



१८ व्या शतकातील प्रसिद्ध योद्धा राणी अहिल्याबाई होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त महायुती मंत्रिमंडळाची बैठक ६ मे रोजी पश्चिम महाराष्ट्रातील अहिल्यानगर इथे होणार आहे. अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थान याच जिल्ह्यातले आहे. सरकारमधील काही वरिष्ठ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळ बैठकीतील चर्चेचे मुद्दे अद्याप निश्चित झालेले नाहीत. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यासाठी पायाभूत सुविधा प्रकल्पांपासून ते विविध योजनांपर्यंतच्या परिपूर्ण विकासाच्या पॅकेजवर विशेष भर दिला जाण्याची शक्यता आहे. त्यामध्ये ऐतिहासिक वास्तूंच्या नूतनीकरणावर भर देण्यात येईल. “या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील महायुतीतील तिन्ही पक्षांचे सर्व ४२ मंत्री उपस्थित राहतील”, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सुरुवातीला २९ एप्रिल रोजी निश्चित केली गेलेली ही बैठक ६ मे रोजी होणार आहे. प्रशासनाला पुरेशी तयारी करण्यासाठी जास्तीची वेळ देण्यासाठी बैठकीची तारीख पुढे ढकलण्यात आली आहे.
मंत्रिमंडळाने अहिल्यानगरची निवड का केली?
दर आठवड्याला राज्य मंत्रिमंडळाची बैठक ही मुंबईत पार पडते. याआधीही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकार आणि शिवसेना-भाजपा सरकारने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मंत्रिमंडळ बैठका घेतल्या होत्या. अशा मागासलेल्या आणि दुष्काळग्रस्त भागाच्या विकासासाठी प्रयत्न करीत असल्याचे दाखवण्याचा पक्षांचा हा प्रयत्न होता. महायुती मंत्रिमंडळाची अहिल्यानगर येथी ल बैठक महत्त्वाची मानली जात आहे. अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या त्रिशताब्दीनिमित्तच्या कार्यक्रमाचे औचित्य यावेळी आहे. महाराष्ट्रातील कोणत्याही पक्षाच्या किंवा युतीच्या सरकारने आतापर्यंत या जिल्ह्यात आयोजित केलेली ही पहिलीच बैठक आहे. २०२३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने राणी होळकरांच्या सन्मानार्थ अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून अहिल्यानगर असे केले.
अहिल्याबाई होळकर यांच्याविषयी…
अहिल्याबाई होळकर यांचा जन्म मे १७२५ मध्ये अहिल्यानगरमधील चोंडी इथे झाला. त्यांचे वडील पाटील मानकोजी शिंदे हे धनगर कुळातील होते. ऐतिहासिकदृष्ट्या धनगर हा एक मेढपाळांचा समुदाय होता. त्यांनी मराठ्यांच्या उदयात महत्त्वाची भूमिका बजावली. अहिल्याबाईंचा विवाह १२ व्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेराव होळकर यांच्याशी झाला. ते मराठा साम्राज्याचे एक प्रमुख राजे होते. १७५४ मध्ये त्यांचे पती खंडेराव आणि नंतर १७६६ मध्ये त्यांचे सासरे मल्हारराव यांच्या अकाली निधनानंतर तीव्र विरोधाला तोंड देत अहिल्याबाई सिंहासनावर विराजमान झाल्या. त्यांनी सक्षम महिला शासक म्हणून त्यांचा असाधारण ठसा उमटवला. त्यांनी केलेल्या सार्वजनिक कल्याणकारी प्रयत्नांमुळे आणि प्रार्थनास्थळांच्या नूतनीकरण आणि बांधकामात केलेल्या योगदानामुळे राज्य नव्याने उभे राहिले. त्यांनी होळकर प्रदेशात रस्ते, विहिरी, घाट, मंदिरे आणि धर्मशाळादेखील बांधल्या. लग्नानंतर त्यांचे संपूर्ण आयुष्य आणि होळकर साम्राज्याच्या शासक म्हणून नंतरचा काळ त्यांनी मध्य प्रदेशातील इंदूर इथे घालवला. त्यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त महायुती सरकार चोंडी येथे मंत्रिमंडळाची बैठक घेणार आहे.
मंत्रिमंडळ बैठकीचे महत्त्व काय?
महाराष्ट्राच्या विधानसभेत फडणवीस यांनी विविध क्षेत्रांतील अहिल्याबाईंच्या कामगिरीची रूपरेषा मांडली आहे. राज्य विधान परिषदेचे अध्यक्ष राम शिंदे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आणि इतर विभागांसह अनेक नेते मंत्रिमंडळ बैठकीच्या तयारीवर देखरेख करीत आहेत. चोंडी येथे बैठकीची व्यवस्था करण्यासाठी आणि मूलभूत पायाभूत सुविधा उभारण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने १.५ कोटी रुपयांची निविदा जारी केली आहे. अहिल्याबाई या सर्व जाती आणि समुदायांमध्ये अत्यंत आदरणीय असल्या तरी सध्याचे होळकर धनगर समुदायाचे नेतृत्व करतात. राज्याच्या लोकसंख्येच्या नऊ टक्के इतका असलेला हा समुदाय एक महत्त्वाची व्होट बँक मानला जातो. निवडणुकांच्या अनुषंगाने सात ते नऊ लोकसभा जागांमध्ये आणि ३५ ते ४० विधानसभा मतदारसंघांमध्ये धनगर समाज निर्णायक भूमिका बजावतो.
२०१२-१३ मध्ये भाजपाने धनगरांना अनुसूचित जमाती (एसटी)अंतर्गत आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते, जे अद्याप पूर्ण झालेले नाही. धनगरांना सध्या भटक्या जमाती (क) या यादीत समाविष्ट केले गेले आहे. त्यांना सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये ३.५ टक्के आरक्षण देण्यात आले आहे. असे असताना ते एसटी या वर्गांतर्गत आरक्षणासाठी आंदोलन करीत आहेत. गेल्या अनेक वर्षांत फडणवीस सरकारने २०१४ ते २०१९ या त्यांच्या पहिल्या कार्यकाळात आणि २०२४ पासूनच्या सध्याच्या कार्यकाळात धनगर समाजासाठी कल्याणकारी योजना आणि निधी राखून ठेवला आहे. १९८० च्या दशकाच्या सुरुवातीपासूनच भाजपा धनगर समुदायाचा विश्वास संपादन करू पाहत आहे. भाजपाचे वसंत भागवत राज्यातील प्रमुख इतर मागासवर्गीय आणि आदिवासी समुदायांमध्ये आपला पाय घट्ट रोवण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यासाठी त्यांनी माळी, धनगर आणि वंजारी असा ‘माधव फॉर्म्युला’ स्वीकारला होता.
अहमदनगरचे नाव का बदलले?
२०२४च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीआधी महायुती सरकारने अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर असे केले. हिंदू व धनगर या दोघांनाही आकर्षित करण्याच्या आणि मुघल शासकांविरुद्ध त्यांची भूमिका स्पष्ट करण्याच्या त्यांच्या धोरणाचा हा एक भाग होता.
विरोधी पक्षाची भूमिका
या मंत्रिमंडळ बैठकीवर केल्या जाणाऱ्या निधीवरून विरोधी पक्षांनी सरकारवर बोट उचलले आहे. याआधी सरकारने अहिल्यानगरमध्ये मंत्रिमंडळ बैठकीसाठी १५० कोटी रुपयांच्या विकासकामांची निविदा काढली होती. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर टीका केली.
“हेलिपॅड, मंडप, स्वच्छतागृहे उभारण्यासाठी प्रचंड निधी खर्च केला जात आहे. अशा वेळी अहिल्यानगरमध्ये मंत्रिमंडळ बैठक घेण्याची गरज आहे कुठे, असा प्रश्न सपकाळ यांनी उपस्थित केला आहे. “सर्व दिखावा करण्यासाठी एका मंत्रिमंडळ बैठकीकरिता १५० कोटी रुपये खर्च केले जात आहेत. तेही अशा वेळी जेव्हा सरकार दिवाळखोरीत सापडले आहे आणि त्यांच्याकडे ज्येष्ठ नागरिक तीर्थयात्रा सुरू ठेवण्यासाठी पैसे नाहीत. लाडकी बहीण योजनेचे पैसे दीड हजारावरून २१०० रुपये करण्यासाठीही निधी नाही”, असेही त्यांनी म्हटले.
विरोधकांनी निधीबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर पीडब्ल्यूडीने यावर स्पष्टीकरण दिले आहे. “१५० कोटी रुपयांची निविदा चुकून जारी करण्यात आली, ती १.५ कोटी अशी आहे. सपकाळ यांच्यासारखे वरिष्ठ नेते बिनबुडाचे आरोप करीत आहेत”, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

Investigating a photo of Buddha’s tooth relic: बौद्ध धर्म हा भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. या धर्माच्या मार्फत भारतीय संस्कृती जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. त्यामुळेच आजही आशियातील अनेक देशांमध्ये भारतीय संस्कृतीची पाळंमुळं सापडतात. या बाबतीत श्रीलंका अग्रेसर आहे. भारत आणि श्रीलंकेला विलग करणारा समुद्र असला तरीही सांस्कृतिक नाळ आजही अबाधित आहे.
रामायण, बौद्ध धर्म या दोन्ही परंपरांनी हा बंध अधिकच दृढ केला आहे. याच बंधातील एक दुवा सध्या विशेष चर्चेत आहे. तो म्हणजे गौतम बुद्धांच्या दंत अवशेषाचा फोटो. गौतम बुद्धांच्या पवित्र दाताच्या अवशेषाचा दुर्मिळ फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. यामुळे श्रीलंकेतील पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.
गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) या फोटोची सत्यता तपासण्यासाठी चौकशी सुरु केली आहे. या तपासाचा उद्देश्य वायरल झालेला डिजिटल फोटो सर्व प्लॅटफॉर्मवरून डिलीट झाला आहे की नाही याची खातरजमा करणे हा आहे.
गौतम बुद्धांचा दंत अवशेष हा कँडी शहरातील प्रसिद्ध टेंपल ऑफ द टूथ या मंदिरात आहे. NewsX ने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, सध्या वायरल होणारा फोटो हा याच मंदिरातून घेतल्याचा दावा आहे. अलीकडेच गौतम बुद्धांचे दंत अवशेष हे सार्वजनिक दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. हा अवशेष सार्वजनिक प्रदर्शनासाठी फारच कमी वेळा ठेवण्यात येतो. १६ वर्षांनंतर प्रथमच राष्ट्रपती अनुर कुमार दिसानायके यांच्या विनंतीवरून हा दंत अवशेष काटेकोर सुरक्षेअंतर्गत प्रदर्शनासाठी ठेवण्यात आला होता. यावेळी फोटो काढण्यास सक्त मनाई होती. किंबहुना मंदिरात प्रवेश करताना भाविकांची तपासणी केली जाते. कुठल्याही प्रकारच्या वस्तू मंदिरात नेण्यास परवानगी नाही. मोबाइल फोन वापरणेही पूर्णतः निषिद्ध आहे. त्यामुळेच इतका कडेकोट बंदोबस्त असताना जर फोटो घेतला असेल तर ही गंभीर बाब असल्याचे मानले जात आहे.
महापरिनिब्बान सुत्तात नमूद केल्याप्रमाणे, गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांच्या चार दातांचे अवशेष मागे शिल्लक होते. त्यातील दोन दातांपैकी एक त्रायस्त्रिंश देवांच्या लोकात आणि दुसरा नागराजाच्या राज्यात होता. तर उरलेले दोन दंत अवशेष पृथ्वीवर गंधार आणि कलिंगमध्ये होते. महावंस आणि दाठावंस या ग्रंथामध्ये उल्लेख केल्याप्रमाणे, गौतम बुद्धांवरील अंत्यसंस्कारानंतर त्यांचा डावा ‘canine tooth’ त्यांचे शिष्य खेमा यांना प्राप्त झाला. खेमा यांनी हा दंत अवशेष कलिंगच्या ब्रह्मदत्त राजाला पूजा करण्यासाठी दिला आणि तो दंतपुरा (आधुनिक दंतपुरम) येथे ठेवण्यात आला होता. याच कालखंडात हा दात ज्याच्याकडे असेल त्याला सर्व प्रकारची कीर्ती मिळते अशी वदंता पसरली. त्यामुळे कलिंगचा गुहसीव राजा आणि पांडू राजा यांच्यात युद्ध झाल्याचा उल्लेख दाठावंसमध्ये आहे. प्रचलित दंतकथेनुसार, कलिंगमध्ये झालेल्या संघर्षानंतर हा दंत अवशेष श्रीलंकेतील अनुराधापूर येथील अभयगिरी विहारात नेण्यात आला. त्यानंतर श्रीलंकेच्या बदलत्या राजधानीप्रमाणे या अवशेषांचेही स्थान बदलत होते. अखेरीस, हा दंत अवशेष कॅंडी शहरात नेण्यात आला आणि सध्या तो दंतमंदिरात (Temple of the Tooth) आहे. मात्र, ब्रिटिश इतिहासकार चार्ल्स बॉक्सर यांचे म्हणणे वेगळे होते. त्यांनी नमूद केल्याप्रमाणे, गोवाच्या बिशपने १५५० च्या सुमारास स्थानिक धर्म नष्ट करण्याच्या प्रयत्नात बुद्धधर्मासाठी अत्यंत पवित्र मानला जाणारा हा दात जाहिरपणे खलबत्त्यामध्ये कुटून नष्ट केला होता. परंतु, त्यांनी मांडलेल्या या गृहीतकाची सत्यता सिद्ध करणारे पुरावे नाहीत.
सध्या श्रीलंकन सरकारने गुन्हे अन्वेषण विभागाला वायरल फोटोची सत्यता तपासण्याचे आदेश दिले आले आहेत. हा फोटो नेमका कधी काढण्यात आला हे तपासण्यासाठी पोलिसांना आदेश देण्यात आले आहे. हा फोटो भाविकांपैकी कोणी घेतला आहे का? किंवा कृत्रिमरीत्या तयार करण्यात आला आहे, याची पडताळणी सध्या पोलीस करत आहेत.
हा पवित्र दात केवळ धार्मिकच नव्हे, तर श्रीलंकेतील राजकीय सार्वभौमत्वाचं प्रतीक मानला जातो. ऐतिहासिक नोंदीनुसार, हा दंत अवशेष १५९० साली कँडी शहरात आला. Press Trust of India ने दिलेल्या वृत्तानुसार, पारंपारिकरित्या हा दंत अवशेष कधीच सार्वजनिकरित्या दर्शनासाठी ठेवला जात नव्हता. या पवित्र स्थळी मुख्य प्रवेश पूर्वी केवळ राजांना आणि काही महत्त्वाच्या भिक्षूंनाच होता. मात्र, आधुनिक कालखंडात दर्शनासाठी सामान्य लोकांनाही प्रवेश देण्यात आला. परंतु, लांबूनच दर्शन घेण्याची परवानगी आहे. यावेळी सार्वजनिक प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशीच सुमारे १,२५,००० भक्तांनी मंदिराला भेट दिली. हे प्रदर्शन दररोज पाच तासांहून अधिक वेळ खुलं आहे. हे १० दिवसांचं प्रदर्शन २७ एप्रिलला संपणार आहे. या दर्शनासाठी आलेल्या प्रचंड गर्दीमुळे कँडी शहरात वाहतूक विस्कळीत झाली असून हजारो भक्त रात्रभर मंदिर परिसरात ठाण मांडून बसले होते.


Pahalgam Terror Attack Modi Mann Ki Baat: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज आपल्या मासिक ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या 121 व्या भागामध्ये देशाला संबोधित केलं. पंतप्रधान मोदींनी यावेळेस पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यासंदर्भात आपल्या भावना व्यक्त करताना, या हल्ल्याने संपूर्ण देश दुखी असल्याचं सांगितलं. दहशतवादी “हल्ल्याचे फोटो पाहून प्रत्येक भारतीयाचा संताप आणि रक्त उसळून येत आहे. हा हल्ला दहशतवाद्यांचा दुबळेपणा दाखवतो. काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित होत होती. विकास कामांना गती मिळत होती हे दहशतवाद्यांना पाहवलं नाही”, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
“जम्मू-काश्मीरमधील पर्यटकांच्या संख्येत विक्रमी वाढ होत होती. या माध्यमातून स्थानिकांच्या कमाईमध्ये वाढ होत होती. मात्र दहशतवाद्यांना हे सारं सहन झालं नाही”, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले. “दहशतवादाविरूद्धच्या या लढाईमध्ये 140 कोटी भारतीयांनी एकत्र राहणं ही सर्वात मोठी ताकद आहे. ही आपल्यामधील एकताच आपल्या दहशतवादाविरूद्धच्या लढाईमधील सर्वात मोठा आधार आहे”, असंही मोदींनी म्हटलं आहे.
दहशतवादी हल्ल्याबद्दल बोलताना पंतप्रधानांनी, “आज जग पाहत आहे की संपूर्ण भारत या दहशतवादी हल्ल्याविरोधात एकाच स्वरात आवाज उठवत आहे. भारतामधील लोकांमध्ये जो संताप आहे तोच संपूर्ण जगात आहे. मला अनेक अंतरराष्ट्रीय नेत्यांचे फोन आले. त्यांनी मला विशेष मेसेजही पाठवले. या हल्ल्याचा सर्वांनीच निषेध खेला आहे. सर्वांनीच मयत व्यक्तींच्या कुटुंबांबद्दल सांत्वना व्यक्त केली. संपूर्ण जग या लढाईमध्ये आपल्यासोबत आहे. पीडितांच्या कुटुंबियांना मी विश्वास देऊ इच्छितो की त्यांना नक्कीच न्याय मिळेल. हा कट रचणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली जाईल,” असं आश्वासन दिलं.
दहशतवाद्यांनी पहलगाम येथे पर्यटकांवर हल्ला करण्याचा कट का रचला याबद्दलही पंतप्रधानांनी भाष्य केलं. “या दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील वेगवेगळ्या राज्यांमधील, वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या नागरिकांना पिडितांच्या दुखाचा अंदाज आहे. दहशतवाद्यांच्या हस्तकांना पुन्हा एकदा काश्मीर उद्धवस्त झालेलं पाहायचं आहे. त्यासाठीच त्यांनी एवढा मोठा कट रचला. देशासमोरच्या या आव्हानांना तोंड देण्यासाठी आपल्याला ठामपणे उभं राहायला हवं”, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी मन की बातमध्ये ‘सचेत’ नावाच्या अॅप्लिकेशनबद्दलही भाष्य केलं. “नैसर्गिक आपत्तींमध्ये तुम्ही अडकून पडू नये यासाठी हे अॅप्लिकेशन भारतीयांना फायद्याचं ठरु शकतं,” असं पंतप्रधानांनी सांगितलं. “हे अॅप्लिकेशन भारताच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनक प्राधिकरणाने विकसित केलं आहे. ‘सचेत’ अॅप्लिकेशनचा हेतू हा लोकांना मदत करण्याचा आणि त्यांना सुरक्षित ठेवण्याचा आहे. या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून हवामानाचे अपडेट्स मिळवता येतील,” असं मोदींनी भारतीयांना सांगितलं. तसेच हे अॅप्लिकेशन अनेक स्थानिक भाषांमध्ये उपलब्ध असल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी दिली.

नागपूर : राज्यात आणि विशेषकरुन विदर्भात तापमानाचा पारा चांगलाच चढला होता. विदर्भातील तापमान ४६ अंश सेल्सिअसपर्यंत जाऊन पोहोचले होते. तब्बल तीन शहरे ४५ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तर अधिकांश शहरांमध्ये पारा अंश सेल्सिअसवर गेला होता. मध्य महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात देखील तापमानाने बरेच रेकॉर्ड मोडले होते. याठिकाणीदेखील अनेक शहरांमध्ये पारा ४४ अंशापर्यंत जाऊन पोहोचला होता. संपूर्ण राज्यच उष्णतेत होरपळत असताना हवामान खात्याने आता दिलासा देणारा अंदाज व्यक्त केला आहे. भारतीय हवामान खात्याने येत्या तीन ते चार दिवसांसाठी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात येत्या तीन ते चार दिवसात संमीश्र स्वरुपाचे हवामान राहण्याची शक्यता आहे. विदर्भात रविवार आणि सोमवार असे दोनही दिवस गारपिटीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय वादळी वाऱ्यासह आणि ढगांच्या गडगडासह पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आला असून काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मराठवाडा, मध्य महाराष्ट्र येथेही उष्णदमट हवामानासह पावसाची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भातील चंद्रपूर तसेच गडचिरोली जिल्ह्याला रविवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट तर २८ एप्रिल म्हणजेच सोमवारी भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये तसेच मराठवाडा अन् दक्षिण महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पर्वतीय भागांमधील हवामानामध्ये झालेल्या बदलांसह दक्षिण भारताकडून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील हवामानावर परिणाम होत आहे. गेले काही दिवस राज्यात तापमानात चांगलीच वाढ झाली होती.
ब्रम्हपूरी येथे सर्वाधिक ४५.९ अंश सेल्सिअस इतकी तापमानाची नोंद करण्यात आली. चंद्रपूर तसेच अकोला येथेही तापमान ४५ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. तर अनेक शहरांमध्ये तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही शहरांमध्ये तापमान ४४ अंश सेल्सिअसपर्यंत जाऊन पोहोचले. मात्र, आता हवामानात बदल होणार असून पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होत आहे. विदर्भातल्या अनेक जिल्ह्यात विजांच्या कडकडाटसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यातही मध्यम स्वरुपाचा पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
प्रामुख्याने लातूर, धाराशिव, नांदेड, सोलापूर या भागात गारपिटीचाही इशारा देण्यात आला आहे. तर, अकोला परिसरात उष्णतेची लाट मात्र कायम असेल. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सातारा, सांगलीपासून सिंधुदुर्गापर्यंत पावसाळी वातावरण असणार आहे. तर काही ठिकाणी वादळी पावसाची हजेरी राहील. सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, परभणी, बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट देण्यात आला आहे.

अमरावती : राज्यात १ जानेवारी २०२५ पासून दुष्काळ वगळता, इतर नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या शेतीपिके नुकसानीकरिता मदत देण्यासाठी ‘सामान्यकृत फरक वनस्पती निर्देशांक’ (एनडीव्हीआय) हा निकष लागू करण्याबाबत आणि कृषी विभागाद्वारे ‘एनडीव्हीआय’ चे निकष तपासण्यासाठी अद्ययावत प्रणाली उभी करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत.
नैसर्गिक आपत्ती सर्वेक्षणाच्या दृष्टीने मध्यप्रदेश राज्यात आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित कार्यपद्धती अवलंबिण्यात येत आहे. त्याचा अभ्यास करण्यासाठी समिती गठित करण्यात आली होती. या अभ्यासगटाने त्यांच्या अहवालात खरीप २०२५-२६ कालावधीमध्ये दुष्काळ वगळता उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीसंदर्भात ‘एनडीव्हीआय’ व इतर (एनडीडब्ल्यू आय, व्हीसीआय, इव्ही, एसएव्हीआय) निकष लागू करण्यासाठी मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र व खानदेश या भौगोलिक विभागातील प्रत्येकी एका जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प राबविण्याबाबत शिफारस केली होती. अपर मुख्य सचिव (महसूल) यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. त्याअनुषंगाने, सन २०२५-२६ मध्ये उपग्रह प्रतिमा वापरून पिकांच्या नुकसानीचे मुल्यांकन करण्यासाठी सामान्यकृत फरक वनस्पती निर्देशांकाचा वापर करण्यासंदर्भात परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी हवामान शास्त्रज्ञ, अखिल भारतीय समन्वयीत कृषी हवामानशास्त्र संशोधन प्रकल्प यांचा प्रस्ताव कृषी आयुक्तालयाकडून प्राप्त झाला होता. या प्रस्तावानुसार प्रकल्पासाठी एकूण अंदाजित खर्च १ कोटी रुपये येणार आहे. ई-गर्व्हर्नन्स कार्यक्रमासंदर्भात आयोजित प्रकल्प अंमलबजावणी समितीच्या बैठकीमध्ये त्यास मान्यता देण्यात आली.
सन २०२५-२६ मध्ये अखिल भारतीय समन्वयीत कृषी हवामानशास्त्र संशोधन प्रकल्प, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी यांचेद्वारे, राज्यातील पिकांच्या परिस्थितीचे, उपग्रहाच्या सहाय्याने प्राप्त प्रतिमांच्या आधारे, सामान्यकृत फरक वनस्पती निर्देशांकाच्या निकषांचा वापर करुन मूल्यांकन करण्यास मान्यता देण्यात आली आहे. यासाठी राज्यातील लागवडीखालील क्षेत्राच्या दर ७ दिवसांनी उपग्रहाच्या सहाय्याने प्रतिमा घेण्यात येणार आहेत.
‘एनडीव्हीआय’ निकषांचा वापर करून पिकांच्या परिस्थितीबाबत जिल्हा, तालुका व शेत पातळीवरील माहिती उपलब्ध करून देणे, परस्परसंवादी ‘एनडीव्हीआय’ विश्लेषणासह ‘रिअल टाइम मॉनिटरिंग डॅशबोर्ड’ विकसित करणे. क्षेत्रीय पातळीवरील माहिती संकलित करणे व शेतकऱ्यांना सल्ला देणे यासाठी मोबाईल अॅप विकसित करणे. लागवडीखालील क्षेत्र, पिकांचे आरोग्य व नुकसानीचा अंदाज यासंदर्भात स्वयंचलित अहवाल तयार करणे, ही कामे करावी लागणार आहेत. विद्यापीठाच्या संशोधन प्रकल्पाला ‘एनडीव्हीआय’शी संबंधित सर्व डेटा आणि इतर तपशील सर्व विभागांना मागणीनुसार उपलब्ध करून देणे अनिवार्य राहणार आहे.


Sunil Shetty Pahalgam Terror Attack : सुनील शेट्टीनं पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर प्रतिक्रिया देत भारतीयांना दिलं आगळं वेगळं आवाहन
Source link