Friday, June 26, 2026
Home Blog Page 33

सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षकांना भोवलं; तुषार दोशींना सक्तीच्या रजेवर जाण्याचे

0


Tushar Doshi Satara Zilla Parishad Election 2026: सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी (Satara Zilla Parishad Election 2026) मोठा राडा झाला होता. पोलिसांकडून झालेल्या धक्काबुक्कीमुळे संतापलेले शिवसेनेचे मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी विधानसभेत आक्रमक पवित्रा घेतला होता. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देखील सातारा राडा प्रकरणी नाराजी बोलावून दाखवली होती. तसेच शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांकडून तुषार दोशी (Tushar Doshi) यांना निलंबन करण्याची मागणी केली होती. मात्र यानंतरही तुषार दोशी पोलीस अधिक्षक कार्यालयात दाखल झाले होते. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही सदर प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. यानंतर आता महत्वाची माहिती समोर आली आहे. 

सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी (Tushar Doshi) यांना भोवले आहे. सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरणाची चौकशी होईपर्यंत सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशी होईपर्यंत अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्याकडे सातारा पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

कोण आहेत तुषार दोशी? (Who Is Tushar Doshi?)

तुषार दोशी हे महाराष्ट्र पोलीस दलातील एक वरिष्ठ IPS अधिकारी (पोलीस अधीक्षक) आहेत, जे सध्या सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीदरम्यान झालेल्या गदारोळामुळे आणि राजकीय संघर्षामुळे चर्चेत आहेत. त्यांच्यावर विधानपरिषदेत निलंबनाची घोषणा झाली होती. सुरुवातीला विधानपरिषदेत उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी निलंबनाचे आदेश दिले होते, पण नंतर राम शिंदे यांच्या आदेशानंतर निलंबन रद्द होऊन ते पुन्हा पोलीस अधीक्षक सातारा कार्यालयात दाखल झाले होते. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या वेळी मंत्री शंभूराज देसाईंना झालेल्या धक्काबुक्की प्रकरणी पोलीस यंत्रणेने निष्क्रियता दाखवल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला यापूर्वी जालना येथील मराठा आंदोलनादरम्यान झालेल्या लाठीमार प्रकरणातही त्यांचे नाव चर्चेत आले होते.

सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवेळी नेमकं काय घडलेलं? (Satara Zilla Parishad Election 2026)

  1. जि.परिषदेत शिवसेना-राष्ट्रवादी युतीचे 65 पैकी 35 जागा मिळवत बहुमत
  2. भाजप 27 जागांसह सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर
  3. साताऱ्यात बहुमतासाठी 33 सदस्यांच्या पाठिंब्याची होती गरज
  4. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने 6 सदस्य फोडत अध्यक्ष बनवला
  5. भाजपने शिवसेनेचे 2,राष्ट्रवादीचे 3 सदस्य फोडले 
  6. भाजपने एका अपक्षाचाही पाठिंबा मिळवत अध्यक्षपदाची निवडणूक जिंकली
  7. इतर दोन सदस्यांना पोलिसांनी मतदानापासून रोखल्याचा शिवसेनेचा आरोप

एकनाथ शिंदे काय म्हणाले होते? (Eknath Shinde On Satara ZP)

सातारा जिल्ह्यातील घटनेसंदर्भात माहिती शंभुराज देसाई आणि अर्जुन खोतकर यांनी मांडली. ⁠याचा मी साक्षीदार आहे. ⁠तिथे पाच ते दहा वर्षांपूर्वीचा गुन्हा दाखल केला. मी पोलीस अधीक्षकांना फोन केला की, त्यांना मतदानाच्या नंतर कारवाई करा. ⁠मतदानापासून वंचित ठेवता येत नाही. ⁠ते म्हणाले लगेच कारवाई करत नाही.  ⁠मी पोलिस महासंचालकांना देखील फोन केला. ⁠मी तुषार दोषी यांच्याकडून खात्री केली होती. ⁠ते म्हणाले, मला फोन आला होता. ⁠मतदानापासून वंचित ठेवणे हा लोकशाहीचा खून करणे आहे. मंत्र्यांना देखील बघितले नाही. ⁠आरोपी प्रमाणे मंत्र्यांना घेऊन गेले.⁠दोनच जणांना मतदानाला ते कसे घेऊन गेले? ⁠महाराष्टाराच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी परिस्थिती पाहिली, असे एकनाथ शिंदे म्हणाले होते. 

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले होते? (Devendra Fadnavis On Satara ZP)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जी वस्तुस्थिती सांगितली आहे, त्याची चौकशी केली जाईल. ⁠त्यानुसार कारवाई केली जाईल, असे म्हणत त्यांनी एका वाक्यात विषय संपवला. 

संबंधित बातमी:

Satara ZP Election: एकनाथ शिंदे सातारा SP आणि राड्याची माहिती देत असतानाच फडणवीसांची एन्ट्री, मोठा वाद मुख्यमंत्र्यांनी एका वाक्यात संपवला

आणखी वाचा



Source link

चक्रवर्ती सम्राट अशोकांचा आदर्श अंगीकारून समाज एकत्र आणण्याची गरज – दादासाहेब भोसले

0
चक्रवर्ती सम्राट अशोकांचा आदर्श अंगीकारून समाज एकत्र आणण्याची गरज – दादासाहेब भोसले

चक्रवर्ती सम्राट अशोकांचा आदर्श अंगीकारून समाज एकत्र आणण्याची गरज – दादासाहेब भोसले

फलटण : चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या 2330 व्या जयंतीनिमित्त फुले-शाहू-आंबेडकर सभागृह, बुद्ध विहार, कोळकी येथे भारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा (पूर्व) यांच्या वतीने जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी भारतीय बौद्ध महासभा राज्य शाखेचे संघटक तसेच समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर व सातारा-पुणे जिल्ह्याचे प्रभारी आयुष्यमान दादासाहेब भोसले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात ते म्हणाले की, सम्राट अशोक यांच्यासारखा शौर्यवान, नीतिवान, धैर्यशील आणि बुद्ध धम्माचा विचार, आचार व संस्कार संपूर्ण जगभर पोहोचवणारा महान शासक इतिहासात दुसरा झाला नाही. अखंड भारताची संकल्पना साकार करणारे सम्राट अशोक हे खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी राजे होते. भारतीय बौद्ध महासभेने सम्राट अशोकांचा फोटो आदर्शांच्या यादीत समाविष्ट करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असून, त्यांच्या विचारांचा प्रसार प्रत्येक कार्यक्रमातून व्हायला हवा, असे त्यांनी नमूद केले.
भोसले पुढे म्हणाले की, समाजातील मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याची आज गरज आहे. सम्राट अशोकांनी बौद्ध धम्मासाठी केलेला त्याग, समर्पण आणि प्रचार-प्रसार हे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली आहे. तसेच भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘BSI मिशन 25’ अंतर्गत दिलेल्या उद्दिष्टांची तातडीने पूर्तता करण्याचे आवाहन त्यांनी पदाधिकाऱ्यांना केले. सम्राट अशोक जयंतीनिमित्त केंद्र व राज्य पातळीवरून सर्वांना शुभेच्छा देत त्यांनी भविष्यात अशोकांच्या सन्मानासाठी सकारात्मक निर्णय घेतले जातील, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा (पूर्व) चे संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे यांनी सम्राट अशोकांचा बौद्ध धम्माकडे झालेला प्रवास, कलिंग युद्धानंतर घडलेला परिवर्तनाचा टप्पा आणि त्यांनी केलेला धम्माचा व्यापक प्रसार यावर सखोल विवेचन केले. त्यांनी अशोकांच्या धम्मनीतीतून समाजाला मिळणाऱ्या मूल्यांचा विशेष उल्लेख केला.

फलटण तालुका शाखेचे माजी अध्यक्ष शिवाजी सावंत यांनी आपल्या भाषणात सम्राट अशोकांच्या जीवनकार्याचा आढावा घेत त्यांच्या राज्यकारभारातील जनकल्याणकारी धोरणे, न्यायप्रियता आणि धर्मनिरपेक्षतेचे महत्त्व अधोरेखित केले.

बौद्धाचार्य व साहित्यिक भीमराव लोंढे यांनी सम्राट अशोकांच्या कार्याचे तत्त्वज्ञानात्मक विश्लेषण करत त्यांच्या धम्मकार्याची आजच्या काळातील उपयुक्तता स्पष्ट केली.

वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी अशोक भोसले यांनी सध्याच्या सामाजिक व राजकीय परिस्थितीचा आढावा घेत, अशा परिस्थितीत सम्राट अशोकांच्या जयंतीचे आयोजन करण्याचा भारतीय बौद्ध महासभेचा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. त्यांनी या उपक्रमाचे स्वागत करत सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी भारतीय बौद्ध महासभा फलटण तालुका महिला शाखेच्या अध्यक्षा आयुनि रंजना रणवरे यांनी उपस्थितांना शुभेच्छा देत, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या महिलांचे व त्यांच्या धम्मकार्याचे कौतुक केले.

महिला विभागाच्या अध्यक्षा आयुनि सुजाता गायकवाड यांनी सम्राट अशोकांच्या जीवनकार्याचा आढावा घेत, विशेषतः तरुणांनी पुढे येऊन या विचारप्रवाहात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. त्यांनी महिला व युवकांनी संघटनात्मक कार्यात अधिकाधिक सहभाग नोंदवण्याची गरज व्यक्त केली.

जिल्हाध्यक्ष नानासो मोहिते यांनी कार्यक्रमाचे नियोजन केंद्र व राज्याच्या सूचनांनुसार काटेकोरपणे पार पाडल्याचे सांगत, आगामी काळात सम्राट अशोक जयंती अधिक व्यापक स्वरूपात साजरी करण्याचा संकल्प व्यक्त केला.

कार्यक्रमात विजय लोंढे यांनी कविता व गीतांच्या माध्यमातून सम्राट अशोकांना अभिवादन करत उपस्थितांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्याचे ऑडिटर आयु.अरुण साहेबराव गायकवाड यांनी केले.
यावेळी मोगराळे येथील शिलवान, गुणवान बौध्द उपासक आयु.आबा भोसले यांनी जयंतीचे औचित्य साधून सर्वांना जिलेबीचे वाटप केले.
या कार्यक्रमास आयु. दादासाहेब भोसले, आयु.अरुण साहेबराव गायकवाड, आयु. नानासो मोहिते, आयु. सुजाता गायकवाड, सोमीनाथ घोरपडे, संपत भोसले, शिवाजी सावंत, आबा भोसले, रंजना रणवरे, अशोक भोसले, राजकुमार रणवरे, विजय लोंढे, भीमराव लोंढे तसेच माता रमाई ग्रुपच्या महिला सदस्यांसह वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा महिला प्रमुख चित्राताई गायकवाड, अश्विनी अहिवळे, ज्येष्ठ समाज सेविका कांताताई काकडे, रजनी माने, आरती काकडे आणि मोठ्या संख्येने बौद्ध उपासक-उपासिका उपस्थित होते.

चक्रवर्ती सम्राट अशोकांचा आदर्श अंगीकारून समाज एकत्र आणण्याची गरज – दादासाहेब भोसले

0
चक्रवर्ती सम्राट अशोकांचा आदर्श अंगीकारून समाज एकत्र आणण्याची गरज – दादासाहेब भोसले

चक्रवर्ती सम्राट अशोकांचा आदर्श अंगीकारून समाज एकत्र आणण्याची गरज – दादासाहेब भोसले


फलटण : चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या 2330 व्या जयंतीनिमित्त फुले-शाहू-आंबेडकर सभागृह, बुद्ध विहार, कोळकी येथे भारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा (पूर्व) यांच्या वतीने जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमासाठी भारतीय बौद्ध महासभा राज्य शाखेचे संघटक तसेच समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर व सातारा-पुणे जिल्ह्याचे प्रभारी आयुष्यमान दादासाहेब भोसले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात ते म्हणाले की, सम्राट अशोक यांच्यासारखा शौर्यवान, नीतिवान, धैर्यशील आणि बुद्ध धम्माचा विचार, आचार व संस्कार संपूर्ण जगभर पोहोचवणारा महान शासक इतिहासात दुसरा झाला नाही. अखंड भारताची संकल्पना साकार करणारे सम्राट अशोक हे खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी राजे होते. भारतीय बौद्ध महासभेने सम्राट अशोकांचा फोटो आदर्शांच्या यादीत समाविष्ट करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असून, त्यांच्या विचारांचा प्रसार प्रत्येक कार्यक्रमातून व्हायला हवा, असे त्यांनी नमूद केले.
भोसले पुढे म्हणाले की, समाजातील मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याची आज गरज आहे. सम्राट अशोकांनी बौद्ध धम्मासाठी केलेला त्याग, समर्पण आणि प्रचार-प्रसार हे सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आपली आहे. तसेच भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘BSI मिशन 25’ अंतर्गत दिलेल्या उद्दिष्टांची तातडीने पूर्तता करण्याचे आवाहन त्यांनी पदाधिकाऱ्यांना केले. सम्राट अशोक जयंतीनिमित्त केंद्र व राज्य पातळीवरून सर्वांना शुभेच्छा देत त्यांनी भविष्यात अशोकांच्या सन्मानासाठी सकारात्मक निर्णय घेतले जातील, असा विश्वास व्यक्त केला.

यावेळी भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा (पूर्व) चे संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे यांनी सम्राट अशोकांचा बौद्ध धम्माकडे झालेला प्रवास, कलिंग युद्धानंतर घडलेला परिवर्तनाचा टप्पा आणि त्यांनी केलेला धम्माचा व्यापक प्रसार यावर सखोल विवेचन केले. त्यांनी अशोकांच्या धम्मनीतीतून समाजाला मिळणाऱ्या मूल्यांचा विशेष उल्लेख केला.

फलटण तालुका शाखेचे माजी अध्यक्ष शिवाजी सावंत यांनी आपल्या भाषणात सम्राट अशोकांच्या जीवनकार्याचा आढावा घेत त्यांच्या राज्यकारभारातील जनकल्याणकारी धोरणे, न्यायप्रियता आणि धर्मनिरपेक्षतेचे महत्त्व अधोरेखित केले.

बौद्धाचार्य व साहित्यिक भीमराव लोंढे यांनी सम्राट अशोकांच्या कार्याचे तत्त्वज्ञानात्मक विश्लेषण करत त्यांच्या धम्मकार्याची आजच्या काळातील उपयुक्तता स्पष्ट केली.

वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी अशोक भोसले यांनी सध्याच्या सामाजिक व राजकीय परिस्थितीचा आढावा घेत, अशा परिस्थितीत सम्राट अशोकांच्या जयंतीचे आयोजन करण्याचा भारतीय बौद्ध महासभेचा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले. त्यांनी या उपक्रमाचे स्वागत करत सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी भारतीय बौद्ध महासभा फलटण तालुका महिला शाखेच्या अध्यक्षा आयुनि रंजना रणवरे यांनी उपस्थितांना शुभेच्छा देत, कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या महिलांचे व त्यांच्या धम्मकार्याचे कौतुक केले.

महिला विभागाच्या अध्यक्षा आयुनि सुजाता गायकवाड यांनी सम्राट अशोकांच्या जीवनकार्याचा आढावा घेत, विशेषतः तरुणांनी पुढे येऊन या विचारप्रवाहात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले. त्यांनी महिला व युवकांनी संघटनात्मक कार्यात अधिकाधिक सहभाग नोंदवण्याची गरज व्यक्त केली.

जिल्हाध्यक्ष नानासो मोहिते यांनी कार्यक्रमाचे नियोजन केंद्र व राज्याच्या सूचनांनुसार काटेकोरपणे पार पाडल्याचे सांगत, आगामी काळात सम्राट अशोक जयंती अधिक व्यापक स्वरूपात साजरी करण्याचा संकल्प व्यक्त केला.

कार्यक्रमात विजय लोंढे यांनी कविता व गीतांच्या माध्यमातून सम्राट अशोकांना अभिवादन करत उपस्थितांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्याचे ऑडिटर आयु. साहेबराव गायकवाड यांनी केले.
या कार्यक्रमास आयु. दादासाहेब भोसले, आयु. साहेबराव गायकवाड, आयु. नानासो मोहिते, आयु. सुजाता गायकवाड, सोमीनाथ घोरपडे, संपत भोसले, शिवाजी सावंत, आबा भोसले, रंजना रणवरे, अशोक भोसले, राजकुमार रणवरे, विजय लोंढे, भीमराव लोंढे तसेच माता रमाई ग्रुपच्या महिला सदस्यांसह वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा महिला प्रमुख चित्राताई गायकवाड, अश्विनी अहिवळे, ज्येष्ठ समाज सेविका कांताताई काकडे, रजनी माने, आरती काकडे आणि मोठ्या संख्येने बौद्ध उपासक-उपासिका उपस्थित होते.

तोंडले येथे रंगला बालआनंद मेळावा; परतवडी शाळेच्या विद्यार्थ्यांचे शिवरायांवरील नृत्य सादरीकरण ठरले आकर्षण!

0
तोंडले येथे रंगला बालआनंद मेळावा; परतवडी शाळेच्या विद्यार्थ्यांचे शिवरायांवरील नृत्य सादरीकरण ठरले आकर्षण!

तोंडले येथे रंगला बालआनंद मेळावा; परतवडी शाळेच्या विद्यार्थ्यांचे शिवरायांवरील नृत्य सादरीकरण ठरले आकर्षण!


दहिवडी (ता. माण) : सातारा जिल्हा परिषद, पंचायत समिती माण आणि केंद्रसमूह तोंडले यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ साठी केंद्रस्तरीय बालआनंद मेळावा मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला. शुक्रवार, २७ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा तोंडले येथे हा मेळावा संपन्न झाला.
या मेळाव्यात केंद्रसमूहातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला. शैक्षणिक, सांस्कृतिक आणि क्रीडा उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आपली कला, कौशल्ये आणि सर्जनशीलता सादर करण्याची उत्तम संधी मिळाली. कार्यक्रमास मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी तसेच पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बालचमूंचा उत्साह द्विगुणित केला.
या कार्यक्रमासाठी मान्यवर म्हणून जिल्हा परिषद सदस्या मा. सौ. सोनलताई गोरे व मा. सौ. अलका जगदाळे, पंचायत समिती माणचे सभापती मा. श्री. विक्रम शिंगाडे, उपसभापती मा. सौ. प्रियांका जगदाळे तसेच सदस्या मा. सौ. उषा भोसले, मा. श्री. बाळकृष्ण कदम आणि मा. श्री. अर्जुन काळे उपस्थित होते.
तसेच विशेष उपस्थितीत गटविकास अधिकारी मा. श्री. प्रदीप शेंडगे, गटशिक्षणाधिकारी मा. डॉ. चंद्रकांत खाडे, सहाय्यक गटविकास अधिकारी मा. श्री. लक्ष्मण पिसे, भाग विस्तार अधिकारी (शिक्षण) मा. श्री. विजयकुमार गंबरे, मा. शमिमबानू तांबोळी आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली.
🎭  शाळेच्या विद्यार्थ्यांचा देखणा सांस्कृतिक आविष्कार
या मेळाव्यात जिल्हा परिषद शाळा परतवडी येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेले छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित नृत्य विशेष आकर्षण ठरले. मुलींनी ‘शिवरायांच्या वाघिणी’ तर मुलांनी ‘मावळे’ बनून सादर केलेल्या नृत्याने उपस्थित प्रेक्षक, पालक आणि मान्यवरांची मने जिंकली.
या उत्कृष्ट सादरीकरणासाठी मुख्याध्यापिका सौ. स्वाती साळवे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच सौ. रुपाली पवार मॅडम आणि विषय शिक्षक श्री. सुर्यकांत सुस्तरफोड सर यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी या नृत्यांची प्रभावी मांडणी केली.
✨ एकूणच, हा बालआनंद मेळावा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा, आनंदाचा आणि कलागुणांना वाव देणारा अविस्मरणीय उत्सव ठरला.

फलटणचा_टायगर : समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची जनतेच्या हृदयात घर करणारी नेतृत्वगाथा

0
फलटणचा_टायगर : समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची जनतेच्या हृदयात घर करणारी नेतृत्वगाथा


फलटण प्रतिनिधी :- फलटणच्या राजकारणात अनेक नेते आले आणि गेले, मात्र काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात जी थेट जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवतात. बॉलीवूडमधील महानायक अमिताभ बच्चन यांचा “हम जहाँ खड़े होते हैं, लाईन वहीं से शुरू होती है!” हा गाजलेला डायलॉग जसा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला शोभून दिसतो, तसाच तो फलटणचे लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्याही कार्यशैलीला तंतोतंत लागू पडतो. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या राजकीय आणि सामाजिक प्रवासाचा हा विशेष आढावा.
फलटण नगरपरिषदेमध्ये प्रशासनावर प्रभावी पकड कशी ठेवावी आणि प्रलंबित विकासकामांना गती कशी द्यावी, याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे समशेरसिंह. ते खऱ्या अर्थाने ‘बॉस’ असले तरी हुकूमशहा नसून जनतेचे सेवक आहेत. त्यांच्या वेगवान निर्णयक्षमतेमुळे आणि स्पष्ट व्हिजनमुळे विरोधकांसाठी त्यांच्याशी स्पर्धा करणे कठीण झाले आहे. अनिल कपूर यांच्या नायक चित्रपटातील नायकाप्रमाणे प्रशासन हलवून सोडण्याची ताकद त्यांच्या कार्यपद्धतीत दिसून येते. ‘तारीख पे तारीख’ न देता थेट निर्णय घेण्यावर त्यांचा भर असतो.
सत्तेचा माज किंवा दिखावा न करता साधेपणाने काम करणारे समशेरसिंह हे राजकारणातील अपवादात्मक व्यक्तिमत्त्व आहेत. VIP संस्कृतीपासून दूर राहून ते थेट जनतेशी जोडलेले आहेत. कोणतीही वेळ असो—रात्री असो वा दिवस—ते लोकांच्या मदतीसाठी तत्पर असतात. एसी केबिनमध्ये बसण्यापेक्षा रस्त्यावर उतरून लोकांच्या समस्या सोडवणे हेच त्यांचे खरे वैशिष्ट्य आहे.
सामान्य माणसाला अडचण आली की सर्वप्रथम आठवण येते ती समशेरसिंहांची. पाणी, रस्ते, आरोग्य सेवा अशा मूलभूत प्रश्नांवर ते तत्काळ प्रतिसाद देतात. अन्यायाविरुद्ध उभे राहणे आणि गरजूंना मदतीचा हात देणे, यामुळे ते ‘संकटमोचक’ म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत.
राजकारणात वारसा टिकवणे आणि वाढवणे हे मोठे आव्हान असते. माजी खासदार कै. हिंदुराव नाईक निंबाळकर यांनी पाहिलेले विकासाचे स्वप्न आज त्यांचे पुत्र रणजितसिंह आणि समशेरसिंह यशस्वीपणे पुढे नेत आहेत. प्रामाणिकपणा आणि पारदर्शकतेच्या मार्गावर चालत त्यांनी वडिलांच्या कार्याचा सन्मान राखला आहे.
फलटणमध्ये ‘करण-अर्जुन’सारखी भक्कम भावांची जोडी विकासाचे चक्र वेगाने पुढे नेत आहे. रणजितसिंह यांचे व्यापक व्हिजन आणि उच्चस्तरीय संपर्क, तसेच समशेरसिंह यांची स्थानिक पातळीवरील प्रभावी अंमलबजावणी—या समीकरणामुळे शहराचा चेहरामोहरा झपाट्याने बदलत आहे.
या विकासयात्रेत ‘नारीशक्ती’चाही मोठा वाटा आहे. महिलांच्या प्रश्नांवर काम करताना कुटुंबातील महिलांची भक्कम साथ लाभत आहे. बचत गट, आरोग्य, सुरक्षितता आणि रोजगार यांसारख्या विषयांवर त्यांच्या योगदानामुळे विकासाला अधिक बळ मिळाले आहे.
अलीकडील काळात फलटणमध्ये मंजूर झालेली कोट्यवधींची विकासकामे, भव्य स्टेडियम आणि प्रशासकीय इमारती पाहता नागरिकांच्या अपेक्षा अधिक उंचावल्या आहेत. “पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त!” या भावनेने प्रेरित होऊन फलटणला एक आदर्श ‘स्मार्ट सिटी’ बनवण्याचे त्यांचे स्वप्न आकार घेत आहे.
साधेपणा, तत्परता आणि जनसेवेची निष्ठा जपणाऱ्या या ‘फलटणच्या टायगर’ला वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा. “जिंदगी लंबी नहीं, बड़ी होनी चाहिए…” या विचाराप्रमाणे त्यांचे कार्य खरोखरच मोठे आणि प्रभावी आहे.

सातारा जिल्ह्यात इंधन मुबलक; साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा

0
सातारा जिल्ह्यात इंधन मुबलक; साठेबाजी व काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा

फलटण प्रतिनिधी (उमेश काकडे ): आंतरराष्ट्रीय व आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन तुटवड्याच्या अफवा पसरत असल्या तरी सातारा जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
IOCL, BPCL आणि HPCL या तेल कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी जिल्ह्यात इंधनाची कमतरता नसल्याचे स्पष्ट केले आहे. काही पेट्रोल पंपांवर “Advance Payment System” मुळे पुरवठ्यात तात्पुरता अडथळा निर्माण झाल्याचे सांगण्यात आले आहे.
युद्धजन्य परिस्थितीचा गैरफायदा घेत इंधनाची साठेबाजी करणे किंवा जास्त दराने विक्री करणे हा जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ अंतर्गत गंभीर गुन्हा असून अशा प्रकारांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
तसेच, सुरक्षेच्या दृष्टीने प्लास्टिक बाटल्या, कॅन, ड्रम किंवा इतर अप्रमाणित कंटेनरमध्ये इंधन विक्रीस पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पंपचालकांवर आणि संबंधित ग्राहकांवर कठोर कारवाई होणार असून संबंधित पंपांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची शिफारस करण्यात येणार आहे.
जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनास सहकार्य करावे आणि बेकायदेशीर साठेबाजी किंवा काळाबाजाराच्या घटना आढळल्यास तात्काळ जिल्हा पुरवठा कार्यालयाशी संपर्क साधावा.

नीलम गोऱ्हेंचा आदेश रद्द, तुषार दोशींचे निलंबन नाहीच; पोलीस अधीक्षक सातारा कार्यालयात दाखल

0


सातारा: पोलीस अधीक्षक तुषार दोशी हे आज त्यांचा पोलीस (Police) मुख्यालयात हजर झाले असून दैनंदिन कामकाजाला देखील त्यांनी सुरुवात केल्याचं पहायला मिळालं. विधिमंडळ अधिवेशन कार्यकाळात उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी तुषार दोशींच्या (Tushar doshi) निलंबनाचे आदेश दिले होते. मात्र, अधिवेशनाच्या शेवटच्यादिवशी सभापती राम शिंदे यांनी उपसभापतींचा आदेश रद्द करत सातारा (Satara) जिल्हा परिषद अध्यक्षपदी चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे, तुषार दोशी यांचे निलंबन झाले की नाही, हा प्रश्न अनुत्तरीत होता. मात्र, तुषार दोशी आज आपल्या कार्यालयात हजर झाल्याने त्यांचे निलंबन झाले नसल्याचे स्पष्ट झालं आहे. 

जिल्हा परिषद निवडणूक अध्यक्षपदाच्या निवडीवेळी राष्ट्रवादीच्या दोन सदस्यांना जिल्हा परिषद सभागृहात घेऊन जाताना मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांना पोलिसांकडून धक्काबुक्की झाली होती. या दरम्यान झालेल्या गोंधळानंतर मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि त्यांच्या काही अधिकाऱ्यांना निलंबित करावे अशी मागणी केली होती. या मागणीनंतर सभागृहात उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी तुषार दोशी यांना निलंबित करण्याचे निर्देशही दिले होते. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकाराची चौकशी केली जाईल असे सांगितले. तसेच, सभापती, उपसभापती आणि तालिका अध्यक्षांच्या अधिकारासंदर्भातही त्यांनी कायदेशीर बाजू तपासण्याची गरज असल्याचे म्हटले होते. त्यातच, अधिवेशनाच्या शेवटच्यादिवशी सभापती राम शिंदे यांनी नीलम गोऱ्हेंनी दिलेले आदेश रद्द केले. 

या घटनाक्रमानंतर पोलिस अधीक्षक दोशी हे आज दोन दिवसांनंतर पोलिस मुख्यालयात हजर झाले आहेत. त्यामुळे, त्यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली किंवा त्यांचे निलंबन झालेच नाही, हे स्प्ट झालं आहे. 

विधानपरिषदेचे कामकाज तहकूब 

सभापती राम शिंदे यांनी दिलेल्या आदेशानंतर साताऱ्याचे एसपी तुषार दोशींचे निलंबन झाले की नाही? असा सवाल मंत्री शंभुराजे देसाईंनी सभागृहात केला होता.तसेच, निलंबन केलं की नाही ते सांगावे नाहीतर आम्ही कोर्टात जाऊ, असे शशिकांत शिंदेंनी म्हटले. त्यावर आता बोलणे उचित नाही, असे उत्तर सभापती राम शिंदे यांनी दिले. त्यानंतर, सातारा प्रकरणावरून विधानपरिषदेचे कामकाज अर्धा तास तहकूब करण्यात आले. शिवसेना नेते तथा मंत्री उदय सामतं, शंभुराजे देसाई, शशिकांत शिंदे यांनी आक्षेप घेतला. या आक्षेपानंतर विधानपरिषदेचे कामकाज तहकूब करण्यात आले. 

हेही वाचा

Uddhav Thackeray-Priyanka Chaturvedi Meeting: शरद पवारांचं नाव का घेतलं?, प्रियंका चतुर्वेदी भडकल्या; उद्धव ठाकरे म्हणाले, मी पक्षप्रमुख…

आणखी वाचा



Source link

तोंडले केंद्रातील बालआनंद मेळाव्याचे सस्नेह निमंत्रण; विद्यार्थ्यांच्या सहभागाचे आवाहन

0
तोंडले केंद्रातील बालआनंद मेळाव्याचे सस्नेह निमंत्रण; विद्यार्थ्यांच्या सहभागाचे आवाहन

दहिवडी (माण) :- सातारा जिल्हा परिषद सातारा, पंचायत समिती माण व केंद्रसमूह तोंडले यांच्या वतीने सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठी केंद्रस्तरीय बालआनंद मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा शुक्रवार दि. २७ मार्च २०२६ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा तोंडले (ता. माण, जि. सातारा) येथे संपन्न होणार आहे.

केंद्रसमूहातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी हा मेळावा आनंद, कौशल्यविकास आणि सर्जनशीलतेचा उत्सव ठरणार आहे. विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांना आपली कला सादर करण्याची संधी मिळणार आहे.
या कार्यक्रमासाठी सातारा जिल्हा परिषद सदस्या  मा. सौ. सोनलताई गोरे व मा. सौ. अलका जगदाळे, तसेच पंचायत समिती माणचे सभापती मा . श्री . विक्रम शिंगाडे , उपसभापती मा . सौ . प्रियांका जगदाळे व सदस्या मा . सौ . उषा भोसले, मा. श्री. बाळकृष्ण कदम व मा. श्री. अर्जुन काळे हे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित राहणार आहेत.
विशेष उपस्थितीत गटविकास अधिकारी मा. श्री. प्रदीप शेंडगे, (गटशिक्षणाधिकारी पं स माण )  मा. डॉ. श्री. चंद्रकांत खाडे . (सहाय्यक गटविकास अधिकारी पं.स.माण )मा. श्री. लक्ष्मण पिसे, भाग विस्तार अधिकारी (शिक्षण) मा. श्री. विजयकुमार गंबरे, भाग विस्तार अधिकारी (शिक्षण), बीट मलवडी तसेच  मा. शमिमबानू तांबोळी भाग विस्तार अधिकारी (शिक्षण), बीट मार्डी यांची उपस्थिती लाभणार आहे.

या बालआनंद मेळाव्यास मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी तसेच पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून बालचमूंचा उत्साह वाढवावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
कार्यक्रमाचे आयोजन केंद्रप्रमुख मा. सौ. साधना झणझणे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य यांच्या सहकार्याने करण्यात आले आहे.

फलटण नगरपरिषद सभेत ४६ ठराव मंजूर; नामांतराच्या मुद्द्यावर जोरदार खडाजंगी

0
फलटण नगरपरिषद सभेत ४६ ठराव मंजूर; नामांतराच्या मुद्द्यावर जोरदार खडाजंगी

फलटण :- फलटण नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत तब्बल ४६ विषयांना मंजुरी देण्यात आली. विरोधी नगरसेवकांनी काही विषयांवर उपसूचना मांडून विरोध दर्शवला; मात्र सत्तारूढ पक्षाच्या बहुमतामुळे त्या फेटाळण्यात आल्या. या सभेत नामांतराचा मुद्दा सर्वाधिक चर्चेचा ठरला असून, यावरून सत्ताधारी आणि विरोधक नगरसेवकांमध्ये तीव्र वाद झाल्याचे पाहायला मिळाले.
तीन तास चाललेल्या या बैठकीत शहरातील रस्ते, चौक, इमारती आणि सभागृहांना नवी नावे देण्याच्या प्रस्तावांवर चर्चा झाली. नवीन नगरपरिषद इमारतीला ‘छत्रपती शिवाजी महाराज भवन’, सभागृहांना ‘क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले’ व ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ अशी नावे देण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. तसेच जुन्या इमारतीला ‘छत्रपती सईबाई महाराणी भवन’, ‘श्रीमंत रामराजे शॉपिंग सेंटर’ला ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शॉपिंग सेंटर’ असे नामांतर करण्याबाबतही चर्चा झाली.
याशिवाय विविध भागांना ‘माता रमाई चौक’, ‘छत्रपती संभाजी नगर’, ‘छत्रपती सईबाई महाराणी साहेब नगर’ आणि ‘फिरंगाई देवी नगर’ अशी नावे देण्याची मागणी सत्ताधाऱ्यांनी केली. या प्रस्तावांवरून सभागृहात वातावरण तापले होते. “महापुरुष हे आमची अस्मिता आहेत,” असे म्हणत नगरसेवक सचिन अहिवळे यांनी आक्रमक भूमिका घेतली, तर “महापुरुषांना जातीपुरते मर्यादित करू नये,” असे प्रतिपादन नगरसेवक विकास काकडे यांनी केले.
नगरसेविका श्वेता तारळकर यांनी मांडलेली उपसूचना सत्ताधाऱ्यांनी नाकारली. दरम्यान, विविध प्राधिकरणांना ना हरकत दाखले देण्याच्या ठरावावर नगरसेवक अनिकेतराजे नाईक निंचाळकर यांनी कायदेशीर आक्षेप घेतला. हा ठराव कायद्याच्या विरोधात ठरू शकतो, असा मुद्दा त्यांनी मांडला. यावर नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी स्पष्टीकरण देत मोठ्या निधीच्या कामांना अडथळा येऊ नये म्हणूनच हा निर्णय घेतल्याचे सांगितले.
अखेर बहुमताच्या जोरावर हा ठराव मंजूर करण्यात आला. याशिवाय सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करणे, गाळ्यांचे फेरलिलाव करणे यांसारखे इतर प्रस्तावही मंजूर करण्यात आले.

फलटण नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा: ४६ ठरावांना मंजुरी; इमारतींना महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय गाजला

0
फलटण नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा: ४६ ठरावांना मंजुरी; इमारतींना महापुरुषांची नावे देण्याचा निर्णय गाजला


फलटण : फलटण नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेत शहर विकास, प्रशासनिक सुधारणा आणि विविध योजनांशी संबंधित एकूण ४६ महत्त्वाचे ठराव मंजूर करण्यात आले. यामध्ये शहर हद्दवाढ, स्टेडियम उभारणी तसेच नगरपरिषद इमारती व सभागृहांना महापुरुषांची नावे देण्याचा ठराव विशेष चर्चेचा विषय ठरला.
उपनगराध्यक्षा सौ. प्रियदर्शनी रणजितसिंह भोसले आणि मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या उपस्थितीत झालेल्या या सभेस नगरसेवक व विविध विभागांचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला नगरसेवक विकास काकडे यांनी नव्याने निवडून आलेल्या सदस्यांना शासन निर्णयांची माहिती देण्याची मागणी केली. यावर मुख्याधिकाऱ्यांनी सर्व निर्णयांची नोंद मिनिट्स बुकमध्ये होत असल्याचे स्पष्ट केले.
सभेत सन २०२६-२७ साठी विविध विभागांच्या वार्षिक निविदा मागविण्याचा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेतील कामांवर चर्चा करताना काही प्रभागांमध्ये कामे कमी झाल्याची तक्रार करण्यात आली. नगराध्यक्षांनी मागणीअभावी कामे न झाल्याचे सांगत स्पष्टिकरण दिले.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतील कामांवरही चर्चा झाली. “नमो उद्यान” उभारणीसंदर्भात वन विभागाच्या जागेचा विचार करण्याची सूचना मांडण्यात आली, मात्र त्यासाठी अधिक वेळ लागणार असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले. पेठ मंगळवार येथील बुद्ध विहार दुरुस्तीचा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर झाला.
शहर विकास आराखड्याच्या चर्चेत झोपडपट्टी भागांनाही निधी देण्याची मागणी करण्यात आली. विरोधी सदस्यांनी त्यांच्या मतांना पुरेसे महत्त्व दिले जात नसल्याची नाराजी व्यक्त केली. यावर नगराध्यक्षांनी सहा महिन्यांत रस्ते सुधारण्याचे आश्वासन दिले.
निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणीही सभेत करण्यात आली असून त्यास सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला.
सभेतील सर्वाधिक चर्चेचा विषय म्हणजे नगरपरिषदेच्या इमारती व सभागृहांना महापुरुषांची नावे देण्याचा प्रस्ताव. या मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधी गटात तीव्र वादविवाद झाला. विरोधी सदस्यांनी विद्यमान नावे कायम ठेवण्याची भूमिका घेतली, तर सत्ताधारी गटाने महापुरुषांचा सन्मान करण्याचा मुद्दा मांडला. अखेरीस हा प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला.
नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांसाठी नवीन वाहन खरेदीचा प्रस्तावही मंजूर करण्यात आला. शहर हद्दवाढीच्या प्रस्तावात जाधववाडी परिसराचा प्राधान्याने समावेश करण्याची मागणी करण्यात आली. फरांदवाडी येथे स्टेडियम उभारणीसंदर्भातही चर्चा झाली.
याशिवाय विविध विकास कामांसाठी जमीन खरेदी, मनुष्यबळ उपलब्धता, दिव्यांगांसाठी निधी, कार्यालयीन सुधारणा, नवीन शौचालये, भुयारी गटार योजना, एलएएन प्रणाली, सीसीटीव्ही यंत्रणा, सुरक्षा रक्षक नेमणूक, बाजार व्यवस्थापन आणि थकीत गाळ्यांवर कारवाई यांसारख्या विषयांवर महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
पाणीपुरवठा कामातील त्रुटींवरून आलेल्या तक्रारीवर चर्चा करून चौकशीसाठी समिती नेमण्याचा निर्णय घेण्यात आला. आवश्यक असल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले. वीज विभागासोबत कराराचा विषय मात्र स्थगित ठेवण्यात आला.
सभेच्या शेवटी ध्वनीप्रणालीबाबत तक्रार नोंदवण्यात आली असून पुढील बैठकीत सुधारणा करण्याचे आश्वासन देण्यात आले.
एकूणच, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले गेले असून ही सभा फलटणच्या विकासाच्या दृष्टीने निर्णायक ठरणार आहे.