील. ती योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचणार नाही. मी माझ्या पत्नीच्या चुलत भावाला – जो पोपच्या निवडीसाठी मतदान करणार आहे – ही इच्छा सांगण्याचं धाडस देखील करणार नाही. हाँगकाँगचे आर्चबिशप कार्डिनल स्टीफन चाउ हे जेसुइट आहेत आणि चिनी आहेत. बऱ्याचशा इटालियन पोपांनंतर आपल्याला एक पोलिश पोप, त्यानंतर जर्मन आणि मग अर्जेंटिनियन पोप मिळाले. त्यामुळे आता एक चिनी जेसुइट पोप ही एक रंजक आणि योग्य निवड ठरू शकते. विशेषतः पोप फ्रान्सिस यांनी सप्टेंबर २०१८ मध्ये चीन सरकारबरोबर मुख्य भूमीतील बिशप निवडीसंबंधी केलेल्या तात्पुरत्या करारानंतर ती आणखीनच रंजक आहे. या करारामुळे आता मुख्य भूमीतील बिशपांच्या निवडीवर अंतिम निर्णय पोपच घेतात.

२०२५ मधील कॉन्क्लेव्हमध्ये ८० वर्षांखालील १३५ मतदार असतील. जिथे मतदान होणार आहे, तिथे हे सर्व मतदार आवश्यक संख्येपर्यंत पोहोचत नाही तोवर दररोज दोन वेळा मतदान करतील. नव्या पोपची निवड होईल, तेव्हा व्हॅटिकनच्या चिमणीमधून पांढरा धूर निघेल. तोपर्यंत धुराचा रंग काळाच असेल.

मी ज्या चर्चमध्ये नेहमी प्रार्थनेसाठी जातो, तिथे एकाने मला ‘कॉन्क्लेव्ह’ नावाचा चित्रपट असलेली पेन ड्राइव्ह दिली – ज्यात प्रसिद्ध हॉलीवूड अभिनेता पीटर फायन्स यांनी व्हॅटिकनच्या सेक्रेटरी ऑफ स्टेटची भूमिका केली आहे. हा सेक्रेटरी कॉन्क्लेव्हचे संचालन करतो. ही पेन ड्राइव्ह ज्या व्यक्तीने दिली होती तिची मुलगी चित्रपट संपादनाचं काम करते. त्या चित्रपटात अफगाणिस्तानच्या काबूलमधील आर्चबिशपला पोप म्हणून निवडण्यात आलं! (माझ्या माहितीप्रमाणे, अफगाणिस्तानमध्ये कॅथलिक पाद्रीच नाहीत – कार्डिनल तर फारच दूरची गोष्ट.)

नवीन पोप हे देवाचे सेवक असावेत, त्यांनी भविष्याकडे पाहून तरुण पिढीला आध्यात्मिकता आणि धर्म अधिक स्वीकारार्ह वाटावा यासाठी योजना तयार करावी. सामाजिक मूल्ये बदलत आहेत. उदाहरणार्थ, विवाहसंस्था संकटात आहे. एकेकाळी एकाकीपणा आणि नाकारलेपणाच्या विरोधातील एक आधार असलेली कुटुंबसंस्था आता दुर्लक्षित होत आहे.

चर्चने मला आणि मेल्बाला (माझ्या पत्नीला) ज्याप्रमाणे स्वत्वाची जाणीव दिली, तसेच ते अशा अस्थिर काळात लोकांना आधार देत राहील का?



Source link

Pakistan Army initiates unprovoked firing across LoC overnight| World Bank issues big warning

0
Pakistan Army initiates unprovoked firing across LoC overnight| World Bank issues big warning


Jammu and Kashmir Pahalgam Terror Attack Live Updates 26 April 2025: जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर आता भारताने पाकिस्तानविरोधात कडक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. भारताने सिंधू जल करारास स्थगिती दिल्यानंतर पाकिस्तानमध्ये पाण्याचा एक थेंबही वाहून जाऊ देणार नाही, असे जलशक्ती मंत्री सीआर पाटील यांनी शुक्रवारी म्हटले आहे.

Live Updates

Pahalgam Terror Attack Live Updates Today 26 April 2025 | पहलगाम दहशतवादी हल्लानंतरची कारवाई पाहा लाईव्ह अपडेट्स

08:15 (IST) 26 Apr 2025

पहलगाम हल्ल्यामध्ये पाकिस्तानी लष्कराचाच सहभाग? पुरावे आणि इतिहास काय सांगतो? 

गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर जम्मूतून भारतीय सैन्याची मोठी तुकडी चीनच्या सीमेवर तैनात झाली. अशा हालचालींवर पाकिस्तानी लष्कर बारकाईने लक्ष ठेवून असते. …सविस्तर बातमी

08:14 (IST) 26 Apr 2025

Pahalgam Terror Attack Live Updates: दहशतवाद्यांशी संबंधित तीन जणांची घरे जमीनदोस्त; पुलवामा, कुलगाम आणि शोपियाँ जिल्ह्यात कारवाई

दहशतवाद्यांशी संबंधित असलेल्या तीन जणांची घरे जमीनदोस्त केल्याची माहिती समोर आली आहे. एएनआय वृत्तसंस्थेने याचे काही व्हिडीओ शेअर केले आहेत. पुलवामा, कुलगाम आणि शोपियाँ या जिल्ह्यात कारवाई करण्यात आली आहे. हे दहशतवादी लष्कर-ए-तोयबा या संघटनेशी संबंधित असल्याचे सांगितले जाते.

https://twitter.com/ANI/status/1915955876629803117

07:34 (IST) 26 Apr 2025

Pahalgam Terror Attack Live Updates: संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेकडून पहलगाम हल्ल्याचा निषेध

संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेने शुक्रवारी जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला. या हल्यामागील सूत्रधार आणि हल्ला करणारे अतिरेकी यांना शोधून कडक कारवाई करण्यात यावी आणि पीडितांना न्याय मिळावा, अशी अपेक्षा संयुक्त राष्ट्राने व्यक्त केली आहे

Was the Pakistani army involved in the Pahalgam attack What does evidence and history say

पहलगाम हल्ल्यामध्ये पाकिस्तानी लष्कराचाच सहभाग? पुरावे आणि इतिहास( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता काय सांगतो?





Source link

आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या मनीषा माने-मुसळे हिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

0
आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या मनीषा माने-मुसळे हिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

सोलापूर : ज्येष्ठ मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर (वय ७०) यांच्या आत्महत्येप्रकरणी अटकेत असलेल्या एसपी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्स रुग्णालयातील प्रशासकीय अधिकारी मनीषा महेश माने-मुसळे (वय ४५) हिला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तिची पाच दिवसांची पोलीस कोठडी शुक्रवारी संपल्यानंतर ती पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आली होती.

पोलीस तपास अधिकाऱ्यांनी पुढील तपासासाठी पोलीस कोठडीचा हक्क राखून न्यायालयीन कोठडीची मागणी केली असता, न्यायदंडाधिकाऱ्यांनी ती मान्य केली. यावेळी आरोपीच्या वकिलांना युक्तिवादाची संधीही लागली नाही.

१८ एप्रिल रोजी रात्री डॉ. वळसंगकर यांनी रेल्वे लाईन-मोदी खाना परिसरातील निवासस्थानी स्वतःच्या रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडून आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या पत्रात प्रशासकीय अधिकारी मनीषा माने-मुसळे हिला जबाबदार धरले होते.

या पत्राच्या आधारे पोलिसांनी तिला अटक केली होती. सुरुवातीला तीन दिवस आणि नंतर दोन दिवस अशा एकूण पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली होती.

या कालावधीत पोलीस तपासात समोर आले की, मनीषा माने-मुसळे हिने ईमेलद्वारे डॉ. वळसंगकर यांना धमकावले होते. आर्थिक व्यवहारांवरून डॉ. वळसंगकर यांनी तिचे अधिकार आणि पगार कमी केला होता, यामुळे ती संतापली होती. त्यामुळे तिने मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली होती.

रुग्णालयातील २७ अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही तिच्याविरोधात तक्रार केली होती. तसेच वळसंगकर कुटुंबीयांचीही सखोल चौकशी करण्यात आली आहे.

तपास अधिकारी : अजित लकडे
वकील : प्रशांत नवगिरे (आरोपी वतीने)

ही कारवाई संपूर्ण शहरात खळबळजनक ठरली असून पोलीस तपास अधिक गतीने सुरू असल्याची माहिती आहे.

Bahadoli Jambul trees will be planted across the maharashtra state

0
Bahadoli Jambul trees will be planted across the maharashtra state



Bahadoli Jambul trees will be planted across the maharashtra state | बहाडोलीच्या जांभूळ झाडांची राज्यभरात करणार लागवड; पालघर जिल्ह्यात सुरंगी लागवडीसाठी प्रयत्न





Source link

National Herald refuses to issue notice to Sonia gandhi and Rahul Gandhi in financial irregularities case

0
National Herald refuses to issue notice to Sonia gandhi and Rahul Gandhi in financial irregularities case



National Herald refuses to issue notice to Sonia gandhi and Rahul Gandhi in financial irregularities case | सोनिया, राहुल गांधींना नोटीस बजावण्यास नकार; नॅशनल हेराल्ड आर्थिक गैरव्यवहार प्रकरण





Source link

खंडणीप्रकरणी इक्बाल कासकर निर्दोष

0
खंडणीप्रकरणी इक्बाल कासकर निर्दोष


मुंबई : कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा भाऊ इक्बाल कासकर याची महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) स्थापन मुंबईतील विशेष न्यायालयाने शुक्रवारी खंडणीच्या प्रकरणातून निर्दोष सुटका केली. खंडणीसाठी जीवे मारण्याची धमकी देण्याच्या आरोपांसह कासकर याच्यावर मोक्कांतर्गत खटला चालवण्यात आला. विशेष मोक्का न्यायाधीश बी. डी. शेळके यांनी या खटल्याचा शुक्रवारी निकाल देताना कासकर याची त्याच्यावर ठेवण्यात आलेल्या सर्व आरोपांतून पुराव्यांअभावी निर्दोष सुटका केली. न्यायालयाचा तपशीलवार आदेश रात्री उशिरापर्यंत उपलब्ध झाला नव्हता.

कासकर हा सध्या ठाणे तुरुंगात बंदिस्त असून त्याच्यावर आर्थिक गैरव्यवराहाप्रकरणी दाखल खटला प्रलंबित आहे. त्यामुळे, त्याची या खंडणी प्रकरणातून निर्दोष सुटका झाली असली, तर त्याला कारागृहातच राहावे लागणार आहे.

पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यानुसार, कासकर याने २०१५ मध्ये ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाकडे ३० लाख रुपये आणि चार सदनिकांची मागणी केली होती. कासकर याने प्रकरणातील एका सह-आरोपीच्या नावे एक सदनिका नोंदणीकृत केली. तसेच, ३० लाख रुपयांची खंडणी घेतल्याचा पोलिसांचा आरोप आहे. या सहआरोपीचा खटल्यादरम्यान मृत्यू झाला. कासकर आणि दुसऱ्या एका आरोपीविरुद्ध ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच, नंतर कासकर याच्यासह अन्य आरोपींवर मोक्कांतर्गत खटला चालवण्यात आला. या प्रकरणात कुख्यात गुंड छोटा शकील याला फरारी आरोपी दाखवण्यात आले आहे. दरम्यान, यापूर्वीही कासकर याला दक्षिण मुंबईतील सारा-सहारा मार्केट प्रकरणातून निर्दोष सुटका करण्यात आली होती.



Source link