मुंबई इंडियन्सचा संघ लखनौ सुपर जायंट्सविरूद्ध वानखेडेच्या मैदानावर सामना खेळत आहे. आयपीएल २०२५ मधील चॅम्पियन संघ असलेल्या मुंबई इंडियन्ससाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे, कारण आज ESA Day साजरा केला जात आहे. लखनौ विरुद्धच्या सामन्यात, मुंबई इंडियन्स फ्रँचायझी एका खास उपक्रमासह मैदानात उतरली आहे. मुंबई संघाचा हा सामना पाहण्यासाठी १९ हजार गरीब मुलं मैदानात उपस्थित आहेत.
आज मुंबई इंडियन्सचा सामना पाहण्यासाठी १९ हजार मुलं वानखेडे स्टेडियमवर पोहोचली आहेत, ज्यांना त्यांच्या आदर्श खेळाडूंना थेट खेळताना पाहता येईल आणि स्टेडियममधून त्यांना पाठिंबा देत आहेत. मुंबई इंडियन्स संघाकडून ईएसए दिन उपक्रम पहिल्यांदा २०१० मध्ये आयोजित करण्यात आला होता. पण ESA Day नेमका काय आहे, जाणून घेऊया.
काय आहे ESA Day? ESA शब्दाचा फुल फॉर्म काय?
ESA Day हा दिवस रिलायन्स फाउंडेशन आणि मुंबई इंडियन्सचा उपक्रम एज्युकेशन अँड स्पोर्ट्स फॉर ऑल (ESA) याचा एक भाग आहे. या दिवशी, एमआय शहरातील आणि एनजीओमधील मुलांना लाईव्ह सामना पाहण्यासाठी आणि त्यांच्या आवडत्या क्रिकेटपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी आमंत्रित करते.
२०१० मध्ये, मुंबई इंडियन्सच्या मालकीण नीता अंबानी यांनी एजुकेशन एंड स्पोर्ट्स फॉर ऑल म्हणजेच ESA ला प्रोत्साहन देण्यासाठी एक उपक्रम सुरू केला. या उपक्रमांतर्गत, फ्रँचायझी वेगवेगळ्या मुलांना मोफत सामना पाहण्याची संधी देते. यावेळी सुमारे १९,००० मुले खेळाडूंशी संवाद साधताना आणि वानखेडे स्टेडियमच्या वातावरणाचा आनंद घेत आहेत. पहिल्यांदाच मुले लाईव्ह क्रिकेट सामना पाहण्यासाठी आली आहेत.
फलटण :-साताऱ्याच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाची भर घालत, मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज फलटण येथे शिकणाऱ्या कु. अनुष्का केंजळे व कु. तेजस्विनी कर्वे या दोन महिला हॉकी खेळाडूंनी महाराष्ट्राच्या महिला संघात स्थान पटकावले आहे. पुण्यातील बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी राजे क्रीडा संकुलातील एस्ट्रोटर्फ मैदानावर हॉकी इंडिया अंतर्गत, हॉकी महाराष्ट्र आणि क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निवड चाचणीमध्ये त्यांनी हा उल्लेखनीय पराक्रम साधला.
या खेळाडूंचा समावेश असलेला महाराष्ट्र संघ लवकरच बिहार येथे होणाऱ्या ‘खेलो इंडिया’ महिला हॉकी स्पर्धेत सहभागी होणार आहे. त्यासाठी दिनांक 28 एप्रिलपासून बालेवाडीत स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
अनुष्का आणि तेजस्विनी यांना दि हॉकी सातारा संघटनेचे सचिव व ज्येष्ठ प्रशिक्षक श्री. महेश खुटाळे सर आणि प्रशिक्षक श्री. सचिन धुमाळ सर यांनी घडवले असून, सहाय्यक प्रशिक्षक म्हणून श्री. बी. बी. खुरंगे सर यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटी क्रीडा समितीचे चेअरमन श्री. शिवाजीराव घोरपडे, मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य श्री. वसंतराव शेडगे, दि हॉकी सातारा संघटनेचे अध्यक्ष श्री. बाहुबली शहा, तसेच श्री. पंकज पवार, श्री. प्रवीण गाडे, श्री. विजय मोहिते, श्री. महेंद्र जाधव, श्री. सचिन लाळगे आणि माजी राष्ट्रीय खेळाडू श्री. सुजीत निंबाळकर यांनी अभिनंदन केले आहे.
साताऱ्यातील या खेळाडूंच्या घवघवीत यशामुळे जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
What is Bankruptcy : आपण अनेकदा दिवाळखोर किंवा दिवाळखोरी हा शब्द ऐकला असेल. पण दिवाळखोरी म्हणजे नेमकं काय हे अनेकांना माहिती देखील नसेल. आपण आज दिवाळखोरी म्हणजे काय? याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊयात. जेव्हा एखादी व्यक्ती किंवा एखादी संस्था कर्ज चुकविण्यात असमर्थ असते तेव्हा दिवाळखोरी जाहीर केली जाते. यासाठी न्यायालयीन प्रक्रिया झाल्यानंतर न्यायालय याबाबत ठरवत असतं.
जेव्हा एखादी संस्था आर्थिक जबाबदाऱ्या पूर्ण करू शकत नाही किंवा कर्जदारांना पैसे देऊ शकत नाही, तेव्हा ती संस्था किंवा व्यक्ती दिवाळखोरीसाठी न्यायालयात अर्ज करू शकते. अशा प्रकरणामध्ये न्यायालयात याचिका दाखल केली जाते. त्यानंतर या प्रकरणासंदर्भात न्यायालयात सुनावणी पार पडते. तेव्हा न्यायालय त्या व्यक्तीची किंवा संस्थेची बाजू ऐकून घेते आणि त्या प्रकरणात सर्व पुरावे योग्य वाटल्यास न्यायालय दिवाळखोरी जाहीर करण्याच्या संदर्भात निर्णय घेतं.
दरम्यान, दिवाळखोरीच्या संदर्भात न्यायालयात याचिका दाखल केल्यानंतर ज्या कंपनीने किंवा संस्थेने न्यायालयात दिवाळखोरीसाठी याचिका दाखल केली, त्या संस्थेचं सर्व थकीत कर्ज मोजलं जातं. खरं तर ही संपूर्ण प्रक्रिया एवढी सोपी देखील नसते. दिवाळखोरीसाठी अर्ज करणं म्हणजे संबंधित संस्था कर्जाच्या दायित्वातून मुक्त होण्यासाठी एक कायदेशीर प्रक्रिया असते.
हेही वाचा
जर दिवाळखोरीसाठी याचिका दाखल केली असेल तर त्या संबंधित संस्थेच्या किंवा व्यक्तीच्या क्रेडिट रेटिंगवर परिणाम होतो. म्हणजे त्या व्यक्तीला भविष्यात कर्ज घ्यायचं असेल तर अडचणी निर्माण होऊ शकतात. तसेच दिवाळखोरी जाहीर करण्यासाठी ठरावीक वेळ लागतो. तसेच न्यायालयाने संबंधित संस्थेची दिवाळखोरी जाहीर केल्यानंतर त्या संस्थेची किंवा व्यक्तीची मालमत्ता जप्त केली जाते आणि दिवाळखोरीच्या कायद्यानुसार पुढील प्रक्रिया केली जाते.
दरम्यान, दिवाळखोरीमध्ये देखील दोन प्रकार पडतात. त्यामध्ये एक म्हणजे तथ्यात्मक दिवाळखोरी आणि वाणिज्यिक दिवाळखोरी. आता तथ्यात्मक दिवाळखोरीमध्ये संबंधित व्यक्ती किंवा संस्थेकडील मालमत्ता विक्री केल्यानंतरही ही कर्जाची रक्कम बाकी असते. तर वाणिज्यिक दिवाळखोरीमध्ये व्यक्ती किंवा संस्थेकडे अधिक पैसा असतो. मात्र, तरीही कर्ज चुकविता येत नाही. अशा परिस्थितीत न्यायालय योग्य तो निर्णय घेतं आणि दिवाळखोरीची घोषणा करण्यात येत असते.
Allahabad High Court: कनिष्ठ न्यायालयातील एका न्यायाधीशांकडे निकाल लिहिण्याची क्षमता नसल्याच्या मुद्दाल्या अलाहाबाद उच्च न्यायालयाने गांभीर्याने घेतले आहे. त्यानंतर उच्च न्यायालयाने कानपूर नगरचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश अमित वर्मा यांना तीन महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी न्यायिक प्रशिक्षण संस्थेत पाठवले आहे.
उच्च न्यायालयाने म्हटले की, कानपूरचे अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश अमित वर्मा यांच्याकडे निकाल लिहिण्याची क्षमता नाही. आदेश देताना ते कारणे आणि निष्कर्षांचा उल्लेखही करत नाहीत. त्यामुळे त्यांना तीन महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी पाठवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी सांगितले की, अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांचा एक आदेश आधीच रद्द करण्यात आला आहे. त्यानंतरही त्यांनी अशीच चूक पुन्हा केली आहे. यावरून असे दिसून येते की, त्यांना प्रशिक्षणाची गरज आहे. मुन्नी देवी विरुद्ध शशिकला पांडे यांच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती नीरज तिवारी यांनी हा आदेश दिला.
२०१३ मध्ये, कानपूर येथील शशिकला पांडे या महिला घरमालकिनीने भाडे वसुली आणि घराबाहेर काढण्याबाबत न्यायालयात याचिका दाखल केली. ज्यामध्ये न्यायालयाने २९ फेब्रुवारी २०२४ रोजी मुन्नी देवी यांच्या विरुद्ध आदेश दिला. या निर्णयाविरुद्ध मुन्नी देवी यांनी पुनरीक्षण याचिका दाखल केली होती, जी ७ नोव्हेंबर २०२४ रोजी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांनी फेटाळली. यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करून या आदेशाला आव्हान दिले होते.
आव्हान देणाऱ्या याचिकेत असे म्हटले होते की, न्यायाधीशांनी आदेशाची कारणे आणि निष्कर्ष दिलेले नाहीत. न्यायाधीशांनी न्यायालयीन विवेकाचा वापर केलेला नाही. १७ डिसेंबर २४ रोजी उच्च न्यायालयाने अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांचा आदेश रद्द केला आणि नवीन आदेशाची फाइल कनिष्ठ न्यायालयात पाठवली.
हेही वाचा
दरम्यान, याचिकाकर्त्याने पुनरीक्षण याचिकेत नवीन आधार जोडण्यासाठी दुरुस्ती याचिका दाखल केली. जे १ मार्च २५ रोजी कोणतेही कारण न देता अतिरिक्त जिल्हा न्यायाधीशांनी रद्द केली. ज्याला नंतर उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले.
याचिका दाखल करणाऱ्या महिलेने म्हटले की, अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश अमित वर्मा यांनी आधीच्या आदेशात जी चूक केली होती, तीच चूक त्यांनी या आदेशातही केली आहे. त्यामुळे हा आदेश रद्द करावा. ज्यावर न्यायालयाने म्हटले की, न्यायाधीश वर्मा यांच्याकडे निकाल लिहिण्याची क्षमता नाही, त्यामुळे त्यांना प्रशिक्षण दिले पाहिजे.
पुणे: ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या राज्यस्तरीय कार्यशाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधताना महाराष्ट्राला देशातील पहिले बेघरमुक्त राज्य बनविण्याचा निर्धार व्यक्त केला. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ग्रामविकास विभागाने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीचे कौतुक करताना, केंद्र शासनाकडून आणखी दहा लाख घरांना मंजुरी मिळणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. घर मंजूर झाल्यानंतर जमीन उपलब्ध करून देण्यासाठी मोहीम हाती घेण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.
‘यशदा’ येथे झालेल्या या कार्यशाळेत ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, राज्यमंत्री योगेश कदम, प्रधान सचिव एकनाथ डवले, यशदाचे महासंचालक निरंजन सुधांशू, तसेच मुख्यमंत्री सचिवालयातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “प्रशासन लोकाभिमुख आणि गतिमान करण्यासाठी मनुष्यबळाचे योग्य व्यवस्थापन आणि तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करणे आवश्यक आहे. विविध ठिकाणच्या चांगल्या कल्पनांचा अंगीकार करून कार्यक्षम यंत्रणा उभारावी.”
त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनेतील घरे ‘प्रधानमंत्री सूर्यघर’ योजनेच्या माध्यमातून सौरऊर्जेने वीजसंपन्न करण्याचा प्रस्ताव मांडला. यासाठी मनुष्यबळ आणि निधी विविध योजनांमधून उपलब्ध करून देण्याचे आवाहन केले. त्यामुळे रोजगार निर्मितीचेही नवीन मार्ग खुलतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
१०० दिवस कार्यक्रमात उत्तम कामगिरी करणाऱ्यांना सन्मान
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, राज्य शासनाच्या १०० दिवस कार्यक्रमात ग्रामविकास विभागाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या परीक्षणानंतर उत्तम काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची निवड करून त्यांचा सन्मान केला जाणार आहे.
“या कार्यक्रमातून राज्यातील १२,५०० कार्यालयांमध्ये कामकाजात पारदर्शकता वाढवून प्रशासनाबाबतचा विश्वास वाढविण्यात यश आले आहे,” असेही ते म्हणाले.
जलजीवन, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रावर विशेष भर
मुख्यमंत्री फडणवीस यांनी जलजीवन योजनेतील त्रुटी दूर करून योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा आदेश दिला. तसेच येत्या पाच वर्षात प्रत्येक पाच किलोमीटर अंतरावर उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करण्यावर भर देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अंगणवाडीपासून शैक्षणिक सुधारणा राबवून सेवाभावी संस्थांच्या मदतीने प्रगती साधावी, असेही ते म्हणाले.
महिलांच्या सक्षमीकरणासाठी ‘लखपती दीदी’सारख्या योजना प्रभावीपणे राबवण्याचे आवाहन
मुख्यमंत्री फडणवीस यांनी बचत गटातील महिलांना फिरती बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास त्यांच्या उत्पादनाला चांगली बाजारपेठ मिळेल आणि महिलांच्या आर्थिक स्वावलंबनात मोठा बदल घडेल, असे सांगितले.
३० लाख घरे उभारण्याचे ग्रामविकास विभागाचे लक्ष्य – मंत्री जयकुमार गोरे
कार्यशाळेत बोलताना ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले की, आतापर्यंत साडेतेरा लाख घरांना मान्यता देण्यात आली असून त्यापैकी ४६ हजार घरे पूर्ण झाली आहेत. ग्रामविकास विभाग ३० लाख घरे उभारण्याच्या दिशेने काम करत आहे आणि यासाठी जमीन उपलब्ध करण्यावर भर दिला जात आहे.
कार्यक्रमातील महत्त्वाचे उपक्रम आणि उद्घाटन
या कार्यशाळेत ग्रामविकास विभागाच्या विविध उपक्रमांचे उद्घाटन करण्यात आले. त्यात सिंगल युनिफाईड पोर्टल, आवास वितरण ॲप, भूमिलाभ पोर्टल, महाआवास अभियान डॅशबोर्ड आणि नरेगा डॅशबोर्डचा समावेश आहे. तसेच २० जिल्हा परिषदांनी राबवलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांवर आधारित पुस्तिका आणि ‘महाआवास त्रैमासिक’चे प्रकाशनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.
मुख्यमंत्र्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सहा गटांमध्ये विभागून विविध विषयांवर उत्तम कल्पना आणि कार्यपद्धती विकसित करण्याचे निर्देश दिले.
कार्यक्रमाला राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
फलटण प्रतिनिधी:फलटण तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव समितीच्या वतीने यंदा पारंपरिक शिवजयंती मोठ्या दिमाखात व जल्लोषात साजरी होणार आहे. संपूर्ण फलटण शहर आणि ग्रामीण भाग भगवामय झाला असून, ऐतिहासिक कमानी, आकर्षक सजावट, गड-किल्ल्यांवरून येणाऱ्या शिवज्योती आणि भव्य अश्वारूढ पुतळ्यांनी शिवप्रेमींच्या हृदयात नवचैतन्य निर्माण झाले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौक व छत्रपती संभाजी महाराज स्मारक परिसर आकर्षक रोषणाईने उजळून निघाले आहे. गजानन चौकात उभारलेला भव्य अश्वारूढ शिवमूर्ति सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. मोटरसायकल व सायकल भगव्या झेंड्यांनी सजवून शिवभक्तांनी आपल्या प्रेमाची अनोखी अभिव्यक्ती केली आहे.
फलटण तालुका समितीने विविध कार्यक्रमांची आखणी केली असून, सोमवार, २८ एप्रिल २०२५ रोजी रात्री ८:३० वा. शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांचे “स्वराज्याचा छावा” या विषयावर व्याख्यान होणार आहे. त्यानंतर रात्री ११:३० वा. शिवछत्रपतींचा अभिषेक सोहळा होईल. स्थळ: शिवतीर्थ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, फलटण.
मंगळवार, २९ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ८:०० वा. मुधोजी क्लब, माळजाई मंदिर परिसरातून भव्य बाइक रॅलीची सुरुवात होणार आहे. तसेच सायंकाळी ५:३० वा. पारंपरिक व भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.
सर्व शिवभक्त व शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवजयंतीच्या उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन समितीने केले आहे.
जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे २२ एप्रिलला दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. त्यानंतर केंद्र सरकारने देशभरात राहत असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना २८ एप्रिलपर्यंत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. त्याच दरम्यान पुण्यात राहणार्या जम्मू काश्मीर येथील तरुणांना सोशल मीडियावर धमक्या दिल्याची घटना घडली आहे. त्याबाबत काही तरुणांनी एकत्रित येत पुण्यात पत्रकार परिषद घेतली.
यावेळी काश्मिरी तरुण आकिब भट म्हणाले, पहलगाममध्ये झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. यामध्ये सगळ्यात जास्त दुःख आम्हाला झाले आहे. हा हल्ला झाल्यानंतर स्थानिक काश्मिरी लोकांवर डाग लावला जात आहे. हे चुकीचे असून पहलगाममध्ये हल्ल्यानंतर येथील स्थानिक नागरिकांनी सर्व पर्यटकांना घरामध्ये राहण्यास जागा दिली. तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आंदोलन करित निषेध नोंदविला. त्यानंतर छत्तीसगड आणि उत्तराखंडमध्ये काश्मीर येथील विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आल्याच्या घटना घडल्या आहेत. यामुळे पुण्यासह अन्य भागात राहणार्या काश्मिरी तरुणांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आता जे विद्यार्थी काश्मिरीमध्ये गेले आहेत. ते पुन्हा काश्मीर सोडून येण्यास तयार नसल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच ते पुढे म्हणाले, मी २० वर्षापासून पुण्यात राहतोय, इथेच लहानाचा मोठा झालो. मला येथील नागरिकांनी वेळोवेळी साथ दिली आहे. पण पहलगाम येथील घटनेनेनंतर मला इंस्टाग्रामवर धमकीचे मेसेज आले आहेत. धरम पुछ के मारा था… धर्म बोल के मारेंगे अशा प्रकारचे स्टेटस ठेवले जात आहेत. त्या पार्श्वभूमीवर आम्हाला येणाऱ्या धमक्या किंवा समस्या सोडविण्यासाठी एक वरिष्ठ पोलीस अधिकारी आम्हाला द्यावा, जेणेकरून आम्ही संपर्क करून आमच्या अडचणी त्यांना सांगू, त्या पार्श्वभूमीवर आम्ही उद्या पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Pahalgam Attack How Mysuru Man Survived with His Family and Other 35 People Said Climbed Under Fence and Hide in Pit | “त्या दोन गोळ्यांचा आवाज आला आणि…”, दहशतवादी हल्ल्यातून थोडक्यात बचावलेल्या प्रसन्न कुमार यांनी काय सांगितलं?
MHADA will get three and a half thousand houses from Bandra Reclamation, Adarsh Nagar redevelopment! वांद्रे रिक्लेमेशन, आदर्शनगर पुनर्विकासातून म्हाडाला साडेतीन हजार घरे मिळणार!