Tuesday, September 22, 2026
Homeक्रीडाबालेवाडीत महाराष्ट्र महिला हॉकी संघासाठी फलटण  येथील  अनुष्का केंजळे आणि तेजस्विनी कर्वे...

बालेवाडीत महाराष्ट्र महिला हॉकी संघासाठी फलटण  येथील  अनुष्का केंजळे आणि तेजस्विनी कर्वे यांची निवड

फलटण :-साताऱ्याच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाची भर घालत, मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज फलटण येथे शिकणाऱ्या कु. अनुष्का केंजळे व कु. तेजस्विनी कर्वे या दोन महिला हॉकी खेळाडूंनी महाराष्ट्राच्या महिला संघात स्थान पटकावले आहे. पुण्यातील बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी राजे क्रीडा संकुलातील एस्ट्रोटर्फ मैदानावर हॉकी इंडिया अंतर्गत, हॉकी महाराष्ट्र आणि क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित निवड चाचणीमध्ये त्यांनी हा उल्लेखनीय पराक्रम साधला.

या खेळाडूंचा समावेश असलेला महाराष्ट्र संघ लवकरच बिहार येथे होणाऱ्या ‘खेलो इंडिया’ महिला हॉकी स्पर्धेत सहभागी होणार आहे. त्यासाठी दिनांक 28 एप्रिलपासून बालेवाडीत स्पर्धापूर्व प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

अनुष्का आणि तेजस्विनी यांना दि हॉकी सातारा संघटनेचे सचिव व ज्येष्ठ प्रशिक्षक श्री. महेश खुटाळे सर आणि प्रशिक्षक श्री. सचिन धुमाळ सर यांनी घडवले असून, सहाय्यक प्रशिक्षक म्हणून श्री. बी. बी. खुरंगे सर यांनी मोलाचे योगदान दिले आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटी क्रीडा समितीचे चेअरमन श्री. शिवाजीराव घोरपडे, मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य श्री. वसंतराव शेडगे, दि हॉकी सातारा संघटनेचे अध्यक्ष श्री. बाहुबली शहा, तसेच श्री. पंकज पवार, श्री. प्रवीण गाडे, श्री. विजय मोहिते, श्री. महेंद्र जाधव, श्री. सचिन लाळगे आणि माजी राष्ट्रीय खेळाडू श्री. सुजीत निंबाळकर यांनी अभिनंदन केले आहे.

साताऱ्यातील या खेळाडूंच्या घवघवीत यशामुळे जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments